Submitted by हसरी on 3 February, 2010 - 23:00
उपासना कशी करावी?
कोणत्या देवतेची उपासना कशी करावी याची सविस्तर माहिती द्या?
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
उपासना कशी करावी?
कोणत्या देवतेची उपासना कशी करावी याची सविस्तर माहिती द्या?
जा'मोहन्'प्या, >>>आणि हिरवे,
जा'मोहन्'प्या,
>>>आणि हिरवे, पांढरे, निळे या धर्मातल्या लोकांचं काय? त्यांच्या देवाना आकारच नाहीत...
याच्या उत्तरासाठी तुम्हाला एक प्रश्न विचारतो....तुमच्या 'अवलोकन' या सदरात तुमचा 'फोटो' टाकण्यामधे तुमचा उद्देश काय आहे?
मागे तुम्हाला एक प्रश्न विचारला होता..
>>>जागो 'मोहन' प्यारे... हे जर "जा'मोहन' प्या" अस लिहल तर चालेल का?
त्याचे उत्तर तुम्ही ...चालेल... वेगळे नाव हा एक वेगळा ऑप्शनच .. असे दिले होते..
मग हाच न्याय तुमच्या फोटोलाही चालेल का?:)
याच्या उत्तरासाठी तुम्हाला एक
याच्या उत्तरासाठी तुम्हाला एक प्रश्न विचारतो....तुमच्या 'अवलोकन' या सदरात तुमचा 'फोटो' टाकण्यामधे तुमचा उद्देश काय आहे? >>> सही !
मधे खंड पडला होता, खुप वाचावे
मधे खंड पडला होता, खुप वाचावे लागले.
म्हणलेलेच आहे, "वाचाल तर वाचाल"
माझा एक प्रश्न आहे विचारू की
माझा एक प्रश्न आहे विचारू की नाही असा विचार चालला होता. आता विचारतेच.
उपासनेला बसले असताना एके दिवशी चांगले ध्यान लागले. जसे स्वप्न पडावे तसे सर्व स्पष्ट दिसत होते (मी जागीच परंतु वेगळ्याच अवस्थेत (ध्यानात)होते.
मला माझीच प्रतीमा दिसली. मीच मला पहात होते. माझ्या बरोबर आणखीही काही स्त्रीया व पुरूष बसले होते. जसे प्रवचनाला आपण बसतो तसे आम्ही बसले होतो. एवढ्यात एक साप आमच्या मधून अगदी जवळून जाताना दिसला. व त्यानंतर मी भानावर आले.
तेंव्हा पासून मला ध्यानाला बसायचीच भीती वाटू लागली आहे.
आपण सगळे जाणकार आहात, मलाच असे दिसले की सर्वांना हा अनुभव येतो मला माहित नाही.
मी काय करावे म्हणजे ध्यान करावे ? की करू नये ? करावे तर कसे करावे ? नेहमी प्रमाणेच ? की आणखी काही वेगळा मार्ग आहे ?
कृपया मार्गदर्शन करावे.........
सुनिता, मला तुमचा हेवा वाटतोय
सुनिता,
मला तुमचा हेवा वाटतोय :).... किती स्पष्ट दिसलंय तुम्हांला! तेही स्वतःलाच पाहिलंय तुम्ही. हेही वाटतं तितकं सोपं नाहीये. अहो अजिबात घाबरून जाऊ नका. ध्यानात जे काही भीतीदायक दिसतं ते न घाबरता बघता आलं पाहिजे. त्याचा प्रयत्न करा. उपासना चालू ठेवा. ध्यान कराच. नेहमी प्रमाणे जसं करता तसंच करा. स्वस्थ शरीर, शांत/प्रसन्न मन, शांत वेळ या ध्यानासाठी अनुकूल गोष्टी. ध्यान्/उपासने साठी या गोष्टी जितक्या अनुकूल करता येतील तेवढ्या करा. पण ध्यान करणे सोडू नका.
साधकाला भीतीदायक, आनंददायक, समाधानकारक अशी कितीतरी दृष्ये दिसत असतात (कायकाय दिसू शकतं हे मला गुरूंच्या मार्गदर्शनामुळे माहीत आहे. पण इथे सांगत नाही.). साधक ते अनुभवत असतो. हा अनुभव महत्वाचा. तुमच्या अनुभवावरून तुम्ही साधनेच्या खूप वरच्या पातळीवर आहात असं वाटतं. असेच अनुभव घेत रहा.
तुम्हांला छान, आनंददायक असे अनुभव येवोत ही श्री स्वामी समर्थ चरणी प्रार्थना करतो.
महेश दादा, धन्यवाद . आपण
महेश दादा,
धन्यवाद . आपण सांगता म्हणजे मला जो अनुभव आला असा सर्वांनाच येत असेल तर मला भिती वाटण्याचे कारण नाही. माझे मन हलके झाले. आता ध्यानाला पुन्हा सुरुवात करेन.
पुनश्च धन्यवाद व आपल्या मार्गदर्शना बद्दल आभार.
मला जो अनुभव आला असा
मला जो अनुभव आला असा सर्वांनाच येत असेल तर मला भिती वाटण्याचे कारण नाही.>> होय असे अनुभव थोड्याफार फरकाने सगळ्यानाच येत असतात त्यामुळे काळजी करू नये. भीती तर अजिबात बाळगू नये. उपासना/ध्यान सुरू करण्यापूर्वी गुरू/इष्टदेवता/रुप यांना "मला सांभाळून घ्या" अशी विनंती करावी. धन्यवाद कसले त्यात?
आपण असे म्हणता हा आपला
आपण असे म्हणता हा आपला मोठेपणा.

मी माझाच फोटो माझा म्हणून
मी माझाच फोटो माझा म्हणून टाकला आहे... माझा फोटो ही कल्पना नाही, ते वास्तव आहे... राजा रविवर्म्याच्या 'कल्पने'तून आलेल्या चित्राला देवाचा फोटो म्हणून उपासनेत मान्यता द्यावी की नाही, हा एक पर्सनल मुद्दा ठरतो...
