भुभु आणि माऊ बाळांच्या गंमती जमती ३

Submitted by आशुचँप on 25 March, 2025 - 12:02

bhubhumau.jpg

आपल्या बाळांच्या गमंती जमती, त्यांचे फोटो आणि किस्से मायबोलीकरांशी शेअर करण्यासाठी हा धागा. बाकीच्यांनी नुसता आनंद घ्यावा. तुम्हाला या बाळांचा त्रास झाला असेल, राग असेल तरी हरकत नाही पण तुम्ही तुमच्या तक्रारी वेगळ्या धाग्यावर टाकू शकता. ऑलरेडी तसा धागा आहे. इथे फक्त पॉझीटीव्ह गोष्टीच शेअर व्हाव्यात अशी इच्छा आहे.

हे वाचून कुणाला भूभू किंवा माऊ पालक व्हावेसे वाटले तर आनंदच आहे

या आधीच्या ग्ंमती जमती इथे वाचता येतील

२. https://www.maayboli.com/node/82073

१. https://www.maayboli.com/node/77227

==================================================================

Group content visibility: 
Public - accessible to all site users

फोटो बघून लक्षात येईल की जसा ठेवलाय तसाच तिथेच उभा राहतो बूट घातले की >>माउईचा लुक बघुन वाटतय तो मनात नक्की म्हणत असणार "झाली का तुमची हौस? काढता का हे सगळ म्हणजे मला पळापळी करता येइल"

^^^माउई बंदच पडतो, ^^^^
हे एकदम भारीच....
तसा पण तो सॉफ्ट toy वाटतो..
Snowee आणि मिनी रिव्हर्स गिअर मध्ये जातात त्यांना कोन घातला की..
परवा मिनी maula एक शर्ट घातला, माझीच हौस, तर अशीच बंद पडली...
तोच मग snowee ला घातला तर तिने शून्य मिनिटात काढून टाकला..

हरितात्या, सिंबा एकदम नीट बरा होईल. तो फोड पण जाईल आता. तुमच्या घराचे ममत्व त्याला बरे करणारच...

नुसता नाटकी आहे सिंबा, आईसक्रीम द्यावेच लागते, नुसते नाव जरी काढले तरी स्वारी पुढच्या सेकंदाला फ्रीजरपाशी बसलेली दिसेल. लक्ष नाही दिले तर नाकाने फ्रीजचे हॅंडल उडवत बसतो.

आता घरातले सगळेच आईस्कीम हा शब्द त्याच्या स्पेलींगने बोलतो Rofl

तसे बरेचशे शब्द आम्हाला स्पेलींग मधेच बोलावे लागतात, जसं वॅाक, जेवण, डॅाक्टर (हा नावडता शब्द आहे)

हुश्शार असतात भुभूज Happy सग्गळं सग्गळं कळतं.
काल माउईसाठी कुकीज बेक केल्या. फार काही नाही, बनाना, ओट्स, एग, पिनट बटर चे बॅटर केलं, करताना त्याच्याशी बोलत होते, कोणासाठी करणार आहे कुकीज?! माउईसाठी! ते लक्षातच आले त्याच्या. मग ओवन मधे ठेवताच छान वास यायला लागला, मग काय. त्या कुकीज बेक होत होत्या त्या १५-२० मिनिटात नुस्ता धुमाकूळ. कुई कुई, ओवन समोर जाऊन बसणे, माझ्यावर भुंकणे, मला पंज्याने टॅप टॅप करणे . दोन पायावर उभे रहाणे Lol एकदाच्या खायला मिळाल्यावर मग खूश झाला. आम्हाला फुल्ल एन्टरटेनमेन्ट.

So sweet.

e9e87c5f-2241-47e7-b5d3-6026368dcc5f.jpeg

आज सिंबा ४ वर्षाचा झाला … आवडते जेवण ट्रीट आणी आईसक्रीम असा मेनू होता …
त्याला आमच्या आयुष्यात येऊन ४ वर्ष झाली सुद्धा पण आम्हाला तो अजूनही पपीच वाटतो … या ४ वर्षात त्याने आम्हाला भरभरून प्रेम दिले आहे

7c2adea1-19a8-4395-b706-f78a506b2940.jpeg

Happy birthday Simba..
From Snowee, Minnie, Ginger, Lalu, Thipaku

सिम्बाला Happy birthday. सध्या रॅम्बो अलर्ट मोड मधे असतो. मोबाईलवर रात्री मिसाईल/ड्रोन चा अलर्ट वाजला की माझ्या अंगावर उड्या मारायला लागतो.

f67e840a-d3f3-4f27-b86a-c62a43b3e3cb.jpeg

हे महाशय आमचे रक्षण करणार Rofl Rofl

Pages