उपासना

Submitted by हसरी on 3 February, 2010 - 23:00

उपासना कशी करावी?
कोणत्या देवतेची उपासना कशी करावी याची सविस्तर माहिती द्या?

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

व्वा, बरिच उत्तरे आली! म्हणूनच अगोदरच माफी मागितली होती!सर्वांचा सहभाग येथे असणे आवश्यक होत. म्हणूनच हे 'विपरित' धाडस केल गेल. त्यात 'मी' शहाणा असा 'भाव' असण शक्य नाही. तस आपल्याला वाटल असेल तर, आपल्याला झालेल्या तसदीबद्दल परत एकदा आपणा सर्वांची मनःपुर्वक माफी मागतो.

नानबा.. तुमचे मुद्दे अगदि योग्य आहेत, माझा 'विरोध' असायच तस काही 'कारणही' नाही.

अश्विनी, सांगायचा मुद्दा तुम्हाला कळला का?

>>>नेहमी वाटतं हे सर्व लिहिण्याचे आपण अधिकारी नाही. तरीही असे बाफ दिसले, अशी चर्चा दिसली की जे मनात उतरलेय ते न राहवून इथे उतरवलं जातं. मी स्वतःच जिथे परमार्थात पुर्णपणे पुढे गेले नाहिये तर मध्यातच दुसर्‍यांना मी काय म्हणून सांगतेय? म्हणूनच काही लिहिलं की तिथे लिहावंसं वाटतं इदं न मम | इदं गुरुदत्तस्य |.

तुम्ही कृपया असेच लिहित रहा..!
यालाच.. मनन आणि चिंतन म्हणतात! आपण 'सूज्ञ' आहात, आपल वाचन 'अफाट' आहे, यात शंका नाही.
आपण जे लिहितो, ते आपल्याच 'मनाच' दर्शन असत, ते चिंतनाकरिता फारच उपयोगी पडत. "इदं मम | इदं न गुरुदत्तस्य |" अस 'उलट' लिहल तरि चित्तात, एकही 'वृत्ती' खळबळ उठायला नाही पाहिजे. मग लिहल काय आणि न लिहल काय, काही फरक पडत नाही. Happy

महेश, गौरी..
धन्यवाद!

अजून 'हसरी' यांची 'काहीच' प्रतिक्रिया नाही आली! 'हसरी' आपण जे विचारल आहे 'ते' अतिशय योग्य आहे.

माधव,
आता, बोला अजून काय लिहायच आदिमायेबद्दल..:) त्या महामायेची अशी 'वेगवेगळी' रुप 'साक्षिभावान' पहायला काय 'गोड' असतात नाही.जणू काय 'वृत्ती' रुपाने 'आपणच' पसरलोय असा 'भास' होतो.:)
'आपण 'अज्ञानी' आहोत', हा बोध 'परमार्थात' का श्रेष्ठ मानतात, हे लक्षात आल असेलच.

अश्विनी,
श्री समर्थ रामदास्वामींचा, आपण जे समजतो, त्यातला, 'संकल्प आणि विकल्प' कसा 'विचारात' टाकतो, ते पाहू..:)

संकल्प-

सगुणाचेनि आधारे | निर्गुण पाविजे निर्धारे ||

म्हणजे त्यांनी 'निर्धारपूर्वक' सांगितल की, 'निर्गुणाचा' सगुणच आधार आहे, आणि ते परत असही म्हणतात...

विकल्प-

सगुण भक्ती ते चळे | निर्गुण भक्ती ते न चळे | हे आवघे प्रांजळ कळे | सद्गुरु केलिया ||

म्हणजे 'सगुण' हे चळणार-हलणार आहे, तर मग ते 'निर्गुणाचा' आधार कसा काय होऊ शकत?

(या मुद्द्याकरिताच वरच 'संकल्प-विकल्पाच ', लिहन झाल!)

तुमच्या मनात हाच विचार आला होता का?

