उपासना

Submitted by हसरी on 3 February, 2010 - 23:00

उपासना कशी करावी?
कोणत्या देवतेची उपासना कशी करावी याची सविस्तर माहिती द्या?

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

व्वा! आजची सुरुवात तर छान झाली!
जा'मोहन'प्या,

धन्यवाद! नाण्याची दुसरी बाजू तुमच्या शिवाय चांगल कोण सांगू शकणार? आणि ती कळल्याशिवाय पर्याय नाही.

अजून एक चांगली बातमी आहे!
आपल्या या बीबी च्या 'यजमानानी' आपल ध्येय आज पहिल्यांदा जाहीर केल आहे! त्यामूळे आपली ही चर्चा विषयाला धरूनच आहे हे परत एकदा अधोरेखित झाल.

आपल्या या 'घराचे' यजमानपद 'हसरी' यांच्याकडे आहे! आणि जशी यजमानाची स्थिती, तशीच आपल्या सारख्या पाहुण्यांचा 'पाहुणचार' ही! आपला यजमानच 'हसरा' आहे, म्हणुनच आपल्यालाही त्याच 'हसरेपणाची' दावत मिळणार, अशी 'अपेक्षा' करायला हरकत नाही.:)

'हसरी' यांनी विपू मध्ये सांगितलेल 'ध्येय' इथ सांगण जरूरी असल्यामूळेच ते इथे 'पेस्ट' करत आहे!

>>>उपासना कशासाठी करतात माहित नाही (मला भक्तीसाठी आणि मोक्षसाठी करायची आहे)

हसरी धन्यवाद!

महेश!
>>>आपण जे प्रश्न विचारले आहेत, त्याची उत्तरे कदाचित येथे देता येणार नाहीत.
म्हणुनच विचारत होतो की कोठे भेटू शकाल ?

आपल्याला 'साधू', भेटण्याची गरज आहे!

आणि प्रत्येक 'भगवा' कपडे घातलेला 'मनुष्य' साधू असेलच असे नाही! म्हणूनच् रस्त्यावरून आमच्यासारख्या वणवण फिरणार्‍या 'भगव्या' कुत्र्यांत आणि 'साधूत' ला फरक कळणे गरजेचे आहे!

त्यामूळे 'सावधान'! तुमच्यावर कोणाची तरी नजर आहे!! 'जशी मागणी, तसा पुरवठा' या अतिमहत्वाच्या 'तत्वावरच' ....प्रपंचही चालतो आणि परमार्थही!:)

त्यामूळे 'सावधान'! तुमच्यावर कोणाची तरी नजर आहे!! >>>> का घाबरवताय हो महेशला? Rofl

बादवे, मला माहित आहे की हे तुम्ही त्याला अशासाठी सांगताय की जिथे साधूच्या शोधात मनुष्य निघतो तेव्हा फॅन्सी ड्रेसवाले जे काही करताना आढळतात ते पाहून शोधात असलेला माणूस एकतर परमार्थाच्या मार्गावरुन (देवयान पंथावरुन) परावृत्त होऊ शकतो किंवा चुकीच्या व्यक्तीच्या जाळ्यात अडकू शकतो. Happy

जामोप्या, म्हणूनच तर प्राण्यांना आपण वाईट किंवा चांगलं (उदा. लबाड कोल्हा, चोरटं मांजर, प्रामाणिक कुत्रा)

कोल्हा लबाड असतो? किती बँका बुडवल्या कोल्ह्यानी?

चोरटं मांजर ..? काय चोरते बुवा मांजर? दूध?? मग यच्च्यावत पक्षी माणसाच्या बागेतील धान्य, फळे खातच असतात की... चोरटे कबूतर, चोरटी चिमणी का नाही? आणि कुत्र्याला स्वयंपाकघरात घेऊन जर दूध उघड्यावर ठेवले तर ते पिणार नाही का?

