कोणती गाडी घ्यावी?

Submitted by साजिरा on 15 October, 2009 - 07:51

इतक्या गाड्या नि कंपन्या बाजारात आहेत, की निर्णय घेताना गोंधळ होणे साहजिकच असते. एकट्या मारुती-सुझुकीच्याच डझनावारी गाड्या आहेत. त्यात पुन्हा पेट्रोल, डिझेल शिवाय फीचर्स कमी-जास्त करून तयार केलेली मॉडेल्स. अधिक फीचर्ससाठी पन्नासेक हजार किंवा लाखभर रुपये बजेट वाढवावे, तर मग आणखी थोडे पैसे देऊन थोडी मोठी, यापेक्षा चांगली गाडी का घेऊ नये हा प्रश्न उभा रहतो. प्रत्येक कंपनीची, ब्रँडची एक इमेज आपल्या मनात ठसलेली असते. जुने बरेवाईट अनुभव पण पदरी असतात. शिवाय आपल्यापैकी बहुतेक जण कमी-जास्त फायनान्स घेऊनच गाड्या विकत घेतात. हे सारे टप्पे ओलांडून अनुभवलेली निर्णयप्रक्रिया म्हणाजे एक मोठा प्रवासच.

काही मॉडेल्स 'इंटरनॅशनल' असली, तरी भारतीय (छोटे) रस्ते अन गर्दीची (कोण बोललं रे ते- 'बेशिस्तीची म्हण की सरळ!') वाहतूक लक्षात घेता 'स्मॉल कार्स' अन 'मिडसाईझ सेदान कार्स' अर्थातच जास्त विकल्या जातात. यात पुन्हा 'गियरवाल्या' की 'ऑटोमॅटिक ट्रान्समिशनवाल्या' हेही आहेच. लक्झरी कार्स, सुपरलक्झरी कार्स, मल्टियुटिलिटी कार्स, स्पोर्ट्स युटिलिटी कार्स आणि स्पोर्ट्स लक्झरी कार्स - या सार्‍यांचाही आपापला चाहता वर्ग. सेगमेंट आहेच आहे.

तुमचे काय मत आणि अनुभव? नवीन गाडी घेणार्‍या मायबोलीकराला थोडीफार इनपुट्स मिळाली, तर तो दुवा देईल; अन भेटलाच, तर त्याच्या नव्या गाडीतून पार्टीला घेऊन जाईल- हा हेतू. Happy

याशिवाय इथेच दुचाक्या, नवीन लाँचेस, भारतातले बदलते ट्रेंड्स आणि एकूण वातावरण, इंटरनॅशनल मॉडेल्स आणि ट्रेंड्स, मेंटेनन्स टिप्स यांबद्दलही कृपया लिहा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

<भारतात किंमती एव्हढ्या जास्त कां?>
कारण भारतात अत्यंत श्रीमंत लोक रहातात. शिवाय स्वस्त माल घेणे हे भारतीयांच्या प्रतिष्ठेला शोभत नाही. तीच गाडी जर जरा स्वस्त केली तर लोक घेणारच नाहीत, ह्या:! असल्या चीप गाड्या घेत नाही आम्ही!

भारतात लोकांजवळ कोट्यवधी रुपये असतात. पांढरे पैसे जास्त नसले तरी काळे धरून नक्कीच कोट्यावधी असतात. मग २५ लाख म्हणजे किस झाडकी पत्ति! घासाघीस वगैरे करणे हे त्यांच्या इभ्रतीला शोभत नाही.

ते भाव करणारे दळीद्री लोक अमेरिकेतले! इथे एखादा अतिशय श्रीमंत माणूस, ज्याच्याजवळ सहज एक दोन कोटी डॉ. असतील, तो सुद्धा बढाई मारतो की मी ८०००० डॉ. ची मर्क ७५००० डॉ. ला घेतली, भाव करून. किती हुषार मी!

