कोणती गाडी घ्यावी?

Submitted by साजिरा on 15 October, 2009 - 07:51

इतक्या गाड्या नि कंपन्या बाजारात आहेत, की निर्णय घेताना गोंधळ होणे साहजिकच असते. एकट्या मारुती-सुझुकीच्याच डझनावारी गाड्या आहेत. त्यात पुन्हा पेट्रोल, डिझेल शिवाय फीचर्स कमी-जास्त करून तयार केलेली मॉडेल्स. अधिक फीचर्ससाठी पन्नासेक हजार किंवा लाखभर रुपये बजेट वाढवावे, तर मग आणखी थोडे पैसे देऊन थोडी मोठी, यापेक्षा चांगली गाडी का घेऊ नये हा प्रश्न उभा रहतो. प्रत्येक कंपनीची, ब्रँडची एक इमेज आपल्या मनात ठसलेली असते. जुने बरेवाईट अनुभव पण पदरी असतात. शिवाय आपल्यापैकी बहुतेक जण कमी-जास्त फायनान्स घेऊनच गाड्या विकत घेतात. हे सारे टप्पे ओलांडून अनुभवलेली निर्णयप्रक्रिया म्हणाजे एक मोठा प्रवासच.

काही मॉडेल्स 'इंटरनॅशनल' असली, तरी भारतीय (छोटे) रस्ते अन गर्दीची (कोण बोललं रे ते- 'बेशिस्तीची म्हण की सरळ!') वाहतूक लक्षात घेता 'स्मॉल कार्स' अन 'मिडसाईझ सेदान कार्स' अर्थातच जास्त विकल्या जातात. यात पुन्हा 'गियरवाल्या' की 'ऑटोमॅटिक ट्रान्समिशनवाल्या' हेही आहेच. लक्झरी कार्स, सुपरलक्झरी कार्स, मल्टियुटिलिटी कार्स, स्पोर्ट्स युटिलिटी कार्स आणि स्पोर्ट्स लक्झरी कार्स - या सार्‍यांचाही आपापला चाहता वर्ग. सेगमेंट आहेच आहे.

तुमचे काय मत आणि अनुभव? नवीन गाडी घेणार्‍या मायबोलीकराला थोडीफार इनपुट्स मिळाली, तर तो दुवा देईल; अन भेटलाच, तर त्याच्या नव्या गाडीतून पार्टीला घेऊन जाईल- हा हेतू. Happy

याशिवाय इथेच दुचाक्या, नवीन लाँचेस, भारतातले बदलते ट्रेंड्स आणि एकूण वातावरण, इंटरनॅशनल मॉडेल्स आणि ट्रेंड्स, मेंटेनन्स टिप्स यांबद्दलही कृपया लिहा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

निम्बुडा, एवढ्या मोठ्या फॅमिलीसाठी स्पार्कपेक्शा वॅगन आर नक्किच बेटर ऑप्शन आहे. मी वॅगन आर वापरतो. टॉल बॉडी असल्याने मागे बसायला कम्फर्टेबल आहे. ५ जण आरामात बसतात. १२ ते १४ अ‍ॅवरेज मिळते. नवी वॅगन आर अधिक आरामदायी आहे. ईन्टेरिअर बेटर आहे. अर्थात, मागे बसुन लॅपटॉप्वर काम करताना त्रास होतो खुप कम्पन जाणवते. पण फॅमिलीसाठी मात्र स्पार्क्च्या तुलनेत नक्किच उजवी आहे. ऐसपैस जागा (स्पार्कपेक्शा जास्त). मेन्टेनन्सचा अजिबात त्रास नाही. लाइक ऑल मारुती कार्स वॅल्यु फॉर मनी.

स्पार्क ही गाडी चान्गली असली तरी ती हम दो हमारे दो किन्वा हमारा एक अश्या फॅमिलीकरता आहे. वैयक्तिक मत.

हा हा.

