Submitted by कृष्णा on 13 October, 2025 - 07:56
जुना धागा २००० पार होऊ लागला म्हणून हा नविन धागा.
इथे जुना धागा आहे...
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
जुना धागा २००० पार होऊ लागला म्हणून हा नविन धागा.
इथे जुना धागा आहे...
आज आपला पहिला सामना खेळणारा
आज आपला पहिला सामना खेळणारा अर्जुन तेंडुलकर चर्चेचा विषय होता आणि त्याने ऑल राउंड कामगिरी केली.
फलंदाजीत नाबाद 5 धावा. म्हणजे एव्हरेज वाढला.
गोलंदाजीत 1 विकेट. त्याच्या गोलंदाजीवर कॅच नसती सुटली तर 2 असत्या.
4 ओवर मध्ये फक्त 36 धावा. म्हणजे फक्त 9 ची इकॉनॉमी जी सर्वात बेस्ट होती. इतर चारही गोलंदाजांना 10+ धावांनी चोपले आहे.
क्षेत्ररक्षणात 1 कॅच. लखनौने केवळ तीच एक कॅच पकडली. इतर कोणीच नाही.
अर्जुनच्या संदर्भात मला आणखी
अर्जुनच्या संदर्भात मला आणखी एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते व ती म्हणजे आपल्या क्रिकेटमध्ये घराणेशाही कुणीही राबवत नाही किंवा राबवून घेतली जात नाही. गावसकरांचही उदाहरण ठळक आहेच.
पंजाबचे सुरुवातीच्या सलग
पंजाबचे सुरुवातीच्या सलग मॅचेस जिंकून नंतरच्या सलग हरणे, नि प्लेॲाफ्स ला न जाणे जाम खटकले…
बंगलोर विरुद्ध गुजरात -
बंगलोर विरुद्ध गुजरात -
250+ करतील गुजरात ?
गुजरात - 70 - 6 ( 10 ओव्हर्स)
गुजरात - 70 - 6 ( 10 ओव्हर्स) !!!
पाटीदार भारी आहे. कन्सिस्टंट
पाटीदार भारी आहे. कन्सिस्टंट इम्पॅक्ट इनिंग खेळतोय. कप्तानी सुद्धा करतोय.
RCB चा १८ वर्षांचा दुष्काळ संपवला आणि आता अजून एका ट्रॉफीकडे वेगाने जातोय.
आणि भुवनेश्वर कुमार तर बदाम बदाम बदाम!
कोणाला समजायला मार्ग नाही त्याचा बॉल आत येतो की बाहेर जातो..
गुजराथ ची बॉलिंग तगडी आहे, पण
गुजराथ ची बॉलिंग तगडी आहे, पण तीच आज पाटीदारच्या तडाख्याखाली आली. त्यांची बॅटिंग नेहमीच तीनखांबू तंबू होता आणि तो आज कोसळला.
उद्या हैद्राबाद-राजस्थान. आत्तातरी हैद्राबादचं पारडं जड वाटतंय. बघू, उद्या काय होतं ते
बँगलोर ने २-३ अतिशय महागडे
बँगलोर ने २-३ अतिशय महागडे खेळाडू घेण्याचा अट्टाहास थांबवून व्ह्यॅल्यू अॅडेड प्लेयर्स मधे इंवेस्ट करायला सुरूवात केल्यानंतर सगळेच बदलले आहे त्यांचे. खरं पाहता तेच पंजाब, लायन्स पण करत आहेत. आय्कॉन प्लेयर्स ना ४०-५०% बजेट देऊन मग बाकीचे सब लेव्हल चे खेळाडू घेण्यापेक्षा हे जास्त चांगले मॉडेल आहे का ?
आपल्या क्रिकेटमध्ये घराणेशाही कुणीही राबवत नाही किंवा राबवून घेतली जात नाही. >> +१ आपल्याकडे सिलेक्टरशाही राबवली जाते भाऊ
*आपल्याकडे सिलेक्टरशाही
*आपल्याकडे सिलेक्टरशाही राबवली जाते .. * - पूर्वी निवडसमितीचं अध्यक्षपद आळीपाळीने प्रत्येक विभागाकडे जात असे, असं आठवतं. त्यामुळे, निवडसमिती पक्षपाती असणं, याला अधिकृत मान्यताच मिळाली असावी. नंतर, तो पक्षपातीपणा विभागीय खेळाडूंच्याच बाबतीत मर्यादित न राहता अलगदपणे वैयक्तिक पातळीवर आला असावा !
