कोणती गाडी घ्यावी?

Submitted by साजिरा on 15 October, 2009 - 07:51

इतक्या गाड्या नि कंपन्या बाजारात आहेत, की निर्णय घेताना गोंधळ होणे साहजिकच असते. एकट्या मारुती-सुझुकीच्याच डझनावारी गाड्या आहेत. त्यात पुन्हा पेट्रोल, डिझेल शिवाय फीचर्स कमी-जास्त करून तयार केलेली मॉडेल्स. अधिक फीचर्ससाठी पन्नासेक हजार किंवा लाखभर रुपये बजेट वाढवावे, तर मग आणखी थोडे पैसे देऊन थोडी मोठी, यापेक्षा चांगली गाडी का घेऊ नये हा प्रश्न उभा रहतो. प्रत्येक कंपनीची, ब्रँडची एक इमेज आपल्या मनात ठसलेली असते. जुने बरेवाईट अनुभव पण पदरी असतात. शिवाय आपल्यापैकी बहुतेक जण कमी-जास्त फायनान्स घेऊनच गाड्या विकत घेतात. हे सारे टप्पे ओलांडून अनुभवलेली निर्णयप्रक्रिया म्हणाजे एक मोठा प्रवासच.

काही मॉडेल्स 'इंटरनॅशनल' असली, तरी भारतीय (छोटे) रस्ते अन गर्दीची (कोण बोललं रे ते- 'बेशिस्तीची म्हण की सरळ!') वाहतूक लक्षात घेता 'स्मॉल कार्स' अन 'मिडसाईझ सेदान कार्स' अर्थातच जास्त विकल्या जातात. यात पुन्हा 'गियरवाल्या' की 'ऑटोमॅटिक ट्रान्समिशनवाल्या' हेही आहेच. लक्झरी कार्स, सुपरलक्झरी कार्स, मल्टियुटिलिटी कार्स, स्पोर्ट्स युटिलिटी कार्स आणि स्पोर्ट्स लक्झरी कार्स - या सार्‍यांचाही आपापला चाहता वर्ग. सेगमेंट आहेच आहे.

तुमचे काय मत आणि अनुभव? नवीन गाडी घेणार्‍या मायबोलीकराला थोडीफार इनपुट्स मिळाली, तर तो दुवा देईल; अन भेटलाच, तर त्याच्या नव्या गाडीतून पार्टीला घेऊन जाईल- हा हेतू. Happy

याशिवाय इथेच दुचाक्या, नवीन लाँचेस, भारतातले बदलते ट्रेंड्स आणि एकूण वातावरण, इंटरनॅशनल मॉडेल्स आणि ट्रेंड्स, मेंटेनन्स टिप्स यांबद्दलही कृपया लिहा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>> माझ्या वायपर च्या भळ्भळत्या जखमे वर मीठ नका चोळू हो
अरे डोण्ट वरी, तस ते पहायचे बर्‍याच जणान्चे रहाते! Happy त्यात विशेष काही नाही
माझ्या पुतण्याने हैदराबादेत हीच गाडी घेतली आहे, त्यामुळे मला ही गाडी माहीत! त्याच्या देखिल वायपरचे नन्तर लक्षात आले
मी स्वतः बघितल की कुठे भोके बिके पाडून ते वायपर बदलुन बसवता येतील का, जमेल पण अवघड आहे! नाद सोडला

गाडी मात्र मस्त, तो हैदराबाद ते नाशिक/मुम्बै व्हाया पुणे किन्वा नगर कितीतरी वेळा आला गेलाय! कधी नॉन स्टॉप तर कधी सोलापुरात मुक्काम करुन!

झक्की, देशात कधी येताय? या वेळेस बैलगाडीत नक्की बसवेन तुम्हाला! Wink
बाकी झक्कीन्ना मानल पाहिजे बुवा! भिती म्हणून या माणसाला माहीत नाही!
रिक्षावाले काय की सिक्स सीटर वाले काय, हे बिनधास्त बसायचे......
येवढेच नाही तर मी चालवित असताना देखिल कार मधे बसले होते....
अन एकदा तर मी त्यान्ना चक्क स्कूटी वरुन नेल होत!
आता बैलगाडीच राहिली आहे, तेवढ करुन टाकू पुन्हा आले की!

