उपासना

Submitted by हसरी on 3 February, 2010 - 23:00

उपासना कशी करावी?
कोणत्या देवतेची उपासना कशी करावी याची सविस्तर माहिती द्या?

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हसरी, एका जागी बसून समोर गणरायाचा फोटो/मुर्ती ठेऊन किंवा मनातल्या मनात डोळ्यासमोर रुप आणून गणपतीची स्तोत्रे म्हण. आपण सामान्य माणसं असल्याने समज १५ मिनिटं तू हे केलंस तरी त्यातली १० मिनिटं मन दुसर्‍याच गोष्टींकडे धावेल. ते धावू दे. तू कंटिन्यु कर. उपासनेला बसल्यावर कितीतरी वेळा चक्क वाईट विचार मनात येतात (जे आपण कधी इमॅजिन करु शकत नाही असे ही, उदा. एखाद्या व्यक्तीचा विनाकारण राग येणे). तरीही ते विचार मुद्दामहून हाकलू नकोस. असं करण्यापाठी एक तत्व आहे. समज आपल्याला अ‍ॅब्सेस झालाय व तो ऑपरेट करुनच काढावा लागणार आहे. तर आपल्याला जवळ जवळ निर्जंतूक केलेल्या ऑपरेशन थियेटरमधे डॉक्टरबरोबर जावेच लागेल. ते डॉक्टर ऑटोक्लेव्ह केलेली उपकरणं वापरुन आपला अ‍ॅब्सेस काढतील. इथे विरोधाभास बघ ! अ‍ॅब्सेस हा पूर्ण जंतूंनी भरलेला आणि बाकीचं वातावरण शुद्ध ! पण तिथून बाहेर पडताना ते डॉक्टर आपल्याला निरोगी करुनच पाठवणार आहेत. तसंच आहे हे. तो परमात्मा रुपी डॉक्टर आपल्या मनातली घाण त्या पवित्र स्पंदनांनी बाहेर काढतो व अधिकाधीक शुद्ध करतो Happy

तसेच, काही ठराविक व्रते, पुजा आपल्या धर्मात सांगितलेली आहेत देवतांप्रमाणे त्यात गणपतीची सत्यविनायक पुजाही असते. पण जास्त फाफटपसारा करण्यापेक्षा पुर्ण प्रेमाने त्याची आराधना केव्हाही चांगली.

पण जास्त फाफटपसारा करण्यापेक्षा पुर्ण प्रेमाने त्याची आराधना केव्हाही चांगली.>>>>>अगदी.

अश्विनी पोस्ट छान आहे.

मि असं ऐकले आहे कि कोणती हि उपासना किंवा मंत्र गुरुकडुन घ्यावा मग ती पुर्ण होते? जाणकरांनी माहिती द्यावी

अश्विनी धन्यवाद

ईतर देवतांची कोणी उपासना करत असल्यास ती द्यावी

हसरी, उपासना शब्दाचा अर्थ समजला की उपासना करणे सोपे जाते उपासना शब्दात दोन भाग येतात - उप हा प्रत्यय आणि अस हा धातू आणि त्याचा अर्थ होतो 'जवळ असणे' म्हणजे आपल्या साघ्याच्या जवळ असणे.

आता जेंव्हा आपण म्हणतो मला संगिताची उपासना करायची आहे तेंव्हा साध्य असते मला संगीत समजणे आणि इतरांना संगीताचा आनंद देता येणे. आता गणपतीच्या उपासनेमध्ये साध्य काय आहे याचा विचार करा. थोडा (नाही बराचसा) गोंधळ उडेल, पण काहीतरी उत्तर "आतून" नक्की मिळेल. फक्त ते आणि तेच ऐका, दुसर्‍यांची उत्तरे वेगळी असतील पण तुमचा त्यांच्याशी काही संबंध नाही. (खरे तर ते उत्तर शोधत शोधत आपल्याच आत उतरणे हीच तर उपासना असते) तुमचे साध्य तुम्हाला कळले आणि काय करायचे ('जवळ असणे') ते पण कळले. आता ते कसे करायचे?

