चाची आणि मिसेस डाउटफायरची तुलना करण्यात काही 'राम' नाही! दोन्हीची जातकुळीच वेगळी आहे.मला दोन्हीही सिनेमे आवडतात. चाचीचा ओरिजिनल 'अव्वाई शण्मुगी' मात्र हिंदीपेक्षा बेकार आहे.अमरिष पुरी,ओम पुरी, परेश रावल आणि जॉनी वॉकर हे तमिळ 'कामेडि' कलाकारांपेक्षा एनी डे जास्त उच्च लोक ठरतात.
मिसेस डाउटफायर, परत एकदा बघितला, आणि नकळत चाची ४२०, शी तुलना करु लागलो.>>>> तुलना?डाउटफायरची थीम चोरुन बनवलेल्या चाचीला काहीही स्टँडर्ड नाहीये. अतिशय चीप म्हणूनच तुलनाही होणे नाही.
शनिवारी 'लालबाग परळ' पाहीला.आवडला असं नाही म्हणता येणार. अत्यंत विदीर्ण सत्य. अक्षरशः अंगावर येतो चित्रपट. मध्यंतरानंतर फारच भयाण वाटु लागतो. अगदी चित्रपटाच्याच भाषेत सांगायचं झालं तर 'मरणाच्या सावलीखाली मृत्युचं दडपण घेऊन जगणारी माणसं' पहायला मिळतात. कुणी जाणार असेल पहायला तर शक्यतो लहान मुलांना नेऊ नका.
योगमहे, आत्ताच परिक्षण वाचले. मला वाटते, अधांतर नाटक त्यापेक्षा प्रभावी होते. ज्योति सुभाष नक्कीच, सीमा बिस्वास पेक्षा, जास्त न्याय देतात त्या भूमिकेला !!
इथे सेव्हन्टीन अगेन, बद्द्ल लिहिले होते का कुणी ? हायस्कूल म्यूझिकल वाल्या झॅक चा, मस्त सिनेमा आहे हा ! आयूष्यातल्या चूका निस्तारण्यासाठी, परत १७ व्या, वयाचे होणे, हि मध्यवर्ती कल्पनाच भन्नाट आहे (पटली नाही तरी ).
त्याकाळचे आदर्श, आजच्या जमान्यात निरुपयोगी ठरतात, ते प्रसंग,, मुलांच्या बरोबर शाळेत जाणे, घटस्फोटाच्या मार्गावर असलेला, विवाह थांबवण्याचा प्रयत्न करणे, सगळेच छान जमलेय.
झॅक आहे म्हणून, त्याला भरपूर नाच गाणी आहेत, असेही नाही. तसेच हिरो म्हणून त्याला, विशेष पॉवर्स आहेत, असेही नाही (सगळ्यांकडून थपडा खातो तो. ) पण मला आवडला तो.
आपल्याकडे, काढायचा ठरवला, तर १७ वर्षाचा वाटेल, असा नायक आधी शोधावा लागेल !!!
काल झी सिनेमा वर तमिळ (हिंदी डब केलेला) चित्रपट पाहिला. हिंदीतलं नाव "अपरिचित". मल्टिपल पर्सनॅलिटी डिसऑर्डर व आधारित पण कमालिचा अचाट आणि अतर्क्य. त्यातला हीरो आणि हिरॉईन कोण आहेत माहित आहे का कुणाला?
कोणत्या विषयावर आहे लालबाग परळ किंवा ते नाटक?
>>
गिरण्या बंद झाल्यानंतर गिरणीकामगारांनी कशी आपली आयुष्य काढली, त्यांना किती फसवण्यात आलं, त्यांची मुलं कशी वाईट मार्गाला लागली ह्यावर आहे चित्रपट. नाटकाबद्दल माहीत नाही मला.
