Submitted by हसरी on 3 February, 2010 - 23:00
उपासना कशी करावी?
कोणत्या देवतेची उपासना कशी करावी याची सविस्तर माहिती द्या?
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
उपासना कशी करावी?
कोणत्या देवतेची उपासना कशी करावी याची सविस्तर माहिती द्या?
धन्यवाद..माधव,अश्विनी! अश्विन
धन्यवाद..माधव,अश्विनी!
अश्विनी,
>>>
आणि कर्माच्या बाबतीत जेव्हा आपला (मानवाचा) संकल्प भगवंताच्या संकल्पाशी मिळता जुळता होतो तेव्हाच योग घडतो.
याविषयी श्रीमाउली म्हणतात...
अर्जुना समत्व चित्ताचें| तेंचि सार जाणैं योगाचें| जेथ मन आणि बुद्धीचें| ऐक्य आथी ||२७३||
'मन, बुद्धी आणि चित्त' यांची स्थिती वरील प्रंमाणे होणे..म्हणजेच 'योग' साध्य होणे.:)
धन्यवाद सावट, अश्विनी,
धन्यवाद सावट, अश्विनी, माधव!
माधव, वेगळा बाफ काढायला हवा होता आहे हे खरे आहे, आळशीपणा केला :). आता परत उपासनेकडे वळुया, जर ह्यावर आणखीन चर्चा होताना दिसली तर वेगळा बाफ काढुन माहिती तिथे कॉपी करेन. बाफचे विषयांतर झाले, त्याबद्द्ल क्षमस्व!
|
|
प.पू. श्री माउली, 'स्वधर्म
प.पू. श्री माउली, 'स्वधर्म आणि परधर्म' याविषयी काय म्हणतात ते पाहू....
श्रीभगवंत म्हणतात..
श्रेयान्स्वधर्मो विगुणः परधर्मात्स्वनुष्ठितात् |
स्वधर्मे निधनं श्रेयः परधर्मो भयावहः ||३५||
अगा स्वधर्मु हा आपुला| जरी कां कठिणु जाहला| तरी हाचि अनुष्ठिला| भला देखैं ||२१९||
म्हणौनि आणिकांसी जें विहित| आणि आपणपेयां अनुचित| तें नाचरावें जरी हित| विचारिजे ||२२८||
आपला-आपला..ज्याचा त्याचा, जन्मतःच बरोबर असणारा 'स्वधर्म' हा आचरायला जरी कठीण वाटला, तरीही तोच अनुष्ठिला पाहीजे, कारण अंतिम परिणामांच्या दृष्टीने तोच 'भला' असतो.
इतराकरीता जो आचरायला 'योग्य-विहीत' धर्म आहे, तो आपल्या विहीताप्रमाणे अनुचित असेल , आणि आपले अंतिम परिणामस्वरूपी हित जर विचारात घेतले, तर तो धर्म कदापी आचरणात आणू नये.
श्री माउलींचे हे 'स्वधर्मा' विषयीचे विचार..खरच कायम स्मरणात ठेवण्यासारखे आहेत.
परमार्थात आचरणाला अतिशय महत्त्व आहे. अंतःकरण शुद्धीशिवाय परमार्थात काहीही मिळत नाही. आणि अंतःकरण शुद्धी करिता स्वधर्मा शिवाय..विहीतकर्म आचरणात आणल्याशिवाय, दुसरा सहज तरणोपाय नाही.
श्री भगवंतानी, 'नैष्कर्म' आणि 'निष्काम कर्म' या दोन अंतःस्थितीमधील सांगितलेला फरक जाणणे महत्त्वाचे आहे.
धन्यवाद!
श्रीभगवंत श्रीमद्भगवत गीतेत
श्रीभगवंत श्रीमद्भगवत गीतेत केलेला 'धर्मा' विषयीचा'अमुल्य' उपदेश पाहू....
यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत |
अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् ||श्रीमद भ.गी. ४.७||
जें धर्मजात आघवें| युगायुगीं म्यां रक्षावें| ऐसा ओघु हा स्वभावें| आद्यु असे ||श्री ज्ञा.४.४९||
म्हणौनि अजत्व परतें ठेवीं| मी अव्यक्तपणही नाठवीं| जे वेळीं धर्मातें अभिभवी| अधर्मु हा ||श्री ज्ञा.४.५०||
श्रीमाउली म्हणतात, 'अवघे सगळे 'धर्मजात' रक्षण करणे', असा श्रीभगवंताचा आद्य सहजस्वभाव आहे.म्हणूनच ज्यांना 'जन्म-मरण' नाही, आणि व्यक्त होणारे 'साकार' मुर्त रुपही नाही, असे श्रीभगवंत स्वतः ...योगमायेच्या सहाय्याने 'सगूण-साकार' होतात आणि 'धर्म' संस्थापना करतात.
परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम् |
धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे ||श्रीमद भ.गी. ४.८||
ते वेळीं आपुल्याचेनि कैवारें| मी साकारु होऊनि अवतरें| मग अज्ञानाचें आंधारें| गिळूनि घालीं ||४.५१||
अधर्माची अवधी तोडीं| दोषांचीं लिहिलीं फाडीं| सज्जनांकरवीं गुढी| सुखाची उभवीं ||४.५२||
दैत्यांचीं कुळें नाशीं| साधूंचा मानु गिंवशीं| धर्मासीं नीतीशीं| शेंस भरीं ||४.५३||
मी अविवेकाची काजळी| फेडूनि विवेकदीप उजळीं| तैं योगियां पाहे दिवाळी| निरंतर ||४.५४||
सत्सुखें विश्व कोंदे| धर्मुचि जगीं नांदें| भक्तां निघती दोंदे| सात्त्विकाचीं ||४.५५||
तै पापांचा अचळु फिटे| पुण्याची पहांट फुटे| जैं मूर्ति माझी प्रगटे| पंडुकुमरा ||४.५६||
ऐसेया काजालागीं| अवतरें मी युगीं युगीं| परि हेंचि वोळखें जो जगीं| तो विवेकिया ||४.५७||
श्रीभगवंताचे असे 'अवतार' प्रत्येक युगात होत असतात...जे विवेकाचा दीप उजळवतात. श्रीभगवंताच्या कॄपेने असा 'सद-विवेक',ज्यांचा जागृत होतो...तेच फक्त अशा 'अवतारांना' ओळखू शकतात.