...
हिरण्य म्हणजे स्वप्न हे मला माहीत नव्हते. धन्यवाद... हिरण्य्गर्भ म्हणजे सुवर्णाप्रमाणे तेजस्वी असा एक 'पदार्थ' (?) असा त्याचा अर्थ मी वाचलेला आहे... 'सृष्टीच्या आरंभी असणारे तेज' व्यक्त करण्यासाठी हा शब्द वापरलेला आहे..
कर्मसिद्धांत मला पटतो, कारण त्यात नैसर्गिक न्याय आहे... चांगले क्रियमाण असेल तर चांगले फळ मिळते, हे मान्य करायला पुनर्जन्म, फेरा मान्य केला पाहिजे असं मला वाटत नाही... प्रारब्धाचे फळ अनिस्चित असते, त्याचे उत्तर शोधण्यासाठी काही विचारवंतानी फेरा संकल्पनेशी सांगड घातली असणार , असे मला वाटते..
धन्यवाद,जा'मोहन'प्या! >>>मी
धन्यवाद,जा'मोहन'प्या!
>>>मी माझाच फोटो माझा म्हणून टाकला आहे... माझा फोटो ही कल्पना नाही, ते वास्तव आहे...
'वास्तव' म्हणजे काय? तुमचा लहानपणी काढलेला फोटो, हा तुमच्या म्हातारपणी 'वास्तव' असतो काय? आणि तुमच 'नाव' हे वास्तव आहे की कल्पना? जर मला तुम्हाला प्रत्यक्ष भेटायच असेल आणि मला तुमच्या बद्द्ल काहीच माहीत नसेल, तर कशाची जरुरत पडते ...तुमच्या 'नावाची' की तुमच्या 'रुपाची'? की दोन्हींची ?:)
>>>राजा रविवर्म्याच्या 'कल्पने'तून आलेल्या चित्राला देवाचा फोटो म्हणून उपासनेत मान्यता द्यावी की नाही, हा एक पर्सनल मुद्दा ठरतो... ...
समजा राजा रविवर्माने तुम्हाला समोर बसवून तुमच चित्र काढल असत , तर त्याला तुम्ही काय म्हणाल..कल्पना की वास्तव?
'हिरण्य' याचा अर्थ 'सुवर्ण' म्हणजेच सोने असाही आहे. सुवर्णाचा कोणताही दागिना हा दिसायला आणि आकारमानाला वेगवेगळा भासला(वास्तव की कल्पना?) तरी कसाला सर्व दागिने सारखेच...त्यातील 'सुवर्णतत्व' सारखेच... हीच गोष्ट 'परमतत्वाच्या' बाबातीतही लागू होते.:)
>>>कर्मसिद्धांत मला पटतो, कारण त्यात नैसर्गिक न्याय आहे... चांगले क्रियमाण असेल तर चांगले फळ मिळते, हे मान्य करायला पुनर्जन्म, फेरा मान्य केला पाहिजे असं मला वाटत नाही... प्रारब्धाचे फळ अनिस्चित असते, त्याचे उत्तर शोधण्यासाठी काही विचारवंतानी फेरा संकल्पनेशी सांगड घातली असणार , असे मला वाटते..
आपल्याला पटलेला 'कर्मसिंध्दांत' काय आहे? (कारण आपण 'जे' पटते म्हणता..तेच पटत नाही.. सांगड घातली असणार, असेही म्हणता!:))
धन्यवाद!
जा'मोहन'प्या, >>>उपासना
जा'मोहन'प्या,
>>>उपासना मुक्ती हे विषय सोडून अंतरिक्षात टाइममशिनमधून कुठे चाललात सगळे? सगळे गेले दुसर्या ब्रह्मांडात तर इथल्या डिस्कशनचं काय होणार?
'ब्रह्मांडी ते पिंडी' या न्यायाने आपलाच वरचा प्रश्न-विचार बदलून खालील प्रमाणे विचारला तर आपल उत्तर काय असेल?:)
'मुक्ती आणि त्याकरीता उपासना' हे विषय जाणताना दुसर्या पिंडाचा(ब्रह्मांडाचा) विचार करणे बरोबर आहे काय? जर नाही, तर मग आपण तसा विचार का करीत आहात?:)
धन्यवाद!
जागो मोहन प्यारे आपले म्हणणे
जागो मोहन प्यारे आपले म्हणणे पटले.
श्रीसमर्थरामदास स्वामी आपल्या
श्रीसमर्थरामदास स्वामी आपल्या 'बोधामृतात' म्हणतात...
श्रोत्यांनी आपल्या मनीचे अनुमान-आशंका खालील प्रमाणे बोलून दाखविली....
सावध आहे तों स्मरण| विकळ होतां विस्मरण |
विस्मरण पडतां मरण| पावती प्राणी ||२५||
स्मरण विस्मरण राहिलें| मग देहास मरण आलें |
पुढें जन्मास घातलें| कोणास कोणें ||२६||
म्हणोनी जन्मचि असेना| आणी यातना हि दिसेना |
अवघी वेर्थचि कल्पना| बळावली ||२७||
म्हणौन जन्मचि नाहीं कोणासी| श्रोतयांची आशंका ऐसी |
मरोन गेलें तें जन्मासी| मागुतें न ये ||२८||
वाळलें काष्ठ हिरवळेना| पडिलें फळ तें पुन्हां लागेना |
तैसें पडिलें शरीर येना| जन्मास मागुतें ||२९||
मडकें अवचितें फुटलें| फुटलें तें फुटोनिच गेलें |
तैसेंचि पुन्हां जन्मलें| नाहीं मनुष्य ||३०||
येथें अज्ञान आणी सज्ञान| सारिखेच जालें समान |
ऐसा बळावला अनुमान| श्रोतयांसी ||३१||
श्रोते म्हणतात... वाळलेले काष्ठ-लाकूड जसे परत हिरवे होत नाही,त्याला पालवी फुटत नाही किंवा झाडावरून पडलेले फळ जसे झाडाला परत लागत नाही किंवा मातीचे फुटलेले मडके जसे परत सांधता येत नाही.. तसेच एकदा का देहास मरण आले की, तो परत जन्म घेतो, असे म्हणणे म्हणजे व्यर्थ कल्पना करणेच आहे.. असे असताना अज्ञानी(दगड आणि सज्ञानी(आत्मज्ञानी) हे सारखेच झाले... असे अनुमान काढले गेले.
