चित्रपट कसा वाटला? (जुना धागा)

Submitted by admin on 2 June, 2008 - 02:50

आपण नुकताच पाहिलेला एखादा नवीन अथवा जुना चित्रपट आपल्याला कसा वाटला? आपले परिक्षण "नवीन लेखनाचा धागा" वापरुन लिहावे.

या आधीची समिक्षा इथे पहा.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Snatch, Primal fear आणि Identity पाहिले. रिचीचे मूव्हीज आवडतात त्यांना Snatch नक्की आवडणार. बाकी नॉर्टन आणि वेगळ्या संकल्पनेसाठी बाकीचे दोन.

नासिर रेखाचा मुसाफिर पण अवश्य बघण्याजोगा. तेंडूलकरांच्या अरुण सरनाईक ला काहि भूतकाळ नाही, तो या सिनेमात आहे (त्या भागात मुनमुन सेन आहे ) नासिर नेहमीप्रमाणेच ग्रेट. रेखा मेकपशिवाय.
पंकज भावाचा भुमिकेत (तो संघवाला ) कथानक केरळमधे घडते.
मला नीट आठवत असेल, तर सरुच्या आईबाबांच्या भुमिकेत, आपले उषा नाडकर्णी आणि चंद्रकांत गोखले आहेत. आशाचे एक मस्त गाणे आहे त्यात.
२० वर्षानी सुद्धा आठवतोय हा सिनेमा मला !!!

सिमी अमिताभच्या नमकहराम मधेही होती बहुतेक त्याची हिरॉईन. तिचा आणखी एक छोटाच पण लक्षात राहिलेला रोल रमेश सिप्पींच्या अंदाज मधला. शम्मी कपूरची बायको म्हणून काम केलय तिने. त्यांचे दोन तीन सीन रमेश सिप्पींनी छान खुलवलेत.

हंगलबद्दलची माहिती पहिल्यांदाच वाचली. धन्यवाद टोणगा. ते शेवटचे लगान मधे दिसले होते मला वाटतं.

अवतार कृष्ण हंगल. जन्म सियालकोट . शिक्षण पेशावर. ३ वर्षे पाकिस्तानी तुरुंगात काढली. भारतात पलायन. आधि स्वातंत्र्य सैनिक. मग मार्क्सवादी , इप्टा वगरे. मध्ये मुलाखत वाचली. बायको वारली. सूनही वारली. मुम्बैला फ्लॅट्मध्ये ९३ वर्षांचे हंगल आणि ७० वर्षांचा मुलगा दोघेच एकटे जीवन कंठतात . कुठे जीव जन्मला . कुठे विसावणार. मधली किती आटाआटी......

परवा प्राणची एक कौटुम्बिक क्लिप यूट्युब वर पाहिली . ढाण्या वाघ गलितगात्र झाला आहे. वाईट वाटले.
http://www.youtube.com/watch?v=lTOc_RYvFwE

मागे कुठल्या फोरमवर के.एन . सिंग याना लाईफ टाईम अवार्ड दिले होते. सिन्ग अगदीच थकले होते . धरून आणावे लागले. मुख्य म्हनजे स्मृती गेली होती. माणसे ओळखीत नव्हते. भोवती काय चाललेय तेही समजत नव्हते. प्रत्युत्तरादाखल बोलूही शकले नाही. आपला सत्कार होतोय हेही समजले नाही. किती हॅन्डसम, शैलीदार माणसे होती ही....

असे काही पाहिले की भीती वाटते हो... !

इतके थकेपर्यंत थांबू नये, सत्कार करण्यासाठी !!
अश्या गलितगात्र अवस्थेत त्या लोकाना बघवत नाही, शिवाय त्यांचीहि शान रहात नाही.

दिनेशभाई. हंगलच्या गोष्तीवरून विचार केला. त्याना सियालकोट आणि पेशावरच्या आठवणी येत असतीलच ना? त्या प्रदेशाबद्दल ममत्वही वाटत असेल ना. की त्या प्रदेशाशी निष्ठा बाळगल्याबद्दल अपराधीही वाटत असेल? ऐ मेरे प्यारे वतन , ही भावना मनात येत असेल का?

