कोणती गाडी घ्यावी?

Submitted by साजिरा on 15 October, 2009 - 07:51

इतक्या गाड्या नि कंपन्या बाजारात आहेत, की निर्णय घेताना गोंधळ होणे साहजिकच असते. एकट्या मारुती-सुझुकीच्याच डझनावारी गाड्या आहेत. त्यात पुन्हा पेट्रोल, डिझेल शिवाय फीचर्स कमी-जास्त करून तयार केलेली मॉडेल्स. अधिक फीचर्ससाठी पन्नासेक हजार किंवा लाखभर रुपये बजेट वाढवावे, तर मग आणखी थोडे पैसे देऊन थोडी मोठी, यापेक्षा चांगली गाडी का घेऊ नये हा प्रश्न उभा रहतो. प्रत्येक कंपनीची, ब्रँडची एक इमेज आपल्या मनात ठसलेली असते. जुने बरेवाईट अनुभव पण पदरी असतात. शिवाय आपल्यापैकी बहुतेक जण कमी-जास्त फायनान्स घेऊनच गाड्या विकत घेतात. हे सारे टप्पे ओलांडून अनुभवलेली निर्णयप्रक्रिया म्हणाजे एक मोठा प्रवासच.

काही मॉडेल्स 'इंटरनॅशनल' असली, तरी भारतीय (छोटे) रस्ते अन गर्दीची (कोण बोललं रे ते- 'बेशिस्तीची म्हण की सरळ!') वाहतूक लक्षात घेता 'स्मॉल कार्स' अन 'मिडसाईझ सेदान कार्स' अर्थातच जास्त विकल्या जातात. यात पुन्हा 'गियरवाल्या' की 'ऑटोमॅटिक ट्रान्समिशनवाल्या' हेही आहेच. लक्झरी कार्स, सुपरलक्झरी कार्स, मल्टियुटिलिटी कार्स, स्पोर्ट्स युटिलिटी कार्स आणि स्पोर्ट्स लक्झरी कार्स - या सार्‍यांचाही आपापला चाहता वर्ग. सेगमेंट आहेच आहे.

तुमचे काय मत आणि अनुभव? नवीन गाडी घेणार्‍या मायबोलीकराला थोडीफार इनपुट्स मिळाली, तर तो दुवा देईल; अन भेटलाच, तर त्याच्या नव्या गाडीतून पार्टीला घेऊन जाईल- हा हेतू. Happy

याशिवाय इथेच दुचाक्या, नवीन लाँचेस, भारतातले बदलते ट्रेंड्स आणि एकूण वातावरण, इंटरनॅशनल मॉडेल्स आणि ट्रेंड्स, मेंटेनन्स टिप्स यांबद्दलही कृपया लिहा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

रेन्टल गाडी कुठे घेऊन जायची म्हटले की एक मानवता म्हणून त्या ड्रायव्हरचेही बाळंतपण करीत बसावे लागते हा एक मोठ्ठाच ड्रॉ बॅक आहे. तो ही नीट असला तर नाही तर उग्र गुट्खा खानारे , पचापचा थुंकणारे रॅश ड्रायव्हिंग करणारे ड्रायव्हर अगदी डोक्यात जातात ट्रीपभर.. >> अगदी खरे व लाख मोलाचे. परवा मी सेलम ला गेले व आले ना ते ही नॉन एसीइंडिकातून. लै वैताग. तो वाहन चालक कार्तिकेयन व शूमाकर चा मिक्स ब्रीड असल्यासारखा १०० च्याच स्पीड ने चालवत होता. हायवे वर लै ट्रापीक. मला तामिळ नाडू आवड्त असले तरी शहीद व्हायची अजून तयारी नाही तमीळ रस्त्यावर. मी त्याला रिलॅक्स रिलॅक्स म्हण्तेय तर तो काय असे तामिळातून विचारतोय. मागचा माणूस काहीतरी विशय काढ्ला कि पूर्ण मान मागे वळवून बोलतोय. फोन घेतोय एसेमेस चेक करतोय. मला रामरक्षा येत नाही नाहीतर मी म्हण्ली अस्ती. उतरल्यावर हात जोड्ले.