हे जवळ असणे तीन प्रकारे करता येते -
१. शरीराने - यात पूजा, उपास, मौखीक जप, इतर व्रते ई. येतात.
२. मनाने - यात तुमचे साध्य नेहमी तुमच्या मनात असते. ह्यात मानस जप ई येतात.
३. बुध्दीने - यात तुमच्या बुध्दीने किंवा विवेकाने अयोग्य ते गाळत तुमच्या साध्यापर्यंत पोचायचे असते.

या तीन प्रकारावरून अनुक्रमे कर्ममार्ग, भक्तिमार्ग आणि ज्ञानमार्ग हे तीन मार्ग आहेत. भक्तिमार्ग हा सगळ्यात श्रेष्ठ असे श्रीकृष्णाने गीतेत सांगितले आहे. का? कारण त्याच्यापर्यंत पोहचण्याकरता जो ध्यास, जे प्रेम लागते ते फक्त मनातच उत्पन्न होते त्यालाच भक्ति म्हणतात. त्यामुळे इतर दोन्ही मार्गांवरून चालताना पण भक्ती असणे गरजेचे आहे.

आता आपली उपासना कोणत्या मार्गाने करायची ते ठरले की मग प्रवास चालू झाला.

आता कोणता मार्ग निवडायचा हे बर्‍याचदा आपल्याला कळत नाही. कधी कधी मार्ग बदलायचा असतो किंवा एकापेक्षा अधिक मार्गांवरून चालायचे असते. हे कळण्याकरता गुरु लागतो. पण हो त्याला शोधण्यात वेळ दवडू नका. योग्य वेळ आली किंवा तुमची प्राथमिक तयारी झाली की तोच तुमच्या पर्यंत येईल.

तेंव्हा आत्ता तुम्हाला जो आवडेल तो (किंवा ते) मार्ग निवडा आणि 'त्या'च्याकडे चालू पडा. वाटेत गुरु भेटणारच आहेत. सध्या तो गजाननच तुम्हाला मार्ग दाखवेल. अगदीच गोंधळ उडायला लागला तर स्वामी समर्थ, साईबाबा (शीरडीचे), टेंबे स्वामी, गजानन महाराज या पैकी कोणाही एका गुरुची पोथी वाचायला सुरुवात करा. हो पण हा प्रवास अनेक वर्षांचा (कदाचीत जन्मांचा) आहे. त्यामुळे लगेच काही गवसणार नाही कदाचीत. पण धीर धरा आणि चालत रहा.

हो पण हा प्रवास अनेक वर्षांचा (कदाचीत जन्मांचा) आहे. त्यामुळे लगेच काही गवसणार नाही कदाचीत. पण धीर धरा आणि चालत रहा. >>>> हे मात्र खरं. सद्गुरुंच्या समोर आपल्या अनेक जन्मांची जशी काही कुंडलीच असते. त्यामुळे मी अश्विनी नावाची स्त्री एवढीच ओळख त्यांच्यापाशी नसते, तर, या आधी मी कोण होते व काय केलं? त्याआधी कोण होते व काय केलं? हे सगळं म्हणजे या जन्मात अश्विनी असलेल्या जीवाची सद्गुरुंपाशी असलेली खरी ओळख.

नमस्कार माधव,
तुम्ही छान सांगितल आहे, धन्यवाद!

>>>
१. शरीराने - यात पूजा, उपास, मौखीक जप, इतर व्रते ई. येतात.
२. मनाने - यात तुमचे साध्य नेहमी तुमच्या मनात असते. ह्यात मानस जप ई येतात.
३. बुध्दीने - यात तुमच्या बुध्दीने किंवा विवेकाने अयोग्य ते गाळत तुमच्या साध्यापर्यंत पोचायचे असते.

या तीन प्रकारावरून अनुक्रमे कर्ममार्ग, भक्तिमार्ग आणि ज्ञानमार्ग हे तीन मार्ग आहेत.

