उपासना

Submitted by हसरी on 3 February, 2010 - 23:00

उपासना कशी करावी?
कोणत्या देवतेची उपासना कशी करावी याची सविस्तर माहिती द्या?

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सावट,

आपल्या प्रश्णांची उत्तरे द्यायचा प्रयत्न करतोय.

१) 'ठेविले अनंते तैसेची रहावे' याचा अर्थ काय? >> या जन्मी आपल्या वाट्याला आलेले प्रारब्ध निमूटपणे भोगणे. ते भोगताना होणारे कर्म फलाची आशा न धरता करणे. खूप कठीण आहे आणि आपण सांगितल्याप्रमाणे 'काम करणे' आणि 'काम होणे' यातला फरक कळल्याशिवाय अशक्यप्रायच वाटते.

२) ही 'पातळी' कशी जाणायची? किंवा जे वेचतोय ते 'बरोबरच' आहे हे कसे ठरवणार? जेंव्हा सद्गुरूंचे मार्गदर्शन नसते तेंव्हा स्वतःच्या सारासार विवेकबुध्दीवर सगळी भिस्त ठेऊन चालावे लागते. पण ती पूर्णपणे उत्क्रांत नसल्यामुळे चूकाही होतात. मग परत त्या सुधारण्यात वेळ जातो. जेंव्हा हो/नाही. चूक्/बरोबर असे दोनच पर्याय असतात तेंव्हा थोडी तरी बरी अवस्था असते पण जास्त पर्याय असताना कुठला पर्याय निवडावा हेच कळत नाही.

३) श्रीवेद जर फक्त 'साधकांनाच' मार्गदर्शन करतात..मग जे 'साधक' नाहीत त्यांचे काय? 'साधक' कोणाला म्हणायचे? वेद सगळ्यांनाच मार्गदर्शन करतात. प्रत्येक जीवाला 'मी कोण आहे?' हा प्रश्ण कधी ना कधी पडतोच. तो जेंव्हा त्याचे उत्तर शोधायचा प्रयत्न करू लागतो तेंव्हा तो साधक होतो. वेद धर्माप्रमाणे 'हे केले तर'च' तुला मुक्ती मिळेल' असे कुठेही म्हणत नाहीत.

४) आचरणात आणायचे म्हणजे नेमके काय करायचे? हा खरच प्रश्ण आहे की मला काही सांगू बघताय तुम्ही? दुसरी शक्यताच अधीक दिसतेय मला. ठीक आहे, कळले.

५) यातील 'मी' आणि 'मला' सायलंट आहेत का? मायेच्या जगात व्यक्त होण्यासाठी नाम आणि रुप यांचा आधार घ्यावाच लागतो. 'मी' 'मला' हे फक्त एक रुप म्हणून वापरले होते (बाकी मला 'मी' हे फक्त व्यक्त होण्यापुरतेच लागते असे समजू नका - अजून खूप अहंकार बाकी आहे Happy )

६) तसेच 'मी'पणा कॅनाल केला की प्रारब्ध संपते म्हणजे नक्की काय होते? साखरेची गोडी साखर खाल्ल्याशिवाय कशी कळणार? Happy

७) तुमच्या शेवटल्या प्रश्णात मला फक्त 'तू' आणि 'मी' हा भेद नव्हता करायचा.
सुरुवात अशासाठी की जेंव्हा वेदात काय आहे हे कुतुहल माझ्या मनात निर्माण होते ते माझ्या मुक्तीच्या दिशेने टाकलेले पहिले पाउल असते. अजून पुष्कळ दमछाक करणारा प्रवास बाकी असतो पण निदान सुरुवात तरी झालेली असते. 'मी कोण हे मला संपूर्ण कळणे' म्हणजे त्या प्रवासाचा शेवट (इथे कदाचीत 'मी' सायलंट नसावा)

धन्यवाद माधव! छान सांगितल आहे!

श्रीसंततुकाराम महाराज 'थोर-भक्ती'ची व्याख्या करताना म्हणतात..

हेची थोर भक्ती आवडते देवा । संकल्पावी माया संसाराची ॥१॥
ठेविले अनंते तैसेची रहावे । चित्ती असु द्यावे समाधान ॥२॥
वाहिल्या उद्वेग दु:खाची केवळ । भोगणे ते फळ संचिताचे ॥३॥
तुका म्हणे घालु तयावरी भार। वाहु हा संसार देवापायी ॥४॥

आपल्याला काय आवडते,या पेक्षा श्री भगवंताना काय आवडते..अशी दृष्टि बदलल्याशिवाय 'थोर-भक्ती' कळत नाही.

श्रीभगवंताना काय आवडते हे कळाले,पण तसे कृतीत आल्याशिवायही. या 'थोर-भक्ती' ची प्राप्तीही अशक्य आहे.

