क्रिकेट - १०

Submitted by कृष्णा on 13 October, 2025 - 07:56

जुना धागा २००० पार होऊ लागला म्हणून हा नविन धागा.

इथे जुना धागा आहे...

https://www.maayboli.com/node/86160

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

विक्रमी लोकसंख्या असणाऱ्या आपल्या देशात इतक्या प्रचंड प्रमाणात क्रिकेट खेळलं जात असूनही, प्रतिभेची कमतरता नसूनही व फिरकी आपलं पारंपरिक कसब असूनही, आपल्याला एकही खराखुरा प्रभावी फिरकी गोलंदाज मिळत नाही हे आश्चर्य आहे. शोध घेण्यात, प्रोत्साहन व संधी देण्यात , व फिरकीला योग्य ते महत्व देण्यात आपण कमी पडतोय, हे निश्चित. कुलदीपला बहरण्यासाठी योग्य चांगली वागणूक मिळाली आहे असं मला तरी वाटत नाही. तो फलंदाजीबाबत गंभीर आहे, तंत्रशुद्ध व प्रयत्नशील आहे, हे मी पाहिलेल्या त्याच्या प्रत्येक खेळीत मला तरी जाणवलं आहे. पण त्याला नेहमीच अनिश्चिततेच्या भोवऱ्यात अडकवून ठेवून, तो ऑलराउंडर म्हणून निवडण्याच्या लायकीचा नाही हा शिक्का मारण्यात काय अर्थ आहे !

शोध घेण्यात, प्रोत्साहन व संधी देण्यात , व फिरकीला योग्य ते महत्व देण्यात आपण कमी पडतोय, हे निश्चित. >> +१. परत रणजीला दुय्यम स्थान देण्याच्या हव्यासामूळे होतकरू फिरकी गोलंदाज सुद्धा रेड बॉल टॅ़टिक्सला मह्त्व देण्याऐवजी व्हाईट बॉल वर मेहनत घेतात. साई, दुबे, शौकिन, सुथार वगैरे लिमिटेड क्रिकेटमधे अधिक मेहनत घेताना दिसत आहेत.

ऑलराउंडर म्हणून निवडण्याच्या लायकीचा नाही हा शिक्का मारण्यात काय अर्थ आहे >> बिट्स अ‍ॅण्ड पीस ऑलराउंडर टी २० साठी ठिक असतात पण वन डे मधे नि टेस्ट मधे फारच उघडे पडतात हे गंभीरसारख्या स्ट्रीट स्मार्ट खेळाडूला जाणवत नसेल तर आपण काय बोलणार.

मुळात जर ९-१०-११ नम्बरवर पण ‘थोडीफार का होईना पण बॅटिंग येत असेल, तर सामान्य किंवा प्रसंगी अतिसामान्य बॉलिंग पण चालेल‘ अश्या प्रकारचे खेळाडू हवे असतील तर फंडामेंटल्स मधेच काहीतरी चुकतंय. बुमराह, सिराज आणि कुलदीप मिळून ५० रन्सही काढू शकणार नाहीत कदाचित, पण त्यांच्या बॉलिंगसमोर जवळ जवळ ४०० चा स्कोअर दर वेळी उभा रहाण्याची शक्यता पण कमी आहे.

आपण काय बोलणार.
>>
या विचारामुळेच इथल्या पोस्ट कमी झाल्या असाव्या काय??

लंकेविरुद्ध आपण सहज जिंकलो. त्या मॅच बद्दल काही पॉइंट्स:
- मानव सुतार नी २० पैकी १० विकेट्स काढूनही सामनावीर पुरस्कार नाही
- देवदत्त पडिक्कल नी ३ नंबर वर दाखवलेली मॅचुरिटी बघता आपण उगाच सुंदर ला तिथे ट्राय करण्यात वेळ घालवला असं वाटतं
- जयस्वाल चा पहिल्या डावातला रन आऊट दुर्दैवी होता. टोटल राहुल ची चूक होती
- त्यातल्या त्यात वाईट गिल च खेळला. पण तो काही बाहेर जात नाही. त्यामुळे सर्फराजला परत बाकावर बसायला लागणार असं दिसतंय