सावट तुम्ही खरचं छान पटवलंत (आभारी आहे)
मला तुमच्या सगळ्यांईतक काहीच माहित नाही पण तुमच्या कडुन अजुन जाणुन घ्यायला आवडेल
मला भक्तीमाग विषयी सांगा ना?

ऋग्वेदकाळात उपासनेचे दोन प्र्कार होते:
१. दैनंदिन उपासना
२. नैमित्तिक उपासना

ऋग्वेदातील कितीतरी मंत्राना नैमित्तिक यज्ञांचे संदर्भ नाहीत. त्यावरून हा अंदाज अभ्यासकानी बांधलेला आहे.. दैनंदिन उपासना ही व्यावहारीक फायद्यासाठी करायची नव्हती, तर फक्त अध्यात्मिक उन्नती , परमतत्वाची जाणीव रहाणे या एकाच भावनेसाठी तिचा उपयोग होत होता.
नैमित्तिक उपासना ही विशिष्ट हेतू पूर्ण करण्यासाठी होती.. उदा. पुत्रकामेष्टी यज्ञ, पावसासाठी यज्ञ इ.

पूर्वीच्या काळात जंगलात रहाणे, दैनंदिन साधी रहाणी, एखादे पोटापुरते काम .. संपलं. आयुष्य एवढ्यापुरतेच होते. त्यामुळे काही मागणे, ही फारशी गरज नसायचीच. त्यामुळे दैनंदिन उपासना हीच मुख्य होती.. नैमित्तिक उपासना कधीतरी, एखाद्या हेतुसाठी..

आजच्या सिविलायझेशनच्या काळात आपल्याला रोज काहीतरी हवेच असते. पैसा, घर, घराला कर्ज, बायको ( किंवा घटस्फोट Happy ) , मुले, त्यांच्या परिक्षा........ न संपणारी यादी आहे. आपण आजच्या काळात रोज यातलेच काही ना काही मागायला उपासना करतो. म्हणजे वरवर दैनंदिन उपासना दिसणारी आपली उपासना ही मुळातच शास्त्रानुसार 'दैनंदिन'च्या व्याख्येत बसत नाही... रोजच आपण नैमित्तिक उपासनाच चालवलेली असते.. नवस, इन्स्टंट फल देणारी व्रते, अनेक बाबांचे अनुग्रह... हे सगळे नैमित्तिक कारणानेच तर प्रामुख्याने होतात.. .

त्यामुळे उपासनेची दृष्टी बदलणं, हे जास्त महत्वाचे आहे. देवता, नाव, गुरु, पुस्तक, किती वेळ ... याला फारसे अर्थ नाहीत. हे फक्त वेगळेवेगळे ऑप्शन्स आहेत..

मायेबद्दल "साधक सोपान" मधे फारच सुंदर माहिती दिली आहे. म्हणजे मायेचे वर्णन, प्रकार, निरसन करण्याच्या पद्धती, इ. खरे तर त्यातले काही येथे लिहिण्याचा मोह होत आहे, पण तेवढा वेळ देता येणार नाही.

'हसरी' धन्यवाद!

जागो 'मोहन' प्यारे.. नमस्कार!
छान माहिती आहे, धन्यवाद!

आपण जे सांगितले, ते खालील प्रमाणे परत एकदा लिहले आहे...काही वेगळा अर्थ (आपणास नको असलेला ) काढ्लेला असेल तर कृपया 'दुरुस्त' करा.

उपासनेचे दोन प्रकार आहेत-...
१. नित्योपासना - 'अध्यात्मिक उन्नतीसाठी' उपयोगी.
२. नैमित्तिक उपासना - 'व्यवहारिक गरजेच्या पुर्ततेसाठी' उपयोगी.

हा फरक लक्षात घेऊन.. आपल्या उपासनेचा 'दृष्टीकोण' बदलणं', म्हणजेच 'ध्येय' आपण ठरविणे महत्त्वाचे. देव-नामस्मरण, गुरू, संतचरित्र-पुस्तक वाचन, सत्संगती,उपासनेचा वेळ-काळ, याला 'फारसा' अर्थ नाही! कारण हे वेगवेगळे 'ऑप्शन्स' आहेत.

