स्त्रिया आणि खटकणार्‍या/ जाचक प्रथा

Submitted by डेलिया on 24 March, 2010 - 20:37

या विषयावर अतिशय समतोल आणि सखोल विचारांचा लेख लोकसत्ता मधे वाचनास आला त्याचीच लिन्क -http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=593...

सौभाग्यचिन्हे या बीबी वरुन मला हा विषय सुचला. तो बीबी आता फक्त 'संयुक्ता' पुरता मर्यादित केलेला दिसतोय म्हणुन आणि या विषयाची व्याप्ती त्याच्या पेक्शा मोठी वाटत असल्याने नवीन बीबी उघडावा असे वाटले.

आपल्या समाजात बायकांच्या शारीरिक स्थिती वरुन ( उदा. - पाळी चालु असणे ) किंवा वैवाहिक स्थिती वरुन ( कु. , विवाहित , विधवा ई. ) अनेक प्रथा आहेत. यातल्या काही प्रथा तर स्त्रीसाठी अतिशय अपमानास्पद अशाही आहेत. असे असुनही त्यातल्या काही प्रथा आजही अनेक उच्चशिक्षित स्त्रियांकडुन देखिल पाळल्या जातात. काही स्त्रिया त्या प्रथा मनापासुन पाळतात तर काही जणी घरच्यांच्या / समाजाच्या दबावामुळे पाळतात.

इथे मला हे जाणुन घ्यायचेय की तुम्हाला अशा कोण्त्या प्रथा खटकतात? त्या नाहीशा करण्यासाठी तुमच्या परीने तुम्हि काय प्रयत्न करता ? तसेच तुमच्या पुढच्या पिढीवर या प्रथा लादल्या जाउ नयेत म्हणुन तुम्ही काय करता ? तसेच काही प्रथा खटकुन देखिल त्या तुम्हि पाळता का आणि कशामुळे ?

याचे उत्तर देउन माझ्यापासुनच मी सुरुवात करते.
१. पाळी ( menstrual periods ) सुरु असताना बाजुला बसणे ही जरी प्रथा अता बहुतेक सुशिक्षित घरातुन बंद झालेली असली तरी अजुनही पाळी सुरु असताना देवघरात जाणे , देवाची पुजा करणे ई. सारख्या गोष्टींना मनाई असते. पाळी चालु असणार्‍या स्त्री चा देवाला 'विटाळ' होतो असे म्हणले जाते. :
मला स्वताला या प्रथेत कोणतेही तथ्य वाट्त नाही. तसेच 'पाळी चालु असणार्‍या स्त्री चा विटाळ होतो' असे म्हणणे ही अतिशय अपमानास्पद वाटते. मी स्वता हे अजीबात पाळत नाही तसेच माझ्या मुलीला पण असे काहीही मी सांगणार नाही. ईतर कोणी तिला काही शिकवलेच तर ते का योग्य वाटत नाही हे तिला सांगेन.
२. सौभाग्यचिन्हे ( मंगळसुत्र ) ही बायकांची वैवाहिक स्थिती दर्शवितात. त्याच्या अनुषंगाने बायका - बायकात त्यांच्या वैवाहिक स्थिती वरुन भेद भाव केला जातो. : हा भेद भाव दुर व्हावा आणि सर्व बायकाना समाजात समान वागणुक मिळावी असे मला मनापासुन वाटते. रोजच्या आयुष्यात मंगळ्सुत्र वापरत नसले तरी लग्न , मुंजीसारख्या कार्यक्रमांना जाताना घालते. पटत नसले तरी नातेवाइकांच्या आणि घरातल्या मोठ्याच्या टीकेला सामोरे जावे लागु नये आणि उगीच वाद नकोत म्हणुन.

