मी वाचलेले पुस्तक

Submitted by admin on 17 July, 2008 - 15:56

इथे आपण नुकत्याच वाचलेल्या पुस्तकाबद्दल लिहा. शक्य असल्यास नवीन पुस्तकासाठी नवीन लेखनाचा धागा चालू करा.

भाग २ - धागा - http://www.maayboli.com/node/41038

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

द ब्रेड विनर वाचलय का कोणी?त्याच्या लेखिकेच नाव मात्र आठवत नाहिये...

इथे पहा.

~सिंड्रेला~
~~ है तुझे भी इजाजत, पाड ले तु भी एक कविता !!! ~~

वीकांतामध्ये 'मी उत्सुकतेने झोपलो' हे श्याम मनोहर ह्यांचे पुस्तक वाचले. मला जाम आवडले. भारतीय कुटुंबसंस्थेवरचे एव्हडे खुसखुशीत आणि मार्मिक भाष्य फारच कमी वेळा वाचायला मिळते. आणखी एक विशेष उल्लेखाचे गोष्ट म्हणजे संपूर्ण पुस्तकात एकही उपमा (सिमिली) वालं वाक्य नाहिये. सलग दिसेल तसे, सुचेल तसे लिहिलेले पुस्तक आहे. वेगळीच शैली आहे.

काईट रनर मराठी अनुवाद वाचला. वैजयंती पेंडसे यांनी केलेला. पुस्तक छानच. पण अनुवाद म्हणावा तितका नाही जमला. अनुवाद आणि भाषांतर यात फरक आहे.पुलं म्हणतात तसं, अनुवाद वाचतानाही आपल्या भाषेतलीच मूळ कथा वाचतोय इतके अचूक शब्द आले पाहिजेत. अर्थ पोचला पाहिजे भाषांतर नाही. तसं वाटलं नाही. उदा. It was a gray morning. याचा लेखिकेने शब्दशः भाषांतर केलंय "ती राखाडी सकाळ होती." मराठी मध्ये मी पहिल्यांदा असलं वाक्य वाचलंय. Proud (त्यावरुन मी मूळ इंग्रजी वाक्य काय असेल याचा अंदाज बांधला.) त्याऐवजी "ती उदास सकाळ होती." असं जास्त योग्य नसतं का वाटलं? Sad असो. पण पुस्तक नक्कीच एकदा तरी वाचावे असे.
आता मायकेल क्रायटनच्या "प्रे" चा डॉ. प्रमोद जोगळेकरांनी केलेला अनुवाद वाचतीये. अप्रतिम अनुवाद असतात यांचे. Happy

----------------------
एवढंच ना!

परदेशात रहाणार्‍या भारतीय लोकान्च्या बद्दल लिहिलेली पुस्तके सुचवाल का?इन्गजी व मराठी दोन्ही भाषात?

इथे सापडतील काही.

आताच द ब्रेडविनर चा अपर्णा वेलणकरांनी केलेला अनुवाद वाचला.मुळ लेखिका डेबोरा एलिस यांना पाकिस्तानातिल निर्वासित अफगाण्यांच्या छावण्यात भेटलेल्या एका कुटुंबाची ही कथा..तिथला तालिबान्यांचा हिंसाचार्,क्रुरपणा;स्त्रियांवर होणारा अत्याचार वाचुन अंगावर काटाच येतो!पुस्तकाचा शेवट पुढचा भाग वाचायची उत्सुकता लावुन जातो..बाकी अनुवाद उत्तम..

मीपण वाचलाय "ब्रेड विनर"चा अनुवाद. एका लहान मुलीच्या नजरेतुन लिहिलेले वाचताना खुप अस्वस्थ व्हायला होते. निकीता, याचा पुढचा भाग आहे का? असेल तर त्याचे नाव काय?
पण याच्यापेक्षा मला "नॉट विदाउट माय डॉटर" जास्त आवडले होते. दोन्ही पुस्तके माझ्याच्याने परत वाचवणार नाहीत. Sad

कालच 'माणसं' वाचलं.. भयानक वास्तव...हमालांचं वाचुन अंगावर काटा आला.. माणसं की जनावरं असे लेखकाने लिहिलेय ते खरेच आहे... जनावरांच्याही खालच्या पातळीचं जिणं आहे.. आणि हे लिहिलेय बहुतेक १९७८-८० मध्ये.. परिस्थिती आता थोडीफार सुधारली असेल अशी आशा करते. संघटनेमुळे तेव्हाच जरा जरा फरक पडत होता...

साधना
----------------------------------------
Within each of us lies the power of our consent
to health and to sickness,
to riches and to poverty,
to freedon and to slavery.
It is we, who control these and not another.

'द ब्रेडविनर', 'परवाना' आणि 'शौझिया' असे एकूण तीन भाग आहेत. तिनही हुरहुर लावून जातात; विशेषकरून ब्रेडविनर....