यावर श्रीसमर्थवचन म्हणते..
वक्ता म्हणे हो ऐका| अवघें पाषांड करूं नका |
अनुमान असेल तरी विवेका| अवलोकावें ||३२||
'सआत्मज्ञानी आणि अज्ञानी हे सारखेच', हे आपलेच अनुमान आपणच आपल्याच विवेकाच्या सहाय्याने तपासून घेतले पाहीजे.. नाहीतर पाषांड आणि आपण, यात फरक तो काय?
प्रेत्नेंवीण कार्य जालें| जेविल्यावीण पोट भरलें |
ज्ञानेंवीण मुक्त जालें| हें तों घडेना ||३३||
प्रयत्न न करता जसे कार्य जसे सपंन्न होत नाही किंवा जेवल्याशिवाय अन्य कशानीही जसे पोट भरत नाही... तसेच आत्मज्ञान म्हणजेच मी 'देह' नाही का आत्मानुभव न होताच कोणी मुक्त झालय..परत जन्म-मरण्याच्या फेर्यातून सुटलय अस कधीही होत नाही. (याची पक्कीअशी खूणगाठ आपण मनाशी बांधली पाहीजे)
स्वयें आपण जेविला| त्यास वाटे लोक धाला |
परंतु हें समस्तांला| घडले पाहिजे ||३४||
पोहणें सिकला तो तरेल| पोहणें नेणें तो बुडेल |
येथें हि अनुमान करील| ऐसा कवणु ||३५||
तैसें जयास ज्ञान जालें| ते ते तितुकेच तरले |
ज्याचें बंधनचि तुटलें| तोचि मुक्त ||३६||
एखादा 'आत्मज्ञानी' जरी स्वतः ज्ञानी असला तरीही..त्यामूळे सगळेच 'आत्मज्ञानी' कदापि होणार नाहीत. जो पोहायला शिकेल तो प्रसंगी बुडणार नाही...येथे जसे , 'पोहायला यायला पाहीजे' असे नुसते अनुमान काही आपल्या कामाला येणार नाही...तसेच ज्याला 'आत्मज्ञान' झाले तेच फक्त तरले..त्यानांच 'मुक्त' असे म्हणतात.. येथेही नुसते अनुमान कदापि कामास येणार नाही.
ज्ञानें चुके जन्ममरण| सगट बोलणें अप्रमाण |
वेदशास्त्र आणी पुराण| मग कासयासी ||४०||
वेदशास्त्रविचारबोली| माहानुभावांची मंडळी |
भूमंडळीं लोक सकळी| हें मानीतना ||४१||
अवघें होतां अप्रमाण| मग आपलेंच काय प्रमाण |
म्हणोन जेथें आत्मज्ञान| तोचि मुक्त ||४२||
'जर ज्ञानाने जन्ममरण चुकत नाही ', असे म्हंटले तर श्री..चारवेद-सहा शास्त्रे- अठरा पुराणे यांचा उपयोग काय? मग सगळेच 'अप्रमाण' होईल.. मग आपले 'ज्ञानाने जन्ममरण चुकत नाही' असे म्हणणेही आपोआपच 'अप्रमाण' होणार नाही काय? म्हणूनच ज्याला 'आत्मज्ञान', तोच फक्त 'मुक्त'.
आत्मज्ञान कळों आले| म्हणोन दृश्य मिथ्या जालें |
परंतु वेढा लाविलें| सकळास येणें ||४४|
आतां प्रश्न हा फिटला| ज्ञानी ज्ञानें मुक्त जाला |
अज्ञान तो बांधला| आपले कल्पनेनें ||४५||
आत्मज्ञान झाल्यावरच सगळ्या दृश्य संसाराचे मिथ्यापण पटेल.. परंतू इतर सगळे अज्ञानी जन 'दृश्य संसारच खरा' असे अनुमान काढतील.
म्हणूनच ज्ञानी त्याला झालेल्या आत्मज्ञानामूळे मुक्त होतो आणि अजूनही जो-जो अज्ञानी आहे, तो-तो आपल्या अनुमानाने-कल्पनेने अजूनच बांधला जातो..घोर अंधःकारात जातो.... असे श्रीसमर्थ वचन आहे.
धन्यवाद!
श्रीसंत ज्ञानेश्वर आपल्या
श्रीसंत ज्ञानेश्वर आपल्या भावार्थदीपिका... अध्याय २ मध्ये म्हणतात...
वासांसि जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोऽपराणि |
तथा शरीराणि विहाय जीर्णान्यन्यानि संयाति नवानि देही ||२२||
जैसें जीर्ण वस्त्र सांडिजे| मग नूतन वेढिजे| तैसें देहांतरातें स्वीकारिजे| चैतन्यनाथें ||१४४||
जसे आपण आपले जुने-जीर्ण झालेले वस्त्र काढून नवे नेसतो..तसेच आपल्या शरीरातील चैतन्य...ते शरीर जीर्ण झाल्यावर, ते टाकून नवीन शरीर धारण करते.(मी म्हणजे 'चैतन्य' आहे हे ज्ञान न झाल्यामूळे.. मी म्हणजे शरीर आहे या अज्ञानजनक अनुमानामूळे..शरीराचे मरणे म्हणजेच आपले 'मरण' असे आपण समजतो.)
नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः |
न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः ||२३||
अच्छेद्योऽयमदाह्योऽयमक्लेद्योऽशोष्य एव च |
नित्यः सर्वगतः स्थाणुरचलोऽयं सनातनः ||२४||
हा अनादि नित्यसिद्धु| निरुपाधि विशुद्धु| म्हणौनि शस्त्रादिकीं छेदु| न घडे यया ||१४५||
हा प्रळयोदकें नाप्लवे| अग्निदाहो न संभवे| एथ महाशोषु न प्रभवे| मारुताचा ||१४६||
अर्जुना हा नित्यु| अचळु हा शाश्वतु| सर्वत्र सदोदितु| परिपूर्णु हा ||१४७||
हे जे प्रत्येक जीवाच्या शरीरात असणारे 'चैतन्य' आहे ..त्याचे वर्णन श्रीभगवंत करत आहेत.
हे चैतन्य नित्यसिद्ध.. निरूपाधिक आणि विशुद्ध आहे..म्हणूनच सृष्टी अंताच्या वेळेला जो महाप्रलय होतो त्यावेळेच्या पाण्याने भिजत नाही..त्याला अग्निचा दाह जाळू शकत नाही...वारा शोषू शकत नाही.. असे हे 'चैतन्य' नित्य, न चळणारे, शाश्वत, सर्वत्र, सदोदित असणारे..सनातन असे ..परिपूर्ण आहे.
अव्यक्तोऽयमचिन्त्योऽयमविकार्योऽयमुच्यते |
तस्मादेवं विदित्वैनं नानुशोचितुमर्हसि ||२५||
हा तर्काचिये दिठी| गोचर नोहे किरीटी| ध्यान याचिये भेटी| उत्कंठा वाहे ||१४८||
हा सदा दुर्लभु मना| आपु नोहे साधना| निःसीमु हा अर्जुना| पुरुषोत्तमु ||१४९||
हा गुणत्रयरहितु| अनादि अविकृतु| व्यक्तीसी अतीतु| सर्वरूप ||१५०||
अर्जुना ऐसा हा जाणावा| सकळात्मकु देखावा| मग सहजें शोकु आघवा| हरेल तुझा ||१५१||
हे जे 'चैतन्य' नुसत्या तर्काने-अनुमानाने गोचर-व्यक्त करता येत नाही. योगी याला भेटण्याच्या उत्कंठेने 'ध्यानाचा' मार्ग अवलंबितात. हे सदा दुर्लभ आहे.
श्रीभगवंत पुढे म्हणतात.. हे त्रिगुणरहीत्,अनादि चैतन्याला जाणल्याशिवाय अवघा शोक-संदेह कदापि हरणार नाही.
धन्यवाद!
आता मुख्य प्रश्न आहे...
आपण म्हणजे शरीर आहे, असे आपणास का वाटते.? हे जर खोटे आहे तर या 'अज्ञानी' अनुमानातून बाहेर कसे पडायचे? आपल्या शरीरातील चैतन्याला जाणायचे म्हणजे नेमके काय करायचे?:)
सावट, खूप छान
सावट, खूप छान
सावट, छान सांगितले आहे. वेळ
सावट,
छान सांगितले आहे.
वेळ मिळेल तेव्हा गुरु आणि श्रीसद्गगुरुंबद्द्ल जे प्रश्न आहेत त्याचा उलगडा कराल का?
धन्यवाद! अश्विनी,
धन्यवाद! अश्विनी, गौरी.
प्रश्न अवश्य विचारावेत.:)
गौरी, तुम्ही अगोदर
गौरी,
तुम्ही अगोदर विचारलेल्या प्रश्नाबद्द्ल बोलत आहात काय?
श्रीसद्गुरूतत्वाच कार्य हे 'अज्ञान' नाहीस करणे आहे. आणि आपण वर पाहील्याप्रमाणे कल्पांतीच्या-प्रलयाच्या वेळीही 'अज्ञान' संपलेले नसते...आणि म्हणूनच परब्रह्मासारखेच श्रीसद्गुरूतत्वही 'सनातन' आहे.
हे श्रीसद्गुरूतत्व प्रत्येक जीवाबरोबर अखंड असते...आणि त्या जीवाची..त्याच्या अज्ञानामूळे होणारी फरफट आणि त्याची जाणिव..पुर्वसुकृत पाहून..हे श्रीसद्गुरूतत्व त्याच्यासमोर योग्य वेळी, केवळ करूणेने प्रकट होते.
जा'मोहन'प्या, खाली, या
जा'मोहन'प्या,
खाली, या चर्चेदरम्यान, आपल्या विविध पोष्ट मधून घेतलेले काही संदर्भ आहेत. त्याविषयी काही विचारायच आहे...:)
>>>१)दैनंदिन उपासना ही व्यावहारीक फायद्यासाठी करायची नव्हती, तर फक्त अध्यात्मिक उन्नती , परमतत्वाची जाणीव रहाणे या एकाच भावनेसाठी तिचा उपयोग होत होता.
नित्य उपासनेचा उपयोग सध्याच्या काळात अध्यात्मिक उन्नती साठी होतो की होत नाही?
>>>२)त्यामुळे उपासनेची दृष्टी बदलणं, हे जास्त महत्वाचे आहे. देवता, नाव, गुरु, पुस्तक, किती वेळ ... याला फारसे अर्थ नाहीत. हे फक्त वेगळेवेगळे ऑप्शन्स आहेत..
उपासनेची दृष्टी कशी बदलायची?
>>>३)अध्यात्मिक उन्नती या शब्दाची नेमकी व्याख्या सांगता येणार नाही..... काही मुद्दे मांडतो...
>>>४)मला अध्यात्मिक मार्गाला लावलं ते इन्शुरन्स या विषयानं ! Human life is full of uncertain events called risks..... The outcomes are always unpredictable..... ही इन्शुरन्स या विषयाची सुरुवात आहे
आपण जर 'अध्यात्मिक मार्गाला' लागलेले आहात्..तर ..व्याख्या न करता येणारी..अशी स्वतःची 'अध्यात्मिक उन्नती' कशी साधणार आहात?