प्रणव, काल एकदा पोस्ट लिहिली आणि ती सेव्ह करताना उडालीच. नंतर जरा कंटाळा केला गेला, सॉरी.

जास्त वापर होणार नसेल वॅगन-आर-ड्युओ घेऊ नकोस. माणसांसाठी फारसा नसला, तरी सामानासाठीच्या स्पेसचा थोडा प्रॉब्लेम येतोच. लुक्स आणि नवीन डिझाईन महत्वाचे वाटत असेल, तर या गाडीचे भरपूर वय झाले आहे, हे लक्षात ठेवायला हवे.

स्विफ्ट इज द प्रुव्हन मशिन. त्यामुळे तिचा प्रश्नच नाही. पण गाडीच्या वयाचाच विचार केला, तर स्विफ्टचेही बर्‍यापैकी वय झाले आहे. रिट्झ आणि स्विफ्ट एकच गाडी आहे, फक्त लुक्स सोडले, तर. त्यामुळे मी निर्णय घेताना तरी रिट्झला पसंती देईन.

फिगो रिट्झपेक्षा थोड्या कमी किंमतीत मिळेल. तेवढीच जागा आणी कंफर्ट. पेट्रोल स्विफ्ट/रिट्झपेक्षा पेट्रोल फिगोचे मायलेज मात्र थोडे जास्त आहे. रिट्झ आणि फिगो दोन्ही नवीनच आहेत बाजारात. त्या दृष्टीने एक्साइटमेंट सारखीच. सर्व्हिस नेटवर्क आणि रिसेल व्हॅल्यु महत्वाचे वाटत असतील, तर अर्थातच रिट्झ विन्स द रेस.

पाच लाखांपर्यंत बजेट आहे म्हणलास म्हणून, खालच्या पद्धतीनेही विचार करून बघ-
१) १.२ पुंटो आणि १.२ आय२० ची बेसिक मॉडेल्स ५ ते ५.२५ च्या दरम्यान मिळतील. मला या दोन्हींत निवडायला सांगितल्यास- आय२०. या दोन्ही गाड्या भारतातल्या परंपरागत 'स्मॉल कार्स' पेक्षा नक्कीच मोठ्या आणि आकर्षक दिसतात.
२) १.२ पोलोचे बेसिक मॉडेल पाच लाखांत मिळेल. पण हिचे लुक्स मात्र पुंटो, आय२० किंवा रिट्झइतके (मला) एक्सायटिंग वाटत नाहीत. 'जर्मन टेक्नॉलॉजी' हा मात्र युएसपी.

हेय आमच्या गाडीचा नंबर आला. आता पुढील महिन्यात राणी सजवणार. ढांग टिक ढांग टिक टांग.
अ‍ॅक्सेसरीजबद्दल सांगा जाणकार. मला गाडीत विडीओ स्क्रीन आवड्त नाही. पण उत्तम सीट कवर्स,
काचांना हल्की काळी फिल्म, स्टीअरिन्ग ला कवर, पुढे मागे ते अ‍ॅक्सिडेंट गार्ड मिळतात ते लावावेत का?
( बैल गेला झोपा केला न्यायानुसार? :P) मला मायबोलीचा म गाडीच्या मागच्या काचेवर लावायचा होता
त्याचा स्टिकर मिळतो काय?

सॉरी, थोडेसे विषयांतर...

भाड्याने गाडी घेतल्यास (ड्रायवर सह आणि ड्रायवर शिवाय) किती भाडे पडते?(पुण्यातले रेट मिळाल्यास बेस्ट) धन्यवाद!

