जिरं १ टिस्पून, तमालपत्र १,२ , टोमॅटो प्युरे १ मध्यम कॅन, ८,१० काजू पाण्यात भिजवून मग पेस्ट करुन, लाल तिखट-चवीप्रमाणे, हळद १ टीस्पून, कसूरी मेथी १,२ टेबलस्पून, फ्रेश /हेवी क्रिम साधारण १ कप, पनीर साधारण पाव किलो किंवा १५,२० तुकडे ,(जशी ग्रेवी हवी असेल त्याप्रमाणे प्रमाण कमी जास्त करावं), मीठ चवीप्रमाणे
एका पातेलीत तेल गरम करुन त्यात जिरं ,तमालपत्र घालून फोडणी करावी. त्यावर टोमॅटो प्युरे घालून झाकण घालून थोडा वेळ उकळी काढावी. मग त्यात हळद, लाल तिखट घालून नीट मिक्स करुन काजू पेस्ट घालून पुन्हा उकळी काढावी. नंतर त्यावर कसूरी मेथी हाताने चुरुन आणि फ्रेश क्रिम घालून पुन्हा शिजू द्यावे. चवीप्रमाणे मीठ घालून सर्वात शेवटी पनीरचे तुकडे घालावेत व पुन्हा झाकण घालून शिजवावे.
लागणारे जिन्नस हे अंदाजे आहेत. आपल्या आवडीप्रमाणे प्रमाण कमी जास्त करावं. तांच अमेरिकेत इंडियन ग्रोसरीमध्ये किंवा अमेरिकन ग्रोसरीमध्ये हेवी क्रीम मिळतं ते वापरावं.
थँक्स ग
थँक्स ग सायो!!
मैत्रिणींनो, झक्काSSSस होते ही भाजी अन खट्पट पण नाहीये फारशी! सायोच्याच हातची खल्लीये मी... अगदी बोटं-पातेलं चाटुन पुसुन
(स)पन्ना,
(स)पन्ना,
त्यात एक तळटीप द्यायचीच राहून गेलीय की ज्यांना पनीर ऐवजी चिकन घालायचं असेल त्यांनी जरुर घालावं. ते ही मस्त लागतं.
बरीच सोपी आहे ग रेसिपी. कांदा
बरीच सोपी आहे ग रेसिपी. कांदा बिंद्याच लफड नाही काही. करुन बघेन नक्की.
सायो, रेसिपी मस्तच आहे. चिकन
सायो, रेसिपी मस्तच आहे. चिकन घालून करून बघते.
२ टेबलस्पून कसुरी मेथीने कडवट होत नाही का?
अजिबात नाही. उलट मस्त चव येते
अजिबात नाही. उलट मस्त चव येते कसुरी मेथीने. आणि चिकन घालूनही मस्त लागते. तीही खाल्लीय मी.
मी परवाच केली होती. झटपट आणि
मी परवाच केली होती. झटपट आणि चविष्ठ. पुढल्या वेळी टोमॅटो प्युरी घरीच करणार आहे.
मस्तच होते या रेसीपी ने ही
मस्तच होते या रेसीपी ने ही भाजी.. आताच शनिवारी केली होती .
यातच पनीर बरोबर थोडे काजू आणी बेदाणे टाकायचे की झाली शाही पनीर माखनी. आमच्या इथे एका रेस्टॉरंट मधे खाल्ली होती अशी.
चिकन टाकुन पण छान लागत्ये
चिकन टाकुन पण छान लागत्ये म्हणताय तर अंडी टाकुन पण छान लागेल न??
सायो, मस्त सोपी रेसिपी
सायो, मस्त सोपी रेसिपी गं.पार्टीला करायला तर अगदी आयडियल. नाहीतर वाटणघाटण करायचा कंटाळा येतो अगदी. मला वाटते बारीक चिरलेली फरसबी-गाजर-फ्लॉवर, मटार घालून केलेली व्हेज माखनी पण छानच लागेल. मुळात ग्रेव्हीची आयडिया सही आहे.
हो अगो. पार्टीला हिट रेसिपी
हो अगो. पार्टीला हिट रेसिपी आहे कारण दिसायला शाही दिसते आणि बल्कमध्ये करायलाही सोप्पी.
एका पंजाबी मैत्रिणीनेही रेसिपी मागून ह्याच पद्धतीने करायला सुरुवात केलीये.
सायो, मस्तच वाटते रेसिपी,
सायो, मस्तच वाटते रेसिपी, नक्की करून बघेन.
आलं, लसूण, कांदा वगैरे नेहेमीचे घटक नाही (बरं झालं, तेवढच सुटसुटीत)
सायो, क्रिम म्हणजे हेवी
सायो, क्रिम म्हणजे हेवी व्हिपींग क्रिम वापरतेस का? छान आहे रेसीपी !!
व्हिपींग क्रिम नाही, हेवी
व्हिपींग क्रिम नाही, हेवी क्रिम मिळतं ते.
सायो तू यात पनीर तळून घालतेस
सायो तू यात पनीर तळून घालतेस की असच??
