भुभु आणि माऊ बाळांच्या गंमती जमती ३

Submitted by आशुचँप on 25 March, 2025 - 12:02

bhubhumau.jpg

आपल्या बाळांच्या गमंती जमती, त्यांचे फोटो आणि किस्से मायबोलीकरांशी शेअर करण्यासाठी हा धागा. बाकीच्यांनी नुसता आनंद घ्यावा. तुम्हाला या बाळांचा त्रास झाला असेल, राग असेल तरी हरकत नाही पण तुम्ही तुमच्या तक्रारी वेगळ्या धाग्यावर टाकू शकता. ऑलरेडी तसा धागा आहे. इथे फक्त पॉझीटीव्ह गोष्टीच शेअर व्हाव्यात अशी इच्छा आहे.

हे वाचून कुणाला भूभू किंवा माऊ पालक व्हावेसे वाटले तर आनंदच आहे

या आधीच्या ग्ंमती जमती इथे वाचता येतील

२. https://www.maayboli.com/node/82073

१. https://www.maayboli.com/node/77227

==================================================================

Group content visibility: 
Public - accessible to all site users

काय गोड आहेत माऊई चे हावभाव!! त्याला अजून 'मूर्ती' ही कन्सेप्ट माहिती नाही?
(अरे सॉरी इथे फक्त स्वतःच्या पेटस बद्दल लिहायचं असेल, धागा डायव्हर्ट होईल, पुसते आहे प्रतिसाद)

कौतुकाबद्दल थॅन्क्स Happy
अनु, खरं तर मूर्ती पाहिल्या नहीत असे नाही, हा पहा इथे नव्हता दचकला.
IMG_6195.jpg
पण हा बुद्ध सरप्राइज होता, तोही अचानक दिसला आपल्याच दारात Happy

हा वरचा पुतळा सुप्रसिद्ध विम्पी किड चा आहे. युनि. ऑफ मेरीलँड मधे. आम्ही सगळे त्या पुस्तकांचे फॅन आहोत Happy त्याचा लेखक क्रिएटर तिथला अ‍ॅल्युम्नाय आहे बहुतेक.

अचानक दिसला आपल्याच दारात >>>>> पॉईंट टू बी नोटेड. Happy
स्ट्रेंजर आपल्याकडे अचानक दिसला की पेट्स अ‍ॅलर्ट होणारच Wink

माझ्या मै चा एक भलामोठ्ठा भुभू आहे. तिच्याकडे बायकांचा काही समारंभ असला की त्याचीच सगळ्यांना आधी धडकी भरते. अल्मोस्ट बर्‍याचशा बायका त्याला घाबरतात, आणि हा पठ्ठ्या मात्र आपल्या मालकिणीला काहीतरी धोका आहे असं समजून सतत भुंकत बसतो. शेवटी कोण कोणाला घाबरतंय, हेच कळत नाही!

मग थोड्या वेळाने त्याची खात्री पटते की सगळं ओके आहे. बस, मग महाराज अगदी निवांत आपल्या गादीवर जाऊन झोपतात. पण तरीही काही घाबरणाऱ्या महिला चाईल्ड बॅरिकेडच्या मागेच बसतात, आणि हा मात्र पूर्ण वेळ सुट्टा फिरत असतो!

IMG_4660.jpeg

काल संध्याकाळी सिंबाने बॅकयार्ड मधे कुंपणाजवळ भूंकून गोंधळ घातला, नीट जाऊन बघीतले तर हा बसला होता … रॅट स्नेक आहे विषारी नसतो .. मग उचलला आणी मागील झाडीत सोडून दिला.
पण तो साप दिसेनासा होईस्तोवर सिंबा पुर्ण वेळ नजर ठेऊन होता

maitreyee — भारतात असतांना सर्पमित्र म्हणून कामं केलं आहे त्यामुळे हाताळता येताता साप .. त्यातून हा विषारी नसल्याने कामं सोप होतं …

देखणा आहे गडी! Happy

परवा आम्ही वॉक ला गेलो असताना एका ड्राईव्हवे वर मोठी मांजर बसली होती. सहज तिला पस्प्फ्स्स्पस आवाज दिला तर कुठून कुठून एकदम ४-५ पिल्लंच बाहेर आली. सगळे वेगवेगळे दिसणारे, एकतर ऑरेंज कॅट होती. फार गोंडस होते सगळे. त्यांच्याशी थोडावेळ खेळलो तेवढ्यात शेजारच्या घरातून एक माणूस बाहेर आला, म्हणाला तुम्हाला न्यायचे तर न्या, फार उच्छाद आहे या स्ट्रे कॅट्स चा. दर वर्षी ८-१० पिल्लं जन्माला येतात आणि ती मांजरी इथून अजिबात जातच नाही. माझ्याकडे कुत्रा आहे तो भुंकून पॅनिक होतो हि पिल्लावळ दिसली की, म्हटलं माझ्या घरी ऑलरेडी १ कॅट आहे आणि ती फार टेरिटोरिअल आहे आणि तसंही मी एवढ्या सगळ्यांना कसं नेऊ? घरात जागाच नाही एवढी. नंतर येऊन थोडं कॅट फुड दिलं त्यांना. पण त्यांचं काय होईल माहित नाही. ज्यांचं घर आहे ते लोकं बाहेर कधीच दिसत नाहीत फारसे. बहुतेक कोणीतरी वयस्क राहात असावे.