'धर्मांच' अस महत्त्व 'अधोरेखित' करत असतानाच श्रीभगवंत शेवटी श्रीपार्थास उपदेश करतात...
सर्वधर्मान्परित्यज्य मामेकं शरणं व्रज |
अहं त्वां सर्वपापेभ्यो मोक्ष्ययिष्यामि मा शुचः ||श्रीमद भ.गी. १८.६६||
तैसें धर्माधर्माचें टवाळ| दावी अज्ञान जें कां मूळ| तें त्यजूनि त्यजीं सकळ| धर्मजात ||१८.१३९५||
मग अज्ञान निमालिया| मीचि येकु असे अपैसया| सनिद्र स्वप्न गेलया| आपणपें जैसें ||१८.१३९६||
तैसा मी एकवांचूनि कांहीं| मग भिन्नाभिन्न आन नाहीं| सोऽहंबोधें तयाच्या ठायीं| अनन्यु होय ||१८.१३९७||
'धर्म आणि अधर्म' हे अवघे 'टवाळ' जाणून ...त्याचे मूळ असे 'अज्ञान' आहे...ते त्यजून .. त्यानंतर म्हणजेच 'अज्ञान' दूर झाल्यावरच मग झालेल्या सोSहं...म्हणजेच 'अहंब्रह्मास्मि' या बोधानंतरच श्रीभगवंताच्या ठायी 'अनन्यता' येते...त्याच्या अगोदर कदापी नाही.
एकीकडे श्रीभगवंत सांगतात ... अधर्माचा नाश करून मीच 'धर्म' स्थापन करतो... तर दुसर्या बाजूला श्री अर्जुनास ,अवघे सगळे 'धर्मजात' त्यजून मलाच शरण ये, असा मोलाचा उपदेशही करतात. हे भगवंताचे वेगवेगळे भासणारे...सांगणे, आपण विवेकाच्या सहाय्याने...अतिशय काळजीपुर्वकतेने समजून घेतले पाहीजे.
धन्यवाद!
माधव, नमस्कार! कसे
माधव, नमस्कार!
कसे आहात?
>>>२. माझा कुठल्याच धर्मावर विश्वास नसेल तर माझ्या जिवाला काहीच आवडी निवडी नसतील का?
आणि
>>>सुरुवातीपेक्षा शेवट खूप आवडला
अनंत कोटि पिंडाचे (अर्थात 'पिंडी ते ब्रह्मांडी' या न्यायाने अनंत कोटि ब्रह्मांडाचे ) धारण केलेल्या शरीरानुसार, म्हणजेच भोगण्यासाठी तयार असलेल्या वासनेनुसारच नैसर्गिक मूळ-स्वभाव..आवडी-निवडी..(धर्म) तयार झालेल्या असतात.
एखादा जन्म मिळाल्यावर 'कर्म' न करता रहाणे शक्य नसते... कारण प्रकृती..त्या जीवाच्या त्रिविध गुणानुसार आणि पूर्वकर्मानुसार(प्रारब्ध)..त्याच्या कळत(ज्ञानी) किंवा नकळत(अज्ञानी) कर्मफळ भोगायलाच लावते. उदा. जसे समजा एखाद्याला हातपाय बांधून रथात टाकले आहे...अशा परीस्थीतीत त्याने कितीही , 'मी जागचा हलणार नाही' ..असा कृतनिश्चय केला तरीही रथ चालू लागल्यावर त्याच्या शरीराला चालावेच लागते.
अर्थात आवडी-निवडी अगोदर... जन्म...धर्म, त्यानंतर फळ म्हणून मिळालेला, असा असतो.:)
आवडी-निवडी नाहीत याचा अर्थ श्रीभगवंतसोडून इतर विषयाविषयी प्रखर वैराग्य निर्माण होणे( करणे-सोडणे नाही!
हे निर्माण होण्यासाठी धर्माची ...म्हणजेच अंतःशुध्दीची गऱज लागतेच.:)
आपण केलेल कोणतेही कर्म, आपले खर्या अर्थाने ऐहिक भले करणारेच असेल, असा आपलाच विश्वास नसतो...तिथे...बाकीच्यांची तर गोष्ट्च नको...!:)
धन्यवाद!
सावट, एक नविन लेखमाला चालू
सावट, एक नविन लेखमाला चालू करा ना.
कोणताही एक विषय (उदा. गीता किंवा तुम्हाला आवडेल तो) घेऊन त्यावर तुमच्या शैलीत निरूपण करा.
आमच्या सारख्या अनेकांना खुप ज्ञानलाभ होईल.
सावट, महेशची विनंती खरचं
सावट, महेशची विनंती खरचं मनावर घ्या. गीता, दासबोध एखादे उपनीषद... यादी खूप मोठी आहे. त्या निमित्ताने आमचा पण अभ्यास होईल.
माधव यांच्याशी वि.पू. मध्ये
माधव यांच्याशी वि.पू. मध्ये झालेली चर्चा, त्यांच्या अनुमतीने इथे पेस्ट करत आहे...!
