उपासना

Submitted by हसरी on 3 February, 2010 - 23:00

उपासना कशी करावी?
कोणत्या देवतेची उपासना कशी करावी याची सविस्तर माहिती द्या?

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

संचित तैशी बुध्दी उपजे मनामधीं | सांगितलें सिद्धि नव जाय || १ ||
ज्याचा जैसा ठेवा तो त्यापाशीं धांवे | न लगती करावे उपदेश || २ ||
घेऊन उठती आपुलाले गुण | भविष्याप्रमाणें तुका म्हणे || तु.गा. ४३५८.३ ||

संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या सारखे 'आत्मज्ञानी' संत आपल्याला श्रीभगवंतापर्यंत पोहचवणार्‍या 'बुध्दी' विषयी काय म्हणतात ते पहाण्यासारखे आहे.

मागे आपण पाहील्याप्रमाणे, आपल्याला जन्मत:च ज्या वैयक्तिक बुध्दिचा आपल्याला लाभ होतो, ती आपल्याला आपल्याच गत कर्मानुसार लाभते. हा फार मोठा 'सिंध्दांत' आहे. म्हणजेच आपली बुध्दी ही आपल्याच गत कर्मानुसारी चालते, संचिताप्रमाणे चालते त्यामुळेच आपल्याला 'श्रीसंतानी' जे सांगितले, ते आपल्या 'सिध्दीस' जात नाही, आपल्याला कळत-वळत नाही.

आपण मागे 'वांग्याच्या भाजी.. एखाद्याला आवडते आणि एखाद्याला आवडत नाही', हे उदाहरण पाहीले आता ही 'आवड' आपण ठरवून करतो का? तर नाही! ती जन्मत:च असते. आपल्या सक्षम असणार्‍या बुध्दीला हे कळते की ही आपली 'आवड-निवड' या मध्ये वांग्याचा काही दोष नाही. पण असे असतानाही..बुध्दीचा निर्णय झाला असतानाही ...आपल्याला न आवडणारी भाजी आवडायला लागते का? किंवा आवडणारी भाजी आपण खायचे सोडतो का? नाही!अस का व्हाव? कारण हे कळाल तरी चित्तामधील गत जन्मानुसार असणार्‍या 'वासना' अजून असतातच. नुसत बुध्दीला कळून आपली आवड काही बदलत नाही, आपला स्वभाव काही बदलत नाही, आपण योग्य वेळ येताच मागचेच उगाळत बसतो.

'तत्वचिंतक' आणि 'तत्वज्ञानी' संत यांच्यात एक महत्त्वाचा फरक आहे. 'तत्वचिंतक' आवड-निवड' ..त्याचे कारण समजावून घेऊन ..स्वतःच्या बुध्दीला तात्पुरते पटवून तेथेच थांबतो..तर 'तत्वज्ञानी' हा आवड आणि निवडीच्या पलीकडची अवस्था अनुभवत असतो. म्हणूनच आपण कायम 'तत्वज्ञानी संत' काय सांगतात हेच ऐकल पाहीजे.

नाहीतर आपली अवस्था फार विचित्र होते. एका बाजूला आपण म्हणतो, आपला जन्म आपल्याच प्रारब्धानुसार मिळतो.. ते भोगलच पाहीजे..परत आपणच म्हणतो की श्री भगवंत आपल्यावर कधीही अन्याय करत नाहीत,आणि दुसर्‍या बाजूला सकाळी उठून वर्तमानपत्र वाचन किती जरूरी हे आपण दुसर्‍याला पटवून सांगत बसतो, आपल्या मागण्यांचा पाढाच श्रीभगवंतापूढे आयुष्यभर वाचत असतो...आपला कारभार सगळाच 'संशयाने' भरलेला असतो.

आपली अस्थिर'बुध्दी' म्हणते एक आणि 'मन' दुसरेच करते.

म्हणूनच 'तत्वज्ञानी' संत म्हणतात..

ज्याचा जैसा ठेवा तो त्यापाशीं धांवे | न लगती करावे उपदेश || २ ||

ज्या वासना-ठेवा आपण जन्मोजन्मी साठवलेला असेल, त्याच्याकडेच 'मन' धाव घेत आणि तेच करत्..त्याकरीता कोणत्याही बाह्य उपदेशाची आपल्याला 'गरजच' पडत नाही.

घेऊन उठती आपुलाले गुण | भविष्याप्रमाणें तुका म्हणे || तु.गा. ४३५८.३ ||

सगळेजण आपापले गुण-दूर्गुण आपल्याच गत-कर्माप्रमाणे म्हणजेच भविष्याप्रमाणे घेऊन येतो.

यातून जर सुटायचे असेल तर्...जर आपली 'बुध्दी', स्थिर-प्रज्ञेत रुपांतरीत करायची असेल तर अगोदर आपल्याला आपल्या 'मनाकडे' लक्ष द्यावे लागेल.

श्रीभगवंतानी जे स्वतःभगवंतानी आपल्या मुखाने आपल्याला सांगितले आहे, तेच 'सत्य' आहे. बाकी सगळे दृष्यावर आधारलेले..'असत्य'!:)

माधव,

पूर्वपक्ष-
>>>
१. ह्या चराचरात 'तो' भरलेला आहे. - गृहितक
२. म्हणजे तो निर्जीवातही आहे
३. निर्जीव 'आहे' ह्या साक्षीभावाने रहातात म्हणजे त्यांच्यावर मायेचा अंमल नाही. म्हणजे ते मायेने बनलेल्या ह्या जगात रहातात पण तिच्यापासून ते अलिप्त आहेत.
४. मायेच्या अंमलाखाली नसणे = मुक्त असणे

उत्तरपक्ष(सिंध्दांत)- Happy
सर्वसाक्षीभाव (सर्व खल्विदं ब्रह्मा) हा 'मी म्हणजे देह' या गृहीतकातून पुढे जावून मनुष्य देहात असतानाच 'मी म्हणजे आत्मा' (अहं ब्रह्मास्मि)या गृहीतकापर्यंत पोहचल्यानंतरच प्राप्त होतो..! त्याच्या अगोदर नाही आणि त्याच्या नंतरही नाही!:)

जे जे दृष्य आहे.. ते ते सगळे 'मूळमायेच्या' अमलाखालीच येते. 'मूळब्रह्म' हेच फक्त मायेच्या पसार्‍याच्या पलीकडचे. म्हणूनच 'ते' ब्रम्ह म्हणजे 'मी'च, ही प्रथम अवस्था ही मायेच्या अमंलाखाली येत नाही.

म्हणूनच मायेच्या अंमलापलीकडे गेलेले संत आणि त्यांचे सांगणे.. मायेच्या अंमलाखाली असणार्‍या आपल्याला ओळखू येत नाहीत.( हे कळण फार महत्त्वाचे आहे. )

आपण सगळे सजीव-निर्जीव त्या परमेश्वराचा 'अंश' आहोत हे 'सत्य' आहे, पण म्हणून आपला 'अंश' परमेश्वरात आहे असे शास्त्र म्हणत नाही..जसे अग्निपासून धूर होतो..पण धूरात अग्नि आहे,असे म्हणता येत नाही किंवा लाकडात अग्नि असतो हे बरोबर्..दोन लाकडे एकमेकाना घासल्यावर मुळचाच अव्यक्त 'अग्नि' व्यक्त होतो..पण म्हणून अग्नित लाकूड आहे असे म्हणता येत नाही... अग्नित लाकूड टाकलेकी 'अग्नी' आहे तसाच रहातो..पण लाकडाचे 'स्वरूप' आमुलाग्र बदलते.