माणसाने आपले स्वभाव प्राण्यांच्यावर आरोपीत केलेले आहेत. याला पर्सोनायझेशन की काहीतरी म्हणतात.... माणसाला उगाच वाटत असतं, हा प्राणी म्हणजे अमूक या स्वभावाचं प्रतिक...

म्हणूनच् रस्त्यावरून आमच्यासारख्या वणवण फिरण्यार्‍या 'भगव्या' कुत्र्यांत आणि 'साधूत' ला फरक कळणे गरजेचे आहे!

खरं की काय? मला वाटतं वस्तुस्थिती उलट आहे... भगवा कुत्रा आणि भगवा साधू यात अजिबात फरक नाही, हे कळणं म्हणजेच भक्तीभाव जागृत होणे... गीतेत आहे... सज्जन, कुत्रा, चांडाळ इ इ सर्व सारखेच मानावे वगैरे वगैरे.... श्लोक कुठे मिळाला तर बघायला हवा...

जामोप्या, म्हणूनच तर प्राण्यांना आपण वाईट किंवा चांगलं (उदा. लबाड कोल्हा, चोरटं मांजर, प्रामाणिक कुत्रा) हे आपल्या दृष्टीकोनातून म्हटले >>>> हे असं पुर्ण वाचा हो ! अर्धवट वाक्य उचलू नका, त्याने अर्थ बदलतो. तुम्ही जे म्हटलंय तेच जवळपास मी म्हटलंय ना?

जा'मोहन' प्या
>>>
खरं की काय? मला वाटतं वस्तुस्थिती उलट आहे... भगवा कुत्रा आणि भगवा साधू यात अजिबात फरक नाही, हे कळणं म्हणजेच भक्तीभाव जागृत होणे... गीतेत आहे... सज्जन, कुत्रा, चांडाळ इ इ सर्व सारखेच मानावे वगैरे वगैरे.... श्लोक कुठे मिळाला तर बघायला हवा...

अगदी खर आहे! आणि तो श्लोक कृपया सांगाच !

हा 'फरक' हा फरक नाही हे कळायला नजरही 'साधूचीच' लागते..आणि तेच तर सांगितल आहे!

परत एकदा विनंती करतो...श्रीमद्भगवतगीतेतला तो श्लोक अवश्य सांगावा!कारण तुम्ही जे सांगितल आहे त्यात 'तथ्य' आहे.

धन्यवाद!

>>त्यामूळे 'सावधान'! तुमच्यावर कोणाची तरी नजर आहे!!
या विधानाचा नक्की काय अर्थ घ्यावा Uhoh
१. नशिबाची नजर म्हणाल तर आहे चांगलीच आहे.
२. साधू, गुरू यांची कदाचित अजुन नाही.
३. पुर्वी कालेजात असताना ज्यांची नजर असावी असे वाटत असे त्यांची नसायची Wink
४. तुम्ही नजर ठेवत असाल तर चांगलेच आहे.
५. तसे आम्ही स्वतःवर पहिल्यापासुनच नजर ठेवून आहोत. Happy

जा'मोहन'प्या,

आपले 'अनमोल' सांगणे खाली परत एकदा लिहीत आहे..

१. आपण जन्म आणि मृत्यु यांच्यामध्ये असणारे एक छोटेसे जीवन जगतो असतो, याची जाणीव..
२. आपल्या हातात काहीही नसते, कुछ तय नही है, सिर्फ यही तय है, याची जाणीव.
३. माणसाचे जीवन अशाश्वत आहे, याची जाणीव असणे... ..

आणि

४.माणसाचे जीवन अनप्रेडिक्टेबल आहे
५.जग हे दु:खाने भरलेले आहे आणि
६.जरामरण यातून सुटला कोण प्राणिजात?

परत आपण अस ही म्हणता की ," मनुष्यजन्म हा श्रेष्ठ आहे, हा मला शुद्ध भोंदूपणा वाटत्तो"

याचे कारण म्हणजे...

