इतक्या गाड्या नि कंपन्या बाजारात आहेत, की निर्णय घेताना गोंधळ होणे साहजिकच असते. एकट्या मारुती-सुझुकीच्याच डझनावारी गाड्या आहेत. त्यात पुन्हा पेट्रोल, डिझेल शिवाय फीचर्स कमी-जास्त करून तयार केलेली मॉडेल्स. अधिक फीचर्ससाठी पन्नासेक हजार किंवा लाखभर रुपये बजेट वाढवावे, तर मग आणखी थोडे पैसे देऊन थोडी मोठी, यापेक्षा चांगली गाडी का घेऊ नये हा प्रश्न उभा रहतो. प्रत्येक कंपनीची, ब्रँडची एक इमेज आपल्या मनात ठसलेली असते. जुने बरेवाईट अनुभव पण पदरी असतात. शिवाय आपल्यापैकी बहुतेक जण कमी-जास्त फायनान्स घेऊनच गाड्या विकत घेतात. हे सारे टप्पे ओलांडून अनुभवलेली निर्णयप्रक्रिया म्हणाजे एक मोठा प्रवासच.
काही मॉडेल्स 'इंटरनॅशनल' असली, तरी भारतीय (छोटे) रस्ते अन गर्दीची (कोण बोललं रे ते- 'बेशिस्तीची म्हण की सरळ!') वाहतूक लक्षात घेता 'स्मॉल कार्स' अन 'मिडसाईझ सेदान कार्स' अर्थातच जास्त विकल्या जातात. यात पुन्हा 'गियरवाल्या' की 'ऑटोमॅटिक ट्रान्समिशनवाल्या' हेही आहेच. लक्झरी कार्स, सुपरलक्झरी कार्स, मल्टियुटिलिटी कार्स, स्पोर्ट्स युटिलिटी कार्स आणि स्पोर्ट्स लक्झरी कार्स - या सार्यांचाही आपापला चाहता वर्ग. सेगमेंट आहेच आहे.
तुमचे काय मत आणि अनुभव? नवीन गाडी घेणार्या मायबोलीकराला थोडीफार इनपुट्स मिळाली, तर तो दुवा देईल; अन भेटलाच, तर त्याच्या नव्या गाडीतून पार्टीला घेऊन जाईल- हा हेतू. 
याशिवाय इथेच दुचाक्या, नवीन लाँचेस, भारतातले बदलते ट्रेंड्स आणि एकूण वातावरण, इंटरनॅशनल मॉडेल्स आणि ट्रेंड्स, मेंटेनन्स टिप्स यांबद्दलही कृपया लिहा.
एकाने तर हिंदुत्वासारखा वाद
एकाने तर हिंदुत्वासारखा वाद घातला.
पूर्वी तर देशी लोक फोर्ड, शेव्ही ह्या गाड्या घेत नव्हते फक्त जापानी गाड्या. >> अजूनही (१ वर्षापूर्वी पर्यंत तरी) असेच आहे. मी जेव्हा मर्क्यूरी घेतली (आणि नंतर जीएमसीची SUV आणि सॅटर्न घेतली) तेव्हा पण मला लोकांनी हेच प्रश्न विचारले. खरंतर जनरल मोटर्स च्या गाड्यांचं अॅव्हरेज टोयोटा आणि होंडाशी कंपेरेबल आहे. शिवाय इंजिनच्या लाइफमध्ये फारसा फरक नाही राहिला. राहिला प्रश्न रीसेल व्हॅल्यूचा (ज्याचा देशी लोक सगळ्यात आधी विचार करतात). जापनीज गाड्यांना रीसेल जास्त आहे पण गाडी विकत घेताना पण जास्त पैसेच (डॉलर्स) द्यावे लागतात. अमेरिकन गाड्या थोड्या स्वस्तात मिळतात रीसेलला त्याप्रमाणेच कमी किंमत मिळते...
आय टेन मनात भरली आहे, पण ती
आय टेन मनात भरली आहे, पण ती मायलेज काय देते?
रिव्हँप्ड झेन एस्टीलोचा काय रिपोर्ट आहे?
भारतात गाडीचा इन्शुरन्स
भारतात गाडीचा इन्शुरन्स मिळायला वेळ लागतो का हो? की माझ्या भावाने थाप मारली की इन्शुरन्स व्हायला दोन तीन महिने लागतील, म्हणून तो आत्ता इथे येऊ शकत नाही!? आणि गाडी घेऊन जवळपास तीन चार महिने झाले, बरीच गाडी फिरवली त्याने, ती इन्शुरन्स शिवायच? का जोपर्यंत पकडत नाही तोपर्यंत कायदेशीर असते सगळे?
