भुभु आणि माऊ बाळांच्या गंमती जमती २

Submitted by आशुचँप on 14 August, 2022 - 16:47

https://www.maayboli.com/node/77227
पहिल्या धाग्याने २००० चा टप्पा गाठल्याने नवा धागा

==================================================================================

आपल्या बाळांच्या गमंती जमती, त्यांचे फोटो आणि किस्से मायबोलीकरांशी शेअर करण्यासाठी हा धागा. बाकीच्यांनी नुसता आनंद घ्यावा. तुम्हाला या बाळांचा त्रास झाला असेल, राग असेल तरी हरकत नाही पण तुम्ही तुमच्या तक्रारी वेगळ्या धाग्यावर टाकू शकता. ऑलरेडी तसा धागा आहे. इथे फक्त पॉझीटीव्ह गोष्टीच शेअर व्हाव्यात अशी इच्छा आहे.

हे वाचून कुणाला भूभू किंवा माऊ पालक व्हावेसे वाटले तर आनंदच आहे

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नव्या किस्स्याने सुरुवात करतो

आमच्याकडे पोळ्यांसाठी मावशी येतात. त्यांनाच आम्ही ओड्यासाठी भाकऱ्या बनवायला सांगतो. त्या मस्त मोठाल्या जाडजूड भाकऱ्या थापून देतात. आणि या भाकऱ्या त्याच्या वेगळ्या डब्यात ठेवलेल्या असतात. आमच्या पोळ्यांचा डबा आहे तसाच पण त्याला तो आता कळतो.

तर गेल्या आठवड्यात आईची एक मैत्रीण जेवायला आलेली. त्यांनी आईला ताटे वगैरे घ्यायला मदत केली. आणि चूकून ओडीनचा डबा उघडला. त्यांना वाटलं आज खास बेत असेल बहुदा भाजी भाकरीचा. त्यांनी आपल्या आणि आईच्या ताटात वाढली अर्धी अर्धी. ते बघताच चिरंजीव आलेच धावत. बरं त्या नेहमी येणाऱ्या त्यामुळे ओडीनची सवय होती. त्या म्हणे काय झालं तुलाही भूक लागली आहे का. तर भुंकायलाच सुरुवात केली. त्यांना काही कळेच ना. आई तोवर स्वयंपाक घरात होती. त्या म्हणायला लागल्या अगं हा ओडीन माझ्या अंगावर का भुंकतोय. नाही म्हणलं तरी गांगरल्या थोड्या.

आईने बाहेर येऊन पाहिलं तर कळलं. ती म्हणे अगं त्या ओड्याच्या भाकऱ्या आहेत. आपल्या वेगळ्या डब्यात आहेत. मग त्यांनी बिचाऱ्यांनी ताटातल्या परत डब्यात ठेवल्या, त्याला दाखवून डबा बंद केला तरी ऐकेना. शेवटी अर्धी भाकरी दिल्यावर मग शांतपणे टेबलाखाली जाऊन बसून खाल्ली.

मी नव्हतो हे झालं तेव्हा, आईने सांगितल्यावर म्हणलं बघु मला काय करतो. मग रात्री त्याच्या डब्यातली चतकोर भाकरी घेतली आणि जेवायला सुरु केली. त्याचे लक्ष होतेच पण माझ्यावर भुंकायची डेरींग नव्हती. मग चुळबुळ करत समोर उभा राहीला, तरी लक्ष दिले नाही तर मांडीवर पंजा ठेऊन सांगितले, बाबा बहुतेक तु माझी भाकरी खातोयस. तरी मी दाद दिली नाही म्हणल्यावर मग जाऊ दे, ऐश कर, माझी भाकरी तुला दिली, आपलाच आहेस असं दाखवत निघून गेला.