अ‍ॅक्सेसरीजबद्दल सांगा जाणकार >>>

१.ट्रंक उघडून केनवुडचे मोठे ४ स्पिकर्स न एक मोठ्ठा सब
२. डॅश उघडून तिथे विमानासारखी (किंवा गेलाबाजार व्हॉल्वो च्या बससारखी विविध बटणं, बटण दाबले की गाणी चालू, फ्रिझ उघडे इ इ
३. बॉडीला लायनिंग पेंट
४. पाठीमागच्या काचेवर एक मस्त विंग

हाय काय नी नाय काय. Happy

मनस्मी पुण्यात एविस, हर्ट्स आहे. (ड्रायव्हर शिवाय - रु १०००) भाडे पाहिले होते. तसेच मी एकदा ७०० रु रोज प्रमाणे इंडिका पण (ड्रायव्हरसहित ) घेतली होती. डीसे मध्ये. आता बदलले असेल तर माहित नाही.

४. पाठीमागच्या काचेवर एक मस्त विंग १.ट्रंक उघडून केनवुडचे मोठे ४ स्पिकर्स न एक मोठ्ठा सब>> अनुमोदन. मागे कुत्र्याचा स्टिकर.

पुढे मागे ते अ‍ॅक्सिडेंट गार्ड मिळतात ते लावावेत का?
>> नको, दुर्दैवाने अ‍ॅक्सिडेंट झाला तर गाडीच्या चासिस ला धक्का लागतो. कारण अ‍ॅक्सिडेंट गार्ड shock absorb करत नाहीत.

अ‍ॅक्सेसरीजबद्दल सांगा जाणकार >>>

१. गाडीच्या काचांना 'लुमार' ची फिल्म लावा. थोडी महाग आहे पण चांगली आहे. गाडी आतून तापत नाही. A/C चा इफेक्ट चांगला रहातो. (V-Cool भलतीच महाग आहे)
२. समोरच्या काचेसाठी सुध्दा पारदर्शक फिल्म मिळाते. ही लावण्याचे दोन फायदे, एक रात्रीच्या वेळी समोरच्या गाडीच्या दिव्यांचा त्रास होत नाही आणि दुसर म्हणजे कडक उन्हात सुध्दा गाडी आत खुपच कमी तापते
३. रिव्हर्स सेन्सर्स लावून घ्या. गाडी मागे घेताना आपटण्याची शक्यता कमी
४. रिअर व्हू मिरर मोठा लावून घ्या
५. गाडीला बाहेरून टेफलॉन कोटींग आणि खालून 'Anti-Rust' treatment करून घ्या
६. टायर मधे नायट्रोजन भरून घ्या (टायर ट्यूब-लेस असतील तर उत्तम)
७. Aura चे alloy wheels लावून घ्या
८. बॉनेटच्या आत एक छोटा दिवा बसवून घ्या

manya2804, अ‍ॅक्सेसरीजबद्दल अनुमोदन. विशेषतः समोरच्या काचेच्या फिल्मिंगबद्दल. हे फारसे कुणी करत नाही. कारण इतर सर्व काचांना फिल्मिंग करण्यासाठी जेवढा खर्च येतो तेवढाच या एकाच (समोरच्या) काचेसाठी येतो (कमीत कमी ३५०० रु.). पण त्याचे फायदे खूप आहेत. उन्हाळ्यात काचा बंद करून एसी चालऊ ठेवला तरी, समोरच्या कचेतून ऊन्हं येऊन प्रचंड चटके बसतात आणि ड्रायव्हिंग नको वाटते. हे चटके बसणं कमी होतं. एसीची इफिशियन्सी वाढते. शिवाय रात्रीच्या प्रवासात थोडा अँटीरिफ्लेक्टिव्ह इफेक्ट येतो. नवीन गाडीला तर करायलाच हवे हे.

एक फुल, तुमचा प्रश्न आताच पाहिला. Happy

पुंटो - डिझेल १.३ आणि पेट्रोल १.४ बद्दल बोलायचे, तर या 'लिनिया'च आहेत. म्हणजे लिनिया आणि पुंटो यांची इंजिने एकच. फक्त कपडे बदलले. लिनियाची लांबी करोला आणि सिव्हिकपेक्षाही जास्त आहे. हा गाडा शहरातल्या ट्रॅफिकमध्ये चालवायचे ज्यांना संकट वाटते त्यांच्यासाठी हॅचबॅक (स्मॉल कार) श्रेणीतली पुंटो. फक्त पेट्रोलमध्ये आणखी एक व्हर्जन म्हणून १.२ वाली पण आहे. हे इंजिन मात्र लिनियाच्या कुठच्याच व्हर्जनमध्ये नाही. ही सारी फियाटची स्वतःची इंजिने आहेत.

