कोणती गाडी घ्यावी?

Submitted by साजिरा on 15 October, 2009 - 07:51

इतक्या गाड्या नि कंपन्या बाजारात आहेत, की निर्णय घेताना गोंधळ होणे साहजिकच असते. एकट्या मारुती-सुझुकीच्याच डझनावारी गाड्या आहेत. त्यात पुन्हा पेट्रोल, डिझेल शिवाय फीचर्स कमी-जास्त करून तयार केलेली मॉडेल्स. अधिक फीचर्ससाठी पन्नासेक हजार किंवा लाखभर रुपये बजेट वाढवावे, तर मग आणखी थोडे पैसे देऊन थोडी मोठी, यापेक्षा चांगली गाडी का घेऊ नये हा प्रश्न उभा रहतो. प्रत्येक कंपनीची, ब्रँडची एक इमेज आपल्या मनात ठसलेली असते. जुने बरेवाईट अनुभव पण पदरी असतात. शिवाय आपल्यापैकी बहुतेक जण कमी-जास्त फायनान्स घेऊनच गाड्या विकत घेतात. हे सारे टप्पे ओलांडून अनुभवलेली निर्णयप्रक्रिया म्हणाजे एक मोठा प्रवासच.

काही मॉडेल्स 'इंटरनॅशनल' असली, तरी भारतीय (छोटे) रस्ते अन गर्दीची (कोण बोललं रे ते- 'बेशिस्तीची म्हण की सरळ!') वाहतूक लक्षात घेता 'स्मॉल कार्स' अन 'मिडसाईझ सेदान कार्स' अर्थातच जास्त विकल्या जातात. यात पुन्हा 'गियरवाल्या' की 'ऑटोमॅटिक ट्रान्समिशनवाल्या' हेही आहेच. लक्झरी कार्स, सुपरलक्झरी कार्स, मल्टियुटिलिटी कार्स, स्पोर्ट्स युटिलिटी कार्स आणि स्पोर्ट्स लक्झरी कार्स - या सार्‍यांचाही आपापला चाहता वर्ग. सेगमेंट आहेच आहे.

तुमचे काय मत आणि अनुभव? नवीन गाडी घेणार्‍या मायबोलीकराला थोडीफार इनपुट्स मिळाली, तर तो दुवा देईल; अन भेटलाच, तर त्याच्या नव्या गाडीतून पार्टीला घेऊन जाईल- हा हेतू. Happy

याशिवाय इथेच दुचाक्या, नवीन लाँचेस, भारतातले बदलते ट्रेंड्स आणि एकूण वातावरण, इंटरनॅशनल मॉडेल्स आणि ट्रेंड्स, मेंटेनन्स टिप्स यांबद्दलही कृपया लिहा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

स्कोडा / करोला ब्येष्ट Happy

डुकाटी बाइक्स (इटालिअन), आपली एन्फील्ड बुलेट थंडर बर्ड >>> म्मामी तोडलत Happy

लॉरा आणि सुपर्ब भारीच असणार की. कारण किंमतही लिनियापेक्षा भारी, म्हणजे सव्वा आणि दीडपट आहे. Happy

किंमतीच्या बाबतीत -
फियाट लिनियाचे स्पर्धक- होंडा सिटी, फोर्ड फियेस्टा, हुडाई वरना, मारुती एसेक्स४, शेवर्ले ऑप्ट्रा
स्कोडाचे स्पर्धक- टोयोटा करोला, शेवर्ले क्रुझ, फोक्सवॅगन जेट्टा, होंडा सिव्हिक

मामी... नविन गाडी नविन गड्याच्या हाती देण्याचे धाडस कसं काय केलं... पिडा गेली हे चांगल झालं Happy

साजिरा फार उपयुक्त माहिती देत आहेस... विचार करावा काय? Wink

नविन इंडिका व्हिस्टा घ्यावी का?? मारूती८०० काढायची इच्छा अज्जिब्बात होत नाहिये. पण आता लाँग ड्राईव्हला छोटी पडते म्हणून दुसरी गाडी घ्यायची आहे (मला नव्हे, माझ्या पप्पाना!!!)

बाकी काही म्हणा....