याला 'फारसा' अर्थ नाही! कारण हे वेगवेगळे 'ऑप्शन्स' आहेत.

याला फारसा अर्थ नाही, म्हणजे मला म्हणायचे आहे की हा देव करु की तो देव, १० वेळा मंत्र म्हणू की १०० वेळा, फूल एक देऊ की ४, सोमवार की शुक्रवार ई. .असे तपशील म्हणजे फक्त ऑप्शन्स आहेत.. ज्याने त्याने सोयीने , आवडीने ऑप्शन निवडावा... एकाला हा ऑप्शन उपयोगी पडला म्हणून दुसर्‍यालाही तोच उपयोगी पडेल असे नाही, कोण गीता वाचेल कोण गाथा.... म्हणून ऑप्शन हा शब्द वापरला...

अध्यात्म-सत्संग-सद्विचार ह्याबाबतीत आंतरजालावर पुस्तके वाचायला मिळतील का किंवा बोधप्रद लिखाण? कोणाला माहिती असेल तर सांगाल का?

धन्यवाद जागो 'मोहन' प्यारे!

'संकल्प_विकल्पाच्या' निमित्याने सगळ्यांची जी 'उत्तरे' आली ती संगतवार मांडू आणि पाहू की हाती काय लागतय का ते.... आदिमायेच हेही 'मूळरुप' पाहण' ही महत्त्वाच आहे..!

१)गौरी- विकल्प(संशय) मनात येणे म्हणजेच मायेचा प्रभाव असणे.
२)नानबा-माझं मत दुसर्‍यावर लादलं जाऊ नये.प्रत्येक उदाहरण तर्कावर घासल्याशिवाय स्विकारणं जरा अवघड जातं मला.
३)अश्विनी-बीजमंत्र म्हणजे व्हास्ट प्रकरण आहे (गौरी-'नाम' ह्या विषयावर आण़खीन जाणुन घ्यायला आवडेल)
४)महेश-जशी सामान्य औषधांना पथ्ये असतात, तशी यांनाही असावीत, उदा. संपुर्ण विश्वास, सदाचरण, नैतिकता, श्रद्धा, इ.
५)हसरी-मला भक्तीमार्गा विषयी सांगा ना?
६)जागो'मोहन'प्यारे-त्यामुळे उपासनेची दृष्टी बदलणं, हे जास्त महत्वाचे आहे.

एक 'संकल्प' सोडला की, त्यातून अनेक 'विकल्प' जन्म घेतात..जशी आपली सर्वांची 'उत्तरे'!
त्याच सर्व विकल्पातूनच 'सार' एकत्र केल की.. 'मूळ संकल्पा' पर्यंत जाणारा 'मार्ग' मिळतो अस म्हणतात ते काही खोटे नाही.:)
पहा यातच आपल्याला हवा असणारा 'सद्-वस्तू' पर्यंत जाणारा 'पथ' आहे का तो. प्रत्येक स्वतंत्र 'विकल्प' हा बिखरल्यासारखा भासतो..पण तेच जर एकत्र आले तर 'विवेक' तयार होतो आणि हा विवेकच पुढचा 'मार्ग' प्रशस्त करतो.

आपल्या सर्वांना धन्यवाद!

माधव, आता तुमच उत्तर पाहीजे..:)

जागो 'मोहन' प्यारे... हे जर "जा'मोहन' प्या" अस लिहल तर चालेल का?

हे वाचून श्रीसंत जनाबाईंची खूप आठवण येते आहे.. त्या म्हणतात ,.. "मी श्रीभगवंतच खाते, श्रीभगवंतच पिते, श्रीभगवंतच बोलते,श्रीभगवंतच लेते आणि श्रीभगवंतावरच निजते....."