>>.भक्तिमार्ग हा सगळ्यात श्रेष्ठ असे श्रीकृष्णाने गीतेत सांगितले आहे.

भगवान श्रीकृष्णांनी श्रीमद्भगवतगीतेत 'ज्ञानपूर्णसप्रेमभक्ती' (आत्मनिवेदनभक्ती, ज्याचाशेवट 'सायोज्यमुक्ती'त होतो) श्रेष्ठ आहे, असे सांगितले आहे.

>>>का? कारण त्याच्यापर्यंत पोहचण्याकरता जो ध्यास, जे प्रेम लागते ते फक्त मनातच उत्पन्न होते त्यालाच भक्ति म्हणतात.

कारण, यामध्ये 'पुनरावर्ती' नसते. आणि ही 'सप्रेमभक्ती' श्रीसद्गुरुंनी करुणेने कृपा केल्याशिवाय शक्य होत नाही, असे शास्त्र वचन आहे.याकरिता 'मनाचे' 'उन्मन' होणे गरजेचे असते. मन,चित्त्,बुध्दी, अहंकार हे क्रमाने 'लय' पावायला पाहीजे, त्याशिवाय या भक्तीचा उदयही होत नाही.

>>>त्यामुळे इतर दोन्ही मार्गांवरून चालताना पण भक्ती असणे गरजेचे आहे.

माधव, भक्तीत 'होणे' अपेक्षीत आहे, 'करणे' नाही. हे कृपया लक्षात घ्यावे. आपण जे 'मी करतो', असे म्हणतो, त्याच सगळ 'भोगयुक्त-कर्मफळात' रुपांतर होत आणि 'होण' व्हायच असेल, तर मग मी करित नाही, हे अगोदर अनुभवाने कळायला पाहीजे..नुसत्या शब्दज्ञानाचा उपयोग नाही. आणि हे एकदा वळले की, आपोआपच कळते की अ़जून कोणीतरी 'तिर्‍हाईत' करतोय!

उदा.. अतिशय देखणे-धडधाकट 'डोळे' आहेत, पण 'प्रकाशच' नसेल तर उपयोग 'शून्य'! हे आल 'तिर्‍हाईत' पण! आता समजा असा शरीरा'बाहेरून' आयता असणारा 'प्रकाशही' आहे, पण शरीराआतील 'मन' जागेवर नाही. मग जे दिसतय त्याचा 'बोध' होणार नाही. म्हणजे परत कोणाच्यातरी असण्याची गरज आली, जो बाहेरुन आणि आतून आपल्या हातात नाही!

म्हणूनच, श्रीसदगूरुंची 'कृपा' असल्याशिवाय 'परम बोध' होणार नाही... तो नाही झाला तर 'पुनरावर्ती' टळणार नाही ! आणि म्हणूनच 'उपासना' करायचीच असेल तर 'परब्रह्मरूपी श्रीसद्गुरुंच्या' भेटीसाठीच करावी, असे 'शास्त्र' सांगते.

माधव, 'उत्तर' अवश्य लिहावे, ही नम्र विनंती! स्पष्ट सांगण जरूरी वाटल, म्हणूनच लिहल गेल .. काही चुकल्यास क्षमा असावी !

असो... जगदंब, जगदंब, जगदंब ! Happy

एक भा.प्र.
मानसपूजेला सोवळ्याचे बन्धन आहे का? खासकरुन स्त्रियांसाठी आणि दत्तगुरुंच्या पुजेसाठी.

मानसपूजेला सोवळ्याचे बन्धन आहे का? खासकरुन स्त्रियांसाठी आणि दत्तगुरुंच्या पुजेसाठी.
>> माझ्या मते नाही! त्यानंच हे सगळं तयार केलं- त्यालाच विटाळ होतो? नाही वाटत मला. जिथे प्रेम असतं तिथे सोपस्कार महत्त्वाचे नाहित. (अर्थात मी रुढार्थानं 'एक्स्पर्ट' नाहिये - त्यामुळे हवं तरच घ्या सल्ला!)