मामी घेतली की करा अभिनंदन. आताशी स्पार्क फक्त "खयालोंमें.........." :स्पार्क च्या स्वप्नात रममाण झालेली बाहुली:

तुम्हारे जैसी बीबी है तो उन्हे क्या करेगा मालनबी? कारांइच देखेंगा ना. लाइट लेलो मेरी अम्मा : )

ऐसपैस जागा >>>
मेन्टेनन्सचा अजिबात त्रास नाही. >>>

आमच्या ओळखीच्या एका फॅमिलीने देखील वॅगन आर बद्दल हाच रिव्ह्यु दिला होता. त्यामुळे २-३ आठवड्यापूर्वी पर्यंत वॅगन आर चेच खूळ होते डोक्यात. पण मध्यंतरी पेपर मध्ये शेवर्ले प्रॉमिस बद्दल वाचलं आणि ठाण्याच्या शेवर्ले शोरुम मध्ये जाऊन चौकशी केली तर लक्षात आलं की स्पार्कचे टॉप मॉडेल (LT) ज्या किमतीत बसतेय साधारण त्याच किमतीत वॅगन आर चे लोअर मॉडेल (LXI ) बसतेय.
[१) स्पार्कचे ३ मॉडेल्स आहेत - PS, LS and LT
2) वॅगन आर चे २ मॉडेल्स आहेत - LXI and VXI
]

शिवाय ३ वर्षाचे मेन्टेनन्स फ्री आहे स्पार्कचे. त्याच प्रमाणे दर महिन्यात २५ ते ३५ हजारच्या range मध्ये discount आहे. शिवाय corporate discount वेगळा. स्पार्कचा मार्केट मध्ये अजून तितकासा बोलबाला नसल्याने कदाचित स्पार्कला promote करण्यासाठी या ऑफर्स वगैरे असतील. पण वॅगन आर ला असे काहीच नाहीये.

म्हणून मग स्पार्क कडे कल जातोय.

स्पार्क माझ्या आत्येकडे आहे.....पण फॅमिली तिघान्ची आहे म्हणुन ठिक आहे. मोठ्या फॅमिलीसाठी बुट स्पेस आणि इतर विचर करता वॅगन आर नक्किच बेटर्......पण प्राईसिन्ग फॅक्टर आणि ३ ईयर्स वॉरन्टी ही अ‍ॅट्रॅक्टिव्ह ऑफर आहे...... फक्त या वॉरन्टीमध्ये काय काय अन्तर्भुत आहे ते निट पहा. कधी कधी ह्या ऑफर्स नावापुरत्या निघतात आणि प्रत्यक्ष सर्व्हिसिन्ग्च्या वेळी मग काही पार्ट्स त्याच्या अन्डर येत नाहीत असे ऐकावे लागते.... म्हणुन वॉरन्टीची सखोल महीती काढा, म्हणजे वर्शभरानन्तरचा त्रास टळेल.

साजिरा.....मारुतीच्या एको गाडीबद्द्ल तुमचे मत द्या प्लिज!
जास्त लोकांसाठी म्हणुन माझ्या भावाने बुक केली होती (खर तर ओम्नीच्या त्रुटी काढुन मारुती ने ही गाडी काढली) पण नंबर येण्याच्या आत कॅन्सल केली... का तर म्हणे अ‍ॅवरेज देते. १५-१६ कि.मी. असा कंपनीचा दावा असला तरी खर तर ती १२ च देते असं समजतं!

तुमच्या काही ऐकीवात आहे का इकोबद्दल?

बकवास........... आर्ये, मी टेस्ट ड्राईव्ह घेतली आहे. यापेक्षा जुनी "वेर्सा" चान्गली... निदान पॉवर्फुल एसी होता. एको मध्ये ७ सिटर्ला एसी नाही...म्हणजे तो बसवुन घ्ययचा..... ५ सिटर्मध्ये एसी आहे पण आतली सिट्स्ची रचना खास नाही....... त्यापेक्षा ओमनी बरी...... नव्या इतर गाड्याच्या तुलनेत तर ईन्टेरियर आणि एक्न्दर सर्वच सुमार आहे. एखाद्याचा कॅटरिन्गचा किन्वा तत्सम मालवाहु व्यवसाय आहे त्याला ठिक आहे एक्वेळ, पण घरच्यासाठी अजिबात नाही........आणि अ‍ॅवेरेज १२ च देते हे ही खरय्...

ओल्टो/अ स्टार्ला आता चान्गले पर्याय आहेत बाजारात्.....तेही बघायला सान्गा.....
निस्सान मय्क्रा, स्पार्क, एस्टिलो ई.