फियेस्टा, एसेक्स४, लोगान, अल्टो या गाड्या आता घेऊ नयेत. या गाड्या 'बदलून' येणार आहेत, असं मी वर कुठेतरी लिहिलं होतं.

एसेक्स४, वॅगनआर, अल्टो या आता 'के-सिरीज' च्या नवीन इंजिनांसह येणार आहेत, असे मारुतीने काल जाहीर केले आहे. (ही 'के-सिरीज' इंजिने स्व्फ्ट, रिट्झ, ए-स्टार, एस्टिलो इ. मध्ये आधीच लावली आहेत). आणि तशा बातम्याही आज सगळीकडे आहेत. नवीन एसेक्स४ ची आज टाईम्सला जाहिरातही आहे, पान भरून.

पण तरीही माझ्या मते-
पेट्रोल- एसेक्स४ (८ लाख) चा विचार करणार्‍यांनी, थोडे जास्त पैसे मोजून होंडा सिटी (९ ते ९.५ लाख) किंवा थोडे थांबून २०१० च्या पहिल्या किंवा दुसर्‍या तिमाहीत येणार्‍या ऑल-न्यु फोर्ड फिएस्टाचा (९ लाख) विचार करावा.

डिझेलसाठी फियाट लिनिया (८.५ ते ९.५ लाख) आणि ह्युंडाई वरना (८.५ ते ९ लाख) हे पर्याय आहेतच. परंतु याही गाड्या २०१० मध्ये मॉडिफाईड व्हर्जन्स बनुन येणार आहेत. लिनिया १.३ लिटर्स ऐवजी जास्त ताकदवान १.६ लिटर्स इंजिनात येईल तर नवीन हुंडाई 'वरना-ट्रान्सफॉर्म्ड' मध्ये काही इंजिन रिफाईनमेंट्स तसेच इंटेरियर-एक्स्टेरियरमधले बदल होतील.

साजिरांचे आभार हा बीबी सुरु केल्यामुळे.
मी बी विचार करतो आहे गाडीचा. बजेट आहे साधारण ३-४ लाख. वॅगन आर घ्यायची आहे.
पण कन्फुज आहे ...

१) सेकंड हँड घ्यावी का? साधारन किती किमतीत असेल? सेकंड हँड घेऊन चांगली ड्रायवींग प्रॅक्टीस करायची मग नवी गाडी घ्यायची - हे भावाचं मत!
२) ऑफीसची गाडी आहे घरी येन्या जान्याकरता मग ह्या गाडीचा उपेग काय? - हे मत पप्पांचं ! म्हनजे आठवड्यातून असा किती वेळा बाहेर फिरायला जानार?
३) कि मग ह्या पैशानी नविन घेतलेल्या घराचं लोन फेडुन टाकावं? - मित्र म्हनतो मंग आपन कधी हिंडायचं फिरायचं? आपल्या इच्चा कधी पुर्या करायच्या ?

मंग आता मि काय करावं ?

साजिर्‍या धन्स... एवढ्या सखोल माहीतीसाठी...

माझे सध्याचे बजेट ४०००० ते ७५००० आहे (कॅश). एक ते २ वर्ष वापरुन नंतर नविन गाडी घेण्याचा विचार आहे.

अजून काही महत्त्वपुर्ण वाटत असेल तर नक्की कळव.

