Submitted by कृष्णा on 13 October, 2025 - 07:56
जुना धागा २००० पार होऊ लागला म्हणून हा नविन धागा.
इथे जुना धागा आहे...
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
जुना धागा २००० पार होऊ लागला म्हणून हा नविन धागा.
इथे जुना धागा आहे...
साधारणपणे दरवेळी जो कप्तान
साधारणपणे दरवेळी जो कप्तान असतो त्याच्या आयपीएल टीमचे प्लेअर भारतीय संघात जास्त दिसतात >> +१ आयपीएल टीमचे प्लेअर असले तरी हरकत नाही फक्त ज्या फॉर्मॅट साठी सिलेक्ट केले जातात त्याला सुटेबल असावेत एव्हढीच माफक अपेक्षा ठेवूया.
पराग इंज्युअर्ड झाल्यावर ऋतुराज एकदम व्हाईस-कॅप्टन म्हणून टीममधे आला. >> हो ते विसरलोच होतो. उद्या र्हुण्म्या कप्तान नि मी वाईस कप्तान झालो तरी आश्चर्य वाटू नका देऊ
वाईस कॅप्टन मला वाटते
वाईस कॅप्टन मला वाटते कर्णधारपदाचा अनुभव कोणाला जास्त आहे त्याला बनवत असावेत. जर त्या प्लेयरचा फॉर्म खराब असेल तर तो संघाबाहेर जात असावा. पण तेच जर तो संधी मिळून आत आला तर पुन्हा थेट वाईस कॅप्टन बनवत असावेत. कारण कप्तान फिल्डवर नसताना जर कोणाला कप्तानी करायची असेल तर तो कप्तानीचा अनुभव असलेला खेळाडू असणे कधीही चांगले.
अरे हा तर मरत मरत संघात आला आणि याला डायरेक्ट व्हाईस कॅप्टन केला असा विचार करता कामा नये. एकदा संघात आल्यावर प्लेइंग ११ मध्ये तो व्हाईस कॅप्टन म्हणून सर्वात उत्तम पर्याय आहे तर त्याला करत असतील.
गिलला इतक्या तरुण वयात सर्व
गिलला इतक्या तरुण वयात सर्व फॉरमॅटचा कर्णधार बनवताना त्याच्याकडे असं काय यशस्वी/ चाणाक्ष कर्णधार म्हणून अनुभवाचं गाठोडं होतं किंवा त्याच्यात नेतृत्वाच्या गुणाचं असं काय दिव्यत्व जाणवलं होतं ? त्यामुळे, कुणालाही उपकर्णधार करताना निवडसमिती इतका खोलवर विचार ( इथे होतोय तितका ) करत असेल, असं मला तरी वाटत नाही.
गिल गुजरातचा कर्णधार होता पण
गिल गुजरातचा कर्णधार होता पण ते सोडा, ते महत्वाचे नाही.
खरे कारण हे आहे की तो भारताचे भविष्य आहे. पुढची दहा-बारा वर्षे तो नक्की खेळणार आणि त्याची जागा वन डे आणि कसोटी दोन्ही संघात कायम पक्की असणार असे आपण त्याच्याबद्दल म्हणू शकतो जे इतर कोणाबद्दल नाही त्यामुळे तो कर्णधार आहे.
गिल विषयी भाऊंशी सहमत आहे. ही
गिल विषयी भाऊंशी सहमत आहे. ही परंपरा जुनी असावी. व्यंकटरामन पण असाच व्हाईस कॅप्टन झाला होता ना?
“वाईस कॅप्टन मला वाटते कर्णधारपदाचा अनुभव कोणाला जास्त आहे त्याला बनवत असावेत” आणि “पुढची दहा-बारा वर्षे तो नक्की खेळणार आणि त्याची जागा संघात कायम पक्की असणार” - हे दोन टोटली वेगळे आणि असंलग्न मुद्दे आहेत.
*पुढची दहा-बारा वर्षे तो
*पुढची दहा-बारा वर्षे तो नक्की खेळणार आणि त्याची जागा...* कर्णधार पदासाठी हा निकष दुय्यम आहे व असावा. इंग्लंडच्या माईक ब्रिअर्ली सारखी उदाहरणे आहेत जिथे केवळ चाणाक्ष कर्णधार म्हणुनच संघातली जागा निश्चित होते ! वाडेकर अतिशय उच्च दर्जाचा व आकर्षक फलंदाज होता पण प्रत्यक्ष फलंदाजीतल्या यशामुळे नव्हे तर त्याच्या असामान्य नेतृत्व गुणांमुळे त्याचं संघातलं स्थान अढळ होतं.