काय अजब 'भावस्थिती' असते नाही संतांची!:)

जामोहनप्या,
आपण सांगितल्याप्रमाणे आपला 'दृष्टिकोण' बदलन जरुरी आहे हे पटल, म्हणूनच 'अध्यात्मिक उन्नती' म्हणजे काय? हे आपल्या दृष्टिकोणातून जाणून घ्यायला निश्चित आवडेल!:)

जा'मोहन'प्या,
तुमच्या 'पोष्ट्ची' वाट पहात आहोत! ('अध्यात्मिक उन्नती' म्हणजे काय?)

बुरा ढुंढने मै चला,बुरा न मिलीया कोई।
अपने अंदर झांकता,मुझसे बुरा न कोई॥
..श्रीसंतकबीर..

याच 'सहाय्य' घेऊन लवकर सुरुवात करा....!:)

संतश्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकाराममहाराजांचे काही अभंग पाहू..

वेद अनंत बोलिला । अर्थ इतकाचि शोधिला ॥१॥
विठोबासी शरण जावे । निजनिष्ठा नाम गावे ॥धृ॥
सकळ शास्त्रांचा विचार । अंती इतकाचि निर्धार ॥२॥
अठरापुराणी सिद्धांत । तुका म्हणे हाचि हेत ॥३॥

वेद..उपनिषदे.. श्रुति..स्मृती.. मिमांसात्मक षड्दर्शने.. सहा शास्त्रे.. अठरा पुराणे... याचा 'अर्थ' ..'विचाराने..आत्मानात्मविवेकाने जर शोधला, तर अतिश्रेयकर..सर्वांगी हितकर असणारे, निजनिष्ठेने होणारे, श्रीभगवंत नामच, 'सिद्धांत'(उत्तरपक्ष) म्हणून 'निर्धाराने'... अंतीम 'सार' रुपाने हातात पडते, म्हणून तेच 'अखंड' गावे..त्याचेच 'किर्तन' करावे... त्यालाच 'शरण' जावे.कारण यातच आपले 'खरे हित' आहे.

असा अत्यंत मोलाचा 'संदेश' रुपी 'उपदेश' श्री महाराज आपणा सर्वांना देत आहेत.

म्हणूनच ही 'संतवाणी' पूढे म्हणते...

हे चि दान देगा देवा । तुझा विसर न व्हावा ॥१॥
गुण गायीन आवडी । हे चि माझी सर्व जोडी ॥धृ॥
न लगे मुक्ति आणि संपदा । संतसंग देई सदा ॥२॥
तुका म्हणे गर्भवासी । सुखे घालावे आम्हासी ॥३॥

महेश,

>>>ज्ञानमार्गाने साधना करता येत नाही का ? ज्ञानमार्गाचे चांगले / वाईट पैलू कोणते ?

'ज्ञानमार्ग' हा श्रीगुरूगम्यच आहे. हे 'ज्ञान' म्हणजेच..'आत्मज्ञान' होय..'स्व'स्वरूपाविषयीचा संभ्रम दूर होणे, म्हणजेच 'आत्मज्ञान' होय.

'स्व' प्रयत्नांना यात 'पुर्णपणे' मुभा आहे... पण आपली अवस्था ही.... भर समुद्रात शीड नसलेल्या नावेसारखी, दिशाहिन..ध्येयहिन.. आणि कधीही नावेसहीत बुड्ण्याची शक्यता असणारी अशी..असते.. त्यामूळे अशा प्रयत्नाना 'यश' मिळण्याची शक्यताही तितकिच 'अंधूक' असते.

आणि 'ज्ञानाशिवाय मोक्ष नाही' हे 'सत्य' जाणून 'मुमुक्षुने' त्वरित 'शास्त्रांनी' सांगितलेल्या मार्गानेच, ही 'ज्ञानप्राप्ती' ..याची देही याची डोळा...करून घ्यावी.... हेच श्रेयकर! Happy

वाह, माझ्या जुन्या लिखाणाला लक्षात ठेवून उत्तर दिल्याबद्दल धन्यवाद.
आता अजुन एक प्रश्न, समजा केवळ डोळे मिटून मन निर्विचार करण्याचा प्रयत्न केला तर तो चांगला की वाईट.
जर परम तत्व निर्गुण निराकार आहे तर त्यात मन केंद्रित करून त्याच्याशी एकतानता साधण्याचा प्रयत्न करणे योग्य की अयोग्य ? कदाचित मी जरा धाडसी आणि वेडे प्रश्न विचारत असेन, पण शंकानिरसन करून घेण्यास प्रत्यवाय नसावा. आपल्या उत्तरावर माझे पुढचे प्रश्न अवलंबुन आहेत.