'महिंद्रा-फर्स्ट चॉईस' कीम्वा 'मारुती- True व्हॅल्यु' मध्ये>>>> मला शक्यतो ओळखीमधेचं गाडी पाहीजे आहे. या ठिकाणी अ‍ॅक्सिडन्ट किंवा प्रॉब्लेमॅटीक गाडी असू शकते असे माझे मत आहे.. Happy

~ योगिता

>>>> एक ते २ वर्ष वापरुन नंतर नविन गाडी घेण्याचा विचार आहे.
पिल्लू, एखाद दोनच वर्षे वापरणार असशील ना, तर चक्क चौदापन्धरा वर्षे होत आलेली मारुती ८०० बघितलीस तरी चालेल, पन्चवीस तीस हजारात मिळून जाईल!
कशीही वापरलीस, धडकवलीस तरी फिकीर नाही! हात साफ होईल
उरलेले चाळिस एक हजार शिलकीत ठेव, अन दोन वर्षानन्तर नविन गाडी घेताना डाऊनपेमेण्ट मधे याची भर घाल, तोवरच्या व्याजातुन मला अन साजिर्‍याला पार्टी दे!
नन्तर जुनी मारुती भन्गारमधे काढली तरी दहा/बारा हजार सहज सुटतील
माझ्या "बन्द पडलेल्या" फियाट ला मला साडेसात मिळाले होते

लिंबुभौ.. एकदम मस्त..

हात साफ होणे हाच उद्देश आहे या मागचा..

कोणाची गाडी असेल तर नक्की सांगा..

~ योगिता.

योगिताच्या केसमध्ये, लिंभाऊला अनुमोदन.
फक्त एक सामाजिक/राष्ट्रीय जबाबदारी/कर्तव्य म्हणून १५ वर्षांच्या पेक्षा जुनी गाडी विकत घेऊ नका, वापरू नका.

सक्षम, थोडा खोलवर जाऊन विचार करा.
कर्ज म्हणजे घरबुडवेपणा, ही समजूत जुनी झाली. कर्जे उचलून शहाणपणाने वागून प्रगती केल्याची नुसती आजूबाजूच्या कुटूंबांत/नातेवाईकांतच नव्हे, तर मोठ्या, बहुराष्ट्रीय कंपन्यांतही उदाहरणे सापडतील. सामान्यत: एकाच उत्पन्न पातळीवर जगातला कोणताही माणूस आयुष्यभर राहत नाही. आज जड वाटत असलेला हप्ता वर्षभराने हलका वाटतो, आणि पाच वर्षांनी जाणवतही नाही. विशेषतः होम लोन ही तर मला अभिमानाची गोष्ट वाटते. तुम्ही स्वतःच्या हिंमतीवर घर घेतले आहे, ते कर्ज फेडण्याची कुवत/धमक तुमच्यात आहे, आणि तुमची ही कुवत तुमच्या बँकेनेही ओळ्खून एक प्रकारे तुमचा सन्मान केला आहे, एक प्रकारे तुम्हाला सामाजिक प्रतिष्ठाच दिली आहे- या पद्धतीने विचार करा. घराच्या हप्त्यांधल्या वार्षिक व्याजाच्या भागासाठी सरकार तुम्हाला टॅक्स मध्ये सुट देते, यातच सारे आले. शिवाय गृहकर्जाचा व्याजदर इतर कर्जांपेक्षा सर्वात कमी असतो, हेही एक मुख्य कारण.
यामुळे, काही अपदात्मक परिस्थिती वगळता, घराचे कर्ज लवकर 'निल' करण्याच्या भानगडीत पडू नका.

मित्र म्हनतो मंग आपन कधी हिंडायचं फिरायचं? आपल्या इच्चा कधी पुर्या करायच्या ? >>>
हा मुद्दा माझ्या दृष्टीने सर्वात महत्वाचा आहे. (स्वतःच्या हिंमतीवर) पंचविसाव्या वर्षी घेतलेली ३ लाखांची गाडी, तिसाव्या वर्षी ५ लाखांची गाडी, पस्तिसाव्या वर्षी १० लाखांची आणि चाळिसाव्या वर्षी घेतलेली ३०-४० लाखांची गाडी यांची किंमत माझ्या मते सारखीच आहे. वय वाढते, भावना बोथट होतात, फुलपाखरू अन इंद्रधनुष्ये बघून हरखायचे-नाचायचे दिवस संपतात अन मग लक्षात येतं, अरे, इतके दिवस घास घास घासलो, काम केलं, ते कोणासाठी? मी, माझी हौस-मौज तर राहून गेली तशीच!!