मग चुळबुळ करत समोर उभा राहीला, तरी लक्ष दिले नाही तर मांडीवर पंजा ठेऊन सांगितले, बाबा बहुतेक तु माझी भाकरी खातोयस. तरी मी दाद दिली नाही म्हणल्यावर मग जाऊ दे, ऐश कर, माझी भाकरी तुला दिली, आपलाच आहेस असं दाखवत निघून गेला. << हाहाहा

>>>>>>>>बाबा बहुतेक तु माझी भाकरी खातोयस.
हाहाहा

आजी मोड ऑन...
पाहिलं का, कसे सगळे कळते हो त्याला... आपलाच बाबा आहे, त्याने खाल्ली भाकरी तर चालते हो... बाहेरच्यांनी मात्र नाही हो खायची...

आजी मोड ऑफ

हाहाहा, आज्जी चे काय विचारू नका
आल्यागेल्या सगळ्यांना कौतुक सांगून झालंय या गोष्टीचे

त्यांची गम्मत म्हणजे ओडिनला काही खायला दिल की तो टेबलाखाली जाऊन बसतो
त्याची ही सवय आजीला माहितीये
त्यामुळे तिच्या मैत्रिणी आल्या की ती ओडिन ला सांगते, ऑडी हा खाऊ घे आणि ते तिकडे टेबल खाली बसून खा

तो तिकडे गेला की सगळ्यांना आश्चर्य
बाई ग, किती समजतं त्याला तुझं बोलणं Happy

आईला म्हणलं त्याला बडे गुलाम अली ची रेकॉर्ड पण आणायला शिकव Happy

त्यामुळे तिच्या मैत्रिणी आल्या की ती ओडिन ला सांगते, ऑडी हा खाऊ घे आणि ते तिकडे टेबल खाली बसून खा << हाहाहा मस्त ट्रीक

पहिला आणि हा दोन्ही धागे स्ट्रेसबसटर आहेत.
न चुकता वाचतो.
सगळे भुभु आणि माऊंच्या खोड्या वाचताना संपूर्ण चलचित्र डोळ्यासमोर दिसतं.
मध्येच आजारी ओडिन आणि दुसऱ्या भुभु ने चावल्यामुळे त्रास झालेला स्नो हे वाचून वाईट वाटले.
आता बरे आहेत वाचून परत छान मूड एकदम.
Relate होतं वाचताना.

तरी मी दाद दिली नाही म्हणल्यावर मग जाऊ दे, ऐश कर, माझी भाकरी तुला दिली, आपलाच आहेस असं दाखवत निघून गेला.

>>>>

Lol

आशुचँप,
भाकरीचा किस्सा मस्त आहे ! बाकी, आपले भू भू पंजा आपल्या हातावर किंवा मांडीवर ठेऊन आपल्यापर्यंत जे काही पोचवतात ते त्या त्या वेळच्या परिस्थितीनुसार वेगवेगळं असू शकतं. तुम्हालाही अनुभव असेलच. या शक्यता बघा Happy
१.हे माझं आहे ( बहुतेक एखादं खेळणं). तू का घेतोस ? ( किंवा तुमचा भाकरीचा किस्सा लागू होतो इथे.)
२.मला कंटाळा आलाय. माझ्याबरोबर खेळ.
३.मला झोप येतेय. थोडं मानेखाली खाजवून दे की. माझं पोट पण दे जरा चोळून ( belly rub )
४.मला शी / सू करायला जायचं आहे. आत्त्ता !
५.मला बाहेर टंगळमंगळ करायला जायचं आहे. घरात फार कंटाळा आला आहे.
६.जेवण झालं पण नेहमीचा खाऊ ( ट्रीट ) कुठे दिलास अजून ? विसरलीस / विसरलास का ?
७.घरासमोरून जेनी/टॉमी (जो कोणी मित्र /मैत्रीण असेल ती /तो ) जाताना पाहिलं मी खिडकीतून आताच. मला पण ने तिच्याशी / त्याच्याशी खेळायला ..
८.सोफ्यावरची ही माझी नेहमीची जागा आहे. तू दुसरीकडे बस बरं!
९.मला वरच्या खोलीत जायचंय माझं खेळणं आणायला पण दादाने / बाबाने दार बंद केलंय ( त्यांची मीटिंग असावी. स्नोला त्याची खेळणी समोर लागतात. एखादे जरी नजरेआड झालं आणि नंतर आठवलं की शोधून काढल्याशिवाय स्वस्थ बसत नाही. )
१०. माझी जेवणाची वेळ झाली आहे. मला वाढ लवकर!
११…..
आता इतरांनी पण भर घाला या यादीत Happy