हा वैभव सूर्यवंशी असामान्य
हा वैभव सूर्यवंशी असामान्य प्रतिभाशाली आहे व व्यवस्थित प्रशिक्षण झालं तर भारताचं नांव दीर्घ काळ दुमदुमत ठेवेल अशी दाट शक्यता आहे!
आज 18 चेंडूत अर्धशतक, 28 चेंडूत 97 ( 12 षटकार 5 चौकार !!! )
मला त्याला फिरकी गोलंदाजी
मला त्याला फिरकी गोलंदाजी खेळताना बघायचा आहे.
*मला त्याला फिरकी गोलंदाजी
*मला त्याला फिरकी गोलंदाजी खेळताना बघायचा आहे. "-
त्यासाठी त्याला आधी राष्ट्रीय संघात घेऊन परदेशी संघांबरोबरच खेळवावं लागेल !!
सिरीयसली, बचावात्मक खेळ, स्पिन विरुद्ध टिकाव व आक्रमण, परदेशी वातावरण व पिचेस, बिग गेम टेम्परामेंट इ. अनेक पैलूंवर त्याला मेहनत घ्यावी लागेलच. पण, मूलभूत प्रतिभा व आत्मविश्वास वादातीत आहे, असं वाटतं.
मूलभूत प्रतिभा व आत्मविश्वास
मूलभूत प्रतिभा व आत्मविश्वास वादातीत आहे, असं वाटतं. >> हो नक्कीच पण मला अगदी टी २० मधेही त्याला दहा ओव्हर्स नंतर कोणत्याही स्पिनर समोर खेळायला बघायला आवडेल
भारताच्या टी २ ० कप विजेत्या संघातील फक्त अभिशेक, किशन नि थोडाफार वरूण हेच काय ते आयपील मध कंसिस्टंट खेळले. संजू, तिलक काही भारी इनिग्स खेळले. दुबे नि रिंकू एखाद दुसरी इनिंग खेळले. बुमरा ने काय केले हे सांगणे कठीण आहे. बाकी कुलदीप, स्काय, हार्दिक, अर्शदीप टोटल फ्लॉप गेले.
*मला अगदी टी २० मधेही त्याला
*मला अगदी टी २० मधेही त्याला दहा ओव्हर्स नंतर कोणत्याही स्पिनर समोर खेळायला बघायला आवडेल-
कदाचित आजच मिळेलही ती संधी तुम्हाला !
मिळाली मिळाली. त्याने मस्त
मिळाली मिळाली. त्याने मस्त हँडल केले. पण ह्याच्बरोबर हेच जाणवले कि कोणी तरी त्याच्या फिटनेसवर मेहनत घ्यायला हवी. स्पिनर्स ना खेळताना जे फूटवर्क हवे (विशेषतः बॉलपर्यंत पोहोचून मारायला) ते सोपे होऊन जाईल जेणेकरून क्रिजमधून पॉवर जनरेट करून मारणे हा एकमेव पर्याय त्या प्रतिभाशाली प्लेयरला राहणार नाही. बाकी हाय बॅकलिफ्ट असतानाही होल्डरला मारलेले टेनिस फोरहँड शॉट काहीच्या काही अवाक करणारे होते.
त्याला कधी सिनियर संघामधे आणणार हे बघणे कुतूहलाचे असेल. गावस्कर ने सिनियर खेळाडूची कुर्बानी त्यासाठी द्यायला हरकत नाही असे म्हटलय. हा सिनियर खेळाडू स्काय असावा का ?
हार्दिक पांड्या से छिनने वाली
हार्दिक पांड्या से छिनने वाली है मुंबई इंडियंस की कप्तानी! MI में बड़ी हलचल; कौन बनेगा नया कप्तान?