वय वाढल्यावर रोल्स रॉईस अन लँबर्घिनी पण येईल एखादे वेळेस; पण उमेदवारीच्या काळात हिंमत दाखवून, कर्ज काढून, हप्ते फेडून घेतलेल्या मारुती ८०० किंवा अल्टोइतकं सुख अन अभिमान नाही देणार ती. Happy

हा अतिशय साधा असा 'लॉ ऑफ मार्जिनल युटिलिटी' आहे. हातात भाकरी अन पोटात प्रचंड भुक असल्यावर त्या भुकेची किंमत करोड रुपयेही होईल. पण एकदा का अर्धी भाकरी खाऊन संपवली, की हातात उरलेल्या अर्ध्या भाकरीची किंमत अर्धा कोटी नाही, तर त्यापेक्षा खुप कमी होईल. Happy

हा सारा निर्णय जनाचे अन मनाचे ऐकून, नीट विचार करून, परिस्थिती अन भविष्यातल्या संधी बघून घ्यावा; हे ओघाने आलेच.

ही ती हिरवी गाडी. (ग्रीन कार).
reva.jpg
चार्ज केलेल्या बॅटरीवर चालणारी ही गाडी. इलेक्ट्रिक कार. एकदा चार्ज केल्यावर साधारण ५० किमीपर्यंत जाणारी. या २ सीटर गाडीची किंमत ४ लाखांपेक्षा जास्त आहे. भारतात काही वर्षांपुर्वी बंगलोरच्या कंपनीने लाँच केली, तेव्हा बेडकासारखी दिसणारी, अन रिक्षापेक्षा लहान भासणारी गाडी बघून अनेकांनी नाके मुरडली होती. पण तिचे भविष्य चांगले आहे, हे नक्की.

काही बदल करून, अधिक आकर्षक करून ती अमेरिकेत नेण्याचे या कंपनीने ठरवले आहे. आता आहे तेच मॉडेल तसेच 'रेवा नेक्स्ट' हे आणि आणखी काही मॉडेल्स घेऊन. त्यांची किंमत बहुधा १० लाखांपेक्षा जास्त असणार. शिवाय चार्ज केल्यानंतर ती १२५ ते १५० किमी न थांबता चालू शकेल.
reva nxt.jpg
ही गाडी अमेरिकेत बनवून जगभर वितरित करण्यासाठी तिथल्या काही कंपन्यांशी ही बंगलोरची कंपनी बोलणे करते आहे. (छे, छे!! आता आपली अर्थव्यवस्था इतकी वाईट झाली, की भारत आता आपल्याकडून आऊटसोर्स करणार??!!- अशी काही अमेरिकनांनी कॉमेंट केल्याचीही बातमी आजच वाचली. Proud )

इंधन न लागणारी environment friendly car. आता टाळले, तरी भविष्यात हिची गरज आपल्याला नक्कीच भासणार आहे. व्हाट्से? Happy

>>>> फक्त एक सामाजिक/राष्ट्रीय जबाबदारी/कर्तव्य म्हणून १५ वर्षांच्या पेक्षा जुनी गाडी विकत घेऊ नका, वापरू नका.
घण्ट्याची सामाजिक्/राष्ट्रीय बान्धिलकी! खर तर ही राजकीय.पक्ष/गाड्ञा उत्पादकान्ची बान्धिलकी!!!! Wink
साजिर्‍या तुझ्या बाकी पोस्ट्स पटल्या, फक्त हे वाक्य अजिबात पटल नाही! Happy
पण तो या बीबीचा विषय नसल्याने तुझे चालुद्यात! Happy

[ती जी ग्रीन कार हे ना, चार लाख का? की पेट्रोलचे साठे सम्पेस्तोवर अशा गाड्या उतरूच द्यायचा नाहीत बाजारात? साला सोलरहिटरचेही तसेच, कैच्याकै किमती!
कोण घेणार कस्ल्या सामाजिक बान्धिलक्य अजपत? ]

