मी वाचलेले पुस्तक

Submitted by admin on 17 July, 2008 - 15:56

इथे आपण नुकत्याच वाचलेल्या पुस्तकाबद्दल लिहा. शक्य असल्यास नवीन पुस्तकासाठी नवीन लेखनाचा धागा चालू करा.

भाग २ - धागा - http://www.maayboli.com/node/41038

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माफ करा काल मी जी. ऐंची काना कथा कुठल्या पुस्तकात आहे हे विचारले. माझी जरा चुक झाली. त्या कथेचे नाव 'काली' असे आहे. ही कथा कुठल्या पुस्तकात आहे हे माहिती असेल तर कृपया उत्तर लिहा.

खालिद हुसैनी च thousand splendid suns वाचलं... Kite runner सारखच हे पण खूप सही पुस्तक आहे...
शेवटी शेवटी खाली ठेववत नाही... काही ठिकाणी खूपच violent आहे.. !

पण एकूण वातावरणनिर्मिती एकदम भारी.. !

मी नुकतच जॉर्ज ऑर्वेल च १९८४ वाचल. मन अगदि सुन्न होत वाचुन. ह्यात माणसामधल्या पराकोटिच्या सत्तापिपासु वृत्तिच इतक तपशिलवार चित्रण आहे की पहिल्या काहि प्रकरणांनतर आता पुस्तक बंद कराव अस सारख वाटत रहात. (अर्थात तरिहि आपण वाचत रहातोच).

स्वतः ब्रिटिश असुनहि सरंजामशाहि राज्यपध्धति मान्य नसल्यामुळे जॉर्ज ऑर्वेल ने ब्रम्हदेशातिल नोकरि सोडुन गरिबित जगण पत्कारल हे कळल्यामुळे हे पुस्तक माझ्यासाठि जास्तच उंचिवर गेल.

सध्या मी पर्व वाचतेय, पुर्ण झाले नाही अजुन. आवडले. ह्याच्या आधी युगांतही वाचलेले. त्यात आणि ह्याच्यात बरीच साम्यस्थळे आहेत. असामीशी सहमत. मला तरी त्यात सगळाच समाज अप्रगत आहे असे वाटले नाही. जशी परिस्थिती तशी प्रगती प्रत्येकाने केलेली दाखवलीय.

नमस्कार्.मी नव्यानेच सभासद झालेय.

६/८ महीन्या॑पूर्वी पर्व वाचलेल॑. जाम घुसलेले तेव्हा त्यात. बरेच ठिकाणी त्या॑नी घडलेल॑ पूराणकथेच्या रूपातून बाहेर काढून सा॑गीतलय्॑.छान अनुभव आहे पर्व वाचण.

नुकतच मी सदान॑द देशमूखा॑च बारोमास वाचल॑. मराठी अभ्यासाय होत ते सोड्ल्यास प्रथमच ग्रामीण लिखाण वाचल. छान आहे पुस्तक. एथून तीथून शेतकरी कसा होरपळ्तोय ते जाणवत॑. सून्न वाटत॑. पण हे आपल्याला जाणून घ्यायला हव॑.
कारण आपण कपडे आणि रेडीमेड फूड यावर खर्च करू पण भा़जी महाग झाल्यावर भाजीचे भाव कडाड्ले अश्या बातम्या झोडू.

अंजली पेंडसे यांच 'देहबोली' वाचल. body language वर आहे. पूर्वी त्या सा.सकाळ मध्ये ह्यावर सदर लिहीत. हे पुस्तक संग्रही ठेवाव अस आहे.

कुणी सांगेल का जी. ऐ. कुलकर्णी यांची 'काना' की 'कान्हा' ही कथा त्यांच्या कुठल्या पुस्तकात आहे? धन्यवाद.

माफ करा काल मी जी. ऐंची काना कथा कुठल्या पुस्तकात आहे हे विचारले. माझी जरा चुक झाली. त्या कथेचे नाव 'काली' असे आहे. ही कथा कुठल्या पुस्तकात आहे हे माहिती असेल तर कृपया उत्तर लिहा >>>>

कुणीतरी या त्रस्त समंधाला उत्तर देऊन आधी शांत करा पाहू!! Happy

---------हितगुज दॅट इ़ज....
पंडितसे मिले पंडित, हो जाय दो दो बातें..
गधेसे मिले गधा, हो जाय दो दो लातें.....

काल राजन खान यांच 'गूढ' वाचल. नाही आवडल. दिवाळी अंकातल्या कथेच ओढूनताणून पूस्तक केल्यासारख वाट्ल.

टोणग्या, बराचं उशिरा उगवलास. मला नाव कळलं देखील. तुला सांगू का? नाव आहे सांज शकून.