असे जर 'कृतीत' येणे झाल्यावरच 'मूळमायेचा' संकल्प-विकल्प रूपी पसारा अनुभवास यायला लागतो. मग लक्षात येते की आपणच आपल्याच मागच्या 'अनंत' जन्मात वाढवलेल्या-जोपासलेल्या वासनाच-संचितच, आपल्याला या जन्मी फळरुपाने-प्रारब्धरुपाने 'उद्वेग-दु:ख' रुपात भोगावे लागते. हा 'उद्वेग' जर कायमचा जायचा असेल तर हा 'संसार' समूळ नष्ट व्हायला पाहीजे.मगच 'समाधान-शांती' या दैवी गुणाची प्राप्ती होते.

संसार म्हणजे 'बायका-पोरे' नव्हेत, तर 'संसार' म्हणजे 'वासना'! या मूळातूनच नष्ट व्हायच्या असतील तर एकच उपाय आहे... श्रीभगवंताला..त्यांच्या शक्तीवर 'भार' घालून शरण जाणे.अस 'शरण' जाण जर घडल आणि श्रीसंतानी सांगितलेली कृती आपल्या कडून घडली, तरच वरील अनुभव येईल, तरच 'संसार' वाहून जाईल, आणि मगच श्रीभगवंताना आवडणार्‍या 'थोर-भक्ती' ची प्राप्ती होईल,अन्यथा कदापि नाही!

धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्ग़ुरुरायाची ।
झाली त्वरा सुरवरां विमान उतरायाची || धृ. ||

पदोपदी अपार झाल्या पुण्याच्या राशी ।
सर्वही तीर्थे घडली आम्हां आदिकरुनि काशी । धन्य.. || १ ||

मृदंग टाळ घोळ भक्त भावार्थे गाती ।
नामसंकीर्तने ब्रम्हानंदे नाचती । धन्य.. || २ ||

कोटि ब्रम्हहत्या हरती करितां दंडवत ।
लोटांगण घालिता मोक्ष लोळे पायात । धन्य.. || ३ ||

गुरुभजनाचा महिमा न कळे आगमानिगमांसि ।
अनुभव जे जाणती ते गुरुपदिचे अभिलाषी । धन्य.. || ४ ||

प्रदक्षिणा करूनि देह भावे वाहिला ।
श्रीरंगात्मज विठ्ठल पुढे उभा राहिला । धन्य.. || ५ ||

परमार्थात श्रीसद्गुरूंचे महत्त्व काय आहे, याविषयी प.पू.श्री सद्गूरू रामदासस्वामी आपल्या श्रीदासबोधात काय म्हणतात ते पाहू..

जय जय जी सद्गुरु पूर्णकामा | परमपुरुषा आत्मयारामा |
अनुर्वाच्य तुमचा महिमा | वर्णिला न वचे ||१||

जें वेदांस सांकडें | जें शब्दासि कानडें |
तें सत्शिष्यास रोकडें | अलभ्य लाभे ||२||

जें योगियांचें निजवर्म | जें शंकराचें निजधाम |
जें विश्रांतीचें निजविश्राम | परम गुह्य अगाध ||३||

तें ब्रह्म तुमचेनि योगें | स्वयें आपणचि होईजे आंगें |
दुर्घट संसाराचेनि पांगें | पांगिजेना सर्वथा ||४||

जे शब्दात सांगता येत नाही..म्हणूनच ज्याविषयी श्रीवेदास ही, आता कसे सांगायचे? असे साकडे पडले, जे योग्यांचे 'निजवर्म' आहे, भगवानश्रीआदिनाथांचे 'निजधाम' आहे, जेथे विश्रांती स्वतः 'विश्रांती' घेते, असे अगाध 'परमगुह्य' जाणायचे असेल..तर ब्रह्मस्वरूप श्रीसद्गुरूंना शरण जावेच लागेल, नंतरच मग ह्या 'अतिदुर्घट' संसाराची पांगापांग होईल..तरच त्या 'सत्शिष्यास' रोकडा अनुभव येइल.

म्हणूनच या पूर्णकाम, परमपुरुष, आत्माराम आणि अनुर्वाच्य अशा श्रीसद्गुरुतत्वाचा जयजयकार असो.
बोला, अनंतकोटि ब्रंह्मांड नायक राजाधिराज श्रीसद्गुरु महाराज की जय!!

पूढे श्रीस्वामीमहाराज म्हणतात..