बाकि तुझ भाकरीचे विवेचन पटले! Happy

मागल्या आठवड्यात लाँच झालेल्या जनरल मोटर्स (शेवर्ले) च्या 'क्रुझ' गाडीची टेस्ट राईड मी आजच सातारा रोडवरल्या पाषाणकर ऑटोमध्ये घेतली. (दिवाळीच्या आधी 'बिग बॉसच्या' घरात बॉक्समध्ये ठेवलेली तीच ही गाडी). जनरल मोटर्सने ही गाडी इतर देशांतही आधीच उपलब्ध केली आहे. (बरोबर ना? जाणकारांनी सांगावे.)
cruze2.jpg

होंडा सिव्हिक, टोयोटा करोला, स्कोडा आणि जनरल मोटर्सच्याच ऑप्ट्रा शी स्पर्धा करणारी ही गाडी. परंतु क्रुझ आता फक्त डिझेलमध्येच आली आहे, अन येत्या काही महिन्यात पेट्रोलमध्येही ती उपलब्ध होईल. ऑटोमॅटिक ट्रान्समिशनवाली यायला मात्र वर्ष जाईल, असे ते म्हण्ताहेत. सध्या उपलब्ध असलेली क्रुझ पुण्यात १४.६१ लाख इतक्या किंमतीत रस्त्यावर येईपर्यंत पडेल. (सिव्हिकची किंमत- १३.५ ते १४.५, करोला- १२.५ ते १४)

२.० लिटर्स (२००० सीसी) क्षमतेचे पॉवरफुल डिझेल इंजिन. डायनॅमिक, मॉडर्न, व्हायब्रंट म्हणता येतील असे लुक्स. (पण 'छ्या! सिव्हिक ची मजा नाय ब्वा!' असं होंडाप्रेमी म्हणतील, हे नक्की!) छान पिकप, कमी आवाज, कमी स्पीडला नॉकिंग नाही, व्हायब्रेशन्स नाहीत आणि इझी हँडलिंग ही वैशिष्ट्ये थोडे अंतर गेल्यावर लगेचच जाणवली. बाकी कीलेस इंजिन स्टार्ट (बटन स्टार्ट), क्रुज कंट्रोल फंक्शन (हे सिव्हिक मध्येही आहे), मागचे सीट ६०:४० स्प्लिट होऊन मागच्या बुटला (डिकीला) आतुनच अ‍ॅक्सेस, टिल्ट आणी टेलेस्कोपिक स्टिअरिंग अ‍ॅडजस्टमेंट, स्टिअरिंग माऊंटेड ऑडियो आणि इतर कंट्रोल्स इत्यादी सोयी आहेत.

२ एअर बॅग्ज, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, ड्रायव्हर इन्फर्मेशन सिस्टिम, अ‍ॅलॉय व्हील्स हे इतर नेहेमीचेच.

>>>>> वय वाढल्यावर रोल्स रॉईस अन लँबर्घिनी पण येईल एखादे वेळेस; पण उमेदवारीच्या काळात हिंमत दाखवून, कर्ज काढून, हप्ते फेडून घेतलेल्या मारुती ८०० किंवा अल्टोइतकं सुख अन अभिमान नाही देणार ती.

अतिशय परफेक्ट! Happy खरोखरच!
कदाचित काही बुप्राअर्थतज्ञ या वृत्तीलाही नाके मुरडतील, पण हे सत्य आहे