इथे सेव्हन्टीन अगेन, बद्द्ल लिहिले होते का कुणी ? हायस्कूल म्यूझिकल वाल्या झॅक चा, मस्त सिनेमा आहे हा ! आयूष्यातल्या चूका निस्तारण्यासाठी, परत १७ व्या, वयाचे होणे, हि मध्यवर्ती कल्पनाच भन्नाट आहे (पटली नाही तरी ).>> मस्त आहे आम्ही सीडीच घेतली आहे. झॅकचे तिन्ही म्युझिकल्स व हे सीडीच आहे. कधीही बघा. त्याच्यात एक सिन्सिअरिटी आहे. म्युझिकल मध्ये पण तो हिरविणीशी जुळवून घेतो अन ती नखरे करत असते कायम. घरचा प्रेक्षक वर्ग आता रॉबर्ट पॅटिसन ची चित्रे जमवू लागला आहे. पण झॅक तो झॅक.
लालबाग परल मुंबै च्या गिरणी संपावर आहे.
Submitted by अश्विनीमामी on 12 April, 2010 - 00:58
१७... मधे त्या मोठ्याचा रोल ज्याने केला आहे तो मॅथ्यू पेरी आपला एकदम फेवरिट. अधिक माहितीसाठी 'फ्रेन्ड्स' बघा स्मित. किंवा 'होल नाईन यार्ड्स'>> आम्ही पण सीडी घेताना झॅक व चँड्लर दोन्ही आहेत म्हणुनच घेतली. सो क्यूट. फ्रेंड्स शिवाय तर आपला दिवस पूर्ण होत नाही. माझा एक रीसर्च चालू आहे. सकाळदुपारसंध्याकाळरात्र फ्रेन्ड्स कुठे कुठे येत आहे ते शोधून सर्फ करत राहायचे. दे आर ऑल्वेज देअर फॉर यू.
Submitted by अश्विनीमामी on 12 April, 2010 - 02:09
काल झी सिनेमा वर तमिळ (हिंदी डब केलेला) चित्रपट पाहिला. हिंदीतलं नाव "अपरिचित". मल्टिपल पर्सनॅलिटी डिसऑर्डर व आधारित पण कमालिचा अचाट आणि अतर्क्य. त्यातला हीरो आणि हिरॉईन कोण आहेत माहित आहे का कुणाला?>>> तमिळ मध्ये हा पिक्चर तूफान चालला होता.. तिकिटे पण मिळत नव्हती. आणि त्यातली गाणी पण तूफान हीट झाली होती.. कंपनीतल्या पब्लिकबरोबर मूळ तमिळ आवृत्तीच बघितली होती.. बाजूला बसून कलिगनी भाषांतर केले होते.. बाकीचे डीटेल्स इथे बघा.. http://en.wikipedia.org/wiki/Anniyan
कमल हसन चा 'अभय' बघण्याचे धाडस कोणी केले आहे का?>>>>>
हो !
त्यात टकला वर सापाचा टॅटू काढून घेताना कमल ह्सन गातो..'कल तक मुझको गौरव था मै देवतांको हू सन्तान
आज मगर हूं आधा जानवर और हूं मै आधा इन्सान"
आणि ते मनिषा कोईरालाच् ' झंगुरीया के दिल मे शोला जो भडका, दुश्मन जमानेका है एक लडका" !
चाची मला प्रचंड आवडतो.. कंटाळा आला की पाहते.
कमल हसन त्यातल्यात्यात छान दिसलाय या सिनेमात. बाकी सिनेमात अचाट करत
असतो काहीतरी.. साडी घातल्यावरचा बायकांसारखा वावर, मला तर जाम आवडला.
खास करून महाराज ची मुलाखत घेताना कमल, छोटिला संत्रं भरवत असतो, ती वाटी धरण्याची स्टाईल एखाद्या बाईला लाजवेल अशी...
दक्षे, तूला दांडकली पाहिजे धरुन. अपरिचित पहाणारी मी आहे. मामी नव्हे.
हिम्या, बघते हं ! दुसरी पर्सनॅलिटी अंगात आली म्हणजे ही माणसं उडू कशी शकतात कोण जाणे
आयला नविन लोक भडकण्यात
आयला नविन लोक भडकण्यात आपल्याला काँपिटीशन देणार आहेत अस दिसत.
