कोणती गाडी घ्यावी?

Submitted by साजिरा on 15 October, 2009 - 07:51

इतक्या गाड्या नि कंपन्या बाजारात आहेत, की निर्णय घेताना गोंधळ होणे साहजिकच असते. एकट्या मारुती-सुझुकीच्याच डझनावारी गाड्या आहेत. त्यात पुन्हा पेट्रोल, डिझेल शिवाय फीचर्स कमी-जास्त करून तयार केलेली मॉडेल्स. अधिक फीचर्ससाठी पन्नासेक हजार किंवा लाखभर रुपये बजेट वाढवावे, तर मग आणखी थोडे पैसे देऊन थोडी मोठी, यापेक्षा चांगली गाडी का घेऊ नये हा प्रश्न उभा रहतो. प्रत्येक कंपनीची, ब्रँडची एक इमेज आपल्या मनात ठसलेली असते. जुने बरेवाईट अनुभव पण पदरी असतात. शिवाय आपल्यापैकी बहुतेक जण कमी-जास्त फायनान्स घेऊनच गाड्या विकत घेतात. हे सारे टप्पे ओलांडून अनुभवलेली निर्णयप्रक्रिया म्हणाजे एक मोठा प्रवासच.

काही मॉडेल्स 'इंटरनॅशनल' असली, तरी भारतीय (छोटे) रस्ते अन गर्दीची (कोण बोललं रे ते- 'बेशिस्तीची म्हण की सरळ!') वाहतूक लक्षात घेता 'स्मॉल कार्स' अन 'मिडसाईझ सेदान कार्स' अर्थातच जास्त विकल्या जातात. यात पुन्हा 'गियरवाल्या' की 'ऑटोमॅटिक ट्रान्समिशनवाल्या' हेही आहेच. लक्झरी कार्स, सुपरलक्झरी कार्स, मल्टियुटिलिटी कार्स, स्पोर्ट्स युटिलिटी कार्स आणि स्पोर्ट्स लक्झरी कार्स - या सार्‍यांचाही आपापला चाहता वर्ग. सेगमेंट आहेच आहे.

तुमचे काय मत आणि अनुभव? नवीन गाडी घेणार्‍या मायबोलीकराला थोडीफार इनपुट्स मिळाली, तर तो दुवा देईल; अन भेटलाच, तर त्याच्या नव्या गाडीतून पार्टीला घेऊन जाईल- हा हेतू. Happy

याशिवाय इथेच दुचाक्या, नवीन लाँचेस, भारतातले बदलते ट्रेंड्स आणि एकूण वातावरण, इंटरनॅशनल मॉडेल्स आणि ट्रेंड्स, मेंटेनन्स टिप्स यांबद्दलही कृपया लिहा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

@डुआय, मी गेले २ वर्षे अपाची (कार्ब व्हर्जन, १६० CC) चालवतोय, अजुनतरी गाडीने कधी प्रॉब्लेम दिलेला नाहीये. मी जेव्हा बाईक घेतली होती तेव्हा FI व्हर्जन बाजारात आले नव्हते. FI व्हर्जन खुपच छान आहे.

पोझिटीव:
१. पॉवर, पिक-अप
२. अ‍ॅव्हरेज (मला अजुनही ५० चा अ‍ॅव्हरेज मिळतोय)
३. मेंटेनंस खुप कमी.
४. अप्रतिम फायरिंग. बाकीच्या स्पर्धकांपेक्षा कितीतरी छान.
५. मस्त डिझाईन

निगेटीव:
१. इंजिन म्हणावं तेवढं smooth नाहीये (कार्ब व्हर्जनबद्दल बोलतोय)
२. पिलीयन सीट लाँग ड्राईव्हसाठी तितकीशी आरामदायक नाहीये (खासकरुन पुरुषांसाठी Wink ).

