उपासना

Submitted by हसरी on 3 February, 2010 - 23:00

उपासना कशी करावी?
कोणत्या देवतेची उपासना कशी करावी याची सविस्तर माहिती द्या?

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

त्याकरता 'कृष्णार्पणमस्तु' या भावनेने कर्म करत जावे म्हणजे 'मी' हे कर्म करत नाहीये आणि 'मला' याचे फळ पण नकोय ह्याच भावनेने सत्कृत्य करावे.
>> व्वा ! खरच ह्यापूढे ही भावना मनात रुजवायला हवी काहीही चांगले कर्म करायच्या आधी. Happy
श्वीनी Happy ओके ठीके.

Actually, फलाशेला पुर्णविराम द्यायचा म्हणजे फळ नको म्हणणे नाही. माझे कर्म मी करत रहाणार व फळ काय द्यायचे, कधी द्यायचे ते तो परमात्मा बघेल, तो परमात्म्याचा हेडएक आहे (जबाबदारी), माझा नाही. माझ्यासाठी उचित काय ते तो दिल्याशिवाय रहाणार नाही व जेव्हा योग्य तेव्हाच देईल, योग्य नसेल तर कधीच देणार नाही ही भावना पाहिजे. मीच त्याचा/ची म्हटल्यावर माझं काय करायचं ते त्याने ठरवायचं.

अश्विनी, तसं म्हणायला तेवढी भक्ती लागते. नाहिये माझ्यात तेवढी. मग तिनेच मला सांगितले असणार, 'प्रत्येक गोष्ट तर्कावर घासून बघतोस ना? मग ह्या विचाराचा (जो वर लिहिला आहे मी - इथे 'मी' सायलंट आहे Happy ) कस लावायचा प्रयत्न बघ करून' सध्या तोच करतोय.

माधव Happy

या संकल्प विकल्पाच्या गुंत्यातून सोडवणारं धाग्याचं टोक शोधतानाच अचानक एखादी अनुभुती येते आणि इतके दिवस झगडवणारा गुंता अलगद सुटून सारं काही स्पष्ट होऊन जातं व वरचा विचार (खरंतर तो विचार रहात नाही, ती एक जाणीव पसरुन रहाते) प्रकाशत रहातो.

सावट, आता तुमच्या एका प्रश्नाचे उत्तर देत आहे.
>>मी' हे कर्म करत नाहीये आणि 'मला' याचे फळ पण नकोय
गीता ही निष्काम कर्मयोग शिकवते असे सर्वांना माहित आहेच,
पण गीतेतच कृष्ण अर्जुनाला सांगतो की युद्धात मेलास तर स्वर्ग मिळेल आणि जगलास तर पृथ्वीचे राज्य मिळेल, त्यामुळे उठ युद्धाला तयार हो. हे म्हणजे अर्जुनाला फलाची लालूच दाखवल्यासारखे आहे. गीतेमधे असणारा विरोधाभास येथे दिसून येतो. कोणीही मानव-प्राणी फलाशा नसेल तर कर्म करायला उद्युक्त होत नाही. खरेतर अशी मते मांडण्याएवढा माझा अधिकार अजिबात नाही. पण मला गीतेचा हा श्लोक सतत कार्यरत ठेवतो. Happy

कोणीही मानव-प्राणी फलाशा नसेल तर कर्म करायला उद्युक्त होत नाही >> अगदी बरोबर! पण मग एक वेळ अशी येते की त्या फळामधला फोलपणा जाणवू लागतो. फलाशा सुटलेली नसते पण त्यात राम नाही हे पण जाणवायला लागते. तीच प्रवासाची सुरुवात असते.

गीतेमधे असणारा विरोधाभास येथे दिसून येतो. >> विरोधाभास नाही. हे कर्ममार्गाने जाणार्‍यांकरता आहे. आपला तो मार्ग नसेल तर आपल्याला ते पटणार नाही, समजणार नाही. कदाचीत ते आपल्या मार्गाच्या अगदी विरुध्द असेल म्हणून आपल्याला विरोधाभास जाणवेल पण तो असेलच असे नाही. गीत केवळ निष्काम कर्मयोगच शिकवत नाही, ती सगळेच योग शिकवते. ज्ञानमार्गीयाला ती सांगते, 'हे जे योध्दे तुझ्यापुढे उभे आहेत ते ज्या दिवशी जन्मले त्याच दिवशी त्यांचे मरण निश्चित झाले. मग त्यांना मारणारा तू कोण?' भक्तीमार्गीयाला काय सांगते ते अश्विनीने वर लिहिलेच आहे - त्याच्याकडे बामची फॅक्टरी आहे तेंव्हा त्याला माझ्या जीवनातला हेडएक द्यायला काहीच हरकत नाही.

दुसरे म्हणजे गीता किंवा वेद हे सर्व पातळीच्या साधकांना मार्गदर्शन करतात. आपण आपल्या पातळीला जे लागू पडते ते वेचायचे आणि ते आचरणात आणायचा प्रयत्न करायचा.

'ठेविले अनंते तैसेची रहावे' हे आत्ता मला लागू नाही. कारण मी जर तसे वागलो तर त्याचे जे परीणाम असतील ते पेलण्याचे बळ माझ्या पंखात नाही. पण म्हणून ते चूक आहे असेही नव्हे.