हे राम उच्च सिनेमा आहे.अर्थातच सेक्स सीन भडक आहेत त्यातले.कमल हासनला त्याच्याशिवाय जमत नाहि.
वा बरे झाले मला मिसेस डाऊट
वा बरे झाले मला मिसेस डाऊट फायर बद्दल कळले..मला बघायचाच आहे तो सिनेमा ..
मी चाची पाहिलाय आता हा बघते.
चाची आणि मिसेस डाउटफायरची
चाची आणि मिसेस डाउटफायरची तुलना करण्यात काही 'राम' नाही! दोन्हीची जातकुळीच वेगळी आहे.मला दोन्हीही सिनेमे आवडतात. चाचीचा ओरिजिनल 'अव्वाई शण्मुगी' मात्र हिंदीपेक्षा बेकार आहे.अमरिष पुरी,ओम पुरी, परेश रावल आणि जॉनी वॉकर हे तमिळ 'कामेडि' कलाकारांपेक्षा एनी डे जास्त उच्च लोक ठरतात.
मल्लिका शेरावतचा रोलही
मल्लिका शेरावतचा रोलही त्यानेच केलाय की काय असं वाटायला लागतं, >>>
चाचीत पांचटपणा बराच होता, पण मला कमल हसन चे साडी घातल्यावरचे मॅनरिझम आवडले.
कमल हसन चा 'अभय' बघण्याचे
कमल हसन चा 'अभय' बघण्याचे धाडस कोणी केले आहे का?
आगाउ आणि मामी ना मोदक
शॅंक्या, मी पाहिलाय.. आता मला
शॅंक्या, मी पाहिलाय.. आता मला कुठलेही भय नाही..
मिसेस डाउटफायर, परत एकदा
मिसेस डाउटफायर, परत एकदा बघितला, आणि नकळत चाची ४२०, शी तुलना करु लागलो.>>>> तुलना?डाउटफायरची थीम चोरुन बनवलेल्या चाचीला काहीही स्टँडर्ड नाहीये. अतिशय चीप म्हणूनच तुलनाही होणे नाही.
कमल हसन चा 'अभय' बघण्याचे
कमल हसन चा 'अभय' बघण्याचे धाडस कोणी केले आहे का?
हो मी केल होत.बक्वास चित्रपट आहे
शनिवारी 'लालबाग परळ'
शनिवारी 'लालबाग परळ' पाहीला.आवडला असं नाही म्हणता येणार. अत्यंत विदीर्ण सत्य. अक्षरशः अंगावर येतो चित्रपट. मध्यंतरानंतर फारच भयाण वाटु लागतो. अगदी चित्रपटाच्याच भाषेत सांगायचं झालं तर 'मरणाच्या सावलीखाली मृत्युचं दडपण घेऊन जगणारी माणसं' पहायला मिळतात. कुणी जाणार असेल पहायला तर शक्यतो लहान मुलांना नेऊ नका.
योगमहे, आत्ताच परिक्षण वाचले.
योगमहे, आत्ताच परिक्षण वाचले. मला वाटते, अधांतर नाटक त्यापेक्षा प्रभावी होते. ज्योति सुभाष नक्कीच, सीमा बिस्वास पेक्षा, जास्त न्याय देतात त्या भूमिकेला !!
इथे सेव्हन्टीन अगेन, बद्द्ल लिहिले होते का कुणी ? हायस्कूल म्यूझिकल वाल्या झॅक चा, मस्त सिनेमा आहे हा ! आयूष्यातल्या चूका निस्तारण्यासाठी, परत १७ व्या, वयाचे होणे, हि मध्यवर्ती कल्पनाच भन्नाट आहे (पटली नाही तरी ).
त्याकाळचे आदर्श, आजच्या जमान्यात निरुपयोगी ठरतात, ते प्रसंग,, मुलांच्या बरोबर शाळेत जाणे, घटस्फोटाच्या मार्गावर असलेला, विवाह थांबवण्याचा प्रयत्न करणे, सगळेच छान जमलेय.