शिवाय ३ वर्षाचे मेन्टेनन्स फ्री आहे स्पार्कचे >> जनरली असल्या ऑफर मध्ये फक्त मजूरी फ्री असते. जे काही सुट्टे भाग, ऑइल वापरतात त्याचे पैसे द्यावे लागतात. फ्री काय काय आहे ते विचारून घ्या.
मी स्पार्कमध्ये बसलेलो नाही पण वॅगन आरमध्ये मागे ३ जण आरामात बसणं जरा मुष्कीलच वाटतं (वॅगन आर मध्ये मी बसलोय)

अजून एक सल्ला : गाडी घेताना त्याचे सेफ्टी फीचर्सपण नक्की विचारात घ्या (स्पेशली तुमच्याकडं लहान मूल आहे म्हणून). जर एयर बॅग्स अव्हेलेबल असतील कुठल्या मॉडेल मध्ये तर ते मॉडेल घ्या.

इकोला 'कार' म्हणणे म्हणजे धाडसच आहे. व्हर्सा आणि इकोच्या किंमतीत दुपटीचा फरक आहे. त्यामुळे तुलना शक्यच नाही. भ्रमर म्हणतो तसं, धंदेवाईक लोकांना माल आणि माणसे वाहून न्यायला स्वस्त पर्याय आहे तो. आपल्या ग्रामीण भागांतली माणसांची घाऊक वाहतुक करण्यासाठी (थोडक्यात 'शीटे' भरण्यासाठी) ही गाडी दिसू लागेल काही दिवसांत.

मला अल्टो चा लूक एकदम "गरीब बिच्चारे गायीचे रोडावलेले वासरू" असा वाटतो. त्यामुळे अल्टो मुळीच घ्यायची नाही हे पहिल्यापासून कन्फर्म होते माझे Wink

आर्या, भ्रमरच्या म्हणण्या प्रमाणे नवीन trendy looks वाल्या cars आहेत आता market मध्ये available. तुझ्या भावाला त्यांचा विचार करायला सांग Happy

फोर्ड्च्या सेल्स सर्व्हिस्बद्दल कोणाला माहिती आहे का.......... म्हणजे नेटवर्क, खर्च आणि आउटलेट्स याबाबतीत्.........कारण जुनी "फ्युजन" नवी "फिगो होऊन आलिये ती चान्गलिये....पण फोर्ड्ची सेर्व्हिस्ची काळजी वाटते....

जनरली असल्या ऑफर मध्ये फक्त मजूरी फ्री असते. जे काही सुट्टे भाग, ऑइल वापरतात त्याचे पैसे द्यावे लागतात. >>>
मनीष, ऑईल फ्री आहे म्हणून संगितलंय त्यांनी. अजून काय काय फ्री आहे ते पण सांगितलंय. आता आठवत नाहीये. मोदकला विचारून सांगत्ये. फक्त गाडीची सर्व्हीस सेंटर पर्यंत ने-आण करण्याचा खर्च आपला.

<<<आपल्या ग्रामीण भागांतली माणसांची घाऊक वाहतुक करण्यासाठी (थोडक्यात 'शीटे' भरण्यासाठी) ही गाडी दिसू लागेल काही दिवसांत.<<

साजिरा, सिटीमधे कॉलसेंटरला याच गाड्या भरतातेत सध्ध्या!

<<आर्या, भ्रमरच्या म्हणण्या प्रमाणे नवीन trendy looks वाल्या cars आहेत आता market मध्ये available. तुझ्या भावाला त्यांचा विचार करायला सांग<<
निंबुडा, आमची सद्ध्याची गरज फक्त ट्रेन्डी अशी नसुन ८ लोकांकरता गाडी अशी आहे. Happy

*पेट्रोल गाडी
*८ लोकांकरता (दोन जोडपे + आई+ नातवंड)
*आउटसाईडला जाण्यासाठी दणकट
* बजेट फक्त ४-५ लाख

अशी आमची अवस्था आहे.

जाणकारांनी सल्ला द्या बरं!

आर्या, नविनच गाडी हवी हा जर अट्टाहास नसेल तर मग युज्ड कार शोरूम्मध्ये २००४ ते २००५ ची स्कोर्पिओ / टवेरा या बजेटमध्ये नक्कि मिळेल्.....जेव्हा फॅमिली मोठी आणि बजेट कमी असेल तेव्हा हा पर्याय चेक करायला हर्कत नाही....... कमी चाललेली वेल मेन्टेन्ड गाडी सहज मिळते हल्लि.......युज्ड कार मार्‍केट तेजित आहे सध्या..........
आणि नीत पारखुन घेतली तर चान्गली गाडिही मिळते......... आपल्या बजेटमध्ये मोठी गाडी मिळते मोठ्या फॅमिलिसाठी..... एक सहज म्हणुन चक्कर मारुन यायला सान्ग भावाला...... पुण्यात हाय्वेवर महिन्ड्राचे शोव्रूम आहे ना....फ्र्स्ट चॉईस...... ट्राय कर........
टवेराचे अ‍ॅव्रेज चान्गले आहे आणि स्कॉर्पिओ दणकट आहे गाडी........

