मी वाचलेले पुस्तक

Submitted by admin on 17 July, 2008 - 15:56

इथे आपण नुकत्याच वाचलेल्या पुस्तकाबद्दल लिहा. शक्य असल्यास नवीन पुस्तकासाठी नवीन लेखनाचा धागा चालू करा.

भाग २ - धागा - http://www.maayboli.com/node/41038

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

स्टुडिओ मी पण वाचले पण एक गोष्ट जराशी खटकली..... त्यात त्यांच्या बायकोचा काहीच उल्लेख नाही, काही मैत्रिणींचा मात्र आहे. जरी त्यातली बरीच वर्णने स्वतःची कलावंत वृत्ती, त्यांना आलेले आयुष्याचे, लोकांचे इ. अनुभव, त्यांचे विचार, त्यांच्या आयुष्यातील व्यक्ती यावर आहेत. असे का?

मिनोती,

काईट रनर छानच आहे. तू त्याच लेखकाच "थाऊजंड स्प्लेंडीड सन" पण वाच तुला आवडेल.

Richard Bach चे illusions वाचले नुकतेच... मला तरी आवडले..

The Secret दिलेय एकाने वाचायला.. अजुन २-३ नच पाने वाचलीत, पण तेही पुस्तक खुप आवडेल असे वाटतेय.

हे पुस्तक आवडणे/ न आवडणे मला कधी कधी माझ्या मनस्थितीवरही अवलंबुन आहे असे वाटते. सध्या खुप निराशावादी विचार मनात येत होते त्यामुळे ही दोन पुस्तके वाचुन जरा बरे वाटायला लागले. चांगल्या मनस्थितीत असताना वाचली असती तर तेवढा प्रभाव पडला असता की नाही देव जाणे. कदाचित वाचुन म्हटले असते, हुं त्यात काय, मला तर हे आधी पासुनच माहित आहे. मागे एकदा the monk who sold ferrari वाचताना वाटले की ह्यात काय नवीन सांगितले आहे, हे तर भारतीय लोकांना आधीपासुनच माहित आहे.

----------------------------------------
Within each of us lies the power of our consent
to health and to sickness,
to riches and to poverty,
to freedon and to slavery.
It is we, who control these and not another.

Richard Bach चे illusions वाचले नुकतेच... मला तरी आवडले..

Richard Bach चे "जोनाथन लिव्हिंगस्टन सि गल" सुद्धा छान आहे. फार गाजलं होतं.
मला त्याची "वन", आणी " अ ब्रिज फोर पासिंग" पण आवड्लं.

मला त्यांची सर्वच पुस्तकं आवडतात.

ऍशबेबीला अनुमोदन.मला कधीकधी एखादे पुस्तक वाचण्याआधीच त्याबद्दल निगेटीव विचार येतात. 'monk who sold ferrari' या नावापासूनच माझा विरोध सुरु झाला,जर तुम्हाला मटेरिअलिस्टीक जगाचा त्यागच करायचा आहे तर फेरारी 'sold' कशाला,' gave up' म्हणाना.अत्यंत भंपक आणी मार्केटींग गिमिकने चालवलेले पुस्तक वाटले ते.
********************************
द मोअर यु राईट पर्सनल, द मोअर इट बिकम्स युनिवर्सल

मलाही जोनाथन लिव्हिंगस्टन सिगल वाचायचेय.. इथेच चौकशी करुन पुस्तकाची माहिती मिळाली.. पुस्तकवाल्याकडे आणायला गेले तर ते आधीच गेले होते, मग त्याने रिचर्डचे illusions दिले. तो चांगले आहे म्हणाला, म्हणुन वाचायला घेतले.. आवडले Happy आज बदलायला जाणार तेव्हा बघते सीगल किंवा इतर काही मिळते का ते...

आगाऊ, ही सेल्फहेल्फची बरीच पुस्तके अशीच असतात. मी चुकूनही वाटेला जात नाही त्यांच्या..
----------------------------------------
Within each of us lies the power of our consent
to health and to sickness,
to riches and to poverty,
to freedon and to slavery.
It is we, who control these and not another.

