स्त्रिया आणि खटकणार्‍या/ जाचक प्रथा

Submitted by डेलिया on 24 March, 2010 - 20:37

या विषयावर अतिशय समतोल आणि सखोल विचारांचा लेख लोकसत्ता मधे वाचनास आला त्याचीच लिन्क -http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=593...

सौभाग्यचिन्हे या बीबी वरुन मला हा विषय सुचला. तो बीबी आता फक्त 'संयुक्ता' पुरता मर्यादित केलेला दिसतोय म्हणुन आणि या विषयाची व्याप्ती त्याच्या पेक्शा मोठी वाटत असल्याने नवीन बीबी उघडावा असे वाटले.

आपल्या समाजात बायकांच्या शारीरिक स्थिती वरुन ( उदा. - पाळी चालु असणे ) किंवा वैवाहिक स्थिती वरुन ( कु. , विवाहित , विधवा ई. ) अनेक प्रथा आहेत. यातल्या काही प्रथा तर स्त्रीसाठी अतिशय अपमानास्पद अशाही आहेत. असे असुनही त्यातल्या काही प्रथा आजही अनेक उच्चशिक्षित स्त्रियांकडुन देखिल पाळल्या जातात. काही स्त्रिया त्या प्रथा मनापासुन पाळतात तर काही जणी घरच्यांच्या / समाजाच्या दबावामुळे पाळतात.

इथे मला हे जाणुन घ्यायचेय की तुम्हाला अशा कोण्त्या प्रथा खटकतात? त्या नाहीशा करण्यासाठी तुमच्या परीने तुम्हि काय प्रयत्न करता ? तसेच तुमच्या पुढच्या पिढीवर या प्रथा लादल्या जाउ नयेत म्हणुन तुम्ही काय करता ? तसेच काही प्रथा खटकुन देखिल त्या तुम्हि पाळता का आणि कशामुळे ?

याचे उत्तर देउन माझ्यापासुनच मी सुरुवात करते.
१. पाळी ( menstrual periods ) सुरु असताना बाजुला बसणे ही जरी प्रथा अता बहुतेक सुशिक्षित घरातुन बंद झालेली असली तरी अजुनही पाळी सुरु असताना देवघरात जाणे , देवाची पुजा करणे ई. सारख्या गोष्टींना मनाई असते. पाळी चालु असणार्‍या स्त्री चा देवाला 'विटाळ' होतो असे म्हणले जाते. :
मला स्वताला या प्रथेत कोणतेही तथ्य वाट्त नाही. तसेच 'पाळी चालु असणार्‍या स्त्री चा विटाळ होतो' असे म्हणणे ही अतिशय अपमानास्पद वाटते. मी स्वता हे अजीबात पाळत नाही तसेच माझ्या मुलीला पण असे काहीही मी सांगणार नाही. ईतर कोणी तिला काही शिकवलेच तर ते का योग्य वाटत नाही हे तिला सांगेन.
२. सौभाग्यचिन्हे ( मंगळसुत्र ) ही बायकांची वैवाहिक स्थिती दर्शवितात. त्याच्या अनुषंगाने बायका - बायकात त्यांच्या वैवाहिक स्थिती वरुन भेद भाव केला जातो. : हा भेद भाव दुर व्हावा आणि सर्व बायकाना समाजात समान वागणुक मिळावी असे मला मनापासुन वाटते. रोजच्या आयुष्यात मंगळ्सुत्र वापरत नसले तरी लग्न , मुंजीसारख्या कार्यक्रमांना जाताना घालते. पटत नसले तरी नातेवाइकांच्या आणि घरातल्या मोठ्याच्या टीकेला सामोरे जावे लागु नये आणि उगीच वाद नकोत म्हणुन.

