मी वाचलेले पुस्तक

Submitted by admin on 17 July, 2008 - 15:56

इथे आपण नुकत्याच वाचलेल्या पुस्तकाबद्दल लिहा. शक्य असल्यास नवीन पुस्तकासाठी नवीन लेखनाचा धागा चालू करा.

भाग २ - धागा - http://www.maayboli.com/node/41038

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

इथं कोणी जयंत नारळीकरांच्या विज्ञान-कादंबर्‍या वाचल्यात का? >>> शाळेत असताना खूपदा वाचल्या आहेत Happy तेव्हा खूप आवडल्या होत्या म्हणुन संग्रही पण आहेत.

मलिका अमर शेख यांच 'मला उध्वस्त व्हायचय' वाचल.
रोखठोक आणि मनापासून विधानं.
वाचण एक छान अनुभव.
अपेक्षांच भंग म्हणजे साफ चक्काचूर झाल्यनी धारधार म्हणाव लागेल लिखाण.

******************************************
आई नावाची वाटे देवालाही नवलाई
विठ्ठ्लही पंढरीचा म्हण्तो स्वतःला विठाई.

हाय सुप्रिया.
ओळी कशातल्या आठ्वत नाही. शाळेपासून आवड्लेलं सगळ लिहीण्यासाठी बनवलेल्या वहीत टिपलेल्या आहेत.

******************************************
आई नावाची वाटे देवालाही नवलाई
विठ्ठ्लही पंढरीचा म्हण्तो स्वतःला विठाई.

काल मी अनंत सामंतांचं 'मितवा' संपवलं. कथा तशी साधारणच आहे, म्हणजे एक प्रेमकथा. त्यांच्या नेहमिच्या लेखनपद्धतीपेक्षा थोडी वेगळी. (म्हणजे मी त्यांची जी पुस्तकं वाचली आहेत त्यावरून म्हणतेय.) या पुस्तकात जे निसर्ग वर्णन केलं आहे ते अप्रतिम आहे. चित्रं अगदी डोळ्यासमोर उभं राहतं. त्या वर्णनानेच केवळ मला वेड लागलं. पुस्तक वाचताना अक्षरशः असं वाटतं की आपलं ही एक छोटंसं घर असावं जंगलात. मोजकी पात्रं, सोपी भाषा. यातल्या नायकाकडे एक कुत्री (इथे कुत्री असा उल्लेख करताना वेगळं वाटतंय) असते, तिचं नाव सावरी असतं.

नुकती खूप जड पुस्तकं वाचली असतील आणि काही हलकंफुलकं वाचायचं असेल तर हे पुस्तक जरूर वाचा. नक्की रिफ्रेश व्हाल. कथा फिल्मी असली तरि यातल्या निसर्गवर्णनाने तरी नविन तजेला नक्कीच मिळेल. Happy

मला वाटतं ही आधी कोणत्या तरी दिवाळी अंकात प्रसिध्द झालीये. सावरी नाव, जंगलातलं घर थोडंथोडं आठवतंय..

दक्शीणा तू म्हंटलेलं निसर्ग वर्णनानी वेड लागलं ,चित्रं अगदी डोळ्यासमोर उभं राहतं वाचून मला श्रीं.नां.च्या 'पडघवलीची' आठ्वण झाली.

मी काल 'धुमसते बर्फ' आणलय लायब्ररीतून काश्मीर प्रश्नावर आहे.

******************************************
आई नावाची वाटे देवालाही नवलाई
विठ्ठ्लही पंढरीचा म्हण्तो स्वतःला विठाई.

मधुरा, 'पडघवली' गोनींची आहे नं?

पडघवलीची साधारण कथा काय आहे गं? मी ही जमलं आणि मिळालं तर आणेन लायब्ररीतून Happy

होकी सॉरी चूकल माझ 'पडघवली' गोनींची.
कोकणातल्या नारळी पोफळीच्या बागा असणार्‍रा घरी लहान मूलगीच म्हणावी अश्या वयात 'ती' लग्न लागून येते आणि तीथल तीचं पुढल आयुष्य कस जात वगैरे आहे. शेवट वेड लावतो. मला पडघवली वाचून ६/७ वर्ष झालीयत म्हणून असं मोघमच सांगू शकतेय.

******************************************
आई नावाची वाटे देवालाही नवलाई
विठ्ठ्लही पंढरीचा म्हण्तो स्वतःला विठाई.

दक्षिणा, ह्या 'पडघवली' वर आधारीत खुप पूर्वी दूरदर्शनवर 'कुछ खोया कुछ पाया' नावाची सिरियल होती, बघ आठवतेय का.......

इतकं ही बास झालं गं. आणेन मी. उद्याच जाणार आहे ग्रंथालयात. Happy

नाही गं मंजू नाही आठवत... (वय झालं आता :फिदी:) पण कोण होतं ग त्यात?

आजच तुमच्या ग्रप मध्ये सामिल झालोय
बघा एटजस्ट होतोय का
नसल होत तर सा॑गा तस.

गणु ९३८३.