गिल आपला सर्वोत्कृष्ट फलंदाज
गिल आपला सर्वोत्कृष्ट फलंदाज आहे म्हणून कर्णधार आहे असे म्हणत नाहीये. एखादा सेकंड बेस्ट थर्ड बेस्ट फलंदाज असता पण त्याची संघातली जागा पक्की असती तर त्याला कर्णधार करता आले असते.
सध्या इतके पर्याय उपलब्ध असताना संघात जागा पक्की असलेले खेळाडू तसे फार कोणीच नाही. त्यामुळे हा महत्त्वाचा मुद्दा ठरला आहेच.
अन्यथा त्या हिशोबाने तर रोहित शर्मा करणारा हवा होता ना
कारण प्लेइंग इलेव्हन मधील सर्वोत्कृष्ट कर्णधार तोच आहे..
पण विचार करा तुम्ही आता एखाद्याला कर्णधार केला आणि त्याची २०२७ वर्ल्ड कप ला संघातच जागा नाही बनली तर तुम्ही आयत्यावेळी दुसरा कर्णधार निवडून त्या अंडर टीम तयार करणार का?
बाकी कोणी असा खेळाडू आहे का की कितीही साधारण खेळला आणि संघात खेळाडू म्हणून जागा पक्की नसली तरी तो गिलपेक्षा इतका सरस कर्णधार आहे की निव्वळ कर्णधार म्हणूनही संघात खेळू शकतो तरच भाऊ वर म्हणतात तसे उदाहरण लागू.
*...तो गिलपेक्षा इतका सरस
*...तो गिलपेक्षा इतका सरस कर्णधार आहे की निव्वळ कर्णधार म्हणूनही..* गिलच्या मूळ निवडीबद्दलच बोलताना त्याचाच मानदंड म्हणून उल्लेख कसा करता येईल ? मी खूप विश्लेषणात्मक लिहित बसणार नाही, पण श्रेयस अय्यरचा त्यावेळी तेजोभंग करून आता नाईलाजाने त्याला गोंजारणारी ही निवडसमिती आहे असं मला वाटतं; जेव्हा श्रेयसला चांगल्या नेतृत्वाचा अनुभव होता, टेम्परामेंट छान होतं, प्रगल्भता स्वच्छ जाणवत होती व त्याच्याकडे मधल्या फळीतली विश्वासार्ह फलंदाजी होती, तेंव्हा त्याला कर्णधार करायचा नव्हता - व गिललाच करायचा होता - म्हणूनच त्याला टीमच्याच बाहेर ठेवलं , असं समजायचं का ?
Stumps
Stumps
India vs Afghanistan, Only Test
AFG 113/5 (39.5 ov)
IND 564/8d
Rahmat Shah* 43(81)
*Manav Suthar 3/21 (15.5 ov)*
Day 2 - Afghanistan trail by 451 runs.
श्रेयस अय्यर बाबत सहमत.
श्रेयस अय्यर बाबत सहमत.
तो कप्तान झाला तेव्हाच मी म्हटले की त्याचे कुणाशी तरी वाकडे होते ते संबंध सुधारले वाटते.
बाकी गिलचे कसोटी आणि वनडे दोन्हीमध्ये स्थान पक्के आहे.
अय्यर कसोटी आणि ट्वेंटी मध्ये तेव्हा नव्हता.
पुढे जाऊन अय्यर स्थिरावला आणि गिलची कप्तानी समाधानकारक झाली नाही तर ट्वेंटी आणि वनडे अशी white बॉल कप्तानी अय्यरकडे येऊ शकते.
रोहीत शर्मानंतर अय्यरला वनडे कप्तान केला असता तर ट्वेंटी मध्ये सूर्या आणि कसोटीमध्ये गिल असे तीन वेगळे कप्तान झाले असते. जे आपण या आधी केले नाहीये.
*फुटबॉल वर्ल्ड कप सुरू होतोय
*फुटबॉल वर्ल्ड कप सुरू होतोय त्यावर धागा काढा.* - बोकलत यांच्या ह्या पोस्टला +१ करायचं राहूनच गेलं होतं !