याकरीताच 'मायेचा अंमल' म्हणजे काय हे पहाणे जरूरी आहे.:)

>>>
२. मुक्ती मिळालेल्या जीवाची स्थीतप्रज्ञता अखंड टिकून असते. मग आपल्या भोवती असलेले निर्जीव हे मुक्त जीव आहेत का - सगळ्या वासना जाळून साक्षी भावाने रहाणारे?

याबाबत आता आपले मत काय आहे?:)

आणि आता..

>>>१. मनुष्ययोनीतच मुक्ती शक्य आहे. मग जेंव्हा मनुष्य नव्हता (डार्विनच्या उत्क्रांतीवादानुसार) तेंव्हा जीवांना मुक्ती कशी मिळत असे? आणि समजा काही कारणाने मनुष्य जमात नाहिशी झाली तर इतर जीवांना मुक्ती कशी मिळेल?

याविषयी ही आपले मत काय आहे?:)

धन्यवाद!

पण मग असे असेल तर कुठे तरी पुसटसा तरी तसा उल्लेख हवा.
>> माधव माझे आजोबा असे काही रेफरन्सेस सांगायचे (पृथ्वीबाहेरचं जीवन - भारतीय अध्यात्म ह्या दृष्टीकोणातून)... आता मी नावासकट सांगू शकत नाहीये.. आणि आजोबा नसल्यानं त्यांना विचारूही शकत नाही Sad

अश्विनी, अगदी छान बोललीस, हेच मागे मला महेश देशपांड्यांनीही समजावून सांगितलेलं..

परवा युनिव्हर्स आणि ब्लॅकहोल्स वरची डॉक्युमेंटरी बघत होते - स्टिफन हॉकिंग वगैरे मंडळी होती..
त्यात एक शास्त्रज्ञ सांगत होता - 'गेले ३८ वर्ष आम्ही आमच्या रेडिओ दुर्बिणी रोखून बाहेरच्या इन्टेलिजन्ट बिईंग्ज नी सिग्नल पाठवण्याची वाट बघतोय- पण आत्ता पर्यंत काहीच हातात नाही आलं.. who knows - कदाचित ते रेडिओ सिग्नल्स असल्या प्रिमिर्टिव्ह स्वरुपात सिग्नल पाठवतच नसतील...."
ह्या वाक्यानंतर अश्विनी म्हणाली तसंच सगळं मला जाणवलं..

आपण असं का अझ्युम करतोय की लाईफ ह्याच फॉर्म मधे असतं? ते कार्बनच बनलेलं असायला पाहिजे वगैरे..
आणि जर आपल्यामधे कॉन्शसनेस असू शकतो तर आपल्याला स्थिर भासणार्‍या गोष्टींमधे कॉन्शसनेस नसेल कशावरून?

नमस्कार मंडळी,
व्यग्रतेमुळे इकडे फिरकू शकलो नाही. आज येऊन पाहिले तर एकदम ४५ नविन लेख आलेले.
भराभर सर्व वाचून काढले. समजायला वेळ लागणार आहे. त्यामुळे आत्ता लगेच काही लिहिणार नाही.
साधनेत सद्गुरूची आवश्यकता याबाबत दुमत नाही. पण कोण केव्हा कुठे भेटणार हे कसे कळेल ?

महेश,
मला असं वाटतं की, सद्गुरु कोण कुठे केव्हा भेटणार हे कळणं खूप अवघड आहे. जर सुदैवाने कुणी अधिकारी व्यक्ति संपर्कात आल्यास अन् तिने याबद्द्ल काही मार्गदर्शन केल्यासच हे समजते अन्यथा नाही. तोपर्यंत ज्या परमेश्वरी रुपाची साधना/उपासना चालू असेल त्याच रुपाला आपला सद्गुरू मानून त्याच्याशीच संवाद करणे उचित ठरेल. तेच रूप तुम्हांला तुमच्या सद्गुरूकडे घेऊन जाते.
जाणकारांनी अधिक प्रकाश टाकावा.

अश्विनी, सावट, महेश देशपांडे
आपले सद्गगुरुंबद्द्ल विचार वाचायला आवडतील.

मलाही एक प्रश्न पडला आहे, आपण गुरुचे शिष्यत्व घेतो की गुरु आपल्याला शिष्यत्वाची दिक्षा देतात?

एखाद्या व्यक्तीचे विचार पटल्याले, ते अंगिकारणे, अंगी बाणवणे हे आपण करु..त्याने आपला प्रवास ही योग्य दिशेने व्हायला लागेल, पण एवढ्याने मला गुरु भेटले असे म्हणता येईल का?

सावट,
आणखीन एक प्रश्न. खुप त्रास देतोय ना आम्ही वेगवेगळे प्रश्न विचारुन? तरीही विचारते Happy

जेव्हा ८४ लक्ष योनींनंतर मनुष्याचा जन्म मिळतो, तेव्हा त्याच्या संचित, प्रारब्ध कर्मांची पाटी कोरी असते का? कारण बाकी योनीत कर्मांची उत्पत्तीच होत नाहि.

सद्गुरुतत्व हे एकच असतं. त्याची रुपं अनेक असू शकतात.
गुरु हे आपण जी जन्मजात पुंजी घेऊन येतो तिला ओळखायला वाढवायला शिकवतात तर सद्गुरु हे आत्मरुपाचे भान आणतात.

महेश देशपांडेंनी म्हटल्याप्रमाणे, आपल्याला ज्ञात परमात्मरुपाची उपासना चालू ठेवावी. योग्य वेळी योग्य ते रुप आपोआप आपल्या समोर येतं. तुम्ही शोधात निघायची पण गरज नसते. कुठल्या ना कुठल्या कारणाने ते समोर येतं. त्याची आपल्या अंतरी खूण पटते, तिथे आपल्याला अकारण प्रसन्नता वाटते, तिथे आपल्याला विसावा मिळतो व तेच आपले स्थान असते.

सद्गुरु आपल्या समोर आले अन् आपण त्यांना आपले सद्गुरु मानले की बास आहे. सदगुरुंनी आपल्याला कानमंत्र द्यायची आवश्यकता नसते कारण ते सदैव त्यांचा खजिना आपल्यासाठी खुला ठेवून असतात. आपण तो लुटायची आपली तयारी पाहिजे. त्यांचा खजिना कधी रिकामा होत नाही कारण ते जेवढं आपल्याला देतात त्याहून जास्त ती आदिमात व दत्तगुरु त्यांना पुरवत असतात.

श्री गजानन विजय मधे कान फुंकणे व दिक्षा देणे याबद्दल कथा आहे व त्यात स्वतः गजानन महाराजांनी भक्ताचे विचलीत मन स्थिर करुन दिले आहे.

आता स्वामी, महाराज, साई देहात नाहीत पण जर तुम्हाला त्यांच्या ठायी तुमचं विसाव्याचं स्थान मिळालं तर ते कसे येऊन तुमचे कान फुंकणार किंवा दिक्षा देणार? शक्यच नाही ना? पण तरीही ते तुमच्या पाठीशी उभे रहाणारच आहेत.

तसेच आपल्या मूलाधारचक्राच्या चार पाकळ्या आहार, विहार, आचार, विचार या जेवढ्या शुद्ध व उपासनांमधे जेवढे सातत्य त्याप्रमाणे आपल्याला खरे सद्गुरु भेटतात. जर आपण कुणाला फसवत असू आणि एकीकडे गुरु शोधत असू तर तो कलीपुरुष आपलं काम चोख बजावतो आणि आपली भोंदू माणसाशी गाठ घालून देतो व आपली फसवणूक होते.