"मनुष्याची शिकार मात्र सुरुच असते.. त्याला मर्यादा नसते आणि त्यासाठी सगळे षड्रिपु झाडून प्रत्येकजण हवेतसे वापरत असतोच... प्राणी असे करत नाहीत..... निसर्गनियमानुसार जितके घ्यायला हवे तितकेच ते घेतात.. "

ही फार 'महत्वाची' गोष्ट आपण एवढ्या सहजासहजी सांगितली आहे! आणि म्हणूनच आपल्या 'पोष्टच' महत्त्व ही 'अनमोल' आहे. तुमच्या 'कारणा'सहीत असलेल्या वरील म्हणण्याला पुर्णानुमोदन!

मनापासून धन्यवाद!:)

जा'मोहन' प्या,

तुमच्या खालील 'योग्य' मुद्यावरही 'लक्ष' देणे जरूरी आहे...

१) इन्द्रियांची जीवशास्त्रीय प्रगल्भता हे अध्यात्मिकदृष्ट्या निरोगी असल्याचा पुरावा ठरू शकत नाही
२)गंमत म्हणजे क्लिनिकल प्रॅक्टिस करताना रोजच म्हातारा-आजारी मनुष्य-मृत्यु हे बुद्धाचे त्रिकूट बघुनही कधी ही जाणीव झाली नव्हती ... ... अर्थात नुसते एवढे बघून ही जाणीव होणे इतके सोपे असते, तर सगळी मेडिकल कॉलेजेस आज बुद्ध् तयार करणार्‍या फॅक्टरीज झाल्या असत्या !!

Human life is full of uncertain events called risks..... The outcomes are always unpredictable..... .... कारण रिस्क आहे, म्हणजे ती चार प्रकारे मॅनेज करायला लागते....

१)अ‍ॅवाईड करा,
२)प्रिवेन्ट करा,
३)रिस्क ट्रान्स्फर करा किंवा
४)स्वतःच रिटेन करा...

धन्यवाद!:)

महेश,

>>>५)'तसे आम्ही स्वतःवर पहिल्यापासुनच नजर ठेवून आहोत.'

एवढा 'आत्मविश्वास'...तर ठीक आहे..तुमची स्वतःवरच स्वतःची खरच किती 'नजर' आहे ते पाहू! Happy

तुमचीच दोन विधाने खाली देत आहे...

१)मी कोणत्याच साधनेत नाही, की कसले अनुभवही आलेले नाहीत. पण मनातुन सारखे वाटत असते की काहीतरी साधना सुरू करावी.

आणि..
२)मला हे वाचल्यावर असे वाटले की मी बहुतेक मध्यम संवेगयुक्त साधक आहे की काय!

आता बोला, तुमच 'लक्ष' आणि 'लक्ष्य' कोठे आहे? 'ग्रीन-टी' ची जरूरत आहे की काय? Happy

सावट , खूप छान लिहिता तुम्ही. लिहित रहा आम्ही वाचतोय Happy

विषय बदलतोय , पण खूप दिवसांनी इकडे लिहायचं होतं.

माझाही एक प्रश्न. पुजेत बसलो सकाळी तर मन कॉन्सट्रेट होतच नाही अशात. चित्त विचलित होतं खूप काहीही विचार येतात मनात, तरीही नेटानं जप पूर्ण करतो. मग बराच वेळ अपराधी वाटत राह्तं. माझ्या देवाचं माझ्यावर लक्ष आहे हे त्याने दाखवून दिलय (केश्वीनी साक्ष आहे त्याला Happy ) तरीही मला मनात अनेक शंका कुशंका येतच राहतात. अमूक माझ्याबाबतीतच का ? मी जी उपासना करतोय ती योग्य आहे का ? माझ्याच देवाची आहे का ? असले काहीही प्रश्न.

सावट, तुमच्या निरिक्षणाला मनापासुन दाद Happy
लवकरच सविस्तर काही लिहिण्याचा प्रयत्न आहे, पाहू कसे जमते.