गुलमोहर: 

जाच हा निव्वळ शारिरीक असावा का? म्हणजे हुंडाबळी, बलात्कार, मारहाण - याला जाच म्हणायचे, पण सर्वात नंतर जेवायचे (हा प्रोटोकॉल आहे उदात्त भारतीय संस्कृतीचा) हा पुरेसा सिरियस जाच नाही - असं आहे का ते?>>>

रैना,
अत्यंत महत्वाचा प्रश्न विचारलाहेस..

tonaga,
दलिताने सार्वजनिक विहीरीवर पाणी पिउ नये, असाही प्रोटोकॉल होता आधी..मग तो तसा आहेच म्हणून काय गप बसायला हवे होते का? कारण काय तर म्हणे "दुभत्या म्हशीच्या लाथा गोड"!!माणूस म्हणून ज्या गोष्टी बहुसंख्य लोकांना by default मिळतात, त्या जर कुणाला नाकारल्या जात असतील प्रोटोकॉल च्या/संस्क्रुती च्या नावाखाली, तर त्याला विरोध होणारच. जसे आपल्याकडे दलितांनी केला, जगण्यासाठी पुर्णपणे सवर्ण समाजावर अवलंबून असून सुद्धा..

सिंड्रेला,
स्पष्टिकरणासाठी धन्यवाद. मुद्द्याचे खन्डन ठिक आहे गं, पण non-issues ची out of context चर्चा हा मला तरी "झोपेचे सोंग" प्रकार वाट्तोय..

श्री
१. बाळाच्या प्रकृतीकारणास्तव किंवा कुठल्याही कारणाने जर स्त्रीने विनंती केली असेल तर अशी खोली देणे/ काही व्यवस्था करणे/आडोसा देणे इ.इ. कंपनीला बंधनकारक आहे.
२. पाजण्यापुरती घरची मंडळी/इतरकोणी बाळ घेऊन येऊ शकतात.
३. बाळ घेऊन यायला शक्य होत नसेल तर आईला अशी खोली शांतपणे उपकरणांच्या सहाय्याने दूध काढून द्यायला लागते आणि ते दूध शीतकपाटात ठेवायची व्यवस्था करणे हेही काही देशात कंपनीला बंधनकारक आहे.

५०० झाले की काय होणार? तुमचे 'चालूद्या' बंद होणार का? तसे असेल तर टाकते मीच उरलेल्या १६!

लोक पण काय दळण दळतायत. कुठून कुठं चाललंय...

रैना, भारतासारख्या उच्च संस्कृती असलेल्या देशात अशी कम्पनी आढळत नाही...

चांगली सिरियसली वाचत होते लेख. तर मधे हे वाक्य :
** स्वतंत्र स्त्री आरामकक्ष (ठशींळीळपस ठो)

Rofl सकाळ म्हणजे फार इनोदी बै.

स्त्री म्हणुन एक फूल ने म्हणलं आहे त्याप्रमाणे एकाच कामासाठी सर्व पात्रता निकष सारखे असताना स्त्री आणि पुरुषाला वेगळा पगार असणे.>> ह्याचे प्रमाण कमी आहे. तसेच MNC व मोठ्या कंपनीत तर नाहीच. जाता जाता बायकांना Income Tax कमी भरावा लागतो (भारतात)

५०० पोष्टी झाल्या की काय करणारेस तू मंद्या?? तुझा पालथा घडा सरळ करणारेस का??? Uhoh

जाता जाता बायकांना Income Tax कमी भरावा लागतो (भारतात)..>>
ते बायकांना नोकरी करुन पैसा कमावण्यासाठी प्रोत्साहन म्हणून समजले तर जपानातले उदा. बायकांना अर्थार्जनापासून demotivate करणारे आहे..त्यामुळे तुलना च चुक आहे!

हे भारतात/अमेरिकेत सुद्धा लागु होतं. पगाराबाबत. स्त्री CEO आणि पुरुष CEO यांच्या पगाराची तुलना पदभारांबाबत - उदा सेल्स डायरेक्टर वगैरे स्त्रीपुरुषांच्या पगारात तफावत आढळुन येऊ शकते. तफावतीचे प्रमाण हे देशाप्रमाणे बदलु शकते.
टोणगा अशा कंपन्या आढळतात, पूर्वीपेक्षा जास्त. manufacturing मध्ये आढळायच्या, software मुळे प्रमाण कमी झाले, जे पुन्हा वाढीस लागणे क्रमप्राप्त आहे. बरोबर- शँकी.