मी स्वतः गेले दीड वर्षे '१.३ डिझेल लिनिया- इमोशन पॅक' वापरतो आहे. सेदान कार असूनही, हायवे ड्राईव्हला २० च्या आसपास मायलेज देते आहे. आजकालच्या डिझेल कार्सनी 'व्हायब्रेशन्स, हार्श ड्राईव्ह, पिकप नाही, भरपूर मेंटेनन्स' ही डिझेल कार्सची परंपरागत इमेज बदलून टाकली आहे. त्याचप्रमाणे याही गाडीबद्दल. लिनिया/पुंटोला १५००० किमीचे सर्व्हिस इंटर्व्हल्स आहेत- याचा अर्थ वर्षातून एकदा सर्व्हिस! मॅनोव्हरेबिलिटी, कंफर्ट, राइड क्वालिटी, हाय स्पीड स्टेबिलिटी या सगळ्या बाबतीत ती वरना, सिटी, एसेक्स४, फियेस्टा यांपेक्षा चांगली आहे. (या सार्‍या गाड्या मी स्वतः लाँग ड्राईव्हला नेऊन चालवल्या आहेत). इंटेरियर सध्या तरी 'द बेस्ट इन इट्स क्लास' असे आहे. माय कार फंक्शन्स, एयर बॅग्स, एबीएस, ब्ल्यु अँड मी या सार्‍या सुखसोयींचा विचार केला, तर तिची किंमत मला तरी 'व्हॅल्यु फॉर मनी' वाटते. रिसेल व्हॅल्युचा मी फारसा विचार केलेला नाही. पण फियाटने ज्या पद्धतीने मागच्या वर्षी भारतात स्वतःचा कंप्लीट मेक-ओव्हर करून दाखवला, ते बघता त्याचीही फारशी काळजी राहणार नाही असे वाटते.

पेट्रोल लिनिया मात्र मी जास्त चालवलेली नाही. पण विकल्या जाणार्‍या लिनिया गाड्यांत पेट्रोल आणि डिझेल व्हर्जन्सचे प्रमाण अनुक्रमे ३०% व ७०% असे असावे.

पुंटोचे स्पर्धक- स्विफ्ट, रिट्झ, बीट, पोलो, आय२०, फिगो इ.

यातला आय२० हा सर्वात समर्थ पर्याय ठरू शकेल. Happy

==

ता.क. - एक फुल, तुमची पोस्ट आता पाहिली. सही गाडी घेतलीत तुम्ही. हार्दिक अभिनंदन! Happy

साजिरा,
थॅन्क्यु Happy
मला नाही तर दुसर्या कुणाला कामात येईल ही माहिती Happy
लिनीया पण फार आवडते पण पुण्यात चालवणे म्हणजे खरंच ताप..

समोरच्या काचेच्या फिल्मिंगबद्दल .... यामूळे पावसाळ्यात (low visibility मुळे) गाडी चालवीताना त्रास होवु शकतो का ? रात्री आपल्या गाडीच्या हेडलाईट मुळे एकवेळ दिसेल पण पावसाळ्यात आणी दाट धुक्यात हेडलाईटचा फारसा उपयोग होवु शकत नाही. तिथे या फिल्म मुळे आणंखि त्रास होवु शकेल असे मला वाटते.

मायबोलीकर, नाही. चांगल्या प्रतीची फिल्म लावली, तर असा काहीच त्रास होणार नाही. उलट ती फिल्म काचेच्या संरक्षणासाठी आणि बेटर व्हिजिबिलिटीसाठी जास्त मदत करेल. Happy

शेवर्ले च्या स्पार्क बद्दल लिहा ना कुणाला माहिती असेल तर.
शेवर्ले चं ३ वर्षांच शेवर्ले प्रॉमिस आहे. maintainance, servicing, plastic parts वगैरेंची कॉस्ट झीरो असा त्यांचा दावा आहे. wagon-R (k-series engine) पेक्षा प्राईस कमी आहे आणि जास्त आकर्षक पण वाटली त्यामुळे स्पार्ककडे मन inclined होतंय.