स्टाइल आणि स्टेटसचे नॉर्म्स बाजुला ठेवले तर मारुती८०० आणि ओमनि या युटिलिटी गाड्यांना तोड नाही.... a real value for money Happy

मामी... नविन गाडी नविन गड्याच्या हाती देण्याचे धाडस कसं काय केलं... पिडा गेली हे चांगल झालं>> कभी कभी मुझे दौरे पड्ते है. अरे विश्वास ठेवला. घरी काम करणार्‍या मावशींचाच जावाई. त्या कशाला खोटे सांगतील. No issues. Its a learning experience.

मामी, मागे तुम्ही कुठे तरी कॉस्ट कटिंग मीझर म्हणून गाडी, ड्रायव्हर काढून टाकून स्कूटर वापरायला सुरुवात केल्याची वार्ता केल्याचे आठवते. आता अचानक निर्णय बदललात तो? अर्थात हा तुमचा खाजगी निर्णय आहे. पण व्यावसायिक वाहने सोड्ल्यास , प्रतिष्ठेचा प्रश्न नसेल तर गाडी असणे ही सिरियस लायेबिलिटी आहे असे माझे मत आहे. त्याला तुमच्या जुन्या निर्णयामुळे थोडीशी पुष्टी मिळाल्याचे मला वाटले होते. विचार प्रक्रियेत कसा बदल झाला हे जाणून घेणे आवडेल. विठ्ठल कामत त्यांच्या पंच का कुठल्या तारांकित हॉटेलात लोकलने जातात असे त्यानी कुठे तरी लिहिले होते. त्याचेही एक लॉजिक त्यानी मांडले आहे. अ‍ॅफोर्डेबल असूनही गेली २५ वर्षे गाडी घेण्याचे निग्रहाने टाळले आहे. हे अव्यावहारिक आहे काय? मते अपेक्षित....

मामी, मागे तुम्ही कुठे तरी कॉस्ट कटिंग मीझर म्हणून गाडी, ड्रायव्हर काढून टाकून स्कूटर वापरायला सुरुवात केल्याची वार्ता केल्याचे आठवते. आता अचानक निर्णय बदललात तो?>

निर्णय प्रक्रिया:
१) वर्कलोड वाढ्ले. सारखे फोन येतात. घेतले नाहीतर मायबाप ग्राहक रागवतात.
२) कार लोन हा डायरेक्ट एक्स्पेन्स आहे क्लेम करता येतो.
३) तसेच डेप्रिसीएशन क्लेम करता येते नाहीतर सरकारला कर द्यावा लागेल जास्ती.
४) खर्च जास्त होतो यात वादच नाही पण मला स्कूटर वरून रोज घरचे सामान वगैरे आणणे अतिशय अवघड जात होते. कामाची जड ब्रीफ्केस व रोज सामान नाहीतर भाजी नाहीतर पेडिग्रीचे मोठे प्याकेट वगैरे काहितरी.ते जमेना फारसे. फार थकून जायला होत होते. वय!
५) कार व डायवर मुळे बरीच कामे डेलिगेट करता येतात. जसे व्हेट कडे कुत्र्यांना नेणे. तो करू शकतो मला जावे लागत नाही.
६) हपिसची बरीच रूटिन कामे डायवरला येतात. बिले भरणे वगैरे. तो पण दुसरीकडे वैतागला होता. एका वाहिनीत काम होते सारखे गाडी पळवायला लागत होते.
७) गाडीतून जवळपासच्या टूर करायचा बेत आहे उन्हाळा संपला कि - जसे विजयवाडा एलुरू गुंटूर.
८) कड्क उन्हाळ्यात डोक्यावर छप्पर व एसी बरे वाट्ते खोटे का बोला?
९) जावयाला नोकरी मिळावी म्हणून मावशींनी भरीस घातले.
१०) मागील वरशातील मेहनतीचे फळ घरातील बाल व शेपटी कंपनीस द्यावे. त्यांना काहीतरी आरामात हिंडता येइल. या उद्देशाने. जितके दिवस जमेल तेवढे आपण लाड करायचे नाहीका!