मी आत्ताच गूगलून बघितलं "Chevrolet promise+spark+complaints" असं. it seems many people have complaints on the Chevrolet promise and their gold coin offer. Uhoh

it seems we need to re-think on our whole decision. Uhoh

पेट्रोल तवेरा किंवा स्कॉर्पिओ मिळतात का?
पेट्रोल गाडीच (आणि मोठी) पाहिजे असेल तर सेकंड हँड इनोवा हा सगळ्यात चांगला ऑप्शन (जर ४-५ लाख किंमतीत येत असेल तर)

अगदी हम्खास मिळतात. ईनोव्हा गाडी मस्त आहे पण बजेट वाढवावे लागेल. २००५ पासुनची ईनोव्हा ७ लाखाच्या खाली मिळने कठिण आहे. रिसेल व्हॅल्यु जास्त आहे कारण रिलायेबल आहे.

निंबुडा, समाधानी असणारे लोक फारसे कुठे लिहित नाहीत. कंप्लेंट्स असल्या की जागा शोधशोधून लिहिल्या जातात- हेही लक्षात ठेवा. हा अनुभव मीही घेतला आहे. मी जी गाडी घेणार होतो, तिच्यासंदर्भातल्या ब्लॉगवरच्या कंप्लेंट्स बद्दल मी अभ्यास केला, आणि सर्व्हिस मॅनेजरशी चर्चाही केली त्याबद्दल. बर्‍याच वेळेला एखादी गोष्ट कशी वापरायची याचे व्यवस्थित ट्रेनिंग कस्टमरला देणे आवश्यक असते, ते हे शोरूमवाले लोक करत नाहीत. चुकीच्या पद्धतीने वापरल्यामुळे कालांतराने प्रश्न उभे राहतात, आणि त्या प्रॉडक्टबद्दल लोकांचं नकारात्मक मत तयार होतं.

त्यावेळी मी घेणार असलेल्या नवीन गाडीच्या एसीबद्दल तक्रारी वाचल्या होत्या- वेगवेगळ्या ठिकाणी. मी शोरुमला विचारले, तेव्हा हे ऑटो-क्लायमेट-कंट्रोलचे फंक्शन इतर गाड्यांपेक्षा थोडे वेगळ्या पद्धतीने वापरायचे आहे, हे कळले. त्याच सुमारास भावानेही हुंदाई-वरना गाडी घेतली होती. त्याचे (आणि माझ्या इतर काही मित्रांचेही) म्हणणे- माझ्या गाडीचा एसी इतर गाड्यांच्या तुलनेत फार इफिशियंट आहे..!

त्या कंप्लेंट्सबद्दल शोरुममध्ये एकदा सर्व्हिस मॅनेजरला भेटून चर्चा करून बघा. थोडक्यात कुणाचेही मत ग्राह्य न धरता 'ऐकावे मनाचे..' करा. Happy

तक्रार तर सगळेच करत असतात, पण आपली गरज पाहून model ठरवावे. मला bootspace आणि comfort हवा आहे म्हणून wagon-R ठरवली, पण आता चिरंजीव स्विफ्ट वर अडून बसले आहेत. मी जेव्हा जुनी wagon-R चालवून पाहिली, त्यावेळी चांगली वाटली, पण नवीन अजून नीट पाहिली नाही. माझ्या काही मित्रांचा फोर्ड/चेवोर्लेत गाड्यांचा अनुभव तितकासा चांगला नाही (याला इतर कारणे खूप आहेत). तात्पर्य, ऐकावे जनाचे, करावे मनाचे (माझ्या बाबतीत कदाचित, चिरंजीवांचे).

आप्ले मत मान्डणारे सगळेच असमाधानी असतिल असे नाही..... कधी कधी आपल्याला थेच लागली तर मगच्याला सावध करावे असही पवित्रा असु शकतो..... कधी नॉलेज शेअर करणे हाही एक निव्वळ हेतु असु शकतो......पण हेही खरे शेवटी ऐकावे जनाचे.....