माधव-
मानवधर्म हाच काय तो खरा धर्म अध्यात्मातला! बाकीचे धर्म म्हणजे त्या जगदंबेच्या पायाखालच्या दैत्यासारखे - कधी रेड्याचे तोंड धारण करतात तर कधी माणसाची दहा तोंडे! त्यांच्या नादी का लागावे.
धर्म आणि अध्यात्म यांचा काही संबंध नाही. उपासनेशी तर नाहीच नाही. हा तशी प्रत्येक धर्मात काही ना काही उपासना सांगितली असते पण वास्तवात ती यम, नियम या पातळीवरचीच असते. खरी उपासना आतूनच सुरु होते.
धर्म बापा ज्याचा त्यानी
प्रिय मानावा प्राणाहूनी
परी विधर्म्याच्या ठिकाणी
अलोट प्रेम धरावे ||
>>>
धर्म बापा ज्याचा त्यानी | प्रिय मानावा प्राणाहूनी ||
परी विधर्म्याच्या ठिकाणी | अलोट प्रेम धरावे ||
माधव, अगदी खर आहे. आपल्या धर्मावर प्राणाहून अधिक प्रेम 'अगोदर' करता यायला पाहीजे, तरच ओरंजेबासारख्या विधर्म्याला नमाज पडताना पाहून... थबकणारे, भगवा रंग, त्यागाच प्रतिक म्हणून धारण करणारे, प्रखर वैराग्यशील .. 'हे राज्य व्हावे ही 'श्रींची' इच्छा' या अध्यात्मतत्वावर चालणारे...छत्रपती श्री शिवाजी महाराज जन्माला येतील....!
हे 'प्रेम' ज्ञानातून आलेले असते. आणि प्रखर वैराग्याशिवाय 'ज्ञानास तगणे' नाही..म्हणजेच 'ज्ञान' स्थिर होत नाही.. कधीही होणार नाही... आजपर्यंत असे कधी झाले नाही...असे श्री माउली वचन आहे.
म्हणूनच संतानी मानवताधर्म ज्याच्यातून निर्माण होतो, त्या 'मनोधर्माला' अतिशय महत्त्व दिले आहे.
आपला मुद्दा अतिशय योग्य आहे... म्हणूनच याच्यावर योग्य चर्चा होणे जरूरी आहे!
धन्यवाद!
>>> धर्म आणि अध्यात्म यांचा
>>> धर्म आणि अध्यात्म यांचा काही संबंध नाही. उपासनेशी तर नाहीच नाही. हा तशी प्रत्येक धर्मात काही ना काही उपासना सांगितली असते पण वास्तवात ती यम, नियम या पातळीवरचीच असते. खरी उपासना आतूनच सुरु होते.
माधव,
याविषयी थोड पाहूयात..!
'धर्म आणि अध्यात्म' यांच आंतरीक नाते समजण्यासाठी महासिध्दांची चरित्रे वाचणे महत्त्वाचे आहे. प.प. श्रीटेंब्येस्वामी हे, स्वधर्मस्थापनेच्या बाबतीत, प.पू.श्रीसमर्थरामदासस्वामी...भगवत पूज्यपाद श्री आद्यशंकराचार्य महाराजांसारखेच नित्यपूजनीय आहेत. पण त्यानीही वेळ प्रसंगी शरणआलेल्या मुसलमान साधकाला श्रीकुराणातील सिध्दमंत्र देऊनच अनुग्रह दिला...कारण ज्याचा त्याचा धर्म !
आत्मानुभवी साधूसंतानीही अनुग्रह करताना... उपासना देताना.. अगोदर धर्म पाहीला आहे. या 'सत्याकडे' डोळसपणे पाहीले असता..स्वधर्माच महत्त्व लक्षात येते.
याचे कारण काय असावे?
यम,नियम,आसन,प्राणायाम या नंतरचा प्रवास... हा आंतरीक आहे... म्हणजेच प्रत्याहार्,धारणा,ध्यान आणि समाधी ही अष्टांगे क्रमानुसार महत्त्वाची.
आंतरीक प्रवास सुरू होण्यासाठी अगोदरच्या पायर्या महत्त्वाच्या. 'प्रत्याहार' म्हणजेच इंद्रिय संयम..म्हणजेच कासवाप्रमाणे विषयभोगातून प्रसंगी इंद्रीयाना आवरता आले पाहीजे. आता हे आवरणे दोन प्रकारचे आहे. विषयभोगायची इच्छा मनात असताना निग्रहाने मनास आवरणे आणि दुसरा प्रकार म्हणजे मनातून त्या विषयभोगाची इच्छाच अगोदर नष्ट होणे.. हे श्री सद्गुरूकृपेशिवाय होत नाही...सर्व संतानी या दुसर्या प्रकाराला महत्त्व दिले आहे.
आणि हे साधण्यासाठी श्रीसंतसद्गुरूकडूनच मिळालेली, त्या त्या धर्मास मान्य असणारी..शास्त्रसंमत असणारी 'उपासनाच' कामी येते.
साध्य, साधक आणि साधना.... साधना करताना... साधक जेव्हा अध्यात्माच्या एकेक पायर्या चढू लागतो... तेंव्हाच साधनेचा 'हेतू' साध्य झाल्यामूळे, साधना आणि साधक हे द्वैत जावून दोन्हीही 'साध्य' रूपच होते.. त्याच्या अगोदर नाही.
श्रीसमर्थ वचनानुसार आपल्या मनाप्रमाणे वागणार्याला हा मार्ग सापडतच नाही..'मनोमार्गे गेला..तो मुकला'!
