पनीर माखनी

Submitted by सायो on 14 July, 2008 - 23:55
paneer makhani
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

जिरं १ टिस्पून, तमालपत्र १,२ , टोमॅटो प्युरे १ मध्यम कॅन, ८,१० काजू पाण्यात भिजवून मग पेस्ट करुन, लाल तिखट-चवीप्रमाणे, हळद १ टीस्पून, कसूरी मेथी १,२ टेबलस्पून, फ्रेश /हेवी क्रिम साधारण १ कप, पनीर साधारण पाव किलो किंवा १५,२० तुकडे ,(जशी ग्रेवी हवी असेल त्याप्रमाणे प्रमाण कमी जास्त करावं), मीठ चवीप्रमाणे

क्रमवार पाककृती: 

एका पातेलीत तेल गरम करुन त्यात जिरं ,तमालपत्र घालून फोडणी करावी. त्यावर टोमॅटो प्युरे घालून झाकण घालून थोडा वेळ उकळी काढावी. मग त्यात हळद, लाल तिखट घालून नीट मिक्स करुन काजू पेस्ट घालून पुन्हा उकळी काढावी. नंतर त्यावर कसूरी मेथी हाताने चुरुन आणि फ्रेश क्रिम घालून पुन्हा शिजू द्यावे. चवीप्रमाणे मीठ घालून सर्वात शेवटी पनीरचे तुकडे घालावेत व पुन्हा झाकण घालून शिजवावे.

वाढणी/प्रमाण: 
३,४ माणसांसाठी
अधिक टिपा: 

लागणारे जिन्नस हे अंदाजे आहेत. आपल्या आवडीप्रमाणे प्रमाण कमी जास्त करावं. तांच अमेरिकेत इंडियन ग्रोसरीमध्ये किंवा अमेरिकन ग्रोसरीमध्ये हेवी क्रीम मिळतं ते वापरावं.

माहितीचा स्रोत: 
मूळ रेसिपी संजीव कपूरची. त्यात काजू पेस्ट घालणं हे माझं version.
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

थॅंक्स सायो! कालच्या पार्टीमधे हिट झाली भाजी.. सोप्पी नि टेस्टी..
paneer.JPG
फुलक्यांकडे दुर्लक्ष करावे ही नम्र विनंती (गप्पांच्या मल्टिटास्किंग मुळे मेकअप जSSरा जास्त झालयं त्यांना Proud )

चनस्, मस्तच सजवल आहेस ताट. वरचे तिन्ही पदार्थ मस्तच दिसत आहेत. फुलक्यांवरचे सुंदर ठीपके कसे आले हे विचारणर होते Proud आणि भात कुठे आहे?? अजून काय काय बनवल होत?

Proud

मेनु - मेक्सिकन चिप्स नि कोल्ड्रिंक, बुंदी रायता, पुदिनावाले आलु गोभी (स्वप्नाची रेसिपी), पनीर माखनी, फुलके,जिरा राईस , दाल तडका (योकुची रेसिपी) , मॅंगो आईस्क्रीम (मुग्धटली)
एकुणात माबो जिंदाबाद!

चनस, ताट मस्तं कलरफुल दिस्तंय.

>>रंग किंचीत डार्क दिसतोय
गप्पांच्या मल्टिटास्किंगमुळे प्युर्‍या आणि पेस्टा फोडणीत, भांड्याला खाली लागून डार्क रंग येतो. (स्वानुभवावरून...) Proud

मृ Lol

सायो.. नाही.. घरचं तिखट घातलं होतं ..नि काजु + साय पेस्ट घातली.. माबोला अचानक द्रुपलने खाल्लं तेव्हा यु ट्युबवर साय्/क्रीम अ‍ॅड करा असं होत.. मी कॉम्बो केलं Happy

कॅन्ड प्युरीची चव नकोशी वाटते अगदी म्हणून मंजूची लसुणी पालक आणि ही अशा दोन कृत्यांच्या संगमे पनीर माखनी बनवते. एकदम मस्त होते. पालकाऐवजी टोमॅटोच्या फोडी घालून तिच्या कृतीतल्या १ ते ६ पायर्‍या झाल्या की या कृतीत दिल्याप्रमाणे फोडणी इ. करायचे. पदार्थ बनवण्याचा झटपटपणा कमी होतो पण एकदम चविष्ठ पनीर माखनी तयार होते.

रंगाला अंमळ कमी पडते पण रंग हवाच असेल तर अगदी थेंबभर जरी फुड कलर घातला तरी हवा तो इफेक्ट येइल बहुतेक.

IMG_3748.JPG

सगळ्या कॅन्ड पदार्थांत प्रिझर्व्हेटिव्ह्ज् असतात, सोडियम चं प्रमाण जास्त असू शकतं .. आणि चवही किती भयानक टोकाची असते ..

