पनीर माखनी

Submitted by सायो on 14 July, 2008 - 23:55
paneer makhani
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

जिरं १ टिस्पून, तमालपत्र १,२ , टोमॅटो प्युरे १ मध्यम कॅन, ८,१० काजू पाण्यात भिजवून मग पेस्ट करुन, लाल तिखट-चवीप्रमाणे, हळद १ टीस्पून, कसूरी मेथी १,२ टेबलस्पून, फ्रेश /हेवी क्रिम साधारण १ कप, पनीर साधारण पाव किलो किंवा १५,२० तुकडे ,(जशी ग्रेवी हवी असेल त्याप्रमाणे प्रमाण कमी जास्त करावं), मीठ चवीप्रमाणे

क्रमवार पाककृती: 

एका पातेलीत तेल गरम करुन त्यात जिरं ,तमालपत्र घालून फोडणी करावी. त्यावर टोमॅटो प्युरे घालून झाकण घालून थोडा वेळ उकळी काढावी. मग त्यात हळद, लाल तिखट घालून नीट मिक्स करुन काजू पेस्ट घालून पुन्हा उकळी काढावी. नंतर त्यावर कसूरी मेथी हाताने चुरुन आणि फ्रेश क्रिम घालून पुन्हा शिजू द्यावे. चवीप्रमाणे मीठ घालून सर्वात शेवटी पनीरचे तुकडे घालावेत व पुन्हा झाकण घालून शिजवावे.

वाढणी/प्रमाण: 
३,४ माणसांसाठी
अधिक टिपा: 

लागणारे जिन्नस हे अंदाजे आहेत. आपल्या आवडीप्रमाणे प्रमाण कमी जास्त करावं. तांच अमेरिकेत इंडियन ग्रोसरीमध्ये किंवा अमेरिकन ग्रोसरीमध्ये हेवी क्रीम मिळतं ते वापरावं.

माहितीचा स्रोत: 
मूळ रेसिपी संजीव कपूरची. त्यात काजू पेस्ट घालणं हे माझं version.
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

थँक्स ग सायो!!
मैत्रिणींनो, झक्काSSSस होते ही भाजी अन खट्पट पण नाहीये फारशी! सायोच्याच हातची खल्लीये मी... अगदी बोटं-पातेलं चाटुन पुसुन Happy

(स)पन्ना, Happy
त्यात एक तळटीप द्यायचीच राहून गेलीय की ज्यांना पनीर ऐवजी चिकन घालायचं असेल त्यांनी जरुर घालावं. ते ही मस्त लागतं.

मस्तच होते या रेसीपी ने ही भाजी.. Happy आताच शनिवारी केली होती .
यातच पनीर बरोबर थोडे काजू आणी बेदाणे टाकायचे की झाली शाही पनीर माखनी. आमच्या इथे एका रेस्टॉरंट मधे खाल्ली होती अशी. Happy

सायो, मस्त सोपी रेसिपी गं.पार्टीला करायला तर अगदी आयडियल. नाहीतर वाटणघाटण करायचा कंटाळा येतो अगदी. मला वाटते बारीक चिरलेली फरसबी-गाजर-फ्लॉवर, मटार घालून केलेली व्हेज माखनी पण छानच लागेल. मुळात ग्रेव्हीची आयडिया सही आहे.

हो अगो. पार्टीला हिट रेसिपी आहे कारण दिसायला शाही दिसते आणि बल्कमध्ये करायलाही सोप्पी.
एका पंजाबी मैत्रिणीनेही रेसिपी मागून ह्याच पद्धतीने करायला सुरुवात केलीये. Wink

सायो, मस्तच वाटते रेसिपी, नक्की करून बघेन.
आलं, लसूण, कांदा वगैरे नेहेमीचे घटक नाही (बरं झालं, तेवढच सुटसुटीत)

मुम्बई एअरपोर्ट टर्मिनल बी जेट एअर्वेज च्या सिक्युरिटी च्या साईड ला एक सीसीडी लाउंज आहे. मेलं जिना चढावा लागतो. तिथे अशी सेम टु सेम पनीर माखनी व एका वाड्ग्यात बासमतीचा शुभ्र भात देतात. खूप मस्त लागते व विमानात एक तास आराम झोप. ( हे माझे एक प्रायवेट मम्मीज डे आउट आहे Happy अशी जागा जे घर नाही ना ऑफिस जिथे फोन ऑफ असतो व आरामशीर सोफे वगैरे आहेत, सामानाची कट्कट नसते) ते चिकन माखनी ही तसेच देतात. ग्रेवी टेस्ट्स ऑसम. गो सायो.

सायो, खुप खुप थँक्स ग. अगदी अप्रतिम होते ही ग्रेव्ही. आत्ताच केली होती, ३ जणांच्या अंदाजाने अन आम्ही दोघांनीच कढईसुद्धा चाटुन पुसुन घेतली.
मी यात विकतची टॉमेटो प्युरी नव्हती म्हणून चार टॉमेटो किसुन घातले होते अन चमचाभर केचप. किसल्यामुळे प्युरी पातळ न होता घट्ट राहिली. आवडते म्हणून चिमुटभर दालचीनीची पुड पण घातली होती. आणि आर्च म्हणते तसा थोडा गरम मसाला भुरभुरला शेवटी. पण हे नसतं केलं तरी मस्त लागली असती. मी या ग्रेव्हीत मशरुम-मटर घातले.

कालच केली मी पण ..झटपट रेसिपी !! अनायसे सगळे साहीत्य घरात होते.. मस्तचं झाली !!
धन्यवाद सायो.

मी जरा साखर टाकली चवीसाठी.. ग्रेवी थोडी आंबट लागली म्हणुन ..कदचित टोमटोप्युरीमुळे असेल..

केस्मिता, साखर घातली तरी चालते. पण टोमॅटोचा आंबटपणा काढायला दूध, किंवा हेवी क्रिम जरा जास्त घालावं लागतं.

अच्छा ..अस आहे का.
म्हणजे क्रीमच कमी पडले असावे माझे .. आता १-२ वेळा करेन मी पुन्हा कि बरोबर अंदाज येईल.

बाकी इतकी सोपी रेसिपी असेल या ग्रेवीची असे अजिबात वाटले नव्हते कराय्च्या आधी.. कलरचं इतका मस्त येतो ना !! एकदम शाही ग्रेवी

आज केली होती मी. खूप मस्त झाली होती. पनीर माखनी आणि नान असा बेत होता. लेकीने खुश होऊन 'आई तू आता हॉटेल काढ' असा अभिप्राय दिला Proud
धन्स सायो. Happy

अरे वा,

तों.पा.सु. वाटतेय अगदी. Happy

या वीकांताला करेन नक्की.

चार टॉमेटो किसुन घातले होते >> अल्पना, पण टोमॅटो ला पाणी नाही का सुटलं असं करताना? मला तरी टोमॅटो उकडून त्याचा गर काढण्याची प्युरी ची कंसेप्ट माहितीये. नुसतं किसून चालेल का?

Pages