पनीर माखनी

Submitted by सायो on 14 July, 2008 - 23:55
paneer makhani
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

जिरं १ टिस्पून, तमालपत्र १,२ , टोमॅटो प्युरे १ मध्यम कॅन, ८,१० काजू पाण्यात भिजवून मग पेस्ट करुन, लाल तिखट-चवीप्रमाणे, हळद १ टीस्पून, कसूरी मेथी १,२ टेबलस्पून, फ्रेश /हेवी क्रिम साधारण १ कप, पनीर साधारण पाव किलो किंवा १५,२० तुकडे ,(जशी ग्रेवी हवी असेल त्याप्रमाणे प्रमाण कमी जास्त करावं), मीठ चवीप्रमाणे

क्रमवार पाककृती: 

एका पातेलीत तेल गरम करुन त्यात जिरं ,तमालपत्र घालून फोडणी करावी. त्यावर टोमॅटो प्युरे घालून झाकण घालून थोडा वेळ उकळी काढावी. मग त्यात हळद, लाल तिखट घालून नीट मिक्स करुन काजू पेस्ट घालून पुन्हा उकळी काढावी. नंतर त्यावर कसूरी मेथी हाताने चुरुन आणि फ्रेश क्रिम घालून पुन्हा शिजू द्यावे. चवीप्रमाणे मीठ घालून सर्वात शेवटी पनीरचे तुकडे घालावेत व पुन्हा झाकण घालून शिजवावे.

वाढणी/प्रमाण: 
३,४ माणसांसाठी
अधिक टिपा: 

लागणारे जिन्नस हे अंदाजे आहेत. आपल्या आवडीप्रमाणे प्रमाण कमी जास्त करावं. तांच अमेरिकेत इंडियन ग्रोसरीमध्ये किंवा अमेरिकन ग्रोसरीमध्ये हेवी क्रीम मिळतं ते वापरावं.

माहितीचा स्रोत: 
मूळ रेसिपी संजीव कपूरची. त्यात काजू पेस्ट घालणं हे माझं version.
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

इकडे तर अमूलचं चांगलं मिळतं पनीर. हिरव्या बॉक्स मधे. मी सध्या तेच वापरतेय. काही तळून वगैरे नाही डायरेक्ट भाजीत. मला तरी तसंच मऊ आवडतं. तळल्यावरचा तो रबरी फील नाही आवडत.
दुसरं एक हल्लीच सुचवलं गेलंय. ब्रार्स मलई पनीर. कॅनडाचं आहे. ते पण चांगलं वाटलं.

मी पण आता याच पद्धतीने करते नेहेमी. हीट जातेच. बदल म्हणून कधी मटार, सिमला मिरची कींवा रंगीत बेल पेपर. बेस हाच माखनीचा.

अमेरिकेत ( निदान इथे न्यूजर्सीत) नानक चे पनीर बेस्ट आहे. एकदम सॉफ्ट आणि फ्रेश. पाण्यात वगैरे घालावे नाही लागत.

रेसिपी आवडली. सोपी आणि सुटसुटीत आहे. आम्ही नेहमी फक्त पनीर भुर्जी करतो, बदल म्हणून सगळ्यांना अशी ग्रेव्ही नक्की आवडेल.

पुण्यात मॉडर्न, ABC आणि डन्स ही बेस्ट पनीर आहेत. बनारस डेअरीचं पनीर पण चांगलं वाटलं. डन्सचं सगळ्यात उत्तम. पूर्वी दोराबाजीत असायचं, पण हल्ली पाहिलं नाही. कॅम्पमध्ये बाबाजान चौकाच्या अलीकडे डन्सची डेअरी आहे. ( मला इथली बासुंदी पण आवडते) ABC ची डेअरी कोरेगाव पार्क, कॅम्प आणि साळुंके विहार रोडला आहेत. इथले डेअरी प्रॉडक्ट्स पण फ्रेश असतात. बाकी हर्ब्ज आणि मध पण असतो. इथली लेमन लस्सी एक नंबर आहे. दोराबाजीत मिळते.

पनीर चे slices करून shallow fry करून घ्यायचं तव्यावर..थोडा brown color आला पाहीजे..crispy होतं म्हणजे..नंतर ते gravy मध्ये टाकायचे..मस्त लागतं..आपण तसही खाल्लं तरी एकदम टेस्टी Happy

b9c71e7a958f90eea1da87ce99ebf627_2.jpg

अमेरिकेत नानक पनीर बेस्ट असतं.
युनायटेड स्टेट्स ऑफ कोथरुडमध्ये जय श्रीराम! (श्रीराम डेअरी नामक आउटलेट्स आहेत त्यांचे सर्व प्रॉड्क्ट्स - पनीर खवा तूप चांगले आहेत.)

माखनी ग्रेव्ही छान होते पण जरा गोडुस चव असते जी आमच्याकडे फारशी आवडत नाही म्हणून मी हल्ली वाटणात हिरवी मिर्ची घालते. (परतून घ्यायची मिर्ची पण आधी.) त्याने ग्रेव्हीचा आंबडगोडपणा जरा तिखटाकडे बॅलन्स होतो.

सनव, गोडूस चव आवडत नसेल तर लाल तिखट जास्त घालता येईलच किंवा मी वर एक अ‍ॅडिशन केली आहे थोडा कांदा घालण्याची. त्या कांद्यावर आलं, लसूण, मिरची असा ठेवा करुन परतताही येईल. ट्राय करुन बघा.

श्रद्धा, मीरा, sanav, माहितीसाठी धन्यवाद.
जय श्रीराम डेअरी प्रॉडक्ट सर्च करेन गूगल वर.

Pages