क्रिकेट - १०

Submitted by कृष्णा on 13 October, 2025 - 07:56

जुना धागा २००० पार होऊ लागला म्हणून हा नविन धागा.

इथे जुना धागा आहे...

https://www.maayboli.com/node/86160

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

भरत, अहो या बाबतीत माझ्यावर शंकाच नको.
इथल्या माझ्या पोस्ट बघा जरा मागच्या पानावर जाऊन किंवा जुन्या धाग्यावर डोकावून. क्रिकेट हा माझ्या दैनंदिन जीवनाचा भाग आहे. रोज पूर्ण आयपीएल सामना घरात बघितला जातो. आणि त्यावर साईड बाय साइड चर्चा केली जाते.

सध्या मायबोलीवर क्रिकेट धागेच थंड आहेत. म्हणून इथे न लिहिता आमच्या व्हॉट्सॲप क्रिकेट ग्रूपवरच जास्त लिहित आहे एवढेच.

तुम्ही करत राहा अशी माझ्या आवडत्या खेळाडूंवर टीका. मला ती आवडतेच. त्यावर वाद घालायला मजा येतेच Happy
फक्त तेवढेच न करता रोज इतर चर्चा सुद्धा कराल तर जास्त आवडेल इतकेच म्हणायचे होते. जेणेकरून हा धागा हलता राहील.

आणि हो वैभव सूर्यवंशीची बाजू घेऊन मी आज सकाळपासून कित्येकांची भांडत आहे जे तो आयपीएल पुरता हिरो ठरेल म्हणत आहेत.

थांबा त्या पोस्ट इथे कॉपी पेस्ट करतो Happy

------

[30/05, 12:39] Abhishek Naik: या फॉरमॅटमध्ये तो जे शॉट जास्त इफेक्टिव ठरतात तेच खेळणार. आपल्याला अमुकतमुक जमते हे दाखवायला म्हणून कुठले शॉट खेळणार नाही. त्यामुळे त्याला एखादी गोष्ट जमतच नाही असे म्हणायची घाई नको असे मला वाटते.
काल त्यावर झालेली बॉडी लाईन गोलंदाजी आपण पाहिली. त्यानंतर त्याने शॉट सिलेक्शन मध्ये केलेली ऍडजेस्टमेंट सुद्धा विसरू नका. कॉमेंट्रीमध्ये आश्विनने याचे छान विश्लेषण केले होते. कालची खेळपट्टी पहिल्या डावात गोलंदाजांना जास्त मदत करत होती. हार्ड length वरचे बॉल उसळत होते आणि थोडीफार सीम मूवमेंट सुद्धा होती जी दुसऱ्या डावात दिसली नाही. टॉस जिंकून चुकीचा घेतलेला निर्णय होता तो.

बाकी या प्रकारच्या इतर खेळाडूंमध्ये तो नेक्स्ट लेवल आहे. तो इंटरनॅशनल white बॉल क्रिकेट चमकणार यात मला शंका नाही.
कारण ट्वेंटीमध्ये हल्ली जगभरात बाउंड्री छोट्या ठेवतात. कारण त्यांचा टार्गेट ओडियन्स तोच असतो जो फोर सिक्स बघायला आला असतो.

वन डे मध्ये देखील आता दोन बाजूने दोन बॉल वापरतात. त्यामुळे जुना सॉफ्ट झालेला वळणारा रिव्हर्स स्विंग होणारा बॉल कमी खेळावा लागतो. नवीन white बॉल सुद्धा मूव्हमेंट लवकर कमी होते. क्षेत्ररक्षणाचे नियम सुद्धा हल्ली मिडल ओवरमध्ये पाच ऐवजी फक्त चार क्षेत्ररक्षक बाहेर असतात. हा कमी झालेला एक क्षेत्ररक्षक फार भारी पडतो कारण याने बोलिंग प्लान बदलतात.