त्यांनी अ‍ॅक्च्युली जुने इंजिन बदलायला हवे आहे. ते बदलले की नाही, माहिती नाही. >> अरे नविन इंजिन आहे टर्बोचे म्हणूनच विचार करत आहे. पण ती खूप काम काढते हे माहित नव्हते.>>>

डिकोर इंजिनसह नवीन सफारी आलीय! १४ चे मायलेज सांगतात पण १० च्या पुढे मिळत नाही! Happy

चंपक डायकॉर जुनेच आहे. ही सफारी २०१० साठी नविन मॉडेल आहे डायकॉर VTT इंजीन सह. आणखी बर्‍याच गोष्टी आहेत म्हणे.
मला टाटा गाड्या आवडतात. इंडिकाला लेग रुम खरच मस्त आहे. उंच माणसं (भारतीयांच्या तुलनेत) पण मस्त बसतात. माईलेजच्या बाबतीत बोलायचे तर जसे जसे इंजिन वाढत जाते तसे तसे माईलेज कमी मिळणार. अल्टो, मारुती ८०० सारख्या हलक्या गाड्याच १४ देतील पण इतर सर्व १.६ + कमी देतील असे वाटते. सफारी २.२ आहे, शिवाय वजन जास्त त्यामुळे १० मिळाले तर नशीब. फक्त ह्या गाडीची चाशी मात्र अजूनही जुन्या सफारीवर बेस आहे, त्यामुळे खूप वेगात जर वळन घेतले तर गाडी उलटायची भिती मात्र आहे.

सफारीचा जुना प्रॉब्लेम इंटिरियर होता. (तुलना अमेरिकन गाड्यांशी करतोय). टाटा जनरली चिप प्लास्टिक फार वापरतात ते तसेच आहे का? हे माहित नाही पण एकून ही गाडी चालन्याच्या बाबतीत येथील प्रिमीयम कारच्या लक्झरी सारखी चालते. (जुन्या डिकॉर मध्ये मी भरपुर सफर केली आहे. Happy )
हे मान्झा प्रकरण पण नविन दिसते. टाटानी खरच थोडी मोठी अन लक्झरी गाडी काढायला पाहिजे नाहीतर अवघड आहे. १० ते १४ लाखाच्या सेगमेंट मध्ये एक सेडान जर टाटाची आली तर मजा येईल. (टाटांना ! मला नाही.)

मामी टाटाशी जुने नाते आहे, मिठ खाल्लयं. जाउद्या म्हणून सोडून द्या. Happy तुमची निर्णय प्रक्रिया मस्त आहे. खासकरुन जावयाची नौकरी अन एसी. Happy

नविन इंडिका व्हिस्टा घ्यावी का >> चांगली गाडी आहे एवढे मात्र नक्कीच सांगेन. माझ्या नातेवाईकाने घेतली. मी डिसे मध्ये नांदेड ते पुणे हा प्रवास ही गाडी चालवून केला. (४८० किमी) मला अजिबात कंटाळा आला नाही. आवाज देखील तुलनेने फार जास्त नाही. ५ व्या गेअर मध्ये गाडी नगर पुणे हायवेवरुन ११५-२० वर आरामात न झटके देता व बॅलन्स न जाता पळत होती. हा माझ्या दृष्टीने सर्वात प्लस पॉईट. प्रसन्नाचा ढाबा जसा जवळ आला तसे गाडी आता थांबवावी लागणार, म्हणून वाईट वाटले. Happy

प्रसन्नाचा ढाबा जसा जवळ आला तसे गाडी आता थांबवावी लागणार, म्हणून वाईट वाटले. >> यंव रे गडी.
हे मुळातुनच येते. मला पण हायवे वरूनच गाडी चालवायला आवड्ते. सिटीत बिल्कूल नाही. पदोपदी भांड्णे होतात माझी. चेन्नै पाँडी इसीआर ड्राइव पण लै मस्त आहे.

खरेतर माझा प्रश्न या बीबी वर योग्य ठरत नाही .... पण मला कुणी उंदरांपासुन गाडीची रक्षा कशी करावी हे सांगेल का ? आतापर्यंत २ वेळा ए.सी.च्या वायर्स, १ वेळा हेडलाईट वायर्स, विंडस्क्रीन स्प्रे पाइप आणि पंप वायर्स खाऊन झाल्यात. तंबाकु / ग्लु पॅड ठेवला पण काहीच उपयोग झाला नाही. उंदीर मोठा आहे.