भारतात किंमती एव्हढ्या जास्त कां? >> इम्पोर्ट ड्युटी भरावी लागते व ती भारतात अजूनही जास्त म्हणून इतके भाव होतात. काही गाड्या सिकेडी असतात व भारतात फक्त असेंब्ली लाईन असते.
कॅम्री, अ‍ॅकॉर्ड अन CR-V सारख्या साधारण गाड्या देखील २० लाखाच्या वर. ज्या इथे १०-१२ लाखाला मिळतात. (भारतीय रु मध्ये). तिथेच तयार होणारी स्कोडा तुलनेने बरीच स्वस्त मिळते.
येत्या काही वर्षात इम्पोर्ट ड्युटी कमी होईल कारण आता उत्पादक तिथेच गाड्या तयार करायला लागलेत तर पर्यायाने सरकारला विचार करावा लागेल. तेंव्हा कदाचित बिटल घेण्यासाठी कॉर्व्हे एवढी किंमत द्यावी लागणार नाही.

झक्की जर त्यामागील खरे कारण माहीती नसेल तर नेहमीच भारतीयांना शिव्या देणे कितपत बरोबर?

उलट अमेरिकेतले महा हुशार लोकं जिथे कारचे १.६ किंवा १.८ लिटर इंजीन कामाला येउ शकते तिथे रोज ३.२, ४.०, ५.० लिटर सारखे मोठमोठी इंजिन वापरुन ग्लोबल वॉर्मिंग व जगातून तेल नाहीसे करण्यास हातभार लावतात. काय गरज आहे रोज टाहो, सबअर्बन, आस्पेन, अनेक रॅम, एक्स्प्लोरर सारख्या अवाढव्य गाड्या रोज नौकरीवर येण्या जाण्यासाठी वापरायची? शेतमालासाठी किंवा अवजड गोष्टींसाठी वापरणारे ठिक पण इतर लोक? साधारण गाडीचे इंजिन २.५ असतेच असते. बर युरोप मध्ये २.५ लिटर मध्ये जेवढे हॉर्सपावर मिळायला हवे तेवढे अमेरिकन गाड्यात मिळत नाही. नुस्तचे आपले रोज व्हि ६, व्हि ८ जे अवजड ट्रक वापरायचे.

<झक्की जर त्यामागील खरे कारण माहीती नसेल तर नेहमीच भारतीयांना शिव्या देणे कितपत बरोबर?>
सगळी कारणे पक्की कळतात मला. त्याचबरोबर निरनिराळ्या लोकांच्या मनोवृत्तीहि जवळून पाहिल्या आहेत.

यात तुम्हाला मी भारतीयांना शिव्या देतो असे का वाटते? जी काय तुमची मनोवृत्ति असेल त्याचा अभिमान बाळगा. तुम्ही म्हणा - परवडते, जमते म्हणून असे वागतो. आहेतच पैसे आमच्याकडे!! असे म्हणा. शिव्या काय त्यात?

मला स्वतःला हे अमेरिकन भाव करणे म्हणजेच दळीद्रीपणाचे वाटते. तुम्ही पण तसे म्हणा!

भारतात लोक नोकर ठेवतात याचे अमेरिकन लोकांना आश्चर्य वाटते. स्वतःची कामे स्वतः नाही करता येत? पण त्यांनी तसे म्हंटले म्हणून भारतीयांना शिव्या दिल्यासारखे का वाटावे? समाजात आपण जसे वागतो, त्याबद्दल अभिमान हवा. उलट भारतात जमते नि अमेरिकेत नाही हे अमेरिकेचेच उणे असे म्हणायला पाहिजे. तसे का नाही तुम्ही म्हणत? लगेच गळा काढता, शिव्या देतो म्हणून.

