मी वाचलेले पुस्तक

Submitted by admin on 17 July, 2008 - 15:56

इथे आपण नुकत्याच वाचलेल्या पुस्तकाबद्दल लिहा. शक्य असल्यास नवीन पुस्तकासाठी नवीन लेखनाचा धागा चालू करा.

भाग २ - धागा - http://www.maayboli.com/node/41038

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

<काही ठिकाणी त्यातील लीखाण बनाव असल्यासारख वाट्तं. खरी परिस्थीती कधीच उघड होणार नाहीस वाट्त.<>
'My frozen turbulence in Kashmir' या पुस्तकाचा हा अनुवाद आहे. बनाव वगैरे नाही. हे पुस्तक प्रसिद्ध होऊन १५-१६ वर्षं झाली आहेत.
तेव्हा या पुस्तकावर बरीच चर्चा झाली होती, विवादही होते. पण यातील अनुभवांच्या सत्यासत्यतेवर शंका घेतली गेली नव्हती.

मराठ्यांचा इतिहास (शिवाजी महाराजांच्या पश्चात) वाचायची माझी इच्छा आहे... कुणीतरी चांगली पुस्तकं सुचवा ना >>>

सान्टीनो तुम्हाला कांदबर्‍या वाचायच्या असतील तर
छत्रपती संभाजी, छावा. राऊ, मंत्रावेगळा, पाणिपत आणि स्वामी वाचा अनुक्रमे. पण यात छतपती राजाराम, महाराणि ताराराणी यांचा संघर्ष कुठेही येत नाही. (त्यांचा थोडक्यात संघर्षा मी http://www.maayboli.com/blog/26 इथे लिहीला आहे.)

पण जर खर्‍या ईतिहासात रस असेल तर अनेक पुस्तक उपलब्ध आहेत.
तुम्ही ग. ह. खरे आणि अ. रा. कुळकर्णी यांनी संपादित केलेले मराठ्यांचा ईतिहास ( खंड पाच) ह्या पासुन सुरु करु शकता. खुप जर रस आला तर गो स सरदेसाई यांनी लिहीलेली मराठी रियासत वाचायला घ्या. ह्याच बिबी बर मागे मी वेगवगळ्या लेखकांनी लिहीलेली पुस्तके ( कांदबर्या व ईतिहास) अशी लिस्टच दिली होती ती पण उपयोगी पडेल.

नर्मदे हर नावाचे अभिजीत कुंटे यांचे पुस्तक वाचले. तिन परिक्रमा मारण्याची त्यांची जिद्द आवडली. हे पुस्तक त्यांचा परिक्रमेचे वर्णन आहे. ऐकदा वाचन्यासारखे नक्कीच.

नर्मदे हर हे जगन्नाथ कुंटे यांचे पुस्तक आहे. कृष्णमेघ कुंटेचे हे वडील.

केदार,
खूप धन्यवाद !

हो. अरे जगन्नाथच लिहीनार होतो पण लिहील्या गेले अभिजीत. बुध्दीबळाचा प्रभाव. Happy

गौरी देशपांडेच्या थांग आणि दुस्तर हा घाट च परीक्षण लिहिणार आहे का कोणी? लिहिल्या गेलंय का पुर्वी?
मी ते जरा घाईतच वाचलं, मला काही गोष्टी नाही समजल्या.....

इथे ओन लाईन पुस्तक वाचता येईल काय कसे आणि कुठे कृपया मला कोनीतरी सागा प्लीज

मायबोलीवर अशी सुविधा नाही. Happy

भाग्या, जुन्या हितजुजवर बर्‍याच वेळेला थांग आणि दुस्तर हा घाट वर चर्चा रंगली होती. पण गौरी देशपांडेंच्या पुस्तकाची खासियत (माझ्या वैयक्तिक मतानुसार) अशी आहे की, त्यांचं कोणतंही पुस्तक हे प्रत्येक वाचकाला वेगवगळं समजतं. म्हणजे, त्याचा अर्थबोध हा प्रत्येकाला वेगवगळा होतो. तसं ही एका वाचनात तिची पुस्तकं (निदान मला तरी) समजत नाहीत. Sad

इ॑टरनेटवर मराठीत म्रुत्यु॑जय हे पुस्तक वाचता येइल का कसे आणि कोठे प्लिज मला सा॑गा

अहो गणुशेठ... भारतात आहात ना तुम्ही? मग कुठेही हे पुस्तक मिळेल की विकत किंवा वाचनायलात... इंटरनेटवर कश्याला वाचताय...

