क्रिकेट - १०

Submitted by कृष्णा on 13 October, 2025 - 07:56

जुना धागा २००० पार होऊ लागला म्हणून हा नविन धागा.

इथे जुना धागा आहे...

https://www.maayboli.com/node/86160

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

कर्तृत्वाला नशिबाची जोड थोडीफार हवीच. >> +१. मुलींची टीम मानसिक दबावाखाली वाटली, आफ्रिकेविरुद्ध सुद्धा हातातली मॅच गेली.

तिथे पुरुषांचे काय झाले ते कळलेच नाही. सलग दोन सामने बॅटसमेनना पिचला अ‍ॅडजस्ट करता आले नाही हे ऑड वाटते, विशेषतः बॉलर्सने केले हे लक्षात घेतल्यावर. वैभव विंगेत उभा असताना संजू नि किशन फेल जाणे इंटरेस्टींग ठरणार आहे.

मी आपले दोन्ही सामने एकही चेंडू पाहिला नाही. त्यामुळे कंडीशन ऍडजस्ट करताना नेमके कसे गडबडले याची कल्पना नाही. पण अजून एक मुद्दा म्हणजे नुसते कंडीशन ऍडजस्ट करायचे नव्हते तर त्यानुसार आपले ट्वेंटी ट्वेंटी खेळायचे आक्रमक टेम्प्लेट सुद्धा त्यानुसार बदलणे गरजेचे असावे जे जमले नसावे. त्यात वैभव नावाची तलवार टॉप ऑर्डरच्या डोक्यावर होती.

अशा कंडिशनमध्ये जसे आधी कोहली असायचा तसे आता शुभमन गिल असणे फायद्याचे ठरला असता.

Lol
हो ही शक्यता आहेच..
पण भारतात केलेल्या वर्ल्डकप मध्ये २५० धावा कुटत होते तरीही आरामात.

७६ सर्वबाद.
वरून चक्रवर्तीने फोर मारून इज्जत वाचवली यांची आज.
७०-९ होते. ७६ पर्यंत पोहोचवला.
७४ लोएस्ट होता आधीचा.

काल त्यांनी पीच चांगला रीड केला. सुरुवातीपासून शेवटपर्यंत हार्ड लेन्थ गोलंदाजी सोडली नाही. आपल्यावेळी मात्र आपण जेव्हा जेव्हा ती फॉलो केली तेव्हा मदत मिळाली. पण सरप्राईज करण्यापुरतेच त्याचा अध्येमध्ये वापर केला ते चुकले.
फलंदाजीत सुद्धा अश्या गोलंदाजीला खेळायचे तंत्र कमी पडले.
बाकी दुसऱ्या डावात मदत सुद्धा जास्त वाटली, अगदी स्पिनरचा बॉल सुद्धा टर्न होत होता. त्यामुळे पराभवाचा फरक आणखी मोठा झाला.

आता पुढचे दोन सामने कसे खेळतात याची उत्सुकता आहे.
तसेच त्यानंतर वनडे आहेत तेव्हा गिल आणि रोको येतील त्याचीही..

बाहेर खेळताना सातत्याने असे काही परफॉर्मन्स येऊ लागले तर शुभमन गिल ट्वेंटी संघात येऊ शकतो असेही काल वाटले.

चक्रवर्ती मेजर आऊट ऑफ फॉर्म असूनही त्याला इतक्या संधी
अन् संजू जरा फेल गेला तर डायरेक्ट संघाबाहेर?? >> चक्रवर्ती च्या जागी संजूला आणायचे का ? Wink

विनोदाचा मुद्दा बाजूला ठेवून, मला वाटते वैभवला आणायचे म्हटल्यावर संजू, किशन नि अभिशेक ह्यातल्या कोणाला बाहेर बसवायचे ह्याचे उत्तर सध्याचा फॉर्म बघता संजू हेच आले असणार.

अय्यर एव्हढा टॅक्टिकल असूनही प्रत्येक सामन्यामधे ज्या तर्‍हेने गोलंदाज हाताळतो आहे ते खटाके आहे. बिष्नोईला क्रिटीकल ओव्हर देणे , दुबे ला ह्या पिचवर बॉलिंग न देणे वगैरे झेपतच नाही.