>>>समजा केवळ डोळे मिटून मन निर्विचार करण्याचा प्रयत्न केला तर तो चांगला की वाईट.

मनाची 'निर्विचार' स्थिती हे 'अंतिम गंतव्या' सारखे आहे! संतशिरोमणी ज्ञानमाऊलींनी सांगितलेली आणि साधलेली 'संजीवन समाधी' ही याच पठडीतली.( मनाची संकल्प-विकल्प रहीत अवस्था-निर्विकल्प समाधी). 'समाधी' ही लावायची नसते.. तर ती लागते..साधते.

>>>जर परम तत्व निर्गुण निराकार आहे तर त्यात मन केंद्रित करून त्याच्याशी एकतानता साधण्याचा प्रयत्न करणे योग्य की अयोग्य ?

'निराकारावर' मन कसे केंद्रित होईल? एखाद्या माहित असलेल्या 'आकारावर' आपले 'मन' केंद्रित करण्याचा प्रयत्न केल्यास हे म्हणणे.. हा प्रश्न लक्षात येईल!:)

>>निराकारावर' मन कसे केंद्रित होईल? एखाद्या माहित असलेल्या 'आकारावर' आपले 'मन' केंद्रित करण्याचा प्रयत्न >>केल्यास हे म्हणणे.. हा प्रश्न लक्षात येईल
माहित असलेल्या आकारावर म्हणजे काहीही चालू शकेल का ? मुर्ती तर सर्वांना माहित असलेला उपाय आहे. पण त्याऐवजी एखादी वस्तु, व्यक्ती, इ. ?

अध्यात्मिक उन्नती या शब्दाची नेमकी व्याख्या सांगता येणार नाही..... काही मुद्दे मांडतो...

१. आपण जन्म आणि मृत्यु यांच्यामध्ये असणारे एक छोटेसे जीवन जगतो असतो, याची जाणीव..
२. आपल्या हातात काहीही नसते, कुछ तय नही है, सिर्फ यही तय है, याची जाणीव.
३. माणसाचे जीवन अशाश्वत आहे, याची जाणीव असणे...

एकदा या जाणीवा जाग्या झाल्या की लहान्सहान गोष्टींसाठी कुठली तरी 'पूजा' करणे, यातील फोलपणा लक्षात येतोच....

ऋग्वेदात एक ऋचा आहे... हिरण्यगर्भ सूक्त... याचा अर्थ खूप गहन आहे...

हिरण्यगर्भः समवर्तताग्रे भूतस्य जातः पतिरेकासीत ।
स दाधार पृथ्वीं ध्यामुतेमां कस्मै देवायहविषा विधेम ॥

वो था हिरण्यगर्भ सृष्टीसे पहले विद्यमान...
वोही तो सारे भूत जातीका स्वामी महान...
जो है अस्तित्वमान धरती आसमान धारण कर....
ऐसे किस देवता की उपासना करे हम हवि देकर?

यातल्या शेवटच्या भागाचा अर्थ काही जण प्रश्नार्थक घेतात.. कस्मि देवाय म्हणजे 'कोणत्या देवाची' या अर्थाने वर अर्थ दिलेला आहे..

पण याचा दुसरा अर्थ गहन आहे.... कस्मै म्हणजे क नावाच्या देवाला हवी देतो...... सृष्टेचे मुळ शोधताना ऋषीमुनी थकले... ते नेमके काय होते, कसे होते, समजेना... बीजगणितात जसे आपण म्हणतो, ती संख्या एक्स- क्ष मानू आणि मग आपण गणित सोडवायला बघतो..