काल खुप घाईघाईत लिहिल्यामुळे निट विचार करून लिहायला वेळ मिळाला नाही.
विरोधाभास म्हणजे चूक आहे अशा अर्थाने म्हणायचे नव्हतेच. फलाशा नसताना काम करणारे जीव हे फार उच्चकोटीतले असतात, मी जे लिहिले होते ते सामान्य जनांबद्दल होते. विवेकानंदांनी देखील म्हणले होते, जर कोणी खरोखर कामाकरीता काम करत असेल तर मी त्याच्या दर्शनाला लोटांगण घालत जायला तयार आहे. कितीही ठरवले तरी कोणत्याही अपेक्षेविना काम करणे फार अवघड आहे. कोणीही यावर प्रतिक्रिया लिहिण्याच्या आधी या विधानाबाबत सखोल विचार करून पहावा.

श्रीसद्गुरु संततुकाराम महाराजांचा एक अभंग पाहू..

सुंदर ते ध्यान, उभे विटेवरी ।
कर कटावरी ठेवोनिया ॥१॥

तुळसी हार गळा, कांसे पितांबर ।
आवडे निरंतर तेची रूप ॥२॥

मकर कुंडले तळपती श्रवणी ।
कंठी कौस्तुभमणी विराजीत ॥३॥

तुका म्हणे माझे हेची सर्व सुख ।
पाहीन श्रीमुख आवडीने ॥४॥

सर्व संताना ज्या 'सुखाचा' शोध लागला, ते 'सुख' आपल्याला का जाणवत नाही?

अनादी काळापासून माणूस 'सुखाचाच' शोध करीत आहे. मग 'सुख' पुढे आणि 'आपण' मागे अशी शर्यत सुरू होते... जसेजसे सुखाच्या जवळ जाऊ,तसेतसे 'सुख' जवा एवढे आणि 'दु:ख' पर्वता एवढे असे दर्शनास येते. पण तरीही ही 'शर्यत' काही थांबत नाही.

प्रामाणिकपणे याचा शोध घेतला तर लक्षात येते की, आपली आणि संताची सुख शोधण्याची जागा वेगवेगळी आहे. आपण सुख कोठे शोधतो..तर विषयात कसे ते समजावून घेऊ..

माणसाला आजूबाजूचे 'ज्ञान' ग्रहण करण्यासाठी पंच ज्ञानेंद्रियेअसतात, त्यांनी ग्रहण केलेले ज्ञान म्हणजेच 'विषय' ही तसेच असतात....
१)दृकेंद्रिय(रुप- रंग),
२)श्रवणेंद्रिय(नाद),
३)रसना (रस)-वाकेंद्रिय्(शब्द),
४)घ्राणेंद्रिय(गंध) आणि
५)त्वगेंद्रिय (स्पर्श).

म्हणूनच माणसाला 'सुखाची' अनुभूतीही याच विषयांच्या सहाय्याने होते.

यात पध्द्त जरी वेगवेगळी असली.. तरी शोध 'सुखाचाच' आहे. कोण 'गाण्याविषयी' बोलत राहील..तर कोण 'खाण्याविषयी' तासनतास गप्पा मारत बसेल..तर कोण 'रंग-रुपासाठी' वेडा झाला असेल..तर कोणी 'सिनेमा-सिरियलविषयी' सांगत बसेल, तर कोणाला 'सृष्टीसौंदर्याने' मोहीत असेल,तर कोणी आपल 'रंग-रुप-शक्ती' अबाधित राखण्याच्या चिंतेने ग्रस्त असेल.. मग अशा नाना विषयांची रांगच्यारांग तयार होते.

या नाना 'विषयात' खरच आपल्याला पाहीजे असणार 'सुख' असत का? दोन उदाहरणे पाहू...

१)एखाद आवडीच 'गाण' ऐकल्याने आपणास 'सुख' होते. पण तेच गाण ऐकूण-ऐकुण आपण किती वेळा ऐकणार? काही वेळाने डोके दुखायला लागते..मग ते 'सुख' गेले कोठे?
२) आवडती 'जिलेभी' खाऊन्-खाऊन किती खायची, तडस लागल्यावर ते 'सुख' नाहिसे होते.

म्हणजेच त्या-त्या विषयाच्या भोगण्यात किंवा त्या विषयात, आपल्याला तात्पुरत्या 'सुखाचा' आभास निर्माण होतो आणि आपण परत-परत त्या 'विषयाच्या' जाळ्यात अडकतो.. हे अस अडकण अनेक जन्म चालत.

या अडकण्याला फक्त इंद्रियेच जबाबदार आहेत अस नाही, तर अजून काही घटक जबाबदार आहेत. ते जाणून घेतल्याशिवाय..या 'चक्रातून' सुटका कशी शक्य आहे?

दीपूर्झा,
नमस्कार,धन्यवाद!

जा'मोहन'प्या,

>>>मला जे प्रश्न विचारला आहे, त्याला पूरक म्हणून मी माझा आवडता मुद्दा, जो योगायोगाने इथेच उपलब्ध आहे... तो उचलतो..

आणि आता हा खालील 'योगायोग'

>>>अहो आश्चर्यम... गीतेतला तो श्लोक आजच्या सकाळमध्ये डॉ. बालाजी तांबेंच्या लेखमालेत आहे....

विद्याविनयसंपन्ने ब्राह्मणे गवि हस्तिनि
शुनि चैव श्वपाके च पंडिता: समदर्शिनः

गीता. ५/१८

बरेच 'योगायोग' होतायेत नाही.:)

श्लोकाकरीता मनापासून धन्यवाद!

श्रीमद्भगवतगीता, अध्याय पाचवा..कर्मसन्यासयोग.. श्लोक अठरावा.. व्वा! धन्य झालो..

विद्याविनयसंपन्ने ब्राह्मणे गवि हस्तिनि ।
शुनि चैव श्वपाके च पण्डिताः समदर्शिनः ॥ १८ ॥

स्वतः श्रीभगवंत 'पंडित-ज्ञानी' माणसाची लक्षणे सांगत आहेत..या पेक्षा सौभाग्य ते काय?

