उपासना

Submitted by हसरी on 3 February, 2010 - 23:00

उपासना कशी करावी?
कोणत्या देवतेची उपासना कशी करावी याची सविस्तर माहिती द्या?

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

महेश,
नमस्कार!

तुमचीच वाट पहात होतो...:)

>>>मी कोणत्याच साधनेत नाही, की कसले अनुभवही आलेले नाहीत. पण मनातुन सारखे वाटत असते की काहीतरी साधना सुरू करावी.मला ते वाचताना अगदी अंगावर रोमांच येणे, डोळे भरून येणे, इ. वाटत होते.कदाचित मी ज्या प्रकारच्या माहितीच्या शोधात होतो, अगदी तशीच येथे सापडली म्हणूनही असेल.

मित्रा, यालाच अनुभव म्हणतात. याच शास्त्रीय नाव, 'अष्टसात्विक भाव'. फार अवघड भाव आहेत, चित्तातील 'शुध्द-सात्विक' भावाच शास्त्रशुद्ध 'बाह्यदर्शन'. या भावाला 'साष्टांग' नमस्कार.

तुम्हाला एकच विनंती आहे.. आपल्याला 'भूक' लागल्यावर, 'जेवण' कर म्हणजे, 'भूक' शमेल', हे सांगायला, कोणाची गरज आहे का? तद्वत मित्रा, 'मनातुन सारखे वाटत असते की काहीतरी साधना सुरू करावी' अस नुसत म्हणून कस चालेल? तुम्ही योग्य मार्गावरच आहात.. आता अजून 'मार्ग' कोठे आहे? असे विचारत 'वेळ' वाया घालवू नका!:)

पुन्हा एकदा नमस्कार आणि धन्यवाद!

श्रीमहाराजांच्या बद्दल तुम्हाला कळेलच...!:)

सावट, आपण म्हणता तसे खरेच काही आहे का माहित नाही Uhoh
मी फार सामान्य माणूस आहे हो.
नुकताच माहूरला जाऊन आल्यामुळे वर उल्लेखिलेल्या प्रसंगाबद्दल कुतुहल वाटल्याने विचारत होतो.

"साधक सोपान" बद्दल म्हणाल तर ते वाचताना त्यांनी साधनेच्या मार्गात पुढे काय काय घडते याचे जे शास्त्रशुद्ध विवेचन केले आहे, ते प्रथम वाचताना देखील visualize होत होते. आपण एखादे प्रवास वर्णन वाचताना ते कसे डोळ्यापुढे येते तसे.

"साधक सोपान" पुस्तकातील काही विषय (प्रकरणे) अशी आहेत.
त्यावरून पुस्तकाबद्दल साधारण कल्पना येऊ शकेल.
"मायातत्व" ; "प्रवृत्ती-निवृत्ती" ; "विवेक" ; "वैराग्य" ; "शमादिषटक" ; "मोक्षेच्छा" ; "तनुचतुष्ट्यनिरसन" ;
"निष्काम कर्मोपासना" ; "श्रीगुरूनिष्ठा"

>>म्हणूनच, श्रीसदगूरुंची 'कृपा' असल्याशिवाय 'परम बोध' होणार नाही... तो नाही झाला तर 'पुनरावर्ती' टळणार >>नाही ! आणि म्हणूनच 'उपासना' करायचीच असेल तर 'परब्रह्मरूपी श्रीसद्गुरुंच्या' भेटीसाठीच करावी, असे 'शास्त्र' >>सांगते.

मला एक प्रश्न आहे तो असा ...
काही लोक अगदी नास्तिक नसतात, पण त्यांचा स्वभाव तर्कावर तपासून घेणे, बुद्धिला पटले तरच मान्य करणे असा असतो. असे लोक कोणालाही सहसा भावनिक, बौद्धिक शरण जायला तयार नसतात.
पण साधनेत तर गुरूला शरण जाणे आवश्यक असते असे म्हणतात, मग अशा लोकांना गुरू भेटणारच नाही का ?
की त्यांना गुरूची आवश्यकताच पडणार नाही ?
एकलव्याप्रमाणे ज्ञानमार्गाने साधना करता येत नाही का ? ज्ञानमार्गाचे चांगले / वाईट पैलू कोणते ?

महेश,
नमस्कार!

>>>काही लोक अगदी नास्तिक नसतात, पण त्यांचा स्वभाव तर्कावर तपासून घेणे, बुद्धिला पटले तरच मान्य करणे असा असतो. असे लोक कोणालाही सहसा भावनिक, बौद्धिक शरण जायला तयार नसतात.
पण साधनेत तर गुरूला शरण जाणे आवश्यक असते असे म्हणतात, मग अशा लोकांना गुरू भेटणारच नाही का ?
की त्यांना गुरूची आवश्यकताच पडणार नाही ?
एकलव्याप्रमाणे ज्ञानमार्गाने साधना करता येत नाही का ?

अतिशय श्रेय आणि नंतर प्रिय प्रश्न.. आपल्याला जे 'प्रिय' आहे, 'आवडत' ते आपल्याला 'श्रेयकर' असेलच असे नाही.

अश्विनी यांनी 'विवेकाची' व्याख्या करताना ...>>>'विवेक' म्हणजे 'सारासार विचार' (सार आणि असार, चांगले आणि वाईट) करण्याची 'बुध्दीची' कुवत होय, >>>> "श्रेयप्रेय निवडणे" अशी अर्थपुर्ण 'पुष्टी' जोडली.

त्याच्या 'अर्थाचा' जर विचार केला तर असे लक्षात येते की...