सध्या अनिल अवचटांचे "माणसं" वाचतीये. पहिला लेख वाचतानाच मन विषण्ण होऊन जातं..इतकं बारकाईने तळागाळातल्या अशा लोकांबद्दल त्यांनी लिहिलंय की त्यातले दररोज ५-१० जण तरी आपल्या आजूबाजूला वावरत असतील पण ते 'आहेत' याची साधी जाणीवही आपल्याला होत नाही. आपलं आयुष्य चालू रहाण्यासाठी या लोकांची जी काय ढोरमेहनत आहे.. त्यातून त्यांना मिळणारा तुटपुंजा मोबदला.. अन्नान्न दशा.. डोळ्यादेखत तडफडून होणारे मुलाबायकांचे मृत्यू.. तरीही जीव जगवण्याची अगतिकता.. मन सुन्न करून जाते. गरीबी..लाचारी.. हतबलता.. सगळ्याचा एक आकृतिबंध उभा राहतो डोळ्यासमोर... कारण काय आणि परिणाम काय हा विचार उरतच नाही.. आहे हे असं आहे! एक मोठा श्वास घेऊन दुसरे प्रकरण वाचायला घेतलंय.. सबंध पुस्तक वाचायला मनाचा जबरदस्त हिय्या करावा लागणार आहे.. Sad
----------------------
I'm sure..I'm not the Best, still I'm happy.. I'm not like the Rest..!! Happy

मी सध्या 'रावीपार' वाचतिये. जबरदस्त कथा आहेत.

वर्षा... गुलजार लिखित ना? कथा एकसे एक आहेत. मनाला भिडतात एकदम. मी वाचलंय.

हो, 'रावीपार' अप्रतिम आहे!

मी डॉ. अलका मांडके लिखित डॉ. नीतू मांडके यांच्यावर लिहिलेलं 'हृदयस्थ' वाचलं. इथे कोणीतरी लिहिलं होतं आधी की त्यांना नाही आवडलं ते पुस्तक, डॉ. मांडके अहंकारी वगैरे वाटले.. पण मला आवडलं ते पुस्तक.
डॉ. अलकांनी अगदी प्रांजळपणे डॉ. नीतूंबद्द्ल सगळंच लिहिलं आहे. त्यांचं व्यक्तिमत्त्व डोळ्यासमोर उभं राहतं. त्यांना स्वतःबद्दल प्रचंड आत्मविश्वास होता, अश्या लोकांचं बाकी सोशल वागणं जरा डोळ्याआड केलं तरी चालतं (असं मला वाटतं!). जिद्द, कष्ट आणि अर्थातच मूळ हुशारी हे त्यांचे प्रमुख गुण डॉ. अलकांनी खूप विस्ताराने लिहीले आहेतच, त्याच बरोबर स्वतःचं व्यक्तिमत्त्वही डॉ. नीतूंच्या कॉन्ट्रास्टमधे कसं होतं हेही प्रांजळपणे कबूल केलंय. स्वतःच्या वागण्याची, आयुष्याची कबूली अशी सगळ्यांसमोर देणं- फार धैर्याचं काम आहे!

------------------------------------------
हौले हौले हो जाता है प्यार... Happy

मी सध्या गौरी देशपांडेंचं 'निरगाठी आणि चंद्रिके गं सारीके गं' हे पुस्तक वाचायला घेतलंय. त्यात दोन लघुकथा आहेत. फारच सुंदर वाटतंय..... पूर्ण वाचून झाल्यावर इथे परत लिहिनच.

हो दक्षिणा, गुलजार यांचेच आहे 'रावीपार'.
पुनम, मलाही हृदयस्थ आवडले होते, वाचताना जाणवते की डॉ. अलकानी किती वेड्यासारखे प्रेम केले डॉ. मांडकेंवर. कितीतरी वेळा ते विचित्र वागत तरीसुद्धा. त्यांच्या रोकठोक बोलण्याचा अनुभव आम्हीसुद्धा घेतला आहे.

मी सध्या आशा मोरी च (Asha Mori) "Other Side from Moon" वाचतेय. दत्तक मुलीची (आत्म) कथा आहे. तिचा अतीत शोधण्याचा प्रवास आहे त्यात. सुरुवात तरी छान आहे. बाकी पुर्ण वाचून झाल की लिहीन

जीएंचे 'बिम्म ची बखर' वाचले. खुपच मजेदार गोष्टी आहेत.