नानबा १००% खरे आहे. मी पण रुढार्थानं 'एक्स्पर्ट' नाहिये तरीही! Happy

mnp विटाळ शरीराला होऊ शकतो ('होतो' हे मला पटत नाही तरी) मनाला नाही. तुम्ही मानसपुजा करणार ना?

श्रीदासबोधातील खालील काही ओळी आपल्याला 'पथ' दाखवतात.

आधीं अध्यात्मश्रवण | मग सद्गुरुपादसेवन |
पुढें आत्मनिवेदन | सद्गुरुप्रसादें ||४०||

आत्मनिवेदनाउपरी | निखळ वस्तु निरंतरी |
आपण आत्मा हा अंतरीं | बोध जाहला ||४१||

त्या ब्रह्मबोधें ब्रह्मचि झाला | संसारखेद तो उडाला |
देह प्रारब्धीं टाकिला | सावकाश ||४२||

यासि म्हणिजे आत्मज्ञान | येणें पाविजे समाधान |
परब्रह्मीं अभिन्न | भक्तचि जाहला ||४३||

आतां होणार तें होईना कां | आणि जाणार तें जाईना कां |
तुटली मनांतील आशंका | जन्ममृत्यूची ||४४||

संसारीं पुंडावें चुकलें | देवां भक्तां ऐक्य झालें |
मुख्य देवासि ओळखिलें | सत्संगेंकरूनी ||४५||

श्रीशुकमहामूनींचे 'वैराग्य', प्रभूश्रीरामसद्गुरु ॠषी वसिष्ठांचे 'आत्मज्ञान' आणि श्रीरामायण कर्ते ॠषीवाल्मिकी यांचे 'कवित्व' या सगळ्यांचा मिलाप जेथे होतो, अशा श्रीसमर्थ रामदास स्वांमींच्या वरिल पंक्ती आपणासर्वांना 'पथदर्शक' ठरोत, अशी त्यांच्याच चरणी सविनय प्रार्थना!

श्रीसद्गुरुपादसेवन, श्रीसद्गुरुप्रसाद आणि सत्संग यांच 'महात्म्य' श्रीसमर्थाशिवाय दुसर कोण सांगू शकणार?

माधवा,
धन्य आहे तूमची, डोळ्यातून पाणी काढ्लस बघ! Happy

किती छान प्रश्न विचारला आहात? मी तो इथे पेस्ट करतो.

>>>तुम्ही लिहीलेले अगदी पटले. भक्ती 'होते', 'केली' जात नाही. आपण फक्त संकल्प करू शकतो - उपासनेचा.

सगळी शास्त्रे सांगतात की नरजन्म सगळ्यात श्रेष्ठ पण त्या नरालाच 'मी'पणाची बाधा सगळ्यात जास्त असते. मग तो जन्म श्रेष्ठ कसा? कारण ह्या जन्मातच जीवाला 'पुनरपि जननम' ची जाणीव होऊ शकते. आणि तो त्याला करण्यासारखे एकमेव कर्म करू शकतो ते म्हणजे 'पलीकडे' जाण्यची इच्छा करणे. बाकी आपल्या हातात काही असते का?

व्वा! व्वा!
देव तूमच भल करो..!
जरा थांबा! मी आश्विनी यांच्या 'पोष्ट' ची वाट पहात आहे, त्या काय सांगतात हे अगोदर पाहू..:)

नानबा!
नमस्कार..!

महाकाली जंगदबेचे उपासक आपण सगळे जन्मतःच असतो. 'अज्ञानाच्या' आवरणामूळे ते कळत नाही. Happy

हसरी,
नमस्कार!

उपासना कशी करावी?
कोणत्या देवतेची उपासना कशी करावी याची सविस्तर माहिती द्या?

असे तुमचे प्रश्न आहेत. त्याच्या अगोदर अजून एक प्रश्न अतिमहत्वाचा ठरतो...
क्रमवारच सांगायचे तर तो शास्त्रोक्तक्रम असा पाहीजे..तो म्हणजे

१) 'उपासना' कशाकरिता करायची ?.. नंतर मग..