'विवेक' हा जो बुद्धिचा गुण आहे, तो 'माणुस' परत्वे वेगवेगळा असतो. हे उदाहरणादाखल सांगितल्याशिवाय कळणार नाही. मागे 'अस्चिग' यांना हे उदाहरण थोडक्यात दिल होत, ते आपण परत एकदा पाहू..
उदा...
१)मला वांग्याची भाजी आवडते. हे जे 'प्रिय' आहे, हे माझ्याच 'बुध्दिने' अगदि खात्रिदायकरित्या ठरविलेले असत. माझ्याच बुध्दिचा 'तो' निर्णय मनाने अगदि माझ्या 'गळी' उतरविलेला असतो.

२) आता एखाद्याला 'तिच' भाजी आवडत नाही. हेही 'त्याच्या' मनाने 'त्याच्या' गळी उतरविलेले असत.

३) यात आता अजून एक तिसरा भाग येतो.. तो म्हणजे कुणाला वांग्याची 'भरलेली' भाजी आवडते, तर कुणाला परतून 'काप' केलेली आवडते, तर कुणाला वांग्याच 'भरीत' आवडत.

सांगायचा महत्त्वाचा मुद्दा असा की, आपापल्या वैयक्तिक मनाच्या कचाट्यात असणारी आपापली वैयक्तिक बुध्दि आणि तिचा तो 'सारासारविचार' करून सांगणारा बुद्धिचा 'विवेक' नावचा गुण, हा वरिल उदाहरणात किती 'तोकडा' आहे, आपल्यालाच 'तर्काने' कळते. जिथे अशा अगदी 'क्षुल्लक' ठिकाणी 'बुध्दि' गोंधळते..मनाचा बौद्धिक घोटाळा होतो तिथे 'परम-अर्थ' शोधण्यात' 'त्या' तोकड्या बुध्दिची आणि तिच्यावर 'पुर्णपणे' विसंबून निर्णय घेणार्‍याची काय 'त्रेधातिरपिट' होईल, हे पण 'तर्काने' आपण ओळखू शकतो.
आणि महत्त्वाची आणि पुर्ण अवधान देण्याची गोष्ट म्हणजे.. हे 'तर्क' ही त्याच तोकड्या.. एकांगी बुध्दिने, केलेले असतात.

म्हणजेच आपली 'बुध्दि' ही आपल्यालाच 'प्रियकर' असणारा निर्णय जरी देत असली आणि तिने कितीही 'शाब्दिकज्ञान' मिळवले तरि त्या 'अनुभवहीन' ज्ञानातून 'परमार्थाला' 'श्रेयकर' असणारा निर्णय तिला घेता येत नाही! हे शास्त्रिय 'सत्य' एकदा आपल्या बुध्दिच्या 'गळी' (मनाच्या नाही)उतरायला पाहीजे. "आपण 'अज्ञानी' आहोत", हा 'बोध' परमार्थामध्ये अतिमहत्त्वाचा मानला जातो.

'विवेक आणि सद्विवेक' या दोन्ही पुर्णपणे वेगळ्या गोष्टि आहेत. सद्-विवेकामधला जो 'सद' आहे, तो 'श्रीसद्गुरूनी' अतिशय कळवळायेऊन..करूणेन कृपाकेल्याशिवाय 'जागृत' होत नाही, हे 'त्रिवार' सत्य आहे.. या बाबतीत आपण नि:संशय असावे.. हे आपल्याला 'अतिश्रेयकर' आहे.

संदर्भासाठी आपण श्रीसमर्थ रामदासांच्या 'भक्ती' या बीबी वर असणार्‍या खालील ओळी परत एकदा पाहू.

विषयीं विरक्तपण इंद्रियेंनिग्रहण|
गुरूकृपेवांचुनि नव्हे नव्हे || १ ||

चंचळपणें मन न करी विषयध्यान|
गुरूकृपेवांचुनि नव्हे नव्हे || २ ||

बुध्दि बोधक जाण ब्रम्हानुभव पूर्ण |
गुरूकृपेवांचुनि नव्हे नव्हे || ३ ||

भक्ति ज्ञानपूर्ण सप्रेम संपूर्ण |
गुरूकृपेवांचुनि नव्हे नव्हे || ४ ||

रामीरामदास म्हणे निर्गुण सुख लाधणें |
गुरूकृपेवांचुनि नव्हे नव्हे || ५ ||

यात 'नव्हे-नव्हे' असे दोनदा सांगताना श्रीसमर्थांचा 'पक्का' निर्धार दिसून येतो. 'धनुर्विद्येसारख्या' अनेक 'अपराविद्ये' साठी ज्या ठिकानी गुरुंची येन-केन प्रकारे जरूरत लागते, तर 'आत्मविद्येसारख्या' 'पराविद्ये' करिता 'श्रीगुरुंची' किती गरज आहे, हे वरिल सर्वार्थाने समर्थ-विधानाने कळते..पण हा विचार 'मुरण्यासाठी' 'साधनेची' नितांत गरज आहे.

म्हणूनच 'आपण'.. 'आता साधना करावी' असे नुसते न म्हणता... कृती करून.. आपल्याला 'क्षणीक' जाणवलेल्या 'अष्टसात्विक' भावाची, 'अखंड' प्राप्ति करून घ्यावी.. ही नम्र विनंती.

'साधक' जिवनामध्ये, आपल्याला माहितपड्लेल्या साधनावरिल संशय हा जणू 'पाचविला पुजलेला' असतो, किंबहुना तो या 'मार्गामध्ये', 'गृहीतच' धरलेला असतो. 'संशयरहित साधना, हेच सिद्धांचे लक्षण आहे,' अशी 'सिध्दांची' व्याख्या करण्यात येते.. त्यात किती तथ्य आहे आणि 'संशय', समूळ जावा याकरिता 'साधनेची' किती जरुरी आहे, हे कळायला आता हरकत नसावी... :).

