पनीर माखनी

Submitted by सायो on 14 July, 2008 - 23:55
paneer makhani
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

जिरं १ टिस्पून, तमालपत्र १,२ , टोमॅटो प्युरे १ मध्यम कॅन, ८,१० काजू पाण्यात भिजवून मग पेस्ट करुन, लाल तिखट-चवीप्रमाणे, हळद १ टीस्पून, कसूरी मेथी १,२ टेबलस्पून, फ्रेश /हेवी क्रिम साधारण १ कप, पनीर साधारण पाव किलो किंवा १५,२० तुकडे ,(जशी ग्रेवी हवी असेल त्याप्रमाणे प्रमाण कमी जास्त करावं), मीठ चवीप्रमाणे

क्रमवार पाककृती: 

एका पातेलीत तेल गरम करुन त्यात जिरं ,तमालपत्र घालून फोडणी करावी. त्यावर टोमॅटो प्युरे घालून झाकण घालून थोडा वेळ उकळी काढावी. मग त्यात हळद, लाल तिखट घालून नीट मिक्स करुन काजू पेस्ट घालून पुन्हा उकळी काढावी. नंतर त्यावर कसूरी मेथी हाताने चुरुन आणि फ्रेश क्रिम घालून पुन्हा शिजू द्यावे. चवीप्रमाणे मीठ घालून सर्वात शेवटी पनीरचे तुकडे घालावेत व पुन्हा झाकण घालून शिजवावे.

वाढणी/प्रमाण: 
३,४ माणसांसाठी
अधिक टिपा: 

लागणारे जिन्नस हे अंदाजे आहेत. आपल्या आवडीप्रमाणे प्रमाण कमी जास्त करावं. तांच अमेरिकेत इंडियन ग्रोसरीमध्ये किंवा अमेरिकन ग्रोसरीमध्ये हेवी क्रीम मिळतं ते वापरावं.

माहितीचा स्रोत: 
मूळ रेसिपी संजीव कपूरची. त्यात काजू पेस्ट घालणं हे माझं version.
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आज केली आहे पनीर माखनी. झकास झालीये. मी टोमॅटो ब्लांच करुन प्युरी केली. त्यामुळे असेल पण रंग पांढरट गुलाबी आलाय. चवीला मस्तच आणि एकदम झटपट.
धन्यवाद सायो.

चिमुरी, पाणी का घालायचं ह्यात? प्युरे, काजू पेस्ट आणि क्रिम आहे की ऑलरेडी. त्यातूनही अगदी घट्ट वाटल्यास अगदी किंचित घालून ट्राय करू शकता.

काल करुन बघितली. वेळेवर कसूरी मेथी न सापडल्यामुळे ताजीच मेथी बारिक चिरुन पहिले तेलात फ्राय करुन पुढची कृती केली. खरंच अगदी झट्पट आणि चविष्ट झाली होती. जेवायला आलेल्या पाहुण्यांना तर खुपच आवडली. धन्यवाद सायो.

कालच करुन पहिलि, फ्रेश क्रिम कहि मिळाल नाहि म्हनुन मग साय वापरलि, आणी शेवटि थोडस दुध घातल, अगदि छान झालि होति,

Photo-0311.jpg

ह्या शनीवारी घरी १३-१४ लोक जेवायला येणार आहेत, तेव्हा ही रेसेपी करुन बघायचा विचार आहे. फोटो खुप छान दिसत आहेत. मी नानक चे पनीर आणणार आहे. एक शंका: पनीर चे तुकडे सुरुवतीला तळुन घ्यायचे का? की तसेच वापरायचे?

मी केली होती ३० लोकांसाठी. सुपर डुपर मस्त झाली. खूप खूप थँक्स सायो.
फोटो काढायला विसरले आणि नंतर उरलीच नाही.
आज लेकासाठी चिकन घालून बनवणार आहे.

मधुरिमा, साधारण अंदाज सांगितला होता तो बरोबर होता की नाही?
ह्याच ग्रेव्हीत मटर पनीरही चांगलं होतं.

हो, सगळं बरोब्बर सायो. फक्त टोमॅटो प्युरीचा मी ६ पौंडाचा डबा आणला तो बराच जास्त झाला. खूप उरली आहे. त्याचं सूप, सार इ. करून संपवेन आता.
पण मस्तच डिश. सगळ्याना खूपच आवडली.