एकूणच बरेच काही फलंदाज धार्जिणे झाले आहे. ज्यात तंत्र तुलनेत कमी टेस्ट होते. खेळपट्टी स्लो किंवा uneven बाऊन्स असेल तर टेम्परमेंट आणि ऍडजस्टमेंट करायची क्षमता लागते आणि ती त्याकडे आहे, अजून सुधारेल याची झलक तो दाखवतोय.
मेहनती मुलगा आहे. नेटमध्ये पाचशे की कितीतरी बॉल खेळायचा असे ऐकले आहे. त्याची मसल मेमरी सुद्धा चांगली वाटते त्यामुळे..

मी तर एकूणच exited आहे त्याला नेक्स्ट ट्वेंटी वर्ल्ड कप मध्ये खेळताना बघायला. आणि 2027 ODI worldcup नंतर वन डे संघात बघायला जेव्हा तो आणखी तयार झाला असेल.
राजस्थान मधून खेळताना त्याला इतर टीमने दगा दिला पण भारताचा संघ मजबूत आहे. तिथे त्याच्या अश्या खेळी वाया जाणार नाहीत.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे वय त्याच्या बाजूने आहे.. वयानुसार ताकद वाढल्यावर आणि तुलनेत लहान वयातच अनुभवाने परिपक्व झाल्यावर काय प्लेअर बनू शकतो याचा विचार करा.

[30/05, 13:47] Abhishek Naik: टेस्ट खेळणार तो..
आणि तिथूनच Evolve होणार

[30/05, 13:54] Abhishek Naik: तो जगभरातल्या कंडीशन आणि त्यातही ऑल फॉरमॅट कसा खेळतो हे सगळ्यांनाच बघायचे आहे.
फक्त याबाबत वैभवची तुलना इतरांसोबत करून त्याच्यावर अन्याय नको.

अन्यथा त्याला वंडरबॉय म्हणताच नव्वदीच्या दशकात सचिनला वंडरबॉय म्हणणारे सचिनने जे त्या वयात इंग्लंड आफ्रिका ऑस्ट्रेलियात कसोटीत जसे खेळला ते हा करू शकतो का असा मापदंड घेऊन बसायला नको.

या काळात सध्याच्या क्रिकेटमध्ये जे इतर करू शकत नाही ते हा करत आहेच.

[30/05, 14:55] Abhishek Naik: White बॉल क्रिकेट, त्यातही ट्वेंटी आणि त्यातही आयपीएल हे फलंदाजधार्जिणे झाले आहेच. कारण ती सध्याची व्यावसायिक गरज झाली आहे. त्याचे आता कोणी काही करू शकत नाही.

जर या फॉरमॅटमध्ये स्पिनरसमोर खडे खडे सिक्स मारणे शक्य असेल तर कोण पुढे सरसावत मारायला जाईल. जर रिव्हर्स स्वीप खेळणे सहज असेल, तर कोण कश्याला फुटवर्क दाखवत क्रीजचा वापर करून खेळेल. एकूणच पारंपारिक क्रिकेट इथे हाय रिस्क लो reward क्रिकेट झाले आहे. त्यामुळे युवा क्रिकेटर घडतानाच या बदललेल्या मुशीतून घडतात.

पण तरीही जे एखाद्याकडे गिफ्टेड टॅलेंट असते ते असतेच.
त्यामुळे आता बघायचे हे आहे की वैभव सूर्यवंशी आपल्यातील टॅलेंटला न्याय देताना एखाद्या फॉरमॅटपुरते यश मिळवण्यातच धन्यता मानतो की त्यात खऱ्या अर्थाने लिजंड बनण्याची भूक आहे.

भरत तुमच्यासाठी मी तेथील चर्चेत लिहिलेल्या अजून दोन ताज्या ताज्या पोस्ट कॉपी पेस्ट करतो

----

[30/05, 15:52] Abhishek Naik: हो पण याचे आता आपण काहीच करू शकत नाही. आपण वर्गणी काढून तर त्यांना देऊ शकत नाही की या पोरींना हाकला आणि आम्हाला आमच्या आवडीचे क्रिकेट दाखवा Happy