मुख्य स्पर्धक (१६० CC):
१. पल्सर १५० - खुपच कॉमन. अ‍ॅव्हरेज (५० च्या आसपास), पॉवर, पिक-अप, मेंटेनंस, Value for money सर्वच बाबतीत ऊत्तम.
२. युनिकॉर्न - smooth ride. चालवायला मजा येते. अ‍ॅव्हरेज - ५० च्या आसपास.
३. हंक - डिझाईन मस्त, पण बाकी सर्व फिचर्स कॉमन. अ‍ॅव्हरेज ४५ च्या आसपास.
४. यामाहा FZ - डिझाईन, पॉवर, पिक-अप याबाबतीत ऊत्तम. Over-priced (फक्त १५० CC साठी एवढी किंमत भरणे पटत नाही. IMO), अ‍ॅव्हरेज खुपच कमी (फक्त ३५-४० किमी प्रति लि.)
५. यामाहा R१५ - Best in class. Over-priced.

अरे हो रे. पण मुंबईच्या ट्रॅफीकला मिसतोय. पुण्यातली तर्‍हाच निराळी आहे. ईथे बाईक ही पळवण्यासाठीच बनवलेली असते यावर नितांत श्रद्धा असलेली माणसं रोज बघतो मी. ईथे तर Activa हीसुद्धा Pulsar २२० ला हरवु शकते Wink

नमस्कार मंडळी,

माझ्या गाडी घेण्यावर ऑटो ट्रान्समिशन च्या गरजेमुळे फार कमी चॉइस आहेत.
होंडा सिटी
मारुती एस एक्स ४
ह्युंडाई आय १०/२०
पहिले दोन जरा महागात आहेत. आय १० जरा बरी वाटत आहे. (५.४० कि.मत आहे).

इतर कुठल्या आहेत का ऑटोमॅटीक मधे? (मारुती (एस एक्स ४ सोडुन)आणि टाटा ऑटो बनवत नाहीत असे सांगितले मला).

धन्यवाद.

होंडा सिटी टेस्ट ड्राइव केल्या शिवाय घेऊ नका. पुढे डायवरला बसायला अनकंफरटेबल होते लॉन्ग ड्राइवला व मागे एसी नीट पोहोचत नाही असा एक रिपोर्ट ऐकला. आय २० इथे खूप लोकांना आवड्ते.

परवा आम्ही फिगो १००- ११० ला चालविली. कळत पण नाय एकदम स्मूथ. उद्या पहिले सर्विसिन्ग! तीन महिन्याची झाली माझी बाय.

आय २० बेस्ट............ फक्त किम्मत जास्त आहे.........आणि एक रुपयाचे डिस्काऊन्ट नाही...... Sad बजेट कमि असेल तर आय १० ही मस्तच आहे.........

मी गेले १.५ वर्ष होंडा सिटी चालवतो आहे. एकदम मस्त गाडी. चालवायला सुद्धा आरामशिर. तक्रार करायचीच तर Ground Clearance कमी आहे. चार लोक बसले तर मुंबईच्या बर्‍याच Speed Breakers ना लागू शकते.

मला शहरात ११.५ तर हायवे वर १७ Average मिळत. पण गाडीबरोबर काहिच फ्री देत नाहीत. अगदी मड फ्लॅप्स सुध्दा विकत घ्याव्या लागतात. किंमत मात्र जरा जास्त आहे आणि पार्ट महाग आहेत. पण होंडाच्या वेळापत्रका प्रमाणे service करून घेतली तर काहिच problem येत नाही. विशेष म्हणजे होंडाच्या गाड्याना Re-sale value चांगली मिळते.

माझा पहिला चॉइस होंडा सिटीच होता पण मन्याने सांगितलेले मुद्दे मला पटतायत.

दुसरी गोष्ट म्हणजे मी भारतात पहिल्यांदाच गाडी चालवणार आहे. अमेरिकेत चालवलेल्या १४ वर्षाच्या अनुभवाचा इकडे उपयोग शुन्य आहे हे मला ट्रॅफिक पाहुन चांगले कळले आहे उगाच होंडा सिटी घेतली आणि ठोकली इ. तर नुकसान भरपुर होइल. मला मुंबई ते पुणे (आठवड्यात दोन आठवड्यात एकदा चक्कर) आणि मुंबई/पुण्यात चालवायला अशी गाडी हवी आहे. आय १० च जरा बरी वाटत आहे अजुन तरी.