२)कोणत्या देवतेची करावी ?..आणि ..

३)उपासना कशी करावी ?..शेवटी

४)उपासना कोणी करायची ?

म्हणजेच 'साध्य' हे अगोदर ठरवायला लागत.. नंतर मग त्याकरिता 'साधन' काय पाहीजे याच्या खोलात शिरायला पाहिजे, आणि हे निश्चित झाल्यावर मग त्याचप्रमाणे ते 'साधन' ही आपल्याकडून म्हणजेच 'साधका' कडून घडले पाहीजे!

हा क्रम अतिमहत्वाचा! 'साध्य' जर माहीत नसेल तर पुढच 'प्रवास' घडतच नाही! आणि तो जर घडला नाही तर 'साध्य, साधन आणि साधक', या त्रिपुटिचानिरास ही होणार नाही आणि त्यामूळे 'आत्मनिवेदनही' होणार नाही.. असा हा साधा..सोपा क्रम आहे.

याप्रश्नांची उत्तरे, वर सांगितल्याप्रमाणे, श्रीसमर्थांच्या श्रीदासबोधातील खालील ओळी...

आधीं अध्यात्मश्रवण | मग सद्गुरुपादसेवन |
पुढें आत्मनिवेदन | सद्गुरुप्रसादें ||४०||

....मधील 'अध्यात्मश्रवणामध्ये' अंतर्भूत होतात, आणि म्हणूनच श्रीसमर्थांनी सांगितल्यानुसार ते 'आधी' च घडले पाहीजे, तरच पुढचा मार्ग मिळेल! Happy

धन्यवाद!

माधव नमस्कार!

>>>सगळी शास्त्रे सांगतात की नरजन्म सगळ्यात श्रेष्ठ पण त्या नरालाच 'मी'पणाची बाधा सगळ्यात जास्त असते. मग तो जन्म श्रेष्ठ कसा? कारण ह्या जन्मातच जीवाला 'पुनरपि जननम' ची जाणीव होऊ शकते. आणि तो त्याला करण्यासारखे एकमेव कर्म करू शकतो ते म्हणजे 'पलीकडे' जाण्यची इच्छा करणे. बाकी आपल्या हातात काही असते का?

आपण वरील विचारलेल्या, अर्थपुर्ण प्रश्नाचे, खालील प्रमाणे विश्लेषण करु...

१)'नरजन्म' हा 'सर्वश्रेष्ठ' आणि तेवढाच 'अतिदुर्लभ' आहे,

२)या सर्वश्रेष्ठ अशा जन्मात, 'मी' असा सतत स्फुरणारा 'अहंकार' आणि 'माझे' अस म्हणायला लावणारा 'मोह', यामूळे तो 'नर', 'जन्म आणि मरण' या चक्रात भरडला जातो,

३) 'मागच्या अनंत जन्म-मरणात आपण भरडले जातोय' ही जाणीव या 'अतिदुर्लभ' नरजन्मातच शक्य असल्यामूळे, हा जन्म 'सर्वश्रेष्ठ' आहे,

४) 'जाणीव' झाल्यामूळे या चक्रातून 'सुटण्याची' 'इच्छा आणि त्यामूळे वासना' ही निर्माण झाली,

पण पूढे 'कस' जायच, पुढ जायच म्हणजे नक्की 'काय' करायच आणि ते 'केव्हा' करायच?
म्हणजेच काय? कस ?? आणि केव्हा ??? हे प्रश्न आपणास पडले आहेत.

कृपया कोणी मार्गदर्शन करेल का?
धन्यवाद...!

विवेकाच्या अंकुशाच्या सहाय्याने, मिळालेल्या कर्मस्वातंत्र्याचा उचित वापर करुन :-). तसेच, प्रत्येक चर, अचर गोष्टींमधे "तो"च वसलेला आहे. विश्वातील प्रत्येक गती, स्थिती ही त्यानेच पुरवलेल्या उर्जेमुळे आहे हे पक्के जो जाणतो त्याला "मी" पणा विसरायला मदत होते.