पण तुम्हाला खरे सद्गुरु भेटले व तुम्ही त्यांना लबाड, कठोर/क्रूर अशी विशेषणे लावली व त्याच संशयाने बघत राहीलात तर ते तुम्हाला ते तसेच लबाड व कठोर असल्याचे अधिकाधिक पुरावे देतात. कारण जगातील सगळी लबाडी एकत्र केली तरी त्याहूनही जास्त लबाड तो श्रीहरि आहे. सगळी कठोरता एकत्र केली तरी त्याहूनही अधिक कठोर तोच आहे. तुम्ही त्यांच्यावर प्रेम केलंत तर ते हजारो पटीने तुमच्यावर करतात. पण त्यांना लबाड वगैरे म्हणत असाल तर त्यांनी तुमची जबाबदारी का घ्यावी. ते तर थँक्यूच म्हणतील कारण त्यांना नसत्या जबाबदार्‍या घेण्यापेक्षा खर्‍या श्रद्धावानांसाठी राबणं आवडेल.

स्वामीसमर्थांशी लबाडीने वागणार्‍या सुंदराबाईला सुद्धा स्वामींनी असाच धडा शिकवला होता. तिच्या मानसिक पातळीवर तिने स्वामींचं स्थान सहज साध्य असं करुन ठेवलं होतं. अतिपरिचयात अवज्ञा अशी अवस्था झाली होती.

-----

जेव्हा ८४ लक्ष योनींनंतर मनुष्याचा जन्म मिळतो, तेव्हा त्याच्या संचित, प्रारब्ध कर्मांची पाटी कोरी असते का? कारण बाकी योनीत कर्मांची उत्पत्तीच होत नाहि. >>>>

असं नसावं. जेव्हा भोगयोनीतून प्रवास करत करत प्रारब्ध एका लेव्हलपर्यंत कमी होतं तेव्हा मनुष्यजन्म देऊन ते पुर्ण तोडायची (म्हणजेच सत्कर्म करायची) संधी दिली जाते. त्या जोडीला जर श्रद्धा भक्ती असेल तर हे काम अतिशय सोपं होऊन जातं. यासाठी मी कुठेतरी दगडधोंड्यांनी भरलेल्या पिंपाचं उदाहरण दिलं होतं.

हे सगळं सांगण्याची मी खरंच अधिकारी नाही पण जे माहित आहे तेवढे सांगते आहे. माझ्या अज्ञानीपणामुळे माझ्याकडून काही अधिक उणे बोलले लिहिले जात असेल तर मी त्या परमात्म्याजवळ त्या बद्दल शिक्षा मागून दोषातून मुक्तता मागते.

इदं न मम | इदं गुरुदत्तस्य |

मनुष्ययोनीतच मुक्ती शक्य आहे. मग जेंव्हा मनुष्य नव्हता (डार्विनच्या उत्क्रांतीवादानुसार) तेंव्हा जीवांना मुक्ती कशी मिळत असे? आणि समजा काही कारणाने मनुष्य जमात नाहिशी झाली तर इतर जीवांना मुक्ती कशी मिळेल?

मलादेखील हाच प्रश्न वारंवार पडतो... मुळात हिन्दु धर्म हा एक्जिनसी (होमोजिनस- एका माणसाने लिहिलेला/तयार केलेला धर्म) नाही... वैदिक आणि अवैदिक असे दोन प्रवाह पूर्वी होते. खरे तर हे दोन्/अनेक धर्म होते.... कालांतराने सगळेच एकमेकात मिसळले... आज कशा कशाचा ताळमेळ लागत नाही....

वैदिक लोक हे मुळात माणूस असले तरी प्राणी/वनस्पती यांच्यापेक्षा आपण फार वेगळे आहोत असा त्यांचा अट्टाहास नव्हता....वेदात अनेक ठिकाणी प्राणी/गायी/घोडे/वनस्पती यानादेखील आपलाच भाग मानलेले आहे..... किती तरी ठिकाणी रुपक म्हणून त्यांचा आधार घेतलेला आहे... आणि त्याचमुळे तर गृहस्थाश्रमानंतर वान आणि संन्यासाश्रम ही प्रथा होती...
वैदिक म्हणजे ऋग्वेद्,सामवेद, यजु. प्रथेत मूर्तीपूजा नव्हती.. आजही इंद्र, वरुण, मरुत, सविता, सोम, रुद्र (म्हणजे शंकर नव्हे... तो वेगळा, हा वेगळा) , आश्विनी, अग्नी , सूर्य , प्रजापती (म्हणजे ब्रह्मा नव्हे... हे समीकरण नंतर जोडले गेले) अशा वैद्क देवतांची मंदिरे नाहीत. त्यांची तीर्थक्षेत्रे नाहीत... वेदात जन्ममरणाचा फेरा, मुक्ती या संकल्पना नाहीत... ( असे मी कुठेतरी वाचलेले आहे.. ऋग्वेद पूर्ण मी वाचलेला नाही... भाशांतर थोडे थोडे वाचत आहे..)

जन्म मरण, फेरा, मुक्ती या संकप्लना अवैदिक आहेत... ज्यात प्रामुख्याने शैव धर्म होता.. गणपती, कार्तिक, शक्ती, ब्रह्मदेव.... अशा अनेक मूर्तीपूजक धर्मांचे हे कॉमन तत्वज्ञान होते... अथर्ववेदाच्या काळात वैदिक आणि हे अवैदिक भाग एकत्र झालेले आहेत.. म्हणून पूर्वी अथर्ववेदाला वेद मानत नव्हते... पूर्वी वेद त्रयी ही कल्पना होती.. नंतर चतुर्वेद आले... आणि मग ब्रह्मदेवाच्या ४ मुखाचा संदर्भ त्याला मिळाला.... आणि अशा प्रकारे सगळेच एकमेकात मिसळले.त्रिदेव, दत्तगुरु हे सर्वच संप्रदाय असे हळू हळू तयार झाले... पण जन्म्-मरण, आत्मा-परमात्मा, फेरा, मुक्ती हे सगळ्यात कॉमन आहे... .. वेदांत तत्वज्ञान हेही प्रामुख्याने अशाच संकल्पनांवर आहे.. ऋग्वेदावर आधारीत उपनिषदे अगदी अल्प आहेत.. उरलेली सगळीच्या सगळी ही अथर्वेदाशी जोडलेली आहेत...

कृपया यात चुका असतील तर त्या जाणकारानी दुरुस्त कराव्यात... अनेक पुस्तकांमधून संदर्भ काढून मी ही माहिती गोळा केलेली आहे... आजचा हिंदु धर्म हा खरे तर अवैदिक गोष्टीच जास्त मानतो.. वेदांचा संदर्भ फक्त काही ठिकाणी मंत्र म्हणून वापरणे, एवढाच उरलेला आहे...

तो वर जो प्रश्न लिहिलेला आहे, तोच मला २ वर्षापूर्वी पडला होता.. म्हणून मग सगळा इतिहास उकरत बसलो होतो. अजुनही उकरत आहे... या सगळ्यात शेवटी माझ्या लक्षात आले की आपल्याला मनुष्य्-प्राणी यांच्या सीमा रेषेवर मनुष्य असताना तो काय करत होता? याचे उत्तर हवे आहे... आणि मग कळले, अरे म्हणजे ऋग्वेदच की!! Proud दोन वर्षे गावभर पुस्तके हुडकून वाचली आणि मग कळले उत्तर घरातच आहे.... Proud आमचे ऋग्वेदी घराणे आहे.. पणजोबाना राष्ट्रपतीकडून पारितोषिक मिळाले होते.. ऋग्वेदासाठी... त्याना कांची. श्रूंगेरी, संकेश्वर अशा तीन शंकराचार्यांकडून महामहोपाध्याय, वैदिक चुडामणी, स्मृतीसागर, अशा कितीतरी पदव्या मिळालेल्या आहेत...

