मी वाचलेले पुस्तक

Submitted by admin on 17 July, 2008 - 15:56

इथे आपण नुकत्याच वाचलेल्या पुस्तकाबद्दल लिहा. शक्य असल्यास नवीन पुस्तकासाठी नवीन लेखनाचा धागा चालू करा.

भाग २ - धागा - http://www.maayboli.com/node/41038

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

(जरा उशीराच) प्रभाकर पेंढारकरांचं रारंग ढांग वाचलं !! खूप आवडलं.. का कोण जाणे नावावरून मला इतके दिवस वाचावसं वाटलच नाही...
काल संध्याकाळी वाचायला घेतलं ते रात्री ते पूर्ण केल्यावारच खाली ठेवलं.. !
अशी भरपूर "डोमेन नॉलेज" असलेली पुस्तकं वाचायला खूप भारी वाटतं... आणि ह्यात तर हिमालयाचं सुंदर वर्णन पण आहे.. आणि मुख्य म्हणजे इतकं सुमारे २० वर्षापूर्वीच असलं तरी हे पुस्तक जूनं वाटत नाही... आजही सगळ्या गोष्टी रिलेट होऊ शकतात..

जून्या हितगुजावरची ह्या पुस्तकावरची चर्चा इथे मिळेल...
http://www.maayboli.com/hitguj/messages/103385/123266.html?1201251564

लेखकाची backgroud तसच इतर पुस्तकं ह्याबद्द्ल कोणी सांगू शकेल का?

प्रभाकर पेंढारकर बहुतेक दूरदर्शनमध्ये होते (डॉक्युमेंटरी वगैरे बनवण्याच्या कामाच्या संदर्भात.. चू.भू.दे.घे.).. त्यांचे आंध्रातील कृष्णा-गोदावरीच्या महापूरावर व त्यानंतरच्या भीषण परिस्थितीवर देखील एक पुस्तक ३-४ वर्षांपूर्वी आले होते (त्सुनामी नंतर)

-------------------------
उत्तम व्येव्हारे जोडोनिया धन
उदास विचारे 'सेव्ह' करी

त्यांचे आंध्रातील कृष्णा-गोदावरीच्या महापूरावर व त्यानंतरच्या भीषण परिस्थितीवर देखील एक पुस्तक ३-४ वर्षांपूर्वी आले होते (त्सुनामी नंतर) >> चक्रीवादळ नाव त्या पुस्तकाचे. आहे माझ्याकडे पण वाचले नाही अजुन..

नमस्कार मंडळी,
मा. बो. वरच्या ह्या कोपर्‍यावर मी पहिल्यांदाच. Happy

ना. स. इनामदारांची 'झुंज ' कोणी वाचली आहे का? १९६२-६६ च्या दरम्यान प्रसिद्ध झालेली ही ऐतिहासिक कादंबरी. कालखंड मराठेशाहीच्या अंत जिथे सुरु झाला तो. आणि नायक म्हणाल तर फक्त इतिहास संशोधकांच माहित असेल (अस मला वाटतं) असा - यशवंतराव होळकर - इतिहासातील अनेक बदनाम नायकांपैकी.(ग्रांट डफ ची पुण्याई)

'झुंज'ची पार्श्वभुमी विशद करताना इनामदार सुरुवातीलाच सांगतात, की त्या काळी पुण्यात सकाळच्या वेळी ज्या कुणांची नावे घेत नसत त्यामधले हे एक नाव.
सुरुवातीपासुनच कादंबरी खिळवून ठेवते.(कदाचित इतिहासातील या घटना आपल्याला माहीत नाहीत म्हणुन असावे!) घरदार गमावलेला यशवंतराव फाटक्या कपड्यांनीशी जेजुरीला आश्रयास येतो तिथुन ते इंदूर ला मोडकळीस आलेले संस्थान पुन्हा उभे करुन इंग्रजांना पराभुत करे पर्यंत त्याची प्रत्येक कृती अचंबित करते.