सद्गुरुविण ज्ञान कांहीं | सर्वथा होणार नाहीं |
अज्ञान प्राणी प्रवाहीं | वाहातचि गेले ||२१||

ज्ञानविरहित जें जें केलें | तें तें जन्मासि मूळ जालें |
म्हणौनि सद्गुरूचीं पाऊलें | सुधृढ धरावीं ||२२||

जयास वाटे देव पाहावा | तेणें सत्संग धरावा |
सत्संगेंविण देवाधिदेवा | पाविजेत नाहीं ||२३||

नाना साधनें बापुडीं | सद्गुरुविण करिती वेडीं |
गुरुकृपेविण कुडकुडीं | वेर्थचि होती ||२४||

देव म्हणजे काय? हे जाणायचे असेल तर आधी आपल्याला श्रीसत्संग धरायला हवा,त्याशिवाय 'परमतत्वाची' कृपा होणार नाही. आपणच आपल्या मनानेच..श्री सद्गुरूकृपेशिवाय वेगवेगळी साधने करू पाहू..तर ते सगळ व्यर्थ जाईल...कारण..

आत्मज्ञानाशिवाय मुक्ती नाही.. ज्ञानाशिवाय आपण जे जे कर्म करू ते ते सगळे... नविन जन्माचे 'मूळच' असेल..अज्ञानाने केलेल्या कर्मामूळे अजून वाहात जाणेच होईल..

आणि श्रीसद्गुरूकृपेशिवाय 'आत्मज्ञान' होणार..म्हणूनच म्हणौनि सद्गुरूचीं पाऊलें | सुधृढ धरावीं ||२२||

कारण..

जंव नाहीं ज्ञानप्राप्ती | तंव चुकेना यातायाती |
गुरुकृपेविण अधोगती | गर्भवास चुकेना ||३५||

सद्गुरुविण जन्म निर्फळ | सद्गुरुविण दुःख सकळ |
सद्गुरुविण तळमळ | जाणार नाहीं ||३९||

श्रीसद्गुरुकृपेशिवाय 'अधोगती'..परत 'गर्भवास' चुकणार नाही, आपला जन्म 'वाया' जाईल..सकळ दु:ख..तळमळ वाढतच जाईल.

सकळ सृष्टीचे चाळक | हरिहरब्रह्मादिक |
तेहि सद्गुपदीं रंक | महत्वा न चढेती ||४३||

असो जयासि मोक्ष व्हावा | तेणें सद्गुरु करावा |
सद्गुरुविण मोक्ष पावावा | हें कल्पांतीं न घडे ||४४||

जर 'मोक्ष' हा परमपुरुषार्थ साधायचा असेल... तर आपल्याला श्रीसद्गुरु प्राप्ती कशी होईल याकडे लक्ष द्यायला हवे....कारण श्रीसद्गुरुशिवाय 'मोक्ष' प्राप्तिची आपण 'वल्गना' करू, तर तसे 'कल्पांतीही' घडणार नाही!

अशा 'श्रीसमर्थ' वाक्याकडे 'दुर्लक्ष' करून कसे चालेल?

अश्विनी, धन्यवाद!

धन्यवाद, माधवा!

हसरी,
आपण आज एका महत्त्वाच्या टप्यावर आलो आहोत, मागे वळून पहाताना आपल्यास काय जाणवते... ते शब्दात वाचायला निश्चित आवडेल.:)

नानबा,
आपलही मोलाच मत वाचायला आवडेल. आपले 'दास-भक्ता अभिमानी' वाचले..आनंद झाला.:)

गौरी,
>>सबुरीचा मात्र कस लागतोय.

आपल्या एकत्र प्रवासातल्या या टप्यावर आल्यावर, अमळ विश्रांती घेत आपल्यालाही काय जाणवते आहे.:)

सावट, मला कशाला घन्यवाद? उलटे मीच तुम्हाला धन्यवाद दिले आहेत, इतके नि:संदिग्ध आणि सोपे करून सांगितले म्हणून. आता सांगा असा सद्गुरु मिळण्यासाठी (किंवा लौकरात लौकर मिळण्यासाठी) काय केले पाहिजे?

सावट, कायकाय वाचताय..? रामदासापासून गीतेपर्यंत, दतापासून कृष्णापर्यंत.... अहो, आम्ही कॉलेजातपण एका विषयाला एवढी टेक्स्ट बुकं वाचत नव्हतो.. Proud ..

धन्यवाद! माधव..जा'मोहन'प्या!

अश्विनी,

चला, परत एकदा 'झक्की' ला 'बोलाचेच' बोलावणे धाडू!:) अगदीच नाही आलातर असेल तिथून, असेल तसे..'मुसक्या' बांधून आणायचे 'बोलाचेच' फर्मान ही सोडू.. नुसत्या 'बोलाच्या' माराने घाबरणारा 'प्राणी' नाहीये तो!:) कोण आहे रे तिकडे......!

दोस्ता झक्की..कसा आहेस?

>>>तेंव्हा आत चार पाच वर्षात " वासांसि जीर्णाय.. " वगैरे श्लोक म्हणत

कशाला असे म्हणतोहेस..! तो बोलाचाच 'देव' तुला उत्तम..सुदृढ आयुष्य देवो..तूझ्या सर्व 'कामना' पुर्ण होवोत..अशा अनेक मंगल शुभेच्छा!:)

'भक्ती' बीबी वरील तूझेच काही 'बोल'...