मग घरचा इतिहास उकरला... (असली उकराउकरी करायला आपल्याला वाईट वाटत नाही.. याबाबतीत 'सर रॉबर्ट लँग्टन ' आपले गुरुजी आहेत. Proud ) पणजोबांच्या पूर्वीचेही सगळे घनपाठीच होते.. ते वैदिक पाठशाळाही चालवायचे म्हणे... आमचे पणजोबा या श्रेणीतील शेवटचे ठरले.. आजोबांचा काही काळ त्यांच्याबरोबर गेला... पण माझी पिढी आणि मागची पिढी हे मात्र वेदापासून लांब गेलेले आहे...

अश्विनी,

छान सांगितले आहे..अनेक धन्यवाद!:)

जा'मोहन'प्या,
अगदी योग्य वेळी लिहलेत! धन्यवाद.

खर सांगायच तुमच्या मनातला हा 'विचार' अगोदरच ल़क्षात आला होता.. कसे म्हणाल, तर खालील प्रमाणे..

माधव म्हणतात..

>>>मनुष्ययोनीतच मुक्ती शक्य आहे. मग जेंव्हा मनुष्य नव्हता (डार्विनच्या उत्क्रांतीवादानुसार) तेंव्हा जीवांना मुक्ती कशी मिळत असे? आणि समजा काही कारणाने मनुष्य जमात नाहिशी झाली तर इतर जीवांना मुक्ती कशी मिळेल?

आणि तुम्ही मागे लिहले की...

>>>म्हणुनच मानवांपेक्षा इतर जन्म/योनी हे मला नेहमीच अध्यात्मिक पातळीवर वरच्या स्तरावरचे वाटतात.. ( माझ्या या विचाराला सगळेच माझे मित्र विरोध करतात... पण मला माझे मत नेहमी खरेच वाटते.. ) मनुष्य ही या उच्च पातळीवरुन ढळलेली अवस्था आहे... आणि ही ढळलेली अवस्था असते, म्हणूनच तर धर्म, देव, उपासना यांची गरज आपल्याला असते... त्याना नसते!!! Happy ... आता, हे सगळे उपचार करण्यासाठी आपल्याला इंद्रिये, मन ई आहे, हे निसर्गाने आप्ल्यावर केलेले उपकार आहेत. पण म्हणून आपण इतरांपेक्षा श्रेष्ठ ठरत नाही.....

हे दोन्ही 'विचार' एकमेकास पूरक आहेत असे आपल्याला वाटते काय? हे कृपया सांगावे.

होय... हे दोन्ही विचार एकाच विचारप्रवाहाचे भाग आहेत... आणि हा प्रवाह ऋग्वेदाशी जोडणारा आहे.

चला, श्रीसद्गुरू या विषयी सगळ्यांचे मत गोळा करूयात...:)

हसरी,
१)मि असं ऐकले आहे कि कोणती हि उपासना किंवा मंत्र गुरुकडुन घ्यावा मग ती पुर्ण होते? जाणकरांनी माहिती द्या.
२)आपल्याला गुरु मिळेपर्यत आपला मार्ग बरोबर आहे हे कसं समजायचं आपला गुरु कसा ओळखायचा?

माधव,
१)आता कोणता मार्ग निवडायचा हे बर्‍याचदा आपल्याला कळत नाही. कधी कधी मार्ग बदलायचा असतो किंवा एकापेक्षा अधिक मार्गांवरून चालायचे असते. हे कळण्याकरता गुरु लागतो. पण हो त्याला शोधण्यात वेळ दवडू नका. योग्य वेळ आली किंवा तुमची प्राथमिक तयारी झाली की तोच तुमच्या पर्यंत येईल

२)मायेच्या आतच आपल्या आत्ताच्या जागेपासून जवळच एक स्टेशन आहे. बास तिथपर्यंत पोहचलो की झाले. तिकडे सद्गुरु उभे आहेत आपल्याला घ्यायला. मग पुढचा बहुतेक प्रवास त्यांच्याकडे असलेल्या ultrasound submarine ने करायचा.

३)एक रुतून बसलेले वाक्य - quantity leads to quality इतके नाम घ्या की नामचा अर्थ कळण्याची सद्गुरुकृपा होइल. मग पुढे qualityच असेल.
४)जेंव्हा सद्गुरूंचे मार्गदर्शन नसते तेंव्हा स्वतःच्या सारासार विवेकबुध्दीवर सगळी भिस्त ठेऊन चालावे लागते.

५)आता सांगा असा सद्गुरु मिळण्यासाठी (किंवा लौकरात लौकर मिळण्यासाठी) काय केले पाहिजे?

महेश,
१)खरेतर गुरूच्या आवश्यकतेबद्दल शंका घेण्याचे कारण नाही,
पण प्रश्न अशासाठी विचारला की आजकाल आजुबाजुला अनेक गुरू (?) उदयाला येत आहेत,
त्यामुळे ज्यांना साधनेची इच्छा असते, त्यांना खरे कोण हे कळत नाही.

२)काही लोक अगदी नास्तिक नसतात, पण त्यांचा स्वभाव तर्कावर तपासून घेणे, बुद्धिला पटले तरच मान्य करणे असा असतो. असे लोक कोणालाही सहसा भावनिक, बौद्धिक शरण जायला तयार नसतात.
पण साधनेत तर गुरूला शरण जाणे आवश्यक असते असे म्हणतात, मग अशा लोकांना गुरू भेटणारच नाही का ?
की त्यांना गुरूची आवश्यकताच पडणार नाही ?

३)साधनेत सद्गुरूची आवश्यकता याबाबत दुमत नाही. पण कोण केव्हा कुठे भेटणार हे कसे कळेल ?

नानबा,
१)तुमच्या मुळ मुद्द्याला माझा काही विरोध नाही (की गुरु श्रेष्ठ) पण प्रत्येक गोष्ट, प्रत्येक उदाहरण तर्कावर घासल्याशिवाय स्विकारणं जरा अवघड जातं मला - तुमच्या भाषेतच म्हणायचं तर विकल्प म्हणा ना!

गौरी,
१)जे करतोय ते पूर्ण बरोबर नसेल पण तेच सद्गुरु पर्यंत पोचवणार आहे, त्यामुळे त्याबद्द्ल मनात विकल्प येता कामा नये.

२)मलाही एक प्रश्न पडला आहे, आपण गुरुचे शिष्यत्व घेतो की गुरु आपल्याला शिष्यत्वाची दिक्षा देतात?

३)एखाद्या व्यक्तीचे विचार पटल्याले, ते अंगिकारणे, अंगी बाणवणे हे आपण करु..त्याने आपला प्रवास ही योग्य दिशेने व्हायला लागेल, पण एवढ्याने मला गुरु भेटले असे म्हणता येईल का?

जा'मोहन'प्या,
१)त्यामुळे उपासनेची दृष्टी बदलणं, हे जास्त महत्वाचे आहे. देवता, नाव, गुरु, पुस्तक, किती वेळ ... याला फारसे अर्थ नाहीत. हे फक्त वेगळेवेगळे ऑप्शन्स आहेत..

आणि

अश्विनी,
यांची आताची पोष्ट..!

किती छान माहिती आहे नाही, धन्यवाद!:)

नानबा आणि जा'मोहन'प्या आपण आपले आताचे मत कृपया सांगाल का? कारण हे आपले मत अगोदरचे आहे.

श्रीवेदाविषयी श्रीज्ञानमाउली काय म्हणते ते पाहू..

श्रीज्ञानेश्वरी,अध्याय दुसरा.. सांख्ययोग.