आमच्या घरात सुद्धा हेच चित्र आहे. माझी मुलगी सुद्धा हेच आवडीने बघते कारण क्रिकेट या खेळाशी तिची ओळखच तशी झाली आहे. फरक इतका की ती हातात बॅट पकडणारी आहे आणि क्रिकेट खेळायला म्हणून मैत्रिणी सोडून मित्रांमध्ये जाते. म्हणून तिला मी आयपीएल पलीकडचे क्रिकेट सुद्धा सांगत राहतो. माझ्यासोबत बसून तिने इंग्लंड दौऱ्याच्या कसोटी सुद्धा बघितल्या आहेत. पण तिला जरी उद्या सर्व प्रकारच्या क्रिकेटची आवड लागली तरी तिच्या बाकीच्या फ्रेंडना याचे काही पडले नसते. त्यामुळे रोज मॅच संपल्यावर तिची फॅन वॉर chat चालू राहते.

जसे एकेकाळी भारताच्या स्कोअर सोबत सचिनचा स्कोअर विचारला जायचा तसे आता वैभव सूर्यवंशीने किती सिक्स मारले विचारले जात असेल तर तेच घडेल हे बघितले जाणार.

[30/05, 15:53] Abhishek Naik: जे गोलंदाज येथील फलंदाजांना टेस्ट मध्ये नाचवू शकतात ते इथे तुडवले जातात हे बघायला त्याच्याबद्दल कितीही वाईट वाटत असले तरी हे स्वीकारायला हवे. त्यातही जे या फॉर्मेटची डिमांड पूर्ण करतात, तसेच वेरिशन आणतात ते इथेही टिकतात.

बॉलिंग मशीन हा एक इंटरेस्टिंग मुद्दा आहे. हा टोकाचा विचार आहे आणि उपरोधाने म्हटले गेलेले वाक्य आहे याची कल्पना आहे पण समजा ती खरेच बसवली तर हा खेळ बघायला कोणाला मजा येईल का? तर बिलकुल नाही.

कारण हा गोलंदाजाचा खेळ राहिला नाही हे खरे असले तरीही लोकांना त्यातही ते काय करू शकतात हे बघायचे असतेच.
आणि आजही आयपीएलमध्ये प्ले ऑफला जाण्यास तीच टीम फेवरेट असते जी संतुलित असते. ज्यांच्याकडे गोलंदाज सुद्धा चांगले असतात. म्हणजे मार खाऊनही, हिरो बनण्याचा चान्स न मिळूनही त्यांचा संघाच्या कामगिरीतील रोल महत्वाचा आहेच.
किंबहुना गुजरातच्याच त्यांनी अहमदाबादला जिंकलेल्या मॅचेस बघा. त्यांच्या गोलंदाजी डावपेचांनीच समोरच्या संघाला रोखले आहे.

विषयावर आहेत तर काय फरक पडतो.
आणि माझीच पोस्ट आहे.
हेच जर ती व्हॉट्सॲपवर पूर्वप्रकाशित आहे हे सांगितले नसते तर कोणाला काही कळले सुद्धा नसते.

भरत खाजवून खरूज काढणे ह्या वाक्प्रचाराचा अर्थ माहित आहे ना ? Happy

उशीराने का असेना मुंबई मॅनेजमेंटला शहाणपण सुचले आहे. पण यात रोहितची स्वतःची उमेदीची तीन वर्षे गेली. >> एक काळ होता जेंव्हा फक्त टेस्ट क्रिकेट असे नि बत्तीशी नंतर क्रिकेटर रिटायर होत असत. आज ३४ नंतर टेस्ट पेक्षा फास्ट अशा टी २० मधे क्रिकेटरच्या उमेदीची वर्षे असतात हे लक्षात आले. गमत म्हणजे शेवटच्या तीन वर्षांमधले आकडे त्या आधीच्या ७ वर्षांपेक्षा उजवे आहेत - एव्हरेज नि स्ट्राईक रेट मधेही
https://www.howstat.com/Cricket/Statistics/IPL/PlayerSeries.asp?PlayerID...

साधा माणूस, लाँग जंपची प्रॅक्टिस करा.