गुलमोहर: 

प्राचीच्या वरच्या पोस्टला अनुमोदन Happy
(आम्हि आमच्यात वेगवेगळ्याप्रकारे ते सुरू केलच आहे)
स्याम, माझ उत्तर मी उशीरा देईन! Happy

तात्पुरते उत्तर मोड ऑनः

>>>> कुठ्ल्याही स्त्रीची वैवाहीक स्थिती माहीत करुन घेण्याची गरज तुम्हाला का पडते, याचे उत्तर द्याच!! <<<<<
मग घ्याऽऽऽच्च Proud

काय हे ना, की कोणतीही स्त्री जेव्हा माझ्या पाया पडते तेव्हा आशिर्वाद काय उच्चारावा, म्हणजे अष्टपुत्रासौभाग्यवती भव अस म्हणाव की नूस्तच आयु:ष्मानभव - भाग्यवानभव म्हणाव हे समजुन घ्यायला या सगळ्याच खाणाखुणा बर्‍या पडतात! Biggrin

तात्पुरते उत्तर मोड ऑफ

प्राची मस्त पोस्ट. Happy

मला वाटत ज्या प्रकारे संगोपन होत लहानपणापासुन त्यामुळे बराच फरक पडतो.
इथुन पुढे आपल्या संगोपन करताना समान वागणुक हा मुद्दा लक्षात असु द्यावाच शिवाय आपल्या आजुबाजुला आपल्या मित्रमैत्रिणींपैकी कोणी चुकत असेल तर नीट समजावुन सांगाव.
कमीत कमी पुढच्या पिढीत तरी हा इश्यु नसावा अशी मनापासुन इच्छा आहे.
पण ह्यात खेडोपाडी वाढणार्‍या मुलामुलींकडे बघुन त्यांचा स्ट्रगल अजुन बराच आहे हे लक्षात येतय.

अल्पना Lol

प्राची आणि अल्पना ला अनुमोदन !!
आपण यापुढे काय करावे यावर चर्चा होणार असेल तरच हा बीबी चालू ठेवण्यात अर्थ आहे..
जसे प्राची म्हणते तसेच माझ्या आईनेही कधी माझ्या आत्याला वेगळी वागणूक दिलि नाही..आत्याला कुन्कु, मंगळ्सुत्र काढायला वाईट वाट्त होते, कुणीही त्यावर comment केले नाही की आक्षेप घेतला नाही..
अजुनही काही गोष्टी ज्या आपण करु शकतो:
१. कुणालाही मुलगी झाली म्हणून प्रत्यक्ष्-अप्रत्यक्ष पणे हिणवणे, मुलासाठी आग्रह धरणे. मुख्यतः माहेरि जर असे प्रकार दिसले तर तुम्ही नक्किच विरोध करु शकता (e.g.तुमचेच आई-वडील्-भाऊ तुम्च्या वहिनीला यावरुन त्रास देत असतील तर वहिनीच्या पाठीशी उभे राहाणे) सासरीही हे करावेच, पण त्याला मुजोरपणा हे लेबल मिळेल याची तयारी ठेवावी Happy
२. मला अत्यंत राग येतो जेव्हा मुले नसलेल्या स्त्रियांना वेगळी वाग्णूक दिली जाते तेव्हा. हे आपण नक्कीच टाळू शकतो.
३. लहान मुलांना gender unbias शिकवणे. मी यावर आधीही पोस्ट टाकली होती..चुकुनही मुलींसमोर "नीट वाग कारण तुला सासरी जायचेय, मुलींनी घरकामात लक्ष द्यावं" वगैरे उद्गार काढु नयेत. अनेकदा हे अजाणतेपणी निघते, पण त्याचा परिणाम होतोच.
४. आपल्या मुलांच्या-भावांच्या लग्नात हुन्डा न घेणे. बहिणी-मुली:च्या लग्नात न देण्यावर ठाम राहाणे.
५. आपल्या पतीच्या घरच्यांना आपण जितका मान देतो तितका आप्ल्या घरच्यांना नवरा देतो का? हे बघणे. जर नाही, तर ती जाणीव निर्माण करणे.
सध्या इतकेच.