तसे त्यानी क हे नाव दिले... जे आम्ही जाणू शकत नाही, बघू शकत नाही, त्याचा आकार कसा होता, हे माहीत नव्हते, त्याचा आकार 'माणसासारखाच' असावा, त्याचे नाव संस्कृतात की फारसीत असावे, हा भेदच ऋषीमुनीनी मोडून काढला... क्षूद्र माणूस त्याचे नाव तरी काय ठेवणार? म्हणून त्याचे नाव क.......... हा अर्थ जागृत ठेवणे, म्हणजे अध्यात्मिक जाणीव. हे काय आज दिसते आहे, ते याच क चीच गणिताची पुढची पायरी आहे.... उद्या पुन्हा एक नवी पायरी असणार आहे....

लहान मूल आईचा 'अनुभव' घेत असते.... तसा अनुभव.. शब्द, फोटो, नाव कोणत्या भाषेत असावे ?हे प्रश्न त्या मुलाला कधी पडतात काय? तसेच काहीतरी.....

आताच मी एक कथा इथे पोस्टली आहे... 'अढळपद'... त्यातही थोडेफार मी मांडलेले आहे....

>>निराकारावर' मन कसे केंद्रित होईल? एखाद्या माहित असलेल्या 'आकारावर' आपले 'मन' केंद्रित करण्याचा प्रयत्न >>केल्यास हे म्हणणे.. हा प्रश्न लक्षात येईल
माहित असलेल्या आकारावर म्हणजे काहीही चालू शकेल का ? मुर्ती तर सर्वांना माहित असलेला उपाय आहे. पण त्याऐवजी एखादी वस्तु, व्यक्ती, इ. ?

मुर्ती..देव...मोक्ष हे तात्पुरते बाजूला ठेऊन.. आपल्या मनाची जडणघडण जाणून घेणे अगोदर महत्त्वाचे!
आपल्याला माहीत असलेल्या कोणत्याही आकारावर 'मन' केंद्रित होते का? हे पहाणे जरूरी!

जा'मोहन'प्या,

>>>अध्यात्मिक उन्नती या शब्दाची नेमकी व्याख्या सांगता येणार नाही..... काही मुद्दे मांडतो...

याकरिता मनापासून धन्यवाद!

'अढळपद' छान आहे!

सावट, मला तेच विचारायचे आहे की जर एखाद्या व्यक्तीवर निरतिशय प्रेम असेल आणि त्या व्यक्तीच्या चिंतनात जर सर्व काही विसरून कोणी गढून जाऊ शकत असेल तर ती साधनेची / उपासनेची पहिली पायरी समजावी का ?
अर्थात अगदी खरे प्रामाणिक प्रेम, निव्वळ आकर्षण नाही.

महेश,

आपण 'मनाबद्दल' बोलत होतो. एखाद्या 'आकारावर' आपण आपल 'मन' केंद्रित करू शकतो का? हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे. याच उत्तर आपणच आपल्यावरच 'प्रयोग' करून ठरवायचे आहे.पण 'उत्तर' मिळणे जरूरी आहे.

>>एखाद्या व्यक्तीवर निरतिशय प्रेम असेल आणि त्या व्यक्तीच्या चिंतनात जर सर्व काही विसरून कोणी गढून जाऊ शकत असेल तर ती साधनेची / उपासनेची पहिली पायरी समजावी का ?

'व्यसनाच्या' अधिन असणाराही अशाच स्थितीत असतो. मग त्या 'व्यसनाला' आपण प्रामाणिक 'प्रेम' समजतो का?
'प्रेमात वाहून जाणे' आणि 'निरपेक्ष' प्रेम यात टोकाचा फरक आहे. 'निरपेक्ष' प्रेम हे एकटे 'श्रीभगवंतच' करू जाणे.
व्यवहारिक प्रेमात बरेच प्रकार आहेत.. आईवडीलांचे फक्त 'आपल्या' मुलावरील प्रेम..मुलाचे फक्त 'आपल्या' आई-वडिलावरील प्रेम.. नवरा-बायको, तरूण जोडपे यांचे 'आपापसातील' प्रेम, एखाद्या 'कुत्र्याचे', 'आपल्या' मालकावर असणारे प्रेम, 'आपल्या' देशावर असणारे आपले प्रेम, यात श्रेष्ठ् कोणते हे आपले आपणच तपासून पहायला हवे. याचही 'उत्तर' मिळणे जरूरी आहे.

