चित्रपट कसा वाटला? (जुना धागा)

Submitted by admin on 2 June, 2008 - 02:50

आपण नुकताच पाहिलेला एखादा नवीन अथवा जुना चित्रपट आपल्याला कसा वाटला? आपले परिक्षण "नवीन लेखनाचा धागा" वापरुन लिहावे.

या आधीची समिक्षा इथे पहा.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आपल्याकडे सिनेमा कितीही चांगला असला तरी शेवट मात्र खूपदा गंडलेला असतो,आपल्याकडे म्हणजे अमेरिकेत? Uhoh

स्वप्ना, ' ऐतराज ' आणि 'डिस्क्लोजर " मधे एक बेसिक फरक आहे. डिस्क्लोजर मधे डेमी मूर जे काही करते त्याला corporate politics चं सबळ कारण आहे. ऐतराज मधे प्रियांकाचं पात्र नुसतंच sexually frustrated दाखवलंय.

सिन्डे रिक्षा फिरवायला सुरुवात केली की काय.?

ज्याना करन जोहरचा दिमाग खराब आहे हे माहीत असूनही जे सम्पूर्ण करण जोहर पाहतात त्यांच्या दिमागाला काय म्हणावे?

कार्तिक कॉलिंग कार्तिक मिळाला नाही म्हणून तो आणला हे जर उत्तर असेल कार्तिकला जोहर कसा काय पर्याय असू शकतो याचे उत्तर द्यावे लागेल. म्हणजे मदर इंडिया मिळाला नाही म्हणून गजगामिनी आणला असे आहे का?
पा.शा मोड ऑन
आणि पुन्हा उच्च अभिरुचीच्या गोष्टी करायच्या
पां शा मोड ऑफ

काल फिल्म फेअर गौरव पुरस्कार मध्ये पण खूपवेळ माय नेम इज चे निर्लज्ज जाहिरात करणे झाले. आम्ही तीन सोह्ळे आलटून पाल्टून बघत होतो. झी गौरव मराठी, गोल्ड्न ग्लोब्स व फिल्म फेअर. फिल्म फेअर अगदी वाइट. गोल्ड्न ग्लोब क्लासी पण बोरिन्ग व झी गौरव मस्त मजेदार. फिल्म फेअर मध्ये इतकी वाईट कमरेखालच्या विनोदांची पातळी का गाठावी लागते. तशी जबरदस्ती तर आजिबातच नाही. एकतर तो सेट अगदी डोके बधीर करतो इतके लेसर व रंग मारतात. सुमार न्रुत्ये ब्याकार संगीतावर सादर केली गेली. त्यात त्या बक्षिसाची सँक्टिटी कमी होते. भरीला दोन नवम्हातारे शारुख व सैफ. झी गौरव वरील नटरंगचे विडंबन आवड्ले. मराठी कलाकार जरा नॉरमल वाट्तात वागताना. गोल्ड्न ग्लोब बघताना उगीचच दुसरयाच्या पार्टीला गेल्यासारखे वाट्ते.

येस मामीसाहिबा अगदी अचूक निरिक्षण... शं ना नवरेंचं भाषण सुन्दर होतं जीवन गौरवावर.
आय बी एन लोकमत्चे विडम्बन चांगले होते. विशेष्तः निखिल वागळेची नक्कल पाहून वागळे देखील हसला असेल पोट धरून धरून.

दोन नवम्हातारे Lol

मध्ये एकदा चॅनेलवर दाखवत होते, सैफ अली परत पूर्वीची हेअरस्टाईल ठेवणार आहे. का तर म्हणे त्याची गर्लफ्रेंडच त्याच्या अर्ध्या वयाची आहे मग तरूण दिसायला नको कां? काय करेल बिच्चारा.

झी गौरव सोहळा चांगला झाला.. अतुल कुलकर्णीला बक्षीस मिळायला हवं होतं मात्र.. आजचे ऑस्कर्स पण भारी.. ऑस्करचा सोहळा इतका नेत्रसुखद आणि तांत्रिकदृष्ट्या सरस असतो, त्या तुलनेत आपले सोहळे एकदम बकवास..