त्रैगुण्यविषया वेदा निस्त्रैगुण्यो भवार्जुन |
निर्द्वंद्वो नित्यसत्त्वस्थो निर्योगक्षेम आत्मवान् ||४५||

तिन्हीं गुणीं आवृत| हे वेद जाणैं निभ्रांत| म्हणौनि उपनिषदादि समस्त| सात्विक तें ||२५६||
येर रजतमात्मक| जेथ निरूपिजे कर्मादिक| जे केवळ स्वर्गसूचक| धनुर्धरा ||२५७||
म्हणौनि तूं जाण| हे सुखदुःखांसीच कारण| एथ झणें अंतःकरण| रिगों देसी ||२५८||
तूं गुणत्रयातें अव्हेरीं| मी माझें हें न करीं| एक आत्मसुख अंतरीं| विसंब झणीं ||२५९||

श्री वेदामधील 'उपनिषदे' हिच फक्त 'सात्विक' आहेत. बाकी सगळे राहीलेले सकाम-स्वर्गसूचक 'कर्मकांड' च सूचवते. ते 'सकाम' असल्यामूळे शेवटी 'सुख-दु:ख' याचे 'कारण' बनते. म्हणून या समस्त त्रिगुणांना बाजूला सारून जर 'मी' आणि 'माझे' दूर करता आले तर अंतरी 'आत्मसुख' मिळेल.(अन्यथा कदापि नाही.)

यावानर्थ उदपाने सर्वतः संप्लुतोदके |
तावान्सर्वेषु वेदेषु ब्राह्मणस्य विजानतः ||४६||


जरी वेदें बहुत बोलिलें| विविध भेद सूचिले| तऱ्ही आपण हित आपुलें| तेंचि घेपें ||२६०||
जैसा प्रगटलिया गभस्ती| अशेषही मार्ग दिसती| तरी तेतुलेहि काय चालिजती| सांगैं मज ||२६१||
कां उदकमय सकळ| जऱ्ही जाहले असें महीतळ| तरी आपण घेपें केवळ| आर्तीचिजोगें ||२६२||
तैसें ज्ञानीये जे होती| ते वेदार्थातें विवरिती| मग अपेक्षित तें स्वीकारिती| शाश्वत जें ||२६३||

श्रीवेदा मध्ये जरी विविध भेद सूचविले असले तरी त्यामधून आपण आपल्याला हिताचे असेल तेवढेच घ्यावे.
एकदा का ज्ञानसुर्याचा प्रकाश पडला की मगच सगळे स्पष्ट दिसेल. म्हणूनच जे 'ज्ञानी-विवेकी' असतात त्यांना आपण 'अज्ञानी' आहोत हे माहीत असते..म्हणूनच सुरुवातीला ते श्रीवेदार्थात विवरतात जरूर, पण जे 'शाश्वत' ज्ञान आहे, जे अपेक्षित आहे तेच स्विकारतात.

परमार्थात वावरताना कायम जवळ 'गाळणी आणि चाळणी' जवळ ठेऊन वावरावे लागते. कशाचा वापर कधी करायचा हे 'विवेकाने' ठरवावे लागते. आणि आपण गाळणी वापरत आहोत की चाळणी हे कायम लक्षात ठेवावे लागते..कारण जे 'सार' आहे ते नको ते गाळल्यानंतर खाली येते.. तर चाळणीत खाली आलेले 'असार' असते. आपल्याला 'सार' काय आणि 'असार' काय हे निवडण्यासाठी 'विवेक' उपयोगी पडतो.

धन्यवाद!

आपल्या मनात जो 'संशय' कायम ठाण मांडून बसलेला असतो..तो कधी जातो ..याविषयी श्रीसद्गुरू श्रीज्ञानेश्वरमहाराज म्हणतात..

श्रीज्ञानेश्वरी,अध्याय चवथा.. ज्ञानकर्मसंन्यासयोगः...

योगसंन्यस्तकर्माणं ज्ञानसंछिन्नसंशयम् |
आत्मवन्तं न कर्माणि निबध्नन्ति धनंजय ||४१||

म्हणौनि संशयाहूनि थोर| आणिक नाहीं पाप घोर| हा विनाशाची वागुर| प्राणियांसि ||२०२||
येणें कारणें तुवां त्यजावा| आधीं हाचि एकु जिणावा| जो ज्ञानाचिया अभावा- | माजि असे ||२०३||
जैं अज्ञानाचें गडद पडे| तैं हा बहुवस मनीं वाढे| म्हणौनि सर्वथा मार्गु मोडे| विश्वासाचा ||२०४||
हृदयीं हाचि न समाये| बुद्धीतें गिंवसूनि ठाये| तेथ संशयात्मक होये| लोकत्रय ||२०५||

आपल्या मनातला 'साधना' विषयीचा जो संशय असतो त्याच्याहून थोर असे , दूसरे घोर-पाप नाही. कारण त्या प्राण्याचा हा 'संशय' विनाश करूनच सोडतो. म्हणूनच तो सगळ्यात अगोदर 'त्यागला' पाहीजे. या संशयाचे मूळ कारण म्हणजे 'अज्ञान'--ज्ञानाचा अभाव हेच आहे. हे अज्ञान जर दूर नाही केले तर ते अज्ञान मनात वाढतच जाते, बुध्दीला व्यापून सगळेच 'संशयात्मक' दिसायला लागते.

तस्मादज्ञानसंभूतं हृत्स्थं ज्ञानासिनात्मनः |
छित्वैनं संशयं योगमातिष्ठोत्तिष्ठ भारत ||४२||

ऐसा जरी थोरावें| तरी उपायें एकें आंगवे| जरी हातीं होय बरवें| ज्ञानखड्ग ||२०६||
तरी तेणें ज्ञानशस्त्रें तिखटें| निखळु हा निवटे| मग निःशेष खता फिटे| मानसींचा ||२०७||
याकारणें पार्था| उठीं वेगीं वरौता| नाशु करोनि हृदयस्था| संशयासी ||२०८||
ऐसें सर्वज्ञाचा बापु| जो श्रीकृष्णु ज्ञानदीपु| तो म्हणतसे सकृपु| ऐकें राया ||२०९||

हा संशय समूळ जावा म्हणून एकच उपाय.... हाती 'ज्ञानखड्ग' घेणे. या ज्ञानशस्त्रानेच या हृदयस्थ संशयाचा नाश करता येतो. (अन्यथा कदापि नाही)

जरी मंत्रेंचि वैरी मरे| तरी वायां कां बांधावीं कटारें ? | रोग जाय दूधसाखरें| तरी निंब कां पियावा ? ||२२२||
तैसा मनाचा मारु न करितां| आणि इंद्रियां दुःख न देतां| एथ मोक्षु असे आयता| श्रवणाचिमाजि ||२२३||

समजा जर केवळ 'मंत्रानेच' आपला वैरी मरत असेल, तर हाती तलवार घ्यायचे 'प्रयोजन' ते काय?
जर असाध्य रोग दूध-साखरनेच जात असेल..तर कडू निंबाचा रस कोणता शहाणा घेईल?

तसेच आपल्या मनाचा मार न करता, आपल्या इंद्रियांना अजिबात न दुखावता, जर केवळ 'श्रवणानेच' मोक्ष मिळत असेल तर तो 'उपाय' न करता इतर ठिकाणी 'विवेकी' माणसाने पायपिट का करावी?

जर आपल्याला 3-D सिनेमा पहायचा असेल तर.. अगोदर तसा दृष्टी बदलणारा 'चष्मा' मिळवावा लागेल, त्याशिवाय तो '3-D Effect' कसा जाणवणार?