अरे वा ! धागा जोरदार चालु आहे. मी आज बऱ्याच दिवसांनी आले तर पहिल्यांदा हा धागा शोधुन सगळे प्रतिसाद वाचुन काढले. भरपुर खुषी आणि थोडे गम वाले किस्से वाचुन मजा आली. सगळी आजारी बाळ बरी आहेत आणि सगळी खोडकर बाळ आपली कामं जोरदार चालु ठेवून आहेत हे पाहून बरं वाटलं.

अमा, अश्विनी११, तेजो, ओडीनचे बाबा, आपल्या डॉग गटगचं काय झालं? ठरवा ना लवकर. माझ्याकडे फोन नंबर्स नाहीत नाही तर मी एव्हाना ठरवुन काय उरकून टाकलं असतं.

हा किस्सा मी आधी लिहिला की नाही आठवत नाही पण आमचा एक बोका होता विट्या आमच्या घरी पूर्वी लोखंडाची खाट होती आणि तो नेहमी त्या खाटेवर कोपऱ्यात बसायचा अगदी पंख्याखाली . ती खाट आम्ही विकली तेव्हा त्याला त्याची नेहमीची जागा कुठे गेली म्हणून 'म्याऊ' लागला जणू काही तो विचारात होता कि माझी खाट कुठे गेली? आम्हाला काही कळेना हा त्या खाटेच्या जागेवर गोल गोल फिरत का बरं जोर जोरात म्यावतो आहे ??? थोड्या दिवसाने आम्ही नवीन सोफा कम बेड घेतला आता तो रात्रीच पूर्ण उघडून ठेवणार व दिवसा सोफा। तर विटोबा आधी निषेधाचे म्याऊ लागले आणि मग त्यांनी टुणकन सोफ्यावर उडी घेतली अंदाज घेतला कि या जागेवर हवा लागते कि नाही वैग्रे व मस्तपैकी ताणून झोपून गेले आणि हे पुढे रोजचेच होणार होते .

दर वेळेस माबोवर आले की असे वाटते - या धाग्यावर 5-6 तरी पोस्ट असाव्यात....
जरा जास्त हावरटपणा होतोय का ?? Happy

चंद्रा - अगदी अगदी ditto
8 नंबर सोडून

त्याला रिप्लेस म्हणजे - माझा बॉल कॉटखाली गेलाय तो काढून दे
त्यांचं त्यावर भुंकण्याचे काय लॉजिक आहे कळत नाही
बऱ्याच व्हिडिओत पण पाहिलं आहे मी, युनिव्हर्सल आहे

कॉट खाली गेलेला बॉल आपण भुंकल्यावर आपोआप बाहेर येईल असं त्यांना वाटत असावं का? Happy

धनवंती - मी तर रोज च काहिनाकाही टाकू शकतो पण लोकं कंटाळतील म्हणून कंट्रोल करतो

लिही रे आशु
हे खरं घडलेलं वाचायला मजा येते.
बाकी धाग्यांमधलं वाढीव मी मी आणि मी वाचवत नाही.

मी तर रोज च काहिनाकाही टाकू शकतो पण लोकं कंटाळतील म्हणून कंट्रोल करतो>>> अरे अजिबातच नाही. ओड्याचे किस्से कितीही आले तरी आवडतील मलातरी. टायपाचा कंटाळा म्हणून प्रतिसाद देत नाही जास्तकरून पण नवीन प्रतिसाद आला की लगेचच धागा उघडून पाहते.

Pages