खरे तर गाडि जिथे पार्क केली आहे त्या जागेची स्वच्छता केली पाहिजे व उंदरांचा नायनाट केला पाहिजे.
आम्ही मुलुंडात रोड वर पार्क करत असू व तळमजल्यात दोन तेलाचे डेपो होते. त्यामुळे मोठ्या घुशी नांदत.
गाडीत अन्नपदार्थ सांडतात का ? त्यावासाने ते येतात. घरी कुत्रे मांजर असतील तर ते मामांना मारून टाकतील.

इंडिकाला लेग रुम खरच मस्त आहे. उंच माणसं (भारतीयांच्या तुलनेत) पण मस्त बसतात. >> असं म्हणतात की टाटाच्या गाड्या रतन टाटांना समोर ठेवून डिझाइन केल्या जातात. त्यामुळं जवळजवळ सगळ्याच टाटा कार्स मध्ये लेग रूम आणि उंची बर्‍यापैकी असते.

अल्टो, मारुती ८०० सारख्या हलक्या गाड्याच १४ देतील पण इतर सर्व १.६ + कमी देतील असे वाटते. >> छोट्या गाड्यांचं हायवेवरचं अ‍ॅव्हरेज आता बरंच चांगलं आहे. अल्टो वगैरे तर १६-१७+ देत असाव्यात. नवीन SX4ला (१.६ लीटर, VVT इंजीन) पण मारूतीवाले १६ अ‍ॅव्हरेज सांगतायत. माझी SX4 (2007 मॉडेल, Non VVT) १४ अ‍ॅव्हरेज देते.

रिट्झ, स्विफ्ट वैगरे पण (के सिरीज इंजिनवाल्या) छान देतात अ‍ॅव्हरेज. आमची रिट्झ (६-७ महिने जूनी) दिल्लीमध्ये विथ एसी १६+ देते अ‍ॅव्हरेज.

कालच टाटाने नविन १२ ते १५ लाख मध्ये गाडी आणावी असे लिहीले होते, त्यावरुन शोध घेतल्यावर कळले की दॅट वन ईज ऑलरेडी इन द मेकींग. Happy

आक्टो २०१० नंतर ही उपलब्ध होईल असे वाटत आहे. सही गाडी आहे ही.

Tata Prima.jpgTata Prima Rear.JPG

कार पुढून आणि खास करुन पाठीमागून मला जॅग सारखी वाटत आहे. जॅग ला घेतल्यापासून तशी कार भारतात व इंडिका बॉडीवर जॅगची कार येईल असे वाटत होते, आता निदान पहिले तरी सत्यात उतरत आहे. Happy कारची किंमत १२ ते १५ लाख असणार. ( बेस टू लोडेड). ही गाडी येण्याआधी टाटाची आणखी एक MUV Tata Aria पण येत आहे.

मारुतीची Kizashi पण ह्याच रेंज मध्ये आहे. ती पण भारी दिसते. ही पण आक्टो २०१० नंतर ही उपलब्ध होईल असे दिसते.

लिनिया घेणार असाल तर आणखी दोन महिने वाट पाहा. टि जेट मॉडेल येत आहे.

सुबरु भारतात केंव्हा येईल? त्याची वाट पाहत आहे. Happy

मारुतीची Kizashi मस्त दिसते. २००८ च्या ऑटोएक्स्पोमध्ये तिचे कंसेप्ट मॉडेल होते. अगदी प्रेमात पडावे असे.
तिथे ए-स्टारचे पण कंसेप्ट मॉडेल होते, ते सुद्धा खूप आवडले होते स्मॉल कार सेगमेंटमध्ये. पण कंसेप्ट मॉडेल मध्ये खूप फरक होतात नंतर. डिझाइन खूपच बदलते.

यावेळच्या ऑटोएक्सोमध्ये इतकी गर्दी होती की २-३ स्टॉल बघितल्यानंतर फिरावे वाटलेच नाही. मारुतीच्या स्टॉलवर भाऊ होता तरीसुद्धा दोन मिनिटात तिथून बाहेर पडलो. त्याचाच एक मित्र स्कोडाच्या स्टॉलवर होता, पण येतीच्या लाँचमूळे तिथे अगदी स्टॉलच्या बाहेरपर्यंत रांगा लागल्या होत्या, म्हणून त्यालाच बाहेर भेटायला बोलावले. मग त्याने येतीचे एक छोटं मॉडेल दिलं (टेबलवर ठेवण्यासाठी), ते बघून गाडी बघितल्याचं समाधान मानलं.

