चित्रपट कसा वाटला? (जुना धागा)

Submitted by admin on 2 June, 2008 - 02:50

आपण नुकताच पाहिलेला एखादा नवीन अथवा जुना चित्रपट आपल्याला कसा वाटला? आपले परिक्षण "नवीन लेखनाचा धागा" वापरुन लिहावे.

या आधीची समिक्षा इथे पहा.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पर्सी जॅकसन व वीजचोर पाहिला. काहीतरी नवे आहे. जादुगार झाले, वँपायर झाले आता ग्रीक गॉडस. ते लोक मणी शोधत अमेरिका भर हिंडत होते तेव्हा मी तिथे कोणत्या बीबी वरील कोण राहते ते आठवत टीपी केला.
पर्सी चांगली स्टोरी आहे ट्वायलाईट पेक्षा.

मी विहिर पाहिला................... काय स्टोरी न्हाय कळली.. Sad

अजुन मी जिता हाये

आवं, पर सीडी गावाया पायजे ना. असल्या रत्नांच्या सिड्याबी कुटं गायब व्हत्यात.. मिळाली तर मीबी एकडाव परत बगीन म्हंते.. तेवा पार भुगा झालेला टकु-याचा इस्टुरी कुटुन कुटे निघाली ते लक्षात ठेवता ठेवता.. Happy

साधना)

ऑनलाईन आहे बघा. Wink मला मिळाला आत्ताच.

आणि एकदम विषय बदलुनः-
तुम्ही खांटोळ्यांबद्दल सांगितलं होतंत. फोटु टाकायचे विसरलात काय? Happy

ऋयाम /साधना
व्यु~ ऑन्लाईन चित्रपटाचे नाव :- तिसरी लिंक.

मला कळले नाही.मला प्रायव्हेट सन्देश पाठवता का??
Sad

परवा खूप दिवसांनी 'बिनकामाचा नवरा' पाहिला. (अशोक सराफच्या सिनेमाबद्दल बोलतेय. :)) मस्त... रंजना-अशोकची केमिस्ट्री अफलातून आहे. अशोक सराफचे संवाद तर एकदम मस्त. हसून हसून पोट दुखले अगदी. Happy

मागच्याच आठवड्यात मेरिल स्ट्रीपचा 'म्युझिक ऑफ द हार्ट' बघितला. एकदम मस्त सिनेमा.

काल सनी देओल , इरफान खान आणि इशा कोपीकर यांचा Right ya wrong पहिला.
अपेक्षेपेक्षा चांगला वाटला. स्टोरी interetsing आहे. एकदा बघण्यासारखा आहे.
इरफान ची अक्टिंग नेहमीप्रमाणे छान !

ऋयाम /साधना
व्यु~ ऑन्लाईन चित्रपटाचे नाव :- तिसरी लिंक.

मला कळले नाही.मला प्रायव्हेट सन्देश पाठवता का??

परवा सरदार पटेल यांच्या जीवनावरचा सरदार चित्रपट पाहिला. परेश रावल चे उत्तम काम, केतन मेहता यांचं संतुलित दिग्दर्शन..खूपच भावला हा चित्रपट!! कुठेही कंटाळवाणा होत नाही अर्थात स्वातंत्र्यानंतरची परिस्थिती दाखवली आहे .मिळाला तर जरूर पहा!!

श्याम बेनेगल दिग्दर्शीत " वेल डन अब्बा " पाहीला , मस्त सिनेमा आहे. बोमन इराणी , मिनिशा लांबा , इला अरुण , रवी किशन सगळ्यांची काम मस्त झालीत , शासकीय विहीर योजनेवर आधारीत सामाजीक विनोदी हलका फुलका सिनेमा. हैद्राबादी ऐकायला मस्त वाटतात . शक्य असेल तर नक्की बघा.

डायरी ऑफ विम्पी किड पाहिला. माझा लेक आता पुढच्या वर्षी मिडल स्कूल ला जाणार! त्याने अन त्याच्या मित्रांनी ती पुस्तकं फार एन्जॉय केलीयत म्हणून सगळ्यांना बरोबर घेऊन गेले होते.
पुस्तकाच्या मानाने सिनेमा तेवढा विनोदी वाटला नाही! कदाचित या पुस्तकात चित्रांसकट पात्रं उभी केलीयत. पुस्तकातली पाहून आपण तशीच पात्रं डोळ्यासमोर आणतो म्हणून आहेच. आणि अजून काही पुस्तकात नसलेले (विनाकारण इमोशनल) प्रसंग आणि पात्रं सिनेमात घातली आहेत. पुस्तकातले काही धमाल प्रसंग मात्र गाळलेत. त्यामुळे बर्‍यापैकी अपेक्षाभंग झाला. सिनेमात मला सगळ्यात रॉड्रिक आवड्ला. पुस्तकातल्या कॅरॅक्टर ला व्यवस्थित न्याय दिलाय त्याने. बाकी मुख्य ग्रेग - तो दिसायला बर्‍यापैकी क्यूट आहे, जे पुस्तकातल्या पात्राशी विसंगत वाटते. Happy