<उलट अमेरिकेतले महा हुशार लोकं जिथे कारचे १.६ किंवा १.८ लिटर इंजीन कामाला येउ शकते तिथे रोज ३.२, ४.०, ५.० लिटर सारखे मोठमोठी इंजिन वापरुन ग्लोबल वॉर्मिंग व जगातून तेल नाहीसे करण्यास हातभार लावतात. काय गरज आहे रोज टाहो, सबअर्बन, आस्पेन, अनेक रॅम, एक्स्प्लोरर सारख्या अवाढव्य गाड्या रोज नौकरीवर येण्या जाण्यासाठी वापरायची? >

तुमच्या ह्या विधानाला अमेरिकन लोक शिव्या समजत नाहीत, किंवा तिकडे लक्षहि देत नाहीत. उगाच शिव्या देतात म्हणून गळा काढत नाहीत. ठणकावून सांगतात, ग्लोबल वार्मिंग, तेलाची काटकसर आम्ही मानत नाही. अधिकाधिक पॉवर वाल्या गाड्या वापरणे हेच त्यांना आवडते, नि जमतेहि. उद्या तेल संपले तर पर्यायी शक्ति शोधण्यात अमेरिकेचाच पहिला नं. असेल. ग्लोबल वार्मिंग झाल्याचे त्यांच्या टाळक्यात शिरल्यावर त्यावर उपाय करण्यातहि अमेरिकेचाच पहिला नं. असेल.

नि त्यात जास्तीत जास्त योगदान भारतीय शास्त्रज्ञांचेच असेल. कारण भारत सरकार, त्यांचे राजकारण, समाजातले लोक इ. भानगडीत हुषार नि कर्तबगार लोक भारतात कुजून पडण्यापेक्षा कुठेतरी बाहेर जाऊन आपले जीवन जास्त फलित व सुखी करतील.

आज अमेरिकेत कित्येक क्षेत्रात, जवळ जवळ सर्वच क्षेत्रात, भारतीय वंशाच्या लोकांचे फार मोठे योगदान आहे, पण ते अमेरिकेत राहून. भारतात जाऊन करता आले नसते का त्यांना? आधी भारतातच होते ना? मग इकडे आल्यावर एकदम कसे ते एव्हढे हुषार नि कर्तबगार झाले? सगळ्या क्षेत्रात?

त्यांना कधीच वाटले नसेल का की हे भारतासाठी करावे? त्यांनी काय प्रयत्न केले, त्याचे काय झाले, हे त्यांनाच विचारा.

अजूनहि भारतीयांना फक्त पैसे पाहिजेत. कामाची पद्धत बदला, वेगळे काहि करा म्हंटलेले आवडत नाही. तुम्ही कोण शहाणे? तुम्हाला काय कळते ही वृत्ति. पैसे मात्र पाहिजेत. भारतात खरे तर कामे करायला अडचण पैशाची उरली नाही. पण खायला काय, मिळेल तेव्हढा पैसा हवाच आहे. बाकी नुसतीच बोंब. फक्त कुणि काही बोलू नका!!!

जी काय तुमची मनोवृत्ति असेल त्याचा अभिमान बाळगा. >> बरं ठिक आहे बाळगेल मी अभिमान.

तुम्ही जे वर लिहीले ते १०० टक्के बरोबर आहे, पण विषय गाड्यांच्या किमतीचा आहे, त्यात भारताचे योगदान, भ्रष्टाचार, काळा पैसा, भारतीय मनोवृत्ती ह्या सर्वांचा प्रश्न कुठे येतो हे मला कळाले नाही म्हणून तो प्रश्न विचारला. म्हणजे हेच जर तुम्ही भारतीय कुठे कमी पडतात अश्या बाफवर लिहीले असते तर मीच "अगदी अगदी" असे लिहून पहिली प्रतिक्रियाही दिली असती, पण ऑडियन्स / विषय / फोरम तो नाही असे वाटते.

हिली प्रतिक्रियाही दिली असती, पण ऑडियन्स / विषय / फोरम तो नाही असे वाटते
>>>

केदार, जाने दो पियेला आदमी है::फिदी:

शिवाय त्याना 'अ‍ॅडमिनि' स्ट्रेटिव्ह व्हिसा आहे वाटेल त्या बीबीवर वाटेल ते विषय चर्चिण्याचा !