आता हा 'उपाय' कोणता? आणि त्यापासूनच मिळणारे--आपला संशय घालवणारे 'ज्ञान-खड्ग' कसे मिळवायचे? हे मोठे प्रश्न आहेत.:)

धन्यवाद!

ब्रंह्माडे अनंत आहेत..त्याचे काम नियमाने चालावे यासाठी नियामक मंडळेही आहेत. पण एका ब्रह्मांडातून दुसरीकडे जन्म फारच क्वचित प्रसंगी मिळतो... हे सगळे असो!

आपल्याच ब्रह्मांडाच जर विचार केला तर असे दिसून येते की आता पर्यंत तीन युगे लोटली..

१)सत्ययुग- यात मनुष्यलोक आणि देवलोक यांच्यात येणे जाणे होते..प्रसंगी युद्धाकरता मनुष्य देवलोकात जायचा.
२)त्रेतायुग- यात हे येणे जाणे थोडे कमी झाले.. देव फक्त 'यज्ञातच' हविर्भाग स्विकारण्यासाठी प्रकटू लागले.
३)द्वापारयुग- या युगात 'मंत्रांचे' प्राबल्य वाढले.. देव-मनुष्य दरी अजून वाढली.

आणि आता चालू असलेले
४)कलीयुग- यात हे येणे-जाणे पुर्ण बंद झाले.. दोन्ही बाजूनी.

आता ही वरील 'उत्क्रांती' जर अभ्यासली तर असे लक्षात येते की आपण सगळे मनुष्य प्राणीराहीलेला 'गाळ' आहोत.
याच्या पूढची गती म्हणजे...आपल्या गायब होण्याचीच आहे. म्हणजेच आपण 'उत्क्रांतीचा डार्विनचा सिंध्दांत ' एकाप्रकारे खराच करणार आहोत, असे चित्र दिसत आहे.:)

जर आपण म्हणतो की या युगात 'वैज्ञानिक प्रगती' प्रचंड होते आहे..तर ती आपलीच पाठ आपणच थोपटल्यासारखे होईल. जर आपल्या फक्त वरच्याच युगातील--द्वापारयुगातील मानव बघीतला तर तो केवळ मंत्रानेच शस्त्रांची-- संहारक अस्त्रे करायचा..ती पण आजच्या अणुबॉन्ब पेक्षा कीतीतरीपटीने संहारक..
महाभारतातील 'श्रीगीता' कोणत्याही 'साधना' विना, सगळ्या शक्य असणार्‍या Effect सहीत घरी बसून अनुभवणारे श्रीवेदव्यासानुग्रहीत श्रीसंजय ही आता दिसणार नाहीत...कारण आता तेही 'सामर्थ्य' राहीले नाही. हे आता असो!

सांगायचा मुद्दा आपण सगळ्याच बाजूने 'गाळ' आहोत..आणि तरीही श्रीभगवंत आपल्यावर अजूनही आशा धरून आहेत... हे नक्कीच! धन्य त्या श्रीभगवंतांची अजूनही 'संयम' बाळगून आहेत.काय करायचे, कोणत्या मार्गाने जायचे हे सगळे आपल्याच हातात आहे कारण,
'घासून बघितल्या शिवाय स्विकारणे नाही' आणि 'जशी मागणी तसा पुरवठा' या श्रीभगवंतानीच बनविलेल्या नियमांनी श्रीभगवंतांचेच हातही बांधले गेलेत.:)

धन्यवाद!

प्रत्येक ब्रह्मांडाला वेगवेगळे शिवात्मे नियामक मंडळावर असतात ना? तेच ब्रह्मा, विष्णू, महेश आहेत ना?

कलीयुग संपेल म्हणजे कल्पांत येईल. पुढच्या कल्पात हे चार युगांचे नियम, विशेष वेगळे असतील.

दुसर्‍या ब्रह्मांडात जन्म मिळण्याचा क्रायटेरिया काय असु शकतो? त्याच ब्रह्मांडात दुसर्‍या ग्रहावर जन्म सहजतेने मिळू शकतो का?

उपासना मुक्ती हे विषय सोडून अंतरिक्षात टाइममशिनमधून कुठे चाललात सगळे? सगळे गेले दुसर्‍या ब्रह्मांडात तर इथल्या डिस्कशनचं काय होणार? Sad

खर आहे जा'मोहन'प्या...:) धन्यवाद!
याच ब्रह्मांडातील जन्म-मरण चक्रातून बाहेर पडायचे कसे? हे साध्य..ते सोडून 'इतर' ठिकाणीजन्म घेणे कसे होईल? हा विषयच मूळात 'साध्या' पासून भरकटवणारा आहे किंवा 'साध्य' काय हेच अजून कळालेल नाही, हे ठळकपणे दर्शविणारा आहे. म्हणूनच चाळणी आणि गाळणी जरूरी पडते.:)

एकापासून 'अनेक' व्हायचे हा श्रीभगवंताचा 'संकल्प' , आणि अनेकापासून 'एक' व्हायचे हा श्रीसद्गुरुंचा 'संकल्प' ...यातील भेद कळला नाहीतर फार मोठा बौध्दिक गोंधळ होतो..यातून आपण वेळीच सावरायला हवे..:)

आपण सगळे राहीलेला 'गाळ' आहोत आणि हा गाळ अनेक वर्षे असाच साचत राहीला, तर तोच 'कठीण' होतो..दगडासारखा!

दगडाचा कठीणपणा हा खरा तर 'अज्ञानाचच' प्रतिक आहे. जेवढ स्व-स्वरुपाविषयीचा गोंधळ जास्त तेवढच या अज्ञानाच कठीणपणही !

व्यवहारात आपण कधीतरी म्हणतो की.. अज्ञानात सुख आहे. पण परमार्थात हे कधीच 'सत्य' नसते...हे अगदी मनासी बांधून ठेवायला हवे. 'अज्ञानी' दगड जरी व्यवहाराप्रमाणे 'सुखी' वाटला... तरिही परमार्थाप्रमाणे..सर्व 'आत्मज्ञानी' संतानी सांगितल्यानुसार खरे 'महासुख' हे फक्त आणि फक्तच 'आत्मज्ञानाची' प्राप्ती केल्यानंतरच मिळते.. अन्य कोणत्याही उपायांनी कदापि नाही.

अर्थात.. 'मी म्हणजे ब्रह्म' हे अनुभवणारी अतिमहत्वाची 'बुध्दी' ही फक्त आणि फक्तच मनुष्य जन्मातच असल्यामूळे.. इतर कोणत्याही मनुष्यादियोनीमधे 'मुक्ती' कदापी शक्य नाही! आणि म्हणूनच मनुष्य जन्म, त्याच्याकडे अतिमहत्वाची...त्याने जर ठरविले तर 'मुक्ती' कडे घेऊन जाणारी बुध्दी आहे .. या 'एकमेव' कारणासाठीच सर्व योनीमधे सर्वश्रेष्ठ आहे. ही 'बुध्दी जर बाजूला केली किंवा अशी बुध्दी जवळ असताना स्वत:चाच 'आत्मघात' करून घेणारा तर मनुष्य पाहीला तर त्या मनुष्यात आणिदगड यात काहीच फरक करता येत नाही... आणि म्हणूनच त्यावेळी स्वतःचे, प्रारब्धानुसार आलेले भोग भोगताना, अल्प बुध्दी जवळ असणारे 'प्राणीच' श्रेष्ठ आहेत, असे म्हणनेही चुकीचे आहे, असे म्हणता येत नाही.:)

आता अशा दगडासारख्या जीवांची मुक्ती कशी होणार? हा प्रश्न निकालात निघायला हरकत नाही. म्हणूनच 'मनुष्य' जन्म हा 'दुर्मिळ' आहे. हा 'जन्म' अतिसायासाने मिळणारा आहे..मी कोण आहे? याच उत्त याच जन्मात नाही मिळाले तर... दगडाचा जन्म म्हणजेच 'मुक्ती' असे 'अज्ञानाने' वाटणे, हे ही शास्त्रदृष्ट्या चूकीचे म्हणता येत नाही.:)

धन्यवाद!