ही 'आपली' उत्तर 'आपणच', आपल्याच बुध्दिचा वापर करून, विवेकाच्या सहाय्याने, अधोरेखित करायची आहेत.

'पाण्याशिवाय माशाचे 'सगळे जग' वैरी', हे त्या 'माशाला' जो पर्यंत कळत नाही..तो पर्यन्त पाण्याबाहेर काढ्लेल्या माशाची 'तडफड' कशी कळणार? ही 'तडफड' जोपर्यंत कळत नाही, तो पर्यंत 'पायर्‍या' मोजण, हे न मोजल्यासारखच आहे, नाही का? Happy

हे चि दान देगा देवा । तुझा विसर न व्हावा ॥१॥
गुण गायीन आवडी । हे चि माझी सर्व जोडी ॥धृ॥
न लगे मुक्ति आणि संपदा । संतसंग देई सदा ॥२॥
तुका म्हणे गर्भवासी । सुखे घालावे आम्हासी ॥३॥

'गर्भवासाच दु:ख' हे 'दारूण' या सदरात मोडणार असत. अस असतानाही श्रीसंत तुकाराममहाराज 'मुक्ती आणि संपदा', हे नको अस म्हणत असतानाच, 'गर्भवासही' मागतात असे का बरे?

श्रीभगवंताचीच 'रुपडी' असणारी 'श्रीसंतसद्गुरु' मंडळी जेव्हा श्रीभगवंताजवळ काही मागतात..तेव्हा ते मागण हे 'शास्त्रशुध्द' असते.. हे आपण कायम लक्षात ठेऊन.. त्या मागण्याचा 'अभ्यास' केला पाहीजे.

श्रीमहाराजांनी हे वरील मागण, ज्यावेळी.. श्रीभगवंताजवळ मागितले.. त्यावेळेला ते 'आत्मज्ञानयुक्त' होते. त्या 'पुर्णज्ञानामूळेच' आलेल्या.. श्रीभगवंताच्या निरपेक्ष प्रेमाची जाणीव झाल्यामूळेच त्यांनी त्या 'प्रेमाच्या' भरोशावरच आपल गर्भवासाच 'मागण' पुढ रेटल आहे.. !

हे 'मागण' ही कस 'जर-तर' युक्त आहे, हे पाहील तर त्या 'मागण्यातील' द्रष्टेपण कळून येत.

१) त्यांनी 'गर्भवास' मागितला, पण जन्मही 'माणसाचाच' मागितला..(इतर नाही)
२) आणि त्यांनी हा 'दुर्लभ' असा 'मनुष्य' जन्म मिळाल्यानंतर, श्रीभगवंताचाच 'विसर' न व्हावा अस 'दान' ही मागितल. आता जन्म झाल्यावर हे 'दान' श्रीभगवंताकडूनच पाहिजे असेल तर, श्रीभगवंताची 'भेट' ही झाली पाहिजे.

म्हणजेच या 'दुर्लभ' अशा 'मनुष्य' जन्मात, श्रीभगवंताच्या भेटीची 'तीव्र' इच्छा, जी तेवढीच 'दुर्लभ' आहे..तिही मागितली.

श्रीमहाराजाना 'भक्ती' ही करायची गोष्ट नाही, तर ती व्हायची..मिळायची गोष्ट आहे.. हे पक्के माहीत असल्यामूळे... त्यांनी ती भक्ती दानात मागितली.