इथे तसेच असते, मोबाईलवर बोलत गाडी चालवण्याला बंदी आहे असा कायदा आहे. पण रस्त्यावर बघाल, तर अर्ध्याहून अधिक लोक खुश्शाल मोबाईलवर बोलत गाडी चालवत असतात. अर्थात् पकडल्या गेले, तर मोबाइल नि त्याचा चार वर्षाचा खर्च जेव्हढा त्याहून जास्त दंड होईल! नि इथे अशी पण सोय नाही की पोलीसबरोबर आपसात मिटवून टाकले!
झक्की, गाडीचा इन्स्युरन्स
झक्की,
गाडीचा इन्स्युरन्स मिळायला आजिबात वेळ लागत नाही. मी गाडी घेताना सकाळी चेक दिलेला, रात्री गाडी
काढतानाच अपघात झाला व डॅमेज झाले तर शोरूम वाल्यांनी पहिल्यांदी सांगितले तुम्ही पहिल्याच दिवशी इन्स्युरन्स क्लेम केलात असे समजा. पॉझिटिवली घ्या. हे मला तिथे जमलेल्या जवळजवळ प्रत्येकाने सांगितले. ह्या घट्नाक्रमात चेक अजून बँकेतून क्लीअरही झाला नसेल. तो दुसर्या वर्किंग डेला क्लीअर झाला असेल. पण गाडीच्या टी आर बरोबर मला पॉलिसी मिळालीच होती. गाडीचा विमा उतरवणे आपल्यासाठीच लाभ दायक आहे. मला तर वाट्ते चार अॅक्सेसरीज कमी घ्यावयात पण विमा नक्की असावा. अर्थात विदाउट विमा गाडी चाल्वायचे ऑप्शन इथे आंध्रात तरी नाहीये.. मामा चेक करतच असतात. पीयुसी पण मस्ट आहे.
इथे मोबाइल वर बोलताना/ सीट बेल्ट न लावता गाडी चालविली तर लगेच चालान बसते ३०० रु. पोलिसांकडे कॅमेरे आहेत. ते फोटो घेतात व तुमच्या ट्रॅफिक व्हायोलेशन च्या नोटिसा घरी किंवा रजिस्ट्रेशन वरील पत्त्यावर येतात. मग ते लोक फॉलो अप करतात. आरसी कार्ड वर पण सिमकार्ड सारखे काहीतरी आहे. व ती प्रोसेस पूर्ण पणे संगणकीक्रुत आहे. महाराष्ट्रातील सिस्टिम मजला माहीत नाही.
आणि याशिवाय दुचाक्या
आणि याशिवाय दुचाक्या यांबद्दलही >>> साज्या तू अपाची चालवल्येस का?
आगाऊ, नवी एस्टिलो जरी हिट
आगाऊ,
नवी एस्टिलो जरी हिट झाली नसली तरी गाडी आणि ईन्जिन उत्तम आहे..... शोरुम आणि सर्व्हिस सेन्टर वाल्यान्चा रिपोर्ट चान्गला आहे..... पण आय १० शी तुलना केल्यास आय १० च बाजी मारेल..... स्मुथ, स्टेडी.......... गो अहेड.!
आमच्या मित्रपरिवारात जवळ्जवळ १४ गाड्या आहेत, आणि योगायोगाने (अजिबात न ठरवता) एकही मॉडेल कॉमन नाही...त्यामुळे सगळ्या गाड्यान्वर हात साफ करुन घेता येतो... आय १० त्यापैकी एक...... गेले वर्श भर एकदम मस्त रेझल्ट दिलाय मित्राला......!
मामी. महाराष्ट्रात पण तसेच
मामी. महाराष्ट्रात पण तसेच आहे.. अर्थात इथले वाहतूक पोलिस हे छपरी असल्यामुळे फॉलो अप वगैरे कितपत करत असतील माहित नाही..