पुन्हा एकदा 'या' आपल्या अनमोल प्रश्नाबद्द्ल' मनापासून धन्यवाद, आणि नमस्कार!
आपल्याला या गवसलेल्या 'मार्गाबद्द्ल' ओढ लागो... आपल्याला जे 'श्रेय' आहे.. तेच आपल्याला 'प्रिय' ही वाटो. आणि आपली 'मार्गक्रमणा' लवकरात लवकर सुरु होवो हिच 'परमेश्वर' चरणी, सविनय प्रार्थना!

धन्यवाद!

आता बोला.. असा प्रश्न 'जो' विचारतो तो 'सामान्य' असू शकतो?.:) .. ..असो..
अशा प्रश्नाचे 'मनन' आणि 'चिंतन' घडने ही 'दुर्लभ' आहे, आणि हे ही 'त्याच्या' कृपेशिवाय' शक्य नसते, आणि म्हणूनच आपल्याला पुन्हा नमस्कार! Happy

सावट, 'अगमनिगम', 'अगमआचार्य' या शब्दांचे कृपया अचूक अर्थ सांगाल का?

'नेति नेति' असे वर्णन असलेले परब्रह्म, दत्तगुरु यांचे ज्ञान अगमानिगमांसही कठीण, मग सरसकट सर्वांना कसे व्हावे? अशा अर्थाच्या ओव्या वाचनात आल्या. खूप परिश्रम, विषयनिवृत्ती आणि सद्गुरुंची कृपा मिळाल्याशिवाय ते ठायी पडत नाही.

तसेच धन्य धन्य प्रदक्षिणा मधे ओळ आहे "गुरुभजनाचा महिमा नकळे अगमा निगमांसी". त्यामुळे हे अगम निगम म्हणजे नक्की काय? साधकाची नक्की कुठली श्रेणी? असे प्रश्न मला गेले काही दिवस पडले आहेत.

अश्विनी, ज्यानी 'परब्रम्हाच' नेति-नेति अस 'सार्थ वर्णन' केल, त्यांनाच 'अगम आणि निगम' म्हणतात! Happy
कारण सगळ्या प्रकारे (सगुण आणि निर्गूण) वर्णन करून झाल्यावर, त्याना हे 'वर्णन' म्हणजे 'परब्रम्ह' नाही, हे ही लगेच सांगावयास गरजेच वाटल!

याचा 'अर्थ' परब्रम्ह म्हणजे काय हे 'वर्णनात' सांगता येत नाही, त्याची 'अनुभूती' घ्यावी लागते, ती नुसत्या 'वर्णनाने' दुसर्‍यास' करूवून देता येत नाही. म्हणुनच ते वर्णन 'तंतोतंत' असतानाही, 'हे' म्हणजे 'ते' नव्हे, अशी 'पुष्टी' जोडून त्यांनी, परब्रम्हाच शाब्दिक वर्णन पूर्ण केल.

उदा.. समजा आपल्याला साखर म्हणजे काय? हे माहीत नाही, ती कशी असते-दिसते ,कशी बनते हेही माहीत नाही, अशावेळी 'साखरेची गोडी' असा 'वर्णनात्मक निबंध' वाचून, ती गोडी कळू शकेल काय?

आणि समजा एखाद्याने अशा वेळी 'साखरेची चिमूट' हातावर ठेवली आंणि आपण ती खाल्यानंतर, आपल्याला कळते की, वरिल 'वर्णन' तंतोतंत बरोबर आहे.

'परमार्थात', "जे 'आहे' ते 'नाही' आणि जे 'नाही' ते 'आहे'" ही 'साखरेची गोडी' कळण्यासाठी, हातात 'साखरच ठेवणारे' श्रीसद्गुरूचरणच लागतात आणि नंतरच होणार्‍या त्या संकिर्तनाची-गोडी.. नुसत्या कोरड्या 'शब्दज्ञानात' कशी सांगता येणार? Happy

अश्विनी,

महेशना, अजूनही 'ते' श्रीमहाराज म्हणजे कोण? ते आपण सांगितलेले नाही.:)

याच श्रीमहाराजांच्या समोर एक तथाकथीत, स्वयंघोषीत,घमंडी..आगमाचार्ये.. 'ब्रम्हभावस्थिती' म्हणजे काय?असा प्रश्न घेऊन गेला! आणि मग श्रीमहाराजांनी, काही उत्तर न देता,त्या आगमाचार्याला, त्याला डसणार्‍या 'इंगळीच' स्वप्न पाडल..आणि त्या स्वप्नातल्या इंगळीच्या पिलाला घाबरून उठलेल्या आचार्याचा 'ब्रम्हभाव' उघडा पडला.

ओह, अक्कलकोटचे स्वामी समर्थ !

सावट, आपण जे लिहिले आहे ते बरोबर आहे आणि मान्यही आहे.
खरेतर गुरूच्या आवश्यकतेबद्दल शंका घेण्याचे कारण नाही,
पण प्रश्न अशासाठी विचारला की आजकाल आजुबाजुला अनेक गुरू (?) उदयाला येत आहेत,
त्यामुळे ज्यांना साधनेची इच्छा असते, त्यांना खरे कोण हे कळत नाही.

आपले ज्ञान खुपच जास्त आहे, आणि ते समजावून सांगण्याची शैली देखील.
त्यामुळे खरेतर आपल्याच ज्ञानाला मनःपुर्वक नमस्कार !

अरे आज तर बरेच काही वाचायला मिळाले इथे.

अश्विनी, आगम = सहा दर्शने (सांख्य, मिमांसा ई) आणि निगम = वेद.