मधुरिमा, अगं टोमॅटॉ प्युरी छान फ्रीज होते. छोटे छोटे पोर्शन करुन स्वतंत्र झिप्लॉक मध्ये टाक. म्हणजे मग वाया जाणार नाही.

सीमा, कॅनमधून काढून मोठ्या प्लॅस्टिकच्या डब्यात फ्रीजमधे ठेवली आहे.
तर आता

१. फ्रेश प्युरी नाही, कॅनमधली चालेल का फ्रीझ केलेली?
२. मागच्या शनिवारी ठेवलीय फ्रीजमधे- तर आता फ्रीझरमधे ढकललेली चालेल का?
३. फ्रीझरमधे साधारण किती दिवस टिकेल?

सॉरी, पण मी फ्रीझर फार कमी वापरते. भाज्या नि मसाले ठेवते. म्हणून एवढी प्रश्नावली.

१.फ्रेश प्युरी नाही, कॅनमधली चालेल का फ्रीझ केलेली?>>>>> होय नक्किच
२. मागच्या शनिवारी ठेवलीय फ्रीजमधे- तर आता फ्रीझरमधे ढकललेली चालेल का?>>>हे पण होय

३. फ्रीझरमधे साधारण किती दिवस टिकेल??>>> २ महीने तरी टिकावी - ice cube tray मधे set करुन मग cubes ziplock bags मधे ठेवल्यास जेवढि हवी तेवढिच वापरणे सोपे होते

अगदी सोपी रेसीपी .
मिक्सेर ने एन्वेळी दगा दिला म्हणून मला वेळ लागला , नाहीतर 'आयत्या वेळीची' रेसिपी आहे .

IMG1497.jpg

पण ... भर्पूर मलाई टाकूनही आम्बटपणा फार कमी झाला नाही .
पण एकन्दरीत ' सून अगदीच बिनकामाची नाही ' असा भाव साबांच्या वागण्यात वाटला Wink

या हिट् रेसिपिने पनीर माखनी करणार आहे. याआधी केली आहे पण थोड्या प्रमाणात. यावेळी ५० माणसांसाठी करायचा विचार आहे. साधारण अंदाज सांगू शकशील का? आणि कॅन प्युरे कोणत्या कंपनीचा आणावा ?

मी परवा केल पनीर माखनी चिकन घालुन पहिल्यांदाच केल होत पण आंबट झाल होत्.घरच्यांना आवडला पण मला नाही...

साहीत्य पुडिलप्रमाने घेतले होते.आंबट का झाले?
चिकन अर्धा किलो,टोमॅटो ४, क्रिम १०० ग्रॅम,१० काजुची पेस्ट

सीमा, मला पदार्थांच्या मापावरून सांगता नाही येणार पण पुढच्या वेळी केल्यास क्रिम आणि काजूचं प्रमाण वाढवून बघा.

इतरही आहे. अपेटायझर, वेज जालफ्रेझी, पुलाव, पुर्या, गुलाबजाम, रायता, ड्रींक्स. पनीरचे मोठे पाकीट कुठे मिळेल, प्युरि इंडियन ग्रो. ची वापरु का? प्रमाण काय? धन्यवाद.

काजू मुठभर पेक्षा जास्त लागतील. प्युरेचा एक मिडीयम कॅन पुरेल. किंवा हंटचे ते दोन, तीन पुरतील. इंग्रोत नानक पनीरचं एक मोठं पॅकेट येतं ते पुष्कळ झालं. तुम्हांला हवं असल्यास कांदाही घालू शकता. मी तशी प मखनी खाल्ली आहे, मस्त लागते.

सायो,
पनीर माखनी छान झाली. ३ टॉमेटोची प्युरी करून घेतली.पण आंबट लागत असल्यामुळे २ चमचे मिल्क पावडर टाकली.तेलावर टॉमेटो परतायचा का तुम्ही दिल्याप्रमाणे 'झाकण घालून थोडा वेळ उकळी काढावी.' आज मी परतले होते.

आज केली होती. अफलातून झाली. एकदम शाही! फक्त रंग पिवळट आला तो मला केशरी लाल आवडला असता, लाजोच्या फोटो सारखा. बाकी फर्स्ट क्लास रेसिपी!!

Pages