ना. सं. बद्दल काय बोलावे? कादंबरी नव्हे, कलाकृतीच आहे ही. प्रत्येक घटनेला पुराव्याचा आणि तर्काचा आधार आहे त्यामुळे ऐतिहासिक मुल्य ही वाढले आहे.

बाकी अजुन जास्त (?) काही सांगत बसत नाही. एकदा अवश्य वाचून बघा.

मी वाचली आहे झुंज. बरीच वर्षे झाली वाचुन. यशवंतराव होळकरांविषयी फार वाईट वाटते वाचताना. वाचली पाहिजे परत एकदा.

मी पण वाचलिय झुंज. खरच एक कलाकृति आहे. फार वर्षांपुर्वि वाचलेलि (लहानपणि) त्यामुळे पुराव्यांवर आधारित आहे हे माहित नव्हते. शिंदे होळकरांमधल राजकारण, पडत्या काळातिल पेशवाइ यांच अप्रतिम चित्रण आहे. नक्कि वाचा.

मीही झुंज वाचलीए.. खूपच लहानपणी. आता काही आठवतही नाही.. त्याच्यापाठोपाठ 'झेप' ही वाचली होती.. त्याचही कथा आठवत नाही. कोणी वाचली आहे का?

नुकतीच रिबेका वाचली. सुंदर आहे. आणि आजच माधुरी शानभाग यांचा कथासंग्रह 'चकवा' वाचला. सुंदर गोष्टी.

हमोंच पोहरा वाचतेय.
****************************************
तो योग, खरा हठयोग, प्रीतीचा रोग लागला ज्याला|
लागते मरावे त्याला|

<<<जुन्या हितजुजवर बर्‍याच वेळेला थांग आणि दुस्तर हा घाट वर चर्चा रंगली होती<<<
कोणी लिंक देऊ शकेल का?

इथे कोणि जेम्स हॅडलि चेस फॅन नाहित का?
चेस म्हणजे उत्तम टी.पी. इंग्रजितला बाबा कदम म्हणा ना. उत्क्रुष्ट व्यक्तिचित्रण आणि खाण्यापीण्याचि वर्णनं. सर्वात महत्वाचे म्हणजे it is not detective story or 'hudunit' .we know it from the start . आणि शेवटी नेहमी चांगल्याचा वाईटावर विजय. चेसच्या जुन्या प्रकाशकाने त्याच्या पुस्तकावर उगीच बायकांचे फोटो टाकुन त्यांच्याबद्दल गैरसमज पसरवला. मुळात ही पुस्तकं अगदी शोभणार नाहित इतकी सोज्वळ आहेत.
********************************************
द मोअर यु राईट पर्सनल, द मोअर इट बिकम्स युनिवर्सल

नुकतेच John Boyne यांचे The Boy in the Striped Pajamas हे पुस्तक वाचुन संपवले. त्याबद्दल इथे लिहीलय http://www.maayboli.com/node/4202

आजंच संजय जोशी लिखित 'नचिकेताचे उपाख्यान' वाचून संपवलं. सुरवातीपासूनच पुस्तक खूप पकड घेतं. कॉर्पोरेट कल्चर, पॉलिटिक्स, स्वतःचं कंपनीतलं स्थान निर्माण करण्यासाठी जीवाच्या आकांताने खेळल्या जाणार्‍या खेळी आपल्याला शेवटपर्यंत पुस्तक खाली ठेऊ देत नाहीत. न पटावं असं या पुस्तकात काही नाही पण आणि आहे पण. या पुस्तकाच्या नायकाचं म्हणजे नचिकेतंचं इतकं चांगलं असणं खटकतं. शिवाय पुस्तकाचा शेवटही एकदम अनपेक्षित आहे. मध्येच संपवल्यासारखं वाटतं.

एकदा जरूर वाचावं असं आहे. Happy

~~~~~~~~~
दक्षिणा...... Happy
~~~~~~~~~

साद देती हिमशिखरे वाचून झालं नुकतच, त्यावर इथे चर्चा झाली होती ना पूर्वी?
त्याच अनुषंगानं जाणारं दिव्यस्पर्श आहे हातात आता, सुरु करेन.