लंपन मला आवडला होता त्या पेक्षा कितीतरी अधिक 'बिम्म' आवडला.

लंपन पेक्षा वयाने पण लहान आहे हा थोडा.

जीएंच्या शब्दात त्याचे भावविश्व वाचणे हा अतिशय सुंदर अनुभव आहे.

नारायण धारप यांचं 'संक्रमण' नुकतंच वाचलं. भय-कांदबरी वाचण्याची माझी पहीलीच वेळ. खिळवून ठेवते यात काही शंका नाही. पण मला बर्‍याच गोष्टी समजल्याच नाहीत. काही गोष्टी अपूर्ण राहून गेल्यात असंच वाटतं. कदाचित जाणकारांना (त्यांच्या नियमित वाचकांना) त्या समजत असतीलही... Sad

"माणसं" चे तिसरे प्रकरण सुरु करायची हिंमत खरंच नाही झाली. Sad
इथे कुणीतरी विचारलेले "कृष्णवेध" मिळाले लायब्ररीत. चांगले आहे. राधा, पेंद्या आणि कुब्जा हे लोकांच्या नजरेतून दुर्लक्षित असलेले किंवा ज्यांच्याबद्दल फार कमी माहिती असलेले कृष्णाचे सगेसोयरे. त्यांच्यासाठी कृष्ण काय होता , हे गोनीदांनी अतिशय सुरेख आणि नेमक्या शब्दात वर्णन केले आहे. राधे बद्दलचे सारे 'गैरसमज' गळून पडले. पेंद्याच्या गोष्टी खुसखुशीत. हसवणार्‍या. कुब्जेने मात्र डोळ्यातून पाणी काढलं. खरोखर असं कुरुप जिणं तेही त्या काळात, हे शापित आयुष्यच. संपवताही येत नाही पुढे रेटताही येत नाही. तिची दुर्बलता पाहून मनाची प्रचंड घालमेल होते. कर्णाच्या वेळी वाटलं अगदी तस्संच मनात आलं, "असं जिणं नको रे देऊस कुणाला देवा!" Sad
पण कुब्जेच्या कथेचा शेवट गुंडाळलाय असं वाटतं. अजून थोडा वर्णनात्मक, तपशीलात केला असता तर शेवटी लागलेली मनाची रुखरुख राहिली नसती.

----------------------
I'm sure..I'm not the Best, still I'm happy.. I'm not like the Rest..!! Happy

त्यागच करायचा आहे तर फेरारी 'sold' कशाला,' gave up' म्हणाना >> लोल. मलाही ते पुस्तक फार आवडले नाही. मित्र पाठिमागे लागला म्हणून वाचले.

अशात Essential writings of Mahatama Gandhi - Editor Raghavan Iyer Oxford Press वाचले. बापूंनी लिहीलेली काही पत्रे आहेत ती. धर्म, अहिंसा, आश्रम, सत्याचे प्रयोग, राजकारण , त्यांची काही भाषनं अशी विषयवार ह्या पत्रांची मांडनी आहे. गांधींबद्दल बोलनार्‍यांनी ( बाजूने वा विरोधात) अवश्य वाचावे असे आहे.

केदारभाउ,हे नक्कीच भाषांतरीत पुस्तक असणार,कोणी केलेय भाषांतर? आणी लोल म्हणजे काय?
दक्स,धारपांच्या काही कादंबर्‍या सिक्वेल स्वरुपात आहेत,पुन्हा त्यांचे काही मानसपुत्रही आहेत त्यामुळे नवींन वाचकाला थोडं कनफ्यूज होउ शकतं.
********************************
द मोअर यु राईट पर्सनल, द मोअर इट बिकम्स युनिवर्सल

आगाऊ,
ते केदारने लिहीलेले लोल LOL- Laugh out loud, Laughing out loud, or Laughed out loud असे आहे Happy

आगाऊ, Raghavan Iyer ह्यांनी भाषांतरीत केले आहे. बरीच पत्रे गुजराथी आहेत व काही इंग्लीश. जी इंग्लीश आहेत, ती जशीच्या तशी, गुजराथी मात्र इंग्लीशमध्ये अनुवादीत आहेत.

त्या तुझ्या वाक्यावर हसु आले कारण ते भिडले. म्हणून लोल लिहीले.