'मन' जागृत आहे म्हणजेच..परत जन्म आहे आणि परत 'जन्म' आहे म्हणजेच मनाबरोबर चित्तात असणार्या वासनेनुसार 'धर्म' ही आला. मी कोठे-कोणता जन्म घ्यायचा हे माझी 'वासना' ठरवते आणि म्हणूनच वासनेनुसार मिळालेली 'उपासना' महत्त्वाची!
धन्यवाद!
यावर माधव
यावर माधव म्हणतात...
वासनेनुसार 'धर्म' ही आला.>>
धर्माचे महत्त्व ऐहिक जगापुरतेच नाही का? पैगंबर आणि येशूच्या आधी उपदेश देताना इतर संत काय करत असतील? म्हणजे आजच्या घडीला ज्या वासनांनुसार एखाद्या जीवाला मुसलमान धर्म मिळत असेल त्याच वासना जर एखाद्या जीवाच्या पैगंबराच्या जन्माआधी असतील तर मग त्याला कोणत्या धर्मात जन्म मिळाला असता?
म्हणजे धर्म मानवनिर्मित आहेत तर त्यांची निसर्गाच्या प्रक्रियेत अथवा मायेच्या चकात तशी आवशक्यता नाही. हा पण चतुर संतांनी त्याचा उपयोग सामान्य जनांची अध्यात्मातली वाटचाल सुरु करून देण्यासाठी करून घेतला. जसे आपण लहान मुलांना जेवण भरवताना गोष्ट सांगतो. जेवण आणि गोष्ट यांचा तसा काहीच संबंध नाही. आपण फक्त गोष्ट ही संप्रेरक म्हणून वापरतो.
महेश...कसे आहात? धन्यवाद!
महेश...कसे आहात? धन्यवाद!
पाहूया माधवांच्या महामाया जगदंबेचा 'संकल्प' काय आहे तो? विषय सुरू करणे आणि संपविणे, दोन्हीही आपल्या अखत्यारीतल्या गोष्टी नाही आहेत...!:) त्यामूळे कृपया माफ करा.
गुरूदेव, भौतिक आयुष्य चांगले
गुरूदेव, भौतिक आयुष्य चांगले चालले आहे. आध्यात्मिक आयुष्याची वाट अजुन सापडत नाहीये.
माधवा, >>>धर्माचे महत्त्व
माधवा,
>>>धर्माचे महत्त्व ऐहिक जगापुरतेच नाही का?
मग त्रेता-यज्ञ प्रधान युगात पारलौकिक कारणाकरिता 'यज्ञाचा' उपयोग, शास्त्रांनी कसा काय सांगितला?:)
>>>पैगंबर आणि येशूच्या आधी उपदेश देताना इतर संत काय करत असतील? म्हणजे आजच्या घडीला ज्या वासनांनुसार एखाद्या जीवाला मुसलमान धर्म मिळत असेल त्याच वासना जर एखाद्या जीवाच्या पैगंबराच्या जन्माआधी असतील तर मग त्याला कोणत्या धर्मात जन्म मिळाला असता?
जीवाला जन्म आहे, याचाच अर्थ त्याचा एक स्वभाव आहे. म्हणजेच सर्व प्राण्यात 'जाणिव' असतेच, पण तिचे प्रकटीकरण वेगवेगळे असते. जसे भूक लागणे, भिती वाटणे, झोपणे इ. आता भूक लागल्यावर, समोर वेगवेगळे पर्याय असताना, काय आणि किती खायचे, तसेच भिती कोणापासून वाटणे,का वाटणे, झोप रात्रि घेणे-दिवसा घेणे इ. सगळे तपशिल, धारण केलेल्या शरीरधर्मानुसार बदलतात. आता सामान्यतः हे शरीरधर्म 'जाणिव' असे पर्यंत सुटत नाहीत.
असे भिन्नत्व असतानाच एक ठळक स्वभावही असतो. जसे सिंह.. सिंहाच्या कळपातच राहील, वाघाच्या कळपात जाणार नाही आणि महत्त्वाचे म्हणजे त्याचा स्वतःचा एक कळप असेल, दुसरा कळप असेल तर तो हल्ला करतो किंवा त्याला दुसर्या कळपात प्रवेश दिला जात नाही, वैगरे.
आता हे सगळ निसर्गाच्या प्रक्रियेनुसारच असत. असेच 'कळप' माणसात ही असणे, हे ही म्हणणे अनैसर्गिक किंवा मायेच्या चक्राच्या बाहेरचे ...अनावश्यक आहे असे म्हणता येत नाही... मग काळ कोणताही असो.
>>>म्हणजे धर्म मानवनिर्मित आहेत तर त्यांची निसर्गाच्या प्रक्रियेत अथवा मायेच्या चकात तशी आवशक्यता नाही. हा पण चतुर संतांनी त्याचा उपयोग सामान्य जनांची अध्यात्मातली वाटचाल सुरु करून देण्यासाठी करून घेतला. जसे आपण लहान मुलांना जेवण भरवताना गोष्ट सांगतो. जेवण आणि गोष्ट यांचा तसा काहीच संबंध नाही. आपण फक्त गोष्ट ही संप्रेरक म्हणून वापरतो.
मानवी जीवनाचा विचार जर केला तर्...इतर प्राण्यांच्या तुलनेने... 'जाणिवेचे' प्रकटिकरण प्रगल्भ अवस्थेत आढळते. माणसात 'विचाराने-विवेकाने' स्वतःचा विकास साधण्याची जाणिव असते. पण याचा अर्थ सर्व मानवात ही 'जाणिव' सारखिच 'विकसित' झालेली असते...असे म्हणता येत नाही...आणि हे ही मायेच्या चक्रात अनावश्यक आहे असे म्हणता येत नाही.
सगळ्या संताना 'चतुर' अशा करिता म्हणता येइल, कारण त्यांनी स्वतःची प्रगल्भ अवस्था विवेकाने 'अगोदर' साधून घेतली ...म्हणून चतुर!