मॅटरनिटी लीवला पात्र होण्याबाबत आपापल्या कंपन्यांचे रुल्स तपासुन पहा खालील प्रश्नांनुसार आणि इथे लिहा. प्रचंड तफावत आढळुन येईल आत्ताच्या घडीला.
- नक्की किती महिने काम केल्यावर कंपनीला मॅटर्निटी बेनिफीटस (पगारी रजा) देणे क्रमप्राप्त आहे ?
- पगारी रजा किती दिवसांची असते
- पगारी रजा वाढवून मिळते का?

अजून काही मुद्दे वाढव रैने..
- मॅटर्निटी लीव्ह मिळण्यासाठी स्त्रीच्या वैवाहिक स्थितीचा संबंध येतो का? की ती गरोदर आहे एवढी वैद्यकीय वस्तुस्थिती पुरेशी असते?
- स्त्रीने लग्नाआधीचे नाव बदलून नवर्‍याचे नाव लावले आहे की नाही यावर मॅटर्निटी लीव्ह मिळणे न मिळणे अवलंबून असते का?
- मूल दत्तक घेतले असेल तर मॅटर्निटी लीव्ह मिळू शकते का?
- मॅटर्निटी लीव्ह प्रमाणेच पॅटर्निटी लीव्हही मिळू शकते का गरजेप्रमाणे?

या रजा वगैरेसारखे विषय "कामगार/कामगारणीन्चे हक्क" या सदरात मोडतात ना? अण्डर लेबर अ‍ॅक्ट?
त्याचा "जाचाशी" काय सम्बन्ध बुवा? Happy

>>>> पालथ्या घड्यांना समजण्यासारखे नाही ते. <<<<
नक्कीच, (कुणापुढेतरी सदैव) पसरलेल्या हातान्नाच समजणार ते, नै का? Proud Biggrin Light 1

ही असली भाषा पण पालथ्या घड्यांचीच. कितीही दिवे द्या वृत्ती परत एकदा कळून आलीच की.

>>>
अजून काही मुद्दे वाढव रैने..
- मॅटर्निटी लीव्ह मिळण्यासाठी स्त्रीच्या वैवाहिक स्थितीचा संबंध येतो का? की ती गरोदर आहे एवढी वैद्यकीय वस्तुस्थिती पुरेशी असते?
- स्त्रीने लग्नाआधीचे नाव बदलून नवर्‍याचे नाव लावले आहे की नाही यावर मॅटर्निटी लीव्ह मिळणे न मिळणे अवलंबून असते का?
- मूल दत्तक घेतले असेल तर मॅटर्निटी लीव्ह मिळू शकते का?
- मॅटर्निटी लीव्ह प्रमाणेच पॅटर्निटी लीव्हही मिळू शकते का गरजेप्रमाणे?
>>>
ह्या प्रश्णांची माझ्या कंपनीतली उत्तरे
१. मॅटरनिटी लिव्ह - कंपनीत ८० कामकाजाचे दिवस भरल्यावर मिळते.
२. ९० दिवस पगारी रजा, त्यानंतर तुमची वैयक्तिक रजा व त्यानंतर आवश्यकतेनुसार बिनपगारी रजा मिळते. ९० दिवसांची रजा सातव्या महिन्यानंतर कधी ही, बाळ झाले नसल्यासही घेऊ शकता. बिनपगारी रजेच्या काळाशी प्रोरेटेड बोनस कापला जातो. पण गोपनीय अहवालावर ह्यामुळे परीणाम होत नाही.
३. ४५ दिवस गर्भपाताची रजा मिळते. त्यासाठी कागदपत्र दाखवावी लागतात. ही रजा एकूण कार्यकालात २दाच मिळते (बहुदा)
४. सुट्टी मिळण्यासाठी स्त्रीचे विवाहीत असणे आवश्यक नाही. स्त्रीच्या नावाचाही काही फरक पडत नाही. व्यवस्थापन असल्या गोष्टीत लक्ष घालत नाही.
५. पितृत्व रजा केवळ ५ दिवसांची असते. (जे अन्याय्य आहे). परंतु बाळ झाल्यावर वर्षभरात कधीही घेता येते.
६. दत्तक विधानासाठी १५ दिवस ते ४५ दिवस रजा मिळते. आणि स्त्री पुरुष दोघांनाही समान असते. दत्तक मुलाच्या वयावर ते अवलंबून असते.