अहो आश्चर्यम... गीतेतला तो श्लोक आजच्या सकाळमध्ये डॉ. बालाजी तांबेंच्या लेखमालेत आहे....

विद्याविनयसंपन्ने ब्राह्मणे गवि हस्तिनि
शुनि चैव श्वपाके च पंडिता: समदर्शिनः

गीता. ५/१८

गवि- गाय, हस्ति- हत्ती, शुनि- कुत्रा, श्वपाक- चांडाळ.. इतर शब्द सोपे आहेत. भगव्दगीता जशी आहे तशी या पुस्तकात या श्लोकावर खूप छान फोटोदेखील आहे..

दीपू,
तुझ्या काही प्रश्नांची उत्तरं मी माझ्या परीनं देतो:
१. पुजेत बसलो सकाळी तर मन कॉन्सट्रेट होतच नाही अशात. चित्त विचलित होतं खूप काहीही विचार येतात मनात, तरीही नेटानं जप पूर्ण करतो. मग बराच वेळ अपराधी वाटत राह्तं. माझ्या देवाचं माझ्यावर लक्ष आहे हे त्याने दाखवून दिलय>>

अरे चित्त विचलित होणार्‍या घटना नेहमीच घडत असतात. विद्यार्थी दशेपासून ते वृद्धावस्थे पर्यंत या घटना घडत असतात. त्यावेळी विचार मनात येणं हे ही स्वाभाविक आहे. त्यामुळे तू या गोष्टीची काळजी करू नकोस. यात काहीही वाईट नाहीये. तू तुझं पूजा करण्याचं कर्म करत रहा. तू म्हणतोसच ना की देवाचं लक्ष तुझ्याकडे आहे म्हणून. मग असा विचार कर की देवाला माझ्याकडून कशी पूजा करून हे त्याचं त्याला ठरवू देत. मग त्याला जर माझ्या कडून छान पूजा करून घ्यायची असेल तर तो माझं मन शांत करेल, असे विचार मनात येऊच देणार नाही. शेवटी पूजा त्याची आहे. प्रश्न त्याचा आहे. :). असे दिवस नक्कीच येतील की पूजा करताना असले विचलित करणारे विचार नक्कीच येणार नाहीत. माझ्या पत्नीनं मला एक दिवस सांगितलं की तुझे पूजा करताना चालणारे हातवारे बंद झालेत. माझा माझ्यावरच विश्वास बसला नाही. हे केव्हापासून झालं हे ही कळलं नाही. हे हातवारे म्हणजे लक्ष विचलित करणार्‍या विचारांमुळेच होत होते हे सरळच आहे. त्यामुळे सगळं त्याच्या हवाली कर अन् पूजा कर. अरे कर्ता करविता "तो" आहे.

२. तरीही मला मनात अनेक शंका कुशंका येतच राहतात. अमूक माझ्याबाबतीतच का ? मी जी उपासना करतोय ती योग्य आहे का ? माझ्याच देवाची आहे का ?>>

अमुक माझ्या बाबतीतच का? हा प्रश्न न पडलेली व्यक्ति विरळाच. Happy हा विचार तर सगळ्यात आधी मनातून काढून टाक Happy
शंका कुशंका तेव्हा येतात जेव्हा विश्वासाची कमतरता असते. तू ज्या कोणत्या देवाची जी काही उपासना करत आहेस ती तुला योग्य मार्गावर नेणार आहे हा दृढ विश्वास मनात बाळग. "माझाच देव" वगैरे मनातून काढून टाक. मनात त्या देवावर श्रद्धा ठेव. मग बघ कसा बदल घडतो ते. स्वानुभव आहे हा म्हणून सांगतो. मला सुरुवातीला हा प्रश्न पडला होता की इतक्या देवी देवता आहेत, कोणाकडे जाऊ? काय म्हणू त्यांच्या समोर? जप?? प्रार्थना?? स्तोत्र?? नेमकं काय? शेवटी मित्रा करवी माझ्या कुलदेवतेने हा प्रश्न सोडवला. मी आधी कुलदेवतेचा जप करू लागलो. मग काही घटनाच अशा घडल्या की मला गुरू भेटले अन् मी श्री स्वामी समर्थांची उपासना करू लागलो. माझी देवता अन् माझी उपासना निश्चित झाल्या (हे मी माझं भाग्य समजतो :)).