मनाचे खेळ सगळे...

खरय टोणगा. काही दिवसांपूर्वी भानू अथैयांच्या पुस्तकप्रकाशन समारंभाला गेले होते. सिक्स्टीज-सेव्हन्टीजच्या जमान्यातील अनेक तारेसितारे आले होते. काही त्याही आधीचे. कामिनी कौशल सारखे. पडद्यावर भानूजींच्या सिनेमातली दृष्य दाखवत होते आणि मग उपस्थितांवर प्रकाशाचा झोत. एकेकाळी झगमगत्या अभिनय सौंदर्याने पडद्यावर झळकलेले ते चेहरे आता इतकी दशकं उलटून गेल्यावर पुन्हा पहाताना मन उदास झालं. पडद्यावरची वैजयंतीमालाची आम्रपाली, वहिदाची रोझी, तिसरी मंझिलची आशा पारेख, हेलन आणि आता प्रत्यक्षातली त्यांची रुपं. वय कुणालाच माफ करत नाही.

उशिरा पण झेंडा बघितला.. छान झाला आहे.. कार्यकर्त्यांची दशा छान दाखवली आहे .. सगली कडेच आल बेलच आहे अणि त्यात कॉरपोरेट वर्ल्ड म्हणजे कठिनाच दिसते देशाचा..
असो राज ठाकरे च कम करणारा कलाकाराकडे बघून आधी वाटतच नहीं की तो त्याचा आवाज आहे.. नंतर सवय होते

सिमी अमिताभच्या नमकहराम मधेही होती बहुतेक त्याची हिरॉईन. तिचा आणखी एक छोटाच पण लक्षात राहिलेला रोल रमेश सिप्पींच्या अंदाज मधला. शम्मी कपूरची बायको म्हणून काम केलय तिने. त्यांचे दोन तीन सीन रमेश सिप्पींनी छान खुलवलेत.
<<<< शर्मिला,
१००% अनुमोदन गं :), मलाही लक्षात राहिला अंदाज मधला तिचा रोल !
मला ती मेरा नाम जोकर, कर्ज मधे पण आवडली.
बाकी सिमि गरेवाल किती का ठोकळेबाज असेना पण किती छान दिसते अजुनही.. मस्तं मेनटेन केलय तिनी स्वतःला, आजही stylish, elegant आणि amazing sense of dressing !
शोबा डे, सिमी गरेवाल या दोघी वयानी 60 + आहेत पण आजही त्यांची ड्रेसिंग स्टाइल फॅशन स्टेटमेन्ट बनते, त्या विरुध्द रेखा .. कायम तो भयानक डार्क मेक अप आणि झगमगीत साड्या.. अतिशय विचित्र आणि वयानी आहे त्या पेक्षा खूप जास्त aged दिसते !

राधिका आपटे, संदीप कुलकर्णी ,प्रतिक्षा लोणकर यांचा नविन हिंदी पिच्चर आलाय.. वेटिंग रुम ..
कसा आहे ? पाहिला का कुणी ?

कायम तो भयानक डार्क मेक अप आणि झगमगीत साड्या.. अतिशय विचित्र आणि वयानी आहे त्या पेक्षा खूप जास्त aged दिसते !
>>
वैजयंतीमालाचंही हेच झालंय...
त्यात तो जाड चष्मा...

(वास्तविक ती कधीच आवडली नाही मला, ज्वेल थीफ मधे देव आनंद तनुजाला सोडून हिच्या मागे का लागतो हा मला पिडणारा एक प्रश्ण आहे...)