>>>५)कारण दुसर्याला प्रव्रुत्त करणे हीदेखील समष्टी साधना म्हणून गणली जाते..
मग 'व्यष्टी' साधना काय आहे?
>>>६)इन्द्रियांची जीवशास्त्रीय प्रगल्भता हे अध्यात्मिकदृष्ट्या निरोगी असल्याचा पुरावा ठरू शकत नाही
मग 'अध्यात्मिकदृष्ट्या रोगी' कोणाला म्हणायचे? त्याची लक्षणे काय? हा रोग बरा होण्यासाठी 'पथ्य, औषध आणि विश्रांती' हे त्रिकूट कसे जमवायचे?
>>>७)गंमत म्हणजे क्लिनिकल प्रॅक्टिस करताना रोजच म्हातारा-आजारी मनुष्य-मृत्यु हे बुद्धाचे त्रिकूट बघुनही कधी ही जाणीव झाली नव्हती ... ... अर्थात नुसते एवढे बघून ही जाणीव होणे इतके सोपे असते, तर सगळी मेडिकल कॉलेजेस आज बुद्ध् तयार करणार्या फॅक्टरीज झाल्या असत्या !!
ही वरची 'जाणीव' होणे किती महत्वाचे आहे?
या प्रश्नांची उत्तरे वाचायला आवडतील:)
सावट, धन्यवाद! ह्याच
सावट,
धन्यवाद! ह्याच प्रश्नाचे उत्तर हवे होते.
१. आजच्या नित्य उपासनेचा
१. आजच्या नित्य उपासनेचा उपयोग अध्यात्मिक उन्नतीसाठी फारसा होत नसावा... समथिंग इज बेटर दॅन नथिंग एवढाच उपयोग... किंवा रोज भौतिक सुखाची मागणी करता करता एखादा दिवस प्रत्येकाला हे जाणवेल की अरे, आपण फार क्षुल्लक वस्तू मागत होतो... असेही होऊ शकेल.. त्यामुळे उपासना चालूच ठेवावी.. उपासनेला दृढ चालवावे..
२. उपासनेची द्रूशी वर उल्लेखल्याप्रमाणे कालांतराने बदलेल. मला वाटते, विशिष्ट काळानंतर आपल्याला गृहस्थाश्रम सोडून (म्हणजे मनाने, अगदीच शक्य असल्यास शरीराने) पुढच्या आश्रमात जायचे आहे, याचे भान राखल्यास गरजा आणि धावपळ सीमीत करता येऊ शकेल , याने मदत होऊ शकेल, हा एक अंदाज आहे.
३. ४. .. उत्तरे अवघड आहेत..
यांची उत्तरे संपूर्ण्पणे माहीत असती, तर ती लिहून हा बीबी मी बंद नसता का केला? ही उत्तरे संपूर्णपणे समजत नाहीत, म्हणून तर हा बीबी उघडायचा ना? 
५. व्यष्टी साधना म्हणजे व्यक्तीने स्वतःसाठी केलेली साधना. समष्टी म्हणजे समूहासाठी.. यात केवळ शरीराने एकत्र येणे अपेक्षित नाही.... देवळात गोळा झालेले ५० लोक स्वतंत्रपणे व्यष्टी उपासना करत असतात.
६. सात्वीक जीवनाची लक्षणे गीतेत /इतरत्र पहावीत..
७. मृत्यु आणि दु:खाची जाणीव होणे, फार गरजेचे आहे.
एकदा एक माणूस नामदेवाना म्हणाला, तुम्ही सतत सन्मार्गावरच कसे राहता? याचे रहस्य काय? नामदेव म्हणाले, ते सगळे सोड. आजपासून आठव्या दिवशी तुमचा मृत्यु होणार आहे.
तो माणूस घाबरला. नामदेवांचं वचन खोटे कसे असेल? त्याने आठ दिवस फक्त चांगलीच कामे केली, शत्रूना माफ केले. नवव्या दिवशीही तो जिंवंतच राहिला आणि नामदेवाना म्हणाला, तुमचे भविष्य तर खोटे ठरले...
नामदेव म्हणाले, या आठ दिवसात पापाचा विचार किती वेळा मनात आला?
'पाप, कुठले पाप? सगळीकडे यमाचा रेडाच दिसत होता... '
'हेच तर संतांचे रहस्य... संताना सतत मृत्यूचे दर्शन घडत असते... म्हणून ते सन्मार्गावरून ढळत नाहीत.'
हा दाखला डॉ. अभय बंग यानी 'माझा साक्षात्कारी हृदयविकार' या पुस्तकातही दिला आहे. ते म्हणतात, मृत्यूची जाणीव माणसाला पवित्र करते.
मृत्यु या शब्दाबरोबरच सर्व प्रकारची दु:खे हा व्यापक अर्थ घेतला तरी चालू शकेल...
नमस्कार, हा प्रश्न कुठे
नमस्कार,
हा प्रश्न कुठे टाकावा ते कळले नाही म्हणुन इथे टाकतेय.
धर्म ही संकल्पना कशी अस्तित्वात आली असावी? संत-महात्म्यांनी सबका मालिक एक, देव एकच आहे, एक ओंकार हेच शिकवले, जातपात, धर्म ह्यावरुन भेदभाव केला नाही. पण प्रत्येक महात्म्याबरोबर धर्माची स्थापना झालेली दिसते. जसे महम्म्द पैगंबर- मुस्लिम धर्म, भगवान बुद्ध - बौध्द धर्म, गुरु नानक- शिख धर्म. ज्या महात्म्यांनी सर्वांना आपले मानले त्यांना खरच एक वेगळा धर्म स्थापन करावा, अशी गरज भासली असेल?
प्रत्येक धर्म परमात्म्याची उपासनाच शिकवतो मग धर्म स्थापन करण्यामागचे प्रयोजन काय असु शकेल?