>>>
१)मुळात एकदा या जगात रहायचे ठरले की अभ्यास नि कष्ट यांना पर्याय नाही. त्या दोन्हींच्या सहाय्याने तुम्ही पुष्कळ काही काही कमावू शकता. ते तसे कमावले पाहिजेच. उगीच, मी फक्त भक्ति करीन, नि दु:खे सहन करीन असे म्हंटले म्हणजे तुम्ही थोर होत नाही. नि तुम्हाला सुखहि मिळत नाही!
आता माझी ऐहिक व्यावहारिक कर्तव्ये संपली. काय वाटेल ते करून पैसे मिळवावे अशी आवश्यकता नाही. केवळ जिवंत आहे म्हणून दैनंदिन व्यवहार करावे लागतात. पण आता त्यात आसक्ति नाही. जमले तर ठीक आहे, नाहीतर नाही!
आता मी म्हणतो, की ब्रह्म सत्यं जगन्मिथ्या! भक्ति हे एकच कर्तव्य मला उरले आहे. पण दहा वर्षांपूर्वी मला तसे करता आले नसते!

२)मला तरी सांख्ययोग, बुद्धियोग, नि कर्मयोग अनेकदा वाचून सुद्धा आचरणात आणणे फार कठीण वाटते. म्हणून मी नुसते नामस्मरण करत रहातो. जेंव्हा श्रद्धा आपोआप उपजेल, बाकी सगळे कळेल तेंव्हा कळेल. सध्या तरी एकच - नामस्मरण! निदान मन शांत व्हायला तरी उपयोग होतो. भलते सलते विचार डोक्यात येत नाहीत.

अजून असेच काही 'बोल' वाचावेत अशी मनापासून इच्छा आहे!

धन्यवाद मित्रा!

सावट Happy तुम्ही झक्कींचे मित्र आहात? अगदी हक्काचे मित्र असावेत तुम्ही त्यांचे Happy

पण ते तिकडे स्तोत्र वर पोस्ट टाकतात आणि त्यांना उद्देशून तुम्ही उपासनावर पोस्ट टाकताहात !

आपल्या एकत्र प्रवासातल्या या टप्यावर आल्यावर >> हा आपल्या सगळ्यांचा मोठेपणा आहे.
आपण प्रवासाच्या एका टप्प्यावर आला आहात, पण आपल्या लिखाणामुळे 'मनाला' प्रवास खुप मोठा आहे आणि 'मी' सध्या कोणत्याच टप्प्यावर नाहिये, हे उमगलय.
सध्या वाचन्, चिंतन, मनन करुन ज्ञान मिळवण्याचे प्रयत्न चालु आहेत.

सावट
तुमच्या कडुन आणि ईतराकडुन माझ्या ज्ञानात भर पडते आणि मि ते समजुन घेण्याचा प्रयत्न करते
अडचण आली तर तुम्ही आहातच शंका निरासन करायला Happy

तुम्हा सगळ्यांचे मनापासुन धन्यवाद Happy अशिच भर घाला आमच्या ज्ञानात

(माझे काही प्रश्न आहेत ते विचारु का ? )

गौरी,
>>>'मनाला', प्रवास खुप मोठा आहे आणि 'मी' सध्या कोणत्याच टप्प्यावर नाहिये, हे उमगलय.

व्वा! हे सगळ्यात महत्त्वाच! आपण सगळे 'अज्ञानी' आहोत... हा बोध या प्रवासातला महत्त्वाचा टप्पा आहे! मळलेल्या पायवाटेनेच हा 'प्रवास' आहे, त्यामूळे हरवून जाण्याची भीतीच नाही !
धन्यवाद!

हसरी,
प्रश्न जरूर विचारा! प्रश्न पडणे महत्त्वाचे आहे, हे नक्कीच!

माधव,
>>>
२) ही 'पातळी' कशी जाणायची? किंवा जे वेचतोय ते 'बरोबरच' आहे हे कसे ठरवणार? जेंव्हा सद्गुरूंचे मार्गदर्शन नसते तेंव्हा स्वतःच्या सारासार विवेकबुध्दीवर सगळी भिस्त ठेऊन चालावे लागते. पण ती पूर्णपणे उत्क्रांत नसल्यामुळे चूकाही होतात. मग परत त्या सुधारण्यात वेळ जातो. जेंव्हा हो/नाही. चूक्/बरोबर असे दोनच पर्याय असतात तेंव्हा थोडी तरी बरी अवस्था असते पण जास्त पर्याय असताना कुठला पर्याय निवडावा हेच कळत नाही.

जेंव्हा सद्गुरूंचे मार्गदर्शन नसते तेंव्हा स्वतःच्या सारासार विवेकबुध्दीवर सगळी भिस्त ठेऊन चालावे लागते अगदी खरे आहे! ही 'बुध्दीच' पुढचा मार्ग प्रशस्त करते. मन,बुध्दी, चित्त आणि अहंकार या अंतःकरण चतुष्टयापैकी 'बुध्दी' च सगळ्यात महत्त्वाची !