महिंद्र, चेवी , फोर्ड इ. ऑटोमॅटीक बनवतच नाहीत का? सगळ्या ऑटो गाड्या ८-१० लाख पर्यंत जात आहेत. ५-६ पर्यंत फक्त आय १० च आहे.

माहिती बद्दल सगळ्याना धन्यवाद.

सर्विसिन्ग पार पड्ले. इंजीन ऑइल बदलण्याचे पैसे घेतले बाकी फ्री म्हणे हा मला चोर प्रकार वाट्ला. but What the heck!

Scorpio - Automatic आहे बहुतेक मधे जाहीरात करत होते. गेल्या वर्षी पर्यंत santro / Wagon R automatic मिळत होत्या या वर्षी बंद केल्या. चेवी , फोर्ड बनवत नाहीत. तसा या गाड्यांना खप खुप कमी आहे आय १० पण आधी बुक करावी लागेल Automatic साठी लगेच delivery मीळत नाही. असो तज्ञ लोकं सांगतिलच.

मामी, सर्व्हिसिंग फ्री असले, तरी ऑईलचे पैसे सगळीकडेच द्यावे लागतात. लेबर आणि वॉशिंगसारखी किरकोळ कामे फुकटात असतात. ऑईल हे 'कंझ्युमेबल' आहे.

फिगोचा व्हीलबेस हा फियेस्टापेक्षाही जास्त आहे. त्यामुळे तिला रोड स्टेबिलिटी चांगली आहे. हाय स्पीड्स आणि शार्प टर्न्सला ती लगेच कळते.

आय२० पण ऑटोमॅटिक ट्रान्समिशनमध्ये असावी असं वाटतं. नक्की माहिती नाही. ऑटोमॅटिक ट्रान्समिशनच्या स्मॉल कार्स घेणारे भारतात क्वचितच सापडतात. त्यामुळे कंपन्यांनी त्या बनवणे बंदच केले असावे.

नॅनोच्या किंमती वाढणार. पहिल्या एक लाख लोकांत मी पण आहे. माझी नॅनो २-३ दिवसांत येणार. Happy

हो आम्ही परवा एअरपोर्टला जाताना १०० - ११० ला नेलेली फिगो. वेरी स्टेबल. काही प्रश्नच नाही. बरं बिल्डिन्ग मध्ये एकाने पोलो घेतली आहे. ती रंग रूपाने फिगो सारखीच आहे पण जास्त महाग. पर्फॉर्मन्स मस्त असेल बहुतेक.

>>> अर्थात विदाउट विमा गाडी चाल्वायचे ऑप्शन इथे आंध्रात तरी नाहीये.. मामा चेक करतच असतात. <<<
वरती हे अन बरेचसे काही इन्श्युरन्सवर लिहीले गेलय!
कोण मला नेमके सान्गू शकेल काय? माझ्या माहितीप्रमाणे तरी
१) इन्श्युरन्सचे दोन प्रकार होतात, एक निव्वळ गाडीच्या हानि सन्दर्भात, जो गाडी जर हायपोथिकेटॅड असेल तर फायनान्सरकडून केला जातोच जातो, मात्र गाडी रोकडा मोजुन घेतली असेल तर याची "सक्ति" नाही
२) थर्डपार्टी इन्श्युरन्स म्हणून एक प्रकार आहे, जो मात्र कायमचा सक्तिचा आहे. बरीच वर्षे मागे हा दरवर्षी भरायला लागायचा, साधारण ९० च्या दशकात हा गाडीच्या निर्धारित आयुष्याप्रमाणे (१५ वर्षे) एकरकमी एकदाच भरता येतो, १५ वर्षानन्तर गाडी रिन्यु करताना पुन्हा भरावा लागतो. याच इन्श्युरन्समार्फत गाडीमुळे तिसर्‍या कुणा व्यक्तिची झालेली जिवित्/वित्त हानी भरुन काढता येते.

ही वरील माहिती बरोबर आहे का?