ओ पी नय्यर असाच एक नेहेमी लाहोरच्या आठवणी काढत मेला.. शुभ्र काही जीवघेणे मधला ओपीवरचा लेख फार सुंदर होता.. फाळणी नंतर लाहोर/कराचीच्या फिल इंडस्ट्रीमधून अनेक लोक मुंबईला आले.. अनेक पंजाबी/सिंधी कलाकार/तंत्रज्ञ/निर्माते.. ह्या सगळ्यांनाच नेहेमी ही जन्मभूमीची आठवण किती सतावत असेल खरेच..

<<वास्तविक ती कधीच आवडली नाही मला, ज्वेल थीफ मधे देव आनंद तनुजाला सोडून हिच्या मागे का लागतो हा मला पिडणारा एक प्रश्ण आहे.>>
सेम पिंच अँक्या ...

ज्वेल थीफ मधे देव आनंद तनुजाला सोडून हिच्या मागे का लागतो हा मला पिडणारा एक प्रश्ण आहे<<<<<'होठोंपे ऐसी बात' ह्या गाण्यात तनुजाला ईमॅजिन करु शकशील का? देव आनंद ने पण सेफ ऑप्शन निवडला.

वैजयंती ज्वेल थिफमध्येही खुप सुंदर दिसलीय. अर्थात तनुजा तरुण आहे तिच्यापेक्षा त्या चित्रपटात..

आणि आशुचे बरोबर आहे.. होठोंपे... मध्ये तनुजा काहीच करु नाही शकणार. तिथे वैजयंतीच पाहिजे..

मला वैजयंतीमाला आवडली ती मधुमती आणि कठपुतली मध्ये. आम्रपालीत पण तिच होती का, आठवत नाही आता.

मी काल idiot box पाहिला...केकता कपूरची चांगली नक्कल केली आहे..एकदा पाहण्यासारखा नक्कीच आहे..

वैजयन्तीमाला ही अवाढव्य नायिकांच्या माळेतील एक अवाढव्य मणि होता....

सिमी गरेवाल 'कभी-कभी' मधे सुद्धा छोट्या रोल मधे आहे. नीतु-सिंगच्या आईचा रोल केलाय तिने.(खरी आई वहिदा रेहमान ).
'तो बात पक्कि' मधे केदार शिंदेने अगदिच निराशा केलिय.चित्रपट अजिबातच प़कड घेत नाही...त्यामुळे पुर्ण पाहिलाच नाही.

राधिका आपटे, संदीप कुलकर्णी ,प्रतिक्षा लोणकर यांचा नविन हिंदी पिच्चर आलाय.. वेटिंग रुम ..
कसा आहे ? पाहिला का कुणी ? >>>>> काल पाहीला मी "वेटिंग रूम". चांगला वाटला. suspense , thriller आहे. खिळवून ठेवणारा आहे. एकदा बघण्यासारखा वाटला.

>>'होठोंपे ऐसी बात' ह्या गाण्यात तनुजाला ईमॅजिन करु शकशील का? देव आनंद ने पण सेफ ऑप्शन निवडला. <<

इंटरेस्टींग क्वस्चन. 'होठोंपे ऐसी बात' गाण्यावरील नाच लोकनॄत्यात मोडु शकतो, तिथे तनुजा देखील चालली असती असं मला वाटतं; जसं "रात अकेली है" मध्ये ती चालुन गेली. Happy

बायदवे, 'होठोंपे ऐसी बात' मध्ये देवसाब खुपच विनोदी नाचलेत... Happy

मला संगम मधेही ती आवडली. ओ मेरे सनम.. गाण्यात तर खूपच.

खरेच. त्याआधीच्या एका सिनमध्ये तर ती अगदी अप्रतिम.. अतिशय सुंदर अभिनय केलाय..

ती नंतर अवाढव्य झाली खरी, पण त्या बाबतीत आशा पारेखचाच नंबर एक आहे.. नया दौरमध्ये वैजयंती अतिशय गोड दिसलीय आणि वावरलीय... कृष्णधवल चित्रपटांमध्ये तिचे सौंदर्य अगदी खुलुन दिसते.