महेश, तर्कावर तपासून घेणे, बुद्धिला पटले तरच मान्य करणे हे तर आजच्या दिवसाला खूपच गरजेचे आहे. आणि दुसरे असे की जोपर्यंत बुध्दीलाच पटत नाही तोवर ती मनाला काय शिकवणार? त्याला कसा आवर घालणार? पण एक मात्र नक्की की बुध्दीच्या तार्कीकतेवर मात करून 'तो' उपासनेचे बीज रुजवतोच आपल्यामध्ये Happy

एक काळ असा होता की मला 'भक्ती' पटायची नाही. जर का त्याला काही दिल्यावरच जर तो आपले काम करणार असेल तर तो कसला देव? तो तर सरकारी कचेरीतला कारकूनच की - प्रत्येक कामाला लाच घेणारा - असे वाटायचे. पण मग कळत गेले की 'जर मी हे केले तर तू मला ते देशील का?' असे विचारत केलेली भक्ती खरी नव्हेच. (अर्थात काही जणांकरता ती सुरुवात असू शकते) मग आता हळू हळू भक्ती समजू लागली, म्हणजे निदान एवढे तरी कळले की भक्तीची गरज मला आहे त्याला नाही. त्याने तर कंस आणि शिशूपालाचाही उध्दारच केला की.

सध्या 'बेलसर्‍यांचे साधकांबरोबरचे संवाद' वाचायला घेतलं आहे. एक रुतून बसलेले वाक्य - quantity leads to quality इतके नाम घ्या की नामचा अर्थ कळण्याची सद्गुरुकृपा होइल. मग पुढे qualityच असेल.

सावट त्या जगदंबेविषयी लिहा ना Happy

धन्यवाद अश्विनी, महेश!

माधव, तुम्ही छान सांगितले आहे!

अजूनही, त्या 'मूळमाये' विषयी, लिहायला हवय!चला तर मग लिहूयात..:)

अश्विनी यांनी 'भक्ती' या बीबी वर खालील ओळी लिहल्या...

>>>
१)अगं त्यांनी नामस्मरण नाही केलं तरी ते भगवंताचे गुणसंकीर्तन करतात ही गोष्ट ही तेवढ्याच तोडीची आहे बरं!

२)) सगुणाचेनि आधारे | निर्गुण पाविजे निर्धारे ||

श्रीकृष्णांनी भगवदगीतेत सांगितलेल आहे "संत माझ्या सजीव प्रतिमा".
तसेच श्री ज्ञानदेवांनीही ज्ञानेश्वरीत आम्ही भावंडे 'मूर्तीचा मेळावा' करुन अवतरलो आहोत अशी नोंद केली आहे.

सगुण रक्षावे, निर्गुण बोलावे...

३)सगुण भक्ती ते चळे | निर्गुण भक्ती ते न चळे | हे आवघे प्रांजळ कळे | सद्गुरु केलिया ||

हे सांगताना निर्गुण देवाच्या दर्शनाची सातत्यता इथे प्रगट केली गेली आहे. पण त्यासाठी 'सद्गुरु केलिया' ही गोष्ट महत्वाची, हेही स्पष्ट केले आहे.

४)सद्गुरुवचन हृदयी धरी | तोचि मोक्षाचा अधिकारी | श्रवण्-मनन केलेचि करी | अत्यादरे ||

आणि...

अस्चिग यांनी एकदा विचारले होते कि, देव 'निर्गुण' आहे हे एकदा कळाल्यावर, परत त्याला 'सगुणात' कशाकरीता भजायचे? त्यांचा रोख असा होता की हे 'अस' करण 'चूकीचे' नाही काय?

आणि..

आता, या वरिल दोन मतात आढ्ळलेल तुमचच(माधव) खालील तिसर मत..

मानसपूजेला सोवळ्याचे बन्धन आहे का? खासकरुन स्त्रियांसाठी आणि दत्तगुरुंच्या पुजेसाठी.

माझ्या मते नाही! त्यानंच हे सगळं तयार केलं- त्यालाच विटाळ होतो? नाही वाटत मला. जिथे प्रेम असतं तिथे सोपस्कार महत्त्वाचे नाहित. विटाळ शरीराला होऊ शकतो ('होतो' हे मला पटत नाही तरी) मनाला नाही. तुम्ही मानसपुजा करणार ना?

या विविध मतात,नक्की काय बरोबर आहे?:)

माधव, खूप आभार तुमचे अगमनिगमचा अर्थ लिहिल्याबद्दल Happy

तर्कावर तपासून घेणे, बुद्धिला पटले तरच मान्य करणे हे तर आजच्या दिवसाला खूपच गरजेचे आहे. आणि दुसरे असे की जोपर्यंत बुध्दीलाच पटत नाही तोवर ती मनाला काय शिकवणार? त्याला कसा आवर घालणार? पण एक मात्र नक्की की बुध्दीच्या तार्कीकतेवर मात करून 'तो' उपासनेचे बीज रुजवतोच आपल्यामध्ये >>>> हे तंतोतंत घडलंय माझ्या बाबतीत. त्यामुळेच कुणाच्याही पाय मागे खेचण्याने माझ्यावर काहीही परिणाम होत नाही.

---
हळू हळू भक्ती समजू लागली, म्हणजे निदान एवढे तरी कळले की भक्तीची गरज मला आहे त्याला नाही. त्याने तर कंस आणि शिशूपालाचाही उध्दारच केला की. >>>> इथपर्यंत तर आलेय मी आता त्या परमात्म्याच्या कृपेने.

सावट, त्या जगदंबेबद्दल, आदिमायेबद्दल लिहाच प्लिज.

सगुण निर्गुण ह्या मुळात एकाच चैतन्याच्या दोन अवस्था आहेत. "त्या"च्या पाशी तादात्म्य पावण्यासाठी अद्वैताची जाणिव हवी व ती निर्गुणाचा अंदाज आल्यावर होते. "त्या"च्या चरणांशी बसण्याचं सुख अनुभवायचं असेल तर द्वैतभावही हवा कारण नाहीतर त्याच्या चरणांशी कसं बसणार? तू देव मी भक्त ऐसे करी ही विनवणी कशी सार्थ होणार?

