पनीर माखनी

Submitted by सायो on 14 July, 2008 - 23:55
paneer makhani
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

जिरं १ टिस्पून, तमालपत्र १,२ , टोमॅटो प्युरे १ मध्यम कॅन, ८,१० काजू पाण्यात भिजवून मग पेस्ट करुन, लाल तिखट-चवीप्रमाणे, हळद १ टीस्पून, कसूरी मेथी १,२ टेबलस्पून, फ्रेश /हेवी क्रिम साधारण १ कप, पनीर साधारण पाव किलो किंवा १५,२० तुकडे ,(जशी ग्रेवी हवी असेल त्याप्रमाणे प्रमाण कमी जास्त करावं), मीठ चवीप्रमाणे

क्रमवार पाककृती: 

एका पातेलीत तेल गरम करुन त्यात जिरं ,तमालपत्र घालून फोडणी करावी. त्यावर टोमॅटो प्युरे घालून झाकण घालून थोडा वेळ उकळी काढावी. मग त्यात हळद, लाल तिखट घालून नीट मिक्स करुन काजू पेस्ट घालून पुन्हा उकळी काढावी. नंतर त्यावर कसूरी मेथी हाताने चुरुन आणि फ्रेश क्रिम घालून पुन्हा शिजू द्यावे. चवीप्रमाणे मीठ घालून सर्वात शेवटी पनीरचे तुकडे घालावेत व पुन्हा झाकण घालून शिजवावे.

वाढणी/प्रमाण: 
३,४ माणसांसाठी
अधिक टिपा: 

लागणारे जिन्नस हे अंदाजे आहेत. आपल्या आवडीप्रमाणे प्रमाण कमी जास्त करावं. तांच अमेरिकेत इंडियन ग्रोसरीमध्ये किंवा अमेरिकन ग्रोसरीमध्ये हेवी क्रीम मिळतं ते वापरावं.

माहितीचा स्रोत: 
मूळ रेसिपी संजीव कपूरची. त्यात काजू पेस्ट घालणं हे माझं version.
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वर लिहिलय त्या प्रमाणे एक एक ओळ वाचत जशी आहे तशी बनवली , आणि घरी लोकांना ईतकी आवडली की सब का दिल खुश हो गया... जियो सायो जियो , u made my day Happy

आज मेधाचं मिरची का सालन आणि पनीर माखनी केली होती. मस्त झाले काँबो. काय शाही दिसते ही भाजी. इतक्या सोप्या रेसिपीकरिता धन्यवाद!
फक्त एक अडचण अशी की मला प्युरीचा आंबटपणा ( विकतची होती) घालवायला खूप क्रीम आणि साखर घालावी लागली. तु लिहीलेल्या प्रमाणाच्या दुप्पट क्रीम घातले.

घातली ना, अंमळ जास्तच काजू घेतले. तरी आंबट्सर लागत होती. घरी प्युरी करायला पाहिजे पुढच्या वेळी.

एकदम मस्त झाली आत्ताच केली होती.....चिकन घालुन आणि पनीर घालुन सेम ग्रेव्ही......मी कांदा लसुण पण टाकला. एकदम यम्मी झाली. थँक्स सायो . paneer1.jpg

काल केलेली अशी भाजी. हेवी क्रिम न टाकता आणि टोमॅटो (थोडा कांदाही) उकडुन त्याची प्युरी करुन टाकून. मस्त झाली.
पनीर माखनी नॉर्थ मधे कशी करतात? मायबोलीवर रेसेपी आहे का? लिंक द्या प्लिज.

हेवी क्रिम न घालता आंबट नाही झाली की दूध घातलंत? पनीर मखनी म्हणून सर्च केलात गुगलवर तर बर्‍याच रेसिपी मिळतील.

१०० Happy

आज परत केलेली. सुरेख होते ही भाजी. सायो धन्यवाद. नेक्स्ट टाईम थोडासा गरम मसाला घालून काय फरक पडतो बघणार आहे.