जल्लां माझं पण वय झालं आता.... Proud कोण होतं ते नाही आठवत आता, कारण मी खुपच लहान होते तेव्हा..... म्हणजे पाचवीत वगैरे असेन... पण एकच शॉट आठवतोय त्यातला की मस्त हिरव्यागार पोफळीच्या बागा, त्यात सगळ्या बायका फोफळं सोलताहेत, आणि नऊवारीचा बोंगा आणि नाकातली नथ न सावरता येणारी ती बालवधू... ती विळीवर बसते काहीतरी चिरायला आणि हात सणसणीत कापतो तिचा....

अजून काही विचारु नकोस हां.... एवढंच आठवतंय... आता जाणकार लोक प्रकाश टाकतीलच ह्यावर..

सॉरी. चुकलो. 'कुछ खोया कुछ पाया' - पडघवली. यात रोहिणी हट्टंगडी होत्या.
रथचक्र या मलिकेत लालन सारंग होत्या.

मंजू... खरंच वय झालं Proud
आता 'पडघवली' वाचू की 'रथचक्र'? चला दोन्ही वाचते.

चिन्मय - 'रथचक्र' च्या लेखकाचे नाव सांगू शकशील का प्लिज?

Uhoh हम्म्......

चिनूक्स, धन्यवाद. Happy

दक्षिणा, मी म्हटलं ना जाणकार प्रकाश टाकतील म्हणून.... हा चिनूक्सच होता तेव्हा डोळ्यासमोर.... चल, तुला अजुन एक पुस्तक मिळालं लायब्ररीत क्लेम लावून ठेवायला.... Happy

'रथचक्र'चे लेखक श्री. ना. पेंडसे.

रथचक्र- तो, ती, धाकटा, थोरला, कृश्णाबाई.. Happy

सॉरी. चुकलो. 'कुछ खोया कुछ पाया' - पडघवली.

येस्स....... अभी तो मैं जवान हूँ, अभी तो मैं जवान हूँ Proud

चिनूक्स, जळलं मेलं लक्षण तुझं.. माझा आ.वि. डळमळवलास..... Happy

टण्या, ते 'कृष्णाबाई' लिही जरा १०० वेळा Uhoh

मंजू परत चूक...
>>>चुकलो>>> काय?

मंजू, गप्पे! कुछ खोया कुछ पाया लागायची तेव्हा मीच सहावी सातवीत होते आणि तू पाचवीत????????? Proud

श्रद्धा,

हो, मी पाचवीतच होते.....

तुझं सुद्धा ज. मे. ल. ......... Wink

कुछ खोया कुछ पायामध्ये विक्रम गोखलेही होते का? म्हणजे माझ्या आठवणीप्रमाणे तरी होते. त्या दीराच्या भूमीकेत जो नंतर भगवी वस्त्र धारण करतो.
रथचक्र पण सुंदर अनुभव देतं.

******************************************
आई नावाची वाटे देवालाही नवलाई
विठ्ठ्लही पंढरीचा म्हण्तो स्वतःला विठाई.

मी २ दिवसांपूर्वी वि.स. खांडेकरांच अम्रुतवेल वाचलं.
तसं मी वाचन हे सध्याच सुरु केल्यामुळे मला जास्त काही लिहिता येणार नाही. आणि सुरुवातिलाच एवढी अवघड भाषा. पण मानवाच्या आयुष्यात किती दु:ख असतात आणि यातना असतात, त्यांच्याशी सामना करतान्ना काय काय विचार येतात आणि त्यातुन मार्ग काढुन माणुस कसा जगत असतो हे सांगायचा प्रयत्न आवडला. काहि पानं वाचायला मला बराच वेळ लागला कारण समजायलाच जरा जड जात होतं.
अर्थात ईथल्या बर्‍याच जणान्नी हे पुस्तक वाचलं असेल.

समीर,

नविन वाचक असशील तर, अगदी सुरूवातीलाच जड पुस्तकं वाचू नकोस. Happy

मी नुकताच सभासद झालोय.
मी मोनिका गजेद्र्गडकरच 'भूप' पुस्तक वाचले. मला ते खुप आवडले. मनोव्यपाराचं अतीशय सुंदर चित्रण त्यात आहे.

मराठ्यांचा इतिहास (शिवाजी महाराजांच्या पश्चात) वाचायची माझी इच्छा आहे... कुणीतरी चांगली पुस्तकं सुचवा ना....

केदार नक्की सुचवू शकेल चांगली ऐतिहासिक पुस्तक, त्याने मधे एक लिस्ट पण दिली होती..
बरं मधुरा, धुमसते बर्फ म्हणजे जगमोहन यांचं ना ग? कॉलेजच्या दिवसात केव्हातरी वाचलं होतं... काश्मिर प्रश्नावर छान उहापोह आहे तसेच कित्येक तात्कालिक गोष्टी ज्या एरवी कळण कठीणच.. आवडलं होतं..

हो धुमसते बर्फ जगमोहनांचच.
पण १०० पान वाचुन अचानक ते वाचू नयेस वाटायला लागलय मला. अनुवाद जमुन आलाय अस वाटत नाही शिवाय काही ठिकाणी त्यातील लीखाण बनाव असल्यासारख वाट्तं. खरी परिस्थीती कधीच उघड होणार नाहीस वाट्त.
खूप उत्साहाने घेतलेलं अर्धच सोड्तेय त्याच वाईटही वाटतय.

******************************************
आई नावाची वाटे देवालाही नवलाई
विठ्ठ्लही पंढरीचा म्हण्तो स्वतःला विठाई.

Pages