चित्रपट कसा वाटला? (जुना धागा)

Submitted by admin on 2 June, 2008 - 02:50

आपण नुकताच पाहिलेला एखादा नवीन अथवा जुना चित्रपट आपल्याला कसा वाटला? आपले परिक्षण "नवीन लेखनाचा धागा" वापरुन लिहावे.

या आधीची समिक्षा इथे पहा.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी पण पाहीला लालबाग्-परळ, नाही आवडला तितकासा, अभिनय सगळ्यांचाच छान आहे पण अति हिंस्त्रक वाट्ला, थोड ओव्हरच दाखवलय सगळ, लहान मुलांनी तर पाहायलाच नको, जी काय थोडी फार चांगली मुल आहेत, मेहनत करुन जगणारी (गरीब असुनही) ती ही वाया जातील हे पाहुन, शाळकरी मुलांना तरी 'तसे' नको दाखवायला हवे होते....... पुर्ण चित्रपट एकाच कुटुंबावर आधारीत वाटतो, अजुन इतरही ४-५ घरातील वातावरण दाखवायला हवे होते, नी त्याही घरातील मुल आधीच (मिल बंद व्हायच्या) चुकीच्या मार्गावर गेलेली असतात. मंजु हे कॅरॅक्टर आधीच वाईट वळणावर गेलेल असत जर ती मिल बंद झाल्यामुळे, गरिबीमुळे, नाईलाजाने त्या मार्गावर गेलि असती तर योग्य वाटल असत. मोहन-मामी या व्यक्तींचा नी चित्रपटाच्या विषयाचा काही संबंधच लागत नाही उगाचच 'इतर संबंध' दाखवण्यासाठी घुसडल गेलय अस वाटत, नाही तर 'त्या' प्रकाराचा नी पुन्हा तेच मिल बंद, गरीबी, नाईलाज यांची काहीच लिंक जुळत नाहीय. नरु हा ही अगोदर पासुनच भाईगिरि, गुंडगिरी कडे झुकलेला असतो हे सगळ आधी पासुनच त्या घरात चालु असत, मिल बंद झाल्यावर ते आणखी भीषण होत इतकच.

सगळच निगेटिव्हिटी कडे झुकणारा चित्रपट आहे अस माझ मत.......
गिरणी कामगारांच नुकसान झाल, त्यांच्या संसाराची, मुलांच्या शिक्षणाची, आयुष्याची वाताहत झाली मान्य आहे, पण याचा अर्थ असा होत नाही ना की सगळीच मुल, कुटुंब वाईट मार्गावर गेली, त्याही परिस्थितीला धैर्याने तोंड देऊन, त्यावर मात करुन , चांगल्या गोष्टींच्या आधारावर काही कुटुंब तरी तारली गेलीत, स्वतःच्या हिमतीवर तग धरुन उभी आहेत अजुनही, जेमतेम शिक्षणावरही जोर धरुन योग्य नोकरी करुन, धंदा करुन आपल घर अजुनही चालवताय्त. यालाही त्यातले काही गिरणी कामगार साक्ष आहेत.
माझ व्यक्तीगत मत इतकच की थोड तरी पॉझिटीव्ह दाखवायला हव होत, नी इतकच जर सर्वाना त्या वेळची परिस्थीती दाखवायची, समजावायची होती तर कमीत कमी सर्वानी , पुर्ण कुटंबानी एकत्र बसुन पाहण्यासारखा तरी करायला हवा होता. एक मराठी चित्रपट म्हणुन आपण बहुतेक वेळा सहकुटुंब जातो डोळे झाकुन तेव्हा ही एवढी अपेक्षा असण रास्तच आहे ना???

एकदोघांच्या पोस्ट वरुन, मला तो सिनेमा मुद्दाम लोकप्रियतेकडे झुकणारा केलाय असे वाटते. माझ्या कल्पनेप्रमाणे, हा कथाभाग अधांतर नाटकाच्या पुढचा असायला हवा होता. वर शिल्पाने लिहिल्याप्रमाणे, त्यातूनही सावरलेली कुटुंब आहेतच.
परत नाटकाची आठवण आली. नाटक अंगावर येत असले, तरी संयंमपूर्ण होते.
आईच्या भुमिकेत ज्योति सुभाष आणि मुलांच्या भुमिकेत, राजन भिसे, संजय नार्वेकर, भरत जाधव आणि लिना भागवत होते. शेजारणीच्या भुमिकेत सविता मालपेकर असत.
या संपाच्या काळाला, मी साक्षीदार आहे. पण हा कथाभाग थोडा अतिरंजितच झालाय.