“अय्यर एव्हढा टॅक्टिकल असूनही” - खरं तर मी ह्याविषयी फारसा कन्व्हिन्स्ड नाहीये. तो टेस्ट खेळायचा तेव्हा एक होतकरू आणि गुणी टेस्ट प्लेयर होता. वन डे मधे चांगला मिडल ऑर्डर बॅट्समन आहे. त्याच्याविषयी गुडविल ही खूप आहे. पण टी२० मधे भारतीय संघाचा कॅप्टन होण्याइतकं त्याचं कर्तृत्व नक्की काय ह्याविषयी मी साशंक आहे. आयपीएल च्या च कर्तृत्वाचा निकष लावायचा म्हटलं तर पाटीदार किंवा संजू कदाचित अधिक प्रबळ दावेदार असू शकतील. असो.

परवा दुबे, हर्षित राणा नंतर बॅटिंगला आला, का? कुणास ठाऊक! Sad

चक्रवतीचा फॉर्म वर्ल्डकप पासून खराब आहे. पण ह्या स्क्वाडमधे पर्यायी स्पिनर नाहीये (सुंदर नको, त्यापेक्षा अभिषेक/तिलक पण चालतील). तुझी चक्रवर्ती ऐवजी संजू ही सुचना विचार करण्यासारखी आहे Happy

किशन लवकरच संजूसाठी जागा मोकळी करेल असे दिसतेय. वैभव ला कोणी तरी बाजूला नेऊन , दहा ओव्हर राहायचा प्रयत्न करे असे सांगायची गरज आहे.

तिलकच्या गुणवत्तेबद्दल मला शंका नाही पण तो बॉल् बॅटवर येत असताना जेव्हढा इफेक्टीव्ह असतो तेव्हढा बॉल थांबत असेल तर नसतो - विशेषतः त्याच्या पाठच्या व्ही मधे खेळण्याच्या ऑब्सेशनमूळे - त्यामूळे तो फिनिशर म्हणून एव्हढा खाली येणे गँबल वाटते. दुबे चांगला फिनिशर होउ शकेल. अक्षर, राणा किंवा सुंदर कडून तो रोल कंसिस्टंटली अपेक्षित ठेवणे फारच धाडसाचे वाटते.

सूर्या असता नसता तरी फार फरक पडला असता असे मला वाटत नाही. ह्या विकेट्स गेल्या २ वर्षांमधे आपण खेळलेलो त्यापेक्षा वेगळ्या आहेत नि आपण अ‍ॅडजस्ट्मेंट करण्यात कमी पडतोय हे उघड दिसतेय.

आज आपण ट्वेंटी मालिका 4-0 ने हरल्यावर इंग्लंड पहिल्या क्रमांकावर झेप घेत आपण दुसऱ्या क्रमांकावर घसरणार आहोत.

खालील इतिहासाची आज पुनरावृत्ती झाली.

२०११ च्या कसोटी मालिकेत इंग्लंडने भारताला ४-० ने पराभूत केल्यानंतर, २२ ऑगस्ट २०११ रोजी चौथी कसोटी संपल्यावर आयसीसी कसोटी संघांची क्रमवारी अद्ययावत करण्यात आली. इंग्लंडने अव्वल स्थान पटकावले आणि भारताला तिसऱ्या स्थानावर ढकलले.

सूर्याला अजून चार पाच मालिका सहा आठ महिने देत अय्यरला खेळाडू म्हणून आधी संघात घ्यायला हवे होते. >> पण दोघे एकाच वेळी कसे बसवले असते संघात ? मग तिलक आणी/किंवा रिंकूवर संक्रांत आली असती.

ह्या सिरीजमधून एक मात्र उघड झाले कि दुबे, शेडगे, रेड्डी ह्यापैकी कोणीही एकटा पांड्ञाची बॅटींग गेले १-२ वर्षे बोंबलली असूनही पांड्याची जागा भरू शकत नाही.

"पण दोघे एकाच वेळी कसे बसवले असते संघात ? मग तिलक आणी/किंवा रिंकूवर संक्रांत आली असती." - खरंय. मला वाटतं की संजू कडे कॅप्टन्सी देऊन अय्यर ला निव्वळ बॅट्समन म्हणून घेतलं असतं , तर परिस्थितीनुरूप, अय्यर / तिलक आणि खाली रिंकू असं खेळवता आलं असतं.