परत एकदा धन्यवाद!

अश्विनी,धन्यवाद!

गौरी,
नमस्कार!
१)>>>पण काहि प्रश्न पडले आहेत.. आपण नेहमी ऐकतो की मनुष्य जन्म श्रेष्ठ आहे आणि 'मोक्ष' म्हणजेच मुक्ती हेच मनुष्याच्या दुर्लभ जिवनाच ध्येय आहे. ८४ लक्ष योनींनंतर मनुष्य जन्म मिळतो, मनुष्य जन्म श्रेष्ठ कारण 'कर्म' स्वातंत्र्य मिळते आणि... प्राणि-पक्षी यांचे कर्म...

या प्रश्नाचे उत्तर मिळाले का?

२)>>>मग हे असे वाईट कर्म पटकन संपवता येईल, ह्या साठी भक्ती-उपासनेची काहि विशिष्ट पद्धत आहे का?
परमार्थात ही मागणी - पुरवठा तत्त्व चालते म्हणुन हा प्रश्न विचारायचे धाडस केले आहे.

तुमचा प्रश्न 'उत्तम' आहे. खरेतर, हा प्रश्न 'महेश' यांनी विचारावा असे वाटले होते,कारण त्यांच्या एका प्रश्नाचे ते उत्तर आहे...पण ते 'नजरेच्या' नजरबंदीत अडकले..:) असो.

अशी कर्मे(फळे) पटकन नाही..पण क्रमाक्रमाने 'अवश्य' संपवता येतात.कशी ते पहाण्याकरीता..कृपया थोडी 'सबूरी' बाळगावी.:)

सावट, माझ्या कोणत्या प्रश्नाचे उत्तर आहे ते सांगा ना. सद्ध्या कामामुळे वाचायला जास्त वेळ मिळत नाहीये.

सावट नमस्कार!
सर्व विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे मिळाली, म्हणुनच वाचन, मनन, स्मरण करतेय. सबुरीचा मात्र कस लागतोय. Happy

माधव,

काही प्रश्न....

१) 'ठेविले अनंते तैसेची रहावे' याचा अर्थ काय?

२) >>>दुसरे म्हणजे गीता किंवा वेद हे सर्व पातळीच्या साधकांना मार्गदर्शन करतात. आपण आपल्या पातळीला जे लागू पडते ते वेचायचे आणि ते आचरणात आणायचा प्रयत्न करायचा.

ही 'पातळी' कशी जाणायची? किंवा जे वेचतोय ते 'बरोबरच' आहे हे कसे ठरवणार? श्रीवेद जर फक्त 'साधकांनाच' मार्गदर्शन करतात..मग जे 'साधक' नाहीत त्यांचे काय? 'साधक' कोणाला म्हणायचे?
आचरणात आणायचे म्हणजे नेमके काय करायचे?:)

३) >>>त्याकरता 'कृष्णार्पणमस्तु' या भावनेने कर्म करत जावे म्हणजे 'मी' हे कर्म करत नाहीये आणि 'मला' याचे फळ पण नकोय ह्याच भावनेने सत्कृत्य करावे.

यातील 'मी' आणि 'मला' सायलंट आहेत का?:)

४) >>>तसेच 'मी'पणा कॅनाल केला की प्रारब्ध संपते

म्हणजे नक्की काय होते?

५)
प्रश्न- (श्री)वेद तरी तसे सांगत नाहीत. ते तर म्हणतात - तत् त्वं असि!
आणि
हे कळल्यवर मुक्तीची व्याख्या पण करता येते - "मी मला जाणणे".

या वरच्या दोन्ही 'जाणण्यात' काही 'फरक' आहे का?

आपले उत्तर-
हो पहिली सुरुवात आणि दुसरे गंतव्य! वेद ज्ञानदाते आहेत. या मायेत मिळवता येणारे सर्वश्रेष्ठ ज्ञान म्हणजे वेद. त्याच्या कणभर पुढे तर मुक्ती आहे.

समजा 'मी' तुमच्या समोर उभा आहे. आणि 'मी' तुम्हाला सांगितले..'तुम्ही 'माधव' आहात'. हे झाल माझ्या दृष्टिकोणातून... पण हे जर तुम्ही तुमच्या दृष्टिकोणातून पाहीले.. तर त्याचा अर्थ ..'मी 'माधव' आहे', असाच होणार,नाही का? मग तुमच्या दृष्टिकोणातून पाहील्यावर 'सुरूवात' काय असायला पाहीजे? आणि मग या अशा 'तर्काने' केलेल्या स्पष्टिकरणामध्ये 'दोन्हीत' फरक तर काहीच दिसत नाही.. आणि 'श्रीवेद' तर सांगत आहेत की 'फरक' आहे..आणि तेच खर आहे.मग आपला 'तर्क' कुठे चुकतोय?

आपल्या 'उत्तरांची' आतुरतेने वाट पहात आहे. Happy

प्रभू श्रीरामचंद्र-नवमीच्या आपल्यालाही अनंत शुभेच्छा! येणारा प्रत्येक दिवस आपल्यासर्वाकरिता
'प्रभू श्रीरामचंद्र-नवमीच' ठरो, अशी त्यांच्याच सुकोमल 'श्रीचरणी' सविनय प्रार्थना.

धन्यवाद!