असामी, इम्पॅक्ट प्लेयर म्हणून बेंचवर उमेदीने बसायला मिळतं की. Wink

<<<<
गमत म्हणजे शेवटच्या तीन वर्षांमधले आकडे त्या आधीच्या ७ वर्षांपेक्षा उजवे आहेत - एव्हरेज नि स्ट्राईक रेट मधेही
>>>

असामी +786
आणि इथे हे आकडे शेअर केले त्याबद्दल धन्यवाद

मी सुद्धा सेम पोस्ट पाहिली आज..
जे म्हणत होते पांड्या कप्तान झाला म्हणून रोहीत मुद्दाम वाईट खेळला त्यांना उत्तर म्हणून दिले होते हे आकडे Happy

FB_IMG_1780125627619.jpg

बाकी रोहितची उमेदीची वर्षे गेली हे खरे आहे. आता पुढे तो स्वतः कप्तानी नाही करू शकत. कारण तो स्वतः इम्पॅक्ट प्लेअर म्हणून खेळतो. कप्तान तसे करू शकत नाही.

गेल्या वर्षापासून तो फिल्डींगला नसायचा. एक दर्जेदार फिल्डर असतानाही त्याला विश्रांतीची गरज म्हणून बाहेर बसावे लागत असे. स्लिम झाल्यावर नि इंपॅक्ट प्लेयर म्हणून खेळतानाही तो इंजर्ड झाला. "उमेदी"ची वर्षे कप्तान असता तरी वाया गेली असती. किंबहुना मैदानात राहिला असता तर तीन वर्षे खेळताना दिसला नसता. त्याधीच्या तीन वर्षांमधे ते स्पष्ट होत होते.

जे म्हणत होते पांड्या कप्तान झाला म्हणून रोहीत मुद्दाम वाईट खेळला त्यांना उत्तर म्हणून दिले होते हे आकडे >> इथे हे ' जे' कोण दिसले तुला ? कोणीही असे म्हटलेले मला दिसत नाहिये. तुलाच निष्कारण चुम्म, रोहित नि धोनी वगळून इतरांवर दुगाण्या झाडायची खोड आहे. आता तू चापलूसपणे म्हणशील - कि सोशल मिडियावर नि तुझ्या गल्लीतल्या टपरीवर लोक हेच बोलत असतात वगैरे वगैरे.

इथे हे ' जे' कोण दिसले तुला ?
>>>

मी कुठे म्हणालो इथे? उगाच का काहीही शब्द घालता नेहमी माझ्या तोंडात?
वरच लिहिले आहे ना कुठे ते - सोशल मीडियावर - फेसबुकवर
तुम्ही तीन वर्षांचा रेकॉर्ड दिलात तेव्हा ही वायरल पोस्ट आठवली..

<<<आता तू चापलूसपणे म्हणशील - कि सोशल मिडियावर>> उत्तर तुम्हाला माहीत आहे ते मी बोलू नये याचीही सोय केलीत Wink पण असे थोडी ना होते..

वैभव सूर्यवंशी बद्दल सध्या मीच नाही तर सचिन सुद्धा बोलत आहे
great minds think alike Happy
.

When Sachin Tendulkar praises a young batter’s technique, the cricket world pays attention. Speaking during the Cricinfo Honours event, Sachin highlighted Vaibhav Sooryavanshi’s exceptional wrist work and his ability to pick the line and length earlier than most batters, a rare quality that allows him to dominate bowlers despite being just 15 years old.

What makes Vaibhav special is that his power is not based on wild slogging. His timing, bat swing, and reading of the game have impressed some of the greatest minds in cricket. Earning such praise from Sachin Tendulkar is another sign that Indian cricket may have found a truly extraordinary talent.

मी कुठे म्हणालो इथे? >> म्हणजे कोणी तरी इतरत्र काही म्हणाले त्याचे उत्तर तू इथे दिलेस. सॉफ्टवेअर मधे काम करतोस, बग फिक्स त्याच ऑफिसमधे त्याच सॉफ्टवेअर मधे करतोस कि घरी जाऊन सोशल मिडीयावर करतोस ? काय राव ! आम्ही काय अगदीच अलिबागवरून आलो आहोत असे काय समजता ?

