चित्रपट कसा वाटला? (जुना धागा)

Submitted by admin on 2 June, 2008 - 02:50

आपण नुकताच पाहिलेला एखादा नवीन अथवा जुना चित्रपट आपल्याला कसा वाटला? आपले परिक्षण "नवीन लेखनाचा धागा" वापरुन लिहावे.

या आधीची समिक्षा इथे पहा.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

होटों पे ऐसी बात वर गोल्डीने वै.मा. वर बर्‍यापैकी टीका केलेली आहे (सं: एक होता गोल्डी).. गोल्डीच्या मते तिने फार नखरे केले होते तो सिनेमा चित्रीत होत असताना आणि गाण्याच्या आधी व गाण्याच्या चित्रीकरणाच्या वेळी सुद्धा तिने फार अळमटळम केली होती सराव करण्याची. तसेच नृत्यदिग्दर्शकाचेपण तिने सगळे ऐकले नाही वगैरे वगैरे..

तो नाच मलाही काय फार उच्च वगैरे वाटला नाही. संगीतच भारी होतं त्याचं..

जब भी ये दिल..... अजुनही लागते रेडिओवर... चित्रपटातही ते रेडिओवरच लागलेले असते आणि सिम्मी मध्येमध्ये गुणगुणत असते... Happy हे गाणे वगळता बाकी तो चित्रपट भयाण आहे.... हिरोईनचे दोन्ही हिरो मरतात आणि मग ती स्वतःला मनहुस समजते व.व.....

गोल्डीच्या मते तिने फार नखरे केले होते तो सिनेमा चित्रीत होत असताना

हिरविन नखरे करणार नाही तर कोण करणार????????? Wink

देवानंदला नुसते चालायला लावले तरी तो विनोदी वाटतो, मग नाचायला लावले तर काय दुसरे काय होणार??

साधनाला अनुमोदन, जरी वैजयन्तीमाला नंतर खूप जाड झाली हे खर असलं तरी पण हिन्दी फिल्स्म च्या इतिहासातल्या मोजक्या ऑल राउंडर अभिनेत्रीं पैकी आणि उत्कृष्ट डान्सर्स पैकी एक नक्कीच आहे.
इन फॅक्ट डान्सेस मधे पण ती ऑल राउंडर आहे, होठोपे ऐसी बात, कठपुतली, बिछुआ सारख्या गाण्यां पासून ते अगदी स्नेशुअल बुढ्ढा मिल गया पर्यन्त सगळॅ डान्सेस अशक्य सुन्दर केलेत तिनी :).
संगम च्या 'ओ मेरे सनम' गाण्यात तिनी जशी साडी नेसलीये तशा ड्रेपिंग ची स्टाइल अजुनही पॉप्युलर आहे.
अता मात्र रेखा प्रमाणे जरा जास्त ओव्हरड्रेस्ड आणि बटबटीत वाटते पण अभिनेत्री म्हणून वैजयन्तिमालाने जे रोल्स केलेत त्या जागी दुसरी कोणी इमॅजिन करु शकत नाही.

दीपांजली, वैजयंती माला अजुनही चेन्नईत भरतनाट्यमचे प्रोग्राम्स करते..ती अजुनही छान दिसते..
(वैजयंती माला चा उल्लेख आला त्यामुळे रहावलं नाही)

इट्स कॉम्प्लिकेटेड नावाचा चित्रपट पाहीला नुकताच..मला आवडला...

त्यातली नायिका खुप आवडली..

अनुमोदन दीपांजली
वैजयंती माला खरोखरच सुंदर नाचते. चेहरा पण अगदी गोड हसरा. तिच्या जाडीबद्द म्हटल तर तेव्हा सगळ्याच नाइका जाड्या होत्या. (० फिगर कन्सेप्ट नव्हती ना)
आम्रपाली मध्ये तर फारच सुंदर दिसली ती.

"चित्रपट कसा वाटला" हे नाव वाचुन डोकावलो तर ही काहीतरी वेगळीच चर्चा चालू आहे!

<<< अगदी माझेही तसेच झाले..."चित्रपट कसा वाटला"च्या ऐवजी "नायिका कशी वाटली" अशी चर्चा चालू आहे..
रच्याकने.. संदीप कुल्कर्णी दिग्दर्शित "बेधुंद" पाहिला छान वाटला..

रफी आणि शारदाने गायलेले, गुलजारचे गाणे
जब भी ये दिल उदास होता है
जाने कौन आसपास होता है>>माझे आवडते गाणे. शारदा रफीच्या ओळींवर गुणगुणते तो प्रकार भन्नाट आहे ...