पूजा करताना सर्व देवांना मी रोज म्हणतो: मी जी काही पूजा केली आहे. यथामति, यथाशक्ती. त्याचा कृपया स्वीकार करावा. चुकलं माकलं क्षमा करावी. हा भाव मनात आला की सगळं काही आपसूकच न चुकता व्यवस्थित होतं.

तुझं मन शांत राहो, तुझी रोजची देवपूजा छान होवो अन् योग्य मार्गाने तुझी उपासना चालू राहो ही श्री स्वामी समर्थ चरणी प्रार्थना.
||श्री स्वामी समर्थ||

सनातनवालेदेखील कुलदेवतेची (म्हणजे देवीची) उपासना प्रत्येकाला सक्तीने करायला सांगतात... माझे एक मित्र तर कधी भेटले तर हाच प्रश्न विचारतात. आजचा जप किती वेळा झाला?

सनातनची आकडेवारी :

१. एकदा खोटे बोलले की सहा माळांचे जप नष्ट होते.

२. दुसर्‍या व्यक्तीला जप करायला प्रव्रुत्त केले की त्याच्या जपाचे काही कमिशन (सुमारे १०% ) आपल्यालाही मिळते , म्हणे ! ( कारण दुसर्‍याला प्रव्रुत्त करणे हीदेखील समष्टी साधना म्हणून गणली जाते.. ) Happy

माझ्या साठी तरी हे दोन्ही तिन्ही मुद्दे कैच्या कैच आहेत. Proud माहिती बद्द्ल धन्यवाद. काय काय हास्यास्पद गोष्टी!

हे मुद्दे कैच्या कैच वाटतात, ते त्यातल्या आकडेवारीमुळे... पण आकडे सोडले, तर मुद्दे चांगलेच आहेत.... सनातनवाले आकड्यांवर फार भर देतात..... ते हे आकडे कसे काढतात, कुणाला माहीत आहे का?

जामोप्या म्हणतात तसे मुद्दे चांगलेच आहेत पण ती मोजदाद कशी काय करतात? Uhoh
हे तर सरळच आहे की वाईट वागण्याने पुण्याचा र्‍हास होतो.

सावट, तुम्ही किती अभ्यास करताय प्रत्येकाच्या एकेक शब्दाचा? आणि समोरच्याच्याच शब्दांनी समोरच्याला धडेही देताय. ग्रेट Happy हाडाचे शिक्षक दिसताय तुम्ही !

महेश, खूप चांगलं समजावून सांगितल अनेकानेक धन्यवाद तुम्हाला.

मी दहावीत असताना मला माझ्या मामांचे मित्र, त्यांना आम्ही गुरुजी म्हणत असू त्यांनी मला हा मार्ग दाखवला भक्तीचा. त्यांनी मला साईबाबांचा अकरावा अध्याय वाचायला सांगितला रोज. अन मी तो मनापासून वाचत होतो, वाचता वाचता असाच तोंडपाठ झाला अख्खा अध्याय. अन तेंव्हा अनुभव पण असे यायचे की मला मनोमन पटायचे की "तो आहे" का ? कशामुळे पटायचे ? तर बर्‍याच गोष्टी माझ्या मनासारख्या व्हायच्या. अन कधी त्या माझ्या मनासारख्या नाही झाल्यातरी हे पटायचे की त्यांनी ते होऊ दिले नाही हे माझ्यासाठी कीती चांगले होते !! मग हा सगळा व्यवहार का देवासोबत ? निष्काम भक्ती , मला देवाकडून काहीच नको त्याने फक्त प्रेमभरली नजर ठेवावी माझ्यावर असं मला कधी वाटेल ? मग पुढे गुरुजीनी मला साईसच्चरीत गिफ्ट केले. मी त्याचे पहीले पारायण केले ७ दिवसात तेंव्हा एकेका अध्यायाला माझे डोळे आपोआप भरुन येत होते! साईंचे माझ्यावर लक्ष होते. अजूनही जेंव्हा केंव्हा मी ते अध्याय वाचतो ते सर्व अगदी 'आत' पर्यंत पोचते.