१५ वर्षांचे जे प्रकरण आहे, ते वन-टाईम-रोड-टॅक्स संदर्भात. त्याचा आणि इन्शुरन्सचा संबंध नाही. थर्ड पार्टी इन्शुरन्स हा दरवर्षी नव्याने करणे सक्तीचे असते. हाच काय, पण कुठच्याही जनरल इन्शुरन्स(नॉन-लाईफ)ची मुदत ही एक वर्षच असते. त्यानंतर रिन्यु करणे सक्तीचे.

काँप्रेहेन्सिव्ह (टोटल) इंशुरन्स सक्तीचा नाही, पण हायपोथिकेशन असेपर्यंत तो करावाच लागतो, हे बरोबर आहे. पण आपल्या गाडीचे हायपोथिकेशन असो किंवा नसो, काँप्रेहेन्सिव्ह इंशुरन्स आपण करायला हवा. तसे न करणे म्हणजे- दुसर्‍याच्या जीवाची (मारूनमुटकून का होईना) काळजी आहे, पण स्वतःच्या जीवाची आणि स्वतःच्या गाडीच्या जीवाची नाही- असे झाले.

फोर्डच्या सर्व्हिसबद्दल इथे लिहा कुणीतरी. मी गाड्या चालवल्या आहेत, पण सर्व्हिसचा अनुभव नाही. मामींनाही अजून काहीच महिने झालेत, पण तरी लिहा मामी.

ओक्के साजिरा, गॉट दि पॉईण्ट Happy मी रोडट्याक्सचा घोळ इन्शुरन्सशी घालत होतो
पण तरिही, टूव्हिलर घेतली अस्ता कुठे दरवर्षी इन्श्युरन्स करावा लागतो?
की माझेच काहीतरि भयानक कन्फ्युजन होतय? Sad

लिम्ब्या, प्रत्येक स्वयंचलित गाडीचा विमा उतरवावा लागतोच.. कमीत कमी थर्ड पार्टी इन्शुरन्स असलाच पाहिजे.. हे सक्तीचे आहे आणि इन्शुरन्स नसल्यास तशी गाडी चालवणे हे बेकायदेशीर ठरते. वरती हुडाने सविस्तर लिहिले आहेच ह्या बाबतीत..

आजच ढकलपत्रातून आलेली माहिती..

Date: Monday, July 12, 2010, 5:22 AM

Subject: Notice from Praveen Sood (Additional Commissioner for Traffic, Mumbai) - 022 - 22942276.

Dear All,
Please forward this mail as many as you can..do your bit for to help the ignorant.
Take a printout of this and keep it in your car's glove compartment.
May come handy... Not knowing this may leave a big hole in your pocket.
Information you should have: If you are getting caught quite often by traffic police, then please read on.
From now onwards, the Traffic Police cannot catch a motorist just to examine the driving license or vehicle documents.
They can catch you only if you have violated any traffic laws or if you are driving drunk. Remember that when caught for traffic violation, the fine you pay must be limited to the violation. In other words, the police can't bloat the bill saying that you have no insurance cover or emission certificate, etc.
Many motorists do not know this. According to the law, no policeman can slap a penalty on you just because you have no insurance or emission certificate.
If you have not purchased insurance cover for your vehicle, then the police officer must issue a notice, not impose penalty.
You must be given 15 days' time to purchase insurance cover and one week for obtaining the emission certificate.
Days later, meet the sub-inspector at his station with the insurance cover or emission certificate, so that he will annul the charge at once.
Police can fine you only if you fail to produce these documents within the stipulated period.
If your vehicle is brand new, then you need not bother about obtaining the emission certificate for one full year.
In response to a question as to why policemen fine people instantly without giving them time to obtain insurance cover or emission certificate, Additional Commissioner for Traffic Praveen Sood said, "Yes, it is a mistake. People must force policemen to issue notice or complain to me at least the following day.
The best way to teach the police a lesson is by filing a written complaint with their higher officials and, a week later, using the Right to Information Act (RTI) to know the action taken against them. Remember, any question or application filed under RTI cannot be ignored and no official is bold enough to ignore the RTI Act.

Praveen Sood
(Additional Commissioner for Traffic, Mumbai)
022 - 22942276.