मागे एकदा एका दिवाळी अंकात एक दीर्घकथा वाचली होती. एक म्हातारा प्रसिद्ध लेखक एका आडगावात आपलं आयुष्य गुजारत असतो. गावातल्या लोकांना तो काय करतो वगैरे माहिती नसते. म्हातार्‍याची एक नात, जिचा लहानपणापासून म्हातार्‍यानेच सांभाळ केलेला असतो तिचे आणि म्हातार्‍याचे पटत नसते. पुढे ती एका मुलाच्या नादी लागून पळून जाते वगैरे वगैरे. कथेचे नाव बहुतेक अनौरस असे होते.

ह्या कथेचे लेखक राजन खान होते का?

हो. ती दीर्घकथा राजन खान यांचीच होती. मला वाटतं साप्ताहिक सकाळ च्या दिवाळी अंकात आली होती..

हो. आहे तो अंक माझ्याकडे. भली मोठी गोष्ट होती आणि पात्रांना नावे नव्हती. ती मुलगी परत येते शेवटी.

नमस्कार.

मी नुकताच या गटात शिरलोय. मस्त ग्रूप आहे! धन्यवाद मधुरा भिडे, हे सुचवल्याबद्दल! Happy

इथे कोणी जीए-प्रेमी आहेत का? कुणीतरी त्यांच्या "काली" कथेची चौकशी करत होतं.. "सांजशकुन" हा पूर्ण संग्रहच अप्रतिम आहे! तीन-चार पानांच्याच कथा आहेत, पण या कथांमधून केवढं अफाट विश्व उभं करतात जीए.. मी त्यांची (जवळजवळ) सर्व पुस्तकं घेतलीत! एकएक वाचतोय आणि वेडा होतोय.. त्यांचे मी वाचलेले कथासंग्रह:
१. रमलखुणा.
२. काजळमाया.
३. सांजशकुन.
४. रक्तचंदन.
५. बखर बिम्मची (लहान मुलांसाठी).
६. हिरवे रावे (वाचन चालू आहे..)

मला परवा अपघातानेच एक अप्रतिम पुस्तक सापडले: "मर्‍हाटी स्त्रियांची रामकथा". त्यात मराठवाड्यातील स्त्रियांनी अनेक पिढ्या ओव्यांमधून गायलेली रामायणाची कथा आहे.. अस्सल मराठी लोकसाहित्य, अव्वल दर्जाचे! खूप गोड ओव्या आहेत..

सध्या पुलंचं "पुरचुंडी" वाचतोय. विनोदी नाही, हलकेफुलकेच पण विचार करायला लावणारे आहे.

ह्.मोंच 'निष्पर्ण ....' वाचल. ह्वदयस्पर्शी आणि मन अस्वस्थ करते. पण असे करण्याची पूस्तकाची ताकद हिच लेखकाची प्रतिभा म्यणता येईल नाही का.

कालच चेतन भगतचे 'one night @ the call center' वाचले. बरे आहे पुस्तक. शेवटी शेवटी हिंदी सिनेमातले प्रसंग वाचतेय असं वाटु लागलं. Happy
याआधी त्याचे five point someone चा मराठी अनुवाद वाचायचा प्रयत्न केला. पण तो काही झेपला नाही. अक्षरशः शब्दशः भाषांतर आहे ते, मग वाचायला मजा येत नाही. मुळ इंग्रजी पुस्तक मिळाल्यास वाचेन.

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
अंतरंगी तो प्रभाती छेडितो स्वर बासुरी.....

प्राची त्यावर खरचं हिंदी सिनेमा येतोय.
मीही वाचलय ते. आणि नंतर 'थ्री मीस्टेक ईन माय लाईफ' पण वाचल.

मला असं वाट्ल की चेतन भगत ची पूस्तक आपल्याला पकडून ठेवत नाहीत आपण त्यांना पकडून ठेवायच असतं. पण तरी प्रसंग छान उभे राहतात डोळ्यासमोर.

गेला एक आठवडा Indu sundaresan चं 'the splendor of silence' वाह्चत होते. ठीक आहे एकदा वाचायला. स्वातंत्र्यपूर्व भारतातील परिस्थिती आणि प्रेमकथेवर आधारीत आहे.

मधुरा, मी पण ऐकलंय ते.. त्यामुळे वाचताना गुल, शर्मन, सोहेल, ईशा हेच डोळ्यांसमोर येत होते. Happy
मला त्याची भाषा खुप सोपी आणि सुटसुटीत वाटली. त्यामुळे, वाचायला मजा येते.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
अंतरंगी तो प्रभाती छेडितो स्वर बासुरी.....

इथे कोणी श्री. ना. पेंडसे ह्यांचे "माणूस आणि लेखक" हे आत्मचरित्र वाचले आहे का? नसल्यास जरूर वाचा. खूप सुंदर आहे.

मी चेतन भगत चे Five Point Someone आजंच वाचून संपवलं. पुस्त़क बेस्ट सेलर्स होण्या इतकं काही चांगलं आहे असं मला नाही वाटत. निव्वळ आयटी वाल्यांनी डोक्यावर घेतलं असावं. Happy
बाकी २/३ प्रसंग वाचताना मात्रं अगदी पुस्तक खाली ठेऊ नये, आणि पुढे काय घडेल याची उस्तुकता अगदी शिगेला पोचली होती. Happy बाकी ठिक. माझ्याकडून पाच पैकी ३.

