चित्रपट कसा वाटला? (जुना धागा)

Submitted by admin on 2 June, 2008 - 02:50

आपण नुकताच पाहिलेला एखादा नवीन अथवा जुना चित्रपट आपल्याला कसा वाटला? आपले परिक्षण "नवीन लेखनाचा धागा" वापरुन लिहावे.

या आधीची समिक्षा इथे पहा.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

LSD नक्कीच बघण्यासारखा आहे.. दिबाकर बॅनर्जीच्या सर्वोत्कृष्ट चित्रपटांपैकी एक नसला तरी तद्दन बाजारु चित्रपटांपेक्षा नक्कीच उजवा आहे.. वेगळा प्रयत्न आहे..

ट. सा. चि. अनुमोदन. Even I can not relate to NRI Raj Rohit types and their plastic lady loves. LSD is gritty, disruptive and disturbing. very real life. KJ and aditya Chopra belong in a pink padded cell. Bhat is a punishment by himself.

LSD is gritty, disruptive and disturbing. very real life. >> बरोबर शब्दांत, अगदीच.

काल सध्याच्या क्रिकेट ज्वरा वर आधारित पोगो वर 'मिराबाई नॉट आऊट' पाहीला. एक हलका फुलकाचित्रपट. महेश मांजरेकर, मंदिरा बेदी, अनुपम खेर, मंडळी आहेत. २-२ १/२ तास टेंशन फ्री गेले.

अरे वा LSD चा रीपोर्ट आला का, मला बघायचाय. दिबाकर बॅनर्जीचे आधीचे दोन्ही सिनेमे मला आवडले होते. खोसला का घोसला आणि ओय लक्की लक्की ओय पण. त्या नेहमीच्या रटाळ प्रेमपटांपेक्षा हे दोन्ही खूप चांगले होते.

इश्कियॉ पाहिला शेवटी. आणि पल्प फिक्शन पाहिल्यावर वाटले होते तसेच वाटले. चित्रपट नक्की बघण्यासारखा आहे, शेवटपर्यंत उत्सुकता टिकवतो. 'दिल तो बच्चा है' आधी विशेष आवडले नव्हते, पण चित्रपटात मस्त वाटले. विद्या बालन, नासिर, अर्शद वारसी सगळ्यांची कामे मस्त झाली आहेत. पण एवढे असूनही सगळीकडे जेवढे त्याचे कौतुक झाले तेवढा ग्रेट का आहे ते कळले नाही. दिग्दर्शकाला काय दाखवयाचे आहे यातील बराच भाग निदान पहिल्यांदा बघताना समजला नाही. आता ते पॅशन फॉर सिनेमा पासून इतर ब्लॉग्स व रिव्यू वाचून बघतो Happy

आधी इतरांनी काही न समजलेल्या गोष्टी लिहीलेल्या आहेत त्यात तो जिजा शेवटी यांना सोडून का देतो ते मला कळले नाही, हे एक आणखी.

Up in the air एकदम मस्त, आवडला. जॉर्ज क्लूनी जरा म्हातारा दिसतो आता, किंवा दाखवलाय, पण त्याचे काम, संवादफेक यामुळे जास्त आवडला. त्याच्या त्या ज्युनियर चे कामही मस्त झाले आहे.

आजचे कोडे:

ए.के. हनगल, प्रेमनाथ, निरूपा रॉय, सिमि गरेवाल यांना खरोखरीचे तरूण कोणी पाहिले आहे काय?

मामी,
तरुणपणीचा प्रेमनाथ 'बादल,सिकंदर ए आझम' मध्ये पाहिलाय. रुबाबदार दिसत असे. मधुबाला उगाच त्या दिलप्याच्या मागे धावली.
तरुण निरुपा रॉय 'रानी रुपमती' मध्ये पाहिली होती.
ए.के.हनगल हा माणुस कधीतरी तरुण होता यावर माझा विश्वास नाहीय Proud
तेच सिमी गरेवालबाबत Proud

आशुतोष ०७११ यांस जल्दी फाइव पारितोषिक जाहीर. जोरदार टाळ्या.

सिमितैंचा मेरा नाम जोकर मधील रोल विसरले काय भौ?
ए.के. हनगल बद्दल अनुमोदन.