आता 'दान' पाहीजे, तेही साधसुध नाही.. तर सा़क्षात 'भक्ती' च... श्रीभगवंताचीच सावली असणार्‍या 'कृपाशक्तीच'...! मग हे अस 'जगावेगळ' दान, दानात देणारा 'दाता' ही तेवढ्याच 'तोलामोलाचा' पाहीजे नाही का! म्हणजेच पुढ्च 'अतिदुर्लभ' मागण, म्हणजेच 'श्रीसद्गुरुभेट' आणि नुसतीच कोरडी भेट नाही तर.. त्यांची महादुर्लभ भक्तीदानात देणारी 'कृपा' ही मागितली! 'आत्मदान' हे सर्व 'दानात' श्रेष्ठ आहे, अस शास्त्र सांगत!

३)चला आता 'योग' मिळाला..पण त्याचा 'क्षेम' ही महत्त्वाचा, मग तेही पुढे मागितल..
गुण गायीन आवडी । हे चि माझी सर्व जोडी ॥धृ॥
श्रीभगवंताच्या 'गुणांच' संकीर्तन 'अखंड' होणे.. म्हणजेच 'क्षेम' होणे होय!

आणि हे सगळ मिळालेल सांभाळायचा सद्विवेक-वैराग्य जर पाहीजे असेल.. एका गोष्टिची 'अत्यंत' जरूरी असते.. ती म्हणजे 'संतसंग देई सदा ॥२॥'..

म्हणजेच महादुर्लभ असा 'संतसंग' ही मागितला!

मनुष्यजन्म..मोक्षाची 'तीव्र' इच्छा.. श्रीसद्गुरुभेट्..श्रीसद्गुरुकृपा..त्यांच्याकडूनच साधनाची प्राप्ती..आणि मिळालेली साधनाच 'मोल' कळून ती साधना विनायास..विनातक्रार होणे..संतांची-संतचरित्र-सद्ग्रंथ यांचीसंगती.. हे सर्व मिळण्..अतिदुर्लभ आहे,अस शास्त्र सांगत!

"हे सगळ मिळणार असेल तरच, नवीन 'गर्भवासाच' दु:ख, सुखाने भोगायला तयार आहोत,अन्यथा नाही!", असे स्पष्ट आणि रोखठोख मागणे, श्रीमहाराज, श्रीभगवंताना मागत आहेत.

(झक्की तूझ यावरच 'मत' वाचायला निश्चित आवडेल!:))
(हसरी' 'भक्ती' विषयी लिहलय!:))

>>'निरपेक्ष' प्रेम हे एकटे 'श्रीभगवंतच' करू जाणे.
>>तो पर्यंत 'पायर्‍या' मोजण, हे न मोजल्यासारखच आहे, नाही का?
निरपेक्ष प्रेम करणारे लोक नसतात असे नाही. तसेच विशुद्ध प्रेम ही भक्तीची पहिली पायरी आहे असे काही संतांनी सांगितले आहे. साधना / उपासना करताना सुद्धा अनेक पायर्‍या असतात. त्यामुळे त्या न मोजणे पटले नाही.
नंतर जे लिहिलेत ते अगदी योग्य आहे, "न लगे मुक्ती आणि संपदा, संतसंग देई सदा"
म्हणुनच आम्ही तुमची संगत जोडली आहे Happy

'निरपेक्ष' प्रेम हे एकटे 'श्रीभगवंतच' करू जाणे. >>>>> हेच या जगातलं एकमेव सत्य Happy म्हणूनच जिथे काही अंशाने सुद्धा लाभेविण प्रिती दिसून येते ती त्या व्यक्तीच्या ठायी असलेल्या भगवंताच्या अंशामुळेच.

तुकाराम महाराजांचा हा अभंग आणि आपले नेहमीचे "सदा सर्वदा योग तुझा घडावा....." हे दोन जरी आपण आपल्या विचलीत क्षणी आठवले तरी क्षणात बरे वाटते. तुझे कारणी देह माझा पडावा यातच नरदेहाचे, नरजन्माचे महिमान आहे.

सावट, वरील तुमची पोस्ट अप्रतिम आहे. मी नुस्ती वाचतेय हल्ली, पण आत्ता अगदी रहावले नाही इतकं आतूSSSन काहीतरी (बहुतेक, भगवंतावरचे प्रेम) उचंबळून आलं.

Pages