इंशुरन्स कंपल्सरी आहे... आणि गाडी घेतानाच तो काढला जातो.. बहुतेक वेळेस गाडीच्या किमतीत त्याचा अंतर्भाव केलेला असतो.. फक्त तो १ वर्षासाठीचा असतो.. पुढे मग रिन्यू करणे आपल्या हातात असते.. पण चारचाकीचा इंशुरन्स असावाच असावा... नेहमीच फायद्याचे असते.... मग इथे कोणीही कितीही वाद घातला, की माझी गाडी आहे.. काही झाले तर बघू वगैरे ह्याला काही अर्थ नाही..
इथे कोणी टाटा इंडिका बद्दल का
इथे कोणी टाटा इंडिका बद्दल का बोलत नाही. पाच लोक आरामात बसतात.... तीन लाखात...सिटि मायलेज तेरा आणि हायवे ला पंधरा..........
गारेगार अगदी अगदी. इंडीका=
गारेगार अगदी अगदी.
इंडीका= टॅक्सी. अगदी आरामाची गाडी बट नॉट टु ओन. जस्ट कामापुरती मामी बरी आहे.
ऑटोमेटेड दुचाक्या व
ऑटोमेटेड दुचाक्या व चारचाक्यांचा इन्स्युअरन्स असावाच लागतो . डिस्क्रिशन नाही.मोटार व्हेईकल अॅक्ट हा सेन्ट्रल अॅक्ट आहे त्यामुळे तो सगळ्या राज्यात लागू आहे.
मोटर वेईकल अॅक्टनुसार कलम १४६, बिन इन्श्युअरन्सची गाडी पब्लिक प्लेसमध्ये आणता येत नाही. गाडी विकत घेताना १ की ३ महिन्याचा ट्रन्झिट इन्स्युअरन्स असतो. त्यामुळे ती गाडी तुम्ही किमान घरी तरी आणू शकता. अन्यथा ती गाडी डीलरच्या आवाराबाहेरही काढता येत नाही. इन्सुअरन्स कम्पनीत पैसे भरल्यावर तो क्लार्क प्रिन्टच बटन दाबतो त्या क्षणी कम्पनीची जबाबदारी चालू होते.त्यामुळे त्या पॉलीसीत लाएबिलिटीची वेळ अगदी सेकन्दानिशी छपलेली असते. तुम्ही कपनीच्या ऑफिसम्धून उतरल्या उतरल्या देखील गाडीचा अपघात होऊ शकतो. विमा नसताना तुमच्या विरोधात अॅक्सिडेन्ट क्लेम डिसाइड झाला तर त्याची रक्कम पाहूनच तुम्हाला हार्ट अॅटॅक येईल्.आणि तो होतोच कारन माणूस मेलेला असतो. घर दार विकून पैसे भरायची पाळी नाही आली म्हनजे मिळवली. काही लोकाना विम्याची रक्कम वाचवल्याचा भयंकर आनन्द असतो. अर्थात 'मामा' तो तुम्हाला फारसा मिळू देत नाहीत. विमा नसल्यास तुम्हाला प्रत्येक चौकात त्यासाठी दन्ड होऊ शकतो.
मलाही तेच आश्चर्य वाट्ले
मलाही तेच आश्चर्य वाट्ले झक्कींचा भाउ असे कसे करू शकला असेल. माहिती पूर्ण वाट्त नाही.
विमा काढल्या शिवाय गाडीची खरेदी प्रक्रीया पूर्ण होतच नाही. मी जवळजवळ दर तीन वर्शांनी नवी गाडी घेत असते स्कूट्री पण खूप घेउन झाल्या माझ्यासाठी, स्टाफ साठी एकदाही विना विमा ही ऑप्शन कोणी ही सांगितलेली नाही.
आमच्या एका सँट्रोचा अपघात झाला होता तर ८४००० रिपेअरचा खर्च विमा कंपनीने दिला होता. हूड यांचे वरील पोस्ट अतिमहत्त्वाचे आहे. रोड वर गाडी काढणे हेच एक जबाबदारीचे काम आहे व पेपर वर्क पर्फेक्ट हवे.
तुम्ही एक वर्श नीट गाडी
तुम्ही एक वर्श नीट गाडी चालविलीत तर विमा कंपन्या नो क्लेम बोनस म्हणून प्रीमिअम कमी लावतात.
मोठ्या व महाग फॉरिन गाड्यांना तर विमा जरूरीचा आहे कारण साधे दिवा वगैरे फुट्ला अपघातात तरी दोन्ही दिवे रिप्लेस करावे लागतात १० - १५ हजार उगीच खर्च आपल्याला पड्तो.
