Submitted by आशुचँप on 25 March, 2025 - 12:02

आपल्या बाळांच्या गमंती जमती, त्यांचे फोटो आणि किस्से मायबोलीकरांशी शेअर करण्यासाठी हा धागा. बाकीच्यांनी नुसता आनंद घ्यावा. तुम्हाला या बाळांचा त्रास झाला असेल, राग असेल तरी हरकत नाही पण तुम्ही तुमच्या तक्रारी वेगळ्या धाग्यावर टाकू शकता. ऑलरेडी तसा धागा आहे. इथे फक्त पॉझीटीव्ह गोष्टीच शेअर व्हाव्यात अशी इच्छा आहे.
हे वाचून कुणाला भूभू किंवा माऊ पालक व्हावेसे वाटले तर आनंदच आहे
या आधीच्या ग्ंमती जमती इथे वाचता येतील
२. https://www.maayboli.com/node/82073
१. https://www.maayboli.com/node/77227
==================================================================
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
धनवन्तीने तळजाई गटग धाग्यावर
धनवन्तीने तळजाई गटग धाग्यावर कोकोनटची आठवण काढली तेव्हापासून इथे नवीन फोटो द्यायचे होते. पण काढलेच नव्हते. हिरोला असं बरोबर दिसत नाही, अधूनमधून फोटो सेशन करायलाच हवं म्हणून काल काढले.
* आमच्या नेबरहुडातलाच रोजचा वॉक आहे.

कहीं दूर जब दिन ढल जाये, श्यामकी दुलहन बदन चुराये चुपकेसे आये- मोड मधला कोकोनट.
खरंच हँडसम आहे कोकोनट! स्वच्छ
खरंच हँडसम आहे कोकोनट! स्वच्छ पांढरा दिसतोय आणि
मस्त मस्त कोकोनट ❣️
मस्त मस्त कोकोनट ❣️
इथले फोटो आणि किस्से आवर्जून येउन वाचतो.
मंडळ आभारी आहे _/\_..
मंडळ आभारी आहे _/\_..
खूप छान आलेत फोटो..
शहाणे लेकरू आहे कोकोनट ...
कोकोनट एकदम मस्त दिसतोय…
कोकोनट एकदम मस्त दिसतोय… चांगलाच मोठापण झालाय
सॅमीची आणि आमची गंमत!
सॅमीची आणि आमची गंमत!
की जेणे करून हिची चाहूल लागेल त्यांना.
सध्या वेदर चांगले असल्याने पक्षी, खारी बाहेर पडल्यात मग सॅमीची मजाच असते मागे पळायला आणि त्यांना पकडायला. पण ते गिफ्ट आम्हाला नको असतात त्यामुळे आम्ही मांजराच्या गळ्यात घंटी बांधतो
काल कॉलर घंटी तर बांधली आणि रात्री काढायला विसरलो... झालं हिच्या रात्रीच्या झुमीज, पळापळ त्यामुळे घरभर छुमछुम आवाज! आमची झोपमोड... झोपेत काही सुधरेना ...नंतर ट्युब पेटली... तोपर्यंत मिनी मंजोलिका एपिसोडच झाला
मंजोलिका
मंजोलिका

आमच्याकडे ही पकडा पकडी कायमच सुरू असते. हाती काही लागत नाही पण प्रयत्न जोरदार असतो. समरमधे अजून एक छंद म्हणजे मधमाश्या ( बंबल बी) पकडून खाणे. त्या मात्र पकडता येतात.
दुपारची पकडा पकडी झाल्यावर दमून झोपलेला सिंबा
सॅमी आणि सिंबाच्या शिकारी
सॅमी आणि सिंबाच्या शिकारी
सिंबा एकदम पुणेरी काकांच्या अॅटिट्यूड मधे १ ते ४ नॅप घेतो आहे असे वाटतेय 
मंजोलिका>>>
मंजोलिका>>>
आइ ग ! दमुन झोपलय लेकरु ..
^^^आम्ही मांजराच्या गळ्यात
^^^आम्ही मांजराच्या गळ्यात घंटी बांधतो Lol^^^

अंजली तू तर फारच धाडसी आहेस....
अंजली, मस्त किस्सा. मलाही गोड
अंजली, मस्त किस्सा. मलाही गोड किणकिण असणारी वासराच्या गळ्यात असते तशी घंटी आणायची आहे कोकोनटला.
सिंबाचा राजेशाही आराम.
कोकोनटला त्याच्या सारखेच भुभु आणले आहे खेळायला. डोळ्याभोवती तपकिरी पॅच आणि शुभ्र. आजकाल त्याला खेळणी वगैरे आणलेले कळते. आनंदाने उड्या मारत येतो.