टीम मोठी की एक खेळाडू?
मला रोहित शर्मा खूप आवडतो.
वानखेडे मध्ये त्याच्या नावाचा स्टँड पाहिला की आजही अंगावर रोमांच उभे राहतात.
पण
यंदाच्या आणि मागच्या दोन-तीन वर्षांच्या IPL मध्ये प्लेऑफ गाठलेल्या संघांचे सलामीवीर पाहताना असं वाटतं की रोहितने यापेक्षा अजून जास्त योगदान द्यायला हवं होतं, अगदी त्याच्या सर्वोत्तम फॉर्ममध्येही.
किंवा कदाचित आम्हीच त्याच्याकडून नेहमीच थोडं जास्त अपेक्षा ठेवतो.

वर फोटो मध्ये दिले आहे की ipl 24 25 आणि 26 मध्ये रोहित ने त्याचा बेस्ट खेळ केलाय
पण
2024 मध्ये तो ऑरेंज कॅप मध्ये 17 रँक ला होता
2025 मध्ये ही 17 रँक ला
2026 मधे तर चक्क 32 रँक
हा जर त्याचा बेस्ट खेळ असेल तर बॅट्समन म्हणून त्याने अजून खूप योगदान द्यावे अस वाटतं
त्याच्या दर्जा च्या बॅट्समेन कडून कमीत कमी टॉप 6 ते 7 मध्ये तो असावा अस वाटतं

पर्सनली मी रोहित कडून ह्याच्या पेक्षा खूप जास्त अपेक्षा ठेवतो

रोहित शर्माची क्याप्टनशिप बाप आहे. बॅटिंगपेक्षा जास्त डोकं क्याप्टनशीपमध्ये लावतो तो आणि नेमकी तीच मुंबईने काढून घेतली. बॅटिंगमध्ये ३८ वर्षाच्या रोहितला २०-२२ वर्षाच्या पोरांसोबत कुठे कंपेअर करताय. तो मागेच पडणार तिथे पण त्याची बॅटिंग बघणे आणि त्याने मारलेले एक एक फटके बघणे हा एक सोहळा असतो जो कुठल्याच बॅट्समनला अजून जमला नाही.

ऑस्ट्रेलिया टेस्ट दौरा २०२४-२५. खराब फॉर्ममुळे रोहितने म्हणे एक सामना स्वतःच बाहेर बसायचा निर्णय घेतला. समालोचकाच्या भूमिकेत असलेल्या माजी खेळाडूने त्याला याबद्दल छेडले. तेव्हा तो मैं कहीं नहीं जा रहा हूं. मी पुन्हा येईन असं म्हणाला. त्याचे फॅनबॉइजपण तेच म्हणत होते.
पण बॉक्सिंग डे टेस्ट त्याचा शेवटचा कसोटी सामना ठरला.
तेव्हा फॅन बॉइज म्हणे की रोहित टेस्टसाठी इतका काही चांगला नव्हता.
वन डे आणि टी ट्वेंटी मध्ये आणखी काही काळ खेळतो आहे. जिंकलाही आहे. तर आता म्हणे पुढचा वर्ल्ड कप पण खेळणार. वय झालं हे मान्य करा. इतर गोष्टींवर खापर कशाला फोडायचं?

त्याची रिटायरमेंट त्याने जाहिरातींत एनकॅश केली सुद्धा. आता म्हणतोय मैं हमेशा शांती साथ में रखता हूं. त्याच्या फॅनबॉइजनी पण तेच करावं.

तिकडे संघात प्रवेश मिळावा म्हणून इतके फलंदाज दारावर धडका मारताहेत.

रोहित अजून काही वर्षे खेळला तरी काही हरकत नाही. त्याची बॅटिंग बघण्यात जी मजा आहे ती इतर कुठल्याही फलंदाजात नाही. भारतीय संघात येऊन बाकीचे खेळाडू काय मोठे दिवे लावणार आहेत. पाकिस्तान ऑस्ट्रेलिया यांच्या गोलंदाजांसमोर थरथर कापतील. एक दोन जणांना विचार करूनच हार्ट अटॅक येईल. त्यामुळे ते बाहेर आहेत तेच त्यांच्यासाठी सोयीस्कर आहे. इंटरनॅशनल क्रिकेट हे युद्ध आहे आणि आयपीएल ही लग्नाची वरात आहे. रोहित शर्मा बुमरा हे युद्धातले घोडे आहेत आणि युद्ध के घोडे बारात मे नही नाचते.