हाय मी फोर्ड फिगोच बुक केली. लाल रंगाची. पोलो घ्यायला नकार आला घरातून. ब्लुटूथ एनेबल्ड आहे.
टायटानियम मॉडेल. शेवर्ले मलाच नको होती. बरी वाटली मला तरी. शोरूम घराजवळ. सर्विस सेंटर् हपीस जवळ. डेप्रीसीएशन क्लेम करणायासाठी खरेदी. टाटा फायनान्स चा इंट्रेस्ट रेट एचेसबीसीपेक्षा जास्त आहे.
मी देशी ब्यांकेतून कर्ज घेणार. त्याचा रेट अजून कमी आहे. कंपनी च्या नावावर घेतल्यास लाइफ टॅक्स २% जास्त? का?

मामीसाहेबा अभिनंदन Happy
उत्तम निर्णय घेतलाय.

केदार तु खरतर माझ्याच भावना व्यक्त केल्या आहेस.
रॉबिन Biggrin

नमस्कार ....

New Wagon R .. बद्दल काय मत आहे ?? (K-series engine) ..
मला घ्यायची आहे पिल्लु च्या b'day ला (Sep-10 ला) .... माझं बजेट ४ लाख आहे..... any views ??

नवीन फिगो गाडी घेतली त्याचे रामायण:

सर्व माबोकरांना अतिशय धन्यवाद तुमच्या शुभेच्छांमुळेच गाडीला अपघात होउनही काही जीवित हानी झाली नाही. I actually felt like I have used up all my good luck.

नवशिका मराठी वाहन चालक घेतला होता. त्याने डिलिवरी घेतानाच गाडी शोरूम मधून काढतानाच एका बसला उजवीकडून व एका झाडाला डावीकडून ठोकली डावे दार व आरसा गेला. मग गाडी दुसर्‍या एका आयकॉनला लागून थांबली नशीबाने नाहीतर नक्की त्याने कोणाच्यातरी अंगावर घातली अस्ती. नशीबाने इन्स्युअरन्स होता त्यामुळे पूर्ण रिपेअर्सचा खर्च मिळेल. गाडी लगेच सर्वेस सेंटर लाच गेली. घरी आलीच नाही मग जुना तेलुगु वाहन चालक शोधून त्याला परत कामावर घेतले. मराठी वाहन चालकाला तिथेच नारळ दिला. माझ्या कुटुंबाच्या जीवनाची जबाबदारी मी तुझ्यावर सोपवू शकत नाही. असे स्वच्छ सांगून. हा घरी काम करणार्‍या मावशींचा जावई आहे त्यामुळे दोन तीन दिवस घरी पण मावशी आहेत का जातात अशी परिस्थिती झाली. विनाकारण मनस्ताप झाला. ४०००० चे डॅमेज त्याने केले. वर दुसर्‍या आयकॉन मालकाला नुकसान भरपाई द्यावी लागली ते निराळेच. शिवाय जुना वाहन चालक आला म्हणून त्याला ही बोनस दिला. एकूण पैसे बरेच गेले. तसा प्लॅन नसताना.

आता गाडी नीट चालू आहे. आरामदायक राइड आहे व कुत्रे, मुलगी यांना अतिशय उपयोग होत आहे. जुना व अनुभवी वाहनचालक असल्याने रोजचे काम थोडे बहुत आरामदायक झाले आहे. मला ही गाडी टेक्निकल कारणे जसे ड्रायविन्ग प्लेझर पर्फोर्मन्स वगैरे साठी घ्यायची नव्हती त्यामुळे मेरेको चलता है. गाडीत त्यांनीच म्युसिक सिस्टिम दिली आहे पण त्याचा रिमोट नाही. गाडीत ब्लुटूथ आहे व आय्पॉड कनेक्ट करता येतो. पावर विंडोज नाहीत. छोटी गाडी छोट्या गरजा पूर्ण करण्यासाठी ठीक आहे.
I am over and done with long drives and driving adventures. so I don't mind.