गाडीचे मरू द्या हो मामी.
गाडीचे मरू द्या हो मामी. एखादा माणूस तुमच्या गाडीचा धक्का लागून मेला अथवा जखमी झाला आणि २ महिन्यानी हॉस्पिटलमध्ये मेला तर त्याचे नातेवाईक कॉम्पेन्सेशन क्लेम दाखल करतात तो बहुधा काहीतरी रकमेचा डिसाईड होतो. विमा नसेल तर तो क्लेम तुम्हाला खिशातून द्यावा लागतो एरवी तो इन्सुरन्स कम्पनी भरते . ही रक्कम त्या माणसाने उर्वरित आयुष्यात जेवढे उत्पन्न मिळवले असते त्यावर असतो. तो जर उच्चपदस्थ, व्यापारी, तरुण असेल तर ती रक्कम किती असू शकते ते जरा या क्षेत्रातल्या वकिलाना विचारा म्हणजे डोळ्यासमोर कसे दिवसा तारे चमकतात ते अनुभवा. मग म्हणायचे '२-३ हजार विम्याला खर्च केले असते तर?' लायसेन्स नसलेल्या व्यक्तीस (तुमची मुले, नोकर, शिपाई.ऑफिस बॉय)तुम्ही गाडी चालवायला दिली आणि त्याने अपघात केला तर कम्पनी पैसे देत नाही , तुम्हाला भरावे लागतात. मद्यपान करून गाडी चालवून अपघात केल्यासही कम्पनी पैसे देत नाही. बारीक अक्षरात लिहिलेले पॉलीसी डोक्युमेन्ट वाचा एकदा म्हणजे तुम्ही कोणाला गाडीला हातदेखील लावू देणार नाहीत :). कम्पनी तुमची व्हायोलेशन्स शोधून त्या कारनासाठी क्लेम देण्याचे नाकारते. मग तुम्हाला तो क्लेम भरावा लागू शकतो. हा अभ्यासाचा विषय आहे अपघात झाल्यावर रड्त बसन्याचा नाही.
मुकुला, ईन्डिका टाटा॑
मुकुला,
ईन्डिका टाटा॑ प्रॉडक्ट असल्याने त्याला अजिबात रिसेल व्हॅल्यु नाही...... म्हणुन विचार केला जात नाही..... आणि ईन्डिकावर तॅक्सीचा छाप पडलाय आता......
त्यामानाने, विस्टा आणि मॅन्झाचे रेपोर्ट्स छान आहेत्......पण पुन्हा विस्टाने खुप तापही दिलाय सुरुवातिच्या बायर्सना...... माझ्या मित्राच्या विस्टामधे ९ प्रॉब्लेम्स आले २ ते ३ महिन्यात्...त्यातले २ तर टाटाच्या "डेटाबेसमधेही नव्हते असे सर्व्हिस मॅनेजर म्हणाला...तोही हतबल होता....तीनदा गाडी परत नेली होती....शेवटी गाडी परत घ्यायचे खरमरित लेटर दिले तेव्हा सारवासारव कर्ण्यात आलि......आता उत्तम चालते..... हय्वेवर २० ते २२ अॅवरेज (aqua quadrajet: diesel) दिलेय मुम्बई दापोली प्रवासात्......मस्त आहे......
विस्टा आणि मॅन्झा काही प्रमाणात टाटा नावावरचा स्मॉल कार सेग्मेन्ट मधला कलन्क पुसतील.... अर्थात यात मत मतान्तर असेलच... कही हार्ड्कोर टाटा फॅन आहेत....... त्यान्चे अनुभव चान्गले आहेत......!
माहितीबद्दल सर्वांना
माहितीबद्दल सर्वांना धन्यवाद.
मलाही तेच आश्चर्य वाट्ले झक्कींचा भाउ असे कसे करू शकला असेल. माहिती पूर्ण वाट्त नाही.
माहिती पूर्ण नाही किंवा चुकीची असण्याची शक्यता आहे. मी स्वतः अजून त्याच्याशी बोललो नाही. काही पण कारणे असू शकतात. पण मी आपले त्या निमित्ताने भारतात इन्शुरन्स चे कसे असते ते विचारून घेतले.
झक्कींचा भाउ असे करणार नाही. तो विशिष्ठ शहरात कधीच राहिला नव्हता. पण मी मात्र ५ वर्षे राहिलो होतो, मी काही पण लिहू शकतो. हे तुम्हाला माहितच आहे!