ह्म्म्म धर्म हा वेगळ्या
ह्म्म्म धर्म हा वेगळ्या बीबीचा विषय आहे. या विषयावर आधी काही बीबी लिहिले गेले आहेत. शोधावे लागतील.
धन्यवाद
धन्यवाद जा'मोहन'प्या!
गौरी,
जीवाची जशी आवड-वासना त्यानुसार त्याला वातावरणाचा लाभ होतो.
आता जीवाची आवड आणि त्यानुसार मिळालेले जन्म- मृत्यू मधील प्रारब्ध हे जरी 'सत्य' असले, तरीही त्या जीवाबरोबर अखंड असणारे श्रीसद्गगुरुतत्व हेही आपले 'काम' अतिशय चोख पणे करत असते.
जसे तंबाकू खाणार्या एखाद्याची..दुसर्या सारखी आवड असणार्या माणसाबरोबर सलगी होते..याच महत्वाच्या कारणासाठी श्रीसद्गुरूतत्वही तसेच वेश आणि उपदेश धारण करते, जेणे करुन, त्या जीवाला, त्याच्या आहे तशा आवडीनुसार, त्याच्या कलाकलाने घेऊन..त्याला मुख्य मार्गाप्रत आणून सोडते...जीवाचा अहंकार जेवढा दाट तेवढाच हा लागणारा वेळ(जन्म)-अधोगती ही जास्त.
जीवाची आवड भिन्न-भिन्न असते..म्हणूनच असे मार्गही(धर्म) प्रथम दर्शनी भिन्न वाटतात...परंतू तरीही त्या जीवाकरता तोच मार्ग योग्य असतो.
वर्ण आणि आश्रम हे माणसाचे जन्मतःचा असणारा स्वभाव आणि गुण (त्रिगुण)यावर ठरतो..त्यामूळे आपल्या समजूतीनुसार असनार्या..जात-पात याला परमार्थात महत्व शून्य.
धन्यवाद!:)
जीवाची आवड भिन्न-भिन्न
जीवाची आवड भिन्न-भिन्न असते..म्हणूनच असे मार्गही(धर्म) प्रथम दर्शनी भिन्न वाटतात. >> सावट नीटसे कळले नाही आणि जे कळले असे वाटले ते पटले नाही.
१. कोणता धर्म अध्यात्म मार्गात मार्गदर्शन करतो? सगळे धर्म हे मानव निर्मीत आहेत आणि ते फक्त ऐहीक जीवनाबाबतच मार्गदर्शन करतात. जरी धर्माचे संस्थापक अधीकारी असले (असतीलच असे म्हणवत नाही.) तरी जेंव्हा त्या धर्मात "असे केल्यानेच तुम्हाला मोक्ष मिळेल अशी वृत्ती बळावली तेंव्हाच धर्माची अध्यात्मापासून फारकत झाली. धर्माने सांगितल्याप्रमाणे मुक्ती मिळवण्याचा तो एक मार्ग असू शकतो पण फक्त तो एकच मार्ग असू शकत नाही.
२. माझा कुठल्याच धर्मावर विश्वास नसेल तर माझ्या जिवाला काहीच आवडी निवडी नसतील का?
गौरी कृपया धर्मावर चर्चा करायची असल्यास वेगळा बाफ काढाल का?
कुलदेवीची उपासना कशी करावी?
कुलदेवीची उपासना कशी करावी?
’धर्म’ हा शब्द, आपण प्रपंच
’धर्म’ हा शब्द, आपण प्रपंच आणि परमार्थात वेगवेगळ्या प्रकारे अनुभवतो. मानवधर्म-स्त्रीधर्म,प्राणिधर्म,स्वधर्म-परधर्म, शरीरधर्म-मनोधर्म,परमधर्म,शास्त्रांनी सांगितलेला ’धर्म’ नावाचा प्रथम पुरुषार्थ इ. विविध रुपाने-अंगाने हा शब्द आपल्याला अंगवळणी पडला आहे.
आपण आपल्या विषयाशी 'अनन्य' असलेला ’धर्म’ याचा विस्तार थोडक्यात पहाणे जरुरी आहे, किंबहूना तोच या आपल्या,आतापर्यंतच्या 'सद' अशा चर्चेला 'पौष्टता' देणाराच आहे, असे म्हणणे वावगे होणार नाही.
आपण आपल्या ध्यानी-मनी एक गोष्ट कायम ठेवणे जरूरी आहे...ती म्हणजे, हा सगळा 'दृश्य' म्हणजेच आपल्याच डोळ्याला दिसणारा ’संसार’ आहे तो श्रीभगवंताचा ’मूळसंकल्प’ आहे. जे-जे आपल्याला ज्ञात-अज्ञात आहे... त्याचे कारण मूळसंकल्प. म्हणजेच आपण एखाद्या गोष्टीला निसर्गनिर्मीत म्हणू किंवा मानवनिर्मीत म्हणू.. हे सगळ श्रीभगवंताच्या मूळ संकल्पातच अंतर्भूत आहेत, ही गोष्ट, सुर्यप्रकाशाइतकी स्वच्छ आहे. एक उदा. घ्यायचे झाले तर, आपण समजा एखाद्या खुर्चीत बसलो आहे...आणि ती खुर्ची घरात आहे..याचाच अर्थ आपण घरात आहे, असाच होणार,नाही काय? म्हणूनच आपले विचारही त्या अनुरोधानेच असले पाहीजेत.
आपल्या पॄथ्वीतळावर जे काही विविध धर्म आपण पहातो.. त्याचा मूळ 'गाभा' जर आपल्या लक्षात आला तर आपल्या विचाराची दिशा निश्चित बदलू शकते. ’धर्म आणि आताचे त्याचे स्वरूप’ हा आपल्या-आपल्या, ज्याच्या-त्याच्या जिव्हाळ्याचा विषय असला तरिही... आजच्या प्रत्येक धर्माचे स्वरूप कमालीचे बदलले आहे. ज्या गोष्टी विविध धर्मांनी... त्यांच्या संस्थापकांनी महत्वाच्या म्हणून सांगितल्या आहेत त्या एकतर सर्रास पायदळी तुडविल्या जातात किंवा फ़क्त त्याचे बाह्यस्वरुपच पहायला मिळते, ही गोष्ट एखादा आंधळाही मान्य करेल.