*फुटबॉल वर्ल्ड कप सुरू होतोय
*
अय्यर कसोटी आणि ट्वेंटी मध्ये
अय्यर कसोटी आणि ट्वेंटी मध्ये तेव्हा नव्हता. >> अय्यर गिलच्या आधी कसोटी खेळला नि वन डेही (बहुधा). भावी कर्णधार म्हणून त्याच्याकडे तेंव्हापासून बघितले जात होते. तो मुंबई नि डोमेस्टिक मधे पण कप्तान होता वगैरे. नक्की काय कोणाबरोबर बिनसले ते देव जाणे. त्याच्याबद्दल भाऊंनी व्यक्त केलेल्या मुद्द्यांना अनुमोदन. त्याचबरोबर "पुढची दहा-बारा वर्षे तो नक्की खेळणार आणि त्याची जागा वन डे आणि कसोटी दोन्ही संघात कायम पक्की असणार" हेही गिलबद्दल मान्य पण गिलने गिजराथ मधेही काही असे जबरदस्त टॅक्टिकल अॅच्युमेन दाखवल्याचे लक्षात येत नाही - वासरात लंगडी गाय शहाणी हा प्रकार अधिक जाणवतो.
मी सुद्धा तेच तर म्हणत आहे की
मी सुद्धा तेच तर म्हणत आहे की गिल ने काहीही विशेष कप्तानीत केले नाहीये. त्याची जागा दोन्ही संघात फिक्स आहे यामुळे तो कर्णधारपदाचा प्रबळ दावेदार ठरला.
अय्यरने कसोटी पदार्पण आधी केले त्याने काय फरक पडतो. तो नंतर कसोटी संघाबाहेर पडला होता हे महत्त्वाचे. ते देखील कसोटी कप्तानी बदल होण्याच्या बरेच आधी..
फुटबॉलच्या जवळपास सगळ्या
फुटबॉलच्या जवळपास सगळ्या मॅचेस मध्यरात्रीनंतर आहेत. पहाटे उठा नाहीतर पहाटे झोपा अशी सिचुएशन आहे.
ते आपल्यासाठी...अमेरिकेत उलटे
ते आपल्यासाठी...अमेरिकेत उलटे
जाऊ दे.. तसेही आपला देश नाहीये त्यात
दुसऱ्या देशांना खेळताना बघण्यापेक्षा तुम्ही तिथे आपल्या देशासाठी कोकरोच पार्टी जॉईन करून काहीतरी करा..
गिल ला नुसतं कर्णधारपद च नाही
गिल ला नुसतं कर्णधारपद च नाही. अन्यत्र ही झुकत माप मिळालं आहे.
तो आला ओपनर म्हणून. जेव्हा तिथे धावा होईनात अन् पुजारा चा स्लॉट मोकळा झाला तेव्हा 3 वर घसरला. तिथेही मनासारखं झालं नाही मग कोहली गेल्यावर कॅप्टन बनून 4 वर आला.
गेल्या काही वर्षात, इतक्या संधी बाकी कुणाला मिळाल्या आहेत?? का बाकी कुणाच्याही तुलनेत गिल टोटली वेगळ्याच दर्जाचा वगैरे आहे??
अय्यरने कसोटी पदार्पण आधी
अय्यरने कसोटी पदार्पण आधी केले त्याने काय फरक पडतो >> मी अतिशय नम्रतेने त्या वाक्याच्या पुढच्या २-३ वाक्यांकडे आपले लक्ष वेधू इच्छितो. - अय्यर गिलच्या आधी कसोटी खेळला नि वन डेही (बहुधा). भावी कर्णधार म्हणून त्याच्याकडे तेंव्हापासून बघितले जात होते. तो मुंबई नि डोमेस्टिक मधे पण कप्तान होता वगैरे. नक्की काय कोणाबरोबर बिनसले ते देव जाणे.
भारत पाक ट्वेंटी वर्ल्डकप..
भारत पाक ट्वेंटी वर्ल्डकप.. बघताय ना..
स्मृती मस्त मारतेय पुढे येऊन.
फुटवर्क आणि टायमिंग बघायला मजा येतेय
दादाची आठवण झाली..
हल्ली पुरुषांच्या ट्वेंटी क्रिकेटमध्ये हे लोप पावले आहे. जागेवरून बॅट फिरवली की सिक्स मिळतात तर कोण कश्याला फुटवर्क दाखवत क्रिझ सोडतेय.
170 - चांगलं लक्ष्य ठेवलंय
170 - चांगलं लक्ष्य ठेवलंय पाकच्या विरुद्ध.
* स्मृती मस्त मारतेय पुढे येऊन.* +१. आत्मविश्वास खूप वाढलाय ह्या टीमचा एकदिवसीय वर्ल्डकप जिंकल्यापासून !