धन्यवाद.
धन्यवाद भ्रमर! आय १० ची 'एरा'
धन्यवाद भ्रमर!
आय १० ची 'एरा' आणि 'मॅग्ना १.२' यात कप्पा इंजिन हाच फरक आहे.त्याने काय बदल होतो? मायलेज कुणाचे जास्त आहे?
'मॅग्ना १.२' आणि झेन एस्टीलोचे टॉप एंड मॉडेल यात किंमतीत फरक नाहीए पण एस्टीलोत एबीएस आणि ड्रायव्हर एअर बॅग आहे, त्याचा खरेच काही उपयोग आहे का?
एबीएस आणि ड्रायव्हर एअर बॅग
एबीएस आणि ड्रायव्हर एअर बॅग आहे, त्याचा खरेच काही उपयोग आहे का? >> हे फार महत्वाचे फिचर आहे.
ABS चा वापर गाडी थांबवताना होतो, पूर्वी ब्रेक मारल्यावर चाक जाम व्हायचे अन मग बर्फावरुन किंवा पाण्यावरुन गाडी नीट थांबायची नाही. ABS रियल टाईम वापरात येत असल्यामुळे ब्रेक मारताना चाक जाम होत नाही तर फिरते व थांबते.
गाडीच्या बजेटमध्ये ५०,००० जास्त झाले तरी चालेल पण ह्या दोन अत्यावश्यक फिचर्स शिवाय गाडी घेण्याचा विचार करु नये. (ऑफकोर्स हा आग्रह नाही, सजेशन आहे.)
ड्रायव्हर एअर बॅग मुळे अनेक चालक अॅक्सिडेंटमधून मरताना वाचले आहे. गाडी कोणतीही घेत असाल तरी ड्रायव्हर व पँसेंजर एअर बॅग गाडीत असने आवश्यक आहे. गाडी भारतात चालवत असाल तरी.
केदारला एअर बॅगसाठी आनुमोदन ,
केदारला एअर बॅगसाठी आनुमोदन , पण ABS चा भारतात उपयोग कितपत होईल ह्याबाबतीत शंकाच आहे ,
हूड, तुमचे बरोबर आहे. माझ्या
हूड, तुमचे बरोबर आहे. माझ्या गाडीला परवा अपघात झाला तेव्हा त्या डायवर ने दुसर्याला मारले असते तर
काय झाले असते ह्या विचाराने माझे उरले सुरले केसही पांढरे झाले होते. तुमचे पोस्ट अतिशय प्रॅक्टिकल आहे हो.
एअरबॅग मस्ट गाडीला. झेन गाड्या मला तरी आतून कंजस्टेड वाट्तात. आरामात बसता येत नाही. तसे ओपेल कॉर्साचे पण होते. वरून गाडी झ्याक पण आत बसायला आराम नाही.
गाडीच्या बजेटमध्ये ५०,०००
गाडीच्या बजेटमध्ये ५०,००० जास्त झाले तरी चालेल पण ह्या दोन अत्यावश्यक फिचर्स शिवाय गाडी घेण्याचा विचार करु नये. >> अगदी अगदी केदार.. माझ्या वरच्या पोस्टमध्ये पण मी हेच लिहिलंय की गाडीतले फीचर्स बघताना सेफ्टी फीचर्स बघणं पण फार महत्वाचं आहे. मला स्कोडा फॅबिया ची जाहिरात म्हणून खूप आवडते (Safety is not an option for us).
झक्की कोलांटउड्या मारणारच
झक्की कोलांटउड्या मारणारच होते. फक्त कधी, एवढाच काय तो प्रश्न होता.
अहो झक्की, विशिष्ठ शहरातले असोत, नाही तर झुमरीतलैय्यातले. इंशुरन्सचे नियम सर्वांना सारखे आहेत. इंशुरन्स काढल्याशिवाय गाडी शोरुमच्या बाहेर काढता येत नाही. गाडीचा इंशुरन्स न काढणे हा गुन्हा आहे, शिवाय गाडीचा, स्वतःचा, आणि इतरांचा जीव धोक्यात घालण्याचा नतद्रष्टपणाही. अधिक डिटेल्स वरती हुडानी लिहिले आहेतच.
एबीएस, इबीडी, एअर बॅग्ज आणि इतर सेफ्टी फीचर्सबद्दल अनुमोदन. दुर्दैवाने अजुनही भारतात याकडे जास्त लक्ष दिले जात नाही.
