मी वाचलेले पुस्तक

Submitted by admin on 17 July, 2008 - 15:56

इथे आपण नुकत्याच वाचलेल्या पुस्तकाबद्दल लिहा. शक्य असल्यास नवीन पुस्तकासाठी नवीन लेखनाचा धागा चालू करा.

भाग २ - धागा - http://www.maayboli.com/node/41038

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अश्विनी -- 'व्यासपर्व' ची नोंद करून ठेवलीय .. पुढच्या भारतभेटीत घेईन म्हणतो !
------
इथे कुणी 'तमाच्या तळाशी' वाचलं आहे का ?
एक खूपच वेगळा विषय मांडला आहे प्रा. माधुरी शानभाग ह्यांनी. नैराश्य आणि पाठोपाठ होणार्‍या आत्महत्या ह्यास परिस्थिती फक्त निमित्त ठरते ! आत्महत्येच्या प्रवृत्तीच्या जीन्स शरीरात असू शकतात ज्या हे सारं कंट्रोल करतात. त्या जीन्स अनुवंशिकतेने शरीरात येऊ शकतात !!!
मला स्वतःला 'वेगळा विषय' म्हणून पुस्तक आवडलं पण 'कथानक' ठीक ( ओके टाईप्स !!) वाटलं.
--------------

व्यासपर्व वाचलं.. >> हे आवडले असेल नि पूजनीय व्यक्तीरेखांना मानवी कवच बसवून केलेली डागडुजी खटकणार नसेल तर भैरप्पांचे "पर्व" (मूळ पुस्तक कानडी आहे. मराठी अनुवाद मिळतो) वाचा.

हमोंचं बालकाण्ड वाचलं नुकतचं. लेखनशैली खुप छान आहे. त्यांची निष्पर्ण वृक्षावर भर दुपारी ही अशीच खिळवून ठेवते. खुप डिप्रेसिंग आहे कथानक. पण वास्तव आहे ते.. >> एकदम बरोबर. का कोणास ठाउक हमो मी नेहमीच टाळत आलो होतो. नेमकी इथे मराठी ग्रंथालयासाठी पूर्वतयारी करताना ढिगभर हमो मिळाली नि नेमकी हीच दोन वाचली. निष्पर्ण प्रचंड डिप्रेसिंग आहे.

१) पर्व चा अनुवाद कुणी केला आणि पुस्तकाचे नाव 'पर्व' च असेल असे वाटते..
२) हमोंचा काही long form आहे का? मी ते ह. मो. असे घेत आहे..

सारे प्रवासी घडीचे - ले. जयवंत दळवी.

कित्येक वर्षं झाली हे पुस्तक वाचुन पण मनातुन पुसले नाही गेले कधी. नरु, बिड्या आणायला पैसे देणारी आजी आणि त्यातुन कडक लाडू आणणारा नातू, दादू गुरवाचो वस्त्रहरण, बाबल्याच्या मुलीबरोबरची छोटीशी प्रेमकहाणी, शिरोड्याचं वर्णन, गावतलं देउळ, तिथला उत्सव, नवस.. i am neru म्हणणारा नरु.. अतिशय सरळ साध्या भाषेत लिहिलेलं, उगा कोट्या करत विनोदनिर्मिती न करता पात्रं, प्रसंग आणि कथानकातून विनोद निर्माण केलेले हे माझ्या मते मराठि मधील सर्वोत्कृष्ट विनोदी पुस्तकांपैकी एक आहे.

ह्या पुस्तकाच्या शेवटचे कंसातले वाक्य: 'ह्या पुस्तकातील सर्व वर्णने व पात्र काल्पनिक आहेत' हे वाचुन मला उगाचच तेव्हा दळवींचा राग आला होता इतकी ही पात्रं खरी उभी केलेली आहेत (अर्थात ह्यातले अनेक प्रसंग आणि पात्रं ही खर्‍या व्यक्तिरेखांवरुन व प्रसंगावरुनच उचललेली असणार)

शिरोड्याला मंदिरात गेल्यावर तिथल्या सपाता बघुन ह्या पुस्तकाची प्रचंड आठवण आली.. आजही तिथे तितक्याच उत्साहाने दशावताराचे प्रयोग होतात.. पुरुष नट स्त्रीपार्टीचे काम करतात.. लोकं मधेच उठुन बक्षिस देतात आणि प्रयोग थांबवून ज्याने बक्षिस दिले आहे त्याचे नाव मोठ्याने जाहिर केले जाते.

पर्वचा अनुवाद बहुतेक उमा कुलकर्णी ह्यांनी केला आहे (भैरप्पांच्या अनेक पुस्तकांचा अनुवाद त्यांनीच केला आहे).
हमो म्हणजे ह मो मराठे. हे एक ज्येष्ठ पत्रकार देखील आहेत.