अश्विनी, नमस्कार!
कशा आहात?

तुम्ही छानच सांगितले आहे.. धन्यवाद Happy

>>>विवेकाच्या अंकुशाच्या सहाय्याने, मिळालेल्या कर्मस्वातंत्र्याचा उचित वापर करुन . तसेच, प्रत्येक चर, अचर गोष्टींमधे "तो"च वसलेला आहे. विश्वातील प्रत्येक गती, स्थिती ही त्यानेच पुरवलेल्या उर्जेमुळे आहे हे पक्के जो जाणतो त्याला "मी" पणा विसरायला मदत होते.

तुम्ही जे वर सांगितल आहे, ते खालील प्रमाणे मांडू...

जर 'पुढचा मार्ग' त्या नराला पाहीजे असेल तर....

१) त्या नरामध्ये 'विवेक' असला पाहीजे. 'विवेक' हा 'बुध्दी' चा 'गुण' आहे. 'विवेक' म्हणजे 'सारासार विचार' (सार आणि असार, चांगले आणि वाईट) करण्याची 'बुध्दीची' कुवत होय,

२)'नरजन्मात' चांगले-वाईट विचाराने कळत असल्यामूळे, त्या नराने आपले 'कर्मही' चांगले अथवा वाईट असे ठरवून केले पाहीजे (अर्थात चांगलेच),

३)त्याच बरोबर, "जळी-स्थळी-काष्ठी-पाषाणी 'तो' म्हणजेच 'परमेश्वरच' वसला आहे, आणि ह्या 'विश्वाच्या चालण्यावर', तसेच 'त्याच्या असण्यावर'. त्याचच 'चैतन्य' म्हणजेच उर्जा कारणीभूत आहे", हे ही त्या नराने पक्के 'जाणलेले' असले पाहीजे.

या वरिल 'पात्रता' ज्या नरात असतील 'तोच' पुढे जावू शकतो, कारण त्यालाच 'मी' पणा म्हणजेच 'अहंकार' विसरता येतो.

....अश्विनी, कुठे 'चुकीचे' लिहीले असेल, तर कृपया ते 'बरोबर' करा.

अहो मी काय बरोबर करणार? मी पण शिकतेच आहे.

तुम्ही छान समजावून सांगितलंय.

'विवेक' म्हणजे 'सारासार विचार' (सार आणि असार, चांगले आणि वाईट) करण्याची 'बुध्दीची' कुवत होय, >>>> श्रेयप्रेय निवडणे Happy

विवेकाच्या जोडीला वैराग्य जमले तर उत्तमच. वैराग्य म्हणजे सगळं त्यागून जंगलात जाऊन बसणे नाही. विहितकर्मे करतानाच अंतर्शुद्धी होत जाणे. उपासना, नामस्मरण आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे शारण्यभाव ही मोठी साधनं उपयोगी पडतात.

माधवा,
अहो, कोठे हरवलात?:)

'परमार्थात' काठावर बसून चालत नाही, धारेत 'उडी' मारायला लागते, अंग ओले व्हायला पाहीजे ना? Happy

थांबा, तुम्हाला थोडे बोलते करू...

>>>मानसपूजेला सोवळ्याचे बन्धन आहे का? खासकरुन स्त्रियांसाठी आणि दत्तगुरुंच्या पुजेसाठी.

माझ्या मते नाही! त्यानंच हे सगळं तयार केलं- त्यालाच विटाळ होतो? नाही वाटत मला. जिथे प्रेम असतं तिथे सोपस्कार महत्त्वाचे नाहित. विटाळ शरीराला होऊ शकतो ('होतो' हे मला पटत नाही तरी) मनाला नाही. तुम्ही मानसपुजा करणार ना?

अहो, मग त्या 'निराकाराला'(आकारहीन असलेल्याला) आणि'निर्गुणाला' (गुणाचा अभाव असलेल्याला),
पुजेची (मग ती कशीही असो), जरुरतच का पडावी?