झॅक आहे म्हणून, त्याला भरपूर नाच गाणी आहेत, असेही नाही. तसेच हिरो म्हणून त्याला, विशेष पॉवर्स आहेत, असेही नाही (सगळ्यांकडून थपडा खातो तो. ) पण मला आवडला तो.
आपल्याकडे, काढायचा ठरवला, तर १७ वर्षाचा वाटेल, असा नायक आधी शोधावा लागेल !!!
काल झी सिनेमा वर तमिळ (हिंदी
काल झी सिनेमा वर तमिळ (हिंदी डब केलेला) चित्रपट पाहिला. हिंदीतलं नाव "अपरिचित". मल्टिपल पर्सनॅलिटी डिसऑर्डर व आधारित पण कमालिचा अचाट आणि अतर्क्य. त्यातला हीरो आणि हिरॉईन कोण आहेत माहित आहे का कुणाला?
कोणत्या विषयावर आहे लालबाग
कोणत्या विषयावर आहे लालबाग परळ किंवा ते नाटक?
फारेंडा, ते दत्ता सामंतांचं
फारेंडा, ते दत्ता सामंतांचं नेतृत्व असलेल्या गिरणी कामगारांच्या संपाबद्दल आहे (१९८२).
कोणत्या विषयावर आहे लालबाग
कोणत्या विषयावर आहे लालबाग परळ किंवा ते नाटक?
>>
गिरण्या बंद झाल्यानंतर गिरणीकामगारांनी कशी आपली आयुष्य काढली, त्यांना किती फसवण्यात आलं, त्यांची मुलं कशी वाईट मार्गाला लागली ह्यावर आहे चित्रपट. नाटकाबद्दल माहीत नाही मला.
इथे सेव्हन्टीन अगेन, बद्द्ल
इथे सेव्हन्टीन अगेन, बद्द्ल लिहिले होते का कुणी ? हायस्कूल म्यूझिकल वाल्या झॅक चा, मस्त सिनेमा आहे हा ! आयूष्यातल्या चूका निस्तारण्यासाठी, परत १७ व्या, वयाचे होणे, हि मध्यवर्ती कल्पनाच भन्नाट आहे (पटली नाही तरी ).>> मस्त आहे आम्ही सीडीच घेतली आहे. झॅकचे तिन्ही म्युझिकल्स व हे सीडीच आहे. कधीही बघा. त्याच्यात एक सिन्सिअरिटी आहे. म्युझिकल मध्ये पण तो हिरविणीशी जुळवून घेतो अन ती नखरे करत असते कायम. घरचा प्रेक्षक वर्ग आता रॉबर्ट पॅटिसन ची चित्रे जमवू लागला आहे. पण झॅक तो झॅक.
लालबाग परल मुंबै च्या गिरणी संपावर आहे.
धन्यवाद लोकहो! १७... मधे त्या
धन्यवाद लोकहो!
१७... मधे त्या मोठ्याचा रोल ज्याने केला आहे तो मॅथ्यू पेरी आपला एकदम फेवरिट. अधिक माहितीसाठी 'फ्रेन्ड्स' बघा :). किंवा 'होल नाईन यार्ड्स'
नमुसी, तुमच्याशी सहमत.
नमुसी, तुमच्याशी सहमत. मेरिलचा 'डेविल वेअर्स प्राडा' मस्त. मस्तच काम आहे तिचं.
फारएण्ड, मॅथ्यू पेरीचा 'फूल्स
फारएण्ड, मॅथ्यू पेरीचा 'फूल्स रश इन' मस्त आहे.
१७... मधे त्या मोठ्याचा रोल
१७... मधे त्या मोठ्याचा रोल ज्याने केला आहे तो मॅथ्यू पेरी आपला एकदम फेवरिट. अधिक माहितीसाठी 'फ्रेन्ड्स' बघा स्मित. किंवा 'होल नाईन यार्ड्स'>> आम्ही पण सीडी घेताना झॅक व चँड्लर दोन्ही आहेत म्हणुनच घेतली. सो क्यूट. फ्रेंड्स शिवाय तर आपला दिवस पूर्ण होत नाही. माझा एक रीसर्च चालू आहे. सकाळदुपारसंध्याकाळरात्र फ्रेन्ड्स कुठे कुठे येत आहे ते शोधून सर्फ करत राहायचे. दे आर ऑल्वेज देअर फॉर यू.