मधुरिमा, मला किती किलो काय घ्यायचं असा अंदाज नाही यायचा पण टोमॅटो प्युरेचा ६ पाऊंडचा एक मोठा कॅन पुरावा बहुतेक. कारण बाकीच्या भाज्याही असतील ना? समजा हा एक कॅन घेतला तर त्या प्रमाणात साधारण अर्धी वाटी काजूची भिजवून पेस्ट, एक अख्ख्हा ब्लॉक नानकचं पनीर, आणि साधारण अर्ध कार्टन फ्रेश क्रिम लागेल असं आत्ता वाटतंय. सगळं एकदम न घालता थोडं थोडं घालत चव बघत रहा.

सायो, पनीरचा ब्लॉक कॉस्ट्को मधला म्हणते आहेस का? कारण इं ग्रो मधला पनीरचा ब्लॉक आम्हा चौघांमधेच संपतो Happy
खूपच मस्त होते ही भाजी.

तुझा बरोबर वाटतोय अंदाज. बेबी शॉवरसाठी करून नेणार आहे. सोबत एक भाजी, दाल फ्राय, चिकन करी आणि अंडाकरी आहे. तेव्हा पुरेल असं वाटतं आहे. थँक्स!

मला पदार्थ नि बोल दोन्ही आवडले सीमा.

कॉस्टकोमध्ये पनीरचा ब्लॉक?? हे कधीपासून?
इंडीयन स्टोअरला नानकचा ४०० ग्रॅ/ १४ औंस मिळतो तो संपत असेल चौघांत. पण मी म्हणतेय तो एक मोठा आडवा ब्लॉक असतो. तो पुरावा. तो न मिळाल्यास वरच्या प्रमाणातले २.५/ ३ ब्लॉक्स लागतील.

अरे. थँक्स सगळ्याना. बोल कॉस्टको मधला आहे. चारचा सेट मिळतो. फोटोच श्रेय सायोची रेसीपी आणि आईची घरी केलेली मिरची पावडर याला जात. Happy
मधुरिमा , इंडियन ग्रो मधे जो ब्लॉक मिळतो तो (आत्ताच बघितल. १४ OZ आहे.) ३/४ जनांना अगदी व्यवस्थित पुरतो. त्याला मी ५/६ टोमॅटोची प्युरी घालते. क्रीम साधारण १/२ ते पाउण मेजरिंग कप. (मी जास्त घालते. म्हणजे टोमॅटोची आंबट चव नाही लागत.)एक चमचा मिरची पावडर. २० काजू मोठे पुरतात अंदाजे.
हळद अजिब्बात घालत नाही. त्याने लाल रंग फिका होतो.

हो सायो, आमच्या इथल्या कॉस्ट्को मधे पनीर, नान, आणि नवरतन कोर्माचा रस्सा (ग्रेवी नुसती) मिळते. बर्‍यापैकी मोठे असतात हे पॅक्स.
गम्मत म्हणजे याआधी एन सी ला इंडियन पब्लिक बरंच असून तिथे हे काहीच नव्हतं मिळत. इथे कॅन्सस ला बरेच कमी आहेत देशी त्यामानाने- पण हे सगळं मिळतं.

पनीरचा ब्लॉक दोन पौंडाचा आहे.

सीमा, थँक्स.
( मला शंभर काजू लागावेत म्हणजे :):)

केया, मी एक दा चेंन्ज म्हणुन पनीर सोबत स्टर फ्राय करतो अशी सिमला मिर्ची (उभी न चिरता), बेबी कॉर्न, फ्लॉवर टाकला होता.
बाकी सगळी रेसिपी सेम... मस्त झाला होता तो पण प्रकार ..
ह पण आता ह्याला व्हेज माखनी म्हणायच की नाही ते तुम्ही ठरवा Happy

केया, मी ही अशीच ग्रेव्ही मटर पनीरकरताही करते. फक्त कांदा घालून आलं लसूण पेस्ट परतते. फोडणीत तमालपत्राची गरज नाही.

Pages