<<< म्हणजे कोणी तरी इतरत्र काही म्हणाले त्याचे उत्तर तू इथे दिलेस
>>>

मी कोणालाच दिलेले उत्तर नाही.
तो सोशल मीडियावर फिरणारा एक फोटो आहे जो मी बनवला नाही.
तुम्ही रोहितचे गेले तीन सीजन स्कोअर चांगले आहेत हे दिले त्यावरून ते आठवले आणि इथे कॉपी पेस्ट केले.

असो,
ते सोडा... जे तुम्हाला वाटेल ते ठीक.

पण रोहीत शर्मा विषय निघताच कधी न दिसणारे चेहरे सुद्धा आता फॉर्मात येतील त्यांची मजा बघूया Happy

@ बोकलत,
<<<<
रोहित अजून काही वर्षे खेळला तरी काही हरकत नाही. त्याची बॅटिंग बघण्यात जी मजा आहे ती इतर कुठल्याही फलंदाजात नाही.
>>>>

दुसऱ्या वाक्याशी सहमत! क्रिकेट किंवा कुठल्याही खेळामध्ये जिंकणे महत्त्वाचे असतेच. पण तो खेळ बघताना आनंद मिळणे सर्वात जास्त गरजेचे आहे. तो मला सुद्धा रोहीत देतो. पण अर्थात कितीही वर्षे खेळला तर त्याचा खेळ असाच राहणार नाही आणि तो आनंदच येणार नाही. त्यामुळे २०२७ वर्ल्डकप तो खेळावा आणि तो आपण जिंकावा हेच आता देवाकडे मागणे आहे.

ही rcb जिंकू दे त्याबद्दल काही नाही पण ते जिंकले की वाईट घटनांचा सुळसुळाट होतो एकामागोमाग त्यामुळे नको वाटतं. rcb फॅन जो काय धिंगाणा घालतात ते पाहून नियती कोपते आणि मग…
जाऊ दे नको त्या वाईट घटना उकरून काढायला.

[31/05, 21:23] Abhishek Naik: Result
RCB vs GT, 42nd Match
Indian Premier League

RCB 155
GT 158/6
GT won by 4 wickets (with 25 balls remaining)

Click here to view more @espncricinfo :https://www.espncricinfo.com/series/ipl-2026-1510719/gujarat-titans-vs-r...

[31/05, 21:23] Abhishek Naik: या दोघांतील हा सामना सेम ग्राउंड आणि सेम पिचवर झालेला.
आणि आता exact सेम टारगेट आहे.
फक्त आता गुजरातने दिले आहे.

RCB's 8 different captains:

Rahul Dravid (2008)

Kevin Pietersen (2009)

Anil Kumble (2009–2010)

Daniel Vettori (2011–2012)

Virat Kohli (2011–2021)

Shane Watson (2017)

Faf du Plessis (2022–2024)

*Rajat Patidar (2025–2026)*
*2 years 2 Trophy*

*Player of the IPL Tournament*

*2026: Vaibhav Sooryavanshi (Rajasthan Royals)*

2025: Suryakumar Yadav (Mumbai Indians)

2024: Sunil Narine (Kolkata Knight Riders)

2023: Shubman Gill (Gujarat Titans)

2022: Jos Buttler (Rajasthan Royals)

2021: Harshal Patel (Royal Challengers Bangalore)

2020: Jofra Archer (Rajasthan Royals)

2019: Andre Russell (Kolkata Knight Riders)

2018: Sunil Narine (Kolkata Knight Riders)

2017: Ben Stokes (Rising Pune Supergiant)

2016: Virat Kohli (Royal Challengers Bangalore)

2015: Andre Russell (Kolkata Knight Riders)