येणारा प्रत्येक दिवस आपल्यासर्वाकरिता 'प्रभू श्रीरामचंद्र-नवमीच' ठरो, >>>>> श्री साईसच्चरित ११ व्या अध्यायात "अखंड राम लाधाल" असे म्हटले आहे ती आठवण झाली Happy

गौरी,

>>>
.....आपण नेहमी ऐकतो की मनुष्य जन्म श्रेष्ठ आहे आणि 'मोक्ष' म्हणजेच मुक्ती हेच मनुष्याच्या दुर्लभ जिवनाच ध्येय आहे. ८४ लक्ष योनींनंतर मनुष्य जन्म मिळतो, मनुष्य जन्म श्रेष्ठ कारण 'कर्म' स्वातंत्र्य मिळते.

मग कर्म दिले असेलच ना? जर कर्म आहे तर मोक्षाच्या दिशेने प्रवास ही आला.

इथे ही सद् आणि अपप्रवृत्ती दिसतेच ना? मग त्यातुन कर्माची निर्मिती होत नाहि का? की ते गणले जात नाहि कारण मनुष्य योनी नाहिये?......

याविषयी अजून थोड पाहू या...

कार्य(कर्म) म्हंटले की ....सुरुवातीला 'कारण' येत, नंतर 'कर्ता' येतो आणि त्यानंतरच मग ते 'कार्य' होत.
आता ही 'कारण-कर्ता-कार्य' ही त्रिपुटि समजण्यासाठी, म्हणजेच 'कार्यकारणभाव' सम़जण्यासाठी एक उदाहरण घेऊ....

समजा... मातीचे भांडे करायचे आहे..म्हणजे 'माती' लागणारच. तरच भांडे बनवता येईल, म्हणजेच 'माती' हे 'कारण' आहे तर.. भांडे हे कार्याचे स्वरूप आहे. शास्त्रात या कारणाला(माती), 'उपादानकारण' असे म्हणतात.

आता हे भांडे आपोआप होईल का? तर नाही. कुंभाराची गरज लागणार..त्याशिवाय शक्य नाही. या 'कुंभार' या कारणाला.. 'निमित्तकारण' असे म्हणतात.

मागे 'जा'मोहन'प्या' यांनी 'दृष्टिकोण' बदलन कस जरुरी आहे, हे सांगितल...त्याचाच आधार घेऊन ही घटना आपण वेगवेगळ्या दृष्टिकोणातून(चष्म्यातून) पाहीली तर असे दिसते...

१)झालेले 'कार्य'(भांडे) आणि 'कारण'कुंभार, हे दोन्हीही वेगवेगळे जाणवतात-भासतात,... हा झाला 'बुध्दीवादी' दृष्टिकोण.

२)जर 'ज्ञानदृष्टिने' पाहीले तर.. 'कार्य'(भांडे) आणि त्याला असलेले 'कारण' माती , ही वेगवेगळी नसते,तर एकच असते.

म्हणजेच बघण्यातला हा फरक आहे तो आपणास जन्मतःच असणार्‍या 'चष्म्यामूळे' आहे. जो पर्यंत बुध्दीचे 'तर्क' चालवणे सुरु असणार, तो पर्यत सगळे एक असूनही 'दोन-दोन' (द्वैत) दिसते.

एकदा का श्रीभगवंतानी सांगितल्यानुसार, श्रीमद्भगवतगीतेतल्या..पाचव्या अध्यायात..अठराव्या श्लोकात 'ज्ञानी' माणसासारखी दृष्टि आली की सगळ्यातल भेद जावून..एक दिसायला लागते. पण तरिही हा 'ज्ञानी' व्यवहारात..वागताना तारतम्याने-भेदानेच वागतो. (म्हणजेच 'आपण आणि सिंह' तात्विकदृष्ट्या एकच आहे हे पटले तरी..'ज्ञानी' पोटभरलेल्या सिंहाजवळ जावून त्याच्या पाठीवर हात फिरवण्याचा 'अविचार' का करत नाही, ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे.)

म्हणूनच नवीन 'कर्म' होताना जर द्वैत असेल..म्हणजेच 'मी' वेगळा कर्ता असा 'आंतरीकभाव' असेल..तर त्या कर्माचे 'फळ' त्या कर्त्याला भोगायला लागते.

प्राण्याचे एखादे 'कर्म' हे अजून स्वस्वरुपाविषयी 'अज्ञान' असल्यामूळे, ते कर्म 'ज्ञानदृष्टीहिन' असते. म्हणजे त्याचा नुसताच'भोग' होतो..पण नवीन कर्मफळाची निर्मितीही होत नाही..कारण 'मी' कर्ता असा 'आंतरिकभावाचा' त्यात 'अभाव' असतो.

उदा. समजा मला 'कुत्रा' चावला.. तर चावण्याचा 'त्रास' हा माझ्या प्रारब्धानुसार असतो..पण त्याच वेळी त्या कुत्र्याकडून हे कर्म जरी घडले असले तरिही त्यात 'मी' नसल्यामुळे नवीनकर्मफळही तयार होत नाही.

मनुष्य जन्म श्रेष्ठ कारण 'कर्म' स्वातंत्र्य मिळते.. हे जरी प्रथमदर्शनी योग्य वाटले तरीही.. हे 'कर्म' स्वातंत्र्य म्हणजे काय हे कळणे फार जरुरी आहे. नाहीतर मनुष्याकडे पाहून 'प्राणी-पक्षी' परवडले अशी म्हणायची गरज पडते, हेही अगदि खरे आहे.

म्हणजेच जी कर्मे प्राणी-पक्ष्यांच्या प्रमाणे 'अज्ञानाने' केली जातात, त्याचा 'मोक्षासाठी' काहिहि उपयोग होत नाही..मग भली ती 'मनुष्याने' केलीली असली तरिही. उलट मनुष्याने 'मी' कर्ता या भावनेने केलेले प्रत्येक 'कर्म' त्याला 'मोक्षापासून' दूर-अतीदूर घेऊन जाते.