३) >>>
श्रीवेद जर फक्त 'साधकांनाच' मार्गदर्शन करतात..मग जे 'साधक' नाहीत त्यांचे काय? 'साधक' कोणाला म्हणायचे? वेद सगळ्यांनाच मार्गदर्शन करतात. प्रत्येक जीवाला 'मी कोण आहे?' हा प्रश्ण कधी ना कधी पडतोच. तो जेंव्हा त्याचे उत्तर शोधायचा प्रयत्न करू लागतो तेंव्हा तो साधक होतो. वेद धर्माप्रमाणे 'हे केले तर'च' तुला मुक्ती मिळेल' असे कुठेही म्हणत नाहीत.

'साधक' म्हणजे ज्याला 'साधना' मिळाली आहे असा...म्हणजेच 'साध्य' काय या विषयी ज्याच्या 'बुध्दी'चा निश्चय झाला आहे असा! साध्य...साधना आणि साधक हे सगळ मिळूनच 'त्रिपूटी' होते! एकही नसेल तर 'प्रवास' होणारच नाही.:) आहे त्या 'चक्रात' फिरणेच होईल, पण प्रवासाचा वृथा 'भास आणि श्रम' मात्र होईल. आपला लढा कशा-कोणा विरूध्द आहे हे कळल तरच जिंकायची शक्यता असते, नाहीतर आपणच आपल्याच शत्रूला 'अज्ञानाने' मोठ करत जावू.

>>>वेद धर्माप्रमाणे 'हे केले तर'च' तुला मुक्ती मिळेल' असे कुठेही म्हणत नाहीत.

'मुक्ती' ही एक अवस्था आहे! आपण 'बंधनात' नाही हे कळण म्हणजेच 'मुक्ती' होय!

>>>
मायेच्या जगात व्यक्त होण्यासाठी नाम आणि रुप यांचा आधार घ्यावाच लागतो. 'मी' 'मला' हे फक्त एक रुप म्हणून वापरले होते

व्वा! 'नाम आणि रुप' दृश्याची ओळख..आधार!

धन्यवाद!

माधव,

>>>६) तसेच 'मी'पणा कॅनाल केला की प्रारब्ध संपते म्हणजे नक्की काय होते? साखरेची गोडी साखर खाल्ल्याशिवाय कशी कळणार?

ज्या 'प्रारब्धा' मूळे हा 'देह' मिळाला, ते 'प्रारब्ध' संपले की देह आपोआप नष्ट होतो. म्हणजेच 'मी' संपला तरीही... देह-प्रारब्ध संपत नाही आणि अजून देह-प्रारब्ध शिल्लक असल्यामूळे आणि 'मी' च वेगळ आस्तित्व संपल्यामूळे.. तो विदेही साधक .. 'प्रारब्ध' संपण्याची वाट पहातो आणि 'जिवनमुक्ताच्या' अवस्थेत जातो.

>>>७) तुमच्या शेवटल्या प्रश्णात मला फक्त 'तू' आणि 'मी' हा भेद नव्हता करायचा.
सुरुवात अशासाठी की जेंव्हा वेदात काय आहे हे कुतुहल माझ्या मनात निर्माण होते ते माझ्या मुक्तीच्या दिशेने टाकलेले पहिले पाउल असते. अजून पुष्कळ दमछाक करणारा प्रवास बाकी असतो पण निदान सुरुवात तरी झालेली असते. 'मी कोण हे मला संपूर्ण कळणे' म्हणजे त्या प्रवासाचा शेवट (इथे कदाचीत 'मी' सायलंट नसावा)

या प्रवासाच्या तीन वेगवेगळ्या पण क्रमाने येणार्‍या अवस्था-टप्पे आहेत.. या टप्यातील अंतर ही कित्येक जन्माच असू शकत..

१) अहं ब्रह्मास्मि...

म्हणजेच 'मी' म्हणजे 'ब्रह्म' आहे, हे जाणणे... हा सुरूवातीचा टप्पा आहे.
यात 'मी' म्हणजे कोण हे कळाल, पण समोरचा कोण आहे? याच उत्तर अद्याप मिळालेल नसत.
म्हणून पुढचा टप्पा म्हणजे... 'ते'(ब्रह्म),तू(मांझ्यासमोरचा) आहेस. म्हणजेच..

२)तत्त्वमसि...

आता समोरचाही 'ब्रह्मच' आहे हे कळाल, पण 'मी' ब्रह्मज्ञानी आहे, यातला 'मी' अजूनही शाबूत असतो..म्हणूनच पूढचा टप्पा..

३)सर्व खल्विदं ब्रह्मा...