मी लास्टची ओव्हर बघणार आहे.
मी लास्टची ओव्हर बघणार आहे. भारत जिंकणार यापेक्षा हँडशेक नाही झाल्यावर पाकिस्तानी मीठ लागलेल्या गांडुळासारखे वळवळ करतात ते बघायला मज्जा येते.
बायका सुद्धा करत नाहीत का?
बायका सुद्धा करत नाहीत का? हँडशेक
नाही करत. बायका जास्त डेंजर
नाही करत. बायका जास्त डेंजर आहेत.
आत्मविश्वास खूप वाढलाय ह्या
आत्मविश्वास खूप वाढलाय ह्या टीमचा एकदिवसीय वर्ल्डकप जिंकल्यापासून !>> +१
https://www.instagram.com
https://www.instagram.com/reel/DZ7b4tcz0Rn/?igsh=bmdyMnJleGI4Zmpi
राष्ट्रपती Droupadi Murmu यांनी 23 जून 2026 रोजी नवी दिल्लीतील राष्ट्रपती भवन येथे आयोजित विशेष समारंभात माजी भारतीय कर्णधार *Rohit Sharma* यांना प्रतिष्ठित पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले. भारतीय क्रिकेटमधील त्यांच्या उत्कृष्ट योगदानासाठी, विशेषतः देशाला टी-20 विश्वचषक जिंकून देण्यासाठी त्यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला.
अभिनंदन Hitman!!
१ रनने आयर्लंड विजयी.
१ रनने आयर्लंड विजयी.
मुली हरल्या त्याचे जास्त दुःख
मुली हरल्या त्याचे जास्त दुःख झाले आज.
आयर्लंड जिंकले ते उलट बरे वाटले.
पोरी हारणारच होत्या.
पोरी हारणारच होत्या. ऑस्ट्रेलिया भारी टीम आहे. सगळे ग्रह एका रेषेत आले होते म्हणून त्या वर्ल्ड कप जिंकल्या.
आज मुलाच्या एका मित्राकडे
आज मुलाच्या एका मित्राकडे गेलो होतो. त्याला सांगितले होते. पोहे करू नकोस. ऐकले नाही. हरलो दोन्ही.
कर्तृत्वाला नशिबाची जोड
कर्तृत्वाला नशिबाची जोड थोडीफार हवीच.
काल सुद्धा ऑस्ट्रेलियासमोर हरमनप्रीतच खेळली. स्मृती आणि जेमि संथ खेळल्या नसत्या आणि 15-20 धावा जास्त असत्या तर प्रेशर टाकता आले असते.
ऑस्ट्रेलिया सोबत गेल्या तीन ट्वेंटी वर्ल्डकपमध्ये हरमनने सलग तीन अर्धशतक मारले आहेत.
गेल्या जिंकलेल्या वनडे वर्ल्डकप मध्ये देखील ऑस्ट्रेलियासमोर तिच्याच 80-90 धावा फास्ट आल्याने जेमीला नंतर नांगर टाकता आलेला. आधी तिच्या वेगवान खेळीनेच आशा दाखवली.
पण तिची 2017 ची ऑस्ट्रेलियाला सेमीफायनलमध्ये नोकआउट करतानाची 115 बॉल 171 नाबाद इनिंग या सर्वात स्पेशल होती. कदाचित बायकांच्या वर्ल्डकप इतिहासातील आजवरची बेस्ट असावी!
पण नंतर फायनलमध्ये इंग्लड समोर आपण हातातला सामना कसा घालवला हे आठवून आजही त्रास होतो. एवढा बेकार कॉलेप्स मी त्या आधी 96 वर्ल्डकपला वेस्टइंडीजचा ऑस्ट्रेलिया समोर पाहिलेला. पण तो आपला नसल्याने त्रास नव्हता झालेला.
आणि त्यानंतर 2023 ट्वेंटी वर्ल्ड कप सेमीचा चटका. पुन्हा हरमनप्रीतचे 34 बॉल 52. सामना फक्त क्लोज करायचा बाकी होता. पण तिची बॅट अडकली आणि रन आउट झाली. अन्यथा तो एक वर्ल्डकप सुद्धा तिने जिंकून दिला असता.
या दोन्ही मॅचेस लाईव्ह बघण्याचे दुर्भाग्य माझ्या नशिबात होते. त्यामुळे नशीब लागतेच हे मान्य. पण तरीही तिच्यासाठी एकदा टाळ्या!
Pages