आता सांगा, जा'मोहन'प्या यांनी खालील प्रमाणे जे कारणासहीत सांगितल आहे त्यात तथ्य आहे ना!

>>>" मनुष्यजन्म हा श्रेष्ठ आहे, हा मला शुद्ध भोंदूपणा वाटत्तो"

याचे कारण म्हणजे...

"मनुष्याची शिकार मात्र सुरुच असते.. त्याला मर्यादा नसते आणि त्यासाठी सगळे षड्रिपु झाडून प्रत्येकजण हवेतसे वापरत असतोच... प्राणी असे करत नाहीत..... निसर्गनियमानुसार जितके घ्यायला हवे तितकेच ते घेतात.. "

धन्यवाद!

उलट मनुष्याने 'मी' कर्ता या भावनेने केलेले प्रत्येक 'कर्म' त्याला 'मोक्षापासून' दूर-अतीदूर घेऊन जाते.

बरोबर आहे..

रिस्क मॅनेजमेंटमध्ये रिस्कचे दोन प्रकार सांगितले आहेत.

१. Pure risk : अशी रिस्क की ज्याचा शेवट हा लॉस मध्येच म्हणजे दु:खातच असतो.... उदा.. आग, भूकंप, पूर , दुष्काळ, ई. या सर्व नैसर्गिक आपत्ती आहेत. ( याना इन्शुरन्सचे कवर मिळते.)

२. Speculative risk : अशी रिस्क की ज्याचा शेवट हा लॉस किंवा प्रॉफिट असू शकतो..... उदा. नोकरी बदलणे, लग्न करणे, मुलाला विशिष्ट कोर्सला अ‍ॅडमिशन घेणे...... यांचे परिणाम लॉस किंवा प्रॉफिट ( म्हणजे अपेक्षित सुखद फळ्/अनपेक्षित दु:खद फळ) असा काहीही असू शकतो..

आता बारकाईने पाहिले तर मनुष्य प्राण्यांपेक्षा वेगळा का पडला हे लगेच लक्षात येते.

पशुपक्ष्यांना जास्त करुन पहिल्या रिस्कचा त्रास असतो..... अर्थात पाण्याच्या तलावाकडे जायला दोन रस्ते असतील तर कुठल्या रस्त्यावर वाघ असेल आणि कुठे गवत मिळेल, अशी स्पेक्युलेटिव्ह रिस्क तेथेही असते, पण त्याचे प्रमाण कमी असते...

माणसाचे आयुष्य मात्र पहिल्यापेक्षा दुसर्‍या रिस्कने जास्त भरलेले आहे... आयुष्यात कोणताही निर्णय घ्या.... फळ अपेक्षित की अनपेक्षित येणार हा मुद्दा सुटतच नाही... विशिष्ट निर्णय घेणे यातही स्पेक्युलेटिव रिस्क आणि तो निर्णय न घेणे यातही तीच स्पेक्युलेटिव रिस्क..... असे आपले विचित्र त्रांगडे झालेले आहे...

गंमत म्हणजे, अध्यात्म्शास्त्र दु:खांचे दोन तीन प्रकार मांनते:
१. अधिदैविक २. अधिभौतिक ३. अध्यात्मिक

पहिले दोन प्रकार हे प्रामुख्याने नैसर्गिक/ मानवी आपत्तींमुळे होतात.. म्हणजे प्युअर रिस्क.

बहुतांश अध्यात्मिक दु:खे ही आपल्या आयुष्यतील आपण घेतलेल्या निर्णयांची फळे असतात, म्हणजेच आपल्या आयुष्यातील 'निगेटिव आउटकम आलेल्या स्पेक्युलेटिव रिस्क्स'... स्पेक्युलेटिव्ह गोष्टी , त्यांची फळे.. ही माणसाच्या आयुष्यात दिवसेंदिवस वाढत आहेत. माणूस इतर ( ८४ लक्ष-१) बांधवांपासून वेगळा पडतो, तो याचमुळे....

( रिस्क मॅनेजमेंटमध्ये रिस्क हा शब्द 'अनप्रेडिक्टेबल आउटकम' या अर्थाने येतो... त्याचा एन्ड प्रोफिट किंवा लॉस काहीही असू शकतो... व्यवहारात मात्र आपण रिस्क हा शब्द फक्त निगेटिव्ह अर्थाने, लॉस, धोका .. अशा अर्थानी वापरतो.. )

सावट,
खुप छान समजावलेत आपण. वेळात वेळ काढुन प्रश्नांची उत्तरे दिल्याबद्द्ल धन्यवाद.

<< म्हणूनच नवीन 'कर्म' होताना जर द्वैत असेल..म्हणजेच 'मी' वेगळा कर्ता असा 'आंतरीकभाव' असेल..तर त्या कर्माचे 'फळ' त्या कर्त्याला भोगायला लागते.

प्राण्याचे एखादे 'कर्म' हे अजून स्वस्वरुपाविषयी 'अज्ञान' असल्यामूळे, ते कर्म 'ज्ञानदृष्टीहिन' असते. म्हणजे त्याचा नुसताच'भोग' होतो..पण नवीन कर्मफळाची निर्मितीही होत नाही..कारण 'मी' कर्ता असा 'आंतरिकभावाचा' त्यात 'अभाव' असतो.

वा! हे इतके छान सांगितले आहेत, आजच लिहुन ठेवते.

अश्विनी, गौरी
धन्यवाद!

जा'मोहन'प्या,
नमस्कार!
व्वा! अगदी खर आहे! अनेक धन्यवाद.