याच ब्रह्मांडातील जन्म-मरण चक्रातून बाहेर पडायचे कसे? हे साध्य..ते सोडून 'इतर' ठिकाणीजन्म घेणे कसे होईल? हा विषयच मूळात 'साध्या' पासून भरकटवणारा आहे किंवा 'साध्य' काय हेच अजून कळालेल नाही, हे ठळकपणे दर्शविणारा आहे. म्हणूनच चाळणी आणि गाळणी जरूरी पडते. >>>> माझे साध्य (माझ्या आकलनाप्रमाणे) - तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी....
घातले जन्माला तर घालूदे पण "त्या"च्या इच्छेने व त्याच्या कार्यासाठी घालावे (हीच तर सामिप्य मुक्ती). प्रारब्धवशाने अपरिहार्यपणे जन्म येऊ नये हीच इच्छा, इथून जाताना डोक्यावर प्रारब्धाचे ओझे नसावे हीच इच्छा Happy बाकी कुठेही कधीही जन्माला घालावे, मी "त्या"चीच आहे. अनंतकोटीब्रह्मांडनायकाचा कार्यविस्तार सहजासहजी कळणार तर नाहीच...rather कधीच कळणार नाही. पण निदान मला तरी त्या विराटत्वाची, विशालत्वाची कल्पना करणे आवडते कारण आपोआपच त्यातून परमात्म्याचे कौतुक निथळते.

अश्विनी,

कृपया गैरसमज करून घेऊ नये. काही चुकीचे लिहले असल्यास कृपया 'क्षमा' करावी. आपल्याला कोणत्याही प्रकारे दुखावण्याचा माझा हेतू कधीही नव्हता आणि कधीही नसेल याची खात्री बाळगा.

असे होते, म्हणूनच असे लिहण्याविषयी 'आपली' आणि 'माधव' यांची परवानगी अगोदरच र्घेतली होती. आणि त्यांना यात काहीही 'गैर' वाटणार नाही अशी खात्री आहे.. म्हणूनच त्यांच्याही 'उत्तराची' मीही आतुरतेने वाट पाहात आहे.

'तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी....' ही संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांची स्थिती ही 'आत्मज्ञान' प्राप्तिनंतरची आहे.. हे मी अतिशय नम्रपणे आपल्या निदर्शनास आणू इच्छीतो.:) म्हणूनच आपणही अगोदर तेच केले पाहीजे...तरच पूढचा अनुभव येईल... नाही काय?

>>>प्रारब्धवशाने अपरिहार्यपणे जन्म येऊ नये हीच इच्छा, इथून जाताना डोक्यावर प्रारब्धाचे ओझे नसावे हीच इच्छा बाकी कुठेही कधीही जन्माला घालावे, मी "त्या"चीच आहे.

जन्म कोणता असावा? हे परमेश्वर का ठरवेल? ते तर आपलच 'प्रारब्ध' ठरविते...आपल 'पाप आणि पुण्य' म्हणजेच आपल्या चांगल्या-वाईट वासना, श्रीभगवंत कधीही स्विकारत नाहीत, अस शास्त्र सांगते! आपलाच नियम त्यांनी स्वतः कधीच तोडला नाही..( श्रीप्रभू रामांचंद्राच्या कडून झालेला 'वाली' वध आणि पुढच्या अवतारात 'पारध्याच्या' रुपाने स्वतः श्री भगवनंतानी केलीली अवतार समाप्ती ..याच उदाहरण आपणच तर दिलत !) मग ते आपल्याकरिता तोडतील का?

>>>
अनंतकोटीब्रह्मांडनायकाचा कार्यविस्तार सहजासहजी कळणार तर नाहीच...rather कधीच कळणार नाही.

हा विस्तार 'सहजासहजी' कळणार नाही, की... हा विस्तार कधीच कळणार नाही... नक्की काय बरोबर? यावर आपलाच 'निर्णय' अगोदर होणे महत्वाचे आहे, असे आपल्याला वाटते काय?

आपण मला 'चिरफाड' करण्याविषयी परवानगी अगोदरच दिली आहे! हे आपल्या नजरेस आणू इच्छीतो..:) काही चुकल्यास क्षमा करावी!

धन्यवाद!

अहो गैरसमज वगैरे काही नाही हो. Happy बिनधास्त चिरफाड करा.

जन्म कोणता असावा? हे परमेश्वर का ठरवेल? ते तर आपलच 'प्रारब्ध' ठरविते...आपल 'पाप आणि पुण्य' म्हणजेच आपल्या चांगल्या-वाईट वासना, श्रीभगवंत कधीही स्विकारत नाहीत, अस शास्त्र सांगते! आपलाच नियम त्यांनी स्वतः कधीच तोडला नाही. >>> कर्मस्वातंत्र्य २ जणांना नसतं. एक म्हणजे मनुष्य योनी सोडून इतर योनी. दुसरं म्हणजे ज्यांनी आपलं पाप पुण्य, प्रारब्धही "त्या"च्या चरणी अर्पण केलंय असा मानव. इथे मानव स्वतः कर्मस्वातंत्र्य नाकारतो व स्वतःला त्याच्या पुर्णपणे आधीन करतो. म्हणजेच माझ्या हातून जे जे काही घडेल ते ते तू तुझ्या इच्छेनेच घडव. सागरामध्ये जेव्हा घागर ओतली जाते तेव्हा घागरीतले पाणी हे वेगळे ओळखू येत नाही. ते सागरच बनून जाते.

हा देहच जेथे नाही आपुला | एकदा जो साईचरणी वाहिला |
मग तयाच्या चलनवलनाला | काय आपुला अधिकार || (श्री साईसच्चरित)

देवयानपंथावरुन चालणार्‍या प्रत्येकाला या ओवीचे सोपान मिळू शकते. पण प्रामाणिकपणे तोच भाव असायला हवा.

तुकोबांचा हा अभंगही "हेचि दान देगा देवा तुझा विसर न व्हावा" याने सुरु होतो व शेवट "तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी.." या साध्य कथनाने होतो. संतांची वचनं ही या पंथावर ज्याने आजच पहिले पाऊल टाकले आहे त्याला व जो "त्या"च्यात मिसळून जाऊ बघतोय त्यालाही मार्गदर्शक ठरतात. आत्मज्ञानाच्या पायरीला न पोहोचलेल्याने देखिल हेच साध्य डोळ्यासमोर ठेवले पाहिजे. बाकी पुढचा प्रवास करवून घ्यायला "तो" समर्थ असतो. भक्तीची वाट अतिशय अरुंद असते तिथे "मी" आणि "तो" दोघे चालू शकत नाही पण जेव्हा "मी" माघार घेतो तेव्हा "तो" मला त्याच्या कडेवर सांभाळून पुढे घेऊन जातो. तो जिथे नेईल तिथेच स्वर्ग असतो, तोच विसावा असतो. आत्मज्ञानामधला अडसर मुख्यत्वे "मी" हाच असतो.