PTI से बातचीत में सूत्र ने कहा, "हार्दिक मानसिक रूप से तनाव में थे और पूरी तरह थक चुके थे। उन्हें पीठ में चोट भी लगी थी। प्लेऑफ की उम्मीद खत्म होने के बाद हार्दिक ने निर्णय लेने वाले लोगों को बता दिया था कि वह टीम के साथ नहीं रुकेंगे। हार्दिक 32 साल के हैं। कप्तान बनने के बाद पहले साल उन्हें दर्शकों के विरोध का सामना भी करना पड़ा था।"
हार्दिक ने IPL 2026 में 10 मुकाबले खेले और इसकी 10 पारियों में 22.88 की औसत से 206 रन बनाने में सफल रहे। उनकी स्ट्राइक रेट 138.25 की रही। उनका सर्वश्रेष्ठ स्कोर 40 रन रहा। गेंदबाजी में उन्हें 9 पारियों में सिर्फ 4 विकेट मिले।
घटनाक्रम से जुड़े सूत्रों ने NDTV को बताया कि मुंबई इंडियंस का अगला कप्तान वही होगा जिसे रोहित शर्मा का आशीर्वाद मिलेगा
मैनेजमेंट ने 2023 में रोहित की जगह हार्दिक को कप्तान बनाने के खराब फैसले से सबक लिया है. ज़ाहिर है मुंबई के मालिक अब टीम का अगला कप्तान चुनते वक़्त पिछली स्थिति से बचना चाहेंगे. इसलिए, मुंबई इंडियंस टीम के सबसे बड़े नाम रोहित, अगले कप्तान को चुनने में अहम भूमिका निभाने वाले हैं.
"त्याने मस्त हँडल केले" - आज
"त्याने मस्त हँडल केले" - आज वेगळ्याच मॅच्युरिटीने खेळला वैभव, पण रॉयल्स फायनल पर्यंत नाही पोहोचू शकले.
आता रविवारी आरसीबी वि. जीटी!! किंग वि. प्रिन्स!!
हार्दिक पांड्या से छिनने वाली
हार्दिक पांड्या से छिनने वाली है मुंबई इंडियंस की कप्तानी! >> पांड्याने ह्या वेळच्या इंजरी नंतर जेंव्हा मुंबई बाद फेरीत जाणार नाही हे उघड झाले तेंव्हा मॅनेजमेंट कडे मुंबई मधून बाहेर पडायची इच्छा व्यक्त केली असे वाचलेले. त्यामागे मेंटल फटीग हे कारण दिले होते. जे लोक मी संघात कप्तान नसताना माझ्याकडून १००% कामगिरीही अपेक्षा करतात ते मी कप्तान झाल्यावर स्वःतः मात्र कॅज्युअली खेळत होते असे त्याने त्याच्या रिप्र्ट मधे म्हटले अशी बातमी होती. खरे खोटे माहित नाही. पण खरे असेल तर त्याचा उद्देश कोणाकडे आहे हे उघड आहे.
पांड्यापाठी आता तिलकचा बळी जाऊ नये अशी आशा करूया.
पांड्या कर्णधार झाल्यापासून
पांड्या कर्णधार झाल्यापासून मुंबईचा संघ एकसंध वाटलाच नाहीये. एखादा चॅम्पियन संघ हरतानाही जो लढायचा जजबा दिसतो तो या काळात मुंबईच्या संघात दिसलाच नाही. बॉडी लँग्वेज बघूनच हे जाणवते.
रोहीत शर्माला कर्णधारापदावरून काढणे मुंबईची विनाशकाले विपरीत बुध्दी होती. भारताच्या लीडरशिप ग्रूपमधून पांड्या जाणीवपूर्वक दूर ठेवतात पण दीड शहाण्या मुंबईने रोहीत शर्माला तडकाफडकी काढून त्याला कर्णधार करायचा वादग्रस्त निर्णय घेतला जो नंतर हास्यास्पद ठरला.
कारण त्यानंतर मुंबई इडियन्सचा औरा जणू संपलाच. पण दुसरीकडे रोहीत शर्माने मात्र भारताला एकही सामना न गमावता ट्वेंटी वर्ल्डकप आणून दिला. अगदी तशीच चॅम्पियन ट्रॉफी आणून दिली. त्याची लीगसी पुढे नेत सूर्यानेही ट्वेंटी वर्ल्डकप आणून दिला.
मुंबई मॅनेजमेंट स्वतःला मोठे बिजनेस माईंड समजतात हे. पण साधे इमोशनल quotient, टीम स्पिरीट अश्या बेसिक टर्मचे महत्व यांना समजले नाही आणि तीन वर्षे संघ जणू स्पर्धेतूनच बाद केला.
भारताच्या लीडरशिप ग्रूपमधून
भारताच्या लीडरशिप ग्रूपमधून पांड्या जाणीवपूर्वक दूर ठेवतात पण दीड शहाण्या मुंबईने रोहीत शर्माला तडकाफडकी काढून त्याला कर्णधार करायचा वादग्रस्त निर्णय घेतला जो नंतर हास्यास्पद ठरला. >> ह्यावर फार दळण दळून झाले आहे पण रेकॉर्ड साठी परत एकदा, सहा वर्षांमधे काय झाले ह्याची क्रोनोलॉजी अशी आहे.