>>>रिस्क मॅनेजमेंटमध्ये रिस्क हा शब्द 'अनप्रेडिक्टेबल आउटकम' या अर्थाने येतो... त्याचा एन्ड प्रोफिट किंवा लॉस काहीही असू शकतो... व्यवहारात मात्र आपण रिस्क हा शब्द फक्त निगेटिव्ह अर्थाने, लॉस, धोका .. अशा अर्थानी वापरतो..

परमार्थातही सकाम 'पुण्य आणि पाप', हे दोन्हीही 'पापच' मानल जात!

तुम्हाला काही महत्त्वाचे प्रश्न विचारायचे आहेत. ते विचारू का? तुमच्यासारखी 'कोण बरोबर-चुकल?' या पेक्षा 'काय बरोबर्-चुक' अशी 'दृष्टि' असणारी माणसे 'विरळ' असतात! म्हणूनच हा 'विषय' याच 'दृष्टिकोणातून' पूढे सरकावा अशी 'सकाम' कामना आहे. Happy

माधव,
काय झाले?
तुमची 'उत्तरे' आम्हा सगळ्यासाठी महत्त्वाची आहेत. आपण सगळेच 'अज्ञानी' आहोत. म्हणून तर 'हे' जन्म-प्रारब्ध भोगतोय. त्यामूळे मनात कोणताही 'किंतू-परंतू' न बाळगता आपण 'उत्तर' द्यावे ही नम्र विनंती.

झक्की,

>>>माझ्या बायपास सर्जरीच्या आधी हे म्हणत रहा असे मला सांगितले होते. ते म्हणत म्हणतच मी हॉस्पिटालमधे अनेस्थेशियाला सामोरा गेलो.
त्यालाहि आता सात वर्षे झाली. तेंव्हा आत चार पाच वर्षात " वासांसि जीर्णाय.. " वगैरे श्लोक म्हणत बसतील लोक!! 'पळभर म्हणतील हाय, हाय' नि 'पुन: आपुल्या कामी लागतील!'

आलास का? अजून किती लांबून-लांबून बघत बसणार आहेस?

अरे! 'हाय-हाय म्हणणार्‍या जनाच आणि मनाच' ऐकून ज्याच 'भल' झालय! अस एकतरी उदाहरण तू़झ्या ह्या 'उंचा-पूर्‍या, लंब्या-चौड्या' आयुष्यात आजवर 'ब्या' ला तरी सापडलय का?

तूझा 'एडीसन' काय म्हणतोय? 'नामस्मरण' कूठ पर्यंत आलय?आपल्या 'कामाच' काय आहे आणि नाही, हे आतातरी, या 'वयात' कळायला हरकत नाही, नाही का?:)

महेश,

१)काल खुप घाईघाईत लिहिल्यामुळे निट विचार करून लिहायला वेळ मिळाला नाही.
२)विरोधाभास म्हणजे चूक आहे अशा अर्थाने म्हणायचे नव्हतेच.
३)फलाशा नसताना काम करणारे जीव हे फार उच्चकोटीतले असतात, मी जे लिहिले होते ते सामान्य जनांबद्दल होते.
४)विवेकानंदांनी देखील म्हणले होते, जर कोणी खरोखर कामाकरीता काम करत असेल तर मी त्याच्या दर्शनाला लोटांगण घालत जायला तयार आहे.
५)कितीही ठरवले तरी कोणत्याही अपेक्षेविना काम करणे फार अवघड आहे.

....कोणीही यावर प्रतिक्रिया लिहिण्याच्या आधी या विधानाबाबत सखोल विचार करून पहावा.

महेश 'सखोल' विचार करावाच लागणार. वेळेची 'सबब' चालणार नाही! 'तो' वेळ थांबवता येत नाही ना!:)

श्रीस्वामी विवेकानंदानी 'सामान्य कोटी आणि असामान्य कोटी' अशा द्वैत भूमीकेतून त्यांचे 'विचार' खचीतच नाही लिहले. तसे आपण समजणे-वाटणे म्हणजे 'श्रीस्वामी विवेकानंद' आणि पर्यायाने प.पू. श्रीपरमहंस रामकृष्णांच्या'वरच 'अविश्वास' दाखवणे, असे होणार नाही काय?

>>५)कितीही ठरवले तरी कोणत्याही अपेक्षेविना काम करणे फार अवघड आहे.

हो! नक्कीच!! अपेक्षेविना 'काम करणे' आणि 'काम होणे' यातला फरक आपल्याला जाणवत नाही..तो पर्यंत हे विरोधाभासरूपी 'चक्र' अव्याहत चालूच राहील याबाबत अगदी निश्चिंत असायला हवे,नाही का?:)

अश्विनी,

अहो, झक्की दिवसभर गावभर्(मा.बो.) बागडतच(उंडारत) असतो. कुठूनतरी 'संदर्भ' काढून त्याच्या 'म्हातार्‍या' संगतीचा लाभ मिळवण्याचा हा 'दुबळा' प्रयत्न आहे..दुसर काय? तो गेंड्याच्या कातडीचा 'प्राणी', आहे अस त्यानेच एकदा सांगितल होत...म्हणूनच परत एकदा 'गंडस्थळा' वर खाजवून खात्री करू पहातोय झाल.:)

बघू 'साहेब' मनावर घेतायेत का ते!:) असो...