व्हिस्टा आणि मांझा या जुन्या इंडिका आणि इंडिगोपेक्षा खूप चांगल्या आहेत. या दोघींना फियाटची इंजिने आहेत. कार्सची इंजिने स्वतः बनवणे टाटा बंद करेल बहुधा आता. मुकुला, तीन लाखांत डिझेल इंडिका मिळत नाहीत. पेट्रोल इंडिका (झीटा) घेऊ नये. व्हिस्टा पेट्रोल एकवेळ ठीक आहे.
डुआय अपाची नाही चालवली कधी.
आगाऊ झेन एस्टिलो घेऊ नकोस.
आगाऊ झेन एस्टिलो घेऊ नकोस. आय१० ची स्पर्धा ए-स्टार शी होऊ शकेल फार तर.
आय१० कप्पा हे १.२ लिटर्सचे इंजिन आहे. थोडे पॉवरफुल असल्यामुळे मायलेज किंचित कमी मिळेल आय१०-आयआरडीए बेसिक मॉडेलपेक्षा. मी जेव्हा विचार करेन तेव्हा असा करेन, की १.२ लिटर्सची गाडी घ्यायची, तर रिट्झ, पोलो, पुंटो किंवा आय२० का नको? अर्थातच हे ज्याच्या त्याच्या विचार करण्याच्या पद्धतीवर अवलंबून आहे.
एकाने तर हिंदुत्वासारखा वाद घातला..
केदार हे लै भारी. काही ब्रँड लॉयल्टीवाले अजिब्बात ऐकून घेत नाहीत. माझा भाऊ असाच ह्युंडाईचा डाय-हार्ड-फॅन आहे. सँट्रो, वरना मग आय२०. पुढल्या वर्षी ती सोनाटा ट्रान्सफॉर्मड् घेणार आहे. मला नाही आवडत. ह्युंडाईला लोक 'पेपर कार्स' म्हणतात हे त्याला सांगतो. (अर्थात हे आता तितकेसे खरे राहिलेले नाही). टेक्-स्पेक्स आणि इतर फीचर्सवरून वरून मी त्याच्याशी वाद घालतो नेहेमी. पण तो अजिबात ऐकून घेत नाही. 
सोनाटा म्हण्जे ऐरावत आहे
सोनाटा म्हण्जे ऐरावत आहे निव्वळ. इथला ह्युन्दै चा डीलर आहे तलवार पंजाबी. आमच्या जवळच राहतो तो मुरड्त असतो सोनाटातून. ती एलांट्रा पण घेणारे लोक होते काही.
आय २० खरेच मस्त
आय २० खरेच मस्त आहे.
इन्श्युअरन्स मस्ट आहे का? माझ्या एका नातेवाईका बजाज स्कूटर घेतली होती. कम्पनीने तिचा सुरवातीस विमा उतरवला असेल तेवढाच ,त्यानन्तर ती गाडी भंगारात जाईपर्यन्त त्यानी कधीही विमा उतरवला नाही. काहीच घडले नाही. अर्थात ते एका जिल्ह्याच्या गावाला रहात होते.
टोणग्या, तुला आय२० आवडली, हे
टोणग्या, तुला आय२० आवडली, हे वाचून मी धन्य झालो. यापुढील २५ आचरट पोष्टी तुला माझ्याकडून माफ. लोक माफ करतील की नाही, माहिती नाही. ते तू बघून घे.
आणि इंन्शुरन्सबद्दल माहितीसाठी रॉबिनहुडास भेट. तिथेच असेल तुझ्या आसपास. 
बाकी छोट्या गावांतून गाडी घेताना इंशुरन्स न काढता लोक दुचाक्यांच्या डिलीव्हर्या घ्यायचे. त्यापुढची अनेक वर्षे नंबर प्लेट कोरी. बरेच महाभाग तर ती रिसेल करायचे वेळी खडबडून जागे व्हायचे. मग पासिंग करायचे नाईलाजाने. हा म्हणजे भलताच निर्लज्जपणा आहे. आता परिस्थिती सुधारली असेल बहुधा.
मामी, एलांट्रा लई डेंजर गाडी होती. ती विकली गेल्याचा आकडा तीन आकडी असला, तरी थोर नशिब. असाच काहीतरी महान आकडा ह्युंदाईच्या टक्सन (की टसन?) या गाडीच्या नशिबी असावा.