मी काल, चान्स पे डान्स, नावचा सिनेमा बघितला. शहिद कपूर उत्तम नाचलाय. पण मला जेनेलिया चा नैसर्गिक अभिनय जास्त आवडला. तिला चांगल्या भुमिका मिळायला हव्यात. बाकि कथानक, काहि खास नाही.
किसिंग कझन्स, हा इंग्रजी सिनेमा पण बघितला (आता हेच दोन का बघितले, याचे कारण यांच्या सिड्या मिळाल्या) सम्राट चक्रवर्ती, हिरो. त्याचा जगावेगळा व्यवसाय. तो प्रोफेशनल हार्ट ब्रेकर. मोडत आलेली नाती, मोडण्यात एक्स्पर्ट. त्यासाठी तो दाम मोजतो. पण त्याच्या मागे एक कथा आणि त्याला त्यापासून परावृत्त करणारी त्याची कझन. (हि आशियायी नव्हती, तरी आशियायी दिसत होती.) कथानक अगदी वेगळे. शेवट, उगाचच धक्का देणारा नाही. (ती खरेच त्याची कझन असते.) पण ठिक वाटला.

मला जेनेलिया चा नैसर्गिक अभिनय जास्त आवडला. >>> दिनेशदा अनुमोदन , जेनेलियाचा अभिनय खरचं नेहमीच नैसर्गिक / अवखळ असतो पण तरीही तिला म्हणावा तसा वाव मिळाला नाही .

दिनेश त्यात शाहिद सकाळी उठून लचकत मुरड्त जातो ते, व कार मध्ये राहतो, सकाळी उठून वडापाव ब्रेकफास्ट करतो ते सीन मजेशीर आहेत ना. शाहिदचा नाच ही चांगला आहे.

जिनिलियाचा आवाज कर्कश्श आणि डोकं उठवणारा आहे. Angry
प्रत्येक शब्दावर उगिचच भर देऊन किंचाळून बोलते... Sad
बाकी बरी वाटते.

अरे अपिरिचीत लै चालला होता साउथमध्ये.. ह्यातच एक खतरनाक ड्व्यायलॉग आहे विक्रमचा:

पब्लिक मधली एक युवती: लेकिन क्या इतनी छोटी गलती के लिये इतनी बडी सजा सही है?
विक्रमः गलती कोई बनियान का साइज नाही, स्मॉल, मिडीअम, लार्ज.. मेरे लिये हर गलती एक्स्ट्रा लार्ज है..

फारेन्डा, फ्रेन्ड्सबद्दल पुन्हा अनुमोदन.. मामी, अपने पास भी वरिजिनल डीव्हीडी है.. कब मॅरॅथॉन लगाना है?

दोन बायका चूप बसल्यातरच बर्‍या: मिनिशा लांबा नाजून उत्तम दिसणे तोंड उघड्ले की भाता चालल्यासारखे फुसफुसत बोलते.

जेनिलिया. गोड दिसणे पण काहीच त्यात सबस्टन्स नाही.

गलती कोई बनियान का साइज नाही>>> Lol

मामी कतरिना ही आली त्यात (चूप बसल्यातरच कॅटेगरी)

मी पाहिलाय अगदी आवडीने 'अपरिचित'. काय अ‍ॅक्शन आहे बाभो! शेवटी तर तो झटक्यात साधा आणि झटक्यात सैतान बनतो ते तर अवर्णनीय!! अभिनयाची कसोटीच!! बनियानच्या साईझसारखे ओरिजिनल डायलॉग तर आपल्याला सुन्न करतात! वा! मी लकी आहे, की हा चित्रपट मी पाहिलाय.

Proud

जेनेलियाबद्दल अनुमोदन. दिसायला फार गोड, पण बोलणं- अरेरे. लय नाकात Sad

मला तर कतरिनाचे इंग्रजी पण नाही कळत. तिला अन अ‍ॅक्टिन्ग चा स्ट्रेस येतो म्हणे. ऐतेन?

तिला अन अ‍ॅक्टिन्ग चा स्ट्रेस येतो म्हणे.Happy

तिने नुसते गालातल्या गालात हसत राहावे.. अ‍ॅक्टींग करायला कोणी सांगितले.. Happy अप्रेगक मध्ये खुप गोड दिसते ....