हा बघा पिल्लांचा विडीओ. एकाला सहा बोटं आहेत. Happy मांजरातला हृतिक Wink

https://youtube.com/shorts/j82N8PFuF4g?feature=shared

माझ्याकडे असे पाळून लाडाकोडाचे भुभू नव्हते. गावी असताना एक गावठी पिलू उचलून आणून पोसले होते. आमच्या लहानपणी (मिलेनियल लहानपणी) कुत्रं पालन म्हणजे फार काही वैज्ञानिक प्रकार नव्हता, गावच्या बखळी एखाद कुतरी व्यायली की तिच्या पिल्लांनी डोळे उघडायच्या आत, हे तुझे ते माझे वाटप व्हायचे. डोळे उघडले का एक दिवस ते पिलू घरी आणायचे अन् त्याला सुरुवातीला नुसते दूध अन् नंतर दूध भाकरी, कधी दही भाकरी कुस्करून त्यात सुकट टाकून देणे इत्यादी चाले, थोडे गब्दुल झाले का ते कुत्रे स्वतःच स्वतः बाहेर हिंडे स्वतःचे स्वतः उकिरडे फुंकत हाडके चघळी अन् स्वतःच स्वतःचे प्रणयाराधन शोधी ! फक्त घरच्या कोणाची गाडी वाजली का गळ्यातील घुंगरू वाजवत गाडी मागे घरापर्यंत येऊन बसे, उंबरठ्यावर गोंडा घोळून आनंद व्यक्त करे, पावणे आले की मटन होई त्या दिवशी कुत्र्याची चंगळ. एकदाच फक्त जनावरांच्या दवाखान्यात नेऊन त्याची लस अन् नसबंदी केली होती इतके आठवते. रात्री उसाला पाणी सोडताना किंवा माळव्याच्या रानात वस्तीला सोबत येई गडी, गाजर, मुळा, पालकाच्या कोथिंबिरीच्या जुड्या बांधताना सोबत सोबत असे, समोर काही खासफसले तर बोंबलून रान डोक्यावर घेई का आम्ही समजून जात असू समोर काहीतरी लांबडं वळवळत गेलं आहे. पंधरा मिनिटे ब्रेक घेतला की परत जुड्या लावणे सुरू.

अशाच अन् इतक्याच आठवणी आहेत माझ्या. इथे संयुक्तिक असतील का नाही माहिती नाही पण आहेत खऱ्या.

No toys, no soft beds, not even a diet ! But still some of my paw-fect buddy memories.

अंजली, छान व्हिडीओ.
US मध्ये स्ट्रे माऊ असतील हे माहित नव्हते.
तिथे शेल्टर आहेत ना अशा प्राण्यांसाठी ?
तिथे कोणी NGO किंवा प्राणी प्रेमी असतील का जे ह्या माऊ चे स्पेइंग करतील?

images (33)_0.jpeg

तुमची बाळे विरुद्ध आमचे टिप्या स्वामी ! एक वर्गविग्रही वास्तववादी चित्र. आहे रे आणि नाही रे वास्तव !

अतिशय हलके घेणे अजिबात मनावर नको, थोडी चेष्टा करतोय फक्त.

जेम्स वांड, तुमच्या भूभूच्या आठवणी छान आहेत. वेगळ्या प्रकारच्या आठवणींचे पण इथे स्वागतच होते. प्राणिमात्रांबद्दल माया असणे हा इथला समान धागा आहे.

जेम्स वांड, छान आठवणी आहेत.

धनवन्ती, हो माझ्या ग्रुप कम्युनिटी ग्रुप मधे टाकले मी कोणाला हवी असतील तर न्यायला.

शेल्टर बद्दल एवढी माहिती नाहीये जरा शोधाशोध करावी लागेल.

जेम्स वांड, छान आठवणी आहेत. तुमचे लिखाण वाचून माझे भारतातील पहिले पाळीव कुत्रे आठवले, असेच कुठून तरी ऊचलून घरी घेऊन आलो होतो. घरी आधी ओरडा खाल्ला ठेवायचे नाही म्हणून पण कसं बस पटवले घरच्यांना. पण त्याचे कधी वेगळा बेड, डॅाग फुड असले लाड नव्हते … भाकरी दुध हाच त्याचा आहार.

तुमच्या लिखाणाने जुन्या आठवणी ताज्या झाल्या…

धन्यवाद हरितात्या, मला वाटते शहरी आणि ग्रामीण पशुपालन/ पशुमित्र बाळगणे ह्याच्या सुवर्णमध्याला आपण पोचतो आहोत.