कुणाकडे आहे का? फायदे/तोटे किंवा मार्केट रिव्ह्युज कुणी देऊ शकेल का?

आमची गाडी मूळ नक्षत्रावर असेंबल झालीय बहुतेक. शोरूम मधून निघतानाच ठोकले,
काल पोस्टाने आरसी कार्ड आले त्यावर नंबर ३३६८ आणी त्या लोकांनी फोनवर सांगितला होता ३३६७ म्हणून ३३६७ प्लेट बन्वून इतके दिवस वापरली. आज परत भुर्दंड करेक्ट नंबरप्लेट बनवायचा! चुकीच्या प्लेटी घरी घेऊन आले. त्याचा काहीतरी आर्ट प्रॉजेक्ट करीन.

हे वेंधळे पणाच्या बीबीवर टाकावे काय?

इमोशन पॅक काय आहे?

निसान ची एक मायक्रा म्हणून ही आली आहे. स्पेक्स हवेत का तर टाकणार. शोरूम बगलमेंही है. दो मिनिट में लाके देतूं.

इमोशन पॅक काय आहे >> लिनिया आणि पुंटो मध्ये प्रत्येकी चार चार मॉडेल्स आहेत. दिलेल्या फॅसिलिटीजनुसार. अ‍ॅक्टिव्ह, डायनॅमिक, इमोशन आणि इमोशन पॅक. त्यातले अ‍ॅक्टिव्ह हे लोएस्ट, तर इमोशन पॅक हे टॉप एन्ड मॉडेल.

लिनियाच्या, या आधीच्या पोस्टमध्ये एक सांगायचे राहिले- १.३ लिटर्स डिझेल हे इंजिन काहींना slightly underpowered असे वाटू शकते. विशेषतः १.४ फियेस्टा आणि १.५ वरना या डिझेल गाड्यांच्या तुलनेत. वरना पण मी वापरली आहे. तिचा 'टेक-ऑफ फील' तर या क्लासमध्ये क्वचितच सापडतो. (पण मग त्यामूळे मायलेज किंचितसे बोंबलते, हेही आहेच).

याचमुळे १.६ लिटर्सची डिझेल लिनिया लवकरच बाजारात येणार आहे. क्रुझ, सिव्हिक, करोला, जेट्टा, स्कोडा यांच्याशी स्पर्धा करणारी १.८/२.० लिटर्सची गाडीही लवकरच ते आणणार आहेत. १३ ते १५ लाखांच्या आसपास तिची किंमत असेल.

मामी निस्सानचे स्पेक्स टाका. मायक्रा ४ लाखांपासून आहे म्हणे. स्मॉल कार मार्केटमध्ये नवीन गाड्या धुम उडवणार बघा. Happy

निंबुडा, स्पार्कबद्दल वेगळ्या पोस्टम्ध्ये लिहितो.

Micra चा review "http://www.carwale.com/research/upcomingcars.aspx?id=47" इथे वाचा.
१.२ लि. इंजीन जरा under powerred वाटत.

Fiat Punto ची road-test "http://www.carwale.com/research/roadtests/view.aspx?id=75" इथे वाचा

मी Punto चालवून बघीतली आहे. मस्त गाडी आहे. Fiat चा मुख्य problem म्हणजे after sales service and availability of parts. टाटा बरोबर tie up करून सुध्दा यात फारसा फरक पडला नाही. त्यामुळे चांगल्या गाड्या असूनही म्हणाव्या तश्या खपत नाहीत.
Linea Petrol पण चांगली गाडी आहे. ही गाडी Honda City 2008 पेक्षा जास्त Fuel economic आहे असे बर्‍याच जणांचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे लिनीया इमोशनल पॅक १.४ (Fully Loaded) ही सीटी १.५ S MT पेक्षा सव्वा लाखाने स्वस्त आहे. (Ex-Showroom price)
जर डिलर नेटवर्क सुधारलं तर Fiat ला नक्कीच चांगले दिवस येतील.