जसे एखादा..एखाद्या विषयात हूशार असलेल्या विद्यार्थ्याला.. त्याच्या हुशारीबद्द्ल प्रशस्तीपत्रक हे त्याच विषयात ’अधिकारी’ असणाराच, दुसरा एखादा देऊ शकतो, त्याचप्रमाणे परमार्थातही--अध्यात्मातही एखादा ’साधू’ आहे का नाही, हे जाणणाराही ’साधूच’ असावा लागतो... हे आपण कधीही विसरू नये.एखाद्याला ’आत्मज्ञान’ प्राप्त झाले आहे का नाही....हे दुसया आत्मज्ञानी महात्म्यासच कळते... आत्म-अज्ञानास नाही.त्यामूळेच शब्द्ज्ञानीलाच आत्मज्ञानी म्हणण्याचा 'शास्त्रदोष' आपल्याला लागतो. अर्थात विविध धर्माचार्य, परंपराचार्य, धर्म संस्थापक यांची ’योग्यता’ ठरविण्याच्या भरीस आपण पडू नये...कारण तशी योग्यता, उलट तपासणी तसाच एखादा, ’विरळा’ महात्माच करू जाणे. ’परमहंस’ या पदवी धारण केलेल्या श्री प.पू. रामकृष्णपरमहंस महाराजांचे चरित्र याकरिता मुमुक्षुनी अवश्य वाचावे... त्यांनी विविध धर्माचा अनुभवासहीत केलेला अभ्यास पहाणे-वाचणे, हाच एक स्वतंत्र ’अनुभव’ आहे.
असो...आपण आपली ’पात्रता’ कशी वाढवता येईल हे पहाणे जरुरी आहे..कारण शास्त्रा नुसार..क्रमवारीत प्रथम असणारा 'अहं ब्रह्मास्मि’ हा बोध प्रथम आहे... मगच बाकी राहीलेले काय आणि कसे आहेत? हा बोध हा नंतर होतो! अगोदर कधीही नाही, हे परत-परत आपण मनाशी घोळवत ठेवले पाहीजे.
श्रीसार्थ शाण्डिल्य भक्तिसूत्रात सांगितल्यानूसार... अध्याय पहीला.. आह्निक दुसरे...सूत्र पहीले(दहावे)...
सा मुख्यतरापेक्षित्वात ॥ १० ॥
परमेश्वर प्राप्तीकरीता ’भक्ती’ हीच मुख्य आहे.. कारण ज्ञान इ. भगवत्प्राप्तीची साधने-आलंबने तिच्यावरच अवलंबून आहेत.
ज्ञान,कर्म,योग,नाम इ. साधने भगवत्प्राप्तीकरिता.. प्रत्येकाच्या अधिकारानुसार..महात्म्यानी सांगितली आहेत तरीही ती ’भक्तीची’ अपेक्षा करतात.... याचाच अर्थ भक्तिशिवाय या विविध साधनांना पूर्णत्व नाही.
'श्रध्दावांल्लभते ज्ञानम । (श्रीमद भ. गीता ४.३९ ।’ यानुसार श्रध्दा-भक्ती असेल, त्यालाच ’ज्ञान’ मिळते.
तसेच श्रीभगवंतानी सांगितलेला ’निष्काम कर्मयोग’ साधायचा असेल तर ते कर्म भक्तीपूर्वकच झालेले असले पाहिजे अशी महत्वाची ’अट’ आहे.
राजयोगात ’ईश्वरानेच सगळे जग व्यापले आहे’ अशी श्रध्दा असावी लागते,हठयोगात न साधणारी ’निर्विकल्प’ समाधी..श्रीसद्गुरुशिवाय मिळत नाही.
नामसाधनेत ज्याचे आपण नाम घेतो (श्रीराम,श्रीकृष्ण,श्रीशिव,श्रीजगदंब इ.) तोच आपला ’योगक्षेम’ वाहणारा आहे--आत-बाहेर सर्वत्र तोच व्यापून आहे, अशी भक्ती लागते.
म्हणूनच श्रीनारदांनीही आपल्या भक्तिसूत्रात म्हंटले आहे...
सा तु कर्मज्ञानयोगेभ्यो प्यधिकतरा ॥ ना.भ. २५ ॥
म्हणजेच, ती 'भक्ती' तर कर्म,ज्ञान,योग यांहून श्रेष्ठ आहे.
कर्मे लौकिक असोत की शास्त्राने सांगितलेली धार्मिक असोत, ती यथासांग हॊणे आणि त्याचे पुर्णफ़ळ पदरात पडणे कठीण असते. म्हणूनच आपल्या ’मनोबोधात’ श्रीरामदास स्वामी म्हणतात..
यथासांग ते कर्म काही घडेना । घडे कर्म ते पुण्य गाठी पडेना ॥मनाचे श्लोक १००॥
अशा अडचणी भक्ती मध्ये नसतात..देश,काल,जात,आश्रम,वर्ण,व्यक्ती,द्रव्य इ. कर्माला आवश्यक असणार्या गोष्टी लागत नाहीत.
कोणताही 'धर्म' पाहीला तर त्यात 'भक्तीलाच' प्राधान्य असल्याचे दिसून येते.प्रत्येक धर्माची तत्वे,प्रतीके,भक्ती व्यक्त करण्याचे स्वरूप हे सर्व वेगवेगळे आहे.पण प्रत्येक ठिकाणी भक्ती-शरणागती आहे.
