मी केलेला वेंधळेपणा!!!!

Submitted by नंदिनी on 20 April, 2009 - 05:42

जुन्या मायबोलीवरचे काही फारच मजेदार बीबी होते. त्यापैकी हा एक!!

http://www.maayboli.com/hitguj/messages/644/104457.html?1225138364

कुणाचे असेच काही गमतीशीर अनुभव असतील ते इथे टाका...

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

झकास... Rofl

काल मी आणि बॉस एक इश्यु सोडवत होतो. माझ्याकडे कीबोर्ड आणि माऊसचा ताबा होता. गोष्ट दोघांच्याही टाळक्याच्या बाहेर गेली तेंव्हा बॉस म्हणाला "Let's Google this". मी तत्परतेनी ब्राऊझर उघडला आणि नेहेमीच्या सवईप्रमाणे address bar मधे maayboli.com टाईपलं.
मायबोली उघडल्यावर तो माझ्याकडे चमत्कारिक नजरेनी बघायला लागल्यावर कळ्ळ काय झालं ते. तरी नशीब की मी नवीन लेखन वर टिचकी मारून नवीन पोष्टी बघायला सुरुवात नाही केली.

खरय श्री Happy
तरी बरं तो बॉस बिचारा गोरा आहे, त्यामुळे त्याच्यापुढे हे काय आलंय ते पण त्याला धड कळ्ळ नाही Happy

Lol

अगदी अगदी परवा मी एका कस्ट्मरास काय विपू बघत नाही का असेच विचारणार होते.
काल हाइट. कुकर मध्ये एक बटाटा व वाटाणे शिजायला ठेवले व झाकण ठेवायलाच विसरले. चहा पीत बसले.
मग वास आल्यावर बघितले तर कुकर मध्ये खलबली माजली होती. मग जीभ चावून झाकण लावले.

मामी Lol

Rofl

मामी Happy श्री Proud
कुकरवाल्यानं मामींच्या विपुत सूचनावजा सल्ला दिला असावा "जीभ चावून कुकरला झाकण लावत चला" म्हणून

"जीभ चावून कुकरला झाकण लावत चला"
कुठं चला ? Proud
काय ते एक फायनलुन सांगा, जिभ चावुन कुकर लावायचं कि चालत चालत ? की लावुन चालायचं.. Uhoh

जीभ चावली >> Biggrin
फॉर द रेकॉर्ड स्वतः चीच जीभ चावली.>>:-P

ग्रेट आहात तुम्ही मामी __/|\__

माबोवरच्या ''घरची बाग'' धाग्यातील ''मेथी, टोमॅटो, कोथिंबीर'' हे मी एवढे दिवस ''मेथी टोमॅटो कोशिंबीर'' असे वाचत होते.... आणि मेथी व टोमॅटोची कोशिंबीर कशी असेल, कशी लागत असेल ह्या कल्पनेनेच थरथरत असे! Wink शिवाय विचार यायचा, घरच्या बागेतल्या टोमॅटो व मेथीच्या कोशिंबीरीत असे काय खास असेल? Proud
आज नीट वाचल्यावर ते कोशिंबीर नसून कोथिंबीर आहे हे कळले!!!!!

अरु Happy

मामी जीभ चावल्याशिवाय झाकण लागत नाही का ? काय म्हणावं तुमच्या कुकरला ?

शिर्‍या सिक्सर रे सिक्सर , या पानावर आज सगळे गडबडा लोळण्याचेच काम आहे...

:).

कुकर, धूसर चष्मा, हरीण, कुत्र्याचं पिल्लू Rofl

नुकतंच घर बदललं. नवीन घराच्या टॉयलेटमधे वॉटर जेट बसवलेला आहे. याआधी हा प्रकार कधीच वापरलेला नसल्यामुळे हाताळायची फारशी सवय नव्हती. परवा रात्री लाईट गेलेले असताना एका अत्यंत महत्त्वाच्या कामासाठी (:फिदी:) टॉयलेटची वारी करावी लागली. (त्या कामाला इमर्जन्सी लँप तरी कशाला हवा म्हणून तशीच गेले.) काम उरकल्यावर गुडुप अंधारात हाताने साधारण चाचपून, अंदाज घेऊन वॉटर जेट उचलला आणि त्याचा नॉब दाबला. आणि एक जोरदार कारंजं मागून डोक्यावर उडलं. (चाचपून, अंदाज घेतल्यावर सुध्दा मी तो उलटा पकडला होता. :फिदी:)

Pages