आज इथे नवीन बीएमड्ब्ल्यू सेड्न लाँच झाली आहे. क्या कारै!

कारों में कार. फिगो हमार Happy

अर्र! मामी. थोडं वाईटच वाटलं वाचून. शोरुममधूनच बाहेर येताना असं होणं म्हणजे नव्या गाडीचा मूडच जाणं. Sad पण तुम्ही हे सगळं स्पोर्टींगली घेतलंत हे छानच. तुमच्यामध्ये खूप सकारात्मक दृष्टिकोन आहे. व्हेरी क्रेडीटेबल! मामी, कीप इट अप! Happy

गुड मामी. आता तुम्हाला, तुमच्या गाडीला काहीच होणार नाही. इडापीडा टळली बघा. Happy

केदार, टाटा न्यु सफारी चालवून बघितली नाही. त्यांनी अ‍ॅक्च्युली जुने इंजिन बदलायला हवे आहे. ते बदलले की नाही, माहिती नाही. त्यांची इंजिने फरशी बरी नाहीत, हे त्यांना कळले आहे- हे एक बरे. (इंडिका, इंडिगोची आधीच बदलली आहेत)

पण १०-१२ लाखांच्या सेगमेंटमध्ये इतके भारदस्त इंप्रेशन देणारी गाडी सध्या तरी नाही. माझ्या मालकीची सफारी आहे- याचे समाधान मानणार्‍यांचा एक कंपू आहे अजून. मग भले ती पार्किंग मध्ये पडिक असो.

मोदक, नवीन वॅगनआर मस्त आहे. व्हॅल्यु फॉर मनी. नवीन तंत्रज्ञानाचे के-सिरीज इंजिन आहे. फार फीचर्स नको असतील तर साडेतीन लाखाच्या आतच बसेल ती. आणखी थोडेच पैसे टाकून (मामींनी घेतली ती) फोर्ड फिगोचाही विचार करून बघा. (४ लाखांपासून पुढे).

माझ्या एका बॉसकडे टाटा सफारी होती पण ती रीसेल मध्ये विकताना त्यांना जाम त्रास झाले. साजिरा ला अनुमोदन. टाटा गाड्या मला जरा ओबडधोबड वाट्तात. गिवन द मनी मी तर परवडेल ती फारेन ब्रँड्चीच कार घेइन. मेक व वर्कमन शिप साठी.

आण्खी एक लोच्या म्हण्जी आमचे ग्यारेज अगदी सोसायटीच्या पाण्याच्या पंपसमोर आहे. आमचे चांगले ग्यारेज साहेबांनी शेजार्‍याला दिले चांगुल पणाने. त्यामुळे सध्यच्या ग्यारेजात लांबडी गाडी फिटतच नाही.
जुन्या डायवरला म्हण्ले अरे तू येणार माहीत अस्ते तर आपण होंडा सीटी घेतली अस्ती तर तो लगेच चावला
वो फिट नही होती थी अपने ग्यारेज में . चूप ऐकून घेतले काय करणार.

फिगो मी पण टाप एंड घेतली. टायटानिअम. महत्त्वाचे : दोन एअर ब्याग्ज,
क्रॅश झाली की गाडी आटोमाटिक अन्लॉक होते म्हण्जे कोणी अड्कत नाही.
वेट एलेकट्रोनिकली ब्यालन्स होते. व ब्रेक ची काहीतरी फंडू सिस्टिम आहे. रजिस्ट्रेशन झाले कि आता
गाडी सजवायची आहे. जून महिन्याचा प्रोजेक्ट. Happy

साजिरे......धन्स.....

तुझ्या कडे आहे का new wagon R ?..... आणि फिगो नको.... मला मारुति ची कार हवी आहे....
मी पण ऐकले आहे की एकदम मस्त आहे.... म्हणुन्...actually ज्यांनी वापरली आहे त्यांचा view हवा होता....