जूली अ‍ॅन्ड जूलिया - छान आहे... आवडला. मेरिल आणि एमी अ‍ॅडम्सची कामं फार मस्त.
एक बंगाली सिनेमा पाहिला काल "तितली". अपर्णा सेन, कोन्कना सेनशर्मा, मिथुन आहेत. दारजिलिंगचं चित्रिकरण फारच सुन्दर. यूट्यूब वर सबटायटल्स सकट आहे. टायटलचं गाणं फार सुरेख आहे. रितुपर्णो घोश दिग्दर्शित. मस्त, साधी कथा आहे.

मला पण आवडला जूली अ‍ॅन्ड जूलिया. मेरिल स्ट्रीप एकदम मस्त.

कोको शनेल वर एक आलाय मुव्ही. फ्रेंच मध्ये आहे. तो पण मस्त आहे.

मेरिलचा "डेविल वेर्स प्राडा" मस्तच आहे.
कोको चा ट्रेलर पाहिला नेटफ्लिक्स वर... क्यू मधे ठेवलाय.. Happy
"द विसिटर" असाच एक मस्त सिनेमा आहे. नक्की बघा मिळाला की.

"चित्रपट कसा वाटला" हे नाव वाचुन डोकावलो तर ही काहीतरी वेगळीच चर्चा चालू आहे!

हो ना!!!जुन्या पिढीतल्या लोकांनी बाफवर कब्जा केल्यासारख वाटतय.मला तर काहीच झेपत नाहीये.

जुन्या पिढीतल्या लोकांनी बाफवर कब्जा केल्यासारख वाटतय.मला तर काहीच झेपत नाहीये. >>> त्यात कब्जा करण्यासारखं काय आहे , झेपत नसेल तर माहीती करुन घ्यावी .

नाही ,चालु द्या तुमच.हरकत नाही

हरकत नव्हती तर झेपत नाही व.व. कशाला??? Happy

हिंदीत हल्ली बघण्यासारखे काही प्रदर्शित होतच नाहीये, मग चर्चा कशावर करणार? मी इंग्रजी चित्रपट बघत नाही. जे बघते ते टिवीवर, ते अगदी कोरे करकरीत नसतात...

कमल हसनचा दशावतार कुणी पाहीला आहे का ? असेल तर इथे लिहा त्याबद्दल.

काल केबलवाल्याने लावला होता. थोडावेळच पहायला मिळाला. इंटरेस्टींग वाटला.

>>हिंदीत हल्ली बघण्यासारखे काही प्रदर्शित होतच नाहीये, मग चर्चा कशावर करणार?
असा पुर्वग्रह ठेवुन नविन चित्रपट बघु नका.... हां आता बरेचसे टाकाउ असतात पण अधुनमधुन काहीतरी चांगले येत असते!

परवा तो हा... अतिथी बघायला बसलो.... काय बकवास सिनेमा आहे... बिल्कुल बघवला नाही!
परेश रावलने आता थांबायला हवे!

कार्तिक कॉलिंग कार्तिक मात्र आवडला Happy

कमल हसनचा दशावतार थोडाच पाहिलात, वाचलात! आत्ताचा कमल हसन म्हणजे एकेकाळच्या अत्यंत प्रतिभवान कलाकाराचं 'सेल्फ ऑब्सेस्ड' भूत आहे. हा सिनेमा पाहताना तर मल्लिका शेरावतचा रोलही त्यानेच केलाय की काय असं वाटायला लागतं, प्रत्येक फ्रेममधे स्वतःला भरण्याचा इतका अट्टाहास तर दिलिपकुमारनेही कधी केला नाही!

कमल हसनचा दशावतार थोडाच पाहिलात, वाचलात! आत्ताचा कमल हसन म्हणजे एकेकाळच्या अत्यंत प्रतिभवान कलाकाराचं 'सेल्फ ऑब्सेस्ड' भूत आहे. हा सिनेमा पाहताना तर मल्लिका शेरावतचा रोलही त्यानेच केलाय की काय असं वाटायला लागतं, प्रत्येक फ्रेममधे स्वतःला भरण्याचा इतका अट्टाहास तर दिलिपकुमारनेही कधी केला नाही!>>>>>>>>>>>> अनुमोदन,कसला बेक्कार सिनेमा आहे तो.डोकं पार गरगरुन गेलं.

कमल हसनचा दशावतार थोडाच पाहिलात, वाचलात! आत्ताचा कमल हसन म्हणजे एकेकाळच्या अत्यंत प्रतिभवान कलाकाराचं 'सेल्फ ऑब्सेस्ड' भूत आहे. हा सिनेमा पाहताना तर मल्लिका शेरावतचा रोलही त्यानेच केलाय की काय असं वाटायला लागतं, प्रत्येक फ्रेममधे स्वतःला भरण्याचा इतका अट्टाहास तर दिलिपकुमारनेही कधी केला नाही!>> अनुमोदन. ही सुरुवात हिन्दुस्थानी मधून झाली. अतर्क्य गोष्ट दोन रोल स्वतःच करायचे. पन्नाशी नंतर तरुणाचा रोल. काहीही. ताट भर मोदक रे आगाउ.