आजचे दुसरे कोडे:

अरे ओ सांभा मधील सांभा चे नाव त्या सीन मधील एका मराठी नटाचे नाव सांगा.

>>मधुबाला उगाच त्या दिलप्याच्या मागे धावली >> आशु लई म्हणजे लईच हासले Lol Rofl

फारेन्डा, इश्किया बद्दल अनुमोदन.. जेव्हडा टिकाकारांनी/कल्ट सिनेमा प्रेक्षकांनी डोक्यावर घेतला तेव्हडा मला देखील ग्रेट वाटला नाही.. अभिषेक चौबे/विशाल भारद्वाजकडून अधिक चांगल्याची अपेक्षा आहे.. चित्रपट बघितल्या बघितल्या माझ्या मनात आलेली प्रतिक्रिया होती: एका अत्यंत ताकदीच्या लघुकथेची शेवटी वाट लावली.

बाकी पीएफसीवगैरेवरसुद्धा कंपूगिरी चालते जोरदार.. तिथे फारच तळी उचलली गेली होती इश्कियाँची.. कधीकधी अगदी अनुराग कश्यपसुद्धा पक्षपाती अनुदिनी लिहितो उदा: जब वी मेट चे केलेले कौतुक.. तद्दन भंपक सिनेमा केवळ मित्राचा आहे म्हणुन अनुरागने त्याला भारी म्हटले होते..

दिल तो बच्चा है जी मात्र पहिल्यापासूनच आवडले होते Happy

सिमी ग्रेवाल विनोद खन्नाची नायिका होती हाथकी सफाईत. मनोजकुमारच्या दो बदन मध्ये ती सेकन्ड लीडला होती. ती पहिल्यापासून स्टायलिश होती. अवाढव्य नायिकांच्या जमान्यात मेन्टेन असणारी ती एकमेव बाई होती. नन्तर झीनत आली. सिद्धार्थ ह्या इंग्रजी चित्रपटात तर ती शशी कपूरची नायिकाच होती .जोकरमध्ये तर तिचा कॅरॅक्टर रोलच आहे. सध्या ती ६३ वर्षांची आहे Sad

सध्या ती ६३ वर्षांची आहे

cant believe... म्हणजे ती खरेच मेंटेंड आहे. देव आनंदच्या तिन देवीया मधली एक देवी... खुप छान दिसायची, एकदम बाहुलीसारखी....

'दिल तो बच्चा है' साठी इश्कियाला सारे गुन्हे माफ.

काल 'तुम मिलो तो सही' पाहिला. नाही आवडला. नाना आणि थोडीफार डिंपल सोडल्यास बाकी कलाकार सहन होत नाही. पण नाना-डिंपल यांनाही वाया घालवले, असे वाटते.

तेच ते आक्रस्ताळे टाळीवसूल रोल आता नानाने आता नाही केले तर बरं पडेल.

सिमि फार कोल्ड वाटायची. मीनाक्षी शेषाद्री सारखी. शेषाद्री तरी नाचायची. सिमी नाचलेली आठवत नाही . (चुभूदेघे)त्यात ती सारखी तिची जुल्फं साम्भाळीत असायची. तिनी कधी असं समरसून प्रेम अथवा रोमान्स केलाय असं वाटायचच नाही. ती एखाद्या प्रोफेशनल रिसेप्शनिस्ट सारखी वाटायची.

सिमि फार कोल्ड वाटायची. मीनाक्षी शेषाद्री सारखी>> अनुमोदन मिनाक्षी = मुळा. ब्लँड. सिमीचे सायरसने सिमी गिरेबाल म्हणून मस्त विडंबन केले आहे.

तिनी कधी असं समरसून प्रेम अथवा रोमान्स केलाय असं वाटायचच नाही. ती एखाद्या प्रोफेशनल रिसेप्शनिस्ट सारखी वाटायची.

येस... अगदी अगदी..... मिनाक्षी बरीच बरी तिच्या पुढे..

टोणगा, सिमी गरेवाल बद्दल अनुमोदन.
मामी, अशोक कुमारला विसरलात काय ? ही व्यक्तीही कधी तरुण नव्हतीच !

