मदतपुस्तिका

Submitted by admin on 24 March, 2008 - 17:54

मायबोलीवर लेखन कसे करावे, येथील विविध सुविधा कशा वापराव्यात यासंबंधीची माहिती, व सभासदांकडून वारंवार विचारल्या जाणार्‍या प्रश्नांची उत्तरे या मदतपुस्तिकेत मिळतील. तुम्हांला अपेक्षित असलेल्या प्रश्नाचे उत्तर मिळाले नाही, तर कृपया आपला प्रश्न नवीन प्रतिसादाची सोय वापरुन विचारावा, ही विनंती.

मुख्य पानावर उजवीकडे काही निवडक लेखांचे हायलाईट्स चित्रांसह येतात,
तशाच पद्धतीने माझ्या पुढील लेख आणायचा असेल तर काय करावे लागेल?

http://www.maayboli.com/node/13714

तो निर्णय अ‍ॅडमिन घेतात की लेख प्रतिसादांच्या संख्येनुसार आपोआप येतात मुख्य पानांवर?

मला काय म्हणायचे आहे ते पुढील स्क्रिनशॉटवरुन समजेलः

example.JPG

मंदार जोशी
मायबोलीच्या मुख्य पानावर कुठले साहित्य टाकायचे हा निर्णय अ‍ॅडमिन घेतात.

नीतु
तुम्हाला तुमचे स्वत:चे लेखन पानाच्या उजव्या बाजुला "माझे सदस्यत्व >> पाऊलखुणा >> फक्त लेखन" इथे दिसेल.
तुम्ही लेखन प्रकाशित केले की ते आपोआप सगळ्यांना दिसेल आणि वाचता येईल.

सॅम
हो गुलमोहर विभागात लेख हा प्रकार अश्यात सुरू झाला आहे. ७२ तासातील लेखन मध्ये तो दिसत नाही कारण (बहुदा) तो मायबोलीच्या ७२ तासांचे लेख दाखवण्यासाठी जो code आहे त्यात add केला गेला नाहीये अजून. अ‍ॅडमिनना तसे करण्याविषयी विनंती केली जाईल.

- मदत समिती

रुनी, ७२ तासातील लेखन मध्ये 'लेख' दिसतो (अर्थात, गेल्या ३ दिवसात कुणी लिहिला असेल तर!) पण वरती "कथा | ललित | ... | जुन्या गुलमोहरकडे" या शिर्षकांबरोबर दिसत नाही... त्यामुळे जुने लेख बघता येत नाहीत.
आणि 'लेख' आणि 'ललित' मधे काय फरक?

धागा असलेल्या लेखात जर अनेक पाने असतील तर ती १,२,३,- - - या क्रमाने दिसतात.
त्या ऐवजी उलट केले तर नविन लेख आधी दिसतील. कारण आत्ता नविन लेख पहायचे असतील तर धागा उघडून शेवट वर क्लिक करावे लागते. अनेकदा याला खुप वेळ लागतो.

earlier I had been member of maayboli as user id "rajasee" after id transformation to devanagari I had changed my id to राजसी.

for some time I used to login using devanagari rajasee id but afterwards one day I couldn't when tried to ask for new password (I thought I forgot my password) the message I had received that the email id u r providing doesn't match with ur id. then I saw that somebody else is present on maayboli with similar devanagari राजसी. id.

I had been busy to put this matter into ur notice hence as emergency I had again signed up for new id मुकुला.

But I wish to know whatever has happened to my original id राजसी. because all my history which was associated with that id as well as rajasee is lost now, it seems.

Requesting you to look into the matter at the earliest.

Regards,

तुमचा मायबोली आयडी आणि मायबोलीवरचं नाव यात थोडा गोंधळ होतोय.
मायबोली आयडी एकच असतो. एकदा तो कुणी घेतला की त्याच वेळेला दुसर्‍याला घेता येत नाही. Login साठी हाच वापरला जातो.
मायबोलीवरचं नाव कुणालाही कुठलं घेता आणि एकासारखंच दुसर्‍याला घेता येते. एकाच नावाच्या अनेक व्यक्ती असू शकतात. हे Login साठी वापरल जात नाही.

तुमचा आयडी rajasee हा नेहमीच होता तसा आहे (इंग्रजीत) तो बदलला नाहीये. तुम्ही तुमचे नाव बदलून "राजसी" केले आहे, आयडी नाही. आणि राजसी नावाच्या एकापेक्षा अनेक व्यक्ती आहेत आणि त्यात काही चूक नाही. तुम्हाला नवीन आयडी घ्यायची गरज नाही. "rajasee" ला नवीन पासवर्ड मागवू शकता.
"rajasee" या आयडीची सगळी वाटचालीच्या सगळ्या पाऊलखुणा दिसत आहेत. तुम्हाला हवे असल्यास आणि उपलब्ध असल्यास "rajasee" ID चे "राजसी" ID करू शकता.

एखाद्या सदस्याच्या अश्लील्/द्वैअर्थी पोस्टींबद्दल तक्रार करायची असेल तर काय करावे?
मला अ‍ॅटॅच्मेंट पाठवायच्या आहेत.

मंदार तुम्ही अ‍ॅडमिनना त्यांच्या प्रोफाइलमधल्या 'संपर्क' मधून याबद्दल इमेल करू शकता.
-मदत समिती

>>मंदार तुम्ही अ‍ॅडमिनना त्यांच्या प्रोफाइलमधल्या 'संपर्क' मधून याबद्दल इमेल करू शकता.
-मदत समिती

केली होती सकाळी, पण उत्तर नाही.
आणि अ‍ॅटॅच्मेंटची सोय नाही संपर्कात Sad

कार्यबाहुल्यामुळे अ‍ॅडमिन सगळ्या इ-मेल्स ना लगेच उत्तर देत असतील असे वाटत नाही. त्यांचे तुम्हाला उत्तर आल्यावर तुम्हाला त्यांचा इमेल आयडी आपोआप कळेल तेव्हा तुम्ही अटॅचमेंट करून पाठवू शकता.

पाककृती गूगल सर्च मधे शोधून मिळत नाहीत. असं का?
उदा: डांगर,पालक राईस,काळ्या वाटाण्याची उसळ,पनीर माखनी.

पाककृतींचे टायटल्स copy-paste केले सर्च बार मधे तरी रीझल्ट्स मधे नाही मिळत.
यावर काही उपाय?

मदत_समिती,
मी २ महिन्यांपूर्वी प्रकाशित केलेली प्रकाशचित्रे आता का दिसत नाहित? मी जेव्हा ती प्रकाशित केलेली होती तेव्हा ती व्यवस्थित दिसत होती.
http://www.maayboli.com/node/13804

मी ती प्रकाशचित्रे पिकासा वर upload करून ईथे link दिलेली होती . पिकासावर ती प्रकाशचित्रे अजुनही आहेत.

Hi,
How can I read the all Kadmbari ?
Now I can see only 1 under Kadmbari (Gulmohor) tab.
Please help
Thank You.

एखाद्या लेखाला प्रतिक्रिया कशी द्यायची ? मी तसा प्रयत्न केला आहे. ती पोस्ट होते पण खाली संपादन अस टायटल येतं. इतरांच्या प्रतिक्रियांच्या खाली संपादन असं कधी दिसत नाही.
मदत कराल का ?

आता वरचच उदाहरण पहा. फक्त माझ्या प्रतिसादा खाली संपादन अस लिहिलेल दिसतय. बाकी कुठेही नाही. हे का ? असा प्रश्न आहे. प्रतिक्रिया / प्रतिसाद कसे बदलायचे हा प्रश्न नाही.

shugol
तुम्हाला दुसर्‍यांनी लिहीलेले प्रतिसाद कसे बदलता येतील, स्वतःचेच बदलता येतील ना म्हणून फक्त तुमच्याच प्रत्येक पोस्ट खाली फक्त तुम्हालाच संपादन दिसते. एकदा संपादनवर टिचकी मारून बघितली असती तरी कळले असते.

maayboli var aalyavar mala khalil windows pop hot aahet. actual attack vatat nahi, pc varchya macfee scan madhe kahi detect hot nahi, pan he matra sarkhe suggest karte ki 'purchse malware'. pc reboot kelyashivya he jat nahi...Anybody else getting this?

maayboli_er.JPG

अभय, C:\Documents and Settings\All Users\\ ह्या पाथमधे शोधुन बघा. ad2.exe नावाची फाइल दिसते का ? टास्क मॅनेजरमधे पण दिसेल कदाचित. administrator लॉग इन करुन विंडोज रेजिस्ट्रीमधे ह्याच फाइलचा शोध घ्या आणि रेजिस्ट्री एंट्री काढून टाका. अशा कुठल्याही पॉप अपवर क्लिक करु नका.

cindrella: ashi kothlihi file nahiye pc var (search kela). Companyche installed macfee kahich detect karat nahiye. kal pc rrestart kelyavar parat aalya nahiyet hya windows. anyway thanks. me kahi diwas parat watch karin...

निंबुडा
हे बघा http://www.maayboli.com/node/3581

सखी,
सध्या तरी प्रत्येक पानाखाली असलेला सर्च पर्याय (त्यात गूगलऐवजी मायबोली निवडणे) एवढाच मार्ग आहे आहे पाककृती शोधण्याचा.

socrates,
या कथांबद्दल अ‍ॅडमिन यांना कळवत आहे.

अभय
IE ऐवजी Firefox वापरून बघा, त्यात Ad Block plug in मुळे pop ups बंद होतील
- मदत समिती

Hi tumhi Australia/ Newzealand madhe Maayboli-get togethers nahi ka karu shakat? nehemi US madhech hotat. (sorry mala marathitun lihayachi savay karayachi aahe)

नीता
बर्‍याचदा एकाच देशात रहाणारे मायबोलीकर स्वतःच एकमेकांशी संपर्क करून गेटटुगेदर करायचे ठरवतात. तुम्ही पण तुमच्या देशातल्या मायबोलीकरांशी संपर्क करून असे ठरवू शकता. http://www.maayboli.com/node/1767 या धाग्यावर तुम्ही ऑस्ट्रेलिया-न्युझिलंड देशातील मायबोलीकरांशी संवाद साधू शकता.
- मदत समिती

Pages