माझी कंपनी ह्याबाबतीत बरीच उदारमतवादी आहे. त्यांनी मला "Half day - Half pay" तत्वावर काम करू दिले होते. स्तन्य काढून स्टोर करण्याची सोय आहे. (अर्थात आवश्यक उपकरणे स्वतः आणावी लागतात). दोन कलिगचा आधी गर्भपात झाल्याने, दुसर्‍या वेळेस कंपनीने त्यांना ९ महिने बिनपगारी रजा दिली होती. त्याचा त्यांच्या पदावर अथवा पगारावर काही परीणाम झाला नव्हता.
त्यामुळे वरील निरीक्षणे सर्व कंपन्यांसाठी लागू नाहीत.

४. सुट्टी मिळण्यासाठी स्त्रीचे विवाहीत असणे आवश्यक नाही. स्त्रीच्या नावाचाही काही फरक पडत नाही. व्यवस्थापन असल्या गोष्टीत लक्ष घालत नाही.<<
हे विचारण्याचं कारण की माझी एक मैत्रिण शाळेत शिक्षिका आहे. तिच्या कलीगचा असा प्रॉब्लेम झाला होता. आडनाव न बदलल्याने ती विवाहित नाही आणि तस्मात मॅटर्निटी लीव्हसाठी एलिजिबल नाही असा जावईशोध त्यांनी तिचा सातवा संपत आला तेव्हा लावला होता. म्हणे म्युनिसिपल शाळांचा तसा नियम आहे. मग सातव्यानंतर त्या बाईने वरती दाद मागून बघितली. मॅरेज सर्टिफिकेटसकट. पण प्रशासन बहिरे ते बहिरेच. एव्हाना आठवा संपत आला होता. घाईघाईने तिला आडनाव बदलण्याचे सोपस्कार करावे लागले. ते वेळेतच पार पडण्यासाठी तिला आणि तिच्या नवर्‍याला दिव्य करावे लागले होते.
खरंतर आडनाव बदलण्याची सक्ती केली जाणे हे तिला कायद्याने दिलेल्या अधिकाराची पायमल्ली करणारे आहे पण त्या अवघडलेल्या अवस्थेत न्यायालयात किंवा योग्य त्या ठिकाणी दाद मागणे हे तिला सुचलेही नाही आणि शक्यही नव्हते.
हा अनुभव समोर असल्याने माझ्या मैत्रिणीने लग्न झाल्या झाल्या इच्छा नसताना, सासरच्यांना काहीही प्रॉब्लेम नसतानाही आडनाव बदलून घेतले.

माझ्या बॉसिणीने लग्नानंतर नाव नाही बदललेय आणि काही अडचणींमुळे मॅरेज सर्टिफिकेटही नाही. तरीही तिला आमच्या हापिसने पुर्ण मॅटर्निटी लीव्ह दिली होती व मुलीचे/नवर्‍याचे मेडिकलही मिळतेय.

तसेच पुर्वी एक स्त्री लग्न न करताच २ दा प्रसूत झाली, तिला मात्र बहुतेक स्वतःची लीव्ह द्यायला लागली होती.

मुळात स्त्रीया स्वतःच दुय्यम स्थानाची डिमांड करतात.
नवरा माझ्यापेक्षा जास्त शिकलेला हवा.
माझ्यापेक्षा उंच हवा.
माझ्यापेक्षा जास्त कमविणारा हवा.
एकंदरित नवरा शोधताना स्त्रियाना नवरा त्यांच्यापेक्षा (ब-याच बाबतीत) सुपिरिअरच हवा असतो.
म्हणजे ओघानेच त्या स्वत:ला दुय्यमस्थानी (जाने अंजानेमे) ढकलत असतात.
जो मुळात स्वत:च स्वत:ला दुय्यम स्थानी मानतो, त्याच्या आत्मसन्मानाचा व अस्तित्वाचा विचार करताना पुढची व्यक्ती त्याला दुय्यमस्थानी गृहीत धरने स्वाभाविक आहे.
वरिल बाबीत बदल व्हायला सुरुवात झाली कि आपोआपच तो दुय्यमतेवालं गणित सुटेल.