श्रीसंत जरी स्वतः चतुर असले ..तरीही आपल्यासारखी सामान्य मायेच्या चक्रात आडकलेली माणसे अजूनही अचतुरच असतात. आणि मानवाची 'कळपाची' नैसर्गिक' भावना जर लक्षात घेतली तर्..संताना त्या कळपाचाच येक भाग होणे आवश्यक होते..आणि त्या वैयक्तिक जीवाची, 'कळपाची' कोती जाणिव जावून, ती जाणिव विश्वाकार होण्याकरिता, सुरुवात हि तिथूनच...कळपातूनच व्हायला हवी, नाही काय?
आणि अशी सुरुवात होणे हे मायेच्या चक्राबाहेरचे आहे असे कसे म्हणता येईल?:)
धर्माचा वापर सर्वसंतानी 'अन्न' म्हणून केला....संप्रेरक...एखादी रासायनिक अभिक्रीया लवकर व्हावी म्हणुन नाही केला.:)
माणूस जर नैसर्गिक चक्रानुसार 'भूकेला' असेल तर वरील सगळ्या 'तत्वज्ञानाचा' उपयोग त्याच्याकरीता 'शून्य'असेल, कारण भूक असेल तर अगोदर भूक भागायला पाहीजे तरच विचार्-विवेक सुचेल. श्रीसंतानी नेमके हेच केले...अगोदर भूकेकडे लक्ष दिले...!:) आणि हेही नैसर्गिक तसेच मायिक चक्रानुसार अत्यावश्यक आहे..किंबहूना आध्यात्मिक जीवनाची ही मूलभूत गरज आहे.:)
आणि आपणही आजही..अजूनही अशाच एखाद्या कळपाचा 'सदस्य' आहोत हे आपण कधिही विसरता कामा नये. म्हणूनच आपल्यालाही आताही श्रीसंतांची तेवढीच गरज आहे जेवढी फार पूर्वी एखाद्या कळपाला होती आणि आपल्यानंतरही येणार्या अजून एखाद्या कळपालाही....!:)
धन्यवाद!
महेश, >>>भौतिक आयुष्य चांगले
महेश,
>>>भौतिक आयुष्य चांगले चालले आहे. आध्यात्मिक आयुष्याची वाट अजुन सापडत नाहीये.
आणि
......किंबहूना आध्यात्मिक जीवनाची ही (अगोदरची भूक भागणे) मूलभूत गरज आहे...यावर ...
आता तुमचे मत वाचायला आवडेल.:)
सावट सुंदर! माणसाची
सावट सुंदर!
माणसाची सर्वसाधारण वृत्ती ही कळपात रहाण्याची असते. आणि प्रत्येक कळपाची काही विचारधारा असते हे अगदी मान्य. पण अशीही काही अचतुर माणसे असतात की ज्यांचा कोणत्याच कळपाच्या विचारधारेवर विश्वास नसतो. पण अशा माणसांनाही (कोणत्याही कळपाच्या आश्रयाशिवाय) सद्गुरु अप्राप्य नसतात. म्हणजे कुठल्याही कळपाची विचारधारा स्विकारल्याशिवाय सद्गुरुंची प्राप्ती होऊ शकते आणि मुक्तीचा (अध्यात्मिक उन्नतीचा) मार्ग उघडू शकतो.
असा बायपास उपलब्ध असताना 'धर्म' अध्यात्मात महत्वाचा ठरू शकतो का?
माधव, साधारण पणे 'कळप' हा
माधव,
साधारण पणे 'कळप' हा कोणत्याही प्राण्याच्या शरीरधर्मानुसार चालतो, हे आपण वर पाहीलेच. मानव प्राण्यात, 'विचार करता येणे' हे अधिक असल्यामूळे त्याचा 'विचार' ही अधिकपणे-वेगळा करणे जरूरी आहे, हे ओघाने आलेच.
इथेच 'मनाचा' आणि'मनोधर्माचा' वेगळा विचार करणे भाग आहे.
>>>म्हणजे कुठल्याही कळपाची विचारधारा स्विकारल्याशिवाय सद्गुरुंची प्राप्ती होऊ शकते आणि मुक्तीचा (अध्यात्मिक उन्नतीचा) मार्ग उघडू शकतो.
इथे आपण 'मुक्ती' चा विचार करत असल्यामूळे आणि प्रत्येकाच्या (भले मग 'कळप' एक असूदे तरीही) मनाची, त्याची अहंकारात्मक स्वतंत्र आस्तित्व जाणीव लक्षात घेतल्यामूळे, आपले 'विचार' ही त्या अनुरोधानेच व्हायला हवेत.
विचारधारा कोणतीही असूदे, शरीरधर्मामूळे 'कर्म' हे होतेच.. हे आपण वर पाहीलेच. आणि आपले मन जागृत असल्यामूळे ते कोणतीतरी 'विचारधारा' पकडूनच चालते. मनात 'विचारधारा' नसणे म्हणजे निर्विकल्प अवस्था.
अशा वेळी, कर्मे आपल्या कडून घडत असताना ...श्रीभगवंतानी सांगितलेली स्थिती निर्माण होते.