आजही, मला, लिम्बीला मुलान्ना माझ्या त्या डबडा फियाट आठवतात......
पण बाह्य जगात कोणत्याही कितीही भारी भारी गाड्या आल्या तरी पोरे असे म्हणत नाहीत की आपल्याकडे त्या का नाहीत? किन्वा तशाच हव्यात वगैरे!
एकतर त्यान्ना माझी "झेप" कळून चुकली आहे Wink
अन दुसरे म्हणजे शाळकरी वयात फियाटमधुन का होईना, पण दहा वर्शान्पूर्वी त्यान्नी शाळेत येण्याजाण्याचा जो अनुभव घेतला आहे त्यापुढे आता बाकि कोणत्याही गाड्या त्यान्च्यापुढे नाचवल्या तरी फुकट आहेत!
अन त्यामुळेच, माझ्या दुसर्‍या सुमो नावाच्या डब्ब्याचे देखिल त्यान्नी अत्यन्त उत्साहात स्वागत केले, कौतुक केले! ते देखिल, वेळेस हिला धक्का देखिल मारायला लागेल हे सान्गुनही! (मी घरातुन बघत होतो, तिघाही पोरान्नी एकेकट्याने जाउन, कोण बघत नाही ना बघत, गाडी पुढे मागे ओढून बघितली होती.... आईशप्पथ सान्गतो... हे खर हे! फक्त मला बोध इतकाच झाला की वय लहान असेस्तोवरच माणूस प्राप्त परिस्थिती प्रामाणीकपणे समजुन घेऊ शकतो, वय वाढले की मात्र आडमुठेपणा वाढतो! पोरान्ना कळल, प्राप्त गाडिस धक्का मारावा लागू शकतो असे बापाने सान्गितलय, तर लगेच त्यान्नी ते "जमतय" की नाही तपासुन घेतल! आहे की नाही गम्मत?)
तर मुद्दा हा की साजिर्‍याने वर वर्णन केलेल्या परिस्थितीपुढे, वेळच्या वेळिच योग्य त्या गोष्टी उपभोगण्याचे सूत्र लक्षात घेतल्यास, गाडी कोणती घेता या पेक्षा, काय परिस्थितीत कशाच्या निकडीवर तावुन सुलाखुन घेऊन मनोभावे उपभोगता याला जास्त महत्व आहे! Happy
आमेन

आमची आपली ऑल टाईम ग्रेट वॅगन आर. पेट्रोल तसेज एल्.पी.जी वर चालणारी. किफायतशीर. एल्.पी.जी. ला ११ चं अ‍ॅव्हरेज देते. फक्त मुंबईबाहेर एल्.पी.जी असलेले पेट्रोल पंप फार नाहीत किंवा असले तर माहीत नाहीत. मुंबई - गोवा करून आलो दोन वर्षांपूर्वी. आता पुन्हा डिसेंबरात जाण्याचा विचार आहे. फक्त बाहेरगावी जाताना छोट्या डिकीचा प्रॉब्लेम व्यवस्थीत जाणवतो. आजच कॅरीअरची चौकशी करून आलो. कॅरीअर लावूनच कोकणांत जायचं आहे म्हणजे सामान ठेवण्याचा प्रश्न नाही.

किर्‍या, क्यारिअरला पर्याय नाही! Happy
बर्‍याच लोकान्ना ते दिसायला आवडत नाही
पण मला मात्र बिनाक्यारिअरची गाडी भुन्डी किन्वा टकली वाटते Proud
अन हल्ली एलपीजीचे बरेच पम्प अस्तात रे! फक्त चौकशी करत जायचे!

बरोबर किरु. फ्युएल इकॉनॉमी आणि जबरदस्त युटिलिटी यांच्या जोरावर इतक्या नवीन गाड्या (त्यातही खुद्द मारुतीच्याच जास्त आहेत) येऊनही अजून या गाडीला मागणी आहे. एवढेच नव्हे, तर २०१० मध्ये तिची सुधारित आवृत्तीही येते आहे. वॅगनआर-ड्युओ ही पेट्रोल तसेच एलपीजीवर चालणारी आणखीच मस्त गाडी.
सँट्रोसारखीच मोठी हेडरूम आणि सीट्सची अ‍ॅरेंजमेंट ही ठळक वैशिष्ट्ये. (पण याचमुळे हायवेला, जास्त वेगात थोडी अनस्टेबल होते हा एक छोटासा तोटा).