तुमच 'चिंतन' कूठपर्यंत आलय? काही विचारल तर चालेल का?:)

असं असं Happy

माझं कसलं आलंय चिंतन ! आपल्याला मिळालेल्या माहितीच्या आधारे, शिकवणीच्या आधारे, काहीतरी मन बुद्धीमधे उतरवायचा प्रयास करते झालं Happy एक मात्र पक्कं ठाऊक आहे, बाकी काही मला आयुष्यात मिळो/न मिळो, आयुष्यात चांगल्या वाईट घटना या घडत राहिल्या तरी त्यांनी विचलीत न होता, हाती आलेल्या नरजन्माचं सार्थक करायचा प्रयास करणार, तो फुकट घालवणार नाही. "त्या"ने ऑर्डर साईन केली की कुठलीही खंत / हव्यास न बाळगता हसत हसत जायचंय, पुन्हा "त्या"च्याच इच्छेने परत येण्यासाठी किंवा त्याच्याच इच्छेनुसार त्याच्यातच विरघळून जाण्यासाठी. बाकी मला काहीच माहित नाही Happy

पण तुमचे प्रश्न मात्र मला माझ्या माहितीची उजळणी करायला लावतातच Happy धन्यवाद.

महेश,
तुमच्या खालील 'उत्तरातूनच' काही प्रश्न 'उत्पन्न' झालेत!:)

>>>मी' हे कर्म करत नाहीये आणि 'मला' याचे फळ पण नकोय
गीता ही निष्काम कर्मयोग शिकवते असे सर्वांना माहित आहेच,
पण गीतेतच कृष्ण अर्जुनाला सांगतो की युद्धात मेलास तर स्वर्ग मिळेल आणि जगलास तर पृथ्वीचे राज्य मिळेल, त्यामुळे उठ युद्धाला तयार हो. हे म्हणजे अर्जुनाला फलाची लालूच दाखवल्यासारखे आहे.

पण या वरील घटनेच्या अगोदरच श्रीपार्थांच्या मनात 'स्वर्ग किंवा पृथ्वीवरचे राज्य' या कर्मफळाबद्द्ल 'विषाद' निर्माण झाला होता आणि म्हणूनच ते 'कर्मच' त्यागायला चालले होते! नाही का?
हे विसरून कस चालेल? चालेल का?

>>>गीतेमधे असणारा विरोधाभास येथे दिसून येतो. कोणीही मानव-प्राणी फलाशा नसेल तर कर्म करायला उद्युक्त होत नाही. खरेतर अशी मते मांडण्याएवढा माझा अधिकार अजिबात नाही. पण मला गीतेचा हा श्लोक सतत कार्यरत ठेवतो.

श्रीमद्भगवतगीता, अध्याय दुसरा..सांख्ययोग.. श्लोक सदतिसावा..

हतो वा प्राप्स्यसि स्वर्गं जित्वा वा भोक्ष्यसे महीम् |
तस्मादुत्तिष्ठ कौन्तेय युद्धाय कृतनिश्चयः ||३७
||

हा 'श्लोक' ऐकून 'श्रीअर्जून' युध्दाला तयार झाले का? हा महत्त्वाचा प्रश्न आहे. अस झाल असत तर श्रीभगवंताना.. त्यांना पटवण्यासाठी अजून पुढे अठराव्या अध्यायापर्यंत मजल कशाला मारावी लागली असती?

'स्व-कर्म' करण्यास तयार नसलेले श्रीपार्थ... आणि ते चुकीचे आहे हे अठरा अध्यायानंतरच 'कृपेने' लक्षात आणवून देणारे.. तेच महाप्रविण श्रीसद्गुरूरूपातील भगवानश्रीकृष्ण आणि नंतरचे त्यांचे आवडते शिष्योत्तम 'युध्दतत्पर' श्रीपार्थ,.... हा प्रवास अतिकाळजीपूर्वक तपासला पाहीजे... नाहीतर आपल्याच 'मनातला' विरोधाभास ..अज्ञानरुपाने जास्तच प्रकट-ठळक होतो! आणि 'मायेचा' कारभार लक्षात येतो. (माधव- लक्षात घ्यायचा Point! :))

फक्त आणि फक्तच, या 'मायेतून' सुटण्यासाठीच श्रीमद्भगवतगीतेचा उपयोग व्हायला हवा! नाहीतर श्रीभगवंतांच्या मूळ 'उद्देशालाच' फाटा बसेल, नाही काय?

याच दुसर्‍या 'अध्यायातील' हा व अजून काही श्लोक, श्रीज्ञानेश्वरीतील 'टिकेसहीत' खाली देत आहे. 'विषयाच्या' संपुर्ण समजण्यासाठी याचाही अभ्यास जरूर व्हावा..! Happy

हतो वा प्राप्स्यसि स्वर्गं जित्वा वा भोक्ष्यसे महीम् |
तस्मादुत्तिष्ठ कौन्तेय युद्धाय कृतनिश्चयः ||३७||

(हे श्रीभगवंताचे म्हणणे असे मधूनच बाजूला घेऊन त्याचा अर्थ काढू नये..त्यामूळे बुध्दीभेद होतो.:))

श्रीअर्जून, आपलेच सगे-सबंधी-नातेवाईक-शस्त्रास्त्रविद्या शिकवणारे गुरूजन यांना युध्दाकरीता समोर बघून, यांना मारून मिळालेल्या विजयाविषयी(फलाविषयी) साशंक होते, युध्द न करण्याविषयी त्यांच्या 'मनाने' निर्णय घेतला होता. त्यांनी युध्दामधे प्रत्यक्ष भगवानशिवशंकराशीही दोन हात केले होते. युध्द हे काही त्यांच्यासाठी नवे नव्हते. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे, आपण जो निर्णय घेतला आहे तो बरोबरच आहे अशी त्यांची खात्री झाली होती. त्यांचे शरीर आणि मन त्यांना साथ देत नव्हते.हातातील गांडीवधनुष्य गळून पडले होते...गर्भगळीत अवस्था झाली होती. (आपल्यालाही त्यांचा हा निर्णय सकृतदर्शनी 'योग्यच' होता असे वाटते.)