सिम्मीचा (तिचे खरे नाव बहुदा. अनुराधा ) मला आवडलेला एकमेव सिनेमा म्हणजे, दो बूंद पानी (हिरो जलाल आगा ), कथा आणि जयदेवचे संगीत ( पितल कि मोरी गागरी, भाभी तोरी बिंदिया कि आणि जा रि पवनीया, पिया के देस जा ) दोन्ही उत्तम होते.
तसे तिने फार काम कुठे केले ? देवानंद बरोबर (बहुदा तीन देविया ) ऋषी कपूर आणि मनोज कुमार बरोबर, मेरा नाम जोकर, आणि शशि कपूर बरोबर, सिद्धार्थ असे काहिच आठवताहेत.

इन्साफ का तराजू मधे, ति बहुदा वकीलाच्या भूमिकेत होती. जया भादूरीच्या पण एका सिनेमात ती तश्याच भूमिकेत होती.

कमलेश्वरच्या कथेवर, मुसाफिर नावाचा एक सिनेमा आला होता, त्यात तिचे तीन नायक होते.
(मुसाफिर नावचे तीन सिनेमे होते, पहिल्यात सुचित्रा सेन, निरुपा रॉय, किशोर कुमार, दिलीप कुमार आणि उषा किरण होते, यात दिलीप कुमारने लताबरोबर गाणे गायलेय.
तेंडूलकरांच्या अशी पाखरे येती, वर पण एक मुसाफिर नावाचा सिनेमा आला होता, त्यात नासिरुद्दीन शहा, रेखा, मुनमुन सेन आणि पंकज कपूर होते. )

येस्स दिनेश साहेब. मला तिचा नायिका असलेला चित्रपट आठवलाच नाही. जलाल आगा बरोबरचा. सिमी आहे मात्र ग्रेसफुल. ती चीप कधीच वाटली नाही. अगदी जोकरच्या 'त्या' सीनमध्येही. राँदेव्हू मध्ये तिच्या ग्रेससह (आणि तिची ती जुल्फं)सह दिसते मात्र डोळ्यांची वाट लागलीय ... ती काळाच्या थोडी पुढेच होती असे म्हणता येईल...

सिम्मीचा (तिचे खरे नाव बहुदा. अनुराधा ) मला आवडलेला एकमेव सिनेमा म्हणजे, दो बूंद पानी (हिरो जलाल आगा ), कथा आणि जयदेवचे संगीत ( पितल कि मोरी गागरी, भाभी तोरी बिंदिया कि आणि जा रि पवनीया, पिया के देस जा ) दोन्ही उत्तम होते.

काय आठवण करुन दिलीत दिनेश... अतिशय सुंदर चित्रपट - दो बुंद पानी... परत बघायला मिळाला तर जरुन बघेन. आज शोधते ऑनलाईन.. दुरदर्शनच्या कृपेने तेव्हा पाहिलेला...

मी अशोककुमारला तरुण पाहिलेय, अमरिश पुरीलाही पाहिलेय, पण एके हन्गल is one and only one- जुन्या चित्रपट पाहताना मी ओळखीचे चेहरे नेहमी शोधत असते, पण हा एक चेहरा मात्र कधी चुकुनही सापडला नाही.... (काल मिस मेरी पाहात होते, त्यात ओमप्रकाश तरुण आहे, पण डोक्यावर केस मात्र म्हातारा झाल्यावर जेवढे होते तेवढेच..... )

हंगल हा रंगभूमीवरचा डावा कार्यकर्ता. तो इप्टाच्या माध्यमातून चित्रपटात आला तो खूप उशीरा. त्यापूर्वी तो रंगभूमिवर कार्यरत होता. बहुधा तो १९६७ च्या दरम्यान चित्रपटात आला. म्हणजे ५० व्या वर्षी. त्यामुळे त्याने मध्यमवय पार केलेले होते त्यातच लवकर पडलेले टक्कल त्यामुळे त्याने थेट चरित्रभूमिकाच केल्या त्यामुळे तो जुन्या चित्रपटात तरुण आढळणे शक्य नाही.(आज हंगल ९३ वर्षांचे आहेत.) अशोककुमारचा भालप्रदेश उंच असल्याने ते टक्कलच वाटे. तरुणपणीही रसेच दिसते. त्यात त्याचा पंचकोनी चेहरा... Happy

Pages