प्रकृतेः क्रियमाणानि गुणैः कर्माणि सर्वशः |
अहङ्कारविमूढात्मा कर्ताऽहमिति मन्यते ||श्री.भ.गी.३.२७||
देखैं पुढिलाचें वोझें| जरी आपुला माथां घेईजे| तरी सांगैं कां न दटिजे| धनुर्धरा?|| श्री.ज्ञा.३.१७७||
तैसीं शुभाशुभें कर्में| जियें निपजती प्रकृतिधर्में| तियें मूर्ख मतिभ्रमें| मी कर्ता म्हणे ||१७८||
ऐसा अहंकारादिरूढ| एकदेशी मूढ| तया हा परमार्थ गूढ| प्रगटावा ना ||१७९||
हें असो प्रस्तुत| सांगिजैल तुज हित| तें अर्जुना देऊनि चित्त| अवधारीं पां ||१८०||
समोरच्या माणसाच्या डोक्यावरील ओझे, जर आपले ओझे समजून आपल्या डोक्यावर घेतले तर..त्याच्या भाराखाली आपण दबले जाणार नाही काय? अगदी तसेच प्रकृतिधर्माकडून होणारी शुभ्-अशुभ कर्मे, मुर्ख माणूस, भ्रांती-अज्ञाना मूळे, 'मी' केली असे म्हणतो...आणि कर्मफळाचा 'भारवाहू' होतो.
अशा 'मी' कर्ता, अशा अहंकारावर स्वार होणार्या मूढाला, 'परमार्थ' हा कायम गूढच असतो.... !
प्रकृतेर्गुणसंमूढाः सज्जन्ते गुणकर्मसु |
तानकृत्स्नविदो मन्दांकृत्स्नविन्न विचालयेत् ||श्री.भ.गी.३.२९||
एथ कर्मीं तोचि लिंपे| जो गुणसंभ्रमें घेपे| प्रकृतीचेनि आटोपे| वर्ततु असे ||श्री.ज्ञा.३.१८४||
इंद्रियें गुणाधारें| राहाटती निजव्यापारें| तें परकर्म बलात्कारें| आपादी जो ||१८५||
जो प्रकृतीच्या अधिन असतो आणि त्रिगुणाच्या विळख्यात असतो, तो अशा 'कर्मात' लिंपला जातोच.
कारण त्याची सर्व इंद्रीये प्रकृतीगुणकर्मानुसारच स्वतःचा व्यापार करीत असल्यामूळे... दुसर्याचे कर्म जबरदस्तीने तो आपल्या अंगावर घेतोच.
>>>असा बायपास उपलब्ध असताना 'धर्म' अध्यात्मात महत्वाचा ठरू शकतो का?
यातून बाहेर पडण्यासाठी..प्रकृतीच्या अधिन असणार्या... कोणत्याही 'विचारधारेच्या-मनोधर्माच्या' मानवप्राण्याकरीता.. विशेष प्रयत्नांची जरूरी असते.:)
धन्यवाद!
माधव, >>>म्हणजे कुठल्याही
माधव,
>>>म्हणजे कुठल्याही कळपाची विचारधारा स्विकारल्याशिवाय सद्गुरुंची प्राप्ती होऊ शकते आणि मुक्तीचा (अध्यात्मिक उन्नतीचा) मार्ग उघडू शकतो.
श्रीसद्गुरू प्राप्ती कशी होऊ शकते?
महेशा, >>>भौतिक आयुष्य चांगले
महेशा,
>>>भौतिक आयुष्य चांगले चालले आहे. आध्यात्मिक आयुष्याची वाट अजुन सापडत नाहीये.
आणि
या बी.बी. मधील तुम्हाला उद्देशून लिहलेल्या सुरुवातीच्याच पोष्ट मध्ये, खालील प्रमाणे लिहल गेले होते...
.....तुम्ही योग्य मार्गावरच आहात.. आता अजून 'मार्ग' कोठे आहे? असे विचारत 'वेळ' वाया घालवू नका!
याविषयी आता काय वाटत आहे? वरच्या पोष्ट मध्ये श्रीभगवंतानी सांगितलेल पटतय का?:)
म्हणूनच लौकीकदृष्ट्या आपण एखाद्याच्या बुद्धीचे श्रेष्ठत्त्व ठरवून चालत नाही, कारण त्याचे 'मनोधर्म' आहेत तसेच असतात..उलट अजूनच खोल होत जातात. कारण अगोदर श्रीमाउलींनी सांगितल्याप्रमाणे...
...शास्त्र सांगत ...आपली 'बुध्दि' ही 'कर्मानुसारी' चालते, आपल्याच 'गत' कर्मानुसार चालते. तिला आपल भल-बुर कळत नाही. म्हणजे परमार्थाची सुरूवात होताना अशी 'बुध्दि' ही आंधळी असते..पूर्वग्रहदोषीत असते. त्यामूळे ती स्वत्रंतरित्या 'निर्णय' घेऊ शकत नाही..तीला बाहेरच्या 'मदतीची' गरज लागते.
धन्यवाद!
संतश्रेष्ठ श्रीतुकाराम
संतश्रेष्ठ श्रीतुकाराम महाराजांच्या श्रीगाथेतील काही अनुभवाच्या गोष्टी आपल्यालाही 'मार्ग' दाखवणार्या आहेत...
मारगीं बहुत । या चि गेले साधुसंत ॥1॥
नका जाऊ आडराणें । ऐसीं गर्जती पुराणें ॥330.ध्रु.॥
चोखाळिल्या वाटा । न लगे पुसाव्या धोपटा ॥2॥
झळकती पताका । गरुड टके ह्मणे तुका ॥3॥
जो मार्ग(मारग) अगोदर बर्याच साधू-संतानी मार्गील्यामूळे... त्याच्या श्रीचरण रजामूळे, पवित्र झाला आहे..सिद्ध झाला आहे...चालण्यास योग्य झाला आहे... धोपट आहे, अशाच माहीत असलेल्या मार्गाने..त्या मार्गाच्या बळाने.. जाण्यात आपले भले आहे, नाही काय?
मग...एवढ असताना.. आपण परत आडरानाने जाण्यात काय बर शहाणपणा आहे? असे अठरा पुराणें गर्जुन-गर्जुन विचारत आहेत.