मी गाडी घेते वेळी ऐकलेली मौल्यवान ग्रुहितके........

१. ५ लाखा खाली गाडी घ्यायची असेल तर मारुति सुझुकी डोळे झाकुन घ्यावी.
५ लाखाच्या वरती होंडा किंवा टोयोटा घ्यावी.

२. उस मेड ( US made) गाडी ५ वर्ष नीट चालते.....फोर्ड, GM च्या ५ वर्ष जुन्या गाड्या रस्त्यावर कशा दिसतात हे पहावं.....म्हणजे...किति धुर ओकते...कशी चालते....कलर कसा आहे....

(स्वानुभव : - ५ वर्ष जुनी ऊस मेड गाडया लाखात एक दिसतात..... Happy दिसल्या तरी खुप आजारी वाटतात.)

३. Preferred List = होंडा टोयोटा मित्सुबिशी निस्सान सुझुकी बी एम ड्ब्लु मर्सिडिस
hyundai

Non preffered List = Fiat, Ford, GM, Chevy, tata

वरील ग्रुहितके मान्य असतील तर मा मा मा लिहा....
नामंजूर असतील तर ना ना ना लिहा....
१ लं मान्य आणी दुसरं नामंजूर असेल तर.....मा ना लिहा....
याप्रमाणे....

साजिरा सर्व पोस्टे मस्त. पटेश.

माझा नवरा असता तर त्याने हा बीबी चालवला असता नक्की. मला अगदी होंडा सिटीची किल्ली त्याच्या हातात ठेवायची होती. Happy

काही भा प्र.
वोक्स वागेन जेटा/ येटा चा काय रिपोर्ट.

एम एच १४ कुठली व एम एच १ कुठली? आज दोन पाहिल्या. अगदी माहेरचि गाडी फीलिन्ग आले.
आंध्र प्रदेशात पेट्रोल पम्पाला पेट्रोल बंक असे म्हणतात.>> हूड. बरोबर. आणी गाडीला तेलुगुत बंडी म्हणतात म्हणजे हा आमच्या भाषेत बंडीबीबी आहे.

MH
१ to ४ मुंम्बई
६ - रायगड
९ - कोल्हापूर
१० - सांगली
११ - सातारा
१२ - पुणे
१३ - सोलापूर
१४ - पिंपरी चिंचवड
१६ - अ. नगर
१७ - श्रीरामपूर
२० - औरंगाबाद
२४ - लातूर
४३ - नवी मुंम्बई

चु. भु दे घे....

add if you know more...

अतिशय धन्यवाद. गाडयांचे नंप्लेट पाहणे ही जुनी आवड आहे.
Please watch Car and bike show on NDTV channels. It is hosted by Siddharth Patankar
who is very knowledgeable and looks very cute. मी तो शो केवळ मराठी माणसाने होस्ट केलेला आहे
म्हणून बघते. त्यात सगळ्या रिव्यु च्या गाड्या एक्ष्प्रेस वेला नेतात ते ही आवड्ते मला.

आजचा अख्खा 'टाईम्स ऑफ इंडिया' फोक्सवॅगन ने 'विकत' घेतला आहे, असे म्हटले तरी चालेल. आजच्या टाईम्सला (मेन इश्यु) पाने २०+४. त्यातली '+४'- चारही फुल पेजेस- हे फक्त फोक्सवॅगन. (हे '+४' म्हणजे अख्ख्या अंकाला एक कव्हर, अन त्यावरही रीतसर टाईम्स ऑफ इंडियाचा लोगो). २० पानांपैकी खालील पानांवर फोक्सवॅगनच्या जाहिराती (फुल / हाफ किंवा क्वार्टर पेज)..
१, ५, ७, ९, ११, १३, १५, १७.