यावेळी फक्त बुलेट अन हार्ले डेव्हिडसन चे स्टॉल आरामात बघता आले होते.

साजिर्‍या, खुप छान माहीती दिली आहेस.
हे सर्व वाचुन माझाही गाडी घेण्याचा बेत पक्का झाला. मला आई-वडीलांसाठी गाडी घ्यायची आहे. त्यांना आताशा दगदग नाही सहन होत, सतत गावी जाणं होतं या ना त्या कारणासाठी; अन् पुर्वी सामान उचलायला आम्हा दोघांपैकी एकतरी बैल असायचा उपलब्ध :D. पण आता नोकरीनिमित्ताने आम्ही दोघेही बाहेर असल्याने ते शक्य नाही होत.
माझं बजेट आहे ४-५ लाख. मी ४ गाड्या shortlist केल्या, WagonR Duo, Ritz, Swift, Figo. गाडी रोजच्या रोज जास्त धावणार नाही, म्हणुन फक्त पेट्रोल गाड्यांचाच विचार केलाय.
WagonR Duo या लिस्ट्मध्ये फक्त एका कारणासाठी, CNG वर सुद्धा चालते म्हणुन. पण गाडी रोज धावणार नसेल, तर याचा ऊपयोग होईल का? आणखी एक गोष्ट, WagonR Duo चं इंजिन फक्त १ लि. आहे, आणि ईतर गाड्यांचं १.२ लि. आहे. यामुळे कितीसा फरक पडेल?
फिगो ची रिसेल किंमत कमी मिळेल (मला ३-४ वर्षांनी नवीन मोठी गाडी घ्यायची आहे, म्हणुन गाडी घेण्याआधीच रिसेल किंमतीचा विचार करतोय Wink ) असं मला वाटतं.
Ritz चा आकार मला प्रचंड आवडतो (मला माहीतेय की बरीच लोकं नाक मुरडतात ते, पण मला आकर्षक वाटतो.) आणि Ritz मध्ये जागा Swift पेक्षा जास्त आहे, तसंच गाडी मागुन सुद्धा ऊंच असल्यामुळे पाठीचा त्रास (माझ्या वडीलांना स्लीप-डिस्कचा त्रास आहे) असलेल्यांना फायदेशीर आहे असं मला वाटतं.
Swift काही वर्षे बाजारात असल्यामुळे तिचे फायदे-तोटे सर्वांनाच माहीत आहेत.
सर्वच गाड्यांचा Performance \ Mileage \ value for money खुप चांगला आहे, म्हणुन मला गोंधळायला झालंय. काय करु??

मारुतीची नवी गाडी -

ई मेल मधून आलेली माहीती.

cero.JPGcero1.JPG

Maruti Suzuki India Ltd is planning to launch a new Maruti Cervo in Indian road soon. The company will be expected to launch Maruti Cervo model in the month of May - June 2010 in India. Maruti Cervo is the latest small car recently initiated in Japan. The compact and sleek design of Maruti Cervo looks like TATA Nano and the Cervo price also compete with Nano car. Maruti Cervo Launch Date, Review, Photos and Indian Price detail is given below.

Maruti Cervo is another compact car which is all set to pass Alto and Wagon-R. Maruti is a leader for small car market but the launch of Tata Nano has heavily affected the sales of Maruti 800 in the cheapest category. Look wise, Maruti Cervo is even more attractive then TATA Nano. Maruti Cervo will be priced in the range of Rs 1.5 to 2 lacs and TATA Nano priced range is around 1.3 Lacs. It is a five door mini car that comes with 54bhp power in the front and 660cc patrol engine and 64Nm of torque. The engine of Maruti Cervo offers peppy performance with great fuel efficiency.

The Maruti Cervo’s interior looks like new Maruti Swift. Maruti Cervo has comfortable front semi-bucket seats, sporty headlamps and fog lamps, Bluetooth capability and 4-speed auto gearbox K6A DOHC engine with VVT. Maruti Cervo will get huge success in India with their priced well with high profile.