मुसलमान धर्मात मूर्तीपूजा नाही.मूर्तीऎवजी दुसरे काही प्रतीक आहे..त्या प्रतिकासमोर मस्तक नमविणे आहे..पाच-पाच वेळा नमाज पडणे-शरण जाणे आहे. आपला हिंदूधर्म त्याच प्रतिकाला श्रीशिव,श्रीविष्णू इ. नावे घेऊन,मंदिरे उभारून नवविधा भक्तीने शरण जाईल. जैनधर्म परमात्मा मानत नाही, पण तिथेही सर्वसंगपरित्यागी चोवीस तीर्थंकर आहेत....त्यांची भक्ती आहे. बौद्धधर्म ’आत्मा’ मानत नाही, पण ’सरणं गस्सामि’ म्हणत शरणागती आहेच.ख्रिस्तीधर्म ’आकाशातल्या बापाची’ किंवा त्याच्या प्रेषिताची भक्ती करतो,प्रार्थना करतो,शरण जातो.
म्हणजेच धर्माचे प्राणतत्व भक्ती आहे. ’भक्ती’ शिवाय धर्म असूच शकत नाही.भक्तीशिवाय धर्म म्हणजेच प्राणांवाचून देह.
जेव्हा एखादा शिल्पकार, मातीच्या वस्तू बनवतो,तेव्हा त्याला मुख्य गोष्ट म्हणजे ’माती’ लागते...मग ती वस्तू, घडा असो वा राजा,शिपाई, घर, तलवार असो..मुख्य गोष्ट माती.जसे प्राण ज्याच्यात असतात त्यालाच ’प्राणी’ म्हणता येईल....मग आकार कॊणताही असो... असेच धर्म कोणताही असो..त्याचा आचार-विचार कसाही असो...त्याचे मुख्य प्राणतत्व असते ’भक्ती’.
म्हणजेच श्रीभगवंताना अपेक्षित असणारा ’धर्म’ हा प्रथम पुरुषार्थ हा 'भक्ती' शिवाय साधत नाही आणि ’भक्ती’ हे प्राणतत्व जेथे असेल, तेथेच ’धर्म’ ही आहे, हे नि:संशय पणे समाजावे, असे शास्त्र सांगते.
अशा 'भक्तीची' प्राप्ती कशी होईल? हे पहाणे जरूरी आहे.:)
धन्यवाद!
सावट सुंदर पोस्ट!
सावट सुंदर पोस्ट! सुरुवातीपेक्षा शेवट खूप आवडला
आपण आपल्या ध्यानी-मनी एक
आपण आपल्या ध्यानी-मनी एक गोष्ट कायम ठेवणे जरूरी आहे...ती म्हणजे, हा सगळा 'दृश्य' म्हणजेच आपल्याच डोळ्याला दिसणारा ’संसार’ आहे तो श्रीभगवंताचा ’मूळसंकल्प’ आहे. जे-जे आपल्याला ज्ञात-अज्ञात आहे... त्याचे कारण मूळसंकल्प. म्हणजेच आपण एखाद्या गोष्टीला निसर्गनिर्मीत म्हणू किंवा मानवनिर्मीत म्हणू.. हे सगळ श्रीभगवंताच्या मूळ संकल्पातच अंतर्भूत आहेत, ही गोष्ट, सुर्यप्रकाशाइतकी स्वच्छ आहे. एक उदा. घ्यायचे झाले तर, आपण समजा एखाद्या खुर्चीत बसलो आहे...आणि ती खुर्ची घरात आहे..याचाच अर्थ आपण घरात आहे, असाच होणार,नाही काय? म्हणूनच आपले विचारही त्या अनुरोधानेच असले पाहीजेत.
>>>> अगदी अगदी. आणि कर्माच्या बाबतीत जेव्हा आपला (मानवाचा) संकल्प भगवंताच्या संकल्पाशी मिळता जुळता होतो तेव्हाच योग घडतो. कारण श्रीराम सत्यसंकल्पप्रभू आहेत. यावरही सावट काही सांगा प्लिज. मला विस्तृतपणे नाही सांगतायेत.
श्रीभगवंताचा ’मूळसंकल्प’ >>
श्रीभगवंताचा ’मूळसंकल्प’ >> खूप खरे आहे.
बर्याच दिवसापूर्वी 'ईश्वर म्हणजे काय' याचे एक सुंदर स्पष्टीकरण वाचले होते. आपण सहज म्हणतो की या सगळ्यापाठी परमेश्वर आहे. पण म्हणजे नक्की कसा? हे जग पदार्थ व उर्जा यांनी बनले आहे. पदार्थ बनले आहेत अणूंनी. प्रत्येक अणूत एक केंद्रक आणि त्या भोवती फिरणारे(रा) इलेक्ट्रॉन असतात. ह्या केंद्रकातल्या कणांचे वस्तुमान, त्यांचा विद्युतभार तसेच इलेक्ट्रॉनचे वस्तुमान, त्यांचा विद्युतभार आणि त्या दोघांना एकमेकांशी बांधून ठेवणारे 'क्षीण बल' हे आपल्याला नीटसे न उलगडलेले कोडे आहे. पण एक नक्की की ह्या समिकरणातली प्रत्येक राशी ही precise असते. ती थोडी जरी बदलली तरी ह्या संपूर्ण जगाच्या असण्यालाच धक्का ब्सतो. म्हणजे समजा क्षीण बल (ह्याची किंमत एक स्थीरांक असते) जर किंचीत कमी झाले असते तर इलेक्ट्रॉन अणूकेंद्रकाशी संलग्न राहू शकले नसते मग कसला अणू, कसले मूलद्रव्य आणि कसले जग? तसेच ते बल थोडे जास्त झाले असते तर इलेक्ट्रॉन अणूकेंद्रकात कोसळले असते. आणि मग अणू आणि पर्यायाने जग बनू शकले नसते.
आता या इतक्या सूक्ष्म राशी इतक्या precisionने ज्या शक्तीने निर्माण केल्या ती शक्ती म्हणजे परमेश्वर! म्हणजे आपण व आपल्याभोवतालचे जग अस्तित्वात येण्यामागे त्याचा खूप well planned संकल्प आहे.
Pages