नमस्कार.

मी सध्या आरती प्रभूंचा "जोगवा" हा काव्यसंग्रह वाचतोय. वेगळ्याच पातळीवरच्या कविता आहेत अगदी! काही कविता थोड्या ग्रेसांसारख्या वाटतात, पण वृत्तं भलतीच वेगळी आहेत!

मला परवा मुंबईत एका जुन्या पुस्तकांच्या दुकानात सावरकरांच्या मुलाने (श्री. विश्वास विनायक सावरकर) त्यांच्या वडिलांबद्दल लिहिलेले "आठवणी अंगाराच्या" हे पुस्तक सापडले. चांगले वाटले म्हणून घेतले.. कोणी वाचले आहे का? मला तर माहितीही नव्हते की असे काही पुस्तक आहे!

मध्यंतरी श्री. ना. पेंडसेंच्या कादंबर्‍याबद्दल चर्चा चालू होती.. कोणी "गारंबीचा बापू" वाचली आहे का? अप्रतिम आहे! वातावरण-निर्मिती तर कमालीची सुंदर आहे. विशेषतः मी तो दापोलीजवळचा गारंबीचा परिसर प्रत्यक्ष पाहिला असल्याने अफाट मजा येते! (अर्थात तो न पाहिल्याने काही फरक पडत नाही.)

बाकी एकीकडे जी. ए. वाचणं चालूच आहे.

-------------------------------------------------------------
ऋणशेष: अग्नि शेषश्च, शत्रुशेषस्तथैव च |
पुनः पुनः प्रवर्धन्ते, तस्मात तान् न अवशेषयेत ||

बरेच महीन्यानी क्लेम लागून द काईट रनर मिळाल शेवटी. सुरवातच आहे पण पुस्तकाची पकड सॉलीड आहे.

******************************************
आई नावाची वाटे देवालाही नवलाई
विठ्ठ्लही पंढरीचा म्हण्तो स्वतःला विठाई.

द काईट रनर मला तरी खूप आवडले. शेवटचे योगायोग थोडे फिल्मी वाटू शकतील पण तरीही छान आहे.

द काईट रनर पूर्ण झालं. मलाही आवड्ल. ह्या आकाशाखाली एकाच मानवजातीत काही समुहांवर वेळोवेळी एवढे भयानक प्रसंग ओढावलेले आहेत त्यांच्या विचारांनी अस्वस्त वाटते. शेवटी आमिर-सोराय आणि सोहराब चे एकमेकांत मिसळण्याच्या वा न मिसळण्याच्या प्रसंगांवरुन अरविंद गोखल्यांची 'कलिंगड' गोष्ट आठवली मला.

******************************************
आई नावाची वाटे देवालाही नवलाई
विठ्ठ्लही पंढरीचा म्हण्तो स्वतःला विठाई.

कलिंगड म्हणजे त्या दत्तक घेतलेल्या मुलिचि गोष्ट ना? पण ती तर गौरि देशपांड्यांचि होति ना?

>> शेवटी आमिर-सोराय आणि सोहराब चे एकमेकांत मिसळण्याच्या वा न मिसळण्याच्या प्रसंगांवरुन अरविंद गोखल्यांची 'कलिंगड' गोष्ट आठवली मला.>> यावरून तरी नाही वाटत की मधुरा गौरीची आहे हे असे आहे मधील कलिंगडबद्दल बोलते आहे.

मधुरा,
अरविंद गोखल्यांचा कुठल्या कथासंग्रहात आहे ही गोष्ट?

क्षमस्व. गौरि देशपांड्यांचि कथा मी अरविंद गोखल्यांची म्हंट्लय.
मी त्यावेळी 'कलींगड'(गौरि देशपांडे) आणि 'कातरवेळ" (अरविंद गोखले)पाठोपाठ वाचल्या होत्या आणि दोन्ही तीतक्याच भावलेल्या त्यामुळे ही चुक झाली असेल.
तरी सॉरी.