'अतिथी तुम कब जाओगे' पाहिला. एकदा पाहण्यासारखा आहे. हलकाफुलका , नर्म विनोदी असा चित्रपट आहे. परेश रावल जबरदस्त, अजय आणि कोंकणा सेन यांनीही छान कामे केलीत.

यातील कालियाचा प्रसंग तर जबरदस्त, फार मजा आली तो सीन बघताना. अजय देवगण लिहित असलेली स्क्रिप्ट पण खतरनाक. शेवटचा ट्विस्ट पण सही आहे.

यात 'बीडी जलैले' च्या चालीवर असलेले दुर्गामातेचे गाणे मजा आणते.

दोन नवम्हातारे Lol

'अतिथी तुम कब जाओगे' यातील कालियाचा प्रसंग तर जबरदस्त, फार मजा आली तो सीन बघताना. अजय देवगण लिहित असलेली स्क्रिप्ट पण खतरनाक. शेवटचा ट्विस्ट पण सही आहे.>>>

अनुमोदन.... बर्याच दिवसांनी " क्लिन " चित्रपट पहायला मिळाला....

दोन नवम्हातारे !!!!

मामी, फिल्म फेअर मधे कधीही, चित्रपटावरचा दर्जेदार लेख वाचल्याचे आठवतोय का ?

बरेच फडतूस पिक्चर्स येऊ घातले आहेत. कोण बघायला जाणारे असले पिक्चर्स ते प्रोड्युसर्स आणि डिरेक्टर्सच जाणोत. उदा. प्रिन्स, त्या विवेक ओबेरॉयला बघायला कोणी जाईल असं वाटत नाही. स्वाहा, ना घर का ना घाट का (तद्दन भिक्कार जोक्स आहेत आणि त्याही पेक्षा भिकार तो रविकिशन), प्रेम का गेम, लव्ह सेक्स और धोखा इ.इ.

मामी, फिल्म फेअर मधे कधीही, चित्रपटावरचा दर्जेदार लेख वाचल्याचे आठवतोय का ?>> एकदम पटेश.

आशा भोसलेंची मुलाखत कशात होती?>>>
कदचीत साम वर होती. पेपर मध्ये जाहिरात पण होती. कुठ्च्या च्यानेलवर होती ते आठवत नाही.

मी मराठी वर होती. 'स्वरआशा' असा कार्यक्रम होता. चांगला कार्य्क्रम. बाबासाहेब पुरंदरे आशाताईंबद्दल बोलताना दोघांनाही भरुन आलं तो प्रसंग ह्रद्य होता. राज ठाकरेने तेवढ्यात भाषणाची हौस भागवली. कय तर म्हणे, 'आशाताईंची प्रादेशिक गाणी त्या त्या प्रदेशातल्या लोकांना आपली वाटतात. कारण का, तर त्या मराठी आहेत म्हणून!' यात तो स्वतःच म्हणाला की माझे हे मराठी प्रेम सारखे उफाळून येते त्याला रोखू शकत नाही. झी गौरव चांगला. पण आपल्या 'गुणा' ला बक्षीस नाही दिले म्हणून राग आला.
फिफे टुकार.

ऑस्कर सोहळा पाहिला, निखळ करमणूक! झटाझट अवॉर्डस देतात,फालतू बडबड नाही आणि स्मार्ट विनोद करणारे स्टीव्ह मार्टीन आणि अलेक बाल्डविन उदा. 'दिज आर द इनग्लोरिअस बास्टर्ड्स' आणी दुसर्‍या दिशेला हात करत 'अँड दिज आर द पीपल हू मेड इट', 'द अकॅडेमी अ‍ॅक्सेप्ट्स एंट्रीज फ्रॉम ऑल ओव्हर द वर्ल्ड अँड देन कम व्हाट मे,दे नॉमिनेट मेरिल स्ट्रीप'.जॉर्ज क्लूनीचीही प्रचंड खेचत होते दोघे.