हे पुस्तक पण तू वाच India After Gandhi: Ramachandra Guha. १९४६ ते राजिव गांधी पर्यंतचा धावता इतिहास आहे. खोलात जाउन वाचन्यासाठी परत इतर पुस्तकं वाचावी लागतील.

रणजित देसाईंची "स्वामी" वाचतो आहे.

मला सांगु शकेल काय -

स्वामी ची शेवटची आव्रुत्ती कोणती ?

-------------------------------
राहुल
rahul_shinde100@live.com
-------------------------------

"India After Gandhi: Ramachandra Guha"
सुंदर पुस्तक आहे, स्वातंत्र्यानंतरच्या पन्नास वर्षाचा आढावा, बरेचसे समज, गैरसमज दूर होतात.
प्रत्येकाने वाचावं असं पुस्तक आहे.

aashu_D, मी "कृष्णवेध" विषयी विचारले होते. तुम्हाला ते कुठल्या library मधे मिळाले?

डॅन ब्राउन चं एंजल्स आणि डेमन्स वाचलं. मजा आली. पण पाउलो कोएल्हो ची दोन पुस्तकं कंटाळवाणी झाली. कशीबशी संपवली. तेच तेच सारखं लिहीलय असं वाटत राहीलं. कदाचित माझी ते समजण्याईतकी मॅचुरिटी नसावी. सुधा मुर्तींच्या वाइज अदरवाइजचा अनुवाद वाचला. त्यांचे अनुभव म्हणुन वाचतांना ओके वाटलं पण नाही आवडलं फारसं. काइट रनर मिळण्याची शक्यता आहे. सगळ्यांनी आवडल्याचं म्हंटलय त्यामुळे खुप उत्सुकता लागलीय.

दीपाकुल, मला ते कसबा पेठेतल्या "त्वष्टा कांसार समाज" वाचनालायात मिळाले.
----------------------
सुख है अलग और चैन अलग है.. चैन अपना और सुख है पराए
ये जो देखे वो नैना अलग है

कुणी राजमोहन गांधींचे गांधींवरील पुस्तक वाचले आहे काय? पुस्तक एव्हडे जाडजुड आहे की हातात घ्यावे का नाही असा प्रश्ण पडतोय. लेखकाची काय गॅरन्टी नाय ना!

आशु...

माझ्या एका मित्रानी पण ती लायब्ररी लावली होती...
नवी-जुनी खूप पुस्तकं आहेत तिकडे... आणि स्वस्त पण आहे....
_______
एकदम झकास !

गांधीजींवरचे सारंग दर्शने अनुवादित ' मीरा आणि महात्मा' हे अतिशय सुंदर पुस्तक नुकतेच वाचून काढले. चोखंदळ वाचकांसाठी तर ही एक पर्वणीच आहे.गांधीजी आणि त्यांच्या ब्रिटिश शिष्या मॅडलीन स्लेड यांच्यातील भावनिक संबंधांची गुंफण लेखकाने फार सुंदर रितीने मांडली आहे. या महापुरुषांच्या आयुष्यातील फार महत्वाचा पण सुदैवाने फार कमी चर्चिल्या गेलेल्या या हळुवार विषयाला हात घालणे ही सोपी गोष्ट नसावी. सारंग दर्शंनेंनी अतिशय सुंदर शब्दांत ते मांडताना त्यास कुठेही कमी न लेखता दूरस्थपणे त्यातील हिंदोळे चित्रित करण्यात यश मिळवले आहे.जरूर वाचावे असे हे पुस्तक आहे.

काईट रनरऐवजी अलकेमिस्ट मिळाल. Sad पण एकदा पुस्तक हातात घेतल की मी काहीही झालं तरी संपवतेच. त्यानुसार संपवल. मला असं वाटायला लागलय की हा माणूस (पाउलो कोएल्हो) मागल्या जन्मी अद्वैत मानणारा असावा. कारण तिन्ही पु्स्तकांत विश्वाचा आत्मा, मेडिटेशन, पंचमहाभूत वगैरे सारखं(सारखं तेच तेच) येत रहातं. वर कुणीतरी म्हटलय तस हा गोष्ट एकदाची संपवत का नाही अस शेवटी वाटत.
डेव्हिड बाल्डाच्ची ची लास्ट मॅन स्टँडींग, कॅमल क्लब आवडली

Pages