म्हणजेच सर्व 'ब्रह्म' च आहे..होत, 'मी' अस काहीच नाही... नव्हत! पाण्याचीच, स्वतःला वेगळ समजणारी लाट-तरंग पाण्यातच मिसळते.

म्हणूनच आपल्यालाही अगोदर आपल्यात असणारा 'देव' शोधायचा आहे. समोरच्यातला किंवा सगळीकडे 'देव' दिसण, हे त्या नंतरचे 'टप्पे' आहेत. या 'क्रमात' कधीही बदल होत नाही, हे कायम लक्षात ठेवण्यासारखे आहे.Happy

धन्यवाद!

आपल्याला गुरु मिळेपर्यत आपला मार्ग बरोबर आहे हे कसं समजायचं आपला गुरु कसा ओळखायचा?

आपल्यात असणारा 'देव' शोधायचा आहे.>>>>>>>>>>म्हणजे चांगुल पणाच ना ?
आपल्यातला देव कसा शोधायचा?

सावट, प्रारब्ध आणि देह-प्रारब्ध यात फरक काय? ते 'प्रारब्ध संपले... देह-प्रारब्ध संपत नाही' म्हणजे काय?

क्रमाचे निरुपण अप्रतीम !!!

दोन प्रश्ण -
१. मनुष्ययोनीतच मुक्ती शक्य आहे. मग जेंव्हा मनुष्य नव्हता (डार्विनच्या उत्क्रांतीवादानुसार) तेंव्हा जीवांना मुक्ती कशी मिळत असे? आणि समजा काही कारणाने मनुष्य जमात नाहिशी झाली तर इतर जीवांना मुक्ती कशी मिळेल?

२. मुक्ती मिळालेल्या जीवाची स्थीतप्रज्ञता अखंड टिकून असते. मग आपल्या भोवती असलेले निर्जीव हे मुक्त जीव आहेत का - सगळ्या वासना जाळून साक्षी भावाने रहाणारे?

अश्विनी,
तुम्हालाही _/\_. Happy

हसरी,
तुमच्या प्रश्नांची उत्तरे अश्विनीं यांनी द्यावीत अशी त्यांना आपण विनंती करुयात!

माधव,
धन्यवाद!
प्रारब्ध आणि त्याच्यामूळेच मिळालेला देह, हे अधोरेखीत व्हाव म्हणूनच देह-प्रारब्ध अस लिहल गेल!:)

महेश,
कोठे आहात?

माधव,
तुमच्या प्रश्नांची उत्तरे.. खालील श्रीसंतश्रेष्ठ तुकाराममहाराजांच्या अभंगात आहेत..:)

संचित तैशी बुध्दी उपजे मनामधीं | सांगितलें सिद्धि नव जाय || १ ||
ज्याचा जैसा ठेवा तो त्यापाशीं धांवे | न लगती करावे उपदेश || २ ||
घेऊन उठती आपुलाले गुण | भविष्याप्रमाणें तुका म्हणे || तु.गा. ४३५८.३ ||

यावर आपला अभिप्राय कृपया सांगावा!

श्रीज्ञानेश्वरी,अध्याय दुसरा.. सांख्ययोग.

श्री भगवंत माउलींनी 'स्थितप्रज्ञ' पुरुषाची लक्षणे सांगताना म्हंटले आहे...

(ही लक्षणे फक्त 'मनुष्यालाच' लागू होतात, हे सुरुवातीलाच लक्षात घेणे जरूरी आहे... स्थितप्रज्ञ म्हणजेच 'स्थिर बुध्दीचा पुरुष'. आणि अशी 'प्रज्ञा' फक्त आणि फक्तच मनुष्य प्राण्यात असू शकते. इतर योनीत ही 'बुध्दी' 'देहभावापुरतीच' मर्यादीत असते... ती 'आत्मभावात' कधीही जात नाही.)

देखैं अखंडित प्रसन्नता| आथी जेथ चित्ता| तेथ रिगणें नाहीं समस्तां| संसारदुःखां ||३३८||
जैसा अमृताचा निर्झरु| प्रसवे जयाचा जठरु| तया क्षुधेतृषेचा अडदरु| कहींचि नाहीं ||३३९||
तैसें हृदय प्रसन्न होये| तरी दुःख कैचें कें आहे ? | तेथ आपैसी बुद्धि राहे| परमात्मरूपीं ||३४०||
जैसा निर्वातीचा दीपु| सर्वथा नेणें कंपु| तैसा स्थिरबुद्धि स्वस्वरूपु| योगयुक्तु ||३४१||

अखंड्..कधीही 'खंड' न पावणारी चित्ताची प्रसन्नता असलेला.. समस्त संसार सुख-दु:खा पासून चित्ताची अलिप्तता असणारा.. जठरामधे सतत अमृत स्त्रवत असल्यामूळे ज्याला 'क्षुधा-तृष्णा' याची जाणिवच होत नाही अशा स्थितीतील पुरुषाची बुध्दी ही 'आत्मस्वरुपात' आपोआप मिसळते.. जसे की एखाद्या निर्वात ठि़काणी ठेवलेला..सर्वथा न कंप पावणारा दिपच जणू! अशा आत्मस्वरूपात मिसळलेल्या बुध्दीच्या पुरुषालाच 'स्थितप्रज्ञ' असे म्हणतात... आणि हाच श्रीभगवंताना पाहीजे असणारा 'योग' आहे!