त्यांनी अ‍ॅक्च्युली जुने इंजिन बदलायला हवे आहे. ते बदलले की नाही, माहिती नाही. >> अरे नविन इंजिन आहे टर्बोचे म्हणूनच विचार करत आहे. पण ती खूप काम काढते हे माहित नव्हते.
`
मामी अभिनंदन !

कारदेखो.कॉम वर फोर्ड फ्युजन दिसत आहे. ती उपलब्ध आहे का? इथे फ्युजन मिड साईज कार आहे, पण तिकडे SUV दिसतेय.

मामी, तुमचा पॉझीटीव्ह अ‍ॅटीट्युड मला फार आवडतो. एक गालबोट लागून झालें, आता छान होईल सगळं.

फ्युजन घेऊ नका रे भो. कुठच्याही क्षणी गायब होईल मार्केटमधून. 'ए नो नॉनसेन्स कार' अशी जाहिरात करून थकले फोर्डवाले. आधीच फियाटने त्यांच्या फियेस्टाच्या नाकात दम आणला आहे. त्यांची बहुचर्चित ऑल-न्यु-फियेस्टा २०१० मध्ये अपेक्षित होती, ती कधी येते देव जाणे.

आणि फ्युजनला इथं तिला एसयुव्ही कुणी म्हणत नाही. मिडसाईझ पण नाही. पुन्टो, जाझ आणि आय२० ने जबरी आव्हान उभे केले आहे फ्युजनसमोर.

मोदक, युटिलिटी म्हणून घ्या वॅगनआर. वरती म्हणल्याप्रमाणे अल्टिमेट व्हॅल्यु फॉर मनी. पण स्टाईल, परफॉर्मन्स, फ्युचरिस्टिक लुक्स यांचा विचार करत असाल, तर दुसरे पण पर्याय बघा. Happy

मामी, ती एबीएस असेल.

धन्यवाद, मला खरेतर लक्झरी सेडन गाड्या खूप आवड्तात. जगातील तेलसाठा अजून ७० वरशे तरी आहे तर मजा करून घ्यावी. पुढील गाडी आता अजून ५ वर्शांनी तेव्हा स्प्लर्ज करणार. व डायवर ला युनिफॉर्म शिवून घेणार मस्तपैकी ऐट्बाज. I do want a three- pointed star in front of me!
German Engineering+ Italian khaanaa+ Indian Maid+ Chinese Managers+ Arab Financiers = great lifestyle. Proud

German Engineering+ Italian khaanaa+ Indian Maid+ Chinese Managers+ Arab Financiers = great lifestyle. >>> Lol Lol Lol

पालिओ / उनो / ११८ एनी बद्दल काय मत ए?

नाय तर जिप्सी / अ‍ॅम्बॅसेटर

दीप्या मतं कसली डोंबलाची विचारतोस? सगळ्या बंद झालेल्या गाड्या आहेत त्या, पॅलिओ सोडली तर. कुणी कष्ट करून रिव्ह्यु टाकलेही, तरी काय फायदा? नवीन गाड्या दिसत नाहीत काय तुला रस्त्यांवर?

घेण्याबद्दलच बोलत असशील तर वरच्यांपेक्षा मारूती८०० घे.

जिप्सी मस्त. आमच्याकडे १० वर्शे होती. सॉफ्ट टॉप पहिले मग त्यावर हार्ड टॉप बसविला होता. एसी नाही बसविता येत त्यात. आता तशी काही सोय असली तर माहित नाही. ४ व्हील ड्राइव पण आहे. शेतीची कामे, माल डिलिवरीला पण उपयुक्त. व्हेरी कूल कार. व एस्यूवी सारखी ढोली पण नाही दिसत. मार्वत्ती त्यामुळे सर्विस वगैरे नो प्राब्लेम. सॉफ्ट टॉप मध्ये प्रायवसी नाही.