कारण आपल्या लिमितेशन्स आणि गरजा आपल्यालाच माहित असतात.... Happy

पण मार्केटिन्ग ऑफर्स बघुन भुलु नये डोळस्पणे निर्णय घ्या...... ऑल द बेस्ट. फुकटचे सल्ले द्यायला आम्ही आहोतच "पडिक"... Happy

कुणाचेही मत ग्राह्य न धरता 'ऐकावे मनाचे..' करा. >>> हे तर खरेच कारं शेवटी पैसा आपला जाणार अस्तो पण मी भ्रमर यांनी म्हटल्या प्रमाणे इतरांचा अनुभव ऐकून आपले मत नक्की करायला मदत होऊ शकते म्हणून इथे प्रश्न विचारतेय. मोदकच्या एका मैत्रिणीने नुकतीच स्पार्क घेतल्याचे कळलेय. तिला पण विचारणार आहे की प्रॉमिस बद्दल हे शेवर्ले चे लोक जे म्हणतायत ते खरे आहे का ते!

पण मार्केटिन्ग ऑफर्स बघुन भुलु नये डोळस्पणे निर्णय घ्या...... ऑल द बेस्ट. >>> धन्यवाद रे भ्रमरा!
मनीष यांनी आणि तू सुचविल्या प्रमाणे ऑफर्स बद्दल नीट चौकशी करु आम्ही पुन्हा Happy

भ्रमरा, निंबुडाने ते ऑनलाईन कंप्लेंट्सबद्दल लिहिले म्हणून माझी वरची पोस्ट रे. Happy (तुझ्या पोस्टवर मी 'ऐकावे मनाचे..' असं लिहिलं, असं तर नाही ना तुला वाटलं? Happy )

अरे नाही नाही...... अजिबात नाही....मी हे बाफ पुर्वीपासुन फॉलो कर्तोय आणि गाडी हा आपला विक पॉईन्ट्... तसे वाटुन नको रे घेउ........ अरे आपल्या सल्ल्याचा उपयोग झाला तर "निम्बुडा" गाडीच्या मागे लिहेल तरी " भुन्ग्याची क्रुपा / साजिर्‍याची पुण्याई"..... Biggrin

भुन्ग्याची क्रुपा / साजिर्‍याची पुण्याई"..... >>>Rofl

नक्कीच लिहावं लागेलसं दिसतंय Proud

निंबुडा तुम्ही एक तुलनात्मक अभ्यास करा.

१. मला स्पार्क का आवडते. - तिच्या लुक्स मुळे, त्या पॅकेज मुळे की आणखी कश्यामुळे.
२. अल्टो वा तिची दुसरी डायरेक्ट कॉम्पीटिटर - का नाही आवडत? मारुती नावा मुळे? खूप अल्टो असल्यामुळे की मला काहितरी लोकांपेक्षा वेगळं घ्यायचे त्यामुळे
३. तुम्ही गाडी कुठे वापरणार?
४.
५.

असे करत गेलात की हा संभ्रम दुर होईल. कारण प्रत्येकाचे मत वेगळे असते. Happy मार्केटिंग ऑफर वरुन मत बदलू नये ह्या मताचा मी ही आहे.

अमेरिकेत देशी लोक एकजात होन्डा किंवा टोयोटा घेतात. एखाद्या देशीने ह्या व्यतिरिक्त घेतली की १० त ले ४ देशी विचारतात अरे तू निस्सान का घेतली. (मला). मग म्हणल अबे तुझ्या गाडी पेक्षा हेड्,लेग ट्र्न्क रुम, मनुव्हर मस्त होते ते काही पटत नाही. मग माझ्यागाडीत बसून पाहिले की अरे हो बे बरी आहे की, पण टोयोटाचे इंजिन २ लाख मैल पण चालते. तुझ्या गाडीचे चालेल काय? ह्यावर काय म्हणनार? एकाने तर हिंदुत्वासारखा वाद घातला. Happy

पूर्वी तर देशी लोक फोर्ड, शेव्ही ह्या गाड्या घेत नव्हते फक्त जापानी गाड्या. आपल्याकडे शेव्ही, फोर्ड म्हणजे एकदम फंडू गाड्या पण अमेरिकेत आजही ह्या फंडू गाड्या नाहीत. आता चित्र थोडेफार बदलत चालले आहे. असे समज सगळीकडेच आहेत.

भुन्ग्याची क्रुपा / साजिर्‍याची पुण्याई Lol

Pages