आधी सगुण भक्ती आवश्यक आहे. तिथूनच निर्गुणभक्तीचा मार्ग निघतो. आपण १०वी पास झाल्याशिवाय इंजिनियरची परिक्षा देण्याचं अंमलात आणू शकत नाही ना !

साईनाथांनी निर्गुणाची आस लावण्यासाठी त्यांच्या एका भक्ताला मुद्दाम शिरडीतून मच्छिंद्रगडावर उपासनेसाठी पाठवलं. त्याला साईंपासून दूर जायचे, त्यांचे दर्शन (जे सगुणात होतं) घ्यायचे नाही ही कल्पनाच आधी सहन झाली नाही. पण गुर्वाज्ञेनुसार ते तिथे गेले आणि तिथेही त्यांना कसोटीला उतरल्यावर साईंनी दर्शन दिले होते. ही कसोटी कसली? तर साई नजरेसमोर नसतानाही त्यांची जी अपरंपार ओढ लागली, त्यांच्या रुपापेक्षा त्यांच्या जाणीवेवर ध्यान लागू लागले.

माधव,
>>
इतके नाम घ्या की नामचा अर्थ कळण्याची सद्गुरुकृपा होइल.

व्वा! सुरेख!!

'नामाचा' अर्थ म्हणण्यापेक्षा, 'नामातील' अर्थ असे म्हणने जादा संयुक्तीक आहे! नाही काय? असो...

अश्विनी...
आपण सगळे जण 'हसरी' यांच्या बीबी वर आहोत!
त्यांनी 'उपासनेबद्द्ल' जो प्रश्न विचारला, तो अद्याप 'अनुत्तरित' आहे.
या 'मूळ' प्रश्नाच्या अनुरोधाने, ही सद-चर्चा हळू-हळू जायला हवी!

मूळमायेचा, 'प्रकृती आणि पुरुष' असा 'चिद्विलास' शब्दात प्रकट करण हे फारच अवघड आहे, आपण सर्व त्याचाच 'अभिन्न' भाग आहोत. तरी पाहू 'हळूहळू' क्रमाक्रमाने हा 'गुणमायेच्या' प्रभावाखालील विषय कूठे 'ढाळतोय'..:)

मूळमायेचा, 'प्रकृती आणि पुरुष' असा 'चिद्विलास' शब्दात प्रकट करण हे फारच अवघड आहे, आपण सर्व त्याचाच 'अभिन्न' भाग आहोत. तरी पाहू 'हळूहळू' क्रमाक्रमाने हा 'गुणमायेच्या' प्रभावाखालील विषय कूठे 'ढाळतोय'.. >>>> अगदी अगदी Happy

ही सर्व चर्चा भक्ती बीबीवर कॉपी पेस्ट कराल का? म्हणजे या संदर्भात तिथे वाचता लिहिता येईल आणि या बीबीचा मूळ उद्देश परत वर येईल.

खुप छान वाचायला मिळाले.
इथे आपण वेळ काढुन लिहिताय त्यामुळे आम्हाला अध्यात्माची गोडी लागतेय, आणखीन वाचायची आणि जाणुन घ्यायची ओढ लागतेय.

'नाम' ह्या विषयावर आण़खीन जाणुन घ्यायला आवडेल.

लहान असताना पाहिले होते, आमच्या ओळखीच्या एक गृहस्थ आपले दुकान चालवताना जेव्हा मोकळा वेळ मिळेल तेव्हा "राम" नाम लिहायचे. त्या गृहस्थांच्या चेहर्‍यावर एक वेगळेच सात्विक तेज होते. मला राहुन राहुन विचार मनात येतो, की नाम लिहिताना कुठे तरी, कधी तरी त्यांच्या मनात हिशोबाची आकडे मोड, दुकानातली खरेदी-विक्री ह्या बाबतीत विचार येत नसतील का?

'नाम' घेताना, अगदी बर्‍याच वेळी मन कुठेतरी भटकायला जाते, नाम घेण्याची (भौतिक) क्रिया ही ते करत असते, आणि स्वच्छंद भटकुन आले की मग स्वःतालाच दटावते नाम, नामावर लक्ष दे!

कधी काहि काम करताना, हात एकाग्रपणे काम करतायत आणि मन नामस्मरण करतय, असे नाम परमात्म्यापर्यंत पोचते का? कारण इथे मुख्य क्रिया काम करण्याची आहे.

हेच मन देवळात, भजन-किर्तनाचा आनंद घेत असेल, कानावर पडणार्‍या शब्दांनी तृप्त होत असेल पण त्याच वेळी आजुबाजुच्या गोष्टींची नोंद घेण्याचे काम हि चोखपणे करत असते. एकाच वेळी मनाच्या ह्या दोन अवस्था! हे 'मन' म्हणजे खरच खुप गूढ आहे.

हे 'मन' म्हणजे खरच खुप गुढ आहे. >> सावट आता तरी लिहा त्या आदिमायेबदल.

आपण जेंव्हा साघना सुरु करतो तेंव्हा ती फक्त एक भौतीक क्रिया असते. म्हणजे शरीर साधना करत असते पण त्यात मन नसते. का? कारण आपला साधनेवर विश्वासच नसतो. साखरेच्या पाकात पडलेली मुंगी कशी त्यातच अडकून जाते. थोड्या वेळाने ती त्या पाकावरच खूश होते कारण तो गोड लागत असतो. आपण देखील पाकात पडलेलोच आहोत - त्याच पाकाचे नाव माया. त्या मायेचे गारुड मनावर आणि ५ ज्ञानेंद्रियांवर चालते. आपल्याला ती मायाच खरी वाटत असते कारण आपल्या आयुष्याच्या driving seat वर आपण मनाला बसवले असते. आणि त्यावर मायेचा अंमल असतो.