शर्मा २०२० मधे कप्तान असताना आय्पील जिंकले.
२०२१ मधे बरेच मेन खेळाडू रीलीज केले गेले नि मुंबई प्लेऑफ मिस करून गेले.
२०२२ मधे चौघांना रीटेन केले नि हार्दिक गुजराथचा कप्तान झाला नि आय्पील जिंकला. मुंबई रोहितच्या नेतृत्वाखाली तळाला होती. २०२२ मधे हार्दिक भारतीय संघाचा उपकप्तान होता.
२०२३ मधे परत रोहितच्या नेतृत्वाखाली प्लेऑफ मधे होती नि गुजराथकडून हरली.
२०२४ मधे पांड्याला परत आणले गेले नि रोहितच्या माजलेल्या फॅन्सनी अतिशय बालिश धुमाकूळ घातला नि संपूर्ण स्पर्धेला काळिमा फासला. (रोहितने आवाहन केल्यावरही हे दीड शहाणे थांबले नव्हते ह्या वरून ते रोहितफॅन्स म्हणण्याच्याही लायकीचे नव्हते हे उघड आहे) मुंबई शेवटच्या दोघांमधे होती. परत विश्वचषक जिंकणार्या भारतीय संघाचा हार्दिक भारतीय संघाचा उपकप्तान होता. मधे स्काय नि पांड्या उपक्प्तान किंवा कप्तान म्हणून आट्यापाट्या खेळत होते.
२०२५ मधे प्लेऑफ पर्यंत गेले. ह्या वेळी कसलेही कारण न देता पांड्याची उपक्प्तान म्हणून कायमस्वरुपी उचलबांगडी झाली नि स्काय ची वर्णी लागली.
२०२६ मधे परत मुंबई शेवटच्या दोघांमधे. पांड्या नि स्काय दोघेही फ्लॉप. रोहित हिट होता कि फ्लॉप ह्याचा निर्णय आय्पील बघणार्यांना माहित आहे.
एकूण मुंबई संघ इमोशनल quotient, टीम स्पिरीट , चॅम्पियन संघ हरतानाही जो लढायचा जजबा , एकसंध ता वगैर असतानाही - नसतानाही सलग सहा वर्षे (तीन रोहितची नि तीन पांड्याची) तसाच खेळतो आहे.
“ ह्यावर फार दळण दळून झाले
“ ह्यावर फार दळण दळून झाले आहे” +१००
हार्दिक पांड्या से छिनने वाली
हार्दिक पांड्या से छिनने वाली है मुंबई इंडियंस की कप्तानी!
>>
मला एक क्षण वाटलं की फेसबुक / इन्स्टा प्रमाणे इथे ही तुमच्या ॲक्टिव्हिटी ला जुळणाऱ्या विषयांवरच्या पण तद्दन फालतू पोस्ट फीड मधे यायला लागल्यात...
*त्याने मस्त हँडल केले. *
*त्याने मस्त हँडल केले. * खरंय. परिस्थिती ओळखून खेळ करण्याची तयारी व वृत्ती वैभवसाठी खूप आश्वासक आहे. अर्थात, अनेक खेळाच्या पैलूंवर त्याला मेहनत घ्यावी लागणार आहे, यावर सहमत.
जेसन होल्डरला वैभवने कांहीं अफलातून शॉट मारले हे खरं असलं, तरीही जेसन प्रत्येक फलंदाजला अत्यंत हुशारीने व नियोजनबद्ध गोलंदाजी करताना जाणवत होता, हेही तितकंच खरं! मला खूप आवडतो हा जेसन, गोलंदाज, फलंदाज व कर्णधार म्हणून.
*ह्यावर फार दळण दळून झाले आहे* +१

फॅन्सनी अतिशय बालिश धुमाकूळ
फॅन्सनी अतिशय बालिश धुमाकूळ घातला>>>>>> IPL मधील सगळ्या टीम्स चे फॅन्स हे सर्वात वाईट गोष्ट आहे. भारतीय क्रिकेट साठी अत्यंत घातक ठरू शकते...
(No subject)
ऋषभ पंतला किती तरी कोटी रुपयांना घेतलं तेव्हा मालक म्हणाले होते हे (म्हणजे पंतमहाशय) किमान १२-१३-१४-१५ वर्षे खेळतील तेवढ्या ५-४ -६ आयपीएल विजेतेपदं आणतील आणि त्यांचं नाव धोनी आणि शर्माच्या बरोबरीने घेतलं जाईल.