निव्वळ आयटी वाल्यांनी डोक्यावर घेतलं असावं. >>> तुला आय आय टी असं म्हणायचाय का????

प्राची, मलाही त्याची भाषा आवडली आणि खरं सागायच तर मला एरवी ईग्रजी पूस्तक वाचायचा थोडा कंटाळाच आहे तरी ती दोन्ही आनंदाने वाचली.
सांगायची गोष्ट म्हणजे चेतन भगत ड्वाईश बँकेत आहे आणि आमचे शेजारीही. ते एकत्रच काम करतात. तर त्याच्या म्हणण्यानुसार माणूस छान आहे व नेहमी आनंदी असतो.

असो.

मलिका अमर शेखचं 'मला उद्ध्वस्त व्हायचयं' वाचतेय.

******************************************
आई नावाची वाटे देवालाही नवलाई
विठ्ठ्लही पंढरीचा म्हण्तो स्वतःला विठाई.

"आई नावाची वाटे देवालाही नवलाई
विठ्ठ्लही पंढरीचा म्हण्तो स्वतःला विठाई."
खुपचं छान. आवडलं. कशातल्या या ओळी?

adm
नाही मला आय टी च म्हणायचं होतं. Happy

सध्या, मी अनंत सामंतांचं 'मितवा' वाचतेय. नुकतंच सुरू केलंय. वाचून सांगते.

अनंत सामंतांचे 'मितवा'?? बघण्यात नाही आले कधी..

हो... खास ऐकिवात नसलेलंच पुस्तक असावं. परवा ग्रंथालयात आनायसे दिसलं म्हणून म्हटलं वाचून पाहू. जनरली त्यांच्या पुस्तकाचे विषय आणि भाषा दोन्ही रफ्-टफ असतात. हे पुस्तक तसे हळूवार वाटते. (अजुनी फक्त ७ च पानं वाचलीयेत) बहुतेक प्रेमकथा असावी असं वाटतंय.

पद्मा गोळेंचे तिन्ही आणि निकुंबाचे पाची काव्यसंग्रह कुठे मिळू शकतील?

नमस्कार.

अभिजीत देसाई यांचे "गाणीबजावणी" नावाचे नवीन पुस्तक आले आहे.. अप्रतिम! हिंदी सिनेमातील गाणी, गायक, संगीतकार, गीतकार, किस्से असा विषय आहे आणि फारच मनापासून लिहिलं आहे. तर माझ्यासारखाच जुनी-नवी हिंदी गाणी हा ज्यांचा Weak point असेल त्यांनी अवश्य वाचावं! त्यातील लताबाईंचा फोटो तर नजर लागावी इतका सुंदर आहे!!
याच विषयावर शिरीष कणेकरांनीही "गाये चला जा" आणि आणखीही काही सुंदर पुस्तकं लिहिलीत.
इथं कोणी जयंत नारळीकरांच्या विज्ञान-कादंबर्‍या वाचल्यात का? त्यांच्या "प्रेषित" व "वामन परत न आला" या दोन उत्तम विज्ञान-कादंबर्‍या आहेत.
चेतन भगतच्या पुस्तकांविषयी मी मधुरा भिडेशी पूर्ण सहमत आहे. भाषा उत्तम, वर्णनशैली छान, पण कथा ओके-ओके..

नाही मला आय टी च म्हणायचं होतं. >>> आय टी वाल्यांचा आणि five point some one डोक्यावर घेण्याचा काय संबंध... ??????
ज्यांनी कोणी आय आय टी तून engineerng केलं असेल.. किंवा for that matter IIT बघितलं असेल... किंवा PG केलं असेल किंवा engineering मधे अभ्यासात धडपड पण होस्टेल लाईफ आणि बाकीच्या activities/ groups enjoy केले असतील ते सगळेच जणं हे पुस्तक चांगलं रिलेट करू शकतात...

ह्या पुस्तकाचा आणि आयटी चा दुरान्वये संबंध नाही.. !!!! त्यामुळे हा मुद्दा आजिबात न पटेश.. !

पद्मा गोळेंचे तिन्ही आणि निकुंबाचे पाची काव्यसंग्रह कुठे मिळू शकतील? >>>>>>> दुकानात.

साद देती हिमशिखरे वाचले. ह्या पुस्तकाचे उदा माझे दोन मित्र नेहमी आमच्या चर्चेत देतात म्हणून जिव लावुन वाचले. गुरुदेवांची शिकवन तेवढी वाचायला चांगली वाटली. पण माधवचा गोंधळ काही ठिकानी अनाठायी वाटतो व पुस्तकभर तो नक्की साधना म्हणजे काय करतो ते कुठेही येत नाही. काही गोष्टींचा उहापोह जसे दैवी चमत्कार, ज्ञान, सुख हे आवडले. जेवढी स्तुती ऐकली तेवढे खरच आवडले नाही.

Pages