लेखकाची backgroud तसच इतर पुस्तकं ह्याबद्द्ल कोणी सांगू शकेल का?


प्रभाकर पेन्ढारकरांची मूळ ओळख म्हनजे ते भालजी पेन्ढारकरांचे चिरंजीव. ते फिल्म डिव्हिजन या शासकीय डोक्युमेन्तरी निर्मिती विभागात सेवेत होते. त्याशिवाय त्यांचे वैयक्तिक कार्यही चित्रपट क्षेत्रात आणि साहित्यातही आहे. त्यानी बाल शिवाजी नावाचा एक चित्रपट दिग्दर्शित केला होता.त्या.च्या बर्‍याच बाल चित्रपटाना राष्ट्रीय स्तरावरची पारितोषिके मिळाली आहेत. ते आता निवृत्त आहेत . त्यानी स्फुट लिखाणही बरेच केले आहे. ते बहुदा चित्रपट निर्मीतीबद्दलच आहे....मौजच्या २००८ च्या दिवाळी अंकात तेन्डुलकरानी एका न लिहिलेल्या पटकथेवर पेन्ढारकरानी एक लेख लिहिला आहे. (तेन्डुलकर म्हनजे पांढर्‍या दाढीवाले, ब्याटीवाले नव्हेत.)

---------हितगुज दॅट इ़ज....
पंडितसे मिले पंडित, हो जाय दो दो बातें..
गधेसे मिले गधा, हो जाय दो दो लातें.....

"इथे कोणि जेम्स हॅडलि चेस फॅन नाहित का?"
कोलेज मध्ये असताना चेस खुप वाचला, अगदी आठ्वड्याला तीन पुस्तकं. त्या काळात, अलीस्टर मॅकलीन, पेरी मेसन खुप वाचले. भरपुर मनोरंजन, वेळ घालवायला सलग वाचावी अशी पुस्तकं. बरं झालं आठवण करुन दिली, परत वाचुन पहायला पाहीजेत.

"कुणी नरेंद्र जाधवांचे 'आम्ही नि आमचा बाप' हे पुस्तक वाचले का?"
चांगलं आहे पुस्तक पण पुढे तोचतोच पणा आणी थोडं प्रचारकी होतय. पण प्रत्येकान वाचावच असं पुस्तक आहे. प्रतिकुल परीस्थितीत रडत न बसता, माणुस काय करु शकतो हे, हे पुस्तक शिकवत.

'रारंग ढांग' .. मी पण एवढ्यातच वाचले. पुस्तक आणुन २ वर्षे झाली, पण असेच रहात होते वाचायचे.
खुपच छान आहे. प्रसंग अगदी डोळ्यासमोर उभे रहातात. एका बैठकीत संपवण्या सारखेच आहे.

"डोमेन नॉलेज" >> १००% सहमत.

'आकाशाशी जडले नाते' या विद्याताई माडगूळकरांच्या पुस्तकात त्यांचे आत्मचरित्र आहे. केंद्रस्थानी अर्थातच गदिमा आहेत. सरळ आणि साध्या भाषेत गप्पा मारल्यासारखं त्यांचे आणि गदिमांचे सहजीवन उलगडले आहे. बघता बघता संपून जाते. गदिमांच्या चाहत्यांना नक्कीच आवडेल. (हे दोन वर्षांपूर्वी वाचले होते. पण लिहायचे राहून जात होते.)

चाऊ, मी मागे लिहिले होते ह्या पुस्तकाबद्दल, प्रचारकी वाटले तर त्यात आश्चर्य नाही.. तो एक उद्देश आहेच ते पुस्तक लिहिण्यामागचा.. आंबेडकर चळवळीचा अभ्यास करणार्‍याला विशेषत: त्यात काय चांगले झालेय ते पहाणार्‍याला हे पुस्तक म्हणजे मैलाचा दगड निश्चित आहे. त्यात अगदी शेवटी ह्याचा विस्तृत उहापोह केलाय तो वाचला तरी बरच जाणवतं आणि लिहिलेलं सगळं खरच आहे, त्यामुळे ते जास्त भिडतं..