देखैं कूर्म जियापरी| उवाइला अवेव पसरी| ना तरी इच्छावशें आवरी| आपणपेंचि ||३५२||
तैसीं इंद्रियें आपैतीं होती| जयाचें म्हणितलें करिती| तयाची प्रज्ञा जाण स्थिती| पातली असे ||३५३||

अशा 'प्रज्ञावंत' पुरूषाची स्व-इंद्रिये .. कासव जसे आपले अवयव आपल्या इच्छेनुसार आवरते.. तशी स्व-स्वाधीन असतात.

ऐसा आत्मबोधें तोषला| जो परमानंदें पोखला| तोचि स्थिरप्रज्ञु भला| वोळख तूं ||३६६||
तो अहंकारातें दंडुनी| सकळ कामु सांडोनी| विचरे विश्व होऊनी| विश्वामाजीं ||३६७||

आत्मबोधाने तोषलेला..परमानंदी रमलेला.. हा स्थितप्रज्ञ.. अहंकार..कामादी चित्तवृत्ती पासून निघून.. विश्वामधे स्वतः विश्व होऊनच विचरत असतो.

अर्थात.. आपल्या भोवती असलेले 'निर्जीव' हे 'मुक्त-जीव' नाहीत! Happy

धन्यवाद!

माधव,

>>>१. मनुष्ययोनीतच मुक्ती शक्य आहे. मग जेंव्हा मनुष्य नव्हता (डार्विनच्या उत्क्रांतीवादानुसार) तेंव्हा जीवांना मुक्ती कशी मिळत असे? आणि समजा काही कारणाने मनुष्य जमात नाहिशी झाली तर इतर जीवांना मुक्ती कशी मिळेल?

>>>२. मुक्ती मिळालेल्या जीवाची स्थीतप्रज्ञता अखंड टिकून असते. मग आपल्या भोवती असलेले निर्जीव हे मुक्त जीव आहेत का - सगळ्या वासना जाळून साक्षी भावाने रहाणारे?

...मनुष्ययोनीतच मुक्ती शक्य आहे..मुक्ती मिळालेल्या जीवाची स्थीतप्रज्ञता अखंड टिकून असते...आणि
मग आपल्या भोवती असलेले निर्जीव हे मुक्त जीव आहेत का?

याचा विचार करताना...प्रज्ञा स्थिर झाल्यामूळे... तो मनुष्य 'मुक्त' होतो असा क्रम आहे!

म्हणजे 'जन्म' मनुष्याचाच पाहीजे हे प्रथम..मग श्रीभगवंतानी सांगितलेला 'योग' याच जन्मात साधल्यामूळेच..त्याची स्थूलात-दृष्यात रमणारी बुध्दि स्थिर होते,चित्त वासनारहीत होते आणि तो या जन्म-मरण द्वंद्वातून देहातीत होतो. Happy

'जन्म' मनुष्याचाच पाहीजे हे प्रथम >> म्हणूनच तर माझा प्रश्ण होता की -- "मनुष्ययोनीतच मुक्ती शक्य आहे. मग जेंव्हा मनुष्य नव्हता (डार्विनच्या उत्क्रांतीवादानुसार) तेंव्हा जीवांना मुक्ती कशी मिळत असे? आणि समजा काही कारणाने मनुष्य जमात नाहिशी झाली तर इतर जीवांना मुक्ती कशी मिळेल?" कारण तेंव्हा मनुष्य जमातच अस्तित्वात नव्हती/नसेल.

माधव, आपण फक्त आपल्या पृथ्वीचा रेफरंस घेऊन बोललो तर सद्ध्यातरी मनुष्यच कर्मस्वातंत्र्य असलेला प्राणी आहे व त्याचीच बुद्धी कर्मस्वातंत्र्याचा वापर करण्याजोगी प्रगत आहे.

कदाचित ब्रह्मांडात आपल्याला माहित नसलेले असे कितीतरी ग्रह असतील ज्यावर मनुष्यासारखे किंवा त्याहूनही अधीक प्रगत जीव असतील. ही तर अधिक उत्क्रांत अवस्था असेल. कर्मस्वातंत्र्य / प्रारब्ध तोडणे / मुक्ती यांचा अन्योन्य संबंध आहे तर ही संधी मनुष्य व त्यापुढे अजून उत्क्रांत झालेले जीव यांना मिळू शकते. आणि अशी कितीतरी ब्रह्मांडं असतील.