कसला क्यूट फोटो आहे कोकोनट चा
कसला क्यूट फोटो आहे कोकोनट चा
माउईला पण गिफ्ट, खेळणी आणले की फार आनंद होतो. पण आता तो एन्टायटल्ड झाला आहे फार.
कोणीही बॅग घेऊन २ दिवस गावाला जाऊन आले की आत येताच त्याला खंडणी दिल्याशिवाय घरातच यायचे नाही असे हट्ट करतो! बॅगेवरच चढेल , तिथेच बसून राहील असे नखरे. आम्ही ही सपशेल मॅनिप्युलेट झालेलो आहोत. रिकाम्या हाताने गावाहून येण्याची हिंमत नाही, एकम्मेकाला आठवणही करतो. कोणी विसरलेच तर येताना कितीही थकले असले तरी घराजवळ डॉलर स्टोअर मधून तरी काहीतरी बारीकशी खंडणी घेतोच विकत.
थँक्यू मंडळी
थँक्यू मंडळी
सिंबाची वामकुक्षी
मस्त!
कोकोनट - कसला गोड फोटो आलाय. मला त्या फेमस झालेल्या झु मधल्या माकडाची आठवण झाली सॉफ्ट टॉय बरोबर खेळणारा.
माऊई उर्फ वसूली भाई
गोड किस्से
सिंबा, कोकोनट आणि माऊई एकदम
सिंबा, कोकोनट आणि माऊई एकदम डॅबिस गोड बाळं आहेत
माउई ला काल रात्री झोपायच्या
माउई ला काल रात्री झोपायच्या आधी नेहमीसारखे बॅकयार्ड मधे सोडले. पण दार उघडले आणि समोर पाहिले तर पॅटिओतल्या खुर्चीवर चक्क एक कोल्हा बसला होता मस्तपैकी आरामात! पण माउईलाही तेव्हाच तो दिसला. आणि त्याचे डोकेच आउट झाले. जोराजोरात गुरगुरत भुंकत तीरासारखा त्या कोल्ह्यावर धावून गेला! मी जाम घाबरले, कोल्ह्याने याच्यावर अटॅक केला तर काय! तो साधारण माउईच्याच साइज चा पण अंगाने अगदी लीन, बारीक. पण शेवटी तो जंगली प्राणी! मी धडपडत माउई स्टॉप स्टॉप नो नो करत जोरात ओरडत बाहेर गेले. पण माउई ने मला पूर्ण इग्नोअर मारले. तो कोल्हा बिचारा हल्ला बिल्ला न करता घाबरून पळत सुटला. माउई त्याच्या मागे सुस्साट सुटला! पूर्ण बॅकयार्डात चक्कर मारून शेवटी एके ठिकाणी फट दिसली त्यातून तो कोल्हा पळाला. माउईला त्यातून जाता येण्यासरखे नव्हते
पण तो तिथेच उभा राहून मागचे पाय घासून वगैरे अॅग्रेसिवली भुंकत होता. तो कोल्हा लांब गेल्यावर मग तिथे आणि अजून ४ ठिकाणी टांग वर करून बाउंड्री मार्क करून मग काहीच न घडल्यासारखा घरात आला! जाम टेन्शन दिले १-२ मिनिटासाठी.
बापरे!!
बापरे!!
maitreyee - एकदम जोरदार अनुभव
maitreyee - एकदम जोरदार अनुभव…. कोल्हे सहसा जोडीने वावरतात… हा एकटा होता म्हणून बरं झालं. कितीही झालं तरी ते जंगली प्राणी… चावला वगैरे तर रेबीजचा धोका असतो.
मागे एकदा सिंबा कायोटीवर धावला होता तेव्हा माझी अशीच त्रेधातिरपीट उडाली होती, त्यामुळे तुमची अवस्था मी समजू शकतो
कोल्हा बॅकयार्डमध्ये येतो वॉव
कोल्हा बॅकयार्डमध्ये येतो वॉव! आमच्याकडे डेलावेअरात, एक कोल्ही व तिची चार पिल्ले होती. मस्त झाडी होती. बेडरुमच्या खिडकीवर एक दोनदा काजवे पाहीलेत. लुकलुकायचे अंधारात.
हरितात्या- बाप रे कायोटी तर
हरितात्या- बाप रे कायोटी तर अजून डेन्जरस असतात, ते ग्रुप ने हल्ला करतात. इकडे फार क्वचित दिसतात पण आहेत. कोल्हे मात्र भटक्या कुत्र्यांसारखे केव्हाही दिसतात. माणसांना सरावलेत ते.
सामो, काजवे इथे खूप दिसतात. जुलै मधे साधारण २ आठवड्यासठी आजू बाजूचे ट्रेल्स वर अक्षरशः हजारोनी दिसतात, अतिशयोक्ती नाही अजिबात.
होय मै नक्कीच. जर्सी सिटी
होय मै नक्कीच. जर्सी सिटी मध्ये मध्यवर्ती शहरी भागात राहूनही आम्हाला काजवे दिसत मग तुमच्याकडे बॅकयार्ड वगैरे असलेल्यांकडे नक्कीच दिसत असणार.
Pages