<<तसेच पुर्वी एक स्त्री लग्न न करताच २ दा प्रसूत झाली, तिला मात्र बहुतेक स्वतःची लीव्ह द्यायला लागली होती. >>
हे मात्र चूक आहे, म्हणजे स्वतःची लिव्ह द्यायला लागणं (मॅटर्निटी लीव्ह न मिळण)

>>>>५. पितृत्व रजा केवळ ५ दिवसांची असते. (जे अन्याय्य आहे). परंतु बाळ झाल्यावर वर्षभरात कधीही घेता येते.
६. दत्तक विधानासाठी १५ दिवस ते ४५ दिवस रजा मिळते. आणि स्त्री पुरुष दोघांनाही समान असते. दत्तक मुलाच्या वयावर ते अवलंबून अस>>>><<<
आयला, मला या दोन्ही मिलाल्या नाहीत Sad माहितही नव्हते, अन कम्पनी XXXXX

नीरजा, त्या कॉर्पोरेशनला कोर्टात खेचता येण्यासारखे नव्हते का? (बाळबोध प्रश्न आहे, माहिते, पण राग अनावर होतो)

पितृत्व रजा केवळ ५ दिवसांची असते.>> लिंबु माझ्यामते ३ आठवड्याचि (ऐकीव) मिळते. आणि आता ६ आठवडे करण्याचा प्रस्ताव आहे म्हणे बुवा.

खालील लिंकवर टिचकी मारुन फेर फटका मारा, तिथे सगळे कायदे दिलेले आहेत. पण वेळेअभावी मला वाचायला जमेना. कामाची माहीती मिळाल्यास माबोवर टाका.

http://www.erlaws.com/showfullact.asp?Act=PWA&cntr=1&stype=off

सरकारी शाळा, ८ महिने पूर्ण होत आलेली अवघडलेली बाई, नोकरी गमावणं न चालण्यासारखं... इत्यादी अनेक कारणं असणार..

कायद्यात माझ्या माहितीप्रमाणे तरी लग्नासंबंधी काही नाही (कायदेपंडीत इकडे या).
http://pblabour.gov.in/pdf/acts_rules/maternity_benefit_act_1961.pdf

(2) No woman shall be entitled to maternity benefit unless she has actually worked in an
establishment of the employer from whom she claims maternity benefit for a period of
not less than one hundred and sixty days in the twelve months immediately preceding the
date of her expected delivery.
गोम ही आहे की प्रीएम्प्लॉयमेंट मेडिकल मध्ये स्त्री गर्भार असल्याचे निदर्शनात आल्यास (काही) कंपन्या कामावर रुजु करुन घेतच नाहीत.
रुजु करुन न घेणे हे कायदेशीर नाही, पण अशा स्त्रीला रजा देणे कंपनीवर बंधनकारक नाही.
दुसरी वस्तुस्थिती ही आहे की किमान १ वर्ष/ ६ महिने काम केल्याशिवाय रजेसाठी पात्र नाही असे खुशाल सांगीतले जाते.

नावाबद्दल काही प्रश्न येत नाही सहसा. (कायद्याप्रमाणे येऊ नये).
दत्तकपालकत्वासाठी सुट्टी मिळते, ती मॅटरनिटी एवढीच आहे आमच्या दोघांच्याही कंपन्यात आणि स्त्रीपुरुष दोघांना मिळते. दत्तकपालकत्वाच्या कायद्याबाबत मला ठाऊक नाही. (जाणकारांनी प्रकाश टाकणे).

पितृत्वासाठीच्या सुट्टीबाबत अनेक वायफळ सल्लागारांचे मत आणि कायदे वाचुन ती नक्की कायद्याअंतर्गत देणे बंधनकारक आहे की नाही ते समजले नाही :फिदी:. आजवर मी तरी ५ दिवस ब-याच कंपन्यात पाहिली आहे. आमच्या कंपन्यात ५ दिवस आहे.

मला आश्चर्य याच वाटत की हे खाजगी मधे नसुन सरकारि "खात्यात" झाल!
या खात्याला खायला घातल अस्त तर मिळाली अस्ती सहज Angry

Pages