रजनीचा 'शिवाजी द बॉस' पाहिला. शंकरच्या आत्तापर्यंतच्या सिनेमातला सगळ्यात साधा सिनेमा.रजनीची कॉईन खिशात टाकण्याची स्टाईल अफाट.त्याचं विनोदी प्रसंगाचं टायमिंग जबरी आहे. हिरॉईन त्याला तो काळा आहे म्हणून नकार देते तो सीन पहाच,काळेपणावरून साउथमधे असलेल्या न्यूनगंडाची मस्त खिल्ली उडवली आहे,त्यात पुन्हा कमल हसनलाही एक टोमणा ठेउन दिलाय.शेवटची मारामारी अ आणी अ,पण शंकरला तेवढे मार्जिन द्यावेच लागते.

मोझर बेअर च्या सिडीज घेतल्या, की त्यात बहुदा एक जूनी (न खपलेली) सिडी फ्री मिळते. मला अशीच, आतंक हि आतंक, नावाच्या सिनेमाची सिडी मिळाली. आमिर खान, जूही चावला आणि रजनीकांत चे फोटो होते वर.
धीर करुन बघितली, भयानक !!!
आमिरला विशेष काम नाही. जूही सिनेमात शोधावी लागते. रजनीकांत ची हिरॉईन चक्क, अर्चना जोगळेकर !! (काळाकुट्ट तो आणि गोरीपान ती !!! ) ते दोघे पाहताक्षणीच एकमेकांच्या प्रेमात पडतात म्हणे !!
एवढी नृत्यनिपूण ती, पण तिला दिलेला नाच, अगदीच फिल्मी. तिच्या आईच्या भुमिकेत, सुहास जोशी, दोघीनाही वाया घालवलेय.
बाकि सिनेमा म्हणजे अ. आणि अ. चा बाप !!!
कालच २०१२ बघितला. इथे आधी लिहिले होते कुणीतरी. स्पेशल इफेक्ट्स अजिबात इंप्रेस करत नाहीत. फक्त मला नवल वाटते, कि एवढ्या प्रमाणात, जर प्रवाशी बोटीत घेतले आहेत, तर त्यांच्या खाण्यापिण्याची काय सोय ? ती कुठेच दिसली नाही.
नोहाज आर्क प्रमाणे, जर सगळे प्राणी घेतले, तर झाडे, किमान बिया नकोत का ?
एवढी उलथापालथ झाली, तरी शेवटी आफ्रिका खंड तसेच कसे टिकले ? त्यातल्या लेक व्हिक्टोरियाचा आकार देखील बदललेला दिसला नाही !!
व्हॅटिकन कोसळले, पण मक्केच्या काबाला काहिच झाले नाही !!

नाय तर काय, त्यात मार्लन ब्रँडोच्या जागी इशरत अली आहे! हे म्हणजे मधुबालाच्या रोलसाठी कष्मिरा शाह!

हे म्हणजे मधुबालाच्या रोलसाठी कष्मिरा शाह<<<<<<< गरीबांची मधुबाला आहे ती आणि तळागाळातल्या गरीबांची मधुबाला म्हणजे मल्लिका शेरावत Lol

व्हॅटिकन कोसळले, पण मक्केच्या काबाला काहिच झाले नाही !!>>>> दिनेशदा, डायरेक्टर घाबरला की त्याच्या नावाने फतवा निघेल. रिलीजच्या वेळेस ही मुलाखत वाचलेली. इथे वाचा :http://www.politicsdaily.com/2009/11/07/director-of-2012-destroys-rome-s...

जॉर्ज क्लूनीचा "अप इन दी एअर" पाहिला. हलका-फुलका आहे.

अशीच एक सीडी मिळाली होति, नावपण आठवत नाही, त्यात चंद्रचूड सिंग, अंजला जव्हेरी, मयुरी कानगो आणि अस्ताद वर्सी होते. या अंजला जव्हेरीचे नाव पण कुठे बघितल्याचे आठवत नाही. (ती बरिचशी रविना टंडन सारखी दिसते ) जाणकार या सिनेमाचे नाव सांगतील का ?
अ.आणि.अ. साठी चांगला विषय आहे.
हा सिनेमा बघून मी इतका वैतागलो, कि कचर्‍याच्या डब्यात पण ती टाकवेना तशीच.
तूकडे तूकडे करुन टाकले तिचे.

तेरे मेरे सपने मधे अंजला झवेरी नव्हती सिमरन होती,तुम्ही सांगताय तो सिनेमा बेदर्दी,बेताबी का बेखुदी कायतरी होता.

Pages