आता मार्ग कळण्यासाठी....तशा साधू-संत्-सद्गुरुची गाठही पडावीच लागणार! हे ओघानेच येणार नाही काय?
आता ती गाठ पडल्यावर काय होते?...श्रीमहाराज म्हणतात...
ऐसे ऐसियानें भेटती ते साधु । ज्याच्या दरशनें तुटे भवबंदु ।
जे कां सिच्चदानंदीं नित्यानंदु । जे कां मोक्षसिद्धी तीर्थ वंदूं रे ॥1॥
'सत्-चित-आनंद' मधील नित्य आनंदाची प्राप्ती व्हायची असेल...'मोक्ष' नावाची सिद्धी पाहीजे असेल तर अगोदर 'साधु' दर्शन झाल पाहीजे..त्यामूळे आपलाही 'भवपाश-भवभय' जाईल...आणि त्यांचे 'श्रीचरणतीर्थ' मिळाल्यामूळे..त्याच्या जवळच नित्यवास करणारी 'मोक्षसिद्धी' ही मिळेल.
त्यामूळे अजून काय-काय होईल?
भाव सर्वकारण मूळ वंदु । सदा समबुद्धी नास्ति भेदु।
भूतकृपा मोडीं द्वेषकंदु । शत्रु मित्र पुत्र सम करीं बंधु रे ॥345.ध्रु.॥
'बुद्धी' सम झाल्यामूळे, सर्वाविषयी समत्वाची प्राप्ती होईल.
मन बुद्धि काया वाचा शुद्ध करीं । रूप सर्वत्र देखोनि नमस्कारीं ।
लघुत्व सर्वभावें अंगीकारीं । सांडीमांडी मीतूंपण ऐसी थोरी रे ॥2॥
मन,बुद्धि,काया आणि वाचा मूळच्या शुद्ध स्वरूपात आल्यामूळे..योग साधल्यामूळे.. मी-तू, माझे-तू़झे हे सगळ सांडेल. श्रीभगवत्स्वरूपाची सर्वत्र प्रचीती आल्यामूळे..स्वत:कडे आपोआपच 'लघुत्व' घेतल जाईल आणि सर्वत्र अखंडीत नमस्कार घातला जाईल.
अर्थकामचाड नाहीं चिंता । मानामान मोह माया मिथ्या ।
वर्ते समाधानीं जाणोनि नेणता । साधु भेट देती तया अवचिता रे ॥3॥
अर्थ-काम सुट्ल्यामूळे चित्ताचा व्यर्थ चिंता करण्याचा स्वभाव जाईल. मान्-अपमान या मोहामूळे जन्मणार्या अंतःकरण वृत्तीपासून...त्या मिथ्या आहेत..मायीक आहेत असे 'ज्ञान' झाल्यामुळे..सूटका होऊन अंतरी अखंड 'समाधान' नांदेल.
मनीं दृढ धरीं विश्वास । नाहीं सांडीमांडीचा सायास ।
साधुदर्शन नित्यकाळ त्यास । तुका ह्मणे जो विटला जाणीवेस रे ॥4॥
असे सगळे अनुभव आल्यामूळे, मनामधे श्रीसाधुविषयी-श्रीभगवंताविषयी 'दृढ विश्वास' येईल आणि जाणिव विटेल.
मन, बुद्धि,काया, वाचा या सर्वांची शुद्धी होईल...त्यामूळे जाणिव सूक्ष्म होईल..विटेल..मगच 'जाणीव-नेणीव भगवंती नाही'(जाणणे आणि न जाणणे या बुद्धीच्या वृत्तीची.. निवृत्ती होईल.) याचा अनुभव येईल. त्यामूळेच..या नंतर..अशी अवस्था आल्यानंतरच.. अखंड.... नित्यसाधुदर्शन झाल्यामूळे.... नित्य-आनंदही मिळेल.(त्याच्या अगोदर कदापि नाही.):)
धन्यवाद!
माधव, >>>पण अशीही काही अचतुर
माधव,
>>>पण अशीही काही अचतुर माणसे असतात की ज्यांचा कोणत्याच कळपाच्या विचारधारेवर विश्वास नसतो. पण अशा माणसांनाही (कोणत्याही कळपाच्या आश्रयाशिवाय) सद्गुरु अप्राप्य नसतात. म्हणजे कुठल्याही कळपाची विचारधारा स्विकारल्याशिवाय सद्गुरुंची प्राप्ती होऊ शकते आणि मुक्तीचा (अध्यात्मिक उन्नतीचा) मार्ग उघडू शकतो.
पाण्यामध्ये अनेक प्रकारचे 'जीव'.... नानाविध..अनेक कळप करून रहात असतात....त्यातला एखादा जीव, जर 'मी' कळपाच्या बाहेर रहातो असे म्हणाला...याचा अर्थ तो पाण्याच्या बाहेर रहातो, असे म्हणाला, असे होत नाही. त्याला जे काही करायचे ते 'पाण्यात'(बंधनात) राहूनच करावे लागेल कारण तो त्याचा जन्मतःच बरोबर असणारा 'शरीरधर्म' आहे.
असाच विवेक जर 'मनोधर्माच्या' बाबतीतही केला तर, श्रीभगवंतानी सांगितलेले 'स्वधर्माचे' महत्त्व लक्षात येते.
जर आपल्याकडून 'कर्म' होणे जर आपल्याला टाळता येत नाही...या बंधनात रहाणे जर निसर्गताच आहे..तर ते 'कर्म' स्वधर्माला मान्य असणारे, म्हणजेच 'योग्य' कर्म का करू नये?