वरून गरम मसाला नाही
वरून गरम मसाला नाही भुरभुरायचा?
कित्ती ते प्रश्न सायोने जशी
कित्ती ते प्रश्न सायोने जशी दिलीये कृती तशीच्या तशी करा. खूप छान होते.
पनीर तळून घ्यायची गरज नाही.
पनीर तळून घ्यायची गरज नाही. वर गरम मसाला भुरभुरायचीही गरज नाही, सिंडी म्हणतेय ते ऐका.
मुम्बई एअरपोर्ट टर्मिनल बी
मुम्बई एअरपोर्ट टर्मिनल बी जेट एअर्वेज च्या सिक्युरिटी च्या साईड ला एक सीसीडी लाउंज आहे. मेलं जिना चढावा लागतो. तिथे अशी सेम टु सेम पनीर माखनी व एका वाड्ग्यात बासमतीचा शुभ्र भात देतात. खूप मस्त लागते व विमानात एक तास आराम झोप. ( हे माझे एक प्रायवेट मम्मीज डे आउट आहे अशी जागा जे घर नाही ना ऑफिस जिथे फोन ऑफ असतो व आरामशीर सोफे वगैरे आहेत, सामानाची कट्कट नसते) ते चिकन माखनी ही तसेच देतात. ग्रेवी टेस्ट्स ऑसम. गो सायो.
सायो, खुप खुप थँक्स ग. अगदी
सायो, खुप खुप थँक्स ग. अगदी अप्रतिम होते ही ग्रेव्ही. आत्ताच केली होती, ३ जणांच्या अंदाजाने अन आम्ही दोघांनीच कढईसुद्धा चाटुन पुसुन घेतली.
मी यात विकतची टॉमेटो प्युरी नव्हती म्हणून चार टॉमेटो किसुन घातले होते अन चमचाभर केचप. किसल्यामुळे प्युरी पातळ न होता घट्ट राहिली. आवडते म्हणून चिमुटभर दालचीनीची पुड पण घातली होती. आणि आर्च म्हणते तसा थोडा गरम मसाला भुरभुरला शेवटी. पण हे नसतं केलं तरी मस्त लागली असती. मी या ग्रेव्हीत मशरुम-मटर घातले.
अल्पना टोमॅटो किसायची कल्पना
अल्पना टोमॅटो किसायची कल्पना भारीच. मला पण बाहेर मिळणारी प्युरी आवडत नाही. पुढल्यावेळी करुन बघेन.
सायो, मी काल तुझ्या कृतीने
सायो,
मी काल तुझ्या कृतीने करुन पाहिली पनीर माखनी. मस्त होते. धन्यवाद रेसेपीबद्दल.
हा एकदम झकास .......मंडळ
हा एकदम झकास .......मंडळ आभारी आहे
थॅन्क्स स्वाती, वृषाली.
थॅन्क्स स्वाती, वृषाली.
कालच केली मी पण ..झटपट
कालच केली मी पण ..झटपट रेसिपी !! अनायसे सगळे साहीत्य घरात होते.. मस्तचं झाली !!
धन्यवाद सायो.
मी जरा साखर टाकली चवीसाठी.. ग्रेवी थोडी आंबट लागली म्हणुन ..कदचित टोमटोप्युरीमुळे असेल..
उद्या करुन बघते.. थॅन्क्स
उद्या करुन बघते..
थॅन्क्स सायो.
केस्मिता, साखर घातली तरी
केस्मिता, साखर घातली तरी चालते. पण टोमॅटोचा आंबटपणा काढायला दूध, किंवा हेवी क्रिम जरा जास्त घालावं लागतं.
अच्छा ..अस आहे का. म्हणजे
अच्छा ..अस आहे का.
म्हणजे क्रीमच कमी पडले असावे माझे .. आता १-२ वेळा करेन मी पुन्हा कि बरोबर अंदाज येईल.
बाकी इतकी सोपी रेसिपी असेल या ग्रेवीची असे अजिबात वाटले नव्हते कराय्च्या आधी.. कलरचं इतका मस्त येतो ना !! एकदम शाही ग्रेवी
आज केली होती मी. खूप मस्त
आज केली होती मी. खूप मस्त झाली होती. पनीर माखनी आणि नान असा बेत होता. लेकीने खुश होऊन 'आई तू आता हॉटेल काढ' असा अभिप्राय दिला
धन्स सायो.
अरे वा, तों.पा.सु. वाटतेय
अरे वा,
तों.पा.सु. वाटतेय अगदी.
या वीकांताला करेन नक्की.
चार टॉमेटो किसुन घातले होते >> अल्पना, पण टोमॅटो ला पाणी नाही का सुटलं असं करताना? मला तरी टोमॅटो उकडून त्याचा गर काढण्याची प्युरी ची कंसेप्ट माहितीये. नुसतं किसून चालेल का?
८,१० काजू पाण्यात भिजवून मग
८,१० काजू पाण्यात भिजवून मग पेस्ट करुन >> किती वेळ भिजवायचे काजू पाण्यात? रात्रभर?
Pages