एस्टीलोत एबीएस आणि ड्रायव्हर
एस्टीलोत एबीएस आणि ड्रायव्हर एअर बॅग आहे >>
हे एबीएस काय असतं??? एअर बॅग माहीत आहे. पण असं ऐकलंय की ही एअर बॅग चुकुनही ओपन झाली तरी नवीन बसवून घेण्याचा खर्च अफाट आहे. :-०
एबीएस म्हणजे अँटीलॉक ब्रेकिंग
एबीएस म्हणजे अँटीलॉक ब्रेकिंग सिस्टीम. जोरात ब्रेक लावला तर ही सिस्टीम ब्रेक लॉक होउ देत नाही. ठराविक वेळेनंतर ब्रेक रेलीज करते आणि परत ब्रेक लावते. (मला मराठीतून समजावून सांगणं थोडं जड जातय). निसरड्या रस्त्यांवर याचा विशेष उपयोग होतो. (जसे की बर्फ पडला असेल तर किंवा पाणी पडलं असेल तर) जर कंटिन्युअस ब्रेक लावून ठेवला तर गाडी घसरायची शक्यता असते. एबीएसमुळं हे टळतं.
पण असं ऐकलंय की ही एअर बॅग चुकुनही ओपन झाली तरी नवीन बसवून घेण्याचा खर्च अफाट आहे.>> पण जो खर्च होइल तो वाचलेल्या जीवाच्या किंमतीपेक्षा नक्कीच कमी असेल.
साजिर्या हुंदाई खरच चांगली
साजिर्या हुंदाई खरच चांगली कंपनी आहे रे.
इकडे फोर्ड,शेवी वाले लोकं हे मोठ्या किमतीलावून भंगार गाड्या विकायचे. हुंदाईने चांगल्या गाड्या आणून ह्यांची सद्दी संपवली. एकेकाळी चिप कार म्हणून हूंदाई प्रसिद्ध होते पण आता त्यांचा कार खरच चांगल्या व मोअर व्हॅल्यू फॉर मनी देणार्या असतात. २०११ सोनाटा ही लक्झरी कार सारखी बिल्ट केली आहे.
कमी पैशात ऑलव्हिल ड्राईव अन इतर सोयी. ड्राईव्ह आरामदायी, पेट्रोलसाठी किफायती अशी ह्या गाड्यांची खासियत आहे.
सॅन्टा फे आणि टुसॉन (हिच बहुतेक तू म्हणत आहेस ती टसन का काय ते) ह्या गाड्यांनी SUV मार्केट खाल्ले आहे.
माझ्याकडे दर आठवड्यात एक नविन गाडी असते. एका आठवड्यात २०११ ह्युंदाई सोनाटा लॉट मध्ये बघून मी कॅडी सोडून सोनाटा घेतली आहे. डिडन्ट रिग्रेट इट.
पण भारतात ह्याच गाड्या असतात का ते माहित नाही. शिवाय मला स्वतःला स्मॉल कार्स खूप आवडत नसल्यामुळे मी सॅन्ट्रा वगैरे गाड्यांमध्ये बसूनही पाहिले नाही. आय २० ची इतकी स्तुती ऐकल्यावर आता भारतात आल्यावर बसून पाहावे लागेल असे दिसते.
केदारला अनुमोदन्....... आज
केदारला अनुमोदन्.......
आज भारतात मारुतिनन्तर रिलायबल आणि उत्तम सर्व्हिस नेटवर्क असणारा ब्रॅन्ड ह्युन्दाईच आहे....... आणि आय २० मस्तच, थोडे जास्त पैसे मोजावे लागतात, वर या मॉडेल वर अजिबात डिस्काउन्ट नाही (जरा कॉन्फिडन्स तो देखो). टुसॉन नाही चालली इथे फार... पण मि नुकतिच ईन्डोनेशिआत ह्युन्दाईची SUV पाहिली (नाव नेम्के लक्शात नाही कारण तिथे सगळ्या गाड्या याच सेग्मेन्ट मधल्या जास्त आहेत) असे वाटले कि हि गाडी भारतात लॉन्च करा..... स्कॉर्पिओ, ईनोवाचे नक्किच धाबे दणाणतील.......!
निम्बुडाची गाडी बुक झाली
निम्बुडाची गाडी बुक झाली का...... मी स्टिकर बनवुन ठेवलाय.......
Pages