******************************************
आई नावाची वाटे देवालाही नवलाई
विठ्ठ्लही पंढरीचा म्हण्तो स्वतःला विठाई.

धन्यवाद मधुरा,

गौरि देशपांड्यांच्या एक दोनच कथा मी वाचल्यात त्यामुळे 'कलिंगड' हे नाव लक्षात होत म्हणुन विचारल.

मलाही काईट रनर खूप आवडले...

इथे 'बारबाला' कोणी वाचलंय का? त्याचे लेखक कोण आहेत सांगू शकाल का? आणि पुस्तकाची साधारण कथाकल्पना सुद्धा.
त्याच्यासाठी खूप क्लेम आहे, ना जाने मेरा नं. कब आयेगा? Sad
पुस्तकाला इतकी मागणी की नजरेसही पडत नाही. बघेल तेव्हा इश्श्यू झालेले असते. Sad

मीही काईट रनर नुकतेच वाचले.. त्याच्या आधी द ब्रेडविनर वाचले. अंगावर अक्षरक्ष: काटे आले दोन्ही पुस्तके वाचताना. दोघांतला अफगाणिस्तान पुर्णपणे भिन्न आहे. काईट रनर चा अफगाणिस्तान धुळधाण होण्याआधीचा आणि थोडा नंतरचा, तर द ब्रेडविनर मधला संपुर्ण धुळधाण झालेला.. लोक अशा परिस्थितीतही जगताहेत हे वाचुनच रडायला येते. देवाचे आभार अशा ठिकाणि जन्माला घातले नाही.

काईट रनर मध्ये शेवटी अफगाण मधील तालिबान राजवट संपली असे दाखवलेय. तसे खरोखरच झालेय काय?

साधना

९/११ नंतर अमेरिकेने काय केले ऍशबेबी??? तालिबान राजवट संपवून करझाईंना नाही का पंतप्रधान केले...

-------------------------
उत्तम व्येव्हारे जोडोनिया धन
उदास विचारे 'सेव्ह' करी

हा... मला करझाई इराक मध्ये की अफगाणिस्तान मध्ये हाच गोंधळ झाला.

म्हणजे याचा अर्थ आता अफगाणि बायकांना तो भयानक बुरखा घालणे, पुरूष नातलग सोबत नसल्यास घराबाहेर न पडणे, घर चालवण्यासाठी नोकरी न करणे वगैरे बंधने नाहीत?? तसे झाले असेल तर खरच सुटल्या त्या बिचा-या....

बारबाला वर सप्तहिक सकल मधे परिक्षण आले आहे. त्यात लेखक मिळतील. saptahiksakal.com बहुतेक.

'बारबाला' हे वैशाली हळदणकरांचं आत्मचरित्र आहे.

थँक्स चिनूक्स आणि सिंड्रेला... Happy

सिंड्रेला,
त्या www.saptahiksakal.com वर पुस्तकाचे परिक्षणही सापडले.
विशेष धन्यवाद. Happy

इथली लिंक पाहून ते परिक्षण व तिथली इतरही परिक्षणं वाचली मी. प्रकाशकाचे नाव, लेखक/ लेखिकेच नाव या पलिकडे सर्व परिक्षणे ही राफांच्या 'पावूस' या निबंदापासून स्फूर्ती घेऊन लिहिलेली वाटतात Happy

अशी परिक्षणे लिहिण्याकरता पगार पण मिळत असेल तर मी अर्ज करावा म्हणते त्या जागेसाठी - पुस्तक तर वाचायला मिळतीलच शिवाय काही वाचनीय लिहायची जबाबदारी नाही.

तिथली परिक्षणं बहुतेक मनावर घ्यायची नसतात. त्यात नव-नवीन आलेल्या पुस्तकांची यादी- लेखक/प्रकाशनाचे नावासहीत मिळते म्हणून लक्ष ठेवायचे. आम्ही त्यातुन लेखक्/विषय वगैरे बघुन पुस्तक आणतो. कधी कधी अजिबात आवडत नाही कधी एखादे चांगले पुस्तक संग्रही येते.

Pages