Maruti Cervo will surely attract the younger generation with its nice features included sporty stylish look, elegant interiors and sleek external design. Maruti Cervo will definitely create a good impression in the Indian automobile market. We can say that, Maruti Cervo will be one of the fastest and most selling cars in the Indian auto market, after its launch.

Technical Specifications of Maruti Cervo Car:

§ Fuel Type: Petrol

§ Engine Description: 60-65 bhp and K6A DOHC engine with VVT

§ Engine Displacement(cc): 660

§ Seating Capacity: 5

§ Number of Doors: 4

§ Gears: 4-Speed

Maruti Cervo Price:

The Ex-show room Price of Maruti Cervo:

Maruti Cervo - Rs 150,000 - Rs 200,000 (Delhi & Mumbai Ex-Showroom Price)

माझ्या माहितीत अनेक जण आहेत (मुंबईत) ज्यांची दोन गाड्या घेण्याची देखिल आर्थिक स्थिती आहे..तरिही एकही घेत नाहीत. (ज्यांन्ना धंदा वा व्यवसाय यात स्वताच्या वाहनाशिवाय दुसरा पर्यायच नाही त्यापैकी यातील चौघे जण आहेत अन प्रत्त्येकाकडे एक गाडी आहे) कारणे:
१. मुंबईत गरजच भासत नाही. रोज साठी रीक्षा, टॅक्सी, बस ऊपलब्ध आहेत.. लोकल ट्रेन हा सर्वात उत्तम पर्याय असे त्यांचे मत.
२. कामाच्या व्यापातून long drive वगैरे अशक्य आहे.. सुट्टीला अगदीच कुठे कारने जायचे असेल तर pvt rentals घेवून जातात.. गाडी चालवायचा, वगैरे व्याप नाही..मस्त enjoy करता येते.
३. कार वाचून कुटुंबाचं काहीही आडत नाही.
४. यातील काही मंडळी पर्यावरण्-जागरूक असल्याने, मोठ्या गाड्या चालवणं, निव्वळ एका माणसाच्या प्रवासासाठी गाडी वापरणं हे चक्क अपराधी वाटतं. कार पूल चे पर्याय वापरावेत्(शक्य असल्यास) असे म्हणतात.
५. भारतात (मुंबईत आणि ईतर मोठ्या शहरात) महिन्याला एक या न्यायाने नविन गाडी बाजारात येते. प्रत्त्यक्षात त्याला आवश्यक रस्ते, infrastructure, वगैरे ऊपलब्ध नाही त्यामूळे एकीकडे सरकार काम करत नाही म्हणून बोंब मारायची व दुसरीकडे गाड्या घेवून निव्वळ वाहतूक, प्रदूषण, रस्त्यांची वाट लावणे, यात भर घालायची हे त्यांन्ना मान्य नाही.
६. यातील काही जणं पुन्हा फिटनेस फ्रीक असल्याने कायम गाडीचा वापर नकोसा वाटतो. गाडीची "सवय" लागली की त्याचे दुष्परिणाम जास्त आहेत असं त्यांचं मत..
७. समाजसेवेच्या भावनेने यातील काही जणांनी गाडी चे पैसे काही गरीब, गरजू, विद्यार्थ्यांना मदत करण्यात गुंतवले आहेत..
८. राहिला social status, business status चा प्रश्ण तर लखपती असला किंवा करोडपती, व्यवसाय वा नोकरीत कामाच्या दर्जाला स्थान आहे,गाडीच्या मॉडेल ला नव्हे, असा त्यांचा अनुभव आहे.. ज्या समाजात तुम्ही कुठल्या गाडीतून येता त्यानुसार संबंध ठरतात त्या समाजापासून ते दूर असतात.
९. चैन, कंफर्ट, हा क्रायटेरीया नसेल अन आपल्या स्वार्थ सुखापेक्षा ईतरही गोष्टी महत्वाच्या असतील तर गाडी न घेण्याला ईतर अनेक पर्याय आहेत असे यातील काहींचे म्हणणे पडले.

सुंदर गाड्या ज्या आता भारतात उपलब्ध आहेत.