अरे हे हमो का.. हे आहेत माहिती. पण मी त्यांच काहीच वाचलेलं नाही किंवा मला संधी मिळाली वाचायला. धन्यवाद टण्या.

हमो अजून आहेत??

भैरप्पांचे अनेक वेगवेगळी कथानकं एकत्र गुंफलेले पुस्तक कुठले.. हे बर्‍यापैकी मोठे आहे.. मला आता सगळी कथानकं लक्षात नाहीत.. पण बहुतेक ह्यात एक अतिशय यशस्वी एक्झीक्युटीवचे एक कथानक आहे. तसेच एक घटस्फोटित यशस्वी महिलेचे व तिच्या तरुण मुलाचे जो इंजिनिअरिंगसाठी हॉस्टेल वर राहत असतो आणि तिथे एक लफडं करतो असेही एक कथानक आहे.

भैरप्पांचं आत्मचरित्र प्रत्येकाने वाचलंच पाहिजे असं आहे.. ते वाचलं की मग त्यांची इतर पुस्तकं 'समजत' जातात.. नुकतंच आलेलं 'मंद्र' मला आवडलं नाही (म्हणजे कथानक). पण भैरप्पांच्या आत्मचरित्रातल्या संदर्भांमुळे ते खोटं वाटत नाही.

भैरप्पांचं आत्मचरित्र प्रत्येकाने वाचलंच पाहिजे असं आह >> नाव सांग पुस्तकाचे (अनुवादाचे पण Happy )

'आत्मचरित्र' असंच आहे. उमा कुलकर्णी यांनी अनुवाद केला आहे.

ह. मो. मराठे - हनुमंत मो. मराठे
----> मराठे संमेलनामधे जेव्हा पुरस्कार घोषित केला "हनुमंत मराठे" या नावाने तेव्हा त्यांना सुद्धा कळले नाही जेव्हा व्यासपीठावर "ह. मो" चा पुकारा झाला तेव्हा त्यांच्या लक्षात आले. हे संमेलन गोवा येथे ३ वर्षापुर्वी झाले होते.

अखि, हमोंना कुठला पुरस्कार देण्यात आला आणि त्यांच्या कुठल्या पुस्तकासाठी कृपया सांगतेस का?

असामी, बालकांड वाचल्यावर निष्पर्ण तील नायकाच्या मनोभुमिकेचा जरासा उलगडा होतो बघ. खरं तर निष्पर्ण ही त्याच्या आयुष्यातील अनुभवांवर आधारित असु शकते. असं बालपण वाट्याला आल्यावर एक प्रकारचं नैराश्य सगळ्या आयुष्याला व्यापु शकतं..

मराठे कुल संमेलन जे होत ना त्यात मिळाला होता. म्हणजे मराठे लोकांच get to gether. त्या संमेलनामधे माझे सासु सासरे गेले होते

मी वाचलय "पर्व" पण मला काहि ते तितकस आवडल नाहि. महाभारतातिल व्यक्तिंना मानवि पातळिवर दाखवलय म्हणुन नाहि पण एकंदर त्यांनि जे चित्रण केलय ते फारच अप्रगत समाजाच वाटत. ज्या राज्यसत्तेच्या अधिपत्याखालि एक महायुध्ध लढल गेल त्याच राजाला दुध आणि लाह्या वेळेवर खायला मिळायचि मारामार असेल हे कल्पना करुनहि पटत नाहि. पात्रांच मानविकरण करण्याच्या प्रय्त्नात कथेचा मुळ तोल गेलाय अस वाटत. आता व्यासपर्व आणि युगांतर एकाच वेळि वाचण्याचा संकल्प आहे.

व्यासपर्व खूप अवघड आहे कळायला. पण युगांतर एकदम सुरेख सोपं.

पर्ववद्दल माझे मत असे आहे....
महाभारतातल्या व्यक्तीरेखांना त्यांना कुठलाही दैवी किंवा चमत्कारांचा साज न चढवता एव्हढे चपखलपणे मानवी स्वभाव, साचे नि व्यवहारांमधे बसवलेले (ते हि सगळ्या विसंगती नीट सोडवून) आणि तरिही व्यक्तीरेखांचे कुठेही चारित्र्यहनन झालेले नाहिये, त्या एकमेकांशी नि मुख्य म्हणजे कथानकाशी प्रामाणीक आहेत (म्रुत्युंजय आठवतेय ?), एव्हढे करूनही त्यांची भव्यता टिकून ठेवलेली आहे. अशा प्रकारचे amalgam मी तरी आधी वाचले नव्हते. युगांत मधे काहि भाग तसा आहे पण तेही विश्लेषण ह्या रुपामधे येते, कथानकाच्या स्वरुपामधे येत नाही. (पर्व चा problem म्हणशील तर एकच, मूळ महाभारत आधी वाचलेले हवे, पहिल्यांदाच महाभारत वाचू म्हणून पर्व वाचतील तर flashbacks चा overdose डोक्यावरून जाईल.)