इंटरेस्टींग क्वस्चन. 'होठोंपे ऐसी बात' गाण्यावरील नाच लोकनॄत्यात मोडु शकतो, तिथे तनुजा देखील चालली असती असं मला वाटतं; जसं "रात अकेली है" मध्ये ती चालुन गेली.

काय च्या कायच..... ह्या गाण्यावर आजही नाच केला जातो.. तनुजाने नाच केला असता तर लोक आतापर्यंत विसरलेही असते हे गाणे..

'रात अकेली है' आणि 'होठोंपे...' दोन्ही वेगवेगळ्या प्रकारची गाणी आहेत. रात अकेली मध्ये नाच नाहीच. वेस्टर्न टाईप दोनचार स्टेप्स आहेत. तर होठॉपे मध्ये नाच आहे...

अर्थात मला तनुजाला कमी मुळीच लेखायचे नाहीये. she had her own charm..

http://www.youtube.com/watch?v=J7lFQ2iOU4Y

http://www.youtube.com/watch?v=x92K2mUeYZ0&feature=related

जुनी गाणी पाहताना लक्षात येते की यातले शॉट्स किती लांब आहेत जवळजवल अर्ध्या ते एका मिनिटांच एक शॉट.. आणि तेवढ्या स्टेप्स आठवणीत ठेऊन नर्तक नाचतात,. हल्ली सेकंदासेकंदाचे शॉट्स असतात.. Happy

रफी आणि शारदाने गायलेले, गुलजारचे गाणे
जब भी ये दिल उदास होता है
जाने कौन आसपास होता है

हे गाणे सीमा नावाच्या एका सिनेमातले (जूना नूतन, बलराज सहानी चा वेगळा )
या सिनेमात सिम्मी होती. कबीर बेदी आणि राकेश रोशन असे दोन नायक होते (बहुतेक दोघाना दाढी मिशी नव्हती त्या सिनेमात ) सिनेमा फारसा आठवत नाही पण गाणे चांगलेच लक्षात आहे.

शेवटचे कडवे तर खासच
कोई वादा किया नही लेकीन
क्यू तेरा इंतजार रहता है
बेवजा जब करार मिल जाये
दिल बडा बेकरार रहता है

***
पुर्वी खरेच खूप मोठे शॉट्स असत. असे मोठ्या शॉटचे अलिकडचे उदाहरण, म्हणजे उधार कि जिंदगी मधे काजोल ने एक श्लोक, एका शॉट मधे म्हंटलाय, आणि मै हू ना, मधले एक पूर्ण गाणे, एका सलग शॉट मधे आहे.

बायदवे, 'होठोंपे ऐसी बात' मध्ये देवसाब खुपच विनोदी नाचलेत >> तो कधी विनोदी नाचत नाही?

'रात अकेली है' ह्यात थोड्याच नाचाच्या स्टेप्स आहेत बाकी मुक्त हालचालीच आहेत. तनुजाचा मुद्राभिनय (त्यात तीचे सुंदर दिसणे आलेच) आणि गोल्डीचा कॅमेरा आपले लक्ष नाचाकडे जाऊच देत नाहीत. पण "होठोंपे...'" मध्ये फक्त नाचच आहे. तनुजाचे त्यात काय काम? Happy

पण तरी 'होठोंपे..' पेक्षा मला वै.मा. मला जास्त आवडते ती...
१. कठपुतली - बागड बम् बम्
२. आशा - तू ना आया और होने लगी शाम रे (ह्यात आशा पारेख पण आहे - रखवालदाराच्या वेशात)
३. मधुमती - बिछुआ (ह्यात लताने 'ओय होय होय' असलं खतरी म्हटलय की कटल्यावर पतंग जसा गिरक्या घेतो असे वाटते आणि पुढच्याच क्षणी 'दैय्या रे दैय्या' हे पूर्ण जोशात येते - पतंग लागला पुन्हा चढायला Happy आणि हे सर्व वै.मा. ने इतके अप्रतिम सादर केले आहे ना की बास रे बास )

Pages