१) V8 Audi Q 7 4.2 TDI : DIESEL SUV
340 bhp, 760 NM Torque. with 8 cylinder 4.2 TDI engine hitting top speed of 240 km per hr. 0 - 100 in 6.4 seconds It is equipped with quattro : their permanent all wheel drive and adaptive air suspension.

2) Volkswagen Phaeton: 3.6 L V6 engine delivering over 280 PS of power and has
6 speed DSG gear box. 18 way adjustable front seats bi - xenon headlights with cornering lights, blue tooth control receiver, fridge and air suspension that adapts to all road conditions automatically.

cruise on.

टाटा जनरली चिप प्लास्टिक फार वापरतात ते तसेच आहे का? >> केदार, आधी होता हा प्रॉब्लेम खरेच. आता व्हिस्टा आणि मांझाचे इंटेरियर बघितले, तर काही गोष्टी बदलण्याचे टाटांनी ठरवले आहे, हे कळते. चांगले इंटेरियर हे त्यांचे युएसपी कधीच नव्हते. स्पेस आणि युटिलिटी सारख्या (आतापर्यंत भारतीयांना महत्वाच्या वाटणार्‍या) गोष्टींकडे ते जास्त लक्ष देत होते. याचमुळे इस्टेट, सियारा, सफारी, मोबाईल, सुमो, इंडीका, व्हिस्टा, मांझा अशी टाटाच्याच गाड्यांची घरात रांग लावणारी कुटुंबे बघायला मिळतात. इंडिकामधली स्पेस ही काही सेदान कार्सपेक्षाही जास्त असते, भासते.

आरियाच्या ट्रायल्स चालू आहेत पुण्यात. गाडी फारशी चांगली नाही दिसायला, पण किंमतीच्या बाबतीत स्कॉर्पियो आणि इनोव्हाला चांगलीच स्पर्धा देईल, असं वाटते. शेवटी टाटांचा खास असा एक आशिक सेगमेंट आहेच ना! (या सेगमेंटनेच सुमो ग्रँड ला देखील हात दिला). बाकी ती अप्पर एन्ड सेदान पण चांगली दिसते आहे. फियाटाचेच इंजिन आहे. तिची चर्चा २००९ मध्येच चालू होती. (नाव विसरलो). या वर्षाखेर पर्यंत दिसली पाहिजे मार्केट मध्ये. (शिवाय फियाटची देखील याच प्राईस रेंजमधली गाडी येणार आहे. शिवाय १.६लिटर्सची लिनिया देखील. सध्याची लिनिया किंचितशी 'अंडरपॉवर्ड' म्हणता येईल, अशी आहे. पण माझ्या मते परफॉरमंस आणि मायलेज यांचा एकत्रित विचार केल्यास, सध्याची लिनिया ओके आहे)

काशी, डिझेल स्विफ्ट डिझायर कुड बी द मोस्ट प्रॅक्टिकल सलून इन द इंडियन मार्केट. 'अत्यंत प्रॅक्टिकल' हेच तिचे पर्फेक्ट वर्णन होउ शकते.

दीपूर्झा, चांगली माहिती टाकलीस. ही गाडी नॅनोपेक्षा नक्की चांगली असणार आहे.

योग, तू दिलेले मुद्दे बरोबर आहेत. मुंबईतल्याच काय, पण पुण्यासह इतर शहरांत देखील असा विचार करणारी माणसे, कुटुंबे आहेत. पण इथे तो विषय नाहीच आहे. 'गाडी घ्यायची नाही' यामागे पक्की निर्णयप्रक्रिया असणार्‍यांचा आदर करायलाच हवा. त्याचप्रमाणे मामीसारख्यांच्या निर्णयप्रक्रियेचा पण. 'गाडी घ्यायचे ठरवले आहे, पण कोणती घ्यावी- ते कळत नाही' असं म्हणणार्‍यांसाठी हा बीबी. Happy

रेन्टल गाडी कुठे घेऊन जायची म्हटले की एक मानवता म्हणून त्या ड्रायव्हरचेही बाळंतपण करीत बसावे लागते हा एक मोठ्ठाच ड्रॉ बॅक आहे. तो ही नीट असला तर नाही तर उग्र गुट्खा खानारे , पचापचा थुंकणारे रॅश ड्रायव्हिंग करणारे ड्रायव्हर अगदी डोक्यात जातात ट्रीपभर.. Sad

Pages