आपला हा निर्णय श्रीभगवंताना सांगून ते त्यांचा होकार गृहीत धरल्यासारखे बोलू लागले आणि त्याचवेळी श्रीभगवंतानी त्यांच्या या 'निर्णयाविषयी' नापसंदी दर्शवताच... श्रीअर्जूनांची अवस्था काय झाली असेल याची आपण कल्पना करू शकतो... त्यांना आपली 'चूक' होती आहे हे कळायलाच बराच वेळ गेला..पण त्यांची श्रीभगवंताच्यावर 'पुर्णश्रद्धा' होती.. त्यामूळेच आपली 'चूक' काय हे जाणण्याच्या श्रीपार्थाच्या 'जिज्ञासे' मधूनच श्रीमद्भगवतगीतेचे एकामागोमाग एक १८ अध्याय आपल्यासमोर आले.

हे सगळ्यात शेवटचे श्रीपार्थ हे 'पुर्णज्ञान' आणि 'सप्रेमभक्तीसहीत' होते..श्रीभगवंतानी त्यांना श्रीसद्गुरू या नात्याने 'पुर्णशिष्य' केले आणि त्यानंतरच ते 'युध्दाला' प्रवृत्त झाले..त्याच्या अगोदर नाही.:)

याच अध्यायातले आणि श्रीज्ञानेश्वरीमधील श्रीभगवंताचे पुढचे सांगणे आपण'अवश्य' अभ्यासले पाहीजे...


यावानर्थ उदपाने सर्वतः संप्लुतोदके |
तावान्सर्वेषु वेदेषु ब्राह्मणस्य विजानतः ||४६||

जरी वेदें बहुत बोलिलें| विविध भेद सूचिले| तऱ्ही आपण हित आपुलें| तेंचि घेपें ||२६०||
जैसा प्रगटलिया गभस्ती| अशेषही मार्ग दिसती| तरी तेतुलेहि काय चालिजती| सांगैं मज ||२६१||
कां उदकमय सकळ| जऱ्ही जाहले असें महीतळ| तरी आपण घेपें केवळ| आर्तीचिजोगें ||२६२||
तैसें ज्ञानीये जे होती| ते वेदार्थातें विवरिती| मग अपेक्षित तें स्वीकारिती| शाश्वत जें ||२६३||

कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन |
मा कर्मफलहेतुर्भूर्मा ते सङ्गोऽस्त्वकर्मणि ||४७||

म्हणोनि आइकें पार्था| याचिपरी पाहतां| तुज उचित होय आतां| स्वकर्म हें ||२६४||
आम्हीं समस्तही विचारिलें| तंव ऐसेचि हें मना आलें| जें न सांडिजे तुवां आपुलें| विहित कर्म ||२६५||
परी कर्मफळीं आस न करावी| आणि कुकर्मीं संगति न व्हावी| हे सत्क्रियाचि आचरावी| हेतूविण ||२६६||

धन्यवाद!

महेश,

'निरपेक्ष' प्रेम हे एकटे 'श्रीभगवंतच' करू जाणे.
'पाण्याशिवाय माशाचे 'सगळे जग' वैरी', हे त्या 'माशाला' जो पर्यंत कळत नाही..तो पर्यन्त पाण्याबाहेर काढ्लेल्या माशाची 'तडफड' कशी कळणार? ही 'तडफड' जोपर्यंत कळत नाही, तो पर्यंत 'पायर्‍या' मोजण, हे न मोजल्यासारखच आहे, नाही का?

याविषयी आपण लिहलेत..

>>>निरपेक्ष प्रेम करणारे लोक नसतात असे नाही. तसेच विशुद्ध प्रेम ही भक्तीची पहिली पायरी आहे असे काही संतांनी सांगितले आहे. साधना / उपासना करताना सुद्धा अनेक पायर्‍या असतात. त्यामुळे त्या न मोजणे पटले नाही.

या विषयी थोड बोलू...

१)विशुद्ध प्रेम ही भक्तीची पहिली पायरी आहे असे काही संतांनी सांगितले आहे.

मग इतर संतानी काय वेगळे सांगितले आहे काय? किंवा सर्व संताना आलेला 'परात्पराचा' अनुभव वेगवेगळा असतो काय? श्रीभगवंताविषयी 'विशुद्ध प्रेम' पहिली पायरी आहे की शेवटची? श्रीभगवंतांच्या 'अनन्य- भक्तीची' प्राप्ती आणि भगवंताविषयीच स्फुरलेल हे 'विशुद्ध-प्रेम' यात फरक काय?

२)साधना / उपासना करताना सुद्धा अनेक पायर्‍या असतात. त्यामुळे त्या न मोजणे पटले नाही.

' तो पर्यंत 'पायर्‍या' मोजण, हे न मोजल्यासारखच आहे, ' यात 'पायर्‍या' मोजू नका अस सांगितलेलच नाही. उलट अस सांगितलेल आहे..श्रीसद्गूरूंच महत्त्व आणि त्यांच्या कृपेने लाभलेली साधना...कळल्याशिवाय आणि मिळाल्याशिवाय, मनुष्याचा परमार्थ सुरूच होत नाही ... असे शास्त्रवचन असताना.. आपणच आपल्या मनाने पायर्‍या मोजून काही फायदा आहे का ? सांगा बघू! मोजल्यातरी.. त्या न मोजल्या सारखच होणार, नाही का? Happy

>>>साधना / उपासना करताना सुद्धा अनेक पायर्‍या असतात... त्या कोणत्या?

धन्यवाद!

Pages