पंड्या, व्हाईट बॉल क्रिकेटमधे खूप महत्वाचा प्लेयर आहे भारतासाठी. तसंच कुलदीप सुद्धा (तिन्ही फॉर्मॅट्समधे) पण कुलदीप ला इfunction at() { [native code] }अकं आत-बाहेर का करावं लागतं कुणास ठाऊक!

पण दोघे एकाच वेळी कसे बसवले असते संघात
>>>>

अय्यरला प्रत्येक सामना खेळवायलाच हवे हे गरजेचे नव्हते. सूर्याला या कालावधीत प्रत्येक मालिका खेळवायलाच हवी हे गरजेचे नव्हते. रिंकू तसाही आतबाहेर असतोच. दुबे हा अष्टपैलू नुसता नावाला आहे. तो ही आतबाहेर करायला हरकत नाही. गंडला तर तिलक वर्मा सुद्धा आहे गेल्या काही काळात. त्याची जागाही पक्की का समजत आहोत आपण. थोडक्यात मिडल ऑर्डर काही इतकी पॅक नाही की त्यात अय्यर ऍडजेस्ट झाला नसता.

अय्यर आल्या आल्या कर्णधार झाला आणि सारे गणित बिघडले.
वर फेरफटका म्हणत आहेत की संजूला कर्णधार करायला हवे होते आणि अय्यरला खेळाडू. पण मग पुढे काय? संजूला कर्णधार पदावरून काढून अय्यर कर्णधार करणे म्हणजे पुन्हा लफडे. बरे इथे तर वैभवसाठी संजूलाच बाहेर केले गेले. अय्यर बाहेरून येत थेट कर्णधार केला म्हणजे सध्या संघात उपस्थित असलेल्या कोणालाही निवड समिती कर्णधार म्हणून बघत नाहीये. मग सूर्यालाच थोडे खेळवता आले असते.

मला कल्पना नाही की ड्रेसिंग रूमचे वातावरण कसे आहे. पण ते चांगलेच असेल याची खात्री सुद्धा नाही.

सूर्याला या कालावधीत प्रत्येक मालिका खेळवायलाच हवी हे गरजेचे नव्हते. >> मग कप्तान कोण असता ? सूर्या काही चुटपुटत्या इनिंग्स वगळता प्रदीर्घ कालासाठी फेल गेलाय ह्या कारणामूळॅ बाहेर गेला असे मला वाटले. बाकी कोणीही तेव्हढा लाँग टर्म फेल गेलेला नाही.

ह्या सिरीजचा निकाल सूर्या असता तरी फारसा वेगळा लागला असता असे खरच वाटले नाही. एकंडरच सगळा ढीसाळ कारभार होता.

फेफे. संजू ने कप्तान म्हणून खरच तेव्हढे काही केले आहे का ? केरलचाही येऊन जाऊन असतो नि चेन्नई ने सुद्धा कप्तान म्हणून बघितले नाहि त्याच्याकडे.

“ संजू ने कप्तान म्हणून खरच तेव्हढे काही केले आहे का ?” - हा खरंच चांगला प्रश्न आहे आणि ह्याच्या दोन्ही बाजूची आर्ग्युमेंट्स स्ट्राँग आहेत.

तू ‘नाही’ विषयी लिहिलंयस. म्हणून मी ‘हो’ची बाजू मांडतो.

तो राजस्थानचा बरीच वर्षं स्टेबल कॅप्टन होता. त्याच्या काळात टीम बरीच डेव्हलप झाली. त्याचा स्वतःचा खेळ बहरला. जैस्वाल सारख्या नवीन आणि संदिप सारख्या अनुभवी खेळाडूंना रोल क्लॅरिटी देऊन त्याने त्यांच्याकडून चांगले परफॉर्मन्सेस काढून घेतले.

वर्ल्डकप नंतर त्याचं स्थान पक्कं होतं (गंभीरच्या काळातली आनिश्चितता वगळून).

ह्याउलट अय्यरची स्वतःची अशी जागाच टीम मधे नव्हती (टी२०). अय्यरकडे सुद्धा एक आयपीएल ट्रॉफी सोडली तर फार काही दाखवण्यासारखं यश नाहीये. तो मुंबईचा सुद्धा कॅप्टन नाहीये. फक्त आयपीएलच्या च यशाचा विचार केला तर पाटीदार जास्त प्रबळ दावेदार आहे.