अरे इतके सगळे लिहुन कुणाचे मतपरिवर्तन होणार असेल तर त्याला अर्थ ना!
ज्यांना ज्या काही प्रथा वगैरे आहेत त्या पाळायला आवडतात त्यांनी त्या पाळाव्यात, ज्यांना नाही आवडत त्यांनी त्या पाळु नयेत...
आणि ज्यांना त्या मनाविरुद्ध पाळाव्या लागतात, त्यांनी इथे काथ्याकुट करत बसण्यापेक्षा आपापल्या आयुष्यात त्याला विरोध करावा!
मला एखादी प्रथा पटत नाही (किंवा पटते) म्हणुन समस्त स्त्रीवर्गाने ती प्रथा पाळु नये (किंवा पाळावी) हा कसला आग्रह!

प्राची तुझी पोस्ट म्हणजे खरंच an eye opener आहे. Happy
त्या एका पोस्टीतच अख्ख्या बीबीचं सार सामावलेलं आहे.
जाचक प्रथा वा रुढी-परंपरा या व्यक्तीसापेक्ष आहेत, कुणाला जोडव्या जबरदस्तीने घालणं जाच वाटेल कुणाला वाटणार नाही. त्यामूळे आपल्याला ज्या गोष्टी जाचक वाटतात त्या आपल्या परिने मोडीत काढण्यासाठी आपल्या मर्यादेत राहून प्रत्येकाने प्रयत्न केले तर चित्रं नक्किच बदलेल.. Happy

ब्यांकेतल्या बायका, तुमच्या भागातल्या लोकप्रतिनिधी, अभिनेत्री, गायिका इत्यादी लिंब्याच्या पाया पडायला जातात?? काहीही...

नीधप, अश्या सगळ्या बायांनी आपल्या पाया पडायला यावं अशी लिंबुभाऊ ची सुप्त इच्छा असेल..... Wink

एक फूल ची सगळी पोस्ट मस्त.
बाकी हा बाफ आता खरंच बंद करावा ! कायमच फालतू वाद उकरून "बघा कसा मला मस्त वाद घालता येतो" म्हणून स्वतःची करमणूक करून घेणार्‍यांची इथे फुकटात सोय होते आहे !!

>>"बघा कसा मला मस्त वाद घालता येतो" म्हणून स्वतःची करमणूक करून घेणार्‍यांची इथे फुकटात सोय होते आहे !>>
२००% अनुमोदन!

ए ए मैत्रेयी, प्लीऽऽऽज गं, उद्या पर्यन्त नका ना करु बन्द! Happy
उद्या एक शेवटल वाक्य टाकायचय, सुचलय मगाशीच, पण अजुन वेळ आली नाहीये Happy

लिंब्या मी सांगते -
'शुभं भवतु'
'सुखी रहा'
'यशवंत हो, जयवंत हो'

हे आणि अशासारखे अनेक आशिर्वाद देण्याकरिता व्यक्ती स्त्री आहे कि पुरूष, विवाहीत आहे की अविवाहीत हे माहित असणे गरजेचे नाही.. Proud

कोण त्या बायका , अशा कोणाच्या पाया पडतात? ही प्रथाही बंद करून टाका -कुणाच्याही पाया पडायची(थोडे विषयाला सोडून - पण फक्त जात, केवळ वय हे पाया पडून घेण्याची पात्रता नाही) नात्यातल्या बायकांचे वैवाहिक status माहित होण्यासाठी मंगळसूत्र, कुंकू बघायला लागतं? नात्यात नसलेल्या स्त्रिया का पाया पडणार यांच्या?