आपण सगळे जण शाळेत शिकतो की सर्व भाज्या व फळे खाव्यात. तसे करणे श्रेयस आहे. पण आपल्यापैकी कितीजण सगळ्या भाज्या खातात? खात नाहीत कारण त्यांची चव आपल्या जिभेला आवडत नाही. आपण फक्त त्याच भाज्या खातो ज्यांची चव आपल्या जिभेला रुचते - प्रिय वाटते. कोणी आपल्याला साम्गितले की तेवढ्या पुरती आपण न आवडणारी भाजी खातो मग परत ये रे माझ्या मागल्या. बुध्दीला पटते की भाज्या खाणे चांगले आहे पण तिचे मनापुढे काही चालत नाहि.

तसेच साधना केली पाहिजे हे बुध्दीला पटते पण मन मात्र मायेतच खोल रुतलेले असते. पण मग ती साधना बरोबर नाही का? तर हो कदाचीत ती पूर्ण बरोबर नसेल पण कणभर तरी बरोबर असेल. हीच साधना आपल्याला मायेतून वरती खेचू लागते. अगदी मान्य की वेग अगदी कमी असेल पण आपल्याला थोडेच सगळे अंतर या वेगाने कापायचे आहे? मायेच्या आतच आपल्या आत्ताच्या जागेपासून जवळच एक स्टेशन आहे. बास तिथपर्यंत पोहचलो की झाले. तिकडे सद्गुरु उभे आहेत आपल्याला घ्यायला. मग पुढचा बहुतेक प्रवास त्यांच्याकडे असलेल्या ultrasound submarine ने करायचा. Happy

गौरी, नमस्कार! तुम्हाला इथे पाहून खूप बरे वाटले!:)

अश्विनी,

श्रीनारद भक्तिसुत्रात सांगितल्यानुसार, 'भक्ति' ही 'प्रेमस्वरूपा' तर आहेच, पण ती 'फलस्वरूपा' ही आहे, हे विसरून चालणार नाही! 'भक्ती' हे कशाचतरी 'फळ' आहे, आणि कशाच 'फळ' आहे हे जाणण्यात जीवनाची 'सार्थकता' आहे.

म्हणजेच अगोदर 'झाड' तरी रुजू द्या, 'फळ' मिळेलच. प्रत्यक्ष श्रीभगवंतानी तस 'वचनाच कंकण' आपल्या हातात बांधल आहे, त्याचाशी 'ते' कटिबद्ध आहेत!:)

'साधक' जीवनामध्ये एकवेळ 'रज आणि तम' अंतःकरण वृत्ती परवडतात, पण सर्व संतानी आपल्या 'सात्विक' (शुद्ध सात्विक नाही) वृत्ती पासून अत्यंत सावध रहायला परोपरी सांगितल आहे.कारण साधकाच अजून 'पारमार्थिक भल' झालेल नसत, त्यातच तो दुसर्‍याच्या 'भल्याची' काळजी-ईच्छा-वासना करायला लागतो आणि 'परमार्थाच्या' मूळ ध्येयापासून भरकटतो.

माधव!

>>>तसेच साधना केली पाहिजे हे बुध्दीला पटते पण मन मात्र मायेतच खोल रुतलेले असते. पण मग ती साधना बरोबर नाही का? तर हो कदाचीत ती पूर्ण बरोबर नसेल पण कणभर तरी बरोबर असेल. हीच साधना आपल्याला मायेतून वरती खेचू लागते. अगदी मान्य की वेग अगदी कमी असेल पण आपल्याला थोडेच सगळे अंतर या वेगाने कापायचे आहे? मायेच्या आतच आपल्या आत्ताच्या जागेपासून जवळच एक स्टेशन आहे. बास तिथपर्यंत पोहचलो की झाले. तिकडे सद्गुरु उभे आहेत आपल्याला घ्यायला. मग पुढचा बहुतेक प्रवास त्यांच्याकडे असलेल्या ultrasound submarine ने करायचा

अगदी खर आहे!
शास्त्र सांगत ...आपली 'बुध्दि' ही 'कर्मानुसारी' चालते, आपल्याच 'गत' कर्मानुसार चालते. तिला आपल भल-बुर कळत नाही. म्हणजे परमार्थाची सुरूवात होताना अशी 'बुध्दि' ही आंधळी असते..पूर्वग्रहदोषीत असते. त्यामूळे ती स्वत्रंतरित्या 'निर्णय' घेऊ शकत नाही..तीला बाहेरच्या 'मदतीची' गरज लागते.

'मन' म्हणजे मूर्तिमंत 'कल्पनाच' जणू.. कायम संकल्प आणि विकल्पात डूबलेल असत.. 'हे अस करायच' असा 'संकल्प' करायचा, परत आपणच.. होईल ही नाही? संकल्प कसा खोटा आहे, याची 'आवई ' उठवायची, हे अव्याहत चाललेल असत,, अस्थिर 'मन' कायम 'द्वंद्वात' अड्कलेल असत.

उदाहरण जर पहायच झाल तर लगेच आजूबाजूलाच पाहू आणि हे 'फक्त' उदाहरण म्हणूनच पाहू..बाकी नको असलेल लगेच सोडून देऊ....:)

संकल्प- मला गणपतीची उपासना करायची आहे ? ती कशी करायची सांगाल का?
विकल्प-ईतर देवतांची कोणी उपासना करत असल्यास ती द्यावी

संकल्प-मानसपूजेला सोवळ्याचे बन्धन आहे का? माझ्या मते नाही! त्यानंच हे सगळं तयार केलं- त्यालाच विटाळ होतो? नाही वाटत मला. जिथे प्रेम असतं तिथे सोपस्कार महत्त्वाचे नाहित.
विकल्प-अर्थात मी रुढार्थानं 'एक्स्पर्ट' नाहिये - त्यामुळे हवं तरच घ्या सल्ला!)