कधी कधी विचार करत बसलं की असाही विचार मनात येतो की आजचा इथला एका कोटीचा (लेव्हलचा) प्राणि त्याच्या मृत्यूनंतर कदाचित त्या दुसर्‍या ग्रहावरही जन्म घेत असेल अजून दुसर्‍या कुठल्यातरी योनीत. मग जी पृथ्वी तरुण असेल तिच्यावर फक्त उत्क्रांतीच्या सुरुवातीच्या अवस्थेतील जीव असतील आणि दुसर्‍या कुठल्यातरी जास्त वयाच्या पृथ्वीवर खूप उच्च अवस्थेतील जीव असतील. इथले जीव भोग भोगून पुढच्या स्टेपसाठी अजून कुठे जन्म घेत असतील.

हे विचार कदाचित येडचॅपसारखे असतील पण माझ्या मनात येतात ते. आणि सतत जीवांचा मोक्षमार्ग्/मुक्तीमार्ग मोकळा करत रहाणार्‍या अनंतकोटी ब्रह्मांडनायकाला हे खेळ करणं अगदी सोप्पं आहे ना?

चु.भु.द्या.घ्या.

माधव!

मुद्दामच आपला 'दुसरा' प्रश्न पहील्यांदा घेतला, कारण हे प्रश्न एकमेकाच्या संबधीत आहेत.

२. मुक्ती मिळालेल्या जीवाची स्थीतप्रज्ञता अखंड टिकून असते. मग आपल्या भोवती असलेले निर्जीव हे मुक्त जीव आहेत का - सगळ्या वासना जाळून साक्षी भावाने रहाणारे?

याबाबत आता आपले मत काय आहे?

अश्विनी Happy मी पण अगदी हेच विचार करतो कधी कधी.

पण मग असे असेल तर कुठे तरी पुसटसा तरी तसा उल्लेख हवा.

पण जीथे व्यक्त जगच १५-१६% आहे तिथे माझ्या ज्ञानाला खूपच मर्यादा येतात तेंव्हा ज्ञान मिळवण्याची दृष्टीकोण बदलला पाहिजे.

पण मग असे असेल तर कुठे तरी पुसटसा तरी तसा उल्लेख हवा. >>> सद्गुरु / परमात्मा / परमेश्वर यांचा अनंतकोटीब्रह्मांडनायक हा उल्लेख पुरेसा वाटतो मला. जसजसं विज्ञान प्रगत होत जातंय तसतसं विश्व जवळ येत चाललंय असं आपण म्हणतो ना? त्यामुळे जे अव्यक्त आहे त्यातलं थोडंबहुत तरी व्यक्त होईलच "त्या"ने देऊ केलेल्या बुद्धीच्या वरदानामुळे. आज ना उद्या (कदाचित आपल्या या जन्मात शक्य नसेल) सजिवांचे वास्तव्य असलेल्या विविध वयाच्या ग्रहांचा शोध लागेल. कदाचित आज जी सुजलाम सुफलाम वसुंधरा आपण बघतो ती उद्या एखाद्या वैराण निर्मनुष्य्/निर्जीव ग्रहासारखी असेल.

सावट,

१. ह्या चराचरात 'तो' भरलेला आहे. - गृहितक
२. म्हणजे तो निर्जीवातही आहे
३. निर्जीव 'आहे' ह्या साक्षीभावाने रहातात म्हणजे त्यांच्यावर मायेचा अंमल नाही. म्हणजे ते मायेने बनलेल्या ह्या जगात रहातात पण तिच्यापासून ते अलिप्त आहेत.
४. मायेच्या अंमलाखाली नसणे = मुक्त असणे

Happy

माधव,

निर्जीव पेक्षा जड (वजनाने नव्हे Proud ) म्हणूया का? परमात्म्याच्या त्रिगुणांपैकी तम गुणांपासून जड तत्व तयार झाले आहे. जड तत्वामधे महाप्रज्ञा आणि महाप्राणाचे कार्य शून्य असते त्यामुळे तिथे ना मुक्तीच्या दिशेने प्रगती ना अधोगती Happy

अश्विनी माझ्या प्रश्नाचे उत्तर द्या ना Happy (मि वरती प्रश्न विचारला आहे आणि सावट यांनी तुम्हाला उत्तर द्यायला सांगितले आहे वरती पोस्ट पहा )

माधव
नाही तो उपासनेशि संगतच आहे (जसे हवेबरोबर सुंगध आणि ईतर घटक ही येतात ) तसचं उपासना मोक्षासाठी असेल तर जन्म , कर्म , त्याची फळे हे आलचं उलट मला अमुल्य माहिती मिळते आणि माझ्या
ज्ञानात भर पडते त्याबद्दल तुमचे , अश्विनी , सावट यांना धन्यवाद Happy

Pages