2014: Glenn Maxwell (Punjab Kings)

2013: Shane Watson (Rajasthan Royals)

2012: Sunil Narine (Kolkata Knight Riders)

2011: Chris Gayle (Royal Challengers Bangalore)

2010: Sachin Tendulkar (Mumbai Indians)

2009: Adam Gilchrist (Deccan Chargers)

2008: Shane Watson (Rajasthan Royals)

आरसीबी - जोरदार अभिनंदन!! ते संपूर्ण स्पर्धेत विजेत्यांसारखे खेळले. विको आणि भुवी ची धावा / विकेट्स ची आणि टीमला जेतेपद मिळवून देण्याची भूक, त्यामागची स्वयंशिस्त आणि कष्ट घेण्याची तयारी आदर्शवत आहे.

पाटीदार चं नेतृत्व, कृणाल ची स्वतःच्या मर्यादांमधे राहून गरज पडेल तिथे उभं रहाणं, हेझलवूड, सॉल्ट, डेव्हिड, पड्डिक्कल, अय्यर, रसिख - सगळ्यांची साथ - हे सगळं जुळून आलं. ए साला कप नामदु!!

Vaibhav Sooryavanshi is the Most Valuable Player – 436.5 points

Vaibhav Sooryavanshi wins the Orange Cap for being the highest run-getter – 776

Kagiso Rabada wins the Purple Cap for being the highest wicket-taker – 29 scalps

Punjab Kings win the Fairplay award

KKR's Manish Pandey wins the award for the Catch of the Season for taking Tim David's catch at backward point. Devdutt Padikkal collects the award on his behalf

Mohammed Siraj wins an award for bowling the most dots – 172

Sai Sudharsan wins the award for the most fours – 75

Vaibhav Sooryavanshi wins the award for hitting the most sixes – 72

Vaibhav Sooryavanshi is the Super Striker (for the highest strike rate of 237), and the 15-year-old wins a car

Vaibhav Sooryavanshi gets the Emerging Player of the Season award

आरसीबी - जोरदार अभिनंदन!! ते संपूर्ण स्पर्धेत विजेत्यांसारखे खेळले. >> +१. मुंबई च्या शेवटच्या ट्रॉफी जिंकण्याच्या वेळी असेच डॉमिनेट केले होते ते आठवले. पुढचे वर्ष अजून संधी असेल त्यांना जिंकण्याची. नंतर महा लिलाव होत असल्यामूळे रिसेट होईल बहुधा.

मागे वाचलेले ते आठवले कि, जनरली आयपील संघामधे तीन ग्रूप असतात - बाहेरचे इंपॅक्ट्फुल, इंडीयन्स स्टार नि नवशिके. शेवटचा ग्रूप कंसिस्टंटली खेळला तर टिम ला प्लेऑफ रन करयला सोपे जाते पण एलिमिनेटर्स नि फायनल जिंकायला पहिल्या दोघांना पुढाकार घ्यावा लागतो. तुम्हाला पटते का ?

पांड्या सीएसके ला जाणार अशा वावड्या उठल्या आहेत. सॅमन्सन असताना अजून एक का हे कळत नाही.

आयपीएल मध्ये consolation prize ची तरतूदही असती, तर श्रेयस अय्यर, भुवनेश्वर कुमार, जेसन होल्डर इ. नावंही वाचायला मिळाली असती ! Wink
*सॅमन्सन असताना अजून एक का हे कळत नाही.* कारण, त्याची क्रिकेटमधील वाटचाल बघता , सॅमसनला सुखासुखी कांहींच मिळू द्यायचं नाही, हे त्याच्या जन्मकुंडलीतच लिहिलेलं असावं !! Wink

संजू विकेट कीपर आहे
हार्दिक पांड्या अष्टपैलू
दोघे एकाच संघात का असू शकत नाही हे समजले नाही?

हार्दिक पांड्या तिथे सुद्धा कप्तानीचा हट्ट धरेल आणि संजूचा चान्स जाईल, संघातील वातावरण पुन्हा मुंबई इंडियन्स सारखे बिघडेल अशी भीती आहे का?

Pages