आयला, हा अभिनव प्रकार त्या 'जाहिराती देता का कुणी..' बीबीवर टाकला पाहिजे. असो. हे इथे लिहिणे खरे तर अस्थानी. पण 'फोक्सवॅगन' किती तयारीने भारतात उतरली आहे, हे दाखविण्याचा प्रयत्न. Happy

चाकणला भरपूर गुंतवणूक करून एक मोठा, वर्षाला एक लाखांपेक्षा जास्त गाड्या बनवू शकणारा अद्ययावत प्लँट त्यांनी यावर्षी सुरू केला आहे. पुण्यात 'दास ऑटो' हा त्यांचा डीलर.

फोक्सवॅगन ही ऑडी, स्कोडा, बेंटली, बुगाटी, लँबोर्घिनी.. इ. ची बहिणच म्हटली पाहिजे. खरे तर एकच ग्रुप, पण आपापली वेगवेगळी उत्पादने घेऊन स्वतंत्रपणे बाजारात अस्तित्व.

दणकट बांधणी, सुरक्षिततेची पुरेपूर काळाजी, पॉवरफुल गाड्या, नवनवीन तंत्रांचा आवर्जून वापर ही जर्मन कंपन्यांची वैशिष्ट्ये सांगता येतील. मागल्या वर्षी भारतात प्रिमियम सेगमेंटमधल्या 'जेट्टा' आणि 'पस्साट' आल्या, अन त्यांना मिळणारा प्रतिसादही हळूहळू वाढतो आहे. विशेषतः जेट्टाला. ही पुण्यात १७-१८ लाखांपर्यंत, तर पसाट २२-२३ लाखांत जाते. या प्राईस रेंजमधले स्पर्धक- स्कोडा सुपर्ब, होंडा अ‍ॅकॉर्ड, ह्युंडाई सोनाटा, टोयोटा कॅम्री इ.

जेट्टाची टेस्ट राईड मी घेतलेली नाही. (लवकरच दास ऑटोमध्ये जाऊन घेईन). पण या गाडीचे रिव्ह्युज अतिशय चांगले आहेत.

'फोक्सवॅगन'च रे झकासा.

आणखी एक म्हणजे, लिजंडरी 'बीटल' नव्या रुपात येते आहे भारतात. अनेकांच्या नॉस्टॅल्जियाला हात घालायला. Happy डिसेंबरमध्ये दिसेल ही गाडी भारतात.
vw-beetle-india-photo.jpg
लौकिकार्थाने 'स्मॉल' कार, पण किंमत अंदाजे १३-१५ लाख असणार. (हा माझा अंदाज). हिची स्पर्धक- 'क्युटी' म्हणून ओळखली जाणारी फियाटची '५००'. (किंमत १७ लाख - ऑन रोड, पुणे). हा बघा तिचा फोटु. (टिळक रोडच्या पंडित ऑटोमध्ये बघायला मिळेल).
fiat500.jpg

हा उच्चार असा का आहे >> अच्छा अच्छा. मला वाटले- 'नक्की काय उच्चार आहे' हे विचारतोयस. 'का आहे' ते नाय ब्वा माहिती. कूनाला माहिती असेल तर लिहा. मलाही उत्सुकता आहे. Happy

साजिर्‍या, मस्त फोटोज. Happy
क्युटी पण सहिच आहे एकदम.. Happy किंमत पण सही आहे. Sad

वोल्सवॅगन बद्दल बोलतोयस का रे साजिर्‍या?

वोल्सवॅगन नाही. volkswagen- 'फोक्सवॅगन'च रे भो. Happy
फार तर हिंदीमध्ये 'फोक्सवागन' म्हण. Proud

तेच रे स्पेलिन्ग वेगळ आणि उच्चार वेगळा म्हणुन उत्सुकतेने विचारल.
बघ किरु पण गोंधळला. Happy
साजिरा तु गाड्यांचा डाय हार्ड फॅन दिसतोयस.

volkswagen चा जर्मन उच्चार फोक्सवॅगन आहे
volks -म्हणजे पीपल, सर्वसामान्य लोक या अर्थाने (folks सारखे)
wagen -वॅगन -गाडी,
volkswagen - peoples' car - लोकांची, सर्वसामान्यांची, सगळ्यांची गाडी

Pages