इकडे मिळणारं हण्ट्स टाईप टोमॅटो सॉस, टोमॅटो पेस्ट दोन्हींची तीच तर्‍हा!

इतर कॅन्ड पदार्थ आणि बॉटल्ड टोमॅटो प्युरीच्या चवीत मला फरक जाणवतो. टोमॅटो प्युरी तितकी वाईट लागत नाही इथली. पण सोडियम कंटेंट मी चेक केलेला नाहीये. सो बेटर आय डू दॅट.

कॅन्ड प्युरीची चव नकोशी वाटते म्हटलं आहे Happy पनीर माखनी रोज-रोज केली जात नाही त्यामुळे सोडियम इकडे-तिकडे झालं तरी चव आवडली असती तर शॉर्टकट म्हणून वापरलीच असती.

तुमच्याकडे इन्ग्रेडियन्ट्सवर कडक पहारा असतो म्हणे, सिरियल्स पण वेगळ्याच चवीची लागतात.

आधीच्या पोस्टीत लिहायचं राहिलं, (भाजीचा) रंग उजळण्यासाठी १ चमचा टोमॅटो केचप घातलं पण ढिम्म फरक पडला. पुढल्यावेळी नाही घालणार.

रंगाला अंमळ कमी पडते पण रंग हवाच असेल तर अगदी थेंबभर जरी फुड कलर घातला तरी हवा तो इफेक्ट येइल बहुतेक. >> ताई ! रन्ग उजळणारा घटक घालुन बघा ..हळद! डिच्या रेसिपीत हळद नाहिये पहिल्या ६ पायर्‍यात.

ताई, सायोची रेसिपी बघा की. हळद आणि तिखट दोन्ही घातलंय. माखनी असल्याने पहिल्या कृतीतून मिरची वजा केली होती.

ओके! व्हाइट प्लेट मधे सर्व्हा करायच अन अस्सल पनिर माखानि अशिच असते रन्गाला अस जोडुन द्यायच..हाकानिका

मला उचक्या लागल्या Wink

सिंडे, छान दिसतेय पमा.
त्या रंगाचं काहीच करू शकत नाही. टोमॅटो चांगले लालबुंद मिळाले तर बरा रंग येतो. किंवा मग मी कोल्हापुरातून आणलेलं काश्मिरी तिखट घालते. आंबट होणार नाही असं बघून थोडंसं टोमॅटो केचपही घालते.
मलाही ती रेडीमेड प्युरी आवडत नाही, डबा उघडताना प्रिझर्वेटीवचा वास आला की माझा मूड जातो.
रच्याकने, मी आता पाप/ आपा/ लपा ह्या भाज्या मी आधी लिहिल्याप्रमाणे नाही करत, अजून एक शॉर्टकट सापडला आहे. तो योग्य ठिकाणी लिहिते.

काल ही भाजी केली होती मस्त झाली होती.काश्मिरी तिखटामुळे लाल रंग मस्त आला होता. फोटोत जरा रंगबदल का झाला कळत नाही.
IMG_20171020_221321.jpg

alt="IMG_20191218_221305_0.jpg" />

वॉव !!मस्त दिसतीय.
तुम्ही पनीर कोणत्या ब्रँड चं वापरलं?
मी अमूलचं आणलं होतं दिवाळीत.
मीही आधी गरम पाण्यात टाकलं आणि थंड झाल्यावर क्रिस्पी तळून घेतलं. तरी र बरासारखं झालं होतं पनीर.
मला आवडलं नाही अमूल चं पनीर.
असं सॉफ्ट लुसलुशीत पनीर कुठे मिळतं?
चितळेंच्या खव्यामध्ये खूप भेसळ असते सो मी डेअरी प्रॉडक्ट्स तिकडून घेत नाही.

मी नेहमी ही रेसिपी वापरते, हमखास tasty होते.
अमूलच पनीर उकळत्या पाण्यात ठेवून मग वापरायचं, फ्रोझन असतं. शक्यतो फ्रेश पनीर वापरायचं milky mist, बिग बास्केट च पनीर छान असतं. नाहीतर कोणी सुट पनीर विकत असेल तर ते बेस्ट.

मी हल्ली ह्या रेसिपीत अगदी बारीक चेंज केला आहे. तो म्हणजे साधारण पाव वाटी वगैरे कांदा प्रचंड बारीक चिरुन तेलावर चांगला परतायचा आणि त्यावर आलं लसूण पेस्ट घालून बाकी रेसिपी फॉलो करायची.

पुण्यात चांगल्या पनीरसाठी मॉडर्न डेअरी, गोयल्स, हे ब्रँड किंवा मग पंजाब सिंध डेअरीचे पनीर असे पर्याय आहेत. अतिशय मऊ, चवदार पनीर असते. फार शिजवायचे नाही मात्र.

Pages