संकल्प-आता आपली उपासना कोणत्या मार्गाने करायची ते ठरले की मग प्रवास चालू झाला.
विकल्प-आता कोणता मार्ग निवडायचा हे बर्‍याचदा आपल्याला कळत नाही.

संकल्प-विवेकाच्या अंकुशाच्या सहाय्याने, मिळालेल्या कर्मस्वातंत्र्याचा उचित वापर करुन '(मी' कमी होतो)
विकल्प-विवेकाच्या जोडीला वैराग्य जमले तर उत्तमच.

संकल्प-अंकूरापेक्षा बीज(सद्गूगुरू) श्रेष्ठ कारण असंख्य वृक्षांच्या उत्पत्तीची शक्ती एका बीजात असते.
विकल्प-म्हणून सद्गुरुंसमोर, .... हा जप म्हणून स्वतःभोवती (अंकूर) प्रदक्षिणा घालून मग लोटांगण (बीजाला)घालावे.

संकल्प-खरेतर गुरूच्या आवश्यकतेबद्दल शंका घेण्याचे कारण नाही,
विकल्प-पण प्रश्न अशासाठी विचारला की आजकाल आजुबाजुला अनेक गुरू (?) उदयाला येत आहेत,
त्यामुळे ज्यांना साधनेची इच्छा असते, त्यांना खरे कोण हे कळत नाही.

बस झाली उदाहरणे!( कृपया मला माफ करा, समजून देण्याकरिता हे जास्त 'जवळच' वाटल म्हणूनच हे धाडस झाल!)... सांगायचा महत्त्वाचा मुद्दा... 'मन' हे अस 'गूढ' आहे.

हुश्य! सूटलो एकदाच..:) आदिमायेबद्दल बरचस लिहून झाल!

धन्यवाद!

माधवजी, सावटजी
धन्यवाद. आपण जे लिहिले आहे ते उमजले. जे करतोय ते पूर्ण बरोबर नसेल पण तेच सद्गुरु पर्यंत पोचवणार आहे, त्यामुळे त्याबद्द्ल मनात विकल्प येता कामा नये. आणि सावट ह्यांनी म्ह्टल्याप्रमाणे असा विकल्प मनात येणे म्हणजेच मायेचा प्रभाव असणे.

रोजच्या उपासनेचा एक भाग म्हणून गुरुचरित्राचा १४ वा अध्याय वाचावा. हा अध्याय म्हणजेच ग्लौं हे गुरुबीज, गुरुचरित्राचा मेरुमणी. "ग्लौं" हे गुरुबीज १६ स्वर आणि ३३ व्यंजनं यांच्या मिश्रणाने बनलं आहे (एकूण ४९). तसेच या अध्यायाच्या ओव्या ४९ आहेत. सुंदरकाण्डात उल्लेख असलेले "मरुत उनचास" म्हणजे ४९ मरुत गण हे या ४९ ओव्यांच्या ठिकाणी स्थित आहेत. विश्वातील सर्व गती (सुक्ष्मातील सुक्ष्म वस्तू ते विराट विश्व यांच्या गती, श्वासाची गती, शरीरातील इतर गती) या ४९ मरुतगणांच्या कंट्रोल मधे असतात. ह्या अध्यायाच्या नित्य पठणाने या गती आपल्यासाठी योग्य अशा होतात.

आपण जन्माला येतो तेव्हा काही चांगली जनुकं तर काही वाईट जनुकं घेऊन जन्माला येतो. जर ह्या बीजमंत्र आपण जपला किंवा हा १४ वा अध्याय जितका होईल तितका पठणात ठेवला तर वाईट जनुकं मागे सारली जातात (इनॅक्टीव्ह होतात) व चांगल्या जनुकांना प्रोत्साहन मिळेल अशी परिस्थिती निर्माण होते. एक उदाहरण म्हणून सांगता येईल... समजा एखाद्या व्यक्तीमधे अल्झायमर होऊ शकेल असं जनुक उपलब्ध असेल आणि त्या व्यक्तीच्या कर्मानुसार निर्माण झालेले प्रारब्ध जर कठीण असेल तर ते जनुक अ‍ॅक्टीव्हेट होइल अशी परिस्थिती निर्माण होते, एखाद्या प्रदुषित परिसरात त्याला जावेच लागेल, तिथलं रसायन मिश्रीत पाणी त्याच्या वाट्याला येईल, हवेतून टॉक्सिक पदार्थ जातील आणि ते जनुक अ‍ॅक्टीव्हेट होइल. (त्या परिसरातील बाकिच्या लोकांनाही प्रदुषणाचा इतर त्रास होईल पण कदाचित त्यांच्यात ते जनुक नसेल). पण जर ग्लौं हे बीज जपलं जात असेल किंवा १४ अध्याय नित्य पठणात असेल तर ती व्यक्ती अशा घातक परिसरात पोहोचणारच नाही.

हे ग्लौं बीज "ॐ ग्लौं दत्तात्रेयाय नमः" या मंत्राद्वारे जपले जाऊ शकते. जर तुमचे कुणी सद्गुरु असतील तर त्यांचं नाव दत्तात्रेयांच्या जागी घालावे. कुणीच सद्गुरु नसतील तर ते आदिगुरु दत्तात्रेय आहेतच Happy कुठल्या अनिष्ट गोष्टींची भीती वाटणार नाही. वाईट गोष्टींचा / वाईट स्पंदनांचा आपल्यवर प्रभाव होणार नाही. म्हणजे एखादा ब्रह्मसंमंध Proud (हा कोण असतो माहित नाही) पुढे येऊन उभा ठाकला तरी तुम्ही त्याला भिणार नाही.