मी ही वाचलंय 'आम्ही नी आमचा बाप'. प्रचारकी पेक्षाही मला ते आणि त्यांचं कुटुंब प्रतिकूल परिस्थितीतून वाट काढून आज इथवर आलंय ह्याचंच कौतुक वाटलं. खरंच, ठरवलं तर माणूस काय करु शकतो ह्याचं उत्तम अदाहरण.

नुकतचं, गोनीदांच 'पडघवली' वाचलं (फारेंड कडून आणलेलं). ऑफिस मधून येऊन २ दिवसात वाचून काढलं.
आधी एकदा ४,५ वर्षांपुर्वी वाचलेलं. पण यावेळेस अजून जास्त आवडलं. कोकणच आणी तिथली भाषा, काय सुरेख वर्णन केलय.

'बारबाला' या वैशाली हळदणकरांच्या पुस्तकाबद्दल खूप दिवस ऐकून होते, लायब्ररीत लावलेल्या अडिच महीन्याचा क्लेम नंतर पुस्तक हातात पडले, पण निव्वळ निराशा झाली. Sad पुस्तकाचं परिक्षण खूप ठिकाणी वाचले होते, त्यामुळे उत्सुकता वाढली होती.. कुठून कानावर हे ही आलं होतं की पुस्तकाचं प्रिंटींग थांबवलं आहे, आणि बाजारात मोजक्याच प्रती आहेत इ.इ. त्यामुळे तर अजूनच उत्सुकता ताणली गेली.

माझ्यामते तरी या पुस्तकाला साहीत्यिक असा काहीच दर्जा नाही. मुख्यपृष्ट आणि पुस्तकाचे नाव बहुधा वाचकांचे लक्ष वेधून घेत असावे. अत्यंत प्रांजळपणे म्हणावे तर, धड कथा नाही, संघर्ष नाही, आणि पुस्तकाच्या नावावर जावे तर त्याजोगते लिखाणही नाही.

मला पुस्तक अज्जिबात आवडले नाही.

~~~~~~~~~
दक्षिणा...... Happy
~~~~~~~~~

रारंग ढांग अप्रतीम आहे...

आज सकाळपासून इथे लंडन मधे मराठी पुस्तक मिसतोय...
खूप पुस्तकं आठवताय्त... पण हाती एकही लागत नाहिये...

कोणाकडे मराठी पुस्तकं ebook format मधे आहेत का?...
असली तर कृपया कोणती असतील नसतील ती मेल करा...

_______
आँखोंमें सपने लिये
घर से हम चल तो दिये
जाने ये राहें अब ले जाएगी कहाँ...!

लंडनचा महाराष्ट्र मंडळ इतकं जूनं आहे, त्यांचं स्वतःचं ग्रथांलय आहे का ही चौकशी करुन पहा.

काही वर्षांपुर्वी एका दिवाळी अंकात एक कादंबरी वाचली होती. कथानायक गरूड होता व त्याचा जन्मापासुनचा प्रवास रेखाटलेला होता.. . एका इंग्रजी पुस्तकाचा अनुवाद होता बहुतेक. नक्की आठवत नाही. कोणाला माहित आहे का ह्याबद्दल?

साधना.

बेबी - तू बहुतेक Jonathan Livingston Seagull by Richard Bach या पुस्तकाबद्दल म्हणत असावीस असे वाटते.

माझ्याकडे आहे तो दिवाळी अंक. हवा आहे का ?
.
इथे "मारुती कारस्थान" वाचले आहे का कुणी ? Happy

Jonathan Livingston Seagull by Richard Bach
अर्थातच, हा सि गल होता, गरुड नाही.
ह्याच लेखकाची One , आणी A Bridge across forever व Illusion ही छान आहेत.

कदाचित तिनी गरुड आणि सी गल मधे गफलत केली असेल असे समजून तिला वरील पुस्तकाचे नाव सांगितले चिऊ.

Pages