बांगलादेश ला ऑस्सी संघानी हलक्यात घेतलं अन् त्याची फळं भोगली
स्टार्क, हेझलवूड, कमिन्स, स्मिथ गेल्यावर त्यांच्या टेस्ट टीम ला पण मेजर ट्रान्झिशन मधून जायला लागणार आहे

India’s 600 Tests journey
1-100: 10 wins, 40 defeats, 50 draws, W/L: 0.25
101-200: 25 wins, 32 defeats, 43 draws, W/L: 0.781
201-300: 21 wins, 26 defeats, 1 tied, 52 draws, W/L: 0.807
301-400: 32 wins, 31 defeats, 37 draws, W/L: 1.032
401-500: 42 wins, 28 defeats, 30 draws, W/L: 1.5
501-600: 57 wins, 31 defeats, 2 draws, W/L: 1.838

Total: 187 wins, 188 defeats, 1 tied (vs AUS, Chennai, 1986), Drawn: 244, W/L ratio: 0.994

---Crickbuzz

>> - मानव सुतार नी २० पैकी १० विकेट्स काढूनही सामनावीर पुरस्कार नाही
हो एका कसोटीत १० विकेट एकच बॉलर रोज रोज काढत नाही पण जनरली एखादं शतक प्रत्येक कसोटीत असतं, त्यामुळे मानव सुतारला सामनावीर द्यायला हवा होता. त्यामुळे त्याचं मनोधैर्य खूपच वाढलं असतं

कुलदीपविषयी भारतीय टीम मॅनेजमेंटचा प्लॅन नक्की काय असावा? त्याला अतिशय inconsequential ओव्हर्स टाकायला लावून त्याचं करियर संपवण्यापेक्षा त्याला सरळ सांगत का नाहीत की तो त्यांच्या प्लॅन्समधे नाहीये?

मानव सुतारला १० विकेट मिळाल्या असल्या तरी या सामन्यात पडीकलच्या धावांचे योगदान किंचित जास्त होते. त्यातही मानवच्या शेवटच्या चार विकेट पटकन आल्या पण तेव्हा सामन्याचा निकाल जवळपास लागलेला. त्या चार विकेट येण्याआधी पडीकल निर्विवादपणे सामनावीर वाटत होता. निकाल जवळपास लागलेला अश्यावेळी आलेल्या चार विकेट पकडून सामनावीरचा निर्णय फिरवणे योग्य वाटत नाही.

यात मानवच्या कामगिरीला हलके लेखायचे नाही पण सामनावीर एकालाच द्यायचे म्हटले तर पडीकल मला योग्य वाटत आहे.

ऋषभ पंत उर्फ चुम्मा वर १०० सिक्स नंतर एक छान लेख
त्यातील एक परिच्छेद देतो.

https://www.cricinfo.com/story/sl-vs-ind-the-high-wire-logic-of-the-rish...

एखादी योजना आखून ती प्रत्यक्षात आणत एका डावात विजय मिळवणे ही एक गोष्ट आहे. पण अशा प्रकारे फलंदाजी करत, ३६०० हून अधिक धावा करताना जवळपास ४४ ची सरासरी राखणे, तेही दर्जेदार वेगवान गोलंदाजी आणि निकाल देणाऱ्या खेळपट्ट्यांच्या काळात—आणि त्याच्या आठ शतकांपैकी सहा शतके ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेत झळकावणे—आणि त्याच वेळी एक उत्कृष्ट यष्टिरक्षक असणे! हे सगळं एका सहा अक्षरी, G ने सुरू होऊन S ने संपणाऱ्या शब्दात सामावून जातं.

टेस्ट क्रिकेट पाहत आलेल्या आमच्या इतक्या वर्षांच्या अनुभवातही रिषभ पंतसाठी आम्ही कधीच तयार नव्हतो. आणि रिषभ पंतला इतकी वर्षे पाहूनसुद्धा त्याला पूर्णपणे समजून घेण्यास आम्हाला फारसं यश आलेलं नाही.

मानव सुतारला १० विकेट मिळाल्या असल्या तरी या सामन्यात पडीकलच्या धावांचे योगदान किंचित जास्त होते. >> मलाही असच वाटले. पण सुतारला बघणे आनंद आहे. ड्रिफ्ट नि फ्लाईट अहाहा !!

Pages