----
इदं न मम | इदं गुरुदत्तस्य |

अर्थात मी रुढार्थानं 'एक्स्पर्ट' नाहिये - त्यामुळे हवं तरच घ्या सल्ला!
>> ह्याला डिस्क्लेमर म्हणतात.
दुसर्‍याला सल्ला देताना मी बर्‍याचदा टाकतेच (उदा. असं मला वाटतं)- माझं मत दुसर्‍यावर लादलं जाऊ नये म्हणून.

अंकूरापेक्षा बीज(सद्गूगुरू) श्रेष्ठ कारण असंख्य वृक्षांच्या उत्पत्तीची शक्ती एका बीजात असते
>> अंकुराचाच वृक्ष होतो - आणि त्यापासून अशी किती बीजं तयार होतात!!

तुमच्या मुळ मुद्द्याला माझा काही विरोध नाही (की गुरु श्रेष्ठ) पण प्रत्येक गोष्ट, प्रत्येक उदाहरण तर्कावर घासल्याशिवाय स्विकारणं जरा अवघड जातं मला - तुमच्या भाषेतच म्हणायचं तर विकल्प म्हणा ना!

अश्विनी,
प्रत्येक अध्यायामागे कोणते गुरुबीज आहे? कारण गुरुचरित्राची पोथी वाचनात आली नाही, पण आंतरजालावर उपलब्ध असलेली चरित्राची प्रत, त्या अध्यायाचे सार, उद्देश अभिप्रेत करत नाही.
माफ करा, खुप प्रश्न विचारत आहे. जाणकारांकडुन जेवढी माहिती मिळेल, तेवढी ज्ञानात भर पडतेय.

गौरे, प्लिज अहो जाहो नको गं. इथे सगळ्या मैत्रिणी आहोत आपण.

१४वा अध्यायच का ते पहिल्या परिच्छेदात लिहिलंय की गं मी. प्रत्येक अध्यायाचं माहित नाहिये. पण मूळ अष्टबीजांमधलं शेवटच "ग्लौं" बीज म्हणजे हा अध्याय.

तसंच "स्त्रीं" बीज हे तृप्ती बीज आहे. कधी मन अशांत झालं की "ॐ र्‍हीं स्त्रीं र्‍हीं दत्तात्रेयाय नमः" हा जप करावा.

नेहमी वाटतं हे सर्व लिहिण्याचे आपण अधिकारी नाही. तरीही असे बाफ दिसले, अशी चर्चा दिसली की जे मनात उतरलेय ते न राहवून इथे उतरवलं जातं. मी स्वतःच जिथे परमार्थात पुर्णपणे पुढे गेले नाहिये तर मध्यातच दुसर्‍यांना मी काय म्हणून सांगतेय? म्हणूनच काही लिहिलं की तिथे लिहावंसं वाटतं इदं न मम | इदं गुरुदत्तस्य |

हे बीज म्हणजे नक्की काय प्रकरण आहे बुवा?
(रामबीज, गुरुबीज असलं बरच काय काय गेल्या २-४ दिवसात कानावरून पडायलंय)

नानबा, अगं हे बीजमंत्र म्हणजे व्हास्ट प्रकरण आहे Happy (तुझ्या आधिच्या पोस्टमधलं वृक्ष आणि बीज मधलं बीज नाही Wink ) मलाही पेलत नाही. अंधुकसं कळवून घ्यायचा प्रयास चाललाय. तो दत्तमाला मंत्र बघितलास तर त्यात बरेच बीजमंत्र दिसतात उदा. र्‍हीं, क्लिं, क्रौं, ऐं, सौ:, श्रीं, द्रां. पण मूळ कार्यबीज ८ आहेत. अजून कारणबीज पण आहेत.

अश्विनी,
हो, मला लिहिल्यावर कळले की १४ व्या अध्यायाबद्द्ल का विचारतेय, ते तर स्पष्ट केलेय, म्हणुन उडवले ते पोस्टीतुन.
असेच लिहित राहा. तु आणि इतर जाणकार जे लिहिताय ते आम्ही वाचतोय! ह्या वाटेवर आमची सुरुवात हि नाहिये, ज्यावर तुमचा प्रवास आधीच सुरु झाला आहे, त्यामुळे लिहित राहा, आम्हाला मार्गदर्शन मिळतेय.

>>प्रत्येक उदाहरण तर्कावर घासल्याशिवाय स्विकारणं जरा अवघड जातं मला
येस माझे पण तसेच आहे, तसे सावट यांनी त्याबद्दल लिहिलेले कळत असले तरी मनाची तयारी नाही.
बिजमंत्रांबद्दल मला काहीच माहिती नाहीये, पण मला जे वाटते ते सांगायचा प्रयत्न करतो.
साधे आपण कोणाला काही बोललो तर त्या व्यक्तीच्या मनावर (आणि पर्यायाने प्रकृतीवर) बरे / वाईट परिणाम होत असतात. हा परिणाम शब्दांमागच्या अव्यक्त लहरींचा असतो. जर सामान्य माणसांनी एकमेकांना बोललेल्या शब्दांचा असा प्रभाव पडत असेल तर हजारो वर्षांपासुन ऋषी मुनींनी अभ्यास करून सिद्ध केलेल्या शब्दांच्या औषधी गोळ्यांचा (बिज मंत्र) कसला जबरदस्त प्रभाव पडत असेल. जशी सामान्य औषधांना पथ्ये असतात, तशी यांनाही असावीत, उदा. संपुर्ण विश्वास, सदाचरण, नैतिकता, श्रद्धा, इ.

Pages