गुरुजी साईंची तिन्ही त्रिकाळ उपासना करायचे, खूप तेजस्वी चेहरा होता. अन कुणासाठीही कसल्याही मदतीला ते रात्री अपरात्री तत्पर हजर असायचे. कधीही शिर्डीला जायचे ते. आठ-आठ दिवस तिथेच राहायचे. माझ्यासाठी ते माझे गुरुच होते. रीटायर झाले अन एकाच वर्षात लिव्हरचा प्रॉब्लेम होऊन ते गेले. हा माझ्यासाठी खूप मोठा धक्काच होता ! गुरुजींचा रीटायरमेंटनंतरचा जो प्लान होता तो मला माहीत होता... ते त्यांच्या शेवटच्या काळात म्हणालेही होते की 'मला खूप जगायचय अजून मला काहीच होणार नाही' मग असे का झाले ? त्यांना अख्ख्या परळीत सगळे लोक 'देवमाणूस' म्हणून ओळखायचे. कितीतरी लोकांचं त्यांनी आर्थिक मदत देऊन आयुष्य सुधारलं !! मग साईंनी त्यांना त्यातून बाहेर का काढलं नाही ? हा प्रश्न मला अजूनही छळतो. अजून लिहायचं आहे , लिहितो.

होप तुम्हाला माझ्या इथे लिहिण्यामुळे काही अडचण होऊ नये. खूप दिवसांनी सारख्या विचारांच्या लोकांशी हा विषय बोलायचा होता तो असा भडभडून निघतो आहे बाहेर.

अध्यात्म/भक्ती मधे तुम्ही लोक खूप वरच्या लेव्हलला आहेत अन अध्यात्म/भक्तीमधे माझी अजून कसलीच लेव्हल नाहीये.... तेंव्हा समजून घ्यावे.

दीपूर्झा,
आपण लिहा, आम्ही वाचतोय. बाकी, आपल्या प्रश्नांची उत्तरे जाणकार देतीलच.

महेश, आपण छान सांगितले आहे.

अमुक माझ्या बाबतीतच का? हा प्रश्न माझ्या एका मैत्रिणीने तिच्या आजीला विचारला असता त्या म्हणाल्या होत्या, "काही नाहि गं, हे सगळे आपल्याच कर्माचे घोळ असतात आपणच निस्तरायचे":) आत्ता वाटतेय की एवीतेवी सगळ्यांनाच पडणारा प्रश्न आहे हा, विषय निघालाच होता तर हा घोळ निस्तरायचा कसा हे ही विचारायला हवे होते..

इतक्या वर्षांनी एक गोष्ट कळली आहे की, आपण चांगले कर्म करत राहायचे..फळ कधी मिळेल? चांगल्यामुळे वाईटाचा प्रभाव कमी होईल किंवा संपेल तेव्हा?

मग हे असे वाईट कर्म पटकन संपवता येईल, ह्या साठी भक्ती-उपासनेची काहि विशिष्ट पद्धत आहे का?
सावट, आपण म्ह्टलेत की परमार्थात ही मागणी - पुरवठा तत्त्व चालते म्हणुन हा प्रश्न विचारायचे धाडस केले आहे.