मला वाटते गावाकडे पशुधन / पेट इतके असतात आसपास का सरळ अती परिचयात अवज्ञा होते, तिथे ना ब्रीडचे कौतुक उरत ना पेडिग्रीचे तिथे फक्त राखणीला रात्री कुत्रं तेज आहे का नाही इतके बघणे पुरे.

तरीही आता किमान राजपालायम डॉग, मुधोळ हाऊंड, कारवानी, चिप्पीपाराई, रामपूर हाऊंड इत्यादी देशी ब्रीड्स सुद्धा शास्त्रशुद्ध पद्धतीने मेन्टेन करायला सुरुवात झाली आहे.

असेच एक उत्साहवर्धक प्रकरण म्हणजे भीमथडी घोडे संवर्धन, मला वाटते बारामतीचे एक गृहस्थ ह्यात पुढे आहेत. ओरिजनल भीमथडी स्टडस्, मेअर्स इत्यादींचे lineage मेन्टेन करणे , स्टॉक रजिस्टर मेन्टेन करणे इत्यादी करून ते एकेकाळी पूर्ण भारतात आपल्या काटकपणाचा दबदबा निर्माण केलेली एक प्रॅक्टिकल घोड्याची जात परत पुनर्जीवित करतायत.

बापरे रॅट स्नेक वेगळाच आहे
पहिले त्रिकोणी डिझाइन बघून घोणस जातीचा वाटला
मला एक मित्राचा लॅब साप चावून मेल्यामुळे कायमच भीती वाटत अली आहे, मीही काही काळ सर्पमित्र म्हणून काम केलं आहे कात्रज ला
भुभु ना शून्य डिफेस असतो
मांजरे चलाख आणि फास्ट असतात

मन्या मांजर आणि सापाचा किस्सा टाकतो नंतर

बापरे रॅट स्नेक वेगळाच आहे
पहिले त्रिकोणी डिझाइन बघून घोणस जातीचा वाटला
मला एक मित्राचा लॅब साप चावून मेल्यामुळे कायमच भीती वाटत अली आहे, मीही काही काळ सर्पमित्र म्हणून काम केलं आहे कात्रज ला
भुभु ना शून्य डिफेस असतो
मांजरे चलाख आणि फास्ट असतात

मन्या मांजर आणि सापाचा किस्सा टाकतो नंतर

मला एक मित्राचा लॅब साप चावून मेल्यामुळे कायमच भीती वाटत अली आहे,
>>>>
साप तुला चावला आणि मेला? तू म्हणजे विषपुरुष निघालास की Happy (चंद्रकांतामधला पंकज धीरने साकारलेला विषपुरुष कोणाला आठवत असेल तर)

एका मित्राच्या लॅबला साप चावून लॅब मेल्यामुळे मला कायमच भीती वाटत अली आहे, तसे काही ओडिन बाबत होण्याची

हा आता व्याकरण सुधारित टाकले आहे Happy

Happy

अगं, मला पण मंकी आठवतो बऱ्याच वेळा.
तू खूप छान सांभाळ केलास त्याचा. तो कृतज्ञ असणार त्याबद्दल.

किती गोड धनवन्ती तुला आठवतो मंकी Happy

हो तो माझ्यासाठीच आलेला Happy मला एका अ‍ॅनिमल कम्युनिकेटरने सांगितले.

त्याची ती पोटातली गुरगुर आठवते तो पायावर बसला की... माझ्या मुलाशी हेड बंप्स असायचे सारखे. आंघोळीनंतरच्या वापरलेल्या ओल्या टॉवेलवर बसायला फार आवडायचं त्याला. स्वीट मेमरीज ऑफ हिम!

84b79cc5-f57c-4224-ba82-83021f2c72b1.jpeg

खेळ कुठलाही असो आम्ही तर असणारच …. सिंबाला घरी कुठलेही गेम्स खेळलेले आवडतात…. त्याला प्रत्येक खेळात भाग घ्यायचाच असतो. कॅरम खेळतांना नाक एकदम पांढरे झालेले असते …

हरितात्या,

जर्मन शेफर्ड डॉग भयानक आवडती ब्रीड माझी ! , अतिशय बुद्धिमान आणि प्रेमळ, खासकरून लहान बालकांच्या अवतीभोवती अतिशय नजाकतीने फिरतात. आमच्या पाहुण्याचे एक मित्र होते पवार म्हणून पोलिस लाइन मधले ते डॉग स्क्वाड मधले हँडलर होते. ते सकाळी उठून दूध आणायला जाणे ते रात्री शतपावलीला जाताना त्याचं ते डॉगी (नाव विसरलो) कायम सोबत असे, आम्हा लहान पोरांच्या खेळांत प्रचंड हुंदडत असे ते, पण पवार मामांनी एक चुटकी वाजवली की धावत त्यांच्याकडे जाई.

Pages