पण अय्यरचं पोटेन्शियल पहाता, त्याला टीममधे खेळाडू म्हणून खेळवून मग कॅप्टन म्हणून तयार करता आलं असतं.

<<<< ह्या सिरीजचा निकाल सूर्या असता तरी फारसा वेगळा लागला असता असे खरच वाटले नाही. एकंडरच सगळा ढीसाळ कारभार होता.
>>>>>

तेच तर अचानक कसे झाले जे आयर्लंड + इंग्लंड मिळून ६-० फटका बसला. कारण कागदावर तर तसे चित्र नव्हते. कप्तानीचा बदल केवळ एक खेळाडू जात दुसरा आला इतक्यापुरता मर्यादित नसतो. त्यात आहे तोच संघ आमूलाग्र बदलण्याची ताकद असते.

सर्वात वाईट म्हणजे शेवटचा सामना सुरू व्हायच्या आधीच असे वाटत होते की काही चमत्कार नाही घडला किंवा पीच दोन इनिंगमध्ये अनफेअर निघाले नाही तर आपणच हरणार आहोत. त्यामुळे तो सामना बघायची सुद्धा इच्छाच झाली नाही. हे असे गेल्या काही वर्षात आपल्या संघाबद्दल कुठल्याच फॉरमॅटमध्ये आणि कुठल्याही खडतर दौऱ्यात वाटले नव्हते. खेळ उंचावतील आणि जिंकतील ही आशाच नव्हती.

फेफ, तू संजूबद्दल जे लिहिलेस त्यात त्याचा स्वतःचा वाटा किती नि संगकारा चा किती असेल ? मला वाटते कप्तान म्हणून खेळाडूंना प्रोत्साहान देण्यापेक्षाही मह्त्वाची जबाबदारी ऑन त स्पॉट टॅक्टिकल डिसीजन्स घेणे ही आहे नि दुर्दैवाने संजूने तसे काही केल्याचे आठवत नाही. इतकी वर्षे स्टेबल कॅप्टन असूनही त्याला रॉयल्सला फायनल मधे नेताना पाहिल्याचे आठवत नाही. ( एक्दा कदाचित ? पटीदार हे तुलनेसाठी फर्स्ट क्लास उदाहरण आहे) श्रेयस बद्दल तो ज्या तिन्ही टीम्स मधे कप्तान झाला त्यांची कामगिरी उंचावली ( किंवा तो सोडून गेल्यावर ढेपाळली) . त्याला कप्तान म्हणून थेट आणाणे ऑड होते हे मात्र नक्कीच पण गभीर नि आगरकर असे आडेनिडे निर्णय घेतात त्यामूळे त्यात आश्चर्य वाटले नाही हे खरे. हीच टी २० टीम भारतामधे काही सिरीज खेळेतोवर त्याचे कप्तान म्हणून मूल्यमापन करणे अवघड ठरेल.

तेच तर अचानक कसे झाले >> मुख्य कारण म्हणजे पिचेस ! आपण दोन वर्षे सातत्याने कुठे (नि कशा पिचेस वर) खेळत होतो हे बघितले कि उघड होते. त्यात फ्लॅट आयपिल पिचेस वरून इथे जाणे फारसे मदत करणारे नव्हते. मी सगळ्या मॅचेस बघितल्या नि एकही फलंदाज फॉर्‍म नसताना झगडतो तसे खेळलेला आठवत नाही. बहुतेक जण त्याच स्टाईल मधे खेळात होते जसे गेले वर्षभर सुरू होते. आपण प्रॅक्टिस मॅचेस वगैरे वर अजिबात भरोसा ठेवत नाही हा मूर्खपणा वर आहेच.

मॅक्कलमला डच्चू दिल्यावर इंग्लिश टेस्ट टीम प्रॉबेबल कोच च्या यादीत द्रविड आहे...

रच्याकने
काल जिंकलो बुवा एकदाचे
अक्षर ची मॅच होती टोटली

काल जिंकलो बुवा एकदाचे
>>>
दोन्ही टीम वेगळ्या होत्या.
ट्वेंटी वाले जिंकल्यावर जिंकलो बुवा एकदाचे म्हणू शकतो.
तूर्तास या संघाशी इंग्लंड कधी जिंकते हे बघूया Happy

Pages