सर्विस चांगलीच आहे असे मला तरी वाट्ले. एका साइड्चे आयने नीट वरखाली होत नव्हते तर त्यांनी दोनदा फोन करून विचारले. वर्क शाप मस्त हायटेक आहे व तिथे निदान २०- २५ तरी गाड्या होत्या. हैद्राबादेत ३ -४ ठिकाणी सर्विस वर्क शाप आहेत. एक क्विक सर्विस प्रकार आहे त्यात २- ३ तासात गाडी परत देतात. एक वर्कशाप माझ्या हपीसच्या अगदी जवळ आहे त्यामुळे ते अगदी सोयीचे आहे. फिगोत त्यांनी म्युजिक सिस्टिम दिली आहे पण रिमोट दिलेला नाही. त्यामुळे यादीला कायम सांगायला लागते आवाज कमी जास्त करायला. यादी( यादगिरी ) हा माझा डायवर ग्रेट गाय आहे. माझे त्याचे मागे भांड्ण झाले होते त्याकाळात तो एन टीवीत काम करत होता व फार गाडी पिदडावी लागत असे. आता तो पण खूष नी मी पण. तुमचे काही स्पेसिफिक प्रशन असल्यास जरूर सांगा मी त्याला पाठ्वून उत्तर मागवेन. तोच गाडी सर्विसिन्ग ला नेतो व आणतो.

आयकॉन ला पण सर्विसिन्ग ला काही प्रॉब्लेम आला नव्हता.

ब्रेकिन्ग न्यूज : हैद्राबादेस हार्ले डेविड्सनची शोरूम निघाली आहे नवीन. मी एक दिवस जाणार आहे बघायला. एका बाइकचे वजन ३७० किलो. त्यामुळे आजिबात न झेपणारे प्रकरण आहे. पण मी कोचरेकर मास्तर व्रुत्तीने बघून येणार. इथे लिहायचे एक निमित्त आहेच. ७ लाखापासून पुढे किंमती आहेत. २० - २२ लाखापरेन्त. आपली बुलेट थंडरबर्ड १.३ लाखापरेन्त येते.

ज्युनीअर एनटीआर या रेडा सद्रुश्य तेलुगु नटाने एक हार्ली बाइक घेतली आहे. एकेकीचे नशीब दुसरे काय.
जल्ला मेला बाइकचा जन्म! Proud

मामी जुन्या ब्रेकिंग न्युज देताय. Happy त्या नटाने ३० लाख देऊन बाईक विकत घेतली, त्याला उदघाटनाला बोलवायचे कारण तेच होते की तो दिलदार होऊन एक बाईक घेईल. इथे मी अन तेलुगु मित्र जाम हसलो होतो काही दिवसांपूर्वी त्यावर.

हो असेल बुवा. आजकाल मी त्या रस्त्याने रोज जात नाही ना. बीस साल पहले रोज उस रस्तेसे गुजरते थे.

मला डायवराने सांगितले मी" अरे यादी वो देखो हार्ली हार्ली" असे मागून ओरड्ल्यावर Happy त्याने उद्घाट्न केले काय? मला ते ही माहीत नाही. पण शोरूम अगदी डार्लिंग आहे बघ. बरे ते हार्ली म्हणायचे का हार्ले? ते ही सांगावे. उगीच शोरूम मध्ये पचका नको होयाला.

मला कोणीतरी सांगा ना महीन्द्रा स्कॉर्पियो VLX मॉडेल चांगली आहे की नाही ते.>>>
मला कोणीच कहि रिस्पॉन्स दिला नाही. बाय द वे आम्ही स्कॉर्पियो घ्यायची आयडियाच ड्रॉप केली आहे आणी आता सफारी घ्यायचा विचार आहे. मला गाडी मस्त वाटली पण आफ्टर सेल्स सर्विस कशी आहे टाटा ची? काही माहिती आहे का?

साजिरा आणि इतर जरा मांझा वर
प्लीझ कुणी तरी लिहा

मला ति गाडि दिसायल आवाड्ली..मला गाड्यांमधलं फक्त दिसणं कळतं. मान्झा घ्यायची आहे Happy

Pages