टाईम ट्रॅव्हलर्स वाईफ पाहिला.. ठिकठाक आहे.. त्या घटनेला आणखीन आयाम आहेत जे दाखवता आले असते असं वाटलं (उदा. घटनांची क्रॉनोलॉजी दोघांच्याही दृष्टीनं वेगवेगळी असेल). पण बोअर नक्कीच नाही झाला..

मला विंपी किड् मधली ती काडीची माणसं आणि त्यांची expressions आवडतात, तसाच book sketches वापरून अ‍ॅनिमेटॅड मुव्ही बनवायला हवा होता , 'एकता का वृक्ष' स्टाइल एनिमेटेड:).

काल Dracula 2000 पाहिला. पिक्चर तसा बोगसच्चे. पण Gerard Butler ?.... he actually sizzles ! काय खतरनाक दिसलाय तो !

डायरी ऑफ अ विंपी किडची सगळी पुस्तकं आमच्याकडेही आहेत नी आवडती आहेत. बघुया, पिक्चर कधी बघायला मिळतोय.

Gerard Butler... ह्म्म्म...
त्याचा नविन The Bounty Hunter पाहिला का कुणी????

how to train your dragon पाहिला. अ‍ॅनिमेशन एकदम जबरी आहे त्याचं. ३D मध्ये तर आजुनच बेश्ट!!
एकदा बघायला खुप मस्त. Happy

कार्तिक कॉलिंग कार्तिक बघितला, बरा आहे, दिपिका (चक्क) चांगली वाटलीय काही शॉट्स मधे. तिने तिचा रोलही बर्‍यापैकी निभावलाय.फरहान यापेक्षा मला 'लक बाय चान्स' मधे जास्त आवडला होता.

मलाही दिपिका खूSSSSSSप आवडते.. Happy ओशाओ, लआक, चाचौचा, काकॉका इ. इ. बघितले ते फक्त तिच्यासाठीच Happy

लसेऔधो पाहिला अफलातून वाईट्ट पिक्चर आहे. फूकट पाहिलेला हा सर्वात वाईट्ट पिक्चर. कॅमेराचा वाईट्ट वापर. त्यातल्या त्यात ब र्‍या मॉडेल्स. लो बजेट तद्दन भिकारी पिक्चर. (साज्या चार वाक्य झाली रे बक्षीसाच बघ काय ते Wink )

शापित बघितला....

३५० वर्षापूर्वीच्या राजासमोर मॉडर्न अर्धनग्न बाया-बाप्यांचा नाच दाखवलाय..... एखादं जुनं क्लासिकल स्टाईल आमी जे तोमार सारखे गाणे दाखवायला संगीतकाराचे तंबोरे झडले होते की काय!!!! स्टोरी ठीक आहे...

डुआय, नावातच सगळं आलं. त्यांचे प्रोमोजच एवढे भिक्कार होते, मी तर अशा पिक्चर्सच्या वाटेला जातच नाही.

अरे तो LSD म्हणजे ऑफ-बीट पठडीतला पिक्चर आहे. अशाच पठडीतले अभय देओलचे तमाम सिनेमे पण काही लोकांना आवडले नाहीत. ज्याची त्याची निवड, दुसरं काय. LSD बद्द्ल बोलायचे, तर शीर्षकावरून भलत्याच अपेक्षा ठेवून लोक जातात आणि फसतात.

MMS Scandles आणि ठिकठिकाणी लावलेल्या CCTV कॅमेर्‍यांचा वापर करून काय काय केले जाते, त्याची हा LSD सिनेमा म्हणजे झलक आहे. मोबाईल कॅमेर्‍याचे / हँडीकॅमचे किंवा CCTV च्या क्लिप्स बघत असल्याचे संपूर्ण सिनेम्यात वाटत राहते, म्हणून वैताग येऊ शकतो. पण माझ्या मते हेच त्या सिनेम्याचे वैशिष्ठ्य आहे.

जोहर, चोप्रा, भट इत्यादी महामानवांचे सिनेमे अत्यंत वीट आणू लागले आहेत. त्यामुळे असे सिनेमे आता (मला तरी) बरे वाटतात. मला LSD आवडला. Happy

Pages