दुध लाह्या बद्दल मला वाटते कि तर्कसंगत विश्ले षण आलेले आहे. एव्हढ्या मोठ्या स्तरावर युद्धाची तयारी केल्यावर नि त्यात युद्धामधे दारूण पराभव होतोय त्यात मागे राहिल्यांल्याना खाण्यापीण्याची ददात जाणवणे साहजिक आहे. वास्तवातल्या युद्धांनतंरही हेच तर होतेय (खास करून जीतांबाबत). पहा : पहिले, दुसरे महायुद्ध नि त्यानंतर झालेली Germany ची स्थिती.

आता व्यासपर्व आणि युगांतर एकाच वेळि वाचण्याचा संकल्प आहे. >> युगांतर कि युगांत ? Happy

'तिसरे महायुद्ध' हे पुस्तक मी काल वाचून संपवले.

'तिसरे महायुद्ध' हे पुस्तक मी काल वाचून संपवले.
=== म्हणजे अनिरुद्ध बापुंचे आहे ते हेच का?
मग पुस्तक परीक्षण कधी लिहीणार? Wink

कुणी नरेंद्र जाधवांचे 'आम्ही नि आमचा बाप' हे पुस्तक वाचले का? काल मी त्यांची प्रस्तावना वाचली ज्यात त्यांनी त्यांच्या पुस्तकाची प्रशंसा केली आहे. ते वाचून मला पुढे जावे की नये असे झाले आहे.

पुस्तकाचे नाव किंचीत चुकीचे लिहिले गेले आहे असे वाटते आहे. असल्यास क्षमस्व.

हो युगांत :).

असामि मला काहि हे पुस्तक (पर्व) क्लिक नाहि झाल पण तु इथे लिहलेले मुद्दे मात्र पटलेत.

मी वाचलय "आमचा बाप आणि आम्हि" खुप इन्स्पायरिंग आहे पण पुस्तकाचि एकंदर बांधणि मात्र बरिच विस्कळित वाटते. बर्याच गोष्टिंचि पुनरावृत्ति आहे. शिवाय जाधव बंधु आणि त्यांचा वहिनि यांच आत्मकथन वडिलांबद्दल कमि आणि स्वतःबद्दल जास्त आहे. पण श्री. जाधव (चरित्र नायक) यांच व्यक्तिमत्व मात्र खरोखरच जबर्दस्त आहे. सुसंस्कृत पणा आणि शिक्षण यांचा तसा काहि संबंध नसतो हे त्यांच्याबद्दल वाचल्यावर पटते.

सध्या मी 'द ब्रेड विनर' चा दुसरा भाग 'परवाना' वाचतेय. डोळ्यात पाणी येतं वाचताना. १२/१३ वर्षांची एक लहान मुलगी इतक्या हालअपेष्टा सहन करतेय हे पाहून पोटात कालवतं.. काही काही प्रसंगां नंतर तर पुढे वाचवत नाही. Sad

कोणी 'साद देती हिमशिखरे' वाचलय का? कस आहे?

काल गोफ वाचलं गौरी देशपांडेंच . सुलक्षण , वसुमती , मांजी ,जसपाल्,आदित्या ,आनंदा, विशेष म्हणजे भंते , कांती सगळ्यांचीच व्यक्तीरेखा जबर्दस्त आहे . एक स्वतंत्र विचारांची , स्वत्वाची जाणिव असलेली वसुमती खासच .
****************************
Happy Blush Proud Lol Biggrin Rofl

गौरी देशपांडेंची तीच तर खासियत आहे.

>> कोणी 'साद देती हिमशिखरे' वाचलय का? कस आहे?

उत्तम!

बी, अर्थात वाचायलाच हवं,जाधवांच 'आमचा बाप आणि आम्ही'.. आंबेडकर चळवळ समजून घ्यायची असेल तर हे पुस्तक नक्कीच मैलाचा दगड आहे, त्यातला जो शेवटचा भाग आहे ना, ज्यात आंबेडकरी चळवळ आणि जाधव भावंडाच्या उत्कर्षाची सांगड घातलेय ते तर खूपच छान.. आरक्षणाविषयी आंबेडकरांचा दृष्टीकोन अधिक सखोल समजण्यास सुद्धा तितकीच मदत झाली सगळं वाचताना.. आणि आता ह्या चळवळीची पुचाट आणि संधीसाधू नेतृत्त्वामुळे कशी वाट लागलेय तेही पटतं..

धन्यवाद उपास. नक्कीच पुर्ण करतो आता.

कुणी सांगेल का जी. ऐ. कुलकर्णी यांची 'काना' की 'कान्हा' ही कथा त्यांच्या कुठल्या पुस्तकात आहे? धन्यवाद.

Pages