गौरी,

अगं समज एक पिंप आहे. त्याला वरुन झाकण तर आहेच पण खालून १ झडपही आहे. आधी त्यात भरपूर दगड धोंडे भरले (गेल्या व या जन्मातील वाईट कर्मं). नंतर त्यात सोनं, चांदी भरत गेलो (देवाच्या दयेने सत्कृत्य करायची बुद्धी होऊन वाईट कर्म, संगत बंद/कमी केली). नंतर जेव्हा फळं मिळायची वेळ येते तेव्हा खालची झडप उघडली जाते. तेव्हा पहिलं काय बाहेर येईल? obviously, दगड आणि धोंडेच ! ते जेव्हा येऊन येऊन संपतील, त्यानंतर आपण भरलेले सोने चांदी बाहेर येईल Happy पण यासाठी पेशंस (सबुरी) हवी आणि मी केलेल्या सत्कृत्यांचे फळ मिळणारच आहे, तिथे अन्याय होणार नाहिये हा विश्वास (श्रद्धा) हवा.

तसेच, आपल्याला जर सद्गुरु लाभले व आपण त्यांचे तंतोतंत आज्ञापालन केले, श्रद्धा सबुरी ठेवली तर प्रवाही अशी कृपा आपल्या पिंपात टाकली जाते, जी दगड धोंड्यामधूनही झडपेतून खाली येऊन आपल्या पदरात पडते. म्हणजेच वाईट प्रारब्ध भोगतानाही ती कृपा आपल्याला जीवन सुसह्य करते.

गौरी, एक पर्टिक्युलर उपासना शोधत बसण्यापेक्षा आधी उत्कटतेने नामस्मरण (परमात्म्याच्या कुठल्याही आवडत्या रुपाचे) सुरु कर. काहीच सुचत नसेल तर दत्तबाप्पाचा जप किंवा गायत्री जप (त्रिपदा गायत्री जास्त चांगला - स्तोत्रं बाफवर पहिल्याच पानावर आहे) पुढचा मार्ग आपोआपच तुझ्यापर्यंत चालत येईल Happy

दीपू,
विचारत जा रे. काही माहित असलं तर नक्कीच सांगेन. Happy अरे जे माहित आहे तेच सांगितलं. मीही अजून लय लहान आहे रे. Happy फक्त साधना चालू ठेव. श्री साई तुला नक्की मार्ग दाखवतील. Happy आगे बढो

पण यासाठी पेशंस (सबुरी) हवी आणि मी केलेल्या सत्कृत्यांचे फळ मिळणारच आहे, तिथे अन्याय होणार नाहिये हा विश्वास (श्रद्धा) हवा. >> हम्म. गुरुमाते कीती छान शब्दात सांगितलेत.

मी केलेल्या सत्कृत्यांचे फळ मिळणारच आहे, तिथे अन्याय होणार नाहिये हा विश्वास (श्रद्धा) हवा. >> चांगले कृत्य करून चांगल्या फळाची अपेक्षा धरणे अवाजवी नाही. पण म्हणजे चांगले का होईना पण प्रारब्ध पदरी येतेच ना? मग ते चांगले प्रारब्ध भोगतांना हातून चूक होऊन वाईट कर्म घडण्याची शक्यता उरतेच. त्याकरता 'कृष्णार्पणमस्तु' या भावनेने कर्म करत जावे म्हणजे 'मी' हे कर्म करत नाहीये आणि 'मला' याचे फळ पण नकोय ह्याच भावनेने सत्कृत्य करावे.

दाताच्या सर्व वेदनेमागे त्याचे मूळ असते. एकदा का रूट कॅनाल केले की दात त्याचे खायचे काम करतच रहातो पण त्याची वेदना कायमची संपते. तसेच 'मी'पणा कॅनाल केला की प्रारब्ध संपते.

त्याकरता 'कृष्णार्पणमस्तु' या भावनेने कर्म करत जावे म्हणजे 'मी' हे कर्म करत नाहीये आणि 'मला' याचे फळ पण नकोय ह्याच भावनेने सत्कृत्य करावे. >>>> ही पुढची पायरी आहे. Happy

Pages