निंबू, बीट पण आहे शेवर्लेची.
<>>>

हो मामी. बघून आलो ती. पण तिला ३ वर्षांच शेवर्ले प्रॉमिस नाहिये. १३क extra टाकून ते विकत घ्यायचं. आणि आत बसून पाहिलं तर स्पार्क पेक्षा अंधारी आणि मागची सीट फक्त २ जणांना कंफर्टेबल आहे. मलाही आधी बीट चा आकार जाम आकर्षक वाटला होता. पण शोरुम मध्ये जाऊन प्रत्यक्ष पाहून आल्यावर स्पार्क चे फीचर्स जास्त छान वाटले.

साजिरा, तुमच्या पोस्ट ची वाट पाहत आहे.

निंबुडा, उशिरा लिहिल्याबद्दल क्षमस्व.

स्पार्क आणि बीट या दोघींना वेगळ्या सेगमेंटमधल्या गाड्या म्हटले पाहिजे.
स्पार्क ही मुळातच मारुती अल्टोला स्पर्धा म्हणून काढलेली. शेवर्लेची एंट्री लेव्हल कार. अल्टो ८०० सीसी तर स्पार्क १००० सीसी. वॅगन आरही १००० सीसी. तरी अल्टोपेक्षा स्पार्क आणि वॅगनआर या गाड्यांच्या किंमती किमान पन्नास हजाराने जास्त आहेत.

बीट ही स्पार्कपेक्षा लाखभराने तरी जास्त किंमत असलेली गाडी आहे. १२५० सीसी आणि ८४ बीएचपी पॉवर असलेल्या या गाडीची स्पर्धा थेट पोलो, पुंटो, रिट्झ, स्विफ्ट, फिगो यांच्याशी आहे. तिचे फुचरिस्टिक, लवकर आऊटडेट न होणारे लुक्स हा नक्कीच प्लस पॉईंट आहे. मागच्या दरवाजांच्या काचांच्या लहान आकारामुळे तुम्हाला ती 'अंधारी' वगैरे वाटली असेल. (मी बीट चालवली आहे, आणि मागे बसूनही पाहिले, पण तसं काही वाटलं नाही). आपल्याला थोड्या मोठ्या खिडक्या बघण्याची सवय असल्यामुळेही तसे वाटत असेल एखादे वेळेस.

२-३ दिवसांपुर्वी टाइम्समधल्या बीटच्या जाहिरातीत "Now Beat also with 3 years chevrolet Promise" असा उल्लेख दिसला, त्याबद्दल शोरुममधून पुन्हा माहिती घ्या. (अ‍ॅडिशनल वॉरंटीपोटी जास्त पैसे उकळत आहेत का, तेही बघा).

बाकी एंट्री लेव्हल कार्स मध्ये अल्टो आणि वॅगनआर या दोघींपैकी माझी पसंती स्पार्क ला. लुक्स, पर्फॉर्मन्स, मायलेज, व्हॅल्यु फॉर मनी, मेंटेनन्स कॉस्ट या सगळ्याच बाबतीत.
आणखी थोडे पैसे टाकणार असाल, तर बीटच्या सोबत वर उल्लेख केलेल्या इतर गाड्यांचाही विचार करा. Happy

साजिरा, किती वाट पहायला लावायची. असो Wink

आमचा तरी सध्या वॅगनआर की स्पार्क असा dilema आहे. cardekho.com वर या दोन्ही cars चे comparison पाहिले आहे technical and functional बाबींमध्ये. वॅगनआर चा response great च आहे यात काही वाद नाही पण इथे स्पार्क चा अनुभव किंवा माहिती असलेलं कुणी आहे का ते पहाय्चं होतं. कधी कधी दुसर्‍यांचे अनुभव खूप उपयोगी पडतात.