पण जात, वय हे पाया पडून घेण्याची पात्रता नाही<<
जातीचा मुद्दा नक्कीच. तो काही पाया पडून घेण्याची पात्रता ठरूच शकत नाही.
कधी जन्मावं हे माणसाच्या हातात नसतं या न्यायाने वय हा मुद्दा पण तिथे invalid पण वयानुसार आलेल्या शहाणपणामुळे (जर आलेलं असेल तर.. अपवादात्मक परिस्थितीत ते येत नाही!) वय हे पण पाया पडून घेण्याची पात्रता होऊ शकतं.. थोडक्यात वयाला ५०%

>>वयानुसार आलेल्या शहाणपणामुळे (जर आलेलं असेल तर.. अपवादात्मक परिस्थितीत ते येत नाही!) >> नी तुला करोडोवेळा अनुमोदन.. Lol

काय हे ना, की कोणतीही स्त्री जेव्हा माझ्या पाया पडते तेव्हा आशिर्वाद काय उच्चारावा, म्हणजे अष्टपुत्रासौभाग्यवती भव अस म्हणाव की नूस्तच आयु:ष्मानभव - भाग्यवानभव म्हणाव हे समजुन घ्यायला या सगळ्याच खाणाखुणा बर्‍या पडतात!

>>>

उगाच कायच्च्या काय मारिमी.. आणि अविवाहीत स्रीला मुले का होउ नयेत.. वाटले एखादीला तर? किंवा ती आणि तिचा जोडीदार लग्नाशिवाय राहत असतील तर.. सर्वात महत्वाचे म्हणजे तुम्ही आशिर्वाद दिल्याने त्यांना आठ काय, एक पण मूल होणार नाहिये की भाग्यवानभव म्हटल्याने भाग्यवान होणार नाहिये.. तुमचा आशिर्वाद म्हणजे काय संजीवनी आहे काय.. हर मर्ज का एक इलाज..

Biggrin

उगाच कायच्च्या काय मारिमी.. आणि अविवाहीत स्रीला मुले का होउ नयेत.. वाटले एखादीला तर? किंवा ती आणि तिचा जोडीदार लग्नाशिवाय राहत असतील तर.. सर्वात महत्वाचे म्हणजे तुम्ही आशिर्वाद दिल्याने त्यांना आठ काय, एक पण मूल होणार नाहिये की भाग्यवानभव म्हटल्याने भाग्यवान होणार नाहिये.. तुमचा आशिर्वाद म्हणजे काय संजीवनी आहे काय.. हर मर्ज का एक इलाज..>>>>>> Lol

आता ही चर्चा बाष्कळपणाकडे जाते आहे. लिम्बू बहुतेक विनोद करताहेत आणि एकटेच हसताहेत. माझ्याकडून पूर्णविराम.

टण्या,
Lol Lol

भरतला पुन्हा एकदा अनुमोदन.

लिम्बुटिम्बु,
तुम्ही तुम्च्या प्रश्नांइतकेच बिनबुडाचे कारण दिलेत्..अर्थात तेच अपेक्षित होते..

ब्यांकेतल्या बायका, तुमच्या भागातल्या लोकप्रतिनिधी, अभिनेत्री, गायिका इत्यादी लिंब्याच्या पाया पडायला जातात?? >>>>>>>>> Rofl अगदी खरय.. उगीच काहीही !!

टण्या Lol

लई हसलो सकाळी सकाळी इथे येऊन.. !

ब्यांकेतल्या बायका, तुमच्या भागातल्या लोकप्रतिनिधी, अभिनेत्री, गायिका इत्यादी लिंब्याच्या पाया पडायला जातात?? >>>>>>>>> Rofl

बाफ बंद पडो ना पडो पण मुर्खांना, झोपेचं सोंग घेतलेल्यांना उत्तर देणं बंद करा बायांनो. का तुमची शक्ती वाया घालवता ?

बाफ बंद पडो ना पडो पण मुर्खांना, झोपेचं सोंग घेतलेल्यांना उत्तर देणं बंद करा बायांनो. का तुमची शक्ती वाया घालवता ?<<<
एका शब्दात उत्तर आहे पण इथे देत नाही.. समजून घे...
राहवत नाही मोड ऑन होतो गं आपोआप!! Wink

Pages