हो ना!!!जुन्या पिढीतल्या लोकांनी बाफवर कब्जा केल्यासारख वाटतय.मला तर काहीच झेपत नाहीये.
मग काय करता? त्यांना वृद्धाश्रमाचा नवा बाफ काढून देता? बसा म्हणावं त्या सायगल संगीतावर चर्चा करत.आणि तिथूनच जा त्या सैगलच्या भेटीला. Proud

काय आहे विषयाने विषय निघतो. थोडा इकडे तिकडे जातो. प्रत्येक वेळी नवा धागा काढणे शक्यही नसते आणि योग्यही.

मिसेस डाउटफायर, परत एकदा बघितला, आणि नकळत चाची ४२०, शी तुलना करु लागलो.
मूळ सिनेमातल्या, साध्या साध्या गोष्टी बाजूला सारल्याने आणि नको त्या गोष्टिना महत्व दिल्याने, विषयाचा फार गचका झालाय.
मूळ सिनेमात, त्या म्हातारीवर भाळणार्‍या, बस ड्रायव्हरचे, दोनच छोटे प्रसंग आहेत. (चाची मधे किती जण भाळतात ?)
मिसेस डाउटफायर सिनेमाची सुरवातच, नायकाच्या संवेदनशील स्वभावाने होतो. कार्टून मधले स्मोकिंगही त्याला सहन होत नाही. चाची मधे तसले काहि नाही.

मिसेस डाउटफायर मधे नायकाच्या धटींगणपणाचे अगदी मोजके प्रसंग (ट्रामला लोंबकळणे, पर्स मारणार्‍याला एक थप्पड लगावणे ), चाची मधे भाजी बाजारात, लांबलचक मारामारी आहे.

मिसेस डाउटफायर मधे, नायकाचे स्त्रीरुप, आपल्या डोळ्यासमोरच साकार होते, एकदा नाही, अनेकदा. चाची मधे ते नाही.

चाचीचे, नको ते हावभाव, उगाचच केल्यासारखे वाटताहेत. (मी असे वाचले होते कि, त्याने सुहास जोशीना, सल्लागार म्हणून नेमले होते, त्यासाठी. त्यापेक्षा त्यानाच तो रोल द्यायचा !!! )

मिसेस डाउटफायर चा शेवट, अजिबात पारंपारीक नाही. नायक नायिका एकत्र येत नाहीत. पण घटस्फोटीत पालकांच्या, मूलाना एक प्रेमाचा सल्ला देणारे, छोटेसे पत्रोत्तर सिनेमाचा समारोप करते!!
कमल हसन ने चांगल्या विषयांचा कायम बोर्‍या वाजवला.

हे राम आठवतोय ? राणी मुखर्जीला काय काय करायला लावले होते त्यात. यक !!!

अनुमोदन. म्हणूनच अजूनही हे राम बघायचे धाडस केलेले नाही. प्रोमोच लै अवघड वाट्लेले.

मिसेस डाउटफायर चा शेवट, अजिबात पारंपारीक नाही.>> बरोबर. पण रिएलिस्टिक आहे नाही का? मला जर विचाराल तर मुलेही फार नैसर्गिक वागतात त्याच्यात. वडिलांचे लिमिटेशन्स समजूनही त्यांना वडील आवड्तात. त्यात तो एक मर्सीडीज चे स्टार तोड्तो चट्कनी तो प्रसंग किती मस्त आहे ना! आमच्या इथे आहे एका पंजाब्याची. मला नेहमी मोह होतो तो स्टार तस्सा तोडायचा. रॉबिन विल्यम्स खरा चांगला सौम्य अभिनेता आहे. कमलची पर्सन्यालिटी जास्त स्ट्रॉन्ग, तामसी वाटते. तरी बरे गोविंदाचा सिनेमा तर लै आचरट आहे.

मामींना आणि दिनेशदाला अनुमोदन!, चाचीमधे अधुनमधुन येणारे अनेक प्रसंग आचरट्पणाचा कळस गाठतात.

' द जॅपनिज वाईफ' अप्रतिम सिनेमा! पडद्यावर एखादी कथा किती तरलेतेने मांडता येऊ शकते हे पहायच असेल तर अपर्णा सेनचा हा सिनेमा पहावा. सविस्तर लिहिते उद्या.

Pages