अधांतर खुपच छान होते... दोन
अधांतर खुपच छान होते... दोन दिवस डोक्यात घोळत राहिले... विदारक सत्य
मामी माझ्याकडे १० ही सीझन
मामी माझ्याकडे १० ही सीझन च्या डीव्हीडी चा सेट आहे. एकदा मॅरेथॉन करू
फारेंड , मॅथ्यू पेरी बद्दल
फारेंड , मॅथ्यू पेरी बद्दल मोदक. फ्रेंड्स पुन्हापुन्हा पहायचा तो त्याच्या कॉमेंटसाठी. पण 17 again मध्ये खूप म्हातारा वाटतोय.
कमल हसन चा 'अभय' बघण्याचे
कमल हसन चा 'अभय' बघण्याचे धाडस कोणी केले आहे का?>>>>>
मी पाहिलाय. रात्री जागुन.
काल झी सिनेमा वर तमिळ (हिंदी
काल झी सिनेमा वर तमिळ (हिंदी डब केलेला) चित्रपट पाहिला. हिंदीतलं नाव "अपरिचित". मल्टिपल पर्सनॅलिटी डिसऑर्डर व आधारित पण कमालिचा अचाट आणि अतर्क्य. त्यातला हीरो आणि हिरॉईन कोण आहेत माहित आहे का कुणाला?>>> तमिळ मध्ये हा पिक्चर तूफान चालला होता.. तिकिटे पण मिळत नव्हती. आणि त्यातली गाणी पण तूफान हीट झाली होती.. कंपनीतल्या पब्लिकबरोबर मूळ तमिळ आवृत्तीच बघितली होती.. बाजूला बसून कलिगनी भाषांतर केले होते.. बाकीचे डीटेल्स इथे बघा.. http://en.wikipedia.org/wiki/Anniyan
कमल हसन चा 'अभय' बघण्याचे
कमल हसन चा 'अभय' बघण्याचे धाडस कोणी केले आहे का?>>>>>
हो !
त्यात टकला वर सापाचा टॅटू काढून घेताना कमल ह्सन गातो..'कल तक मुझको गौरव था मै देवतांको हू सन्तान
आज मगर हूं आधा जानवर और हूं मै आधा इन्सान"
आणि ते मनिषा कोईरालाच् ' झंगुरीया के दिल मे शोला जो भडका, दुश्मन जमानेका है एक लडका" !
मामी अपरिचित पहिलास? धन्य
मामी अपरिचित पहिलास?
धन्य आहे तुझी...
तुला साष्टांग _/\_
चाची मला प्रचंड आवडतो..
चाची मला प्रचंड आवडतो.. कंटाळा आला की पाहते.
कमल हसन त्यातल्यात्यात छान दिसलाय या सिनेमात. बाकी सिनेमात अचाट करत
असतो काहीतरी.. साडी घातल्यावरचा बायकांसारखा वावर, मला तर जाम आवडला.
खास करून महाराज ची मुलाखत घेताना कमल, छोटिला संत्रं भरवत असतो, ती वाटी धरण्याची स्टाईल एखाद्या बाईला लाजवेल अशी...
दक्षे, तूला दांडकली पाहिजे
दक्षे, तूला दांडकली पाहिजे धरुन. अपरिचित पहाणारी मी आहे. मामी नव्हे.
हिम्या, बघते हं ! दुसरी पर्सनॅलिटी अंगात आली म्हणजे ही माणसं उडू कशी शकतात कोण जाणे
मी थोडाच पाहिला अपरिचीत. खरचं
मी थोडाच पाहिला अपरिचीत. खरचं अचाट आहे.
अपरिचित म्हणजे अन्नियन हा तर
अपरिचित म्हणजे अन्नियन हा तर मी प्लेनात पाहिला. ह्याची गाणी माहिति होती तामिळ मित्रमंडळामुळे ...
Pages