असे कर्माचरण-कर्मानुष्ठान करणे म्हणजे 'मोक्ष'-उन्नतीच्या दृष्टीने उचललेले 'पाऊल' ठरणार नाही काय?:)
श्रीसद्गुरू प्राप्ती कशी होऊ
श्रीसद्गुरू प्राप्ती कशी होऊ शकते? >> आपण कोण प्राप्ती करून घेणारे? तेच शोधतात आपल्याला - आपली वेळ आणि तयारी झाली की.
पण ती तयारीच नाकी नऊ आणणारी असते - एक दिशाहीन प्रवास. पण तरी आपण हातपाय मारतच रहायचे.
इथे हल्ली कोणीच येत नाही. सगळ्यांची उपासना पूर्ण झाली का?
बरं, थोडे (म्हटलं तर बरंच) विषयांतर -
अन्धं तमः प्रविशन्ति येऽविद्यामुपासते।
ततो भूय इव ते तमो य उ विद्यायाँ रताः॥ इशावास्य उप. ९॥
सावट, अश्विनी (आणि बाकीचे पण) लिहा तुमचे विचार या बद्दल!
गौरी, नमस्कार! कशा
गौरी,
नमस्कार! कशा आहात?
>>>माधव, वेगळा बाफ काढायला हवा होता आहे हे खरे आहे, आळशीपणा केला . आता परत उपासनेकडे वळुया, जर ह्यावर आणखीन चर्चा होताना दिसली तर वेगळा बाफ काढुन माहिती तिथे कॉपी करेन. बाफचे विषयांतर झाले, त्याबद्द्ल क्षमस्व!
आपल्याला अजूनही असेच वाटते काय?:)
आपल्याला अजूनही असेच वाटते
आपल्याला अजूनही असेच वाटते काय? >> सावट तुमचे लिखाण 'स्व'धर्म या विषयाला धरून होते त्यामुळे विषयांतर कसले?
धन्यवाद माधवा! गौरी काय
धन्यवाद माधवा!:)
गौरी काय म्हणतात, तेही महत्त्वाचे आहे!
माधव,
>>>श्रीसद्गुरू प्राप्ती कशी होऊ शकते? >> आपण कोण प्राप्ती करून घेणारे? तेच शोधतात आपल्याला - आपली वेळ आणि तयारी झाली की. पण ती तयारीच नाकी नऊ आणणारी असते - एक दिशाहीन प्रवास. पण तरी आपण हातपाय मारतच रहायचे.
दिशाहीन का म्हणून?:) आणि दिशाहीन आहे असे माहीत असताना..परत हात-पाय मारण्यात हशील ते काय?
म्हणूनच म्हणतात...
अन्धं तमः प्रविशन्ति येऽविद्यामुपासते।
ततो भूय इव ते तमो य उ विद्यायाँ रताः॥
धन्यवाद!:)
एक दिशाहीन प्रवास >>> नाही हो
एक दिशाहीन प्रवास >>> नाही हो ! आहार विहार आचार विचार या मूलाधारचक्राच्या पाकळ्या शुद्ध राखणे, श्रद्धा सबुरी वाढवत नेणे, यज्ञेन दानेन तपसा ही त्रिसुत्री पाळणे, "पावित्र्य हेच प्रमाण" ये तत्व पाळण्याची पराकाष्ठा करणे.... हे सगळं म्हणजे त्या देवयानपंथावरचे दिशादर्शक. तिथून सरळ सरळ पुढे पुढे जात रहायचे. आपोआप नारदाच्या गावाला जाता येते जिथे सद्गुरु दोन्ही हात पसरुन उभे असतात त्यांच्या लेकरांना भेटायला
अश्विनी, नमस्कार! घरचे सगळे
अश्विनी,
नमस्कार!
घरचे सगळे कसे आहेत?
नमस्कार सावट बरे आहेत.
नमस्कार सावट
धन्यवाद.
बरे आहेत. वयस्कर माणसांचं रुटुखुटु चाललंय. पण चालायचंच
सावट, नवविधा भक्तींवरपण जरा डीटेलमधे लिहा ना एक एक करुन.
सावट, लवकरच सविस्तर लिहू
सावट, लवकरच सविस्तर लिहू शकेन. तो पर्यंत येथे वाचन भक्ती चालू आहेच.
नमस्कार माधव, इथेच आहोत, वाचन
नमस्कार माधव,
इथेच आहोत, वाचन चालु आहे. आपण एवढे छान प्रश्न विचारलेत आणि सावट ह्यांनी एवढे छान विचार मांडले की आणखीन प्रश्न विचारुन त्यात खंड पाडावा अशी इच्छा झाली नाही.
सावट,
नमस्कार! वेगळा बाफ काढायला हवा असे आता अजिबात वाटत नाही. आपण एवढे छान सांगितलेत की आणखीन प्रश्नांना वाव मिळायला नको, तरी एक विचारावेसे वाटते.
जर जीवाच्या वासनेतुन तसा जन्म आणि पर्यायाने उपासनेसाठी धर्म मिळत असेल, तर त्याच जीवाला धर्मांतराची आवश्यकता किंवा दुसर्या धर्माच्या विचाराचे आकर्षण का वाटावे? आज कितीतरी परदेशी व्यक्ती इस्कॉन मंदिरात कृष्ण भक्तीत गढुन गेलेल्या, गुरुद्वारा मधे पंजाबी शिकुन किर्तन सेवा करताना दिसतात, संन्यास्याचे जीवन जगताना दिसतात. देखाव्याचा लवलेश नाही, दिसते ती फक्त भक्ती.
जन्माला आल्यावर त्या जीवाच्या वासना बदलल्या? की त्याचा प्रवास त्याच मार्गाने व्हावा म्हणुन ह्याचे परमात्म्यानेच प्रयोजन करुन ठेवले आहे? ही काय माया आहे?
Pages