बाकी भंगार. फिअ‍ॅटच्या डीज्जैन मध्ये प्राब्लेम वाट्तो मला. स्लीकनेस नाही. नुस्ते इंजीन चांगले असून काय उपवेग?

त्या सगळ्या मला आवडत होत्या लेका!!

जिप्सी / अ‍ॅम्बॅसेटर पण बंद झाल्यात ??? हे कधी झालं Sad

सफारीला वेळ लागेल... सफारी नवी काढलीना रे टाटांनी? अन् इंडीकाला माग पत्रे डकवून इंडीगो आणलीन अशीच एक ओपेलची ही होती नाव आठवत नाहीये पण

अन् ८०० नको त्यापेक्षा झेन काय वाईट्टे ?

की आय १० / २० म ला २० जास्त आवडली प्लान्टवर बघितली होती सह्ही आहे काये मत?

झेन आतनं लै कंजस्टेड आहे. मला तिचे लाइट्स पण आवड्त नाहीत.
शेवर्ले बीट/ आय २०/आल्टो आहेत कीरे.
मला पणवाट्लेले तू मागोवा घेतोयस कि काय.

फिअ‍ॅटच्या डीज्जैन मध्ये प्राब्लेम वाट्तो मला. स्लीकनेस नाही.
>> बरोबर मामी. आतापर्यंत खरेच हा प्रॉब्लेम होता.

पण २००९ मध्ये आलेल्या फियाटच्या नवीन गाड्या बघा.
fiat-linea.jpgFiat_Punto.jpg

साजिरा, बजेट जर थोडसं हाय असेल तर एस यु व्ही घेण्यास काही हरकत नाही.

होंडा सी आर व्ही, फोर्डची एन्डेव्योअर , किंवा मिस्तुबिशीची पजेरो ऑर शेर्वोलेट ची कॅप्टिव्हा , टोयोटोची लेक्सस.

नाहीतर मग इंडिअन मेड टाटा सफारी अन महिंद्रा स्कॉर्पिओ आहेच की...

अर्थात ह्या माझ्या आवडीच्या गाड्या आहेत. मी तर ह्यातलीच एखादी घेणार. Happy

German Engineering+ Italian khaanaa+ Indian Maid+ Chinese Managers+ Arab Financiers = great lifestyle.

खरा जोक असा आहे.

german engineers, british police, french chef, indian wife, italian lovers, american money, swiss organizers = Utopia

German police, british chef, french engineers, italian organizers, swiss lovers, american wife, indian money = perfectly miserable life

डुआय, तुझ्या आवडण्याच्या रेंजमध्ये जिप्सी-अँबेसेडरपासून आय२० आणि सफारी अशा लहान-मोठ्या, जुन्या-नव्या, कमी-जास्त किंमतीच्या अनेक गाड्या दिसत आहेत. तुला सिरियसली घ्यायची असेल, तर आवडण्याची रेंज हा नंतरचा मुद्दा. किंमतीची रेंज हा पहिला. Happy

झेनपेक्षा फिगो किंवा आय१० घे.
थोडे जास्त बजेट असेल तर आय२०, पुंटो घे.

पूहः मी खरा जोक नाही केला. माझा वरिजिनल जोक आहे. मला खरेच जर्मन गाड्या आवड्तात. मर्क, बीएम ड्बल्यू व ऑडी आमच्या घरापाशीच शोरूम्स आहेत. मी कायम विंडो शापिन्ग करते.बरोबर कुत्रे ( तेही जर्मन ! असल्याने दुकानात घेत नाहीत मला) तसेच डुकाटी बाइक्स (इटालिअन), आपली एन्फील्ड बुलेट थंडर बर्ड आल्टाईम फेवरिट.

लिनिया बरी दिसतेय पण मग स्कोडा लॉरा/ सुपर्ब का नको? आखिर पैसा अपना गवानेका है.

Pages