आणि 'माणसाच्या नावात' काय आहे? हा, पण 'परमेश्वराच्या नावात' 'सर्वकाही' आहे,त्यामूळे तेच फक्त लक्षात ठेवावे! माणसे काय येतात आणि जातात! त्याच बरोबर त्यांचे 'विषयही' जातात.जगात 'विषयांची' रेलचेल आहे. जे 'अक्षय' आहे, 'अढळ' आहे, तरिही 'करुणेन ओथंबल' आहे, त्याचीच 'साथ' धरावी!:)

जगदंब,जगदंब जगदंब!

वैराग्य, विहीतकर्मानी होणारी अंतर्शुद्धी,उपासना, नामस्मरण आणि अनन्यभाव पाहीजे !

व्वा!
हळू-हळू 'पात्रता-लिस्ट' वाढत चालली आहे...:)

लिस्टला एकच नाव देऊया का? भूमण्डल शुद्ध करणे. पृथ्वी स्वतःभोवती व सूर्याभोवती फिरते. ती दोन्ही मण्डलं म्हणजे भूमण्डलं. आपल्या सारख्या सामान्य माणसांची पण दोन भूमण्डलं असतात. एक - हे माझं आहे, ते माझं आहे, हे माझं घर, बायको, आईवडील, मुलं, नोकरी इ. आणि दोन - हे मला हवंय, ते मला हवंय इ.

आपल्याला सगळं चांगलं चांगलं हवं असणं बरोबरच आहे पण मी स्वतःभोवती फिरताना (अंकुर भूमण्डल) हे मला त्या परमात्म्याने दिलंय, हे मिळवायची कुवत मला परमात्म्याने दिलीय हे जाणणे म्हणजे अंकुर भूमण्डल शुद्ध होणे. दुसरं बीज भूमण्डल म्हणजे आपला केंद्रबिंदू तो परमात्माच आहे, त्याच्या कक्षेतच आपण रहाणे हेच आपल्या हिताचे आहे हे जाणणे (नुस्त्या स्वार्थीभावाने नाही, तर प्रेमाने). अंकूरापेक्षा बीज श्रेष्ठ कारण असंख्य वृक्षांच्या उत्पत्तीची शक्ती एका बीजात असते.

म्हणून सद्गुरुंसमोर, मठात, मंदिरात दर्शनाला गेल्यावर प्रथम ॐ ग्लौं दत्तात्रेयाय नमः (इथे दत्तात्रेयाय ऐवजी वाटल्यास आपल्या आवडत्या रुपाचे नाव घालावे) हा जप म्हणून स्वतःभोवती प्रदक्षिणा घालून मग लोटांगण घालावे.

व्वा! वा!!

'मी आणि माझ' सोडण आणि 'तू आणि तूझ' अस प्रेमाने जाणण, म्हणजेच आपल्याभोवती असलेल्या काल्पनिक वर्तुळकक्षेचा केंद्र बिंदू बदलन', ,

यातच सर्व पात्रता पुर्ण होतात!

धन्यवाद!

अश्विनी,
तुम्हाला 'श्रीमहाराजांच्या लिलामृतातील' कोळशाचे सोने करणार्‍या 'किमयागाराची' कथा माहीत असेलच.

पात्रता पाहून, श्रीमहाराजांनी त्याच काय केल नाही ! असंख्य माणस आजूबाजूला असूनही, त्यांच्यावर कृपा न करता...साक्षात 'करूणाकराने' आपला ' समर्थ-जाणता' हात फक्त एकाच्याच माथी ठेवला आणि 'माहूरगडाला' जाण्याची 'देवाज्ञा' केली, कशासाठी? तर 'तपासाठी'.. आणि क्षणार्धात सगळ नव्हत्याच... होत झाल.. किमयेचे कोळसे झाले! 'जीव' मायेच्या तडाख्यातून सूटला..!

पात्रतेशिवाय काही नाही... बोलाचीच कढी ..आणि बोलाचाच भात !!

Pages