ब्रेडविनरचा पुढचा भाग परवाना आहे..तिचा पुढचा पा़किस्तानातला प्रवास...आणि वर्षा खरच नॉट विदाऊट ह्यापेक्षा जास्त चटका लावून जात....

माणसं - लेखक कोण आहे?

अवचटांचं आहे. कदाचित मिनोतीकडे असेल. नसलं तर माझ्याकडे आहे, मी पाठवीन पाहिजे तर...

आहे आहे माझ्याकडे आहे. देइन रे तुला.

----------------------------------------------------------------
~मिनोती.

हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा.

खरच खुप छान आहे "माणसं". अगदी विचार करायला लावणार..

इथे कोणी बोर्डरूम वाचलय का अच्युत गोडबोलेंच?? मला वाचायचय..

To the world you may be the one person, but for one you are the world !!!

मायबोलीवरचे लिखाण वाचल्यामुळे कोनी पुस्तके वाचत नाही का आजकाल?

मी आताच चौघीजणी वाचलं..लिटिल वुमेन चा शांता शेळके यांनी केलेला अनुवाद. अप्रतिम पुस्तक, अनुवाद!! नॉस्टॅल्जिक होतो आपोआप... संग्रही ठेवावे असे पुस्तक, भेट म्हणून द्यायला सुंदरच! (शक्यतो मुलींना! Happy )
----------------------
इतनी शक्ती हमे दे ना दाता मन का विश्वास कमजोर हो ना..

मागच्या आठवड्यात ३ पुस्तकं वाचली
शंकर पाटलांचं 'खुळ्याची चावडी', सानिया चं खिडक्या
आणि आरेबा परेबा... याचे लेखक नाही आठवत.... अरेबा परेबा नाही आवडलं अज्जिबात...
खुळ्याची चावडी मध्ये सर्व ग्रामिण कथा आहेत, पुस्तक खूप छान आहे...
सानियाचं खिडक्या (कथासंग्रह) विशेष आवडलं प्रत्येक गोष्टीत मानवी नातेसंबंधाचा शोध घेण्याचा प्रयत्न दिस्तो. वर्थ वन टाईम रिड Happy

दक्षिणा, सोनिया की सानिया?

आपल्या इथे कोणी जी. ए॑. चे 'माणस॑ :अरभाट आणि चिल्लर' वाचल॑य की नाही? काय ग्रेट पुस्तक आहे. खर॑ तर ही द्विरुक्ती झाली. जी.ए॑. ची पुस्तक॑ ग्रेट असतातच.काजळमाया, पि॑गळावेळ पासुन बखर बिम्मची आणि मुग्धाची र॑गीत गोष्ट पर्य॑त!
आणि erich von daniken या॑च्या chariot of gods चे अनुवाद [कि॑वा रुपा॑तर॑] वाचली आहेत, 'पृथ्वीवर माणूस उपराच' आणि 'देव? छे, परग्रहावरील अ॑तराळवीर' ?

मी भैरप्पांचे वंशवेल आणले आहे. सध्या सासुबाई वाचत आहेत, त्यांना आवडले आहे पुस्तक. बघु त्यांचे झाले की वाचीन.

टण्या, सानिया... सानिया.. सॉरी... बरं का!
वर्षा वंशवेल केव्हढं मोठं पुस्तक आहे बाप रे!

'पृथ्वीवर माणूस उपराच' चागलं वाटलं, शाळेत असताना वाचलं होतं, फारच प्रभावशील आहे. एकदम पटतच की आपले देव म्हणजे फार पुर्वी पृथ्विवर आलेले, फार फार प्रगत परग्रहावासी होते!!

नुसतं सॉरी म्हणून काय होतं ? दुरुस्त करा की ते Happy

कृष्णवेध वाचल गोंनींच्...खरच खुप छान आहे...आता छावा वाचतेय दुसर्‍यांदा...

To the world you may be the one person, but for one you are the world !!!

बखर बिम्मची पुस्तक विकत मिळत का अजून?

माहीत नाही, माझ्याकडची प्रत १९९५ मध्ये घेतलेली आहे, परचुरे प्रकाशन मंदिरने प्रकशित केले आहे.

'बखर बिम्मची' हे पुस्तक बाजारात उपलब्ध आहे. बहुतेक गेल्या वर्षीच नवीन आवृत्ती निघाली आहे. पुण्यात पाथफाईंडर व रसिक साहित्य या ठिकाणी मी हे पुस्तक पाहिलं आहे.

***
दिखला दे ठेंगा इन सबको जो उडना ना जाने...

बखर बिम्मची माबोच्या खरेदी विभागात उपलब्ध होते काही महिन्यांपुर्वीपर्यंत.. तिथे अजुन आहे का बघ एकदा..

Pages