बीट नक्की घेणार नाहीये. आमच्या फॅमिली मध्ये मी, मोदक, साबा, साबु, दीर आणि आमचे पिल्लू असे सर्व आहोत. एकदम पहिल्याच फटक्यात मोठी car घ्यायला जमणार नाहिये पण निदान ५ जण नीट बसू शकतील अशी फॅमिली car हवीये. शिवाय बजेटचा ही प्रश्न आहेच. त्यामुळे बीट आणि रिट्झ वर फुल्ली. त्या यंग जनरेशन ला attract करणार्‍या cars आहेत.

निंबुडा या दोन्ही कार्सचे रिव्ह्युज् तुम्हाला भरपूर ठिकाणी सापडतील. त्यांची तुलना तुम्ही अभ्यासली असल्याचं वरती म्हटलं आहेच.

स्पार्क आणि वॅगनआर या दोन्ही गाड्या (माझ्याकडे नसल्या तरी) मी त्या चालवून बघितल्या आहेत, आणि माझा पर्सनल चॉईस 'स्पार्क' असल्याचे मी वरती म्हटले आहेच.

वॅगनआरचे आता वय झाले आहे, आणि गुडविलचा फायदा घेऊन शेवटी जास्तीत जास्त गाड्या खपविण्याचा मारुतीचा प्रयत्न आहे. त्या तुलनेत स्पार्क ही अजून बरीच तरुण, फ्रेश लुक्स असलेली गाडी आहे. किंमत सारखीच आहे.

गाडी घेतल्यानंतर सहा-एक महिन्यातच आणखी थोडे पैसे टाकून 'वरचे' मॉडेल घ्यायला हवे होते, असं प्रत्येकालाच वाटतं. त्या दृष्टीने स्पार्कच्या थोड्या वरच्या किंवा टॉप एंड मॉडेलचा विचार करून बघा. (पण मग त्यानंतर आणखी काही पैसे टाकून जरा आणखी भारी, दुसरीच गाडी का नाही घेतली, असंही वाटतं. Proud हे नेव्हर-एंडिंग्-लुप आहे, त्याला काही इलाज नाही. Happy )

ज्य्यांच्याकडे स्पार्क आहे, त्यांनी स्पार्क वापरण्याचे आणि परफॉर्मंस इ. बद्दलचे अनुभव निंबुडासाठी इथे लिहावेत, ही विनंती. Happy

गेल्या आठवड्यात इथे एक वाइट अपघात झाला. कोटा नावाचे विनोदी अभिनेते आहेत. त्यांचा मुलगा एअरपोर्टच्या रस्त्यावरून ६०० सीसी स्पोर्टस बाइक चालवत होता. एकदम समोरून डीसीएम मिनि लॉरी आली व त्याने जरी ब्रेक दाबला तरी बाइक थांबली नाही व हेड ऑन कोलिजन होउन तो गेला. चाळीशी पण गाठ्ली नव्हती. बाकीचे घरचे गाडीतून त्याच्या मागून येत होते. लगेच त्याला वैद्यकीय मदत वगैरे मिळाली तरीही उपयोग झाला नाही.

इथे लिहीण्याचा उद्देश हाच की आपल्या हातात अति उत्तम मशीन असले तरीही रोड कंडिशन व इतर वाहन चालकांचे वर्तन आपल्या हातात नसते. हैद्राबादेतील हा ओआरार अतिशय अपघात प्रवण रस्ता आहे. चक्क बंदी असूनही ट्रक व दुचाकी गाड्या त्यावरून चालवितात. ट्रक वाल्यांनी अपघात केले तरी ते पळून जातात नाहीतर बेल वर सुट्तात. ही आपली भारतीय रिअ‍ॅलिटी आहे.

सर्व वाहनप्रेमींना सावधानतेचा इशारा मधूनच. चुकीच्या जागीलिहीले असेल तर उड्वावे.

बाप्रे, मामी तुम्ही म्हणता ते खरंय. भारतात कुठेच कायद्याचे नीट पालन होत नाही.

साजिरा, धन्स तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल. आम्हीही स्पार्क चे टॉप मॉडेल (LT) फायनलाईज केले आहे. तुमच्या response साठी थांबलो होतो. धन्स परत एकदा. Happy

Pages