आज "अप" हा अ‍ॅनिमेशन चित्रपट पाहिला, मस्त आहे. आजोबा आणि त्यांचा छोटा मित्र यांचा प्रवास छान घेतलाय. भरपूर अ. आणि अ. घटना आहेत पण हा अ‍ॅनिमेशन चित्रपट असल्याने दुर्लक्ष करता येते. बोलणारी कुत्री मजा आणतात. नुकताच याला ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे.

ऑस्कर मधे 'Best Actress' असा पुरस्कार दिला जातो तर त्यालाच आपल्या कडे 'Best Actor Female' असे म्हणतात. असे का?

बरेच फडतूस पिक्चर्स येऊ घातले आहेत. >> ह्या साठी आपण इथे '२००९ चा सर्वात फडतुस चित्रपट' असा पुरस्कार जाहीर करु Happy

>>ह्या साठी आपण इथे '२००९ चा सर्वात फडतुस चित्रपट' असा पुरस्कार जाहीर करु >> नक्की, फडतुस चित्रपटांची यादी कळाल्यावर मजा येईल Happy
महागुरु, शक्य असल्यास नवीन धागा काढला तर भरपूर यादी मिळेल.

मी 'शॉर्टकट' (अक्षय खन्ना, अर्शद वारसी, हडकुळी अमृता राव यांचा) या चित्रपटाला नामांकित करतोय.

'आशाताईंची प्रादेशिक गाणी त्या त्या प्रदेशातल्या लोकांना आपली वाटतात. कारण का, तर त्या मराठी आहेत म्हणून!'>>>>
पण तस म्हणायला गेल तर मंगेशकर कुटुंबिय गोव्याच की

त्या यादीत चान्स पे डान्स पण टाका... आमच्या घरी आज सक्काळीच लागलेला..... एकही मिनिट उत्सुकता वाटत नाही, पुढे काय होईल याची..

'अप इन द एअर' पाहिला. मस्त आहे. कर्मचार्‍यांना कामावरून कमी करण्यासाठी मदत करणार्‍या एजंसी मधील व्यक्तीची कथा आहे. जॉर्ज क्लूनीने छान काम केलय.
कामानिमित्त केलेला एकूण विमान प्रवास हा १०मिलीअन होतो. त्यामुळे तो जणू हवेतच ('अप इन द एअर' ) राहत असतो.

कर्मचार्‍यांना कामावरून कमी केल्यानंतर त्यांच्या प्रत्येकाच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया, त्यांना जॉर्ज ने दिलेली उत्तरे छान दाखवलीयेत. त्याची सनताली''नताली' जेव्हा ऑनलाइन पद्धत वापरायचे सुचवते तेव्हा त्यात आलेल्या अडचणी अथवा त्यातील त्रुटी पण छान दाखवलय.

जेव्हा 'नताली' एका स्त्री कर्मचार्‍याला कामावरून कमी केल्यानंतर काही दिवसांनी त्या कर्मचार्‍याने आत्महत्या करणे, तेव्हा नतालीला बसलेला बसलेला अथवा जॉर्ज एका कर्मचार्‍याला सकारात्माक पध्दतीने त्याच्या भविष्याबद्दल पटवून देतो असे प्रसंग छान जमलेत.

जॉर्जच्या बहिणीच्या लग्नानिमित्त तिचे व तिच्या नवर्‍याने जगप्रवास केला हे इतरांना दाखवण्यासाठी त्यांच्या कटआऊटचे विविध प्रेक्षणीय स्थळांसमोर छायाचित्रे काढणे ही कल्पना मस्त वाटते प्रत्यक्षात वापरायला. Happy

रंगासेठ धन्यवाद, बर्‍याच दिवसांपासून कोणीतरी याबद्दल लिहीण्याची वाट पाहात होतो. येथील एनपीआर (रेडिओ चॅनेल) वर याबद्दल एक प्रोग्रॅम ऐकला होता तेव्हापासून उत्सुकता होती. पाहायला पाहिजे.

रामगोपाल वर्मा कि आग ला विसरले कि काय लोकं? फडतूस चित्रपटांचा अघोषित सम्राट आहे.

काल अन्दाज अपना अपना पुन्हा एकदा पाहिला.. बर्‍याच दिवसांनी खळखळून हसलो.. मै हू तेजा, मार्क इधर है Happy

Pages