*...आणि त्यांचं नाव धोनी आणि
*...आणि त्यांचं नाव धोनी आणि शर्माच्या बरोबरीने घेतलं जाईल.* - ह्यालाच ' glorious uncertainties of cricket ' म्हणत असावेत ! ( त्याच्या गंभीर अपघातानंतर पंत पुन्हा त्याच्या मूळ अफलातून फॉर्ममध्ये दिसला नाही. दुर्दैव, त्याचं व भारतीय क्रिकेट प्रेमींचं ! )
<<<<< रोहितच्या माजलेल्या
<<<<< रोहितच्या माजलेल्या फॅन्सनी अतिशय बालिश धुमाकूळ घातला नि संपूर्ण स्पर्धेला काळिमा फासला. (रोहितने आवाहन केल्यावरही हे दीड शहाणे थांबले नव्हते ह्या वरून ते रोहितफॅन्स म्हणण्याच्याही लायकीचे नव्हते हे उघड आहे)
>>>>>>
सुंदर विश्लेषण
असो,
उशीराने का असेना मुंबई मॅनेजमेंटला शहाणपण सुचले आहे. पण यात रोहितची स्वतःची उमेदीची तीन वर्षे गेली.
काही जण कधीच लाईव्ह क्रिकेट
काही जण कधीच लाईव्ह क्रिकेट बद्दल बोलत नाहीत पण काही वादग्रस्त विषय किंवा किंवा खेळाडूवर टीका करायची संधी दिसली की बरोबर या धाग्यावर ती बातमी घेऊन फिरकतात
असो,
ऋषभ पंतला हे दोन सीजन २७-२७ कोटी.. एकूण ५४ कोटी मिळाले.
पुढचा सीजन तो कप्तान म्हणून नाही तर खेळाडू म्हणून खेळला तरी त्याला २७ कोटी देणार का?
की आता परवडत नाही या परफॉर्मन्सला इतके पैसे म्हणून रिलीज करतील?
<<<< त्याच्या गंभीर
<<<< त्याच्या गंभीर अपघातानंतर पंत पुन्हा त्याच्या मूळ अफलातून फॉर्ममध्ये दिसला नाही. दुर्दैव
>>>>
पंत अपघातानंतरचा आल्या आल्या आयपीएल खेळला आणि दिल्ली कर्णधार म्हणून चमकलेला. ५०० + धावा आणि तगड्या इनिंग होत्या.
इतके चांगले खेळला होता की त्यामुळे आल्याआल्या त्याची थेट २०२४ वर्ल्डकप मध्ये वर्णी लागली होती.
मग लखनऊ गेला आणि घसरला...
पर्सनली मला वाटते पंत ने लखनौ सोडावे. जेव्हा तो लिलावात तिथे गेला तेव्हाच मी हे म्हटले होते की नको त्या संघात गेला. तो संघमालक याआधीही धोनी आणि राहुल सोबत कसा वागला आहे ते जगाने पाहिले आहे.
बाकी पंतचा इंग्लंड दौऱ्यातील दमदार परफॉर्मन्स पाहता त्याने या नादात आपला कसोटी फॉर्म गमावू नये किंवा येथील खेळावर परिणाम होऊ नये अशीच इच्छा.
सर, तुमच्याकडूनच शिकतोय.
सर, तुमच्याकडूनच शिकतोय.
२७ मे ला एलिमिनेटर झाली. राजस्थान रॉयल्स जिंकले.
२९ मे ला दुसरी क्वालिफायर झाली. गुजरात टायटन्स जिंकले.
(दोन्हीत वैभव सूर्यवंशीने महान खेळ केला. बिचार्याचे शतक हुकले. सर , तुम्हांला कळकळीची विनंती आहे, तुम्ही वैभव सूर्यवंशीला तरी सोडा. त्याच्याबद्दल अजिबात लिहू नका. शर्मा आणि पंतनंतर तुमची संक्रांत त्या बिचार्यावर नको. )
उद्या ३१ मे ला फायनल आहे.
आणि तुम्ही बोलताय कशाबद्दल टेबलावर नवव्या असलेल्या मुंबईचा कप्तान हार्दिक पांड्या राहणार की नाही ? मुंबई इंडियन्सच्या मालकांनी रोहित शर्मावर कसा अन्याय केला ,याबद्दल.
Pages