श्री साईसच्चरितात पुर्ण २ अध्याय आत्मज्ञान्/ब्रह्म यावर आहेत त्यात खूप सुंदर एक्स्प्लेन केलं आहे Happy

हा विस्तार 'सहजासहजी' कळणार नाही, की... हा विस्तार कधीच कळणार नाही... नक्की काय बरोबर? यावर आपलाच 'निर्णय' अगोदर होणे महत्वाचे आहे, असे आपल्याला वाटते काय? >>>> ही दोन्ही वाक्यं बरोबर आहेत. परमतत्व जितके विशाल आहे तितकेच सुक्ष्मही आहे. त्यामुळे त्याच्या विस्ताराचा अंदाज आपण बांधू पहातो त्यामुळे त्याच्यावरच्या प्रेमामुळे, त्याचा आपल्यावरच्या प्रेमामुळे तो आपल्याला त्याचं अस्तित्व दाखवत रहातो. गीतेतील "पुर्णमिदं.... " श्लोकात म्हटल्याप्रमाणे सगळ्या विश्वाची निर्मिती करुन, सगळ्यांना सगळं काही वाटून टाकलं तरीही तो पुर्णच रहातो. मग अंदाज कुठवर घेणार. पण तरीही बरंच काही उरल्या मुळे शेवटी नेति नेति Happy

अश्विनी,
व्वा! अतिशय सुरेख..अनेक धन्यवाद! देव तुमचे भले करो!

प.पू. श्रीसद्गुरूसाईनाथांना अनंत साष्टांग दंडवत!

हा देहच जेथे नाही आपुला | एकदा जो साईचरणी वाहिला |
मग तयाच्या चलनवलनाला | काय आपुला अधिकार || (श्री साईसच्चरित)

सर्वार्थाने(कोणत्याही बाजूने) त्रिवार 'सत्य' आहे.
बोला श्रीसाईनाथ महाराज की जय!

'देह' आपला नाही...अर्थात 'देह' म्हणजे मी नाही.. हे कळणे म्हणजेच 'आत्मज्ञान' होणे..हे श्रीसद्गुरू शिवाय कसे जमायचे?

त्यानंतरच त्या 'देहावर' आपला अधिकार रहात नाही.. कारण 'मी' म्हणजे देह नाही हे कळालेल असत्..आणि असा विदेही 'मुक्त' च असतो! देहावर अजूनही आपला अधिकार आहे असे वाटणे आणि श्रीसाईचरणी 'देह' वाहणे..या गोष्टी मूळातच शास्त्रदृष्ट्या एकमेकाविरूध्द आहेत.

'देह' वाहणे, म्हणजे एखादे फूल वाहणे नाही, हेही श्रीसद्गुरूकृपेशिवाय कळत नाही!

>>>तुकोबांचा हा अभंगही "हेचि दान देगा देवा तुझा विसर न व्हावा" याने सुरु होतो व शेवट "तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी.." या साध्य कथनाने होतो. संतांची वचनं ही या पंथावर ज्याने आजच पहिले पाऊल टाकले आहे त्याला व जो "त्या"च्यात मिसळून जाऊ बघतोय त्यालाही मार्गदर्शक ठरतात.

अगदी शंभर टक्के खरे आहे. म्हणूनच 'विवेकपुर्वक' आपल 'साध्य' काय आहे? हे पाहीले पाहीजे..आणि तेच मार्गदर्शन डोळ्यासमोर ठेवले पाहीजे.:)

अश्विनी,
>>>इथे मानव स्वतः कर्मस्वातंत्र्य नाकारतो व स्वतःला त्याच्या पुर्णपणे आधीन करतो. म्हणजेच माझ्या हातून जे जे काही घडेल ते ते तू तुझ्या इच्छेनेच घडव. सागरामध्ये जेव्हा घागर ओतली जाते तेव्हा घागरीतले पाणी हे वेगळे ओळखू येत नाही. ते सागरच बनून जाते.

थोड या विषयी बोलूयात.:)

आपण लिहलेत की..

>>>इथे मानव स्वतः कर्मस्वातंत्र्य नाकारतो व स्वतःला त्याच्या पुर्णपणे आधीन करतो. म्हणजेच माझ्या हातून जे जे काही घडेल ते ते तू तुझ्या इच्छेनेच घडव.

आपल्या हातून जे जे घडेल..ते आपल्याच प्रारब्धामूळेच होत असते. यात परमेश्वर मधे येत नाही!

इथे एक गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे ..ती म्हणजे, 'प्रारब्ध' नुसार जे 'सुख-दु:ख' वाट्याला आलेले असेल, ते आपल्याला नाही, तर आपल्याला मिळालेल्या शरीराला भोगावे लागते. म्हणूनच एकदा 'मी' म्हणजे शरीर नाही, हे कळाले की.. 'प्रारब्धाचा' त्रास न होता.. ते भोगले जाते.

'देह म्हणजे 'मी' नाही, अशी अंतरंग अनुभूती आल्याशिवाय श्रीभगवंतांचा 'निष्काम-कर्मयोग' साध्यच होऊ शकत नाही.

आपली अवस्था फारच बिकट-गोंधळलेली असते...वाचून सगळ कळत पण .. पैलवान कसे व्हायचे?..यावरची भारंभार पुस्तके वाचून कोणी पैलवान होत नाही, ही गोष्ट आपल्या लक्षातच येत नाही. आपल सगळ आयुष्य... परमार्थात जे आपोआप-प्रारब्धानुसार होते..ते सगळे 'मी' करतोय, या कर्त्याच्या अहंभावात जाते.. कर्मफळे वाढवण्यात जाते...तर परमार्थात जे स्वतः केल्याशिवाय होत नाही.. असे सांगितलेले असते ..त्याकडे आपले जन्मात लक्ष जात नाही.... एकूण काय सगळाच उफराटा व्यवहार! Happy

>>>सागरामध्ये जेव्हा घागर ओतली जाते तेव्हा घागरीतले पाणी हे वेगळे ओळखू येत नाही. ते सागरच बनून जाते.

हे घागरीतले पाणी सागरात ओतणार कोण? हा मुख्य प्रश्न आहे. आणि घागरीत आहे ते पण 'पाणीच' आहे ...आणि ते सागरातच ओतले पाहीजे..(म्हणजे 'सागर' काय? हे पण माहीत पाहीजे) हे ठरविणार कोण? तरच ओतल्याचा उपयोग होईल! नाही का? Happy

धन्यवाद!

अश्विनी,

>>>हा विस्तार 'सहजासहजी' कळणार नाही, की... हा विस्तार कधीच कळणार नाही... नक्की काय बरोबर? यावर आपलाच 'निर्णय' अगोदर होणे महत्वाचे आहे, असे आपल्याला वाटते काय? >>>> ही दोन्ही वाक्यं बरोबर आहेत. परमतत्व जितके विशाल आहे तितकेच सुक्ष्मही आहे. त्यामुळे त्याच्या विस्ताराचा अंदाज आपण बांधू पहातो त्यामुळे त्याच्यावरच्या प्रेमामुळे, त्याचा आपल्यावरच्या प्रेमामुळे तो आपल्याला त्याचं अस्तित्व दाखवत रहातो. गीतेतील "पुर्णमिदं.... " श्लोकात म्हटल्याप्रमाणे सगळ्या विश्वाची निर्मिती करुन, सगळ्यांना सगळं काही वाटून टाकलं तरीही तो पुर्णच रहातो. मग अंदाज कुठवर घेणार. पण तरीही बरंच काही उरल्या मुळे शेवटी नेति नेति

घागरीतले पाणी सागरात ओतल्यावर ..त्या ओतलेल्या पाण्याला आलेल्या अंतरंग अनुभूती मूळे आपणच सागरच आहोत..असा अनुभव येतो की नाही?:)

श्रीवेदात 'नेति-नेति' म्हणजे नुसत्या शब्दज्ञानाने 'सागराचा' अनुभव येत नाही, असे सांगितले आहे काय?:)

Pages