मदतपुस्तिका

Submitted by admin on 24 March, 2008 - 17:54

मायबोलीवर लेखन कसे करावे, येथील विविध सुविधा कशा वापराव्यात यासंबंधीची माहिती, व सभासदांकडून वारंवार विचारल्या जाणार्‍या प्रश्नांची उत्तरे या मदतपुस्तिकेत मिळतील. तुम्हांला अपेक्षित असलेल्या प्रश्नाचे उत्तर मिळाले नाही, तर कृपया आपला प्रश्न नवीन प्रतिसादाची सोय वापरुन विचारावा, ही विनंती.

पूर्वी मी माउसवर राइट क्लिक करून आवडलेल्या गोष्टी जीमेल करीत असे. आता तो ऑपशन मिळत नाहीये. काही बदल झालेत का? प्लीज मदत करा.

मानुषी, राईट क्लिकचा मेन्यू, तुमच्या ब्राऊझरचा असतो. त्यात काही बदल केले असतील, किंवा नविन जीमेल टूलबार ईंस्टॉल करताना कदाचित तो ऑप्शन गेला असावा. पण cntrl + c आणि cntrl + v हे ऑप्शन्स आहेतच की !

>>पुढे "बदलून" असं लिहून येतं त्याचा अर्थ काय?
लेखात/कवितेत काहीतरी बदल केला गेला आहे असा अर्थ आहे. कधी कधी हा बदल काही नजरचुकीने राहिलेल्या चुका सुधारणे, नविन मजकूर घालणे या पैकी असतो. तर काही वेळेस, अ‍ॅडमिनला सांगून धाग्यात बदल केला जातो [गप्पांचे पान ते लेखनाचा धागा] वगैरे तेव्हाही असे येते.

नमस्कार निलेश

येथे जाऊन थोडे खाली स्क्रोल केले असता एक Picture असे लिहीलेली चौकट दिसेल. त्या चौकटीत, Upload picture: अशी अक्षरे दिसतील. तिथले Browse बटण वापरून तुमचा फोटो तुम्ही तुमच्या हार्डडिस्कवरून प्रोफाईलमध्ये चिकटवू शकता.

कृपया चित्राचा आकार कमीत कमी १००x१०० असावा. तुम्ही चित्र अपलोड केल्यावर ते २००x२०० पेक्षा जास्त असेल तर, २००x२०० आकारात बदलले जाईल. नवीन चित्र बदलले की लगेच ते इतराना दिसू लागते. पण तुम्हाला स्वतःला ते दिसण्यासाठी तुमच्या Browsers चे पान ताजेतवाने (Refresh) करणे आवश्यक आहे.

>>लेखात/कवितेत काहीतरी बदल केला गेला आहे असा अर्थ आहे. <<
धन्स, नंद्या........

अजून एक क्वेरी आहे:.... माझ्या प्रोफाईलवर मी फोटो change केलाय कधीच. पण तरिही मे लोकांना टाकलेल्या विपू वर माझा जुना फोटो दिसतो.... असे कसे?

निंबुडा
त्यांच्या न्याहाळकामध्ये [Browsers मधे] जुन्या प्रकाशचित्राची साठवली गेलेली प्रत जुनीच असेल. त्यांनी त्यांच्या न्याहाळकाची [ Broswer ची] History (cache) काढून टाकली आणि पान ताजेतवाने [रिफ्रेश] केले तर हा प्रश्न सुटेल. नाहीच सुटला तर जिथे प्रॉब्लेम येतो आहे त्या सिस्टीमचे स्पेक्स कळवा.

>त्यांच्या न्याहाळकामध्ये [Browsers मधे] जुन्या प्रकाशचित्राची साठवली गेलेली प्रत जुनीच असेल. <
त्यांच्या म्हणजे कोणाच्या? मी ज्यांना विपू केली आहे त्यांच्या की मी ज्या मशीनवर्रोन माबो access करते आहे त्या मशीनच्या Browsers मध्ये?

एक मात्र आहे? मे बरेच दिवसात कुकिज् साफ केलेल्या नाहीत. म्हनून कि काय? Uhoh

>>त्यांच्या म्हणजे कोणाच्या?

त्यासाठी
>>पण तरिही मे लोकांना टाकलेल्या विपू वर माझा जुना फोटो दिसतो.... असे कसे?

तुमचा जुना फोटो 'कुणाला' दिसतो? तुम्हाला विपू लिहील्यावर दिसतो? का ज्यांना विपू लिहीली आहे त्यांना दिसतो? हे सांगा बरं.

>तुमचा जुना फोटो 'कुणाला' दिसतो? <

मलाच हो ! हा बघा..... नंद्या, जरा तुमच्या विपूत तुम्ही जाऊन बघा ना....... तुम्हांला माझा कोणता फोटो दिसतोय ते!!! तुम्हांला मी एक टेस्ट विपू टाकलीये

untitled_test.JPG

विरंगुळा या गृप मध्ये मला "लेखनाचा धागा" open करण्याची link दिसत नाहिये असे का?
whereas या गृप मध्ये इतर काही जणांनी "लेखनाचे धागे" बनवलेले दिसत आहेत. असे कसे?

निंबुडा,
तुम्ही तुमच्या वैयक्तिक्/खाजगी जागेत असलेली प्रकाशचित्रे जर काढून टाकली असतील तर ती लेखात दिसणार नाहीत. एकदा फोटो/प्रकाशचित्रं चढवलीत की ती काढून टाकण्याची गरज नाही. लेखात तिथूनच दुवा दिला जातो.

विरंगुळा ग्रूपमध्ये सदस्यांना "लेखनाचा धागा" चालू करण्याची परवानगी नाही. विनंतीनुसार मी तसे बदल केले आहेत किंवा इतर ठिकाणाचे धागे हलवले आहेत.

तुम्ही तुमच्या वैयक्तिक्/खाजगी जागेत असलेली प्रकाशचित्रे जर काढून टाकली असतील तर ती लेखात दिसणार नाहीत.

ok. पण वैयक्तिक्/खाजगी जागेची capacity संपली की पुढचे काही upload कसे करणार?

>>पण वैयक्तिक्/खाजगी जागेची capacity संपली की पुढचे काही upload कसे करणार?
नमस्कार निंबुडा,
अशावेळेस दोन पर्याय आहेत.
१. ईतर नको असलेली चित्रे काढून टाकणे.
२. ईतर साईट्स [ज्यांवरती चित्रे चढवता येतात, अशा] वापरणे आणि येथे चित्रांचा दुवा देणे.

तुम्ही तुमच्या वैयक्तिक्/खाजगी जागेत असलेली प्रकाशचित्रे जर काढून टाकली असतील तर ती लेखात दिसणार नाहीत.

माझ्या या वृ. मध्ये http://www.maayboli.com/node/16277 मी ज्या इमेजेस टाकल्या आहेत, त्या इतरांना दिसत नाहियेत, पण मला दिसत आहेत. कदाचित माझ्या कुकीज clear नाहीत म्हणून दिसताहेत. पण इतरांना न दिसण्याचे कारण माझ्या खाजगी जागेतून मी delete केल्यात हे आहे का?

वरील पानावर दोन ईमेजेस आहेत [Image0080.jpg , Untitled1.JPG] त्या तुमच्या न्याहाळकाच्या [browser] कॅशमध्ये असल्याने तुम्हाला दिसत आहेत. पण त्या तुमच्या अकाउंटमध्ये [खाजगी जागेत] दिसत नाहीत.

फू बाई फू या मालिकेतील पाठविलेल्या लिखाणाची लिंक सर्वांना मा.बो. मिंत्राना पाठवायची आहे. काय करावे लागेल. कृपया मार्गदर्शन करावे.

देवनिनाद

मी आत्ता साधारण दिड तासापूर्वीच एक कविता मायबोलीवर टाकली पण ती दुसर्‍या तिसर्‍या पानावर मला दिसते आहे आणि इतर जुने लिखाण पहिल्या पेजवर असे का?
मी जेंव्हा प्रतिक्रिया देते तेंव्हा उजव्या कोपर्‍यात संपादन असे दिसते बाकी कुणाचेच दिसत का नाही?
फक्त लेखन" हे माझ्या पेजवर दिसत का नाही?
अज्ञान दूर करावे.

सुभाषचंद्र
>>मी शेती विषयक लेख कि॑वा साहीत्य कोठे पाहु शकतो?
इथेच, मायबोलीवर. प्रत्येक पानावर शेवटी असलेली गूगल सर्च विंडो वापरून शेती विषयक लेख शोधू शकाल सहज. मायबोलीवरती शेती या नावाखाली नोंदवलेले सर्व लेख इथे दिसतील.

केअंजली

>> मी आत्ता साधारण दिड तासापूर्वीच एक कविता मायबोलीवर टाकली पण ती दुसर्‍या तिसर्‍या पानावर मला दिसते आहे आणि इतर जुने लिखाण पहिल्या पेजवर असे का?

नविन लेखन हे नविन प्रतिसादानुसार क्रमवारित केले असते. त्यामुळे तुमच्या कवितेला प्रतिक्रीया येतील तसतशी ती वर येत राहिल.

>>मी जेंव्हा प्रतिक्रिया देते तेंव्हा उजव्या कोपर्‍यात संपादन असे दिसते बाकी कुणाचेच दिसत का नाही?
कारण फक्त तुम्हालाच तुमची प्रतिक्रीया संपादित करायची परवानगी आहे म्हणून.

>> फक्त लेखन" हे माझ्या पेजवर दिसत का नाही?
हे समजले नाही. कृपया परत सविस्तर सांगणार का?

मी आत्ता साधारण दिड तासापूर्वीच एक कविता मायबोलीवर टाकली पण ती दुसर्‍या तिसर्‍या पानावर मला दिसते आहे आणि इतर जुने लिखाण पहिल्या पेजवर असे का?
>> के अंजली तुम्ही कविता पोस्ट केली त्या नंतर ईतर सर्व साहित्य, बातमी फलकांवर जशा नविन प्रतिक्रिया येतात तसे आपोआप तुमची कविता (प्रतिसाद नं आल्यास) मागे जाऊन हे नविन प्रतिसाद असलेले साहित्य, फलक पुढे येतात. तुमच्या साहित्यावर कुणी प्रतिक्रिया दिली की आपोआप तुमची कविता पुन्हा पहिल्या पानावर येईल. तुम्ही तुमच्या प्रोफाईल मधील पाउलखुणा> फक्त लेखन इथे टिचकी मारून आपण लेखन केलेल्या पानावर पुन्हा जाऊ शकता.

मी जेंव्हा प्रतिक्रिया देते तेंव्हा उजव्या कोपर्‍यात संपादन असे दिसते बाकी कुणाचेच दिसत का नाही?
>> तुम्हाला फक्त स्वतःचेच पोस्ट संपादीत करता